Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 07, 2008

Hitguj » Views and Comments » Current Affairs » A » Archive through February 07, 2008 « Previous Next »

Aashi
Tuesday, February 05, 2008 - 6:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान माहिती मिळतेय तुमच्या ह्या चर्चेमुळे. हे सगळे कधी माहितच नव्हत!

Sumedhad
Wednesday, February 06, 2008 - 11:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार, संतु तुमचा बराच अभ्यास दिसतो आहे. नेहमीच अकबराला एक दिलदार राजा म्हणुन समोर आणले आहे. अकबर बिरबल कथा मधुन अकबर लहान मुलात पन popular आहे. याला काय कारणे असु शकतिल?

Santu
Wednesday, February 06, 2008 - 12:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा पोस्ट चुकुन तिकडे पडला आता इकडे घेतला आहे.
text/plain
Edit Post.htm (16.7 k)


Kedarjoshi
Wednesday, February 06, 2008 - 7:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संतु विथ ड्यु रिस्पेक्ट अरे तशी भाषा का वापरतोस? त्यामुळे तुला जे सांगायचे आहे ते निट पोचत नाही आणि तु भडक माथ्याचा ठरतोस. मूळात तुझा ईतीहासाचा अभ्यासही चांगला आहे मग थोडी भाषा मवाळ वापर की.

राजपुत लोकांनी अकबराला जोधा नावाची सुन होती बायको नाही असे प्रतिपादन केले आहे. ( लोकसत्ता पहील्या पाणावर)

सुमेधा अकबराच्या दरबारात बिरबल हा होता पण त्या सर्वच कथा खर्या नसाव्यात. नंतर काही लोकांनी अकबर बिरबल च्या नावावर मजेशीर कथा रचल्या असाव्यात. ( जसे आपण संटा बंटा च्या नावावर रचतो)


Asami
Wednesday, February 06, 2008 - 10:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोकप्रभामधे आशुतोषची मुलाखत आहे ती वाचली का ?

Santu
Thursday, February 07, 2008 - 6:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असामी कुठल्या अकात हि मुलाखत आहे.?

केदार अरे खरच अकबर फ़ुल्या फ़ुल्या फ़ुल्या होता आता याला
पर्यायी शब्द तरी कोणता?


Santu
Thursday, February 07, 2008 - 6:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुमेधा
अग बिरबल अकबर च्या सर्व कथा कपोल कल्पित आहेत.
जसे झैलसिंग बद्दलचे विनोद.
अबुल फ़जल किवा बदायुनी यांच्या कुठल्या हि तत्कालिन बखरित
या बिरबल चतुरकथा कथांचा उल्लेख नाहि.
हा बिरबल पुढे एका अफ़गणिस्तान च्या लढाईत मारला गेला.


Mi_anu
Thursday, February 07, 2008 - 6:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अकबर ह्रितिक प्रमाणे देखणा वगैरे नव्हता हे मीही वाचले आहे. अर्थात जोधा अकबर चा मुख्य उद्देश प्रेक्षकांना पाहायला आवडणार्‍या गोंडस बाहुला बाहुलीला घेऊन त्यांच्या हावभावांना सूट होणारी कथा लिहून चित्रपट काढणे हा असेल तर अकबर मूळचा कसा होता या गोष्टी गौण ठरतात. आय होप की प्रेक्षकांकडे चित्रपट रंजक करण्यासाठी वापरलेला मीठमसाला ओळखण्याइतपत अक्कल असेल.तसेही अकबर बिरबल कथा नीट वाचल्या तर अकबर हा जरा भडक डोक्याचा माणूस असून बिरबल त्याला युक्तीने हाताळून जे पाहिजे ते मिळवत असे असे वाटते.
गोवारीकरांना चित्रपट ट्याक्स फ्री वगैरे करायचा असल्याने हा विषय निवडावा लागला असावा असा माझा अंदाज.


Slarti
Thursday, February 07, 2008 - 7:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही ती मुलाखत
गोवारीकरची मुलाखत
काय दाखवायचे आणि का दाखवायचे हे एकदम स्पष्ट आहे त्याच्या डोक्यात. कुठे संदिग्धता नाही.

Kedarjoshi
Thursday, February 07, 2008 - 4:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हं वाचली आत्ता.
संतु ने लिहील्या प्रमाने आशुतोश ने अकबरनामा व ऐने अकबरी ला मुख्य प्रमान माणले आहेल. अकबरनामा तर अबुल फझल ने लिहीलेली बखर आहे. त्या मुलाखतीतच तसे लिहीले आहे. तो म्हणतो की त्याने सर्व पुस्तक वाचली वरील दोन बखरी मधले मांडले.

आता माझा तात्विक विरोध का आहे हे लिहीतो.

ईतिहास मांडताना राजांच्या आश्रीतानी लिहीलेल्या घटनांना जर लेखी पुरावा नसेल तर ती घटना ग्राह्य धरली जात नाही. याचे मुख्य उदा म्हणजे सभासद बखर यातील अनेक घटना राजवाड्यांनी(मराठी असुनही) नाकारल्या आहेत कारण बखरकार्ने अनेक घटनांना पुरावा नसताना पण घुसडल्या आहेत. जर सभासद बखरी बाबत हे होउ शकते तर ते कुठल्याही बखरी बाबत होऊ शकते) त्यामुळे अबुल फझल ने जे मांडले ते सत्य होऊ शकत नाही. दुसरे उदा हवे असेल तर पृथ्वीराज रासो चे देतो. ही पण पृथ्वीराज चव्हानवर असलेली बखर आहे. त्यातील काही घटना इतिहास कालावधी संगत नसलामूळे जदुनाथांनी नाकारल्या आहेत. मग हे सर्व अकबरनामाला पण लागु होनारच. त्यात अकबरा विषयी एकतर्फी घटना येनारच. मग त्याला बेस कसा करनार?
दुसरी गोष्ट म्हणजे ईतिहासाधिष्टीत कथा मांडताना एखादा खर्या ईतिहास्काराला गुंतवावे लागते जे त्या मुलाखतीत दिसत नाही. आता श्रेयनामावली असेल तर ते पाहावे लागेल.

त्या कलाकृतीला आशुतोश नक्की न्याय देईल. मोठे सेट्स, त्या काळची वेशभुषा वैगरे असनारच पण विषयाला न्याय देईल असे वाटत नाही.

सहज जाता जाता त्या मुलाखतीत शहाजहान, मोगले आझम, सिकंदर, रुस्तूम सोहराब हे आणि असेच ईतर सर्व चित्रपट आपल्यावर केलेल्या आक्रमकांचेच आहेत. त्यात येथील नावे दिसत नाहीत.
आता मराठी निर्मात्याविषयी -
ओरंगजेब चांगला होता ही मोहीम काही काळ आपल्या मराठी लेखकांनी (नोंद घ्यावी ते ईतिहासकार न्हवते) देखील राबवील. त्याचे ते दारु न पिणे, सतत माळ ओढने याचा फार गवगवा केला. ऐवढेच नाही तर संताजी ला पुजा करताना का मारले? त्याचामुळे मी आता एक दिवस उपोशन करनार व त्या दिनदयाळाकडे माझ्याहातुन झालेले हे पाप त्याबद्दल माफी मागनार हे देखील एका शहान्या मराठी निर्मात्याने ऑरंगजेबाची चांगली बाजु दाखविन्यासाठी मांडले. भले शाब्बास.


Asami
Thursday, February 07, 2008 - 5:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला त्या लेखातले एक वाक्य लक्षात राहिले. " मला इतिहासाचा वर्ग दाखवायचा नाही आहे , माझा अभ्यास माझ्या पटकथेचा पाया पक्का करण्याच्या उद्देशाने झाला आहे. " मला वाटते हे एव्हढे पुरेसे आहे.

खरा अकबर कसा होता , मूळात होता कि नाही , जोधाबाई त्याची बायको होती कि सून ह्या सर्व गोष्टींबद्दल्च्या वादविवादाचा त्याच्या भूमिकेशी संबंध येत नाही. He knows what he is doing and he is completely convinced about it. I guess that should apply to everyone. ज्याना जोधा - अकबर हि कपोलकल्पित कहाणी वाटते त्यांनी त्याला विरोध करावा , movie ला करून काही उपयोग होणार नाही. मूळात जत ऐतिहासिक movie नाही असे म्हटल्यावर बाकी गोष्टी आपोआप गळून पडणार.


Kedarjoshi
Thursday, February 07, 2008 - 5:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असामी,
माझा विरोध अजुन तुझ्या लक्षात आलेला नाहीय. मी चित्रपटाला विरोध करतच नाहीये. पण तो ऐतीहासीक असनाल्या विरोध करतोय.

उद्या शिवाजी अन कल्यान च्या सुभेदाराचा सुनेवर कथारचुन पिक्चर काढला तर चालेल काय? त्यात आपण शिवाजी ने सोडुन देन्या पेक्षा आपल्या जनानखान्यात ठेवली असे मांडुयात आणि वर मला ईतिहासाचा वर्ग दाखवयाचा नाही असेही म्हणुयात. मग त्यातल्या खर्‍या गोष्टींचा काहीही संबध येनार नाही.
आशुतोश्च्या मित्राने हैदरने मोगले आझम पासुन ह्या पिक्चरची कल्पना उचलली उदया आणखी कोणी ह्या कथे प्रमाने आणखी काही कल्पना उचलनार नाही का? २५ वर्षानंतर हा चित्रप्ट रेफ. म्हनुन कोणी वापरनार नाही का? जसे त्यामुलाखतीत हैदर ने मोगले आझम रेफ म्हणुन वापरला.

दुर्देवाने ईतिहासातील पात्र आपण आपल्या मनाला वाटेल तशी दाखवु वा लिहु शकत नाहीत. नाहीतर आज शिवाजी हा दादोजीचा मुलगा आहे ह्याला कोणी विरोध केला नसता, ते मान्य झाले असते. त्यावर दंगली झाल्या नसत्या. ( शिवाजीवरचे लेटेस्ट पुस्तक).

ऐतीहासीक पुस्तक, चित्रपट हे वाचकांचा वा दर्शकांच्या व्हिउ वर परिणाम करतात म्हनुन ऐतीहासीक घटना हा जशाच्या तश्या दाखवाव्या लागतात हे माझे मत.

राहीला चित्रपटाचा प्रश्न मी वर लिहील्याप्रमाने तो उत्तमच असनार. आणि तु म्हणतोस तसे जर असेल तर त्याने ह्या चित्रपटाचा ऐतीहासीक व्यक्तींची काही संबध नाही तो योगायोग समजावा असे लिहावे.पण तो तसे करत नाहीय.
ईति.


Swaatee_ambole
Thursday, February 07, 2008 - 5:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असामी, केदार म्हणतो त्यात तथ्य आहे. ऐतिहासिक नाहीये चित्रपट, तर नावं कशाला ऐतिहासिक व्यक्तींची हवीत? क्ष बादशाह आणि य राजकन्येवर काढा.

Marhatmoli
Thursday, February 07, 2008 - 5:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"तसेही अकबर बिरबल कथा नीट वाचल्या तर अकबर हा जरा भडक डोक्याचा माणूस असून बिरबल त्याला युक्तीने हाताळून जे पाहिजे ते मिळवत असे असे वाटते. "

पुरंदर्यानि एकेका सुलतानाच केलेल वर्णन वाचुन मला अस वाटायला लागलय कि 'अकबर बिरबल' कथांमधला अकबर हा एक रुपक असुन तो एकुणच मोगल सम्राटांच्या स्वभावाचा ल. सा. वि. ( LCM ) आहे. त्यांच्या अश्या स्वभावानेच मराठीत 'मोगलाइ' हे विशेषण रुढ झाल.


"सहज जाता जाता त्या मुलाखतीत शहाजहान, मोगले आझम, सिकंदर, रुस्तूम सोहराब हे आणि असेच ईतर सर्व चित्रपट आपल्यावर केलेल्या आक्रमकांचेच आहेत. त्यात येथील नावे दिसत नाहीत. "

खरच मलाहि ह्या गोष्टिच खुप आश्चर्य वाटत. बाजिराव-मस्तानि किंवा पृथ्विराज चौहान्-संयोगिता ह्या खर्याखुर्या प्रेमकथांवर चित्रपट बनवावा अस आशुतोष ला किंवा इतर कोणालाहि का वाटु नये?


एकंदरच documentation नसल्याचा फ़टका आपल्या इतिहास प्रसिध्ध व्यक्तिंना फ़ार बसला. पण त्यातुनहि मराठि लेखकांचि hostility काय वर्णावि! "शिवाजि हा शहाजिचा नाहि तर दादोजि कोंडदेव यांचा मुलगा होता" अस विधान एका (मराठि) महाभागाने केलय म्हणे.







Marhatmoli
Thursday, February 07, 2008 - 5:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे मी लिहित असतानाच बहुतेक केदारनि post टाकलिये त्यामुळे शिवाजि-दादोजि कोंडदेव मुद्दा repeat झालाय.



Marhatmoli
Thursday, February 07, 2008 - 5:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण केदार माझ्या माहितिप्रमाणे हे संशोधन (?) बरच जुन आहे. हि गोष्ट मी जवळ्पास ७ वर्षांपुर्वि ऐकलिय.

Asami
Thursday, February 07, 2008 - 6:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दुर्देवाने ईतिहासातील पात्र आपण आपल्या मनाला वाटेल तशी दाखवु वा लिहु शकत नाहीत
>>अगदी बरोबर बोललास पण अकबर कसा होता ह्याचा अकबर जोधाशी संबंध नाही. जोधा हि नक्की कोण होती ह्याबाबात differences आहेत पण ते अजुन either way शाबीत झालेले नाही. अमक्या लेखकाने लिहिले एव्हढा पुरावा होत नाही हे तुही मान्य करशील. करण ते फ़क्त he said, she said ची case असते. अशा वेळी त्या मुद्द्याला विरोध कशाच्या basis वर करणार ? ज्या सर्वसामान्य ऐतिहासीक गोष्टि आहेत त्याच्य विरुद्धा किंवा त्यापेक्षा वेगळे काही एखादे काही पुढे आले कि लगेच ते शाबीत झाले असे होत नाही तसेच मूळातली धारणा चूकीची होता असेही होत नाही. मग लगेच इतिहासाच विप्र्यास केला अशा भूमिकेतून विरोध का ?

अकबर जोधा प्रेमकहाणी हा वाद किती अनिश्चित आहे हे दाखवायला एक उदाहरण देतो. तू वर गोवारीकरने ain-e-akbari reference केलिये असे म्हणतोयस. आत rediff चे हे article बघ.
http://ia.rediff.com/movies/2008/feb/05rajput.htm

He also claimed five historians had worked on the subject and had come up with well researched documents that prove the film historically incorrect. Ain-e-Akbari (page 619), Akbarnama (page 212) and a National Council of Educational Research and Training's Class XI history book on medieval India by Professor Satish Chandra are amongst the books that were consulted by the experts, he said

ह्याच BB वर शालेय इतिहास नमूद केला आहे. ह्या दोन गोष्टी परस्परविरोधी नाहीत का ? अशा वेळी खरे कोणाचे हे कसे मानायचे ? हे सिद्ध होईतो त्याने movie release करू नयेच का ? ह्यात इतर कोणाचे हितसंबंध गुंतले नाहित हे छातिठोकपणे सांगता येइल ? हा मुद्दा आजच का ऐरणीवर यावा ? Historical facts can be twisted easily to anybody's means.

आणि तु म्हणतोस तसे जर असेल तर त्याने ह्या चित्रपटाचा ऐतीहासीक व्यक्तींची काही संबध नाही तो योगायोग समजावा असे लिहावे.पण तो तसे करत नाहीय. >> I reserve to draw conclusion till I can watch movie. त्याच्या मुलाखतीमधे त्याची भूमिका अतिशय स्पष्ट आहे.

Kedarjoshi
Thursday, February 07, 2008 - 6:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मोगल सम्राटांच्या स्वभावाचा ल. सा. वि. ( LCM ) आहे>>>> Well put.

हो रश्मी हे " संशोधन " जुनेच आहे. आता लेखकाचे नाव आठवत नाही पण त्याला प्रमान माणुन पुढे जेम्स लेन ने ते प्रसिध्द केले अन गदारोळ झाला.


अगदी बरोबर बोललास पण अकबर कसा होता ह्याचा अकबर जोधाशी संबंध नाही>>
असामी अरे संबध आहे. तिचे लग्न बळजबरी झले आहे, तो प्रेम विवाह न्हवता. राजा भारमला नाहीतर मरावे लागले असते. त्यांचात लग्नाचा करार होता.

Anjali28
Thursday, February 07, 2008 - 10:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार,
मला वाटते त्या मुलाखतीत हेच सांगितले आहे की त्यांचा लग्नाचा करार होता.
मलाही हा चित्रपट 'चित्रपट' म्हणून बघायला आवडेल. आशुतोषचे लगान, स्वदेस आवडले म्हणून हाही बघणार इतकेच.
उत्तर भारतात, नेहरुंच्या Discovery of India सकट काही पुस्तकांमधे शिवाजी महराजांचे चित्रण 'लुटारु' असे आहे. चु. भू. द्या. घ्या. इतिहासकार खास करुन उत्तरेकडचे याबाबत काय म्हणतात? माझी वाद घालायची इच्छा नाही, एक कुतूहल म्हणून विचारते आहे.


Chinya1985
Thursday, February 07, 2008 - 11:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रथम जेम्स लेन आणि शिवरायांच्या जन्माबद्दल 'त्या'विधानाबद्दल. मुळात त्याला कुठलाही पुरावा नाहिये. मुळात सुप्रिम कोर्टाने अस म्हटलय की ज्या पुस्तकातील मजकुरामुळे आरडाओरडा झाला त्या पुस्तकातही तस स्पष्ट म्हटलेल नाहिये. दोन ठीकाणी असलेल्या वेगवेगळ्या मजकुरांना जोडून काही अर्थ लावण्यात आलाय. पण असली विधाने लेखकाने प्रसिध्दीसाठी आहेत.

अंजली, शिवाजी महाराजांना लुटारु वगैरे म्हणणारे सेक्युलर लाल बावटावाले आहेत. उत्तरेकडील सर्व ईतिहासकार अस म्हणत नाहित. अरुण शौरीनी या लोकांबद्दल फ़ार छान वाक्य म्हटलय-' these people r from same school who have became famous by writing reviews on each others books . सेक्युलरवाद्यांना शिवाजी नावाची ऍलर्जी आहे कारण त्यात त्यांना हिंदुंचा स्वाभिमान दिसतो,लढाउ व्रुत्ती दिसते. मग हा ईतिहास कसा लपवायचा??सोप आहे आपल्यासारखाच विचार करणार्‍या ८-१० लोकांनी एकत्र यायच,आणि एकमेकांच्या पुस्तकांबद्दल चांगल चांगल लिहायच. मग देशातले प्रमुख ईतिहासकार कोण असा प्रश्न आला की एकदुसर्‍याची नावे द्यायची आपलीच लोक पुढे आणायची. यांचा सगळा पर्दाफ़ाश अरुण शौरीने पुर्वी केला होता त्यातले काही लेख अरुण शौरिच्या वेबसाईटवर आहेत. सेक्युलरवादी ईतिहासकारांचा खोटारडेपणा कळण्यासाठी हे लेख वाचा भारी आहेत.

आता जोधा अकबरबद्दल त्या मुलाखतीत आशुतोश गोवारिकरने म्हटलेय की १५-२० वर्षाचा कालखंड आहे ज्याची माहीती फ़ारशी नाहिये,त्या कालखंडात काय झाल असेल याबद्दल हा चित्रपट आहे(म्हणजे सगळीच कथा मनाची आहे. अशोकासारखा असण्याचे चान्सेस आहेत)
ऍश आणि हृतिक तलवारबाजी करत आहेत हा सीन उगाचच दाखवलाय अस वाटतय. बाकी मुस्लिम व सेक्युलरवादी औरंगजेबाला पण खराब मानायला तयार नाहीत त्यांच्यासाठी तर अकबर आदर्श राजाच आहे. एक मुस्लिम मला म्हणाला औरंगजेबाबद्दल उगीचच चुकिच पसरवल जातय,तो तसा चांगला राजा होता.


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators