|
Zakki
| |
| Tuesday, November 06, 2007 - 2:35 pm: |
| 
|
अमेरिकेचे राज्यकर्ते प्रथम फक्त स्वतःच्या देशाचा विचार करतात. वैचारिक नेतृत्व, मानवता, नैतिकता, मानवता वगैरे फालतू गोष्टी त्यांनी भारतासारख्या देशांवर सोडून दिलेलल्या आहेत. इराक युद्धात अमेरिकेचं बरंच नुकसान झालं, पण इराकच्या प्रचंड तेलसाठ्यावर त्यांना नियंत्रण मिळालं, सद्दाम रसातळाला गेला, अफगाणिस्तानचं खच्चीकरण झालं, पाकिस्तान अराजकाच्या मार्गावर आहे . . . अमेरिकेचे सामर्थ्य कधीच कमी होणार नाही. सत्य वचन. आता ९ ट्रिलियनचे कर्ज दहा ट्रिलियन होईल. पण जोपर्यंत जवळ ९०० अणूशस्त्रे आहेत तोपर्यंत काही धोका नाही. आता पाकिस्तानचे असे आहे, की त्यांना माहित आहे की अतिरेक्यांचे सगळे पैसे सौदी अरेबिया पुरवते नि सगळे शिक्षण पाकिस्तानात होते. जर या दोन देशांशी मैत्री ठेवली नाही तर पंचाईतच होइल, नुसत्या अमेरिकेचीच नाही तर युरोप, भारत यांचेहि. मग १० बिल्लियन म्हणजे किस झाडकी पत्ति.
|
स्वयंघोषित निधर्मी विचारवंत श्री. रा. रा. सुनिल टी आणि विजयराव कुलकर्णी यांच्यात फूट पाडण्यात मला यश आलेलं दिसतंय. दोन निधर्मी विचारवन्तान्ची सर्वच्या सर्व मते तन्तोतन्त जुळली पाहिजेत असे कुठे आहे?
|
Uday123
| |
| Tuesday, November 06, 2007 - 5:35 pm: |
| 
|
भारताला देखील चिंता करावीच लागेल, (भारताला) शेजारी एका तालीबान राजवटी पेक्षा मुश्/ तत्सम चालेल (दगड आणी विट या मधला पर्याय). तालीबान ची आग पसरायला वेळ नाही लागणार. मुशरफ़ चे दिवस भरले आहेत पण दुसरा कुठलाच पर्याय ऊपलब्द नाही आहे. अमेरिकेला (तसेच बेनझीर पण) कल्पना होती की मुश काय करणार आहे याची. मुश ला पण महीत आहे की आपले खुप काही कोणी वाकडे करणार नाही, आणी तशी वास्तुस्थीतीच आहे.
|
Uday123
| |
| Tuesday, November 06, 2007 - 5:42 pm: |
| 
|
सतिश यान्च्याशी प्रथमच सहमत ( अरे कुणीतरी डॉक्टरला फोन करा रे ) - आधी मारायचं (बेशुद्ध पाडायचं) आणी मग doctor ला आमंत्रण, लिहितांना आधीच काळजी घ्यायची. चांगल्या कामा करता थोडा अप्रामाणिक पणा काय वाईट?
|
Uday123
| |
| Tuesday, November 06, 2007 - 6:06 pm: |
| 
|
आणी इराक युद्धामुळे अमेरिकेचा फायदा झाला आहे हे जर तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा गैरसमज आहे. --(राजकिय, आर्थिक) फ़ायदा ह्याच कुटिल उद्देशाने गेले होते, पण हाती धुपाटणे आले, ह्याची त्यांनी अपेक्षाच केलेली नव्हती. एक मोहीम, अफ़गाण, अर्धवट सोडुन कारण नसतांना दुसरी उघडलीच कशाला? आज अफ़गाण मधे दहा हजार आणी इराक मधे १४०+ हजार सैन्य आहे यातच महत्व कशाला आहे आणी हेतु सिद्ध होतो.
|
Zakki
| |
| Tuesday, November 06, 2007 - 6:18 pm: |
| 
|
बुश, छेनि, नि त्यांचे चमचे या सर्वांचा पैशाच्या दृष्टीने वैयक्तिक फायदा बराच झाला असावा असा एक अंदाज आहे. कदाचित् बर्याच कं चा पण फायदा झाला असावा. त्यांच्या पाठबळाशिवाय अमेरिकेची पॉलिसी अंमलात येत नाही. कं बरोबर कंच्या शेअर असणार्या लोकांचा पण. Dow Jones खरे तर वरच गेला गेल्या सहा वर्षात. माझाहि फायदा झाला असता, पण मला केदार जोशींइतकी अक्कल नाही. नाहीतर मला पण कळले असते कुठे पैसे गुंतवावे वगैरे.
|
पण मला केदार जोशींइतकी अक्कल नाही. नाहीतर मला पण कळले असते कुठे पैसे गुंतवावे वगैरे. >>>>>>
झाल आता मीच सापडलो का तावडीत. (पण तुम्ही पैशांचे नाव काढले म्हणुन भारतातच गुंतवा, अमेरिकेत काही राहील नाही आता.) उदय इराकचे नवनिर्मान करताना सिक्युरीटी चा नावाखाली सगळे कॉन्ट्रक्ट अमेरिके च्या कंपन्याकडे आहेत. (हैलीबर्टन सारख्या). झक्की म्हणत आहेत ते बरोबर आहे. रशीया च्या उदा वरुन अमेरिका शिकनार नाही का?
|
Uday123
| |
| Tuesday, November 06, 2007 - 10:24 pm: |
| 
|
होय (अफ़गाण बाबत) रशीयाच्या चुकेतून अमेरिका शिकली, आणी काढता पाय घेतला.
|
Sunilt
| |
| Wednesday, November 07, 2007 - 1:36 pm: |
| 
|
तालीबानी राजवट उलथणे एवढ्या मर्यादीत उद्देश्यानेच अमेरिकेने अफ़गाणिस्थानवर हला केला होता. ते साध्य झाले आणि आपल्या तालावर नाचणारे करजाई सरकार स्थापन झाल्यावर तेथे राहण्यात त्यांना रस नव्हता कारण अफ़गाणिस्थानात तेल नाही!!
|
Zakki
| |
| Wednesday, November 07, 2007 - 1:48 pm: |
| 
|
sunilt यांचे म्हणणे बरोबर आहे.
|
Maanus
| |
| Wednesday, November 07, 2007 - 5:26 pm: |
| 
|
हा पिच्चर बघा http://en.wikipedia.org/wiki/Lord_of_War
|
Uday123
| |
| Wednesday, November 07, 2007 - 8:27 pm: |
| 
|
तालीबानी राजवट उलथवणे हा एकमेव उद्देश नव्हता, लादेन ला पकडणे हे सर्वात महत्वाचे (२००१ मधे) होते, आणी त्याच उद्देशाने अमेरीका गेली होती. लादेन ला तालीबानाने अश्रय दिला म्हणुन तालीबान वर आग. जगात कुठेही राहीला तरीही आम्ही त्याला शोधुन काढु, न्याय करु, ह्या बुश च्या केवळ वल्गनाच राहील्यात. अफ़गाणीस्थानात तेल नाही, आणी म्हणुन अमेरीकेला रस नाही, हे मला पटते.
|
Savyasachi
| |
| Wednesday, November 07, 2007 - 8:59 pm: |
| 
|
लादेनला पकडणे हा कधीच मुख्य हेतु नव्हता. किंबहूना, ते तसे भासवणे आणि मग खर न पकडता पुढची सगळी वर्ष त्यावर राजकीय फायदा घेणे हा हेतु होता. लादेनच्या फक्त ताकदीचे खच्चीकरण करायचे होते ते त्यांनी केले. पाकिस्तान हा उत्तम लष्करी तळ म्हणूनच त्याला अमेरिका महत्व देते. चीन आणि भारतावर अंकुश ठेवता यावा म्हणून आणि एकंदरीतच आशियावर. ९११ व्हायच्या आधीपासूनच अमेरिका पाकला मदत करते आहेच. ९११ नंतर त्यांना कारण मिळाले भरघोस प्रमाणात मदत चालू करण्याचे आणि त्या नावाखाली तिथे तळ, लष्कर ठेवण्याचे. लादेनला खरच पकडले तर कारणच संपेल की. त्यांच्या अंगाशी येणार स्वत्:चाच खेळ हे खरय. अमेरिकेला इतका पैसा कदाचीत पाकमधे ओतायचा नसेलही पण पाक पण काही मूर्ख नाही दिले तेवढ्यात समाधान मानायला आणि वर करायच तेच करतील. सापाला दुध पाजण्याचा प्रकार आहे. बाकी, युद्धामूळे झुडपाला किती फायदा झाला ते ९११ मूव्ही पाहून कळेल.
|
माझ्यामते मुशर्रफ़च राष्ट्रपतीपदावर रहाणच योग्य आहे. तो जर त्या पदावर नसेल तर कोण येईल??माझ्यामते पाकिस्तानात अस्थिरता निर्माण होईल आणि त्याचा फ़ायदा घेउन अंध इस्लामी पाकिस्तानचा ताबा घेउ शकतात(बेनझिर भुट्टो पण साधारणपणे असच परवा म्हणत होती). जर तसे झालेच तर त्याचा सगळ्यात मोठा फ़टका भारताला बसेल. शिवाय त्यांच्याकडे अण्वस्त्र आहेतच. इस्लामी जिहाद कसा असतो हे दाखवायला त्याचा वापर भारताविरुध्द पण होऊ शकतो. त्यापेक्षा मुशर्रफ़ बरा आहे. आणीबाणी वगैरेशी आपल्याला काय घेण??आपण आपल्या सुरक्षेसाठी काय बर ते आधी बघायला हव.
|
इंडीअन एक्स्प्रेसमधे ३ लेखांची मालिका येत आहे अरुन शौरीची. विषय आहे मुशर्रफ़ आणि पाकिस्तानची सध्द्यस्थिती. इथे पहा- http://www.indianexpress.com/story/238378._.html
|
Chinya1985
| |
| Wednesday, November 14, 2007 - 9:30 pm: |
| 
|
अरुण शौरी लेखमालिकेतिल भाग दुसरा- http://www.indianexpress.com/story/238744._.html
|
Chinya1985
| |
| Thursday, November 15, 2007 - 10:09 pm: |
| 
|
अरुण शौरी लेखमालिकेतिल भाग 3 http://www.indianexpress.com/story/239136._.html
|
लालबावटा फडकवणार्यांच खर रुप नंदिग्रामच्या निमित्ताने चव्हाट्यावर आलेच. http://www.saamana.com/2007/Nov/16/AGRALEKH.HTM
|
Maanus
| |
| Saturday, November 17, 2007 - 5:52 am: |
| 
|
"Dennis you voted against the Patriot Act" ...."Thats because I read it"(video) Way to go. For those who dont know US election system. There is a debate conducted between president candidates of same party before election, where journalist or common man is given chance to ask questions to the candidates. and the candidate has to prove how his thoughts are better than others. (correct me if I am wrong, as I dont follow politics much.) Above are extracts of one candidate.
|
Mukund
| |
| Saturday, November 17, 2007 - 8:39 am: |
| 
|
माणुस.... मी कालचा डिबेट बघितला. या सगळ्या डिबेट्सचे उद्दिष्ट वरकरणी जरी चांगले असले..की बाबा सामान्य अमेरिकन माणसाला या उमेदवारांचे विविध विषयातले धोरण,ज्ञान व विचार काय आहेत याची माहीती मिळावी... तरी अशा प्रत्येक डिबेटमधुन निष्पन्न काहीच होत नाही व सगळे जण खर्या प्रश्नाला बगल देउन आपलाच अजेंडा पुढे आणतात...की मला निवडुन दिलेत तर सकल अमेरिकेचे मी कसे भले करीन.... हे सगळे करीअर पॉलीटीशीअन असल्यामुळे सामान्य माणसाला त्यांच्या उत्तरातुन त्यांना ठाम काय म्हणायचे आहे हे कळतच नाही. यातच त्यांची शिताफ़ी असते. आता कालचेच उदाहरण बघ... हिलरीला विचारले की ती गेल्या आठवड्यात ती ज्या युनीव्हर्सीटीतुन ग्रॅज्युएट झाली तिथे बोलत असताना ती म्हणाली होती की गुड ओल्ड बॉईज माझ्यावर मी एक स्त्री आहे म्हणुन अग्रेसिव्ह रित्या टिका करत आहेत. त्याबद्दल कॅंबेल ब्राउनने तिला प्रश्न केला की ती असे म्हणाली त्याचा अर्थ काय? त्या प्रश्नाला तिने बगल देउन उत्तर भलतेच दिले व मी असे म्हणालीच नाही असे म्हणुन मोकळी झाली. असे अनेक डिबेट मी गेल्या २० वर्षात इथे पाहीले आहेत. उमेदवार अशा डिबेट मधे काहीही प्रॉमीस करतात व काहीही वल्गना करतात... मी असे करेन मी तसे करेन.. वगैरे... आणी प्रत्यक्ष निवडुन आल्यावर त्यातले १० टक्केही लक्षात ठेवत नाहीत. कालच्याच डिबेट मधे प्रत्येक जण म्हणत होता की मी हे करीन ते करीन... उदा. बिल रिचर्ड्सन म्हणत होता की मी सैनीकांचा पगार वाढवीन..त्यांना अशी मेडीकल ट्रीट्मेंट देईन...वगैरे वगैरे...तसेच हिलरी व ओबामा दोघेही म्हणत होते की ते अमेरिकेतल्या प्रत्येक व्यक्तीला मेडीकल इंशुरंस देणार...तेही सरकारच्या खर्चातुन.... अरे बोलायला काय जाते?...पण हे सगळे करायला पैसे कुठुन आणणार त्याचा विचार कोणीच करत नाही किंवा तो प्रश्न कोणी विचारतही नाही.. द्या आपले उत्तर ठोकुन...उचलली जिभ..लावली टाळुला... बोलायला काय जाते? जी गोष्ट सैनीकांची तीच गोष्ट क्रुष्णवर्णीय लोकांच्या बाबतीत... अरब वंशीय लोकांच्या बाबतीत...फ़ायर फ़ायटर्स च्या बाबतीत, युनीअन वाल्यांच्या बाबतीत,शिक्षकांच्या बाबतीत,वर्कींग मीडल क्लासच्या बाबतीत, नाफ़्दा कराराबाबत,परराष्ट्रीय धोरणाबाबत... द्यायची उत्तरे ठोकुन..जी उत्तरे ऐकायला फारच चांगली वाटतात ... लोकांची मेमरी फार कमजोर असते. तुमच्या पैकी कोणाला सध्याच्या बुशच्या वडीलांचा ड्युकाकीस बरोबरचा १९८८ चा डिबेट आठवतो का? त्यात सिनीअर बुशने प्रॉमीस केले होते... NO TAX INCREASE!शिवाय असेही म्हटले होते की... READ MY LIPS.....NO TAX INCREASE! आणी १९८८ मधे निवडुन आल्यावर पहिल्याच महीन्यात त्याने काय केले?..... यु गेस्स्ड इट राइट!... सरसकट टॅक्स हाइक! तर हे असे असते अशा डिबेट्सचे. सर्वसाधारण अमेरिकन जनता उमेदवार कसा दिसतो... प्रेसीडंट च्या इमेजला साजेसा दिसतो की नाही... तो काळा आहे की गोरा,स्त्री आहे की पुरुष. ऍबोर्शन बद्दल त्याचे काय म्हणणे आहे,टॅक्स वाढवणारा आहे का कमी करणारा अश्या गोष्टींचा विचार करुन मतदान करतो असे झक्कींनी मागे मायबोलीवर कुठेतरी लिहिले होते ते खरे आहे. रिपब्लिकन पार्टीचे लोक तर काळ्या व स्त्री उमेदवाराला उभेही करत नाहीत.मिट रॉमनी मोर्मन आहे म्हणुन तो गोरा असुनही त्याच्या नावानेही ते खडे फोडत आहेत. अस सगळ असल्यामुळे सध्याच्या बुश सारखे उमेदवार एकदा नाही तर दोनदा निवडुन येतात. ज्या माणसाला अध्यक्ष झाल्यावरसुद्धा दुसर्या राष्ट्रांचे अध्यक्ष किंवा पंतप्रधान कोण आहेत याचे ज्ञानही नव्हते ही गोष्टच खुप काही सांगुन जाते. असो. आणी हो... कालच्या डिबेटमधे बिचारे ख्रिस्तोफर डॉड व जो बायडन यांच्या बॉडी लॅंगवेज वरुन असे वाटत होते की त्यांनी हिलरी किंवा ओबामाच उमेदवार होणार असे ग्रुहीत धरले आहे. सगळे प्रश्न त्या दोघांनाच जास्त प्रमाणात उल्लेखले होते. खर म्हणजे सेनेटर डॉड ची उत्तरे सगळ्यांपेक्षा चांगली होती व सेनेटर बायडनची मते खुप विचारी वाटत होती.. खासकरुन फ़ॉरेन रिलेशन्सच्या बाबतीत तरी. बायडन ने सांगीतले की पाकीस्तानात आणीबाणी जाहीर झाल्यावर बुशच्या आधी तो मुशारफ़बरोबर व बेनझीर भुत्तोबरोबर फोनवर होता....आता बोला... पण अशा डिबेट्समधे काही काही क्षण कायमचे लक्षात राहतात.. १९८८ च्याच डिबेटमधे व्हाइस प्रेसिडेंशीअल डिबेट मधे डॅन क्वेल व लॉइड बेन्सनमधे एक छान किस्सा घडला होता... रिपब्लिकन पार्टीचा व्हाइस प्रेसिडेंशीअल उमेदवार डॅन क्वेल हा अतिशय ठोकळा होता..(त्याला पोटॅटो चे स्पेलिंगसुद्धा येत नव्हते! ). त्याचे वयही फारसे नव्हते. तेव्हा डिबेटच्या सुत्रधाराने त्याला विचारले की तुझे वय इतके कोवळे असताना तुला लोकांनी का निवडावे? तर तो म्हणाला की जॉन केनेडी अध्यक्ष झाले तेव्हा तेही फक्त ४२ वर्षाचे होते.... त्यावर लॉइड बेन्सनने(जे ६५ वर्षाचे होते) चटकन टोमणा मारला... With all due respect sir...I knew John F. Kenedy...I worked with John F. Kenedy... and let me tell you and the world..YOU ARE NO JOHN F. KENEDY! आणी त्याने एकच हशा पिकला..
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|