Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 04, 2007

Hitguj » Views and Comments » Current Affairs » बातम्यांचे / लेखांचे संकलन » Political » Archive through December 04, 2007 « Previous Next »

Vijaykulkarni
Saturday, November 17, 2007 - 2:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Dan Quyle eventually became VP and he provided endless entertainment!

someone asked him what he thought of lebanese problem.

he said
"what two adult consenting women do in their
bed is none of our business"





Chinya1985
Monday, November 19, 2007 - 8:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पाकिस्तान किति धोकादायक आहे याबद्दलचा हा एक लेख्-

http://www.indianexpress.com/story/240484.html

Jaymaharashtra
Tuesday, November 20, 2007 - 5:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पाकिस्तानी दहशतवादी लखनौ पोलिसांकरवी पकडले जातात काय आणि लगचे राहुल गांधी यांचे अपहरण करण्याचा कट रचल्याचा कबुलिजबाब देखिल देतात काय?
शेंबड पोर तरी विश्वास ठेवेल काय यावर?अर्थात काही महाभाग आहेत म्हणा!!!!!!!!!!!!!!

धन्य त्या दहशतवाद्यांची आणि त्या कॉंग्रेसजनांची!

जय हिंद!
जय महाराष्ट्र!


http://www.saamana.com/2007/Nov/19/AGRALEKH.HTM

Mahaguru
Tuesday, November 20, 2007 - 2:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि ह्या दहशतवादाबद्दल काय मत आहे? :-)
http://www.saamana.com/2007/Nov/19/Link/Main10.htm

Uday123
Tuesday, November 20, 2007 - 3:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पाकिस्तानी दहशतवादी लखनौ पोलिसांकरवी पकडले जातात काय आणि लगचे राहुल गांधी यांचे अपहरण करण्याचा कट रचल्याचा कबुलिजबाब देखिल देतात काय?
---सामान्य भारतीयाचा जीव भांड्यात पडला असेल. राहुल हे देशाचे भावी पंतप्रधान आहेतच, पण त्याच बरोबर ते आपल्या देशाच्या माजी पंतप्रधानांचे पणतु, नातु, मुलगा हे देखील आहेत.
मला पुर्ण खात्री आहे की ते (भावी पंतप्रधानांचे) वडिल, आजोबा, पणजोबा पण होतील.


Jaymaharashtra
Tuesday, November 20, 2007 - 7:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

महागुरु!
हा प्रश्न मुख्यत्वे मला विचारला आहात का? नसेल तर उत्तमच पण जर असेल तर मला याचा अनुभव नाही हो! कारण निदान मी तरी नवर्‍यावर अत्याचार करत नाही.
कायद्याचा गैरवापर करुन नवर्‍यांना छळणार्‍या स्त्रिया माझ्या माहितीत बर्‍याच आहेत.त्यावर एक नविन बि बि चालु करता येईल.
आणि स्त्री हिच स्त्री ची मुख्य शत्रु असते "या उक्तीवर माझा पुर्ण विश्वास आहे स्वानुभावामुळे.


Mahaguru
Tuesday, November 20, 2007 - 8:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी कुणालाच असा प्रश्न विचारला नाही, बातमी वाचली आणि इथे पोस्ट केली. विषयांतर झाला असेल तर क्षमस्व. आणि ह्यावर चर्चा करावी वाटली तर लगे रहो :-)

Shravan
Thursday, November 22, 2007 - 12:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तिकडे कर्नाटकात, त्या देवेगौडा नावाच्या बाप्-लेकांनी किळस येईल इतका पोरखेळ केला आहे लोकशाहीचा!
भाजप ने त्यांच्यावर विश्वास टाकयलाच नको होता, त्यांचा मागचा हा सगळा खेळ बघता.
असल्या बेजबाबदार लोकप्रतिनिधींना आता लोकांनी त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे.


Jaymaharashtra
Friday, November 23, 2007 - 11:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लखनौ मधे ७ साखळी बॉंम्ब स्फोट झाल्याचे वृत्त आहे.
कारण काय तर म्हणे! ३ दिवसांपुर्वी राहुल गांधी याच्या तथाकथित अपहरणाचा कट रचणार्‍या दहशतवाद्यांना पोलिसांनी अटक केली होती, त्यांचा खटला लढवायला लखनौ येथील राष्ट्रप्रेमी वकीलांनी नकार दिला व त्या आरोपींना न्यायालयत नेत असताना चोप दिला होता.त्याचा राग म्हणुन हा रक्तपात घडवला.
वा रे वा! चोर तो चोर वर शिरजोर" असेच म्हणायला हवे.
जय हिंद!
जय महाराष्ट्र!


Jaymaharashtra
Friday, November 23, 2007 - 11:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


जनतादल,समाजवादी ह्या सारखे पक्ष सरळ सरळ राजकाराणाचा बाजार मांडुन बसले आहेत.कसले राष्ट्रप्रेम आणि कसली निष्ठा आणि कसला निधर्मवाद व लोकप्रेम या सगळ्याला यांच्या लेखी काही किंमत नाही. कधी नव्हे ती सत्ता हाती आली त्याचा वापर करुन स्वतःचे जमेल तेव्हढे उखळ पांढरे करुन घ्यायची हिच अप्पलपोटी वृत्ती यांच्या ठायी आहे.
भाजपा ने आता शत्रु कोण आणि मित्र कोण हे ओळखायला शिकावे.
जय हिंद!
जय महाराष्ट्र!


Farend
Wednesday, November 28, 2007 - 9:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज CNN-YouTube debate आहे रिपब्लिकन पार्टीचे. ५ वाजता पॅसिफिक आणि ८ वाजता इस्टर्न टाइम प्रमाणे. मला वाटते हे बघण्यासारखे असेल कारण यावेळी आपल्या ठराविक लोकांसमोर बोलणार नाहीत हे लोक

Zakki
Thursday, November 29, 2007 - 12:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गेले खड्ड्यात! ते काय नि डेमोक्रॅट काय, चोर नं १ चे.

रिपब्लिकन म्हणे टॅक्स कमी करतात! नि मग स्थानिक संस्था, वॉशिंग्टनहून पुरेसे पैसे मिळत नाहीत म्हणून स्थानिक कर त्याच्या दुप्पट वाढवतात!

डेमोक्रॅट तर काय, चक्क कम्युनिस्टांसारखे, सगळे सरकारने करायचे नि मग उत्पन्नाच्या ८० टक्के कर भरायचा! फायदा फक्त मधल्या मधे पैसे खाणार्‍यांचा नि खोटे क्लेम दाखवून फसवणार्‍यांचा!

राजकारणि, ही जमात नष्ट केली तर वकीलहि कमी होतील.

ते लोक पैशाच्या मागे असतात. वकील नसते तर डॉक्टरच्या फिया पण कमी होतील, इन्शुरन्सचे स्तोम कमी होईल. गुन्हे पण कमी होतील.

लोक जरा प्रामाणिकपणा, एकमेकांना मदत करणे, शिकणे, शोध लावणे नि एकंदरीत सुखी नि समाधानी रहायला शिकतील.


Sunilt
Monday, December 03, 2007 - 8:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

४० जागांवर आमनेसामने

- म. टा. प्रतिनिधी

महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युती असली तरी गुजरात निवडणुकीत शिवसेना स्वबळावर लढत असून हिंदुत्वाचा पुढाकार करणाऱ्या या दोन्ही पक्षाचे उमेदवार ४० विधानसभा मतदारसंघात आमने-सामने लढणार आहेत. भाजपला काटशह देण्यासाठी भूमिपुत्रांना न्याय आणि बेरोजगारांना रोजगार या प्रमुख मुद्यांवर शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे नेते गुजरातमध्ये प्रचारसभा घेणार आहेत.

मुख्यमंत्री नरेंद मोदी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविणाऱ्या भाजपला काटशह देण्यासाठी शिवसेनेने मुंबईतून मोठ्या प्रमाणावर कार्यर्कत्यांचा फौजफाटा गुजरातला रवाना झाला आहे. शिवसेनेच्या वतीने पहिल्या टप्प्यात २३ तर दुसऱ्या टप्प्यात १७ जागांवर निवडणूक लढविण्यात येणार आहे. गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर उद्योग सुरू होत असून तिथे भूमिपूत्रांना संधी मिळावी तसेच बेरोजगारांना रोजगार मिळावा, खाडीशेजारच्या गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा या मुद्यांवर प्रचारात भर देण्यात येत आहे. गुजरातमध्ये जिरा आणि गहू उत्पादकांना दलालांचा फारच त्रास होत आहे. त्यामुळे जिरा आणि गव्हाच्या विक्रीसाठी सरकारी केंदे सुरू करण्याची शिवसेनेची प्रमुख प्रमुख मागणी आहे. या मुद्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, नेते सुभाष देसाई यांच्यासह अन्य नेत्यांच्या प्रचारसभा होणार आहेत, अशी माहिती सचिव विनायक राऊत यांनी दिली.


Zakki
Monday, December 03, 2007 - 11:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कॉंग्रेसने नेहेमीप्रमाणे लोकांना बर्‍याच गोष्टी फुकट देण्याचे आश्वासन दिले आहे.

मागे असेच महाराष्ट्रात फुकट वीज देऊन, पाण्याची नि विजेची टंचाई वाढवली असे लोक म्हणतात, नि ते पटण्याजोगे होते.

धन्य धन्य ते राजकारण नि राजकारणी!
कुण्णाला लोकांच्या कल्याणाची किंवा देशाची चिंता नाही. फक्त आम्हाला निवडून द्या, म्हणजे आम्ही कोट्यवधी रुपये खाऊन श्रीमंत होऊ.

आमच्या देशात काय नि भारतात काय, सगळीकडे एकच प्रकार!


Mandard
Tuesday, December 04, 2007 - 4:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सेनेला कोण मत देणार गुजरातमधे. त्यांनी दिलीत पण election लढवल्या होत्या नगरपालिकेच्या. बर्याच उमेदवारांची deposit जप्त झाली. by the way who paid sena to stand against modi, they can do anything for money पण मोदि परत निवदुन येतील असे वाटते.

Satishbv
Tuesday, December 04, 2007 - 11:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

congress मोफत colour tv देखिल देणार आहे

Sunilt
Tuesday, December 04, 2007 - 2:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

by the way who paid sena to stand against modi, they can do anything for money

देणारे लाख देतील पण घेणार्‍यांचे काय?

मावळेदेखील मोहोरा स्वीकारू लागले!! हा हन्त हन्त!!


Chinya1985
Tuesday, December 04, 2007 - 2:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

by the way who paid sena to stand against modi, they can do anything for money
मावळेदेखील मोहोरा स्वीकारू लागले!! हा हन्त हन्त!!


मोदीविरुध्द उभे रहायला कोणी सेनेला पैसे दिले असते तर सर्वच सीटवर सेनेने उमेदवार उभे केले असते. सेना काय छोटी पार्टी आहे का की ज्यांच्याकडे उमेदवार उभे करायला पैसे नाहित???पार्टीचा विस्तार वाढवायचा असल्यास नविन ठीकाणी पहिल्यांदी हार होतच असते. बाकी सेना मोदीविरुध्द उभी राहिलेलीच नाही. सेना भाजप युती गुजरातेत होणार होती व ३० जागांची मागणी सेनेनी केली होती पण इतक्या जागा सेनेला देणं भाजपला शक्य नव्हत म्हणुन युती झाली नाही. आणि मंदार कॉंग्रेस आणि इतर पक्षांची लोकं काय पैशासाठी राजकारण करत नाहीत अस तुम्हाला म्हणायच आहे का??तसं म्हणायच असल्यास म्हणा मग आम्हीही लिहितो धर्मनिरपेक्ष नेत्यांनी,पार्ट्यांनी पैशासाठी काय काय नाही केल ते. आणि मावळेसुध्दा मोहरा स्वीकारू लागले हे तुम्ही कशाच्या जोरावर बोलताय??काही दिवसांपुर्वी विलासराव म्हणाले की ज्या मुस्लीमांनी आम्हाला निवडुन दिल त्यांच्या साठी सत्ता गेली तरी चालेल. काय बेशरमपणा आहे!!!अरे १०% मुस्लीमांनी तुम्हाला निवडुन दिलय का??इतर हिंदुंनीपण तुम्हाला मत दिलीत त्यांच्यासाठी कधी सत्ता सोडावी नाही वाटली तुम्हाला??इतकी लाचारता शिवरायांच्या महाराष्ट्रात कशी आणि कधी आली हेच कळत नाही. या ठीकाणी विलासराव पैशासाठी बोलत नाहीत का??

Chinya1985
Tuesday, December 04, 2007 - 2:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

In one of the dumbest, ill thought out moves which could cost it dearly with the Minorities and simultaneously earn the ire of all the liberal and secular minded people across the country. The Congress led UPA Government has issued a new two rupee coin with a Crusader’s Cross also known as the Jerusalem Cross on it.

This cross was used as a coat of arms by the Crusader Kingdom established after the First crusades in 1096 AD and which lasted until its fall to the forces of Saladin in the late 12th century AD.

Infact it was the papal banner issued by Pope Urban II, who called on the faithful to wage an Holy war to liberate Jerusalem from the “unbelievers”, under which the Crusading armies marched to free Jerusalem and in the aftermath of the Battle of Jerusalem killed thousands of innocent civilians.



ithehi pahaa

{http://newstodaynet.com/2007sud/mar07/210307.htm,http://newstodaynet.com/2007sud/mar07/210307.htm}

आता बोला भारत धर्मनिरपेक्ष आहे का कॉंग्रेसच्या राज्यात??? आणि मंदार हे असे प्रकार होत असताना गप्प रहाणारे कॉंग्रेस नेते पैशासाठी काहीही करत नाही आहेत का??

Jaymaharashtra
Tuesday, December 04, 2007 - 3:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कॉंग्रेस आणि कॉंग्रेसचे लाचार आणि जीहुजुरी करणारे नेते काय काय करु शकतात ते इथे दिसतेच आहे.
१)
http://www.ndtv.com/convergence/ndtv/story.aspx?id=NEWEN20070034910&;ch=12/4/2007%208:54:00%20PM?
२)नटवरसिंग यांनी काय केले ते सर्वश्रृत आहेच.
३)शरद पवार कॉंग्रेस मधे असताना भुखंडाचे कसे श्रीखंड केले ते अजुनही लोकांच्या स्मृतीपटला वरुन पुसले गेले नसावे.(तोच पैसा वापरुन महाराष्ट्रात भ्रष्टाचार वाढवण्यात राष्ट्रवादी अग्रक्रमावर आहे)
आर के आनंद यांनी जे काही केले त्यात गैर काहिच नाही कारण हा त्यांचा स्थायीभाव आहे. अश्याच रितीने स्वतची उपजिविका आजपर्यंत चालु ठेवली आहे त्यांनी आणि गांधी घराण्याचे पाठबळ आहेच की!!!!!!!!!!!!!!!!!
जय हिंद!
जय महाराष्ट्र!



मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators