Giriraj
| |
| Friday, December 14, 2007 - 6:09 am: |
| 
|
नव्या platform सह मायबोली appearance ने जूनीच ठेवता येणार नाही का? बहुतेकांना 'आपला' formaat सवयीचा आणि आवडीचा आहे असे मला वाटते! 'प्रतिसादाला प्रतिसाद' हा प्रकार तिओतकासा पटला नाही... santro बाजारात थोडी स्थिरस्थावर झाल्यावर well established मरुति ज़ेन ला santro सारखे बनवून पेश केले गेले होते.... त्याची आठवण झाली! देवनागरीत लिहिण्याची सोय उत्तमच!
|
Shyamli
| |
| Friday, December 14, 2007 - 3:35 pm: |
| 
|
मायबोली हितगुजचा तरी लुक तसाच ठेवा प्लीज. हे अजिबातच आपलं वाटत नाहिये आपल्या घराची डागडुजी रंगरंगोटी ठीके हो, पण एकदम पाडून नवीनच बांधायला काढल्यावर कसं वाटत तस वाटायला लागलय. नुतनीकरण पूर्ण होईपर्यंत वाट पहायला हवि, पण चैनच पडत नाहिये
|
Naatyaa
| |
| Friday, December 14, 2007 - 5:23 pm: |
| 
|
याआधी अनेकवेळा मायबोलीचे रंगरुप बदलले. मल वाटतं हा सवयीचा भाग आहे. काही दिवसात याची सवय होइल..
|
Vaatsaru
| |
| Saturday, December 15, 2007 - 1:02 am: |
| 
|
पहिली गोष्ट म्हणजे नव्या सुविधा आवडल्या. आता बदलांबद्दल अजून तसे फ़ारसे ’चाचपून’ बघितले नसले तरी थोडे चाचपडावे लागत आहे (सध्या तरी). १. एक सूचना म्हणजे डाविकडे जे navigation आहे ते वरती आडव्या स्वरुपातच दिले तर जास्त ’जागा’ उपलब्ध होउ शकेल. ते सगळे DIV मधेच आहे त्यामुळे नुसत्या CSS बदलांमुळे काम भागू शकेल. २. एक त्रुटी जाणवली की एकाच पॄष्ठावर ’रंगिबेरंगी’ आणि tree view असल्यामुळे tree मधे काही उघडले कि पान ’ताजेतवाने’ होउन पुन्हा पूर्ण वर जाते, मग परत खाली यावे लागते. ३. सध्याचे ’रंग’ मुद्दामच थोडे ’मंद’ ठेवले आहेत की काम चालू आहे ? CSS च्या माध्यमातून अजून ’चमकदार’ करता येउ शकतील. ४. मायबोलीचे वैशिष्ट्य असलेले tree view हे अतिशय सोयिस्कर होते ते तसेच रहावे आणि मुख्य पानावर सगळ्यात वरती दिसावे, आणि मग आजूबाजूला ’रंगिबेरंगी’ वगैरेंचे दुवे दाखवता येतिल. ५. ’रंगिबेरंगी’ विभागासाठी अजून काही सोयी देता येतिल का जसे कि नुसत्याच ’नावापेक्षा’ अधिक माहिती (पहिल्या ३-४ ओळी) बाकीचे नंतर लिहितो (टाईप करुन दमलो )
|
Admin
| |
| Saturday, December 15, 2007 - 1:49 am: |
| 
|
>santro बाजारात थोडी स्थिरस्थावर झाल्यावर well established मरुति ज़ेन ला santro सारखे बनवून पेश केले गेले होते.... त्याची आठवण झाली! त्यांचं काय झालं आपल्या मारूतीचं इंजीन तयार करणारी जी सुझुकी कंपनी होती ती केंव्हाच बंद पडली आणि सुटे भाग मिळेनासे झाले. आणि सध्या बाजारात त्यातल्या त्यात इंजीन चांगलं आहे santro चे. त्यामुळे आपल्या मारूतीला santro चंच इंजीन आतून लावलंय पण अजून बाकीचा बाहेरचा भाग बदलायचाय. आणि इंजीन सारखच असल्यामुळे आता santro सारख्याच काही गोष्टी येणं अपरिहार्य आहे.
|
Dineshvs
| |
| Saturday, December 15, 2007 - 3:29 am: |
| 
|
Admin मला वाटते अजुनही काहि जण इतरत्र टाईप करुन इथे पोस्ट करतात. श्यामली च्या पोस्ट्स तश्या वाटतात. वरती वाटसरुने पण तसेच केलेले दिसतेय. ते कसे करायचे ते मला कुणी समजाऊन सांगेल का. फ़ुरसतीने लिखाण करुन, ते परत परत तपासुन, मला पोस्ट करायला आवडते.
|
आता प्रतिसाद सरळ एका खाली एक असे दिसत अहेत.
|
Psg
| |
| Saturday, December 15, 2007 - 5:32 am: |
| 
|
दिनेश, तुम्ही 'बरहा' हे मराठी सॉफ़्टवेअर वापरून तुमच्या पीसीमधे मराठीत लिहू शकता आणि इथे नुसतं पेस्ट करू शकता नंतर. baraha.com इथून डाऊनलोड करता येईल.. नवीन सवयीचे होईपर्यंत जुन्याशी comparison अटळ आहे बाजारात अनेक सॅंट्रो आहेत, आम्हाला मारुतिच बरी वाटते त्यामुळे असेल बरं, फोटो, चित्रकला अश्या 'दृक' बीबींवर तरी किमान (२५) शब्दांची मर्यादा नको, यावर विचार करता येईल का? तिथे काय लिहायचं असा प्रश्न पडतो खरंच! किंवा मर्यादा हवीच असेल तर फक्त त्या बीबींना जुन्या ४ शब्दांची मर्यादा ठेवता येईल का?
|
फोटो, चित्रकला या bb वर शब्द मर्यादा कमी केलेली आहे.
|
Jo_s
| |
| Sunday, December 16, 2007 - 5:41 am: |
| 
|
मलाही जुन्या मायबोलीतली पध्दत आपलिशी वाटते. सिमलेस पेजेस्. सलग वाचायला छान वाटत. आणि प्रतिक्रिया ही लगेच दिसतात. गुलमोहोर आणि रंगिबेरंगी दोन्ही ठिकाणी जुनीच पध्दत छान वाटते. खास करून दिनेश सारख्यांच्या रंगिबेरंगीत खुपच वाचायला असते आणि प्रतिक्रीयाही खुप असतात. प्रत्येकासाठी पेज उघडत बसण्यापेक्षा ते बर वाटतं.
|
Shyamli
| |
| Sunday, December 16, 2007 - 6:19 pm: |
| 
|
कविता विभाग काव्यधारा करणर का? आणि त्यातले इतर विभाग पण करायला हवेत
|
Giriraj
| |
| Monday, December 17, 2007 - 7:19 am: |
| 
|
Admin Looks आपले असू द्या ना! पुन्हा सुधीर म्हणतोय तसेच मलाही वाटते बर्याच प्रतिक्रिया सुद्धा त्या त्या post मध्ये value additions असतात त्यामुळे प्रत्येक प्रतिक्रियेसाठी वेगवगळे 'टिचकायला' बरोबर नाही वाटत,सलगता तुटते.. मान्य की सगळ्यांची सवय होईल्ल पण जे चांगले आहे ते उगीच का बदलायचे? ( hits चा काही commercial फ़न्डा तर नाही ना यामागे?)
|
Ajjuka
| |
| Monday, December 17, 2007 - 6:28 pm: |
| 
|
गुलमोहर आणि रंगीबेरंगीमधला जुना (त्याच महिन्यातला पण जुना) मजकूर हरवतो. त्याच महिन्यातला मजकूर मिळत नाही तर आधीच्या महिन्यातला कसा शोधणार?
|
Admin
| |
| Tuesday, December 18, 2007 - 1:58 am: |
| 
|
>hits चा काही commercial फ़न्डा तर नाही ना यामागे यात काहीही commercial हेतू नाही. कारण मायबोलीकराना मुद्दाम click करायला लावले तर ते कंटाळून निघून जातील. त्यामुळे नेहमीच सभासदाना समोर ठेवूनच निर्णय घेतले जातात. (फक्त एका बाबतीत हा विचार बाजूला ठेवावा लागतो. जेंव्हा scalability चा प्रश्न होऊन साईट बंद पडेल का असे वाटते. पण तसे अजून तरी झाले नाही.) या सगळया गडबडीचे मुख्य कारण म्हणजे नवीन मायबोलीमधे जुन्या मायबोलीतल्या चांगल्या गोष्टी तत्काळ आणता येतील असा आमचा अंदाज होता. गणेशोत्सव आणि दिवाळी अंक यशस्वी रित्या नवीन software मधून गेल्यावर तो आणखी वाढला म्हणून आम्ही गुलमोहराचे स्थलांतर करायला घेतले पण आमचा अंदाज चुकला. आणि अपेक्षेपेक्षा स्थलांतराला वेळ लागतो आहे. तरीही तत्काळ करण्यासारखे बदल तुमच्या सुचनांवरून लगेच करतो आहोत. >सध्याचे रंग मुद्दामच थोडे मंद ठेवले आहेत की काम चालू आहे रंगसंगतीबद्दलचेही बदल चालू आहेत.
|
Admin
| |
| Tuesday, December 18, 2007 - 2:07 am: |
| 
|
>गुलमोहर आणि रंगीबेरंगीमधला जुना (त्याच महिन्यातला पण जुना) मजकूर हरवतो. त्याच महिन्यातला मजकूर मिळत नाही तर आधीच्या महिन्यातला कसा शोधणार? हे थोडे समजले नाही कारण माझ्या माहीतिप्रमाणे हे होत नाही आहे. पूर्वी last 1 day मधून गेले तर फक्त २४ तासात नवीन आलेला मजकूर दिसायचा. हितगुज-ग़ुलमोहर्-कार्तिक-कथा असे गेले तर कार्तिक महिन्यातल्या सगळ्या कथा दिसायच्या. आता last 1 day मधून २४ तासात नवीन आलेला मजकूर दिसतो. हितगुज-गुलमोहर्-मार्गशीर्ष्-कथा असे गेले तर आजपर्यंत आलेला मार्गशीर्ष महिन्यातला कथा विभागातला सगळा मजकूर दिसतो (फक्त २४ तासामधला नाही) त्यामूळे पूर्वीसारखे tree view नाही पण बाकी महिन्यातला सगळा मजकूर दिसतो आहे ????? /hitguj/messages/75/135465.html?1197266438
|
Milya
| |
| Tuesday, December 18, 2007 - 6:24 am: |
| 
|
Admin मला माहित आहे की ह्यावर तुमचे काम सुरु आहे पण तरिही आगाउपणा करुन सुचना... पूर्वी जितके विभाग होते गुलमोहरवर तेवढे विभाग नविन मायाबोलीवर करता येतील का आणि ते सुद्धा त्यांची hierarchy maintain करुन म्हणजे काव्यधरा मग त्याच्या आत कविता, काहीच्या काही कविता, गझल अश्याप्रकारे?
|
मिल्या आपल्या सुचनेप्रमाणे बदल केले आहेत.
|
Milya
| |
| Tuesday, December 18, 2007 - 6:58 am: |
| 
|
अरे वा mod_10 फ़ारच झटपत कृती.. अनेक धन्यवाद... जसा तुम्हा मंडळीना वेळ होईल तसे बाकीच्या विभागात पण असे बदल करणार का?..
|
मिल्या बाकी सर्व विभाग तर पुर्वीच्या गुलमोहर प्रमाणेच आहेत. आपण नेमकं कुठल्या विभागाबद्दल म्हणत आहात?
|
Limbutimbu
| |
| Wednesday, December 19, 2007 - 8:13 am: |
| 
|
ऍडमिन, इग्नोरची सुविधा आणि फ्रेण्ड्स सर्कल (कम्पु) चे लक्षात आहे ना? 
|