Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 07, 2008

Hitguj » Views and Comments » Current Affairs » UP/Bihar Versus Maharashtra: punha ek raajkaaraN » Archive through February 07, 2008 « Previous Next »

Shyamli
Thursday, February 07, 2008 - 6:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एखाद्या गुन्ह्यानंतर पोलिस पथके तातडीने युपि, बिहारला रवाना होतात हे कसले लक्षण आहे >>>>
कबुल, पण एकानी गाय मारली म्हणुन आपण वासरु मारण्यात कुठला शहाणपणा आहे? मग माणुसकी कशाला म्हणायच? ज्यांना मारहाण केली गेली ते तर गुन्हेगार नव्हते,गुन्हेगारांना शोधुन ठोका की नाही कोण म्हणतय? पण तेवढा वेळ कोण घालवणार? एवढी मेहनत कोण करणार? कमीतकमी वेळात जास्त पब्लिसिटी करण्याचा सगळ्यात सोपा मार्ग एवढ एकच कारण दिसत या कृतीमागे.

त.टी.-मी शीवसेना , म. न.से. समर्थक अथवा विरोधक अजिबात नाही

Ladtushar
Thursday, February 07, 2008 - 7:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणखी एक ई-मेल
मराठे बना! मारटे नव्हे!

क्रमश

Ladtushar
Thursday, February 07, 2008 - 7:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



Raviupadhye
Thursday, February 07, 2008 - 8:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असल्या भडक आणि एककल्ली लिखाणानेच सदसद्विवेक बुद्धीचा बळी घेतला. चान्गले लोक प्रत्येक प्रान्तात असतात हो.देशभक्त शिवाजी होतेच पण लाजपत राय ही होते,भगतसिंह ही होते अन राज ठाकरेला त्या पन्क्तीत बसवण्याचा मूर्ख पणा करू नका.

Raviupadhye
Thursday, February 07, 2008 - 8:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लाड तुषार वरील भाष्य तुमच्या मेलला उद्देशून नाही.
पण काही गोष्टी खटकल्या.सन्त परम्परा प्रत्येक भाषेत आहे, अती उत्तम गायक ही जसराज पासून बडे गुलामांपर्यन्त आढ्ळतात.जाज्ज्वल्य देशाभिमान असलेली माणसे प्रान्तीयतेच्या भाराखाली दबत नाहीत अन इतरांना दाबत नाहीत. नामदेवानी पन्जाबात जावून पन्जाबी रचना केल्या.त्यानी दुराभिमान बाळगला नाही.वृक्ष वल्ल्यंवर प्रेम कबीरानी केले अन उड जा रे कागा हा सन्देश मीरेने ही पक्षावरील प्रेमाने पाठवीला. ज्ञानेश्वरानी हे विश्वची माझे घर ची सन्कल्पना केली ती मूळ रचना सन्स्कृतात होती. त्यामुळे या वैश्विकरनाच्या युगत सन्कुचित मनोभाव सोडुन आपली ज्ञान व skill सम्पदा कशी competitive होते ते बघा. जय भारत


Raviupadhye
Thursday, February 07, 2008 - 8:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नवी दिल्ली, ता.०६ - संगीताला देश, धर्म,सीमा वगैरेची बंधनं नसतात. सात सूर सर्वत्र सारखेच आहेत. याचा प्रत्यय "सरहदे' या लवकरच प्रकाशीत होणाऱ्या गझलच्या अल्बममुळे येणार आहे. लता मंगेशकर आणि मेहदी हसन, हे भारत पाकिस्तानच्या संगीतविश्‍वातील हे दोन ध्रुवतारे यानिमित्ताने प्रथमच एकत्र गाताहेत. .......
आजचे आघाडीचे तरूण संगीतकार मयुरेश पै यांनी संगीतबध्द केलेला "सरहदे' येत्या एप्रिलच्या आसपास रसिकांच्या भेटीला येईल. या अल्बममध्ये दोन्ही देशांतील आघाडीच्या कलाकारांना एकण्याची संधी रसिकांना मिळणार आहे.

गानसम्राज्ञीबरोबर गाण्याची मेहदी हसन यांची दीर्घकाळापासूनची इच्छा. ती या अल्बमच्या निमित्ताने पूर्ण होते आहे. "तेरा मिलना बहोत अच्छा लगे....' हे या गझलचे शब्द आहेत. "सरहदे' या अल्बममध्ये भारत-पाकमधील आठ नामवंत कलाकार एकत्र येत आहेत. यात लतादीदी व मेहदी हसन यांच्यासह गुलाम अली, सुरेश वाडकर, आबीदा परवीन यांचाही समावेश आहे.

आपकी दिल्लगी
श्री. पै हे सुरेश वाडकर यांचे शिष्य. या शिष्याने आपल्या गुरूकडूनही गझला गाऊन घेतल्या असून "आपकी दिल्लगी' नावाचा नवा अल्बम, येत्या आठवडाभरात प्रकाशित होणार आहे. श्री. वाडकर यांनी "सकाळ' ला सांगितले की ""या सर्वच गझलांचे संगीत उत्तम असून माझा शिष्य इतकं चांगलं संगीत देऊ शकतो, याचा मला अभिमान वाटतो.'' ते म्हणाले की मयूरेश याची स्वराची जाण, त्याला मिळालेले प्रतिभेचे वरदान आणि मुख्य म्हणजे त्याचा नम्रपणा व कायम शिकण्याची वृत्ती हे गुण आजच्या तरूण पिढीने घ्यावेत असेच आहेत. यातील "आपकी दिल्लगी नही जाती..'ही गझल गायला कठीण अशी होती. मध्य सप्तकाच्या षडजापर्यंत गेलेल्या या स्वररचनेत मयूरेशने अनोखे रंग भरले आहेत.... गाताना मजा आली, असेही वाडकर यांनी नमूद केले. तर श्री. वाडकर यांचे रेकॉर्डींग हीदेखील माझ्यासाठी एक शाळाच होती. त्यातून खूप शिकायला मिळाले अशी भावना श्री. पै यांनी "सकाळ'जवळ व्यक्त केली.

व्हॅलेंटाईन डेच्या आसपास रसिकांच्या भेटीला येणाऱ्या आपकी दिल्लगी मध्ये श्री. वाडकर यांचे गुरू पं. जियालाल वसंत, कैसर उल जाफरी, कृष्णमोहन, चंद्रशेखर सानेकर यांच्या सात "तरूण' गझला आहेत. तरूण अशासाठी की या सर्व गझला एका तरूण संगीतकाराने तरूण पिढीला डोळ्यासमोर ठेवून "बांधल्या' आहेत. यातील एका गझलचे शब्द आहेत

"वादा जरूर करते है, आते कभी नही।
और ये भी चाहते है, शिकायत ना हो।।

कोणत्याही काळातील प्रेमीजनांची ही सारखीच भावनाच असेल, नव्हे का ?




Giriraj
Thursday, February 07, 2008 - 9:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनसे ने सुरवात फ़ार चांगली केली पण त्याची फ़ळे दिसेनात त्यामुळे बौद्धिक दिवाळखोरी जाहीर करून शेवटी झटपट प्रसिद्धीचा मार्ग स्वीकारला. दीर्घकालीन गुंतवणूक करण्याईतकी सहनशक्ती नाही दाखव आजकाल कुणी! असल्या प्रकारांनी फ़ुटीरतेला खतपाणीच मिळेल भारतात!
रंगवलेल्या कोल्ह्याची गोष्ट का बरे आठवतेय?? सगळेच तर रंगवलेले दिसताहेत!


Satishbv
Thursday, February 07, 2008 - 9:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बहुतेक माझ्या post कुणालाच रुचलेल्या दिसत नाही.
ही मात्र सर्वांना आवडेल. :-)


Jhuluuk
Thursday, February 07, 2008 - 9:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाढती लोकसंख्या आणि वाढती बेरोजगारी या मुंबईच्या मुळ समस्या आहेत असे मला वाटते.
त्यातुन मुंबई ही ७ छोट्या छोट्या बेटांनी बनली आहे. या शहराच्या जडण्-घडणीत भौगोलिक बाजुही जमेत घ्यायला हवी.
आपण या आधी दर पावसाळ्यात ड्रेनेजचे प्रॉब्लेम्स बघितलेच आहेत.
कुठेतरी लोकसंख्येला आळा बसावा आणि त्याप्रमाणे शहरात बांधकामही नियंत्रित व्हावे.
हवाई बेटांवर निसर्ग सौंदर्य जपण्यासाठी आणि भौगोलिक संतुलन राखण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. तिथे येणार्‍या पर्यटंकावर नियंत्रण राखले जाते.
मुंबई अगदी सुंदर वगैरे नसली तरी औद्योगिक राजधानी असल्याने भारतामध्ये तिला विशेष स्थान आहे आणि तिची प्रगती व्हावी अशी ईच्छा असल्यास सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकिय दर्जाकडे विशेष लक्ष द्यायला हवे. इथे लोकसंख्येवर नियंत्रण ठेवायला हवे. इथला सर्विस क्लास- मिडल क्लास/ पांढरपेशा वर्ग सगळे मिळुन एक संस्कृती निर्माण करतात. पण ईकडे येणारे U.P. बिहारवाले ही संस्कृती जोपासु शकतात का? ते काही मोलाची भर टाकतात का?
नाही, मला नाही वाटत ते काही भर टाकतात. जर तुम्ही छोटे-मोठे गुन्हे बघितले तर कितीतरी असे लोक बघाल 'मुळ रा. बिहार' / 'मुळ रा.उ. प्र.'
हे सुद्धा बरोबर आहे की गुन्हेगारी ही वृत्ती आहे आणि ती प्रदेशानुसार बदलत नाही. पण प्रदेशानुसार प्रमाण नक्कीच बदलते. अहो, लखनौ-कानपुर सारख्या शहरात सुद्धा अरे ला का रे झालं कि लगेच रस्त्यात भांडणं होतात, तलवारी निघतात. पण आता हे प्रमाण पुण्या-मुंबईला पण वाढतय बघुन काळजी वाटते. कुठे गेली सगळ्यांची सद्-सदविवेकबुद्धी?

जर लालु रेल्वेमंत्री झाल्याबरोबर बिहारहुन मुंबईला येणार्‍या २ गाड्या सोडु शकतो, तर ते चांगलेच आहे. पण महाराष्ट्रात रेल्वे भरती व्हायला गाड्या भरुन लोक येणार असतिल तर ते चुक आहे. महाराष्ट्रियन लोकांना first prefernece मिळायलाच हवा. फार तर फार out of Maharashtra जागा काही % मध्ये राखुन ठेवाव्यात. इंजिनिरिंग ला प्रवेश मिळवताना कशा जागा असतात oms साठी तशा! आणि बाकी राज्यातही अशा काही राज्येतर जागा ठेवाव्यात out of that state साठी!
दिल्लीमध्ये पण असे काहीतरी नियंत्रण ठेवायला हवे.

फक्त या गोष्टीचे वाईट वाटतेय कि निरपराध लोकांना मारण्यात आले. ज्यांना काही कारणही कळले नसेल. विशेष म्हणजे मारणार्‍यांना तरी काय माहित होते कुणास ठाउक!
दिवसाला रु.५०० देउन निवडणुकीच्या आसपास सर्रास असली कामे होतात!!!!!!!!!!!
असे रस्त्यावर उतरुन एवढे मोठे प्रश्न सुटतात का? उद्या बाकिच्या राज्यातुन, देशातुन मराठी माणसाला पिंजुन बाहेर काढले/ कामावरुन हाकलुन दिले, मारहाण केलीतर चालेल का???


Ladtushar
Thursday, February 07, 2008 - 10:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रवि तुमचे म्हणने पटते!
कलाकाराला सीमा बांधून ठेवत नाहीत! राजकर्त्यानी च या आखाल्यात.

बाकी मात्र गझल सही आहे...
"वादा जरूर करते है, आते कभी नही।
और ये भी चाहते है, शिकायत ना हो।।

Ashwini_k
Thursday, February 07, 2008 - 10:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मागे वर्तमानपत्रात वाचले होते की मुख्यमंत्री विलासराव पाटिलांनी देखील मागणी व्यक्त केली की बाहेरून येणार्‍या लोंढ्या मुळे मुंबै व एकंदर महाराष्ट्राच्या नागरी सुविधा, कायदा सुव्यवस्था आणि राज्याचा निधी यावर ताण पडत आहे व तो ताण आता महाराष्ट्र सोसू शकत नसल्याने ज्या राज्यांतून माणसे येत आहेत त्या राज्यांनी महाराष्ट्रास निधी द्यायला हवा.

बाहेरून महाराष्ट्रात येणार्‍याचे व महाराष्ट्रातून बाहेर जाणार्‍यांचे प्रमाण व्यस्त आहे. त्यामुळे ही तुलना होऊ शकत नाही.

त्याचबरोबर मारहाणीने प्रश्न सुटणारच नाही (बिहार, उत्तर प्रदेशात मारहाण ही कबड्डी, गोट्यांसारखी खेळली जाते, कोणाचा राग आला की गोळी झाडली जाते उ.प्र. येथील लखीमपूर येथील पेट्रोल पम्प माफ़ियांच्या गोळीला बळी पडलेला कर्तव्यदक्ष मंजूनाथ आठवा! तो IIM, IIT मधून शिकलेला होता, त्याला मुंगीसारखा चिरडला होता.)

त्यापेक्षा दुसर्‍या राज्यांमध्ये नोकरी, व्यवसायाच्या सुसंधी व सक्तीच्या शिक्षणावर जोर दिला तर लोंढे येणे कमी होतील असे वाटते.


Ashusachin
Thursday, February 07, 2008 - 2:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Jhuluk - तुमचे म्हणने पटले!

"फक्त या गोष्टीचे वाईट वाटतेय कि निरपराध लोकांना मारण्यात आले. ज्यांना काही कारणही कळले नसेल. विशेष म्हणजे मारणार्‍यांना तरी काय माहित होते कुणास ठाउक!"


Vinaydesai
Thursday, February 07, 2008 - 3:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा प्रश्न तेवढा सोप्पा नाही...

बिहारमध्ये गुंडागर्दी, राजकीय अस्थिरता, बड्या धेंडांची शिरजोरी, जाती वरून मारामार्‍या अश्या अनेक भानगडी आहेत, त्यामुळे ही माणसं मुंबईकडे धावतात...

चांगल्या शिकलेल्या आणि नोकरीधंदा असलेल्या माणसांनाही तिथे असुरक्षितच वाटते, त्यामुळे पोटापाण्याचा धंदा असूनही 100% खात्री नाही.. अराजकता ही तिथल्या राजकारण्यांची जबाबदारी आहे त्यामुळे हा प्रश्न एकतर्फी सोडवता येणारा नाही..

दोन किस्से:

1. Pricewater House, Australia चे काही Consultant कुणाला (गमतीत) धमकी द्यायची झाली तर 'बिहारला' पाठवू का? असं म्हणायचे...

2. लालूच्या डॉक्टरची Merc चोरीला गेली, ती लालूने परत मिळवून दिली, आणि त्याबद्दल त्याने डॉक्टरकडून पाच लाख वसूल केले, (हा किस्सा अगर विनोद) सगळ्यांनी ऐकला असेल..

अजून एक गोष्ट म्हणजे ही माणसं (मनुष्य स्वभावाप्रमाणे) बिहार मध्ये असे काम करायला तयार नसतात.. जमशेदपूरला कारखान्यात दोन तीन तास काम करून मग आरामात झोपतात. आणि कुणी हटकले की लगेच 'चाकू सुरे' घेऊन मारामारी, हा ही प्रकार वाचनात आलाय... (स्थलांतर झालेला माणूस जसे काम करतो, तसा स्थानिक करत नाही.. विचार करण्यासारखे आहे)


Zakki
Thursday, February 07, 2008 - 4:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी १९६४ मधे (म्हणजे तुम्ही सर्व जन्मण्यापूर्वी) जमशेदपूरला लोखंडाच्या प्रकल्पात काम करत होतो. तिथे सुद्धा बंगाली लोकांचे हेच म्हणणे, की बिहारी लोक मूर्ख आहेत, कामचुकार नि आळशी आहेत. पण बंगाल्याला वरची जागा मिळाली की मग दंगल करतात!

पण त्याच वर्षी जेंव्हा हिंदू मुसलमान दंगा झाला तेंव्हा याच बिहार्‍यांनी वेचून वेचून मुसलमान मारले. बंगाली काही सगळेच क्रांतिकारक नसतात. बरेचसे अगदी 'भावूक' हळव्या मनाचे असतात.

मग ते मुंबईत येऊन कसे बुवा काम करतात?




Ashusachin
Thursday, February 07, 2008 - 4:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भारतीय घटनेने कुणालाही कुठेही जाउन राहन्याचा अधिकार दिला आहे. पण कसेही राहण्याचा अधिकार दिला नाही. जेव्हा जेव्हा स्थानिकाना त्रास झाला. तेव्हा सर्वत्र उद्रेक झाला.स्थानिकाना त्रास होइल आसे वागु नये. आता त्रास म्हण्जे
काय ते कसे ठरवावे?

Avinash_kale
Thursday, February 07, 2008 - 7:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राज ठाकरे यांची ओरड अगदी १००% खरी आहे. कदाचित त्यांचा मार्ग लोकांना चुकिचा वाटत असेल. पण खरच आपण जे काहि वृत्तवाहिन्यांवर पाहत आहोत ते घदल आहे का? प्रश्न पडन्याचे कारण असे की एकच घटन गेले काहि दिवस हे लोक दाखवत आहेत काही ठिकानी तर मारहाण करनारे तोंडाला रुमाल बान्धुन आहेत यामगचे कारण संशयास्पद वाटते त्यामुळे झाल्या प्रकारची पुर्ण जबाबदरी राज ठाकरेंवर टाकणे योग्य होत नाही.
मी गेल्या ३-४ वर्षांपासुन मुम्बैकरांच्या बरोबर शिक्षण घेत आहे बहुतेकांची नावे ऐकल्यास मुम्बैत नक्की मराठी लोक राहतात का? असा प्रश्न पडतो? यावर कडी म्हणजे हे जे कोनी तथकथित मुम्बैकर आहेत ते मराठी माणुस म्हनजे घरची कामवाली बाई वगैरे आहेत असाच अविर्भाव आणतात.तीच गोष्ट हिन्दि चित्रपटात बावळट पांडु हावलदार मराठी घरी काम करनारि बाई मराठी पण तेच कधि लालु हावलदार किंवा कमलाबेन ऐकले नाहि. तळपायाची आग मस्तकाला जाते. काय समजता तरी काय अम्हाला? खरोखर मराठी माणसाचा श्वास आता गुदमरतोय. राज तुम्हाला पुर्ण पठिंबा ...पण मारहाण हा उपाय ठरु शकत नाहि एवढेच सांगणे.. आणि बेकायदेशीर बांग्लादेशींची तर खुशाल प्रसाद देऊन पाठवनी केली तरी योग्य !

Arch
Thursday, February 07, 2008 - 7:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मागे वर्तमानपत्रात वाचले होते की मुख्यमंत्री विलासराव पाटिलांनी देखील मागणी व्यक्त केली की >>

अश्विनी, विलासराव देशमुख, पाटिल नाही. बाकी चालू द्या तुमच.

Uday123
Thursday, February 07, 2008 - 7:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अविनाश: मराठी भाषा/ लोकं यांना कमी दर्जाची वागणुक मिळते म्हणुन तुम्हाला होत असलेल्या वेदना योग्य अहेत्/ समजु शकतो. पण म्हणुन राज हा काही आशेचा किरण नाही आहे (तसे असल्यास भविष्यात निराशा होइल). राज चे काही गणितं चुकली असतील्/ आहेत आणी म्हणुन त्याने आता डरकाळी फ़ोडली. काही काळानंतर हे सर्व (गैर)समज दूर होणार आहेत. हा सर्व 'राज'कारण्यांचा ढोंगीपणा आहे, आणी सामन्य माणुस नेहेमीप्रमाणे भरडला जातो.

शिवसेना देखील एकेकाळी मराठीचा कळवळा आहे असे दाखवायची, पण राज्यसभेवर उमेदवार पाठवतांना (केनिया, निरुपम...) त्यांचं मराठी प्रेम कमी पडायचे.



Ashusachin
Thursday, February 07, 2008 - 8:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इतर लोक ज्या प्रकारे कामे करतात तशी आमची मराठी लोक करु शकले असते तर मराठी माणुस म्हनजे घरची कामवाली बाई,बावळट पांडु हवलदार वगैरे आहेत असा अविर्भाव असता का?

Chinya1985
Thursday, February 07, 2008 - 10:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राज हे फ़क्त राजकारण करतोय बाकी काही नाही. मला या मारामार्‍यांमागचा मुद्दाच कळला नाहिये. जर मराठी माणसांवर हल्ले व्हायला लागलेत,हक्कांवर गदा येतेय असे काही झाले असते तर असा प्रतिसाद देणे ठीक होते पण सध्या विनाकारण हे सगळ होतय. दुसर म्हणजे अमिताभला उगाचच यात गोवलय. अमिताभने निवडणुक १७-१८ वर्षापुर्वी लढवलिय मग राज आत्तापर्यंत गप्प का होता??मुंबईत शाळा का नाही काढली म्हणतोय पण राजही चांगलाच श्रीमंत आहे त्याने का नाही अशी शाळा काढली??अमिताभ जर महाराष्ट्राचा ब्रॅन्ड ऍम्बॅसेडर झाला असता तर हाच राज म्हणाला असता की युपीवाल्याला कशाला बनवला,आपल्याकडे काय कलाकार नाहीत??? उध्दव शिवसेना बुडवणार अशी जी एक ओरड राज,राणेनी केली होती ती आता चुकिची ठरलिय कारण शिवसेनेला सपोर्ट मिळतोय,सध्या मोर्चे,आंदोलने यांना चांगला प्रतिसाद मिळतोय.शिवसेना निवडणुकाही जिंकतेय. त्याच्या नेमक विरुध्द म्हणजे राजची परिस्थीती होती,तो तर गायबच होता,त्याचे कार्यकर्ते ऑर्कुटवर मधुन मधुन तक्रार करत की आपण काहीच का करत नाही वगैरे. त्यामुळे काहीतरी करुन पब्लिसिटी मिळवावी म्हणुन त्याने हा मार्ग पत्करला. पण परप्रांतियांनी आपली संस्कृती पत्करलीच पाहिजे,आणि तीचा मान राखलाच पाहिजे. आमच्या घरात रहायला आलेल्या पाव्हण्याने आम्हालाच घराबाहेर काढायला नको. सध्या ज्या मारामार्‍या होत आहेत त्या पुर्णपणे चुकिच्या आहेत असही म्हणता येत नाहि पण याने प्रश्न सुटणार नाही. त्या लोकांना स्वत्:च्या राज्यात काही कामधंदा नाही त्यामुळे ते कुठलीही रिस्क घेऊन मुंबईत येणारच. किती दिवस तुम्ही त्यांना मारणार??काही मुद्दा झाल्यानंतर हे झाल असत तर बर झाल असत. शिवाय हा मुद्दा सोडवताना महाराष्ट्राबाहेरील मराठी माणसांना त्रास होणार नाही ना याची काळजी घ्यायला हवी. कुठल्याही प्रादेशिक सणाला विरोध करु नका,अरे अविनाश आपण आपले सण किती मोठ्या प्रमाणात इथे साजरे करतो त्याला इथल्या लोकांनी विरोध केला तर ते बरोबर आहे का?? तस शिवसेनेनी राडा करण सोडलय ते तस बर केलय.

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators