Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 28, 2007

Hitguj » Views and Comments » Current Affairs » बातम्यांचे / लेखांचे संकलन » Political » Archive through December 28, 2007 « Previous Next »

Kedarjoshi
Tuesday, December 04, 2007 - 4:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मावळेदेखील मोहोरा स्वीकारू लागले!! हा हन्त हन्त!! >>


ईतिहासच आहे तो आपला. मोहरा स्विकारुन फुट पाडने.

अरेरे. धर्म न माननार्या कॉंग्रेस कडुन नाने पाडायचा अधर्म. साला लाज वाटत आहे मला आज. गंमत म्हणजे गेल्या गुरुवारीच सलादिन बद्दल भरपुर ऐकले होते दोन प्यालेस्टाईन मिंत्राकडुन.

या नान्यांना वापस घेन्या विषयी एखादे आंदोलन छेडायला पाहीजे.

(एक भा.प्र. भारतातील मुस्लीमांनी अजुन काहीच का केले नाही या बाबतीत.


Satishbv
Wednesday, December 05, 2007 - 7:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सेना भा.ज.पा. युती ही केवळ महाराष्ट्रा पुरतीच मर्यादित आहे. गोवा मध्ये देखिल ते वेगळे लढलेत व बेळगावात भा.ज.पा. मराठी माणसा विरुद्ध लढते.

Zakki
Monday, December 17, 2007 - 2:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तर आता गुजरातेत मोदींना (भा. ज. प.)ला ४७ टक्के मते मिळाली म्हणे. म्हणजे पुन: Coalition !(म्हणजेच राज्याचे वाटोळे!)



Tonaga
Monday, December 17, 2007 - 5:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

in Belgaum sena also faught against ekikaraN samitee resulting defeat of both.

Maanus
Thursday, December 27, 2007 - 2:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बेनझेर भुट्टो चा खुन झाला.

Jaymaharashtra
Thursday, December 27, 2007 - 5:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पाकिस्तानचे कधीही भले होवु शकत नाही.
बेनझिरला मारुन यांचे प्रश्न सुटणार नाहित.
पाकिस्तान आता खर्‍या अर्थाने अंधःकाराच्या खोल गर्तेत प्रवेश करता झाला म्हणायला हरकत नाही.
अमेरिकेचे सगळे अंदाज आणि सगळ्या युक्त्या फोल ठरल्यात. पाकिस्तान सारखा भस्मासुर या अमेरिकेच्या कृपेनेच वाढला पण आता या पाकिस्तान नावाच्या बाळाने आपली नखे बाहेर काढुन खरे रंग दाखवायला सुरुवात केली हेच खर!
ही तिसर्‍या महायुद्धाची नांदी तर नव्हे?

जय हिंद!
जय महाराष्ट्र!


Gsumit
Thursday, December 27, 2007 - 6:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

I was also shocked know all this... मला वाटते बेनेझिर भुत्तो मुशर्रफला प्रबळ प्रतिस्पर्धी ठरु शकली असती, त्यामुळे, यामागे मुशर्रफचा पण हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही... मला पाकिस्तानमधल्या सद्यस्थितीची जास्त कल्पना नाही अन गरजही वाटत नाही, पण आपल्याबरोबर सगळ्यात जास्त सीमा share करणारा एक देश म्हणुन नक्कीच आपल्या सरकारने याकडे लक्ष ठेवायला पाहिजे असे वाटते... कारण तिथे होणार्‍या उलथापालथिची झळ आपल्याला सुद्ध बसु शकते... आता शांतता वगैरे बास झाले, पोरगं हाताबाहेर चाललय... कानाखाली द्यायची तयारी पण ठेवली पाहिजे आपण...

Yog
Thursday, December 27, 2007 - 8:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

sad news! any hopes of Pak becoming moderate-liberal islamic nation are now close to none... this will have long term effect on the entire region including India. she would have been our better friend in getting some resolve on Kashmir.

I am sure Mush along with his talibani elements have hand in it.

now let us watch what the most hipocratic nation on this earth (any guess?) does about this.

Zakki
Thursday, December 27, 2007 - 10:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hipocratic

म्हणजे काय कुणास ठाऊक? कॅलिफोर्नियातले लोक जरा 'हे' च असतात हे माहित आहे, पण तरी hipocratic शब्द कुठून आला?

कदाचित् hypocritical म्हणायचे असेल.

सगळ्याच देशातले राजकारणी तसे hypocritical वक्तव्ये करत असतात.

उदा. भारतात जनतेच्या कल्याणासाठी आम्हाला निवडून द्या असे म्हणत असतात. प्रत्यक्ष निवडून आल्यावर स्वत:चे कल्याण करून घ्यायलाच त्यांना इतका वेळ लागतो, की नंतर इतरांचे कल्याण करायला वेळच मिळत नाही.

अमेरिकेची पंचाईतच आहे. त्यांनी स्वत:च्याच हातानी ओढवून घेतली (घ्यावी लागली). अफगाणिस्तानवर हल्ला केल्यावर पाकीस्तानला मित्र म्हंटले नसते, तर ज्या पाकिस्तानने रशियाला हाकलून दिले, ते अमेरिकेलापण हाकलून देऊ शकले असते, त्यामुळे ना इलाजास्तव मुशर्रफशी दोस्ती करावी लागली. फक्त सहा वर्षात जरा पाकिस्तान ऐवजी भारताशी मैत्रि करून पाकिस्तानचे महत्व कमी केले असते तर बरे झाले असते. अजूनहि वेळ गेलेली नाही.


Mahaguru
Thursday, December 27, 2007 - 10:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला तितके आश्चर्य वाटले नाही. कालच आमच्या कंपनी मधल्या एका पाकी शी बोलत होतो त्यावेळी त्याच्या बोलण्यातुन तिच्या बद्दलचा अनादर / घृणा दिसत होता. १७ ऑक्टोबर च्या बॉंब स्फोटाबद्दल बोलताना पण तिच्यावर हल्ला झाला त्याचे त्याला वाईट वाटत नव्हते. त्याच्या मते तिने (आणि तिच्य नवर्‍याने) पाकिस्तानचे खुप वाटोळे केले

Shendenaxatra
Thursday, December 27, 2007 - 11:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेल्या म्हशीला मणभर दूध असे म्हटले जाते. तसे बेनझीरबाईंचे होणार. एक सुस्वरूप, सुशिक्षित स्त्री जी एका मुस्लिम देशाची नेता होवू शकत होती ह्या काही चांगल्या गोष्टी म्हणता येतील. मात्र मीही काही पाकी मित्र्रांकडून ऐकले की बाई अगदी भ्रष्ट होत्या. नवर्‍याच्या जोडीने तिने भरपूर लूट केली. अर्थात तिकडे धुतल्या तांदळासारखे कुणीच नसतील म्हणा. आणि एका नि:शस्त्र बाईवर अशा गोळ्या घालणे निंद्य आहेच.
त्यातही गंमत म्हणजे ह्या घटनेचा अमेरिकेतील राष्ट्रपतीपदोत्सुक मंडळी कसा फायदा करुन घेत आहेत ते मनोरंजक आहे. डेमोक्र्याट बुशवर तोफा डागत आहे आणि मी निवडून आलो तर कसा ह्या प्रकरणाचा चुटकीसरशी निकाल लावतो पहा अशा गर्जना करत आहेत.
अर्थात सद्य परिस्थितीत मुशरफला अर्धचंद्र देणे अमेरिकेला परवडणार नाही. कितीही वाटले तरी त्याच्याजागी येणारा नवा नेता मुशीच बरा होता म्हणायला लावू शकेल.








Jaymaharashtra
Friday, December 28, 2007 - 4:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पाकिस्तान मधे जे काही अराजक माजले आहे त्याकडे निदान
हिंदुस्थानला तरी डोळेझाक करुन चालणार नाही.
आणि पाकिस्तानी जनतेचे म्हणाल तर त्यांना तेव्हढी अक्कल(क्षमा असावी) असती तर आज पाकिस्तानची जी दयनिय अवस्था आहे ती झालीच नसती.
हिंदुस्थान पासुन फ़ारकत घेवुन वेगळी चुल तर मांडली पण ती चुल
फुकंण्याची देखिल एक कला आहे ती कधी पाकिस्तानी राज्यकर्त्यांना आणि तेथील जनतेला आत्मसात करता आली नाही.
फ़क्त हिंदुस्थानच्या विरोधात सतत गरळ ओकुन सत्तेची पोळी भाजुन घेत जनतेची दिशाभुल करत राहणे हेच फ़क्त पाकिस्तानच्या हुकुमशहांनी केले. ज्यामुळे दहशतवादाला खतपाणी मिळाले
बेनझिरच्या भ्रष्टाचाराबद्दल मी देखिल अज्ञानीच आहे.पण तरिही तिच्या पाकिस्तानातिल राजकीय अस्तित्वाने आपल्याला नक्कीच फ़रक पडला असता.कारण आता काही प्रमाणात पाकीस्तानची जनता देखिल या अराजकाला कंटाळली आहे.त्यांना देखिल स्थैर्य प्रगती हवीच आहे.शेवटी माणसाला जगायला अन्नपाणीच लागते.बंदुकांचे उत्पादन मुबलक प्रमाणात झाले तरी भुकेला बंदुक खावुन पोट भरता येणारे नाही हे आता तरी पाकिस्तानी जनतेला समजले असेलच.
या अराजकातुन बाहेर पडण्याची सुबुद्धी देव पाकिस्तानी राज्यकर्त्यांना आणि जनतेला देवो हिच सदिच्छा!
देव एव्हढ्यासाठी कारण देव सुबुद्धी देतो पण अल्ला मात्र तसे करताना दिसत नाही. राग नसावा!
जय हिंद!
जय महाराष्ट्र!



Jaymaharashtra
Friday, December 28, 2007 - 4:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे हे काय झाले!
चक्क! हिमाचलप्रदेश देखिल भाजपाने जिंकला!
बिचारे कॉंग्रेसवाले आता कुणाच्या कुशीत तोंड लपवणार?
गांधीनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे आता indain national congress चे विसर्जन करावे आणि ते ही सोनियाबाईंच्या (अ)शुभहस्ते.

जय हिंद!
जय महाराष्ट्र!



Yog
Friday, December 28, 2007 - 5:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्कीबुवा ते सगळ राहू दे..
आता बघा US मधे कसा पाक विरुध्ध systematic porpoganda चालू होईल.. अचानक बुश मन्डळीन्ना जाग येईल की पाकीस्तान terrorist ना मदत करत आहे वगैरे वगैरे आणि सरते शेवटी त्या सर्वाचा सम्बन्ध येनकेन प्रकारेण अमेरीकेच्या security शी जोडतील..
अमेरीका आता फ़क्त पाक मधे घुसायची सर्व कारणे जगापूढे करत राहील.. i think 2008 will see some key milestones (read bloody politics) in the histroy which will trigger islam vs west (read rest of the world) conflict.
जसे कर्म तशी फ़ळे हे गीतेतील वचन सार्थ मानले तर या न्यायाने इस्लामी अतीरेक्यान्ची ही कर्मे अखिल इस्लाम धर्मला बुडवणार एव्हडे निश्चीत. भारताला सध्ध्या चाणक्याची गरज आहे, परराष्ट्रनिती इतकी धूर्त असावी की पाकिस्तानच्या आत्ताच्या अवस्थेचा फ़ायदा घ्यायला हवा. मला वाटत कारगिल नन्तर हा एक दुसरा मोका आहे..

या अख्ख्या तालीबानी संस्कृतीचा नायनाट करायची हीच खरी वेळ (सन्धी) आहे.


Psg
Friday, December 28, 2007 - 5:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भारताला सध्ध्या चाणक्याची गरज आहे, परराष्ट्रनिती इतकी धूर्त असावी की पाकिस्तानच्या आत्ताच्या अवस्थेचा फ़ायदा घ्यायला हवा.
लाख बोललास योग! दुर्दैवानी आपल्याकडे इतके headstrong नाही दिसते कोणी या संधीचा योग्य फायदा उठवणारे.. सगळे नेते वयोवृद्ध किंवा बाहुल्या..

Yog
Friday, December 28, 2007 - 6:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hhmm... for those interested , या विषयासाठी एक स्वतन्त्र bb उघडला आहे ( V&C/Current Affairs/benajir hattyaa..puDhe kaay.. ). आपली मते तिथे जरूर मान्डावीत.
धन्यवाद!


Gs1
Friday, December 28, 2007 - 7:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


अरूण शौरींचा उत्तम लेख.

http://www.indianexpress.com/story/254969.html

Jaymaharashtra
Friday, December 28, 2007 - 8:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योग!
अतिशय योग्य आणि लाख मोलाचा मुद्दा मांडलात.
पण अश्या प्रकारे पाकिस्तानातिल विपरित परिस्थितीचा फ़ायदा स्वतसाठी कसा करता येइल?इतका विचार करण्या इतपत भारताचे राजकीय नेतृत्व परिपक्व नाही आणि राजकीय इच्छाशक्तिचा अभाव rather तुटवडा आहे असे निदान माझे तरी मत आहे.
सद्य परिस्थितित आपल्या भारताचे असलेले कचखावु,
कमकुवत नेभळट नेतृत्व काय करु शकते हे पाहण्यासारखे असेलच!
तसे देखिल UPA च्या कारकिर्दीत भारताच्या विदेश नितीची व परराष्ट्र धोरणाची लत्करे कॉंग्रेसने स्वहस्ते वेशिवर टांगली आहेत.
बघु या काय होतय ते? फ़ारशी आशा करण्यात अर्थ नाही हे नक्की.
जय हिंद!
जय महाराष्ट्र!


Satishbv
Friday, December 28, 2007 - 9:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पाकीस्तानात अस्थिरता निर्माण होण्यासाठी हा हिंदुस्थानने रचलेला कट आहे, असे पाकड्यांनी म्हटले नाही म्हणजे मिळवली. काही वर्षांपुर्वी झिया उल हक यांच्या विमानात भारतातून आंब्याच्या पेट्यांमार्फत स्फोटके चढवली गेली असल्याचा आरोप नंतर पाक गुप्तचर यंत्रणेकडुन झाला होता.

Vinaydesai
Friday, December 28, 2007 - 1:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'मेलेल्या म्हशीला' हे आवडले.. कुणाची हत्या होणे वाईटच...

तिच्या बापाच्या काळापासून प्रत्येकाने हे अतिरेक्यांचे बी पेरले आहे, आणि तेच त्यांना खातंय...


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators