Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 02, 2008

Hitguj » Views and Comments » मायबोली-हितगुज » नवीन मायबोली » नवीन मायबोली: असे सुधारता येईल » Archive through January 02, 2008 « Previous Next »

Badbadi
Wednesday, December 19, 2007 - 11:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नवीन मायबोलीवर गुलमोहोर आणि रंगीबेरंगी असे दोन वेगळे विभाग दिसतात. दोन्ही ला स्वतंत्र paging दिलंय. पण गुलमोहोर च्या 2 वर टिचकी मारली कि रंगीबेरंगी चे पान क्रं 2 दिसते. हे चुकीचे आहे असे वाटते. मी ज्या विभागातले paging navigate करतेय तोच विभाग refresh झाला पाहिजे ना!!!

Milya
Thursday, December 20, 2007 - 6:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mod_10 तुमचे बरोबर आहे. बाकीचे विभाग पुर्वीच्या गुलमोहर प्रमाणेच दिसत आहेत...

फ़क्त विनोदी लेखन मध्ये विडंबने असा स्वतंत्र विभाग चालू कराल का?

Moderator_10
Thursday, December 20, 2007 - 6:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बडबडी
सध्या last 1 day मध्ये गुलमोहर आणि रंगीबेरंगी जे दिसतय ती तात्पुरती सोय आहे. लवकरच नव्या स्वरूपात नीट दिसेल.


Moderator_10
Thursday, December 20, 2007 - 6:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या
तसा बदल केला आहे.


Gsumit
Tuesday, December 25, 2007 - 5:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मॉड, नवीन पोस्ट करतानी हेल्पची लिंक आहे ते छान आहे, पण त्यावर क्लिक केले की HTML formatting च्या टिप्स दिसतात सद्ध्या, त्याबरोबरच, मराठि लिहायच्या टिप्स, स्मायलींची लिस्ट अश्या गोष्टि पण टाकल्या तर जरा बरे होइन असे मला वाटते... नवीन सभासदांना त्याचा बराच उपयोग होउ शकतो...

नवीन मायबोलीचे मराठी लिहायचे नियमसुद्धा जुन्यापेक्षा थोडे वेगळे वाटतात, अन इकडे स्मायली कसे टाकायचे ते पण समजले नाही मला... :-(


Naatyaa
Wednesday, December 26, 2007 - 9:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मायबोलीवर सदस्यांची नावे देवनागरीत दिसतील अशी व्यवस्था करण्याचा मानस आहे का?

बाकी काही मराठी संकेतस्थळांवर तशी सुविधा अस्तित्वात आहे..

Gsumit
Thursday, December 27, 2007 - 2:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अडमिन... :-) अजुन एक सुचले...

नविन मायबोलित पोस्ट करतानी, ती मराठिमधीच दिसते... मग preview पानाची गरज काय? डायरेक पोस्टचे बटन पण देता येइन की... तेवढीच एक स्टेप वाचेल...


Gsumit
Thursday, December 27, 2007 - 2:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

And one more thing.... I could not see any link to delete a post... even if it posted by me only...

Admin
Friday, December 28, 2007 - 1:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आताही बर्‍याच सुविधा आहेत (तिरके, ठळक, चित्र) ज्या preview केल्याशिवाय दिसत नाहीत.

तुम्ही Edit मधे जाऊन खाली पाहिलेत तर delete करायची सोय दिसेल.


Gsumit
Friday, December 28, 2007 - 3:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुठे, मला नाही सापडली delete ची लिंक... :-( मी माझ्या एडिट पेजचा एक स्क्रीनशॉट पण माझ्या फ़ाइल्स मधे अपलोड केलाय... तुम्ही बघु शकता...

ही अपलोड करायची सवय मात्र जाम आवडली, इमेजची साइज मायबोलीच जमवुन घेते... आधी बराच त्रास वायचा इमेज ५० केबी करतानी... thanks for this feature, admin ...


Manjud
Friday, December 28, 2007 - 12:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नविन मायबोलीत Last 1day चे बटन कुठे आहे? समजा मी विचारपुस किंवा कथा विभागात आहे आणि मला Last 1day पोस्ट्स बघायच्या असतील तर मी कश्या बघायच्या?

Psg
Saturday, December 29, 2007 - 5:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मन्जू, मी तरी हेडरचा 'हितगूज' मधे जाते आणि मग Last 1 Day Search ला. की परत नवीन मायबोलीतच प्रवेश मिळतो

खरंच नेमस्तक, नवीन मायबोलीतच Last 1 Day link देता येईल का?

माझी अजून एक विनंति आहे (जी मागे एकदा पण करून झाली होती)- नवीन मायबोलीत Transliteration Chart द्यायची व्यवस्था करावी. नवीन मायबोलीत आपण डायरेक्ट मराठीतच लिहितोय.. एखादा शब्द अडला, कसा लिहायचा समजला नाही तर या चार्टमुळे फायदाच होईल असे वाटते.


Sonchafa
Saturday, December 29, 2007 - 9:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशच्या मागील पानावरच्या पोस्ट शी मी सहमत आहे. जुन्या मायबोलीवर लेखन करताना पूर्ण कथा एकदम पोस्ट करता यावी ह्या साठी वर्ड मध्ये ती महिरपी कंसात टाईप करून, प्रिव्ह्यु बघून, ती पूर्ण झाल्यावर एकदाच संपूर्ण कथा पोस्ट करता येत होती. देवनागरीत लिहिल्यास डावीकडे ईंग्रजीत आणि उजवीकडे त्याचे मराठीकरण झालेले दिसू शकत होते. पूर्ण पोस्ट एका बैठकीत पुरे ने झाल्यास ईंग्रजीतील लेखन कॉपी पेस्ट करून ठेवून सगळे लेखन पुरे झाल्यावर पूर्ण कथा एकदम पोस्ट करणे शक्य होते. पण नवीन मायबोलीत हे करता येणं शक्य आहे का?? व असल्यास ते कसे करता येईल??
पूनम चा बरहा फ़ॉंट चा पर्याय कदचित सोपा असेलही पण तो मलातरी आजतागायत नीट जमलेला नाही. त्यापेक्षा जुनी पद्धतच मला तरी खूप सोपी वाटते व ती अनेकाना सोपी वाटत असेल असे वाटते. मलाही मोठे लेखन तीन चार वेळा वाचून एडिट केल्याशिवाय चैन पडत नाही. आणि कथा किंवा लेखाचा एखादा भाग पोस्ट करून पुढचा भाग पोस्ट करेपर्यंत वाचकांना लटकवून ठेवण्यातही मला मजा वाटत नाही. काय करायचे ह्यासाठी?


Manjud
Saturday, December 29, 2007 - 12:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूनम, मी 'मुलुंड' 'श्रीवर्धन' हे बीबी फ़ेवरेट्स मधे ऍड करून ठेवले आहेत. मी तिकडे जाते आणि मग last 1day search क्लिक करते. म्हणजे कसं नव्यातून जुनं, जुन्यातून नवं आणि परत नव्यातून नवं अशी त्रिस्थळी यात्रा घडते.

Moderator_10
Monday, December 31, 2007 - 6:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>पण नवीन मायबोलीत हे करता येणं शक्य आहे का?? व असल्यास ते कसे करता येईल??
आता नवीन मायबोलीवर हे शक्य आहे. लेखकाला आपलं साहित्य अपूर्ण ठेवता येईल. ते बाकी सभासदाना दिसणार नाही. जेव्हा आपलं साहित्य प्रकाशीत करण्यायोग्य होईल तेव्हा त्याची स्थिती "संपूर्ण" अशी करावी. तेव्हा हे सहित्य सर्व वाचकाना दिसेल. तोपर्यंत काही बदल करायचे असल्यास आपल्या सभासद खात्यात जाऊन पाऊलखुणा मध्ये पहिल्यास फक्त लेखकाला अप्रकाशीत लेख दिसेल. तिथे संपादन करून बदल करता येतील.
नवीन लेखाची default स्थिती संपूर्ण असेल त्यामुळे ज्याना पूर्ण लेख लिहायचा आहे त्याना काहीही करण्याची आवश्यकता नाही.


Moderator_10
Monday, December 31, 2007 - 6:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नवीन मायबोलीत गुलमोहर मध्ये गेल्यास पहिलाच दुवा "गेल्या २४ तासातील लेखन" हा दिलेला आहे.

Itgirl
Tuesday, January 01, 2008 - 2:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मॉड, नव्या मायबोलीवर, अपूर्ण लेखन, अपूर्ण असे status देऊन save केले तरीही ते गुलमोहर मधे प्रकाशित विभागात दिसले. कोणाला न दिसता असे save होत नाही आहे. मी तसे सेव्ह करायचा प्रयत्न करून पाहिले, पण जमले नाही :-(

Admin
Tuesday, January 01, 2008 - 6:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

> मॉड, नव्या मायबोलीवर, अपूर्ण लेखन, अपूर्ण असे status देऊन save केले तरीही ते गुलमोहर मधे प्रकाशित विभागात दिसले.
कुणाला दिसले? तुम्हाला (लेखकाला) दिसत राहिलच पण इतराना दिसायला नको. म्हणुनच कुणाला दिसले हे कळाले तर चूक शोधता येईल?

Moderator_10
Wednesday, January 02, 2008 - 6:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

psg

आपली tralsliteration chart ची सूचना अत्यंत महत्वाची आहे आणि त्यावर काम चालू आहे.

Itgirl
Wednesday, January 02, 2008 - 7:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ऍडमिन, गुलमोहरवरील प्रकाशित साहित्य ज्या विभागात दिसते, तिथे मला दिसले, त्यामुळे माझी अशी समजून झाली की ते सर्वांनाच दिसत असावे. तसदीबद्दल क्षमस्व.

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators