Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 31, 2007

Hitguj » Views and Comments » Current Affairs » बेनजीर हत्त्या...पुढे काय..? » Archive through December 31, 2007 « Previous Next »

Yog
Friday, December 28, 2007 - 6:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अत्त्यन्त दुर्दैवी घटना.. निषेध करावा तितका कमीच आहे. पुन्हा एकदा या निमित्ताने पाकिस्तानात काय चालले आहे हे आता नव्याने जगासमोर येत आहे.
पण यातून पुढे जागतिक पातळीवर राजकारण कसे बदलेल अन त्याचे दूरगामी परिणाम काय होतील किव्वा होवू शकतात यावर विचार होणे आवश्यक आहे.
भारतासाठी मला वाटत ही एक फ़ार मोठी ऐतिहासीक घटना ठरणार आहे. आपले परराष्ट्र धोरण कसे असावे यावर चर्चा अपेक्षित आहे. पाकिस्तान सध्ध्या अत्त्यन्त vulnerable and exposed state मधे आहे. अमेरिका तर प्रथम याचा फ़ायदा घ्यायला टपून बसलेली आहे.. आजपर्यन्त अमेरिका कानाडोळा करत होती हे खरे पण आता उघड उघड पाकिस्तानात मुशर्रफ़ विरुध्ध सत्तेचे वारे वाहू लागल्यावर अमेरीकेचे धोरण अचानक बदलू शकते. on the pretext of their 10Billion funding to PAK they will try to get their hold on Pak.. In fact US has everything to gain from such intervetaion.. ओसमा तिथेच जवळपास आहे, A Q Khan , पाकमधील अतीरेकी training camps , strategic and geographic दृष्ट्या पाक चे location तिथून इराक, अफ़घाण, इराण अन gulf वर ठेवता येवू शकणारे नियन्त्रण.. इत्यादी बर्‍याच गोष्टी अमेरीका विचारात घेणार हे निश्चीत.

या सर्वात from strategic perspetive भारताने काय करावे असे तुम्हाला वाटते? विशेषतः दुर्दैवाने सद्द्य सरकार हे मूस्लीमान्चे लान्गूलचालन करणारे आहे. त्याजागी हिन्दुत्ववादी सरकार आले तर या वेळी आपल्या परराष्ट्र धोरणात अधिक फ़रक पडेल काय..? पडावा का..?

कृपया इथे सत्ताधीश (आपले वा जगातले) कसे corrept आहेत वगैरे असली चर्चा नको.. बेनजीर गेल्या. का, कशा गेल्या, त्यान्ना वाचवता आले असते का ही चर्चा आता व्यर्थ आहे. या घटनेतून पुढे जागतिक पातळीवर काय घडू शकते यावर चर्चा केली जावी. मला तर वाटत आत्ताच वेळ आहे pak vulnerable pretext खाली POK प्रश्ण, बान्गलादेशि अतीरेकी, गेला बाजार दाऊद आणि कम्पनी इतर अतिरेकी सन्घटना इत्यादी सर्वाबद्दल बोम्ब उठवून त्यान्च्या विरुध्ध सक्तीची कारवायी करता यावी यासाठी जागतिक पातळीवर support मिळवता येइल..
तालिबान किव्वा अल कायदावर ही घटना boomrang होण्याची शक्यता अधिक आहे. तुम्हाला काय वाटते?
असो. थोडक्यात आपली परराष्ट्रनिती कशी असावि अन या घटनेतून पुढे काय होवू शकते यावर तुमची "अभ्यासपूर्वक" मते मान्डावित अशी विनन्ती.


Jaymaharashtra
Friday, December 28, 2007 - 9:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योग!
अतिशय योग्य आणि लाख मोलाचा मुद्दा मांडलात.
पण अश्या प्रकारे पाकिस्तानातिल विपरित परिस्थितीचा फ़ायदा भारतासाठी कसा करता येइल?इतका विचार करण्या इतपत भारताचे राजकीय नेतृत्व परिपक्व नाही आणि राजकीय इच्छाशक्तिचा अभाव <rather>
तुटवडा आहे असे निदान माझे तरी मत आहे.
सद्य परिस्थितित आपल्या भारताचे असलेले कचखावु,कमकुवत,नेभळट नेतृत्व काय करु शकते हे पाहण्यासारखे असेलच!
तसे देखिल <UPA> च्या कारकिर्दीत भारताच्या विदेश नितीची व परराष्ट्र धोरणाची लत्करे कॉंग्रेसने स्वहस्ते वेशिवर टांगली आहेत.
बघु या काय होतय ते? फ़ारशी आशा करण्यात अर्थ नाही हे नक्की.
जय हिंद!
जय महाराष्ट्र!

}

Vinaydesai
Friday, December 28, 2007 - 1:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भारताच्या दृष्टीने त्या देशाचे सात आठ लहान लहान देश होणे फायद्याचे ठरेल..


American_desi
Friday, December 28, 2007 - 3:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

My analysis:

1) Benezir hi Americechi puppet hoti. MSNBC madhye pan ale ahe ki US brokered her return. What that means is US funded her return :-)
2) Musharraf ata US che ikat nahi. That is why US did it. Mhanun tila Mushraff/Taliban/AlKayada ni marali. Karan US la Musharaff la hataun apali popatin basavayachi hoti gadivar.
3) Bharatane ani Pak ektra hone actually bharatasathi changale ahe. Nahitar Pak madhye US armi yeun apali vat lavel. Bharatach khara shatru Pak nasun US ahe. US nich Bharatal Nuke power banu dile navate.

Zakki
Friday, December 28, 2007 - 4:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमेरिका भारताचा 'शत्रू' आहे असे मला वाटत नाही. पण भारताचे वाढते सामर्थ्य लक्षात घेता आशियामधे अमेरिकेपेक्षा भारताचे वर्चस्व वाढू नये म्हणून अमेरिका काय वाट्टेल त्या कारवाया करायला मागे पुढे पहाणार नाही. त्यासाठीच अणूकरार करायचे ठरवले. मग त्या निमित्ताने भारतात घुसून काहीतरी चाळे करायचे, कुणा पुढार्‍याला बनवायचे, आपल्या हातचे बाहुले बनवायचे, निदान पक्षी अमेरिकेला पसंत नसलेल्या गोष्टी होऊ द्यायच्या नाहीत हे धंदे करायचे.

बाकी भारत पाकिस्तान, बांगलादेश, मिळून एक मोठे साम्राज्य बनवायला हरकत नाही. पण त्या अत्यंत गरीब, धर्मांध लोकांशी जुळवून घेणे भारतियांना कितपत रुचेल, जमेल याचा नीट विचार केला पाहिजे, नाहीतर आहे ते हातचे जायचे नि मग पुन: इंग्रज येण्यापूर्वी जसे भारताचे अनेक तुकडे होते, तसे होऊन निरनिराळ्या परकीय सत्ता भारत बळकावून बसायच्या!!

शिवाय अमेरिकन इतके वाईट्ट आहेत की त्या महाभारताला त्रास देण्यासाठी मुसलमानांना हाती धरून महाभारतात अतिरेकी कारवाया सुरु करतील यात काहीच असंभव नाही. नाहीतरी मुसलमानांना कुठे हवे असणार आहे महाभारत? नाही तर ते केंव्हाच एकत्र आले असते.


Yog
Friday, December 28, 2007 - 5:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>भारताच्या दृष्टीने त्या देशाचे सात आठ लहान लहान देश होणे फायद्याचे ठरेल..
विनय हे कसे काय...? in fact gulf contries ची अवस्था बघता असे तुकडे कूणाच्याच हिताचे होणार नाहीत.
झक्कीबुवा अमेरीका सध्ध्या इस्लाम अन मुसल्मान यापासून चार हात लाम्ब रहाणे पसन्त करते. in fact US and west are looking for every other opportunity to strangle Islamic countries.. तेव्हा त्याना हाताशी धरून भारताला शह देणे वगैरे जरा कल्पनातीत आहे..


Lalu
Friday, December 28, 2007 - 5:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>> from strategic perspetive भारताने काय करावे असे तुम्हाला वाटते?

स्वतःच्या सीमांचे संरक्षण! जे केले जातेच पण सध्या जास्त सतर्क राहिले पाहिजे कारण शेजारी chaos झाला आहे.
दुसरी महत्वाची गोष्ट अशी की, हे घडूनसुद्धा पाकिस्तानात लोकशाही येण्याच्या दृष्टीने जगभरातून जे काही प्रयत्न होतील त्यात पुढाकार घेऊन महत्वाची कामगिरी कशी करता येईल हे पहाणे. त्या देशाला stabilize करणे हा जगाच्या दृष्टीने सध्या सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. तिथे लोकशाही आणि शांतता असणे यातच भारताचा खरा फायदा आहे. 'बांगलादेशी घुसखोरी', 'दाउद' हे 'जागतिक' प्रश्न नाही आहेत. ते भारताने स्वतःच्या हिंमतीवरच सोडवावेत. तसल्या गोष्टींसाठी आंतराष्ट्रीय पातळीवर जाणे म्हणजे कमकुवतपणा दाखवण्यासारखे आहे.


Abhijeet25
Friday, December 28, 2007 - 5:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भारताने सध्या काय परराष्ट्रधोरण ठेवावे हे ठरवणे खरेच अवघड आहे.

नुस्ता अमेरिकेच्या भरवश्यावर राहुन चालनार नाहि, ते कधी पल्टि मारतील ते सांगता येत नाहि.

मला खालिल प्रश्न कायम पडतात. जे कोणी या विषयातले जाणकार आहेत ते सांगतिल का?

पाकिस्तानशी युद्ध होइल का खरेच कधी?
चीन, कोरिया पाकच्या मदतीला जातील का?
आखाती देश गप्प बसतील का?, त्यांच्याकडुन पाकला मदत मिळेलच मुस्लिम देश म्हणुन.
दोन्हि सीमांवर भारताला लढता येइल का?
अशा वेळेस रशिया आपली मदत करु शकतो का?

हे युद्ध जागतिक युद्ध होइल का?
अमेरिका कोणाच्या बाजुने उतरेल? (जर पाक, चीन, आखाती देश एका बाजुला आणि आपण आणि रशिया दुसर्‍या बाजुला असलो तर?)

जापान आपल्या बाजुने उतरेल का?
तिसरे महायुद्ध होइल?

योग म्हणेल मी हा बिबि बेनझिर भुट्टोंच्या हत्येवर चालु केला होता. आणि हा तिसर्‍या महायुद्धावर कसा काय पोचला.
पण पररष्ट्रानीती मधे हे सगळे येते म्हणुन विचारले.
दुसरा कोणता बिबि आहे का, जिथे मला हे प्रश्न ताकता येतील?




Yog
Friday, December 28, 2007 - 5:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>त्या देशाला stabilize करणे हा जगाच्या दृष्टीने सध्या सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. तिथे लोकशाही आणि शांतता असणे यातच भारताचा खरा फायदा आहे.
agreed! कुठलाही देश stabilized अस्णे हे सर्वान्च्याच दृष्टीने भले आहे. पण पाकिस्तानचा गेला पन्नास वर्षान्चा इतीहास काय सान्गतो? आणि कोण stabilize करणार? इराक मधे जे अमेरिकेने केले तेच पुन्हा आपण करायला जात आहोत का..? अम्ही इराक मधे लोकशाही, stability आणू या घोषवाक्याचे काय झाले हे आपण पहातोय. मला वाटत इस्लाम मधिल कुठल्याही fanetic country ला stabilize करणे हे फ़क्त कागदावर आहे.

स्वताच्या सीमान्चे संरक्षण हे महत्वाचे आहेच पण केवळ तेव्हडेच पुरेसे असते तर आज आपले अनेक प्रश्ण सुटले असते.
शिवाय lets not forget दावूद ला आन्तरराष्ट्रीय अतीरेकी म्हणून "मान्यता" प्राप्त झाली आहे. :-)
मला तरी त्यात कमकुवत्पणा दिसत नाही. अतीरेकी अन आतन्कवाद (तोही इस्लामीक?)हे in general global problem असताना त्यात एखाद्याचा support वा मदत घेणे काय गैर आहे? अमेरीकेकडुन निदान ती कुटील निती तरी घ्यायला हरकत नाही.


Abhijeet25
Friday, December 28, 2007 - 5:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भारताने सध्या काय परराष्ट्रधोरण ठेवावे हे ठरवणे खरेच अवघड आहे.

नुस्ता अमेरिकेच्या भरवश्यावर राहुन चालनार नाहि, ते कधी पल्टि मारतील ते सांगता येत नाहि.

मला खालिल प्रश्न कायम पडतात. जे कोणी या विषयातले जाणकार आहेत ते सांगतिल का?

पाकिस्तानशी युद्ध होइल का खरेच कधी?
चीन, कोरिया पाकच्या मदतीला जातील का?
आखाती देश गप्प बसतील का?, त्यांच्याकडुन पाकला मदत मिळेलच मुस्लिम देश म्हणुन.
दोन्हि सीमांवर भारताला लढता येइल का?
अशा वेळेस रशिया आपली मदत करु शकतो का?

हे युद्ध जागतिक युद्ध होइल का?
अमेरिका कोणाच्या बाजुने उतरेल? (जर पाक, चीन, आखाती देश एका बाजुला आणि आपण आणि रशिया दुसर्‍या बाजुला असलो तर?)

जापान आपल्या बाजुने उतरेल का?
तिसरे महायुद्ध होइल?

योग म्हणेल मी हा बिबि बेनझिर भुट्टोंच्या हत्येवर चालु केला होता. आणि हा तिसर्‍या महायुद्धावर कसा काय पोचला.
पण पररष्ट्रानीती मधे हे सगळे येते म्हणुन विचारले.


दुसरा कोणता बिबि आहे का, जिथे मला हे प्रश्न टाकता येतील?




Lalu
Friday, December 28, 2007 - 6:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जगाच्या भारताकडून आता अपेक्षा वेगळ्या आहेत. तेव्हा मदत "घेण्या" ऐवजी "देण्याची" भाषा बोलावी.
मोठेपणा दाखवण्याची संधी आली तर ती सोडू नये. अश्या वेळी ते प्रॉब्लेम भारताच्या दृष्टीने महत्वाचे असले तर सध्याच्या परिस्थितीत जगाच्या दृष्टीने अजिबात महत्वाचे नाहीत. ९११ सारख्या घटनने नंतरही या प्रॉब्लेममध्ये फारसा फरक पडला नाही (प्रॉब्लेम आहे हे जगाने मान्य केले, एवढेच झाले) तर या वेळी काय पडणार? कोण लक्ष देणार? त्यामुळे ती "रडारड" च ठरेल. जगाने तुमचे ऐकावे असे वाटत असेल तर आधी ती मान्यता मिळवावी. म्हणजे पुढे 'दाउद' म्हटले तरी लोक ऐकतील.

इराकचा प्रश्न वेगळा आहे. पाकिस्तानात संपूर्ण stability येईल का नाही, लोकशाही किती टिकेल हे सगळे पुढचे मुद्दे झाले. निदान त्याची प्रोसेस पुढे चालू ठेवण्यासाठी प्रयत्न होतीलच. त्यासाठी काय केले पाहिजे हे परिस्थितीची पूर्ण कल्पना आली की जाणकार ठरवतीलच. त्यात भारताचा महत्वाचा सहभाग असलाच पाहिजे. या घटनेनंतर भारताचे धोरण काय असावे याबद्दल चर्चा करायची होती, तेव्हा सध्या एवढेच म्हणायचे आहे.


American_desi
Friday, December 28, 2007 - 6:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Americela pak madhye stability nakoch ahe. Show me any country that US brought stability. Jithe America geli tithe ghan karun ali.

Ani Benezir la itaki kimmat mi det nahi. She was know for extremely corrupt and arrogent dictatorship when she was PM. She is not any pro-democracy personality. She would have done anything USA has told her.

Also her farther was hanged during Military coup in 1970 which was supported by USA.

Hi America kayam madhye madhye kay karate? .. ha maza prashna ahe.

Je zale te changale zale. Pak will solve their problem by themselve if US does not interfere.

Shendenaxatra
Friday, December 28, 2007 - 7:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Show me any country that US brought stability. Jithe America geli tithe ghan karun ali.


दुसर्‍या महायुद्धानंतर
पश्चिम जर्मनीत अमेरिकेने तळ उभारले. पूर्वेत रशियाने. यातील कुठला तुकडा प्रगत झाला, आर्थिक स्थैर्य प्राप्त करता झाला? पश्चिमेचा. तेव्हा निदान एक उदाहरण आहे. मला वाटते जपानही असाच बेचिराख झाला आणि अमेरिकेच्या मदतीने पुढे आला.


American_desi
Friday, December 28, 2007 - 9:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

barobar ahe. I am not going to fight this.

But both Germany and Japan have no rights to keep army. So all they can do is economic progress. Their potency has been chopped off.

Now Japan is under sever recession plus a complete social break down. More than 50% of women above 30 age are unmarried. Their population is decreasing etc. etc. ... but well it is not USA's fault.

Plus USA used the nuclear bomb first. I am very positive it will do it again. It is the most coward county on this earth.

Zakki
Friday, December 28, 2007 - 11:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hi America kayam madhye madhye kay karate?

गंमतच वाटली मला हे वाचून!

अमेरिकेला सगळे देश चळचळा कापतात. त्यांना हवे तसे झाले नाही तर (उगाचच्या उगाच सुद्धा) एकेक देश उध्वस्त करू शकतात. नि मग माजलेल्या बैलासारखे ते वाटेल तिथे मुसंडी मारतात. कोण थांबवणार त्यांना?

आता हळू हळू लोक लिहू लागले आहेत की जगातल्या अतिरेक्यांना सौदी अरेबिया पैसे पुरवते नि पाकिस्तान शिक्षण नि आसरा देते. भारतातल्या कुठल्याहि शेंबड्या पोराला हे गेली दहा वर्षे माहीत होते.

इराक कडे जाण्यात चूक झाली. पण दुर्दैवाने छेनि, रम्सफेल्ड, बोल्टन इ. जुनि खोंडे इराण नि इराकच्या मागे लागली. १९७० च्या अखेरीपासून त्यांचा इराणवर राग. त्यापुढे त्यांना काही दिसत नाही.


Mukund
Saturday, December 29, 2007 - 10:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योग.. भारताचे परराष्ट्र धोरण कसे असावे व सध्याचे भारतिय राजकारणी याबाबत मी सौ. गुप्तेबाईंनी मांडलेल्या विचारांशी सहमत आहे.

आणी तु जे म्हणतोस की अमेरिका पाकीस्तानवर आक्रमण करुन त्या देशाचा ताबा घेईल... हे मला तरी होइल असे वाटत नाही. स्ट्रॅटीजीक द्रुष्ट्या अमेरिकेला ते कितीही फायद्याचे वाटले तरी सद्य परिस्थीतीत अमेरिकेकडे त्यासाठी जो अमाप पैसा लागेल तो आहे की नाही याचा मला संशय येतो. आणी त्याहीपेक्षा अशा चढाईकरता जे लोकमताचे पाठबळ अमेरीकन अध्यक्षाच्या मागे लागते तेही सद्य परिस्थीतीत आहे किंवा मिळेल असे वाटत नाही. अमेरिका इराक युद्धामधे बरीच होरपळुन निघाली आहे व लोकही ते युद्ध चालु ठेवण्यात फारसे उत्सुक नाहीत. सध्याची कोलमडलेली इकॉनॉमी अजुन एका युद्धाचा भार उचलु शकेल असे वाटत नाही.आणी सगळ्यात महत्वाचे म्हणजे इराक,इराण,अफ़गाणीस्तानवर ताबा ठेवायला त्यांना पाकीस्तानात कशाला जायला हवे? ते ऑलरेडी तिथे आहेतच की... अफ़गाणीस्तान व खुद्द इराकमधे! काय दिवे लावले आहेत गेल्या चार वर्षात तिथे त्यांनी?:-)

पण तु म्हणतोस ते खरे आहे. अमेरिका मुशारफ़ला पाठ केव्हाही दाखवु शकते. त्यांचा इतिहास अशा धरसोडीच्या धोरणाने भरलेला आहे. १९७९ ते १९८५ पर्यंत अफगाण मुजाहुद्दीनना(अहमदशहा मसुद व ओसामा बिन लादेन)यांनीच पाठींबा दिला होता. कारण त्या वेळी रशिया अमेरिकेचा शत्रु होता व मुजाहुद्दीन रशियाविरुद्ध लढत होते. नंतर त्याच ओसामाला आता ते शोधत फिरत आहेत(मारण्यासाठी).

तीच गोष्ट सद्दाम हुसेनबाबतची. ८० मधल्या प्रदिर्घ इराण्-इराक युद्धात अमेरिकेनेच पैसा व युद्धसामुग्री पाठवुन सद्दामला बळकट केला. त्याच सद्दामला नंतर त्यांनी फासावर लटकवला.

त्यामुळे मुशारफ़बाबत पण तसेच झाले तर ते काही नवल नाही. अशाच धरसोडीच्या परराष्ट्रधोरणाने अमेरिकेला पुर्वी बर्‍याच वेळेला फटका बसला आहे पण अमेरिकेमधेही असा दुरद्रुष्टी असलेला एकही नेता कित्येक दशकात जन्माला आला नाही.फक्त सध्यापुरता विचार करुन शत्रु कोण व मित्र कोण याचा विचार केल्यामुळेच सद्दाम व ओसामा निर्माण झाले(यांच्याच क्रुपेने) व आताही गेले ६ वर्षे मुशारफ़चे लांगुलचालन करुन अमेरिकेला काहीच फायदा झालेला नाही. मुशारफ़ सुद्धा मधुन मधुन १-२ तालीबान माणसे पकडुन बुशला मधाचे बोट चाखवतो. त्यालाही ठाउक आहे की अमेरिका सद्ध्या त्याच्या मदतीवर विसंबुन आहे.पण तो पाकीस्तानी जनमातलाही घाबरुन आहे. त्याची ही दोन दगडांवर पाय ठेवण्याची कसरत किती दिवस चालते हेही इंटरेस्टींग आहे.

हे असे सगळे असल्यामुळे बेनझीर भुत्तोच्या खुनाने तिसरे महायुद्ध सुरु होईल असे मला तरी वाटत नाही. पाकीस्तानात अंतर्गत अराजकता माजेल हे शक्य आहे. मुशारफ़चा सुद्धा खुन होउन दुसरा कोणी मिलीटरी लिडर होण्याच्या शक्यतेकडेही त्यांचा इतिहास बोट दाखवतो.त्यात अमेरिकेचा हात असण्याचीही दाट शक्यता आहे.

अमेरिकन देसी.. अमेरिका सगळीकडे का नाक खुपसते याचे उत्तर अगदी साधे आहे. त्यांची इकॉनॉमी जगात सगळ्यात मोठी असल्यामुळे त्यांचे जगात सगळीकडे इंट्रेस्ट गुंतले आहेत. ते इंट्रेस्ट(तेल हे १ मोठे उदाहरण!) प्रोटेक्ट करण्यासाठी त्यांना सगळीकडे नाक खुपसावे लागते. हे कोणताही देश आपल्या देशहितासाठी करतो व अमेरिकेकडे बलाढ्य सेना असल्यामुळे त्यांना हे शक्य होते जे कमजोर देशांना वाटत असुनही करता येत नाही. बळी तो कान पिळी हा नियम जागतीक राजकारणातही लागु पडतो.त्यात त्यांचा एवढा द्वेश करायचे कारण नाही.

या हत्येमुळे उठलेल्या गदारोळात भारताने काश्मीरच्या प्रश्नाचा जोगवा जगापुढे मागायचा हे मला तरी पटत नाही. लालु म्हणते त्याप्रमाणे हा भारताचा निजी मामला आहे व त्यांनीच तो कणखरपणे टॅकल केला पाहीजे. तसेच दाउद इब्राहीमबद्दलचे. त्यात इतरांचे कोणतेही पॉलीटीकल इंटरेस्ट गुंतलेले नसल्यामुळे कुत्ता जाने और चमडी जाने अशीच व्रुत्ती सगळे जग दाखवणार.

आणी ही हत्या तालीबान व अल कायदावर बुमरॅंग सारखी पलटेल हेही मला वाटत नाही. अरे योग... जिथे ९११ नंतरच्या त्यांच्याविरुद्धच्या प्रचंड मोहीमेमधुन अजुन काहीच निश्पन्न झाले नाही त्यानंतर बेनझीरच्या खुनाने काय वेगळे होणार आहे? अफ़गाण युद्ध व इराक वॉर चालु असुनसुद्धा अल कायदा व तालीबानच्या कारवायांवर संपुर्ण नियंत्रण आणण्यात अमेरिका अजुनतरी अपेशीच ठरली आहे. अल कायदा व तालीबान गनीमी काव्याने लढत असल्यामुळे अशा फ़ेसलेस एनीमीशी युद्ध खेळणे नेहमीच कठीण जाते.त्यामुळे त्यांचे अजुन काही वाकडे होईल असे मला तरी वाटत नाही.


Kedarjoshi
Saturday, December 29, 2007 - 6:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बेनझीर हत्येमुळे भारताला काहीही फरक पडनार नाही. त्या देशाचा इतिहासात अनेकदा हाय प्रोफाईल लोकांची हत्या झाली आहे. त्याचा काही फरक पडला काय? नाही. ही घटना अतिशय साधी आहे ( आंतरराष्ट्रीय राजकारणात). त्या देशात सत्तेवर कोणीही आले तरी भारत द्वेश कायम ठेवावा लागतो त्यामुळे काही फरक पडला नसता. मुशर्रफ ने तसेही तिला निवडु दिले नसते.

अमेरिकेने सत्ता शेअर करन्यासाठी (मुश व तिच्यात) तिला परत पाठवले पण बहुदा नवाज शरिफ वा मुशच्या लोकांनी तिला मारले.
मला लालु व मुकुंदचे पोस्ट आवडले. त्यात थोडी भर घालतो.

महासत्ता होन्यासाठी भारताने अमिरीकेकडुन धडे घ्यावेत. थोडा श्रुड पणा घ्यावा.
१.मुश ला आतुन पाठींबा देउन हत्येचा उघड निषेध करावा. मुशाला जरी त्याचा फायदा नसला तरी बेरजेचे राजकारण महत्वाचे.
२. एक गुप्त फंड आखुन त्यात काही मिलीयन डॉलर्स ठेवावेत. है पैसे नॉर्थ वेस्ट मधी अतिरेक्यांचा हातात कसे पडतील ते पाहावे वा त्यांना (त्या टोळ्यांना) पैसे देउन कंट्रोल करावे. ह्या टोळ्या मुश विरोधी आहेत त्या सध्या पाक मध्ये अस्थिरता आणत आहेत त्यांना साहाय्य करावे जेने करुन विनय म्हणतात तसे होईल. निदान एक तुकडा तरी पडावा. ( ही लॉंग टर्म स्ट्रटेजी आहे. आपण असे ६९ ते ७१ मध्ये करुन बांग्लादेश निर्मान केला आहे ति हिस्ट्री रिपीट करावी) पाक जेवढा अशांत तेवढा आपलाल्या फायदा.
३. आंतरराष्ट्रीय स्तरावर अतिरेक्यांविरुध्द जोरदार प्रचार मोहीम उघडावी.
४. सिमारेषा टाईट कराव्यात.
५. जर भारतात काही हल्ला झाला (जसे एखादा बॉम्ब स्फोट) तर लगेच कुंभाड रचुन पाकच्या सिमारेषेवर हल्ला करावा वा लगेच माघार घ्यावी. हे नेहमी चालु ठेवायचे.

माझी मत काहींना अतिरेकी वाटतील पण स्वतचा देशाला पुढे न्यायचे असेल तर हे वा असे करावेच लागेल. महासत्ता म्हण्जे कि बोर्ड वरची खड खड नाही तर लोकांचा राजकारणात लक्ष घालने. अमेरिका असेच करते मग आपण का नाही? २०२५ काही फार दुर नाही. कदाचित आपण यातले काही करत ही असु.


Antara
Sunday, December 30, 2007 - 4:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो मते छान आहेत हो पण आपला देश आहे का तसा आक्रमक! वृत्ती आहे गुलामगिरी, हाजी हाजी ची! अतिरेक्यांना आपण कन्ट्रोल करणार!! हाहाहा.. अतिरेक्यांच्या इशार्‍यासरशी खुद्द आपले परराश्ट्र मन्त्री स्पेशल विमान करून कन्दहार ला जातात तुरुंगातल्या त्यांच्या भईबन्दांशी त्यांची भरतभेट घदवायला! दिली धमकी सोड अतिरेक्याना, पळवली मंत्राची लेक, सोडा अजून दहाना असे आपले धोरण! २०२५ येवु दे नहीतर २५२० हे असेच शेपूट घालून बसणर!! आता हे ही विचारही अतिरेकी वाटतील पण सत्य स्थिती आहे

Zakki
Sunday, December 30, 2007 - 3:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमेरिकेमधेही असा दुरद्रुष्टी असलेला एकही नेता कित्येक दशकात जन्माला आला नाही.

अमेरिका काय नि भारत काय, सगळे राजकारणी फक्त पुढच्या निवडणुकीत जिंकून यायला काय करावे लागेल एव्हढेच बघतात. बाकी देशाचे 'कल्याण' हा इतरांचा प्रश्न.


इथे राष्ट्राध्यक्षपदासाठी उभे असलेल्या डझनावारी लोकांना फक्त एकच विचार - मला निवडून येण्यासाठी ह्या बातमीचा कसा उपयोग करून घेता येईल? भुट्टो मरो किंवा काऽहीहि होवो.




Nandini2911
Monday, December 31, 2007 - 6:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

http://timesofindia.indiatimes.com/Fears_about_our_nukes_unfounded_Pak_army/articleshow/2663975.cms
याचा देखील विचार करा...

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators