Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through November 06, 2007

Hitguj » Views and Comments » Current Affairs » बातम्यांचे / लेखांचे संकलन » Political » Archive through November 06, 2007 « Previous Next »

Satishmadhekar
Friday, November 02, 2007 - 5:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> शिवाय १९८४ चे दन्गलखोर हिन्दुच होते.

परंतु १९९३ व २००६ मध्ये मुंबईत बॉम्बस्फोट करणारे, भिवंडी-मालेगावमध्ये दरवर्षी नियमाने दंगल करणारे, काश्मीर आणि देशात इतरत्र अतिरेकी कारवाया करून हजारो निष्पापांचे प्राण घेणारे, नुकतीच अचलपूर इथे दंगल करणारे, संसदेवर हल्ला करणारे, काश्मीरमध्ये शिखांचे हत्याकांड करणारे इ. सर्व वाट चुकलेले युवक होते. अशा वाट चुकलेल्यांना धर्माचे लेबल लावणे चुकीचे आहे. उलट त्यांना शिक्षा न करता त्यांचे पुनर्वसन करून मार्गावर आणले पाहिजे. बरोबर की नाही विजयराव? :-(

>>> विजयराव, तुमच्या विचारसरणीप्रमाणे तुमचे इतिहासाचे ज्ञानदेखील चुकीचे आहे.

> अशी शेरेबाजी करून तुम्हाला आनन्द होत असेल तर माझी हरकत नाही.

तुमची जातीयवादी निधर्मान्ध विचारसरणी आणि तुमचा इतिहासाचा तपशील हा चुकीचा आहे हे अनेकवेळा सप्रमाण सिद्ध झालेले आहे. याला तुम्ही शेरेबाजी कशी म्हणता? मला आनंद होतो तो तुमचे अज्ञान दूर केल्याचा, शेरेबाजीचा नव्हे.

Vijaykulkarni
Friday, November 02, 2007 - 12:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

परंतु १९९३ व २००६ मध्ये मुंबईत बॉम्बस्फोट करणारे, भिवंडी-मालेगावमध्ये दरवर्षी नियमाने दंगल करणारे, काश्मीर आणि देशात इतरत्र अतिरेकी कारवाया करून हजारो निष्पापांचे प्राण घेणारे, नुकतीच अचलपूर इथे दंगल करणारे, संसदेवर हल्ला करणारे, काश्मीरमध्ये शिखांचे हत्याकांड करणारे इ. सर्व वाट चुकलेले युवक होते. अशा वाट चुकलेल्यांना धर्माचे लेबल लावणे चुकीचे आहे. उलट त्यांना शिक्षा न करता त्यांचे पुनर्वसन करून मार्गावर आणले पाहिजे. बरोबर की नाही विजयराव?

असे मी कधी म्हणालो बुवा
माझ्या तोन्डी अशी हास्यास्पद वाक्ये टाकून "जितम मया" असे तुम्हाला वाटते का :-)


शिवाय सन्सद हल्ला आणी काश्मिर मधील शीख हत्याकान्ड या विषयावर काहीही लिहायचे नाही असे मी ठरविले आहे. अ फ्यु गुड मेन या चित्रपटात ज्याक निकोल्सन च्या तोन्डी एक वाक्य आहे.


"American people can not handle truth."
may be it is true to some extent about all patriotic people.



Kedarjoshi
Friday, November 02, 2007 - 8:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

American people can not handle truth."
may be it is true to some extent about all patriotic people. >>>>>

ओह असे आहे होय म्हणुन तुम्ही दंगल करनार्यांचा विरोधात लिहीत नाहीत.

माढेकर सोडुन द्या विजयरावांना. he cannot handle truth


Vijaykulkarni
Friday, November 02, 2007 - 11:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार जी,
दन्गल करनारे मग ते कोणत्याही धर्मातले असोत, नराधम असतात असे मी स्पष्ट लिहिले आहे. दन्गलीत बळी पडलेल्या एखाद्या निश्पाप बालिकेचे शव पाहून माझ्या डोळ्यात टचकन पाणी येते. त्यासाठी त्या बालिकेचा धर्म कोणता हे मला तपासावे लागत नाही.

I was writing about truth in a specific context of Parliament attack. I was expecting better from you.







Chyayla
Saturday, November 03, 2007 - 2:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

१९८४ च्या दन्गली बद्दल मनमोहन सिन्ग यानी लोकसभेत माफी मागितली आहे.

क्या बात है कुळकर्णी.. एवढ झाल आणि त्यानी जे हत्याकांड केले ते माफ़ही झाले नाही का? आता तोच न्याय आपण हिंदुनापण लावावा...

त्याच असे कि १९८४ च्या हत्याकांडानंतर शिख समाजाने खलिस्तानला पाठिंबा देणे बंद केले व ती अलगाववादी चळवळ तिथेच थांबली.

आपणही जिहादी मुस्लिमांकडुन दहशतवाद थाम्बवायची, निदान छुपा वा उघड पाठिंबा काढुन घ्यायची वाट पाहु या, आणि मग आपणही माफी मागु या.. काय कसा वाटला उपाय?

शिवाय त्यांच्याकडुनही गोधरा येथिल हत्याकांडाची माफीची अपेक्षा करायला हरकत नसावी.
चला तर मग तुम्ही तोपर्यंत शांतपणे वाट बघा.. एवढा जीवाला त्रास करुन घेणे बरोबर नाही.


निश्पाप बालिकेचे शव पाहून माझ्या डोळ्यात टचकन पाणी येते. त्यासाठी त्या बालिकेचा धर्म कोणता हे मला तपासावे लागत नाही.

तुमच्यात खरच माणुसकी आहे हे एकवेळ मान्य पण ईथे प्रश्न बालिकेचा नाहीच, प्रश्न आहे तो तुम्ही त्या मारणार्याचा धर्म तपासता ना त्याच? मारणारा हिंदु असेल तर होलोकॉस्ट आणि मुस्लिम असेल तर "स्वाभाविक प्रतिक्रिया"..

Satishmadhekar
Saturday, November 03, 2007 - 9:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> केदार जी,
दन्गल करनारे मग ते कोणत्याही धर्मातले असोत, नराधम असतात असे मी स्पष्ट लिहिले आहे. दन्गलीत बळी पडलेल्या एखाद्या निश्पाप बालिकेचे शव पाहून माझ्या डोळ्यात टचकन पाणी येते. त्यासाठी त्या बालिकेचा धर्म कोणता हे मला तपासावे लागत नाही.

जेव्हा माझ्या आवडत्या धर्माचे अतिरेकी निरपराध लोकांची हत्या करतात तेव्हा माझी अतिशय अवघडल्यासारखी परिस्थिती होते. हत्याकांडाचा निषेध केला नाही तर माझ्या "मानवतावादी" भूमिकेला धक्का बसतो. आणि जर निषेध केला तर माझ्या आवडत्या धर्माच्या अतिरेक्यांची निंदा केल्याचे पाप मला लागते. अशा पापाबद्दल अल्ला मला कधीही क्षमा करणार नाही.

म्हणून मी एक युक्ती करतो. हत्याकांडाचा मी निषेध करतो पण ते हत्याकांड हिंदूंनीच घडवले असून निष्पाप मुस्लीमांना त्यात उगाच गोवण्यात येत आहे असा मी कांगावा करतो. म्हणजे मग साप तर मरतोच पण माझी लाठीसुद्धा (खरं तर एके४७ म्हणायला पाहिजे) शाबूत रहाते.

संसदेवर केलेल्या हल्ल्यासाठी माझा भाईबंद "अफजल"ला तिनही न्यायालयांनी फाशीची शिक्षा ठोठावली. तोच त्या हल्ल्याचा सूत्रधार आहे हे निर्विवाद सिद्ध झाले. मला त्याचा म्हणजे पर्यायाने माझ्या लाडक्या धर्मीयांचा निषेध करावा लागला असता. लगेच मी एक युक्ती केली. ह्या हल्ल्याची योजना अडवाणी आणि वाजपेयींनीच केलेली होती असा मी माझ्या माध्यमातील मित्रांकरवी आणि माझ्यासारखे "निधर्मान्ध" विचारवंत यांच्यातर्फे कांगावा केला. त्यामुळे अफझलची फाशी टळली. आता काही काळातच त्याला तुरुंगातून मुक्त करावे यासाठी आम्ही आंदोलन करू.

२००० साली काश्मिरमध्ये माझ्या धर्माच्या अतिरेक्यांनी शिखांचे हत्याकांड केले होते. तेव्हा आम्हीच निधर्मांधांनी मिळून या हत्याकांडामागे वाजपेयी आहेत असा माध्यमांद्वारे आरडाओरडा केला होता.

२००१ मध्ये जागतिक व्यापार केंद्रावर माझ्या लाडक्या धर्माच्या अतिरेक्यांनी विमाने आदळवून ३००० हजार नागरिकांचा प्राण घेतला. तो हल्ला बुशनेच रचलेला होता असा मी माझ्या जगभर पसरलेल्या "निधर्मी" मित्रांकरवी कांगावा केला. अर्थात भारत सोडून जगात इतरत्र माझ्या विचारांचे लोक फारच कमी आहेत. पण भारतात माझ्यासारख्या "निधर्मीन्ची" वीण खूप जास्त आहे. त्यामुळे तर माझ्या आवडत्या धर्माचे अतिरेकी बिनभोभाट अतिरेकी कारवाया करून पसार होतात. त्यातून कुणी चुकुनमाकुन पकडलं गेलं तर आहोतच आम्ही मानवतेच्या नावाखाली कांगावा करायला!

अतिरेकी हल्ल्यात कितीका निष्पाप नागरिक मरेनात, अतिरेक्यांच्या बाजूने बोलले म्हणजे "निधर्मान्ध", "विचारवंत" अशी मानान्कने मला मिळतात. मझ्या दृष्टीने हे जास्त महत्वाचे आहे.


Satishmadhekar
Saturday, November 03, 2007 - 9:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे वाचून बघा. . . . .

http://www.esakal.com/esakal/11032007/Nagpur836429CA56.htm


Vijaykulkarni
Saturday, November 03, 2007 - 2:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

२००१ मध्ये जागतिक व्यापार केंद्रावर माझ्या लाडक्या धर्माच्या अतिरेक्यांनी विमाने आदळवून ३००० हजार नागरिकांचा प्राण घेतला. तो हल्ला बुशनेच रचलेला होता असा मी माझ्या जगभर पसरलेल्या "निधर्मी" मित्रांकरवी कांगावा केला.
:-) :-) :-)

नेहेमीप्रमाणे आपले मुद्दे सम्पल्यामुळे माझ्या तोन्डी इनोदी विधाने घालण्याचा आपला उपद्व्याप पाहून करमणूक झाली.






Maanus
Sunday, November 04, 2007 - 5:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही ही ही.... this is fun

http://article.wn.com/view/2007/11/03/Kucinich_Bush_And_A_Clinically_Insane_Plot/

Chyayla
Sunday, November 04, 2007 - 1:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विजयराव, आता तुम्हाला कस ईनोदी वाटतय ना? असले ईनोद तुम्हीच मारले आहेत.. अजुन बरेच ईनोदी हायेत, सतिशची तीच पोस्ट परत वाचा.

Maanus
Sunday, November 04, 2007 - 2:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Musharraf defends emergency rule - 03 Nov 07

http://www.youtube.com/watch?v=ya86zLFxHrs

before China takes over the country, we should :-)

Mukund
Tuesday, November 06, 2007 - 7:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पाकीस्तानमधल्या आणीबाणीच्या बातमीची इथे कोणीच दखल घेतली नाही याचे मला नवल वाटले. कारण इस्लाम व पाकीस्तान या विषयावर इथे बरेच जण वक्तव्य करताना दिसतात. असो.

ज्या देशाकडे न्युक्लीअर वेपन्स आहेत अशा देशामधे आज आणीबाणीचे राज्य आहे ही खरच काळजी करण्यासारखी बाब आहे. पाकीस्तानच्या आजतागयतच्या इतिहासा वरुन अशी गोष्ट मुशारफ़ सारखा मिलीटरी नेता करु शकतो ही काही आश्चर्याची गोष्ट नाही पण या गोष्टीने अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाची लक्तर वेशीवर लटकवली गेली आहेत हे मात्र निश्चीत!. परत एकदा हे दिसुन येत आहे की अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणात किती वैचारीक दिवाळखोरी आहे. गेल्या ४० वर्षात असा एकही मुत्सद्दी अमेरिकेत निर्माण झाला नाही की त्याने मुत्सद्देगीरी दाखवुन मिडल इस्ट, अरब इस्राएल वाद व भारत पाकीस्तान बाबतचे धोरण आखण्यात दुरद्रुष्टी दाखवली आहे. सध्या बुश व कॉंडेलीसा राइसच्या कारकिर्द्रीत तर ती मुत्सद्देगीरी पार रसातळाला पोहोचली आहे. मुशारफ़ला मित्र बनवुन हे दोघे ओसामा बिन लादेनला पकडण्याची स्वप्ने बघत होते. डेमॉक्रेसी डेमॉक्रेसी जगभर पसरायला पाहीजे असा डंका पिटवणारी अमेरिका... आज त्यांचे मिडल इस्ट व ईंडियन सबकॉंटींनेंट मधे मित्र कोण आहेत हे बघा... सौदी अरेबिया.. जिथे ऍरिस्टॉक्रेसी आहे व पाकीस्तान जिथे एका मिलिटरी नेत्याने आणीबाणी पुकारली आहे. ही गोष्ट, इराकमधे युद्धामुळे माजलेली अराजकता व बुशच्या उद्दाम युद्ध धोरणामुळे तिथे चालु असलेले सिव्हील वॉर व त्या वॉरमुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला बसलेला भुर्दंड व सध्याची कोलमडलेली मॉर्गेज इंडस्ट्री व त्यामुळे बॅंक व इतर आर्थीक संस्थांना बसलेली प्रचंड झळ.....या सर्व गोष्टींचा विचार करता अमेरिकेचे भवितव्य उज्वल आहे याची शंकाच येते....


Satishmadhekar
Tuesday, November 06, 2007 - 8:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> परत एकदा हे दिसुन येत आहे की अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणात किती वैचारीक दिवाळखोरी आहे. गेल्या ४० वर्षात असा एकही मुत्सद्दी अमेरिकेत निर्माण झाला नाही की त्याने मुत्सद्देगीरी दाखवुन मिडल इस्ट, अरब इस्राएल वाद व भारत पाकीस्तान बाबतचे धोरण आखण्यात दुरद्रुष्टी दाखवली आहे.

अरब-इस्राएल, भारत-पाकिस्तान वाद चिघळत ठेवणे हे मुत्सद्देगिरीचे अतिशय उत्कृष्ट उदाहरण आहे. यातून अमेरिकेची व्यापक दूरदृष्टीच दिसून येते.

या देशांच्या आपापसातल्या वादामुळे त्यांची स्वत:ची प्रगती तर खुंटली आहेच, पण त्यामुळे अमेरिकेच्या शस्त्रास्त्रांना एक कायमस्वरूपी बाजारपेठ सुद्धा मिळाली आहे. हे देश जर भांडायचे थांबले तर अमेरिका दिवाळखोर होईल.

जगातल्या इतर देशांच्या आपापसातल्या भांडणामुळे अमेरिकेचे भवितव्य उज्ज्वल आहे आणि यावच्चंद्रदिवाकरौ ते तसेच राहील यात काहीच शंका नाही.


Sunilt
Tuesday, November 06, 2007 - 9:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रथमच सतिश यांच्याशी सहमत!!

अरब-इस्राएल, भारत-पाकिस्तान वाद चिघळत ठेवणे हे मुत्सद्देगिरीचे अतिशय उत्कृष्ट उदाहरण आहे. यातून अमेरिकेची व्यापक दूरदृष्टीच दिसून येते.

हे वाद जाणिवपूर्वक निर्माण करून ते चिघळत राहतील अशी व्यवस्था ह्या जगातील सर्वात मोठ्या दहशतवादी देशाने केली आहे.

या देशांच्या आपापसातल्या वादामुळे त्यांची स्वत:ची प्रगती तर खुंटली आहेच, पण त्यामुळे अमेरिकेच्या शस्त्रास्त्रांना एक कायमस्वरूपी बाजारपेठ सुद्धा मिळाली आहे. हे देश जर भांडायचे थांबले तर अमेरिका दिवाळखोर होईल.

भारत आणि पाकिस्तान यांचे defence budget अर्ध्याने जरी कमी झाले तरी विकास कामाला प्रचंड पैसा उपलब्ध होईल.

जगातल्या इतर देशांच्या आपापसातल्या भांडणामुळे अमेरिकेचे भवितव्य उज्ज्वल आहे आणि यावच्चंद्रदिवाकरौ ते तसेच राहील यात काहीच शंका नाही.

प्रश्नच नाही!



Chyayla
Tuesday, November 06, 2007 - 9:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमेरिकेला आता खरी चिंता पाकिस्तानमधल्या अणुबॉम्बची आहे, कारण पाकिस्तानच असा देश आहे की ज्याच्या द्वारे दहशतवादी अणुबॉम्ब मिळवु शकतात. मुळचा दहशतवादी इस्लामी भस्मासुर त्याचावरच कधीही उलटु शकतो.

पाकिस्तानची तर फ़ारच कोंडी झाली आहे एकिकडे दहशतवाद्यांचा जोर, त्यांचा अमेरिकेला विरोध पण शासन कर्त्याना हे चांगले ठाउक आहे की अमेरिकेच्या मदतीवरच त्यांची अर्थव्यवस्था अवलम्बुन आहे. त्यामुळे ते उघड अमेरिका विरोध करु शकत नाही.

अमेरिकेच्या दडपणामुळे त्याना भारतात दहशतवादी कृत्ये करता येत नाहीत त्यामुळे ते तर अजुनच चवताळुन सरकार विरोधी झालेत, नुकताच बेनझीरच्या आगमनाच्या वेळेसच्या भीषण बॉम्बस्फ़ोटानी हिसका दाखवुनच दिला.

दुसरीकडे अनेक भागात असलेला असंतोश बलुचिस्तान, सिंध या ठीकाणी ईतका की पाकिस्तानची शकले पडु शकतात.

करावे तसे भरावे याचा प्रत्यय पाकिस्तानला येतच आहे, अमेरिकेलाही येइलच. नव्हे आला आहेच.. आता निदान भारताने तरी धडा घेउन दाढी कुरवाळण्याचे उद्योग थाम्बवले पाहिजे... कधी असे जाणवतय, जिहाद पेक्षा अमेरिका परवडली कारण अमेरिका त्याच्या राष्ट्रहिताला साजेसे धोरण ठेवते भले मग कुठे युद्ध होवो काही हो दुसरीकडे जिहादी मात्र सम्पुर्ण मानवजातीचेच शत्रु. ते तर तुम्हाला जगुच देणार नाहीत.

मुकुंद, मला तरी वाटतय की अमेरिकेने ओसामाचा सौदा केला असावा, कारण त्यालाही पाकिस्तान हवा आहे लश्करी दृष्ट्या भारत, चिन व दक्षिण आशियावर लक्ष ठेवण्यासाठी तो एक उपयुक्त लष्करी तळ आहे. पण आता कस धरल तर चावतय आणि सोडल तर पळतय अशी अवस्था झालेली आहे.


Satishmadhekar
Tuesday, November 06, 2007 - 9:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> प्रथमच सतिश यांच्याशी सहमत!!

मला भरून आलंय. मी स्वप्नात तर नाही ना? आता कुलकर्णीसुद्धा जर सहमत झाले तर बेशुद्धच पडेन मी बहुतेक!

Mukund
Tuesday, November 06, 2007 - 10:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सतिश आणी सुनील.. तुमचा रोख फक्त अमेरिकेच्या डिफ़ेन्स बजेटला अशा युद्धांमुळे होणारा फायदा या एकाच मुद्याकडे आहे. मान्य आहे की अमेरिकेच्या युद्धसामुग्री बनवणार्‍या कंपंन्यांना अश्या युद्धांमुळे बाजारपेठ मिळते पण आजची अमेरिकन अर्थव्यवस्था बरीच गुंतागुंतीची आहे. ग्लोबल इकॉनॉमीमुळे नुसत्या डिफ़ेन्स इंडस्ट्रीवर आजची अमेरिकन अर्थव्यवस्था अवलंबुन नाही.आज जगभरची लोक मायक्रोसॉफ़्ट,इंटेल,बोइंग,नायके,कोकाकोला या कंपनींचे प्रॉडक्ट्स रोजच्या जिवनात वापरतात. झालच तर फायझर,ऍमजन,ऍबट सारख्या मोठ्मोठ्या फारमॅस्टीकल कंपनीजची औषधे व शस्त्रक्रिया सामुग्री रोज जगभर वापरली जातात.जिलेट व प्रॉक्टर ऍंड गॅंबल सारख्या मल्टिनॅशनल कंपनीजचे प्रॉडक्ट्स घरोघरी वापरले जातात.फिलीप मॉरीस व आर जे रेनॉल्ड्स च्या सिगरेटी कोट्ट्यावधी लोक रोज फुंकत असतात. अशा कंपनींजच्या जोरावर अजुनही अमेरिका जगाच्या बाजारपेठेत पुढे राहु शकते. त्यांना जगाच्या पॉलीटीकल रंगमंचावर मुशारफ़ची दाढी कुरवाळत बसण्यासारखी वैचारीक दिवाळखोरी दाखवायची जरुरी नाही असे मला म्हणायचे होते.

मॉर्गेज क्रायसीस, अमेरिकेचे ट्रिल्लिअन्स ऑफ़ डॉलर्सचे डेफ़िसीट,इराक युद्धाचा खर्च अशा बर्‍याच गोष्टीमुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर बोजा पडला आहे. त्या संदर्भात मी अमेरिकेचे भविष्य म्हटले होते. नुसती युद्धे पेटवुन पोळी भाजुन घेण्याचे दिवस गेले आता. आणी अशा युद्धांमुळे निर्माण होणारे भावी टेररीस्ट, त्यांच्यापासुन सावध राहण्यासाठी रोजच्या जिवनात सुरक्षेवर होणारा पैशाचा अपव्यय या गोष्टींचा तर मी उल्लेखही केला नाही. असो.आणी हो... नुसते पैशाच्या फायद्याचेच बोलायचे तर वैचारीक दिवाळखोरी याबद्दल बोलणेच खुंटले... कारण नुसता पैसाच मिळवायचा असेल तर तो ते काम बिगरी शिकलेला लबाड मारवाडी पण करतो.....

आणी इराक युद्धामुळे अमेरिकेचा फायदा झाला आहे हे जर तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा गैरसमज आहे. फायदा झालाच असेल तर तो हॅलीबर्टनसारख्या कंपनीला. ऍज अ कंट्री म्हणुन हे युद्ध अमेरिकेला बरेच महाग पडले आहे. तसेच अरब इस्राएल तंटा चालु ठेवण्यात वरकरणी जरी डिफ़ेन्स इंडस्ट्रीला फायदा आहे असे जरी वाटत असले तरी त्याचे दुरगामी परीणाम महागाचेच पडतात हे अमेरिकेने २००१ च्या वर्ल्ड ट्रेड सेंटर च्या हल्ल्यात अनुभवलेच आहे. त्या एका क्रुत्त्यामुळे अमेरिकेचे किती आर्थीक नुकसान झाले आहे हे मोजणे कठीण काम आहे. त्यामुळे जगाच्या पॉलीटीकल रंगमंचावर कायमची वैचारीक दिवाळखोरी दाखवुनसुद्धा अमेरिकेचे भवितव्य कायम उज्वल राहील असे भाकीत करणे फारच धारीष्ट्याचे होइल.

च्यायला...तुझ्याशी सहमत...



Vijaykulkarni
Tuesday, November 06, 2007 - 12:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सतिश यान्च्याशी प्रथमच सहमत
( अरे कुणीतरी डॉक्टरला फोन करा रे :-) )

जगातल्या इतर देशांच्या आपापसातल्या भांडणामुळे अमेरिकेचे भवितव्य उज्ज्वल आहे आणि यावच्चंद्रदिवाकरौ ते तसेच राहील यात काहीच शंका नाही.


हे मात्र तितकेसे खरे नाही.

एकेकाळी निम्म्या जगावर राज्य करणारे इन्ग्लन्ड आज अमेरिकेच्या ताटाखालचे मान्जर बनले आहे.

अमेरिकेशी टक्कर देणार्‍या रशियाकडे १९९८ मध्ये सैनिकान्चे पगार द्यायला पैसा नव्हता. नन्तर तेलाच्या भाववाढीमुळे अब्रु बचावली.

रोमन साम्र्याज्याचे शेवटचे दिवस आणी अमेरिकेचे आजचे वर्तन आणी स्थिती यात मला साम्य जाणवते.


Satishmadhekar
Tuesday, November 06, 2007 - 12:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वयंघोषित निधर्मी विचारवंत श्री. रा. रा. सुनिल टी आणि विजयराव कुलकर्णी यांच्यात फूट पाडण्यात मला यश आलेलं दिसतंय.

असो.


>>> नुसते पैशाच्या फायद्याचेच बोलायचे तर वैचारीक दिवाळखोरी याबद्दल बोलणेच खुंटले... कारण नुसता पैसाच मिळवायचा असेल तर तो ते काम बिगरी शिकलेला लबाड मारवाडी पण करतो.....

अमेरिकेचे राज्यकर्ते प्रथम स्वतःच्या देशाचा विचार करतात. वैचारिक नेतृत्व, मानवता, नैतिकता, मानवता वगैरे फालतू गोष्टी त्यांनी भारतासारख्या देशांवर सोडून दिलेलल्या आहेत. इराक युद्धात अमेरिकेचं बरंच नुकसान झालं, पण इराकच्या प्रचंड तेलसाठ्यावर त्यांना नियंत्रण मिळालं, सद्दाम रसातळाला गेला, अफगाणिस्तानचं खच्चीकरण झालं, पाकिस्तान अराजकाच्या मार्गावर आहे . . . अमेरिकेचे सामर्थ्य कधीच कमी होणार नाही.

अमेरिकन राजकीय परिस्थितीचे गाढे अभ्यासक, श्री. झक्कीकाका, यांवर अधिक भाष्य करू शकतील.


Slarti
Tuesday, November 06, 2007 - 1:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पंचाईत जी झाली आहे ती अमेरिकेची सर्वात जास्त. अत्यंत मर्यादित असे मार्ग आता उपलब्ध आहेत... मदत थांबवताही येत नाही, डेमॉक्रॅट्सच 'constructive dialogue with Pakistan' ची भाषा करू लागले आहेत. Democrat Jack Reed, member of Armed Services Committee, said that dialogue could be lost if Congress were to reduce the flow of money to Islamabad. हा प्रश्न मुशर्रफपेक्षाही अमेरिकेचच जास्त आहे कारण त्यांनी आतापर्यंत १० बिलियन डॉलर्सपेक्षा जास्त मदत दिली आहे. बुश सरकरातील एक अधिकारी म्हणाला, "When you owe the bank a million dollars, you have a problem; but when you owe the bank $100 million, the bank has a problem." या गुंतवणुकीतून त्यांना मिळणारी 'परतफेड' अजूनही दृष्टीपथात नाही, तालीबान व इतर मुस्लिम दहशतवाद्यांच्या कारवाया वाढत तर आहेतच आणि कळस म्हणजे खुद्द मुशर्रफचा तो focus of agenda आहे असेही दिसत नाही. Ref :
A detour... . ही सर्वात चिंताजनक बाब आहे. म्हणजे मदत दिली नाही तर जे काय थोडेफार दहशतवादविरोधी प्रयत्न चालू आहेत त्यांनाही खीळ बसेल अन् मदत दिली तर ती मुशर्रफ स्वतःचे पद भक्कम करण्यासाठी व पर्यायाने हुकुमशाहीसाठी वापरणार नाही याची शाश्वती नाही...
पण एक मात्र नक्की... यापुढे पाकीस्तानात लोकशाही येवो न येवो, मुशर्रफच्या अमेरिकेचा 'मित्र' म्हणून असलेल्या थोड्याफार विश्वासार्हतेला जबरदस्त व कायमस्वरूपी तडा गेला आहे. पाकीस्तानात आणीबाणी जाहीर झाल्याने मुशर्रफ व बुश / अमेरिका यांचा 'last tango' सुरू झाला आहे...

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators