Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through November 01, 2007

Hitguj » Views and Comments » Current Affairs » बातम्यांचे / लेखांचे संकलन » Political » Archive through November 01, 2007 « Previous Next »

Jaymaharashtra
Sunday, October 28, 2007 - 6:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रत्येक हिंदुने वाचुन विचार करावा असा लेख!
http://www.saamana.com/2007/Oct/28/AGRALEKH.HTM

Satishmadhekar
Sunday, October 28, 2007 - 7:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

http://www.hindu.com/2007/10/28/stories/2007102861331000.htm

माझी अशी खात्री आहे हे स्टिंग ऑपरेशन बनावट आहे. कुठल्यातरी नाक्यावरच्या टपोरी मुलांनी बढाया माराव्यात आणि त्याचे चित्रण करून ते जगाला दाखवावे आणि आपल्या वाहिनीचा TRP वाढावा हा त्यामागचा उद्देश स्पष्टपणे दृगोच्चर होतो.

अर्थात असली बनावट दृश्ये पाहून कुमार केतकरांच्या गटारगंगेला मात्र उधाण आलेलं आहे.

वाघेला तर म्हणतोय की नरेंद्र मोदींनी राजकीय फायदा मिळविण्यासाठी स्वतःच ह्या स्टिंग ऑपरेशनचा बनाव घडवून आणलेला आहे. एकंदरीत हे चित्रण आणि तहलकाची विश्वासार्हता शून्य आहे.


http://www.rediff.com/news/2007/oct/27modi.htm


Jaymaharashtra
Sunday, October 28, 2007 - 12:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सतिशजी!
अहो शंका नाही हे बनावटच आहे.त्यांनी त्या सगळ्या मुलाखतींमधे दिलेल्या विसंगत तारखाच हे सिद्ध करायला पुरेश्या आहेत.
उदय १२३ यांनी देखिल हा मुद्दा आपल्या पोस्ट मधे मांडला आहे.
यांनी म्हणजे कॉंग्रेस ने आणि तथाकथित सुडोसेक्युलर पक्षांनी कितिहि आपटली तरी मोदी निवडुन येणार हे नक्की.वाघेलांना तर बहुतेक म्हातारचळ लागलाय?
मोदींनी गुजरातचा खर्‍या अर्थाने कायापालट केला आहे आणि हे सत्य कुणिही नाकारु शकत नाही. आपले झुबकेदार केसांचे आणि सतत भांग पाडत राहणार्‍या विलासरावांनी काहि तरि बोध घ्यावा (रितसर शिकवणी घेणे जास्त बरे)मोदींकडुन म्हणजे तरी महाराष्ट्राचे काही भले झाले तर झाले.
जय हिंद!
जय महाराष्ट्र!



Vijaykulkarni
Sunday, October 28, 2007 - 1:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


तहलकाची विश्वासार्हता शून्य आहे.

तहलका ने भाजप च्या राज्यात जॉर्ज़ फर्नान्डीस विरुद्ध स्टिन्ग केले म्हणून तर तुमचा राग नाही ना?

आणी हो, यावेळी सन्घाने मोदिना पाठिम्बा द्यायचा नाहे असे ठरवले आहे. बरेच दिवस शिशु शाखेत गेला नाहीत कि काय?

:-) दिवे घ्या.

बाकी या स्टिन्ग मध्ये नवे काय आहे?

१९८५ च्या भिवंडी दंगलिच्या वेळेस वयाच्या १२व्या वर्षी एका पुर्ण नऊ महिन्याच्या गर्भवती हिंदु ब्राह्मण स्त्रीला एका मुसलमानाने तिचे पोट फाडुन चिरताना स्वतच्या डोळ्यांनी बघीतलय मीऽजुनही त्या घटनेचा विचार जरी मनात आला तरी डोक्यात सणक उठते माझ्या. काय अपेक्षा आहे तुमची कि विसरुन जावी ती घटना?

इतके भयानक द्रुश्य पाहिल्यावर तुमचा सन्तापाचा भडका उडणे सहाजिक आहे.
पण म्हणून तुम्ही काय करावे?

त्या अमानुश मुसलमानाला पकडून शिक्शा द्यावी? त्याला शिक्शा व्हावी म्हणून आपाल्या परीने थोडे फार प्रयत्ने करावेत?

कि मुसल्मान समाजातल्या एका निर्दोष महिलेला पकडून तिचि हत्या करावी
य घटनेचा वापर करून सत्तेची पोळी भाजून घ्यावी

आणी जर त्या दन्गली स्वाभाविक प्रतिक्रिया होत्या तर मुम्बईचे बॉम्ब स्फॉट स्वाभावीक प्रतिक्रिया होत्या असे आपण मान्य करू का?


Jaymaharashtra
Sunday, October 28, 2007 - 4:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो कुलकर्णी
कशाला उगिच अकलेचे तारे तोडताय?
असले दृष्य बघितल्यावर सर्वसामान्य माणसाच्या (आणि त्याही १९८५ च्या काळातिल १२ वे वर्ष ) सगळ्या संवेदना बधिर न झाल्या तर नवलच! निदान माझ्या तरी झाल्या होत्या( कारण मी अतिसामान्य आहे) .तुम्ही कदाचित वयाच्या १२व्या वर्षी फ़ारच अक्कलवान आणि धाडसी असाल कदाचित तुम्ही त्या महिलेला वाचवायचा निष्फळ प्रयत्न पण केला असता कदाचित? पण मी नव्हते बाबा तुमच्या सारखी!
या धक्क्यातुन सावरायला किती वेळ गेला हे माझ्या जन्मदात्यांनाच माहित.
कुणालाही निर्घुणपणे मारणे हे वाईटच पण म्हणुन फ़क्त तुम्हाला मुस्लिम स्त्री मेल्या वर दुःख होतय आणि हिंदु स्त्रीला तश्याच प्रकारे मारल तर त्याच तुम्हाला सुखदुःख नाही जरा अतर्क्य वाटतय मला.
असो तुमच्याशी वाद घालणे म्हणजे दगडावर डोके आपटण्यासारखे आहे.
जय हिंद!
जय महाराष्ट्र!


Vijaykulkarni
Sunday, October 28, 2007 - 5:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्याशी वाद न घालण्याच्या तुमच्या निर्णयाचा मी आदर करतो.

मात्र,


>>कुणालाही निर्घुणपणे मारणे हे वाईटच पण म्हणुन फ़क्त तुम्हाला मुस्लिम स्त्री मेल्या वर दुःख होतय आणि हिंदु स्त्रीला तश्याच प्रकारे मारल तर त्याच तुम्हाला सुखदुःख नाही जरा अतर्क्य वाटतय मला.

तुमच्या या विधानावर मात्र माझा तीव्र आक्शेप आहे.
मी निधर्मी आहे आणी म्हणून एखाद्या निरपराध गरोदर स्त्रीला ठार मारणारे आणी त्याचे समर्थन करणारे नराधम आहेत अशी माझी भावना आहे. याला कोणताही अपवाद नाही.





Mandard
Monday, October 29, 2007 - 3:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मोदींनी गुजरातचा खर्‍या अर्थाने कायापालट केला आहे आणि हे सत्य कुणिही नाकारु शकत नाही.

कायापालट फारसा झालेला नाही सर्वसामान्यांसाठी. infrastructure is still very poor. Power condition is yet to improve, public transport is horrible our lal daba still better.
पण महाराष्ट्राच्या तुलनेत राज्यकारभार खुपच चांगला आहे. मुख्य म्हणजे मोदी फ़क्त गुजरातचा विचार करतात उगिच अखिल भारतीय चिंता करत नाहीत आपल्या विलासरावांसारखी.


Zakki
Monday, October 29, 2007 - 3:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कि मुसल्मान समाजातल्या एका निर्दोष महिलेला पकडून तिचि हत्या करावी
य घटनेचा वापर करून सत्तेची पोळी भाजून घ्यावी

या दोन्ही गोष्टी करू नये हे बरोबर आहे.

का हो, तुम्ही कधी मुसलमानांचा निषेध करताना दिसत नाही! म्हणजे त्या सामना मधे आले होते की देवाच्या आरत्या, गाणी म्हंटल्याने मुसलमानांच्या भावना दुखावल्या म्हणून त्यांनी सरळ दंगल केली! आता त्यांना त्रास झाला तर त्यांनी कायदेशीरपणे तक्रार करून, चौकशी होण्याची वाट पाहिली का नाही, सज्जन, अहिंसावादी लोकांसारखी? एकदम दंगल करणे चूक होते असे तुम्ही जर लिहीले, तर कदाचित् लोकांना पटेल की तुम्ही खरोखरच निधर्मी आहात नि सगळ्याच हिंसेचा निषेध करता.

नाहीतर लोकांना तुमची भूमिका केवळ एकतर्फी नि ती सुद्धा त्यांच्या विरोधात आहे असे वाटेल. तुम्ही निदान आम्हाला सांगा, की मुसलमानांनी किंवा हिंदूंनी हिंसा करू नये म्हणून काय करावे असे तुमचे मत आहे? तुम्ही १२ वर्षाच्या मुलीला उपदेश करता की तिने मुसलमान माणसाला पकडून द्यावे! तुम्ही किती हिंदू वा मुसलमानांना पकडून दिले आहे, किंवा पकडण्यात मदत केली आहे?

तुम्ही स्वत: काय केले किंवा काय करावे या बाबत निदान काही लिहीले तरी आहे का? की आपले विरोधासाठी विरोध? केवळ वैयक्तिक पातळीवर जे असेल त्याला उत्तार देता, पण सर्वसाधारणपणे काय करावे हे का लिहीत नाही? की तुमचा नुसता
'तत्वाचा प्रश्न?'
पुणेकर नसून पुणेकर म्हणवून घेण्यासाठी असले अतिरेकी लिहीता का? नुसती कीवच येते तुमची. काऽहीहि विधायक न लिहीता केवळ 'आपण जणू कुणी थोर विचारवंत' असे ढोंग करायला इथे येता!!


Savyasachi
Monday, October 29, 2007 - 5:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>त्या अमानुश मुसलमानाला पकडून शिक्शा द्यावी?
अहो झक्की, त्यांनी ते प्रश्णचिन्ह टाकलय बघा दोन्ही वाक्यांच्यापूढे.
त्यांनाच माहीत नाहीये त्यांना काय बोलायचे आहे, उपदेश कसला करणार?
प्रज्ञा, असल भयानक दृश्य पहाव लागण फार वाईट.


Chinya1985
Monday, October 29, 2007 - 6:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विजयराव,तुमच्याकडे नेहमीप्रमाणे उत्तर नाहिच. बाकी सोनियांनी रामाची पुजा करतानाचा फ़ोटो बघितला का???का परत टाकू???आता प्रभु रामाच्या अस्तित्वाबद्दल काय म्हणने आहे तुमचे???

Zakki
Monday, October 29, 2007 - 8:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ते असल्या प्रश्नांना उत्तरे देत नाहीत. फक्त वैयक्तिक चिखलफेक, ढोंगीपणा करण्यात त्यांना धन्यता वाटते. गेले खड्ड्यात! त्यांचे काय घेऊन बसलात?

आता ते म्हणतील राम होताच! बोलून चालून स्वत:ची अक्कल नाहीच! बाई म्हणेल त्याला नंदीबैलासारखी मान हलवायची!


Satishmadhekar
Tuesday, October 30, 2007 - 5:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हिंसाचार हा कुणीही केला तरी तो गुन्हाच. मग तो करणारे भाजपचे असोत किंवा कॉंग्रेसचे असोत किंवा मुस्लीम अतिरेकी असोत. सर्वांना सारखीच शिक्षा द्यायला पाहिजे. तहलकाच्या तथाकथित गौप्यस्फोटातून जे दाखवलं गेलं आहे ते जर "खरं" असेल तर त्यातील गुन्हेगारांना शिक्षा व्हायलाच हवी.

परंतु हा सर्व प्रकार एकंदरीत संशयास्पद आहे. त्या मुलाखतीत एकाने म्हणलंय की त्याने कॉंग्रेसचा माजी खासदार एहसान जाफरीच्या शरीराचे तुकडे तुकडे करून मग जाळून टाकले. परंतु एहसान जाफरी घराल्या लावलेल्या आगीत जळून गेला असंच दंगलीविषयीच्या सर्व बातम्यांत लिहीलेलं आहे. त्याच्या शरीराचे तुकडे केलेले होते असा पुसटसा सुद्धा उल्लेख गेल्या ५ वर्षांत कुठेही आलेला नाही. अगदी "लोकसत्तात" सुद्धा असं आलेलं नाही. त्याचे नख नेलकटरने जरी कापले असते तरी केतकरांनी त्याचा खिमा कसा केला याचे बीभत्स वर्णन केले असते. परंतु त्यांनी सुद्धा असे कधीही म्हणलेलं नाही. त्यामुळे तहलकाच्या मुलाखतीत दाखवलेली थाप होती हे सहजच लक्षात येतं.

सरकारी वकील पंड्यानं तर स्पष्ट सांगितलं आहे की एका मालिकेत काम करण्यासाठी त्याला विचारलं होतं आणि त्याचा होकार मिळाल्यावर त्याला कागदावरचे काही संवाद वाचायला सांगितले आणि त्याचं चित्रण केलं गेलें.

या मुलाखतीतले एकून संवाद पाहिले तर ते कुठल्यातरी नाक्यावरच्या टपोरी गुंडाने बढाया मारल्यासारखे वाटते.

तहलकाची मंडळी फक्त भाजपच्या नेत्यांच्याच मागे लागलेली आहेत. कॉंग्रेस, राजद, समाजवादी, राष्ट्रवादी, साम्यवादी, बसपा इ. पक्षांच्या मागे तहलकाची मंडळी जाताना दिसत नाहीत. त्याचप्रमाणे जनतेच्या जिव्हाळाच्या प्रश्नांवर (सरकारी नोकरांची आणि पोलिसांची लाचखोरी, महाविद्यालयात प्रवेशासाठी देणग्या घेणारे पुढारी, लाचखोर न्यायाधीश इ.) तहलकाने कधी स्टिंग ऑपरेशन केल्याचे ऐकले नाही.

याचा अर्थ फक्त भाजपमध्येच सर्व गुन्हेगार भरलेले आहेत आणि भाजप सोडून इतर सर्व पक्ष धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहेत असा होतो किंवा तहलकाची मंडळी भाजपला बदनाम करून कुठल्यातरी त्यांच्या विरोधी पक्षाला फायदा मिळवून देण्यासाठी काम करत असावीत. तहलकाच्या मंडळींना कुठल्या पक्षाचा आशिर्वाद असावा हे सहजच ओळखण्यासारखं आहे. आपली प्रतिमा उंचावता येत नसल्यामुळे भाजपचे डोकं छाटून आपण त्यांच्यापेक्षा उंच असल्यासारखं दाखवायचा हा प्रकार आहे.

कुटलेही चित्रण आपल्याला हवे तसे मॅनिप्युलेट करता येते. आपल्याला नको असलेला भाग त्यातून काढून टाकता येतो किंवा हवा असलेला भाग त्यात नंतर घुसडता येतो. त्यामुळे हे चित्रणसुद्धा विश्वासार्ह नाही.

भाजपच्या नेत्यांना फसवून त्यांचे गुप्त चित्रीकरण करणे, चित्रीकरण आपल्याला हवे तसे मॅनिप्युलेट करून ते एखाद्या टीव्ही चॅनेलला मोठ्या किंमतीला विकणे आणि नंतर आपल्या चॅनेलवरून ते सतत प्रसिद्ध करून आपल्या चॅनेलचा TRP वाढवणे असा हा प्रकार आहे. यामध्ये तहलका, चॅनेल आणि कॉंग्रेस या तिघांचाही संयुक्त फायदा आहे. तहलकाची आणि या स्टिंग ऑपरेशनची विश्वासार्हता शून्य असल्यामुळेच बहुदा या स्टिंग ऑपरेशननंतर देशात फारशी प्रतिक्रिया उमटली नसावी.


Chyayla
Thursday, November 01, 2007 - 5:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

३१ ओक्टोबर १९८४, दिवस बुधवार सकाळची ९.२० ची वेळ तत्कालीन पंतप्रधान ईंदिरा गांधींवर गोळ्या झाडण्यात आल्या. ईंदिराजींना उपचारार्थ ऑल ईंडिय इन्स्टिट्युट ऑफ़ मेडिकल सायन्सेसमधे नेण्यात आले. या रुग्णालयाबाहेर लोक जमू लागले. दिल्लीच्या काही भागात तणाव तयार झाला. दुपारी दोनच्या सुमारास ईंदिराजींच्या निधनाची घोषणा करण्यात आली. मारेकरी शिख आहेत हे कळल्यानंतर काही भागात शीख वस्त्यांवर दगडफ़ेक झाली. सायंकाळी राजीव गांधींचा शपथविधी झाला. राजधानीतील वातावरण शांत झाले होते.

१ नोव्हेम्बरची पहाट
३१ तारखेला रात्री कॉंग्रेस नेत्यांच्या बैठकी झाल्या. हरकिशनलाल भगत, जगदीश टायटलर, सज्जन्कुमार, धर्मदास शास्त्री, ललित माकन या कॉंग्रेस खासदारांनी आपापल्या भागात कार्यकर्त्यांच्या बैठकी घेतल्या. योजना ठरविण्यात आली आणि १ नोव्हेम्बरच्या पहाटेपासुन दिल्लीत दंगली(हत्याकांड म्हणणे जास्त सायुक्तिक आहे) सुरु झाल्या. दंगलखोरांना एकाच आकाराच्या लोखंदी सळाका, पेत्रोल्-रॉकेलचे डब्बे सारे साहित्य देण्यात आले. प्रत्येक ठिकाणी चार चार चमू गठीत करण्यात आल्या. पहिल्या चमूचे काम अडथळे दूर करण्याचे होते, दुसरी चमू कुलुपे तोडणारी होती, तिसरी चमू लुटालुट करणार होती आणि चवथ्या चमूजवळ आग लावण्याचे सामान होते. १ नोव्हेम्बरच्या पहाटे सुरु झालेला नरसंहार ३ तारखेच्या सायंकाळी थांबला.

३ नोव्हेम्बरची संध्याकाळ
१ तारखेला सुरु झालेल्या दंगलीने कल्याणपुरी, मंगोलपुरी, त्रिओल्कपुरी या भागात नुसता हिंसाचार चालविला होता. वस्त्यावस्त्यांमधे टोळ्या येत होत्या. घराघरातुन शिखांना बाहेर काढले जात होते. त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकुन त्यांना पेटवुन दिले जात होते, जेव्हा पेट्रोल सम्पले तेव्हा जळते टायर शिख युवकांच्या गळ्यात टाकले जात होते. राजधानीचा आसमंत धुराने आणि मानवी मांसाच्या जळक्या वासाने व्यापला होता.

२७३३ मृत!
१ नोव्हेम्बरच्या पहाटे सुरु झालेला हा नरसंहार ३ तारखेला सायंकाळी ईंदिराजींच्या अंत्यसंस्कारानंतर अचानक थांबला. सरकारी आकड्यानुसार या काळात मृत झालेल्यांची संख्या होती २७३३! तर गैरसरकारी आकडा आहे ४९००. यात महिला होत्या, लहान मुले होती. स्वतंत्र भारताच्या ईतिहासतील सर्वात मोठ्या दंगलीवर नव्या पम्तप्रधानांची प्रतिक्रिया होती, 'जेव्हा मोठा वृक्ष कोसळतो, तेव्हा जमीन हादरतेच.'

लष्कर होते
दिल्लीच्या रस्त्यांवर तीन दिवस हिंसाचार सुरु असताना केंद्र सरकारने तातडीने लष्कराला बोलाविले होते. पण लष्कर स्वता:हून कोणतीही कारवाई करु शकत नाही पोलिसांना तर दंगलखोरांना मदन करण्याचेच आदेश होते. प्रत्येक ठिकाणी पोलिस दंगल्खोरांच्या बाजूने सक्रिय असल्याचे दिसत होते.

२४ वर्षानंतर
दिल्ली दंगलीला २४ वर्षे झाली आहेत. या दंगलीवर कोणीही स्टिंग ऑपरेशन वैगेरे केलेले नाही. कलंक्-महाकलंक या नावाने दिल्ली का सच या आशयाचा कार्यक्रम झालेला नाही. दिल्ली दंगलीत मोठी भुमिका बजावणार्यांपैकी ललित माकन, अर्जुनदास यांना शिख अतिरेक्यांनी ठार केले, भगत यांचे निधन झाले तर टायटलर, सज्जन्कुमार हे नेते आजही कॉंग्रेसचे खासदार आहेत. रंगनाथ मिश्रा, जैन, बॅनर्जी, खोसला, आहुजा असेक समित्या अस्तित्वात आल्या आणि गेल्या. एक योगायोग म्हणजे गुजरात दंगलींची चौकशी करण्यासाठी जो नानावटी आयोग नेमण्यात आला आहे, त्याच नानावटींनी दिल्ली दंगलीचीही चौकशी केली होती.

रविंद्र दाणी यांच्या दिल्ली दिनांक वरुन साभार.



Satishmadhekar
Thursday, November 01, 2007 - 11:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

१९८४ आणि २००२ मधील साम्य आणि भेद -

१९८४: इंदिरा गांधींच्या हत्येमुळे चिडलेल्या कॉंग्रेसच्या पुढार्‍यांनी आणि कार्यकर्त्यांनी ४ दिवस देशभर दंगल माजविली. त्यात हजारो शिखांची घरे जाळली गेली आणि सुमारे ३००० शीख (अधिकृत आकडा) मारले गेले. अनधिकृत आकडा १५ हजार आहे.
२००२: गोध्रा येथे स्थानिक धर्मांध मुस्लिमांनी रेल्वेच्या डब्याला आग लावली. यात ५९ हिंदू महिला व मुले मृत्युमुखी पडली. याचा बदला म्हणून पुढचे ३-४ दिवस गुजरात मधल्या हिंदू समाजाने दंगल माजविली. यात हजारो मुस्लिमांची घरे जाळली गेली आणि अधिकृत आकड्यानुसार सुमारे ५५० मुस्लीम व २५० हिंदू मारले गेले. अनधिकृत आकडा ४००० आहे.

१९८४: "जेव्हा एक महावृक्ष कोसळतो, तेव्हा आजूबाजूची जमीन हादरतेच.", असे पंतप्रधान राजीव गांधींनी उद्गार काढले. या उद्गारांचा सोयीस्कर अर्थ घेऊन पुढची दंगल झाली.
२००२: "गोध्रा येथील घटनेच्या अमानुषतेच्या तुलनेत गुजराती नागरिकांनी फारच संयमित प्रतिक्रिया दिली आहे.", असे मुख्यमंत्री मोदी यांनी उद्गार काढले. या उद्गारांचा सोयीस्कर अर्थ घेऊन पुढची दंगल झाली.

१९९१: राजीव गांधींना मरणोत्तर "भारतरत्न" हा सर्वोच्च नागरी पुरस्कार दिला गेला. त्यांचा उल्लेख "आधुनिक भारताचे शिल्पकार" असा केला जातो. त्यांच्या नावाने "राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार" अशांसारखे अनेक पुरस्कार दिले जातात. अनेक शहरातील रस्ते, पूल इ.ला त्यांचे नाव दिलेले आहे. अनेक ठिकाणी त्यांचे पुतळे उभे केलेले आहेत.
२००२-२००७: मोदींचा "आधुनिक हिटलर", "रोम जळत असताना फिड्ल वाजवणारा नीरो", "खुनी" अशा शब्दात उद्धार. त्यांना अमेरिकेने व्हिसा नाकारला. देशात कुठेही ते गेले तरी त्यांचे निदर्शनांनी स्वागत होते.

१९८४-२००७: १९८४ च्या दंगलीत सहभागी असलेल्या एकाही कॉंग्रसच्या पुढार्‍याला आजवर शिक्षा झालेली नाही. त्यातले काही जण केंद्रात अनेक वर्षे मंत्री होते.
२००२-२००७: २००२ च्या दंगलींना मोदीच जबाबदार आहेत असे सांगून निधर्मान्धांची मोदींना फासावर चढवण्याची मागणी.

१९८४ च्या दंगलीचे वर्णन: दुर्दैवी
२००२ च्या दंगलीचे वर्णन: होलोकास्ट (हिटलरने दुसर्‍या महायुद्धात ६० लाख ज्यूंचे जे शिरकाण केले त्या संदर्भात हा शब्द वापरला जातो)


Vijaykulkarni
Thursday, November 01, 2007 - 12:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

१९८४ च्या दन्गली बद्दल मनमोहन सिन्ग यानी लोकसभेत माफी मागितली आहे.

१९८४ ची दन्गल समर्थनीय होती असे कोणताही कॉन्ग्रेसवाला म्हणत नाही. त्या दन्गलीला जबाबदार पुढार्‍याना वीर पुरुष वगैरे म्हणत नाहीत.

मुख्य म्हणजे त्याच कॉन्ग्रेस ला पन्जाब च्या जनतेने नन्तर सत्तेवर बसविले.

याचा बदला म्हणून पुढचे ३-४ दिवस गुजरात मधल्या हिंदू समाजाने दंगल माजविली

बदला म्हणून?

अशा प्रकारच्या कोणत्याही दन्गली बदल म्हणून होत नसतात.












Satishmadhekar
Thursday, November 01, 2007 - 1:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> १९८४ च्या दन्गली बद्दल मनमोहन सिन्ग यानी लोकसभेत माफी मागितली आहे.

माफी मागितली म्हणजे सगळे गुन्हे माफ झाले का? गेल्या २३ वर्षात एकाही कॉंग्रेसी पुढार्‍याला शिक्षा तर सोडाच त्यांच्यावर गुन्हा सुद्धा दाखल झालेला नाही.

याच मनमोहन सिंगांनी १९९९ च्या लोकसभा निवडणुकीच्यावेळी १९८४ ची शिखांविरूद्धची दंगल रा. स्व. संघाने केलेली होती असे जाहीररीत्या सांगितले होते. जर रा. स्व. संघ या दंगलीला जबाबदार होता, तर त्यांनी का माफी मागितली? का ते संघाच्या वतीने क्षमायाचना करत होते? :-(


>>> मुख्य म्हणजे त्याच कॉन्ग्रेस ला पन्जाब च्या जनतेने नन्तर सत्तेवर बसविले.

मुख्य म्हणजे त्याच भाजपला गुजरातच्या जनतेने नंतर प्रचंड बहुमताने सत्तेवर बसविले. :-)

विजयराव, तुमच्या विचारसरणीप्रमाणे तुमचे इतिहासाचे ज्ञानदेखील चुकीचे आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर १९८४ च्या शिखांच्या शिरकाणानंतर जुलै १९८५ मध्ये राजीव गांधींनी लोंगोवालांबरोबर करार केला. त्यानंतर सप्टेंबर १९८५ मध्ये झालेल्या पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत पंजाबच्या जनतेने कॉंग्रेसला नाकारून अकाली दलाला बहुमत दिले होते. त्यावेळी अकाली दलाचे सुरजीतसिंग बर्नाला हे मुख्यमंत्री झाले होते (हे सध्या तामिळनाडूचे राज्यपाल आहेत). त्यांचे सरकार राजीव गांधींनी बहुधा १९८८ मध्ये बरखास्त केले. बहुतेक वाढलेल्या अतिरेकी कारवायांमुळे ते बरखास्त केले असावे.



>>> १९८४ ची दन्गल समर्थनीय होती असे कोणताही कॉन्ग्रेसवाला म्हणत नाही. त्या दन्गलीला जबाबदार पुढार्‍याना वीर पुरुष वगैरे म्हणत नाहीत.

पण कॅबिनेट मंत्रीपदाची खिरापत वर्षानुवर्षे दिली ना? त्याचं काय?


>>> बदला म्हणून?
अशा प्रकारच्या कोणत्याही दन्गली बदल म्हणून होत नसतात.

माझे संपूर्ण पोस्ट नीट वाचा आणि मधलेच एखादे वाक्य निवडून प्रतिक्रिया देण्याच्याऐवजी संपूर्ण विषयाला धरून बोला.

१९८४ आणि २००२ च्या प्रसंगात काहिसे साम्य आहे. दोनही प्रसंगात मुख्य प्रशासकाने आपली जबाबदारी नीट पार पाडली नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. परंतू दोनही प्रशासकांना एकसारखे निकष लावलेले नाहीत. असं का ते सहज समजण्यासारखे आहे.


Savyasachi
Thursday, November 01, 2007 - 2:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>बदला म्हणून?

अशा प्रकारच्या कोणत्याही दन्गली बदल म्हणून

बदला आणि बदल यात फ़रक आहे हो. जरा पोस्टल्यावर वाचत जा आणि दुरुस्तीही अशी नम्र विनंती :-)

Chinya1985
Thursday, November 01, 2007 - 8:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राजीव गांधींनी म्हटले होते-'या शिखांना एकदा चांगला धडा शिकवलाच पाहिजे'
त्यानंतर दिल्लितील वृत्तपत्रांमधे कॉंग्रेसतर्फ़े एक जाहिरात आली होती ज्यात एक शीख ट्याक्सी ड्रायव्हर दाखवला होता आणि लिहिले होते की 'क्या आप इसपर विश्वास रखेंगे??'


Vijaykulkarni
Thursday, November 01, 2007 - 10:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

१९८४ आणि २००२ च्या प्रसंगात काहिसे साम्य आहे. दोनही प्रसंगात मुख्य प्रशासकाने आपली जबाबदारी नीट पार पाडली नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते.

चला निदान इतके तरी मान्य केलेत. "हिन्दुन्ची उस्फुर्त प्रतिक्रिया" वगैरे लिहिले नाहीत. धन्यवाद.

सन्जय गान्धीचा अपघाती म्रुत्यु झाल्यावर आमच्या गावात काही रिकामटेकडे युवक बाजारपेठेतून दुकाने बन्द करण्यासाठी दमदाटी करित हिन्डत होते. एकाच्याही चेहेर्‍यावर दु:ख वगैरे नव्हते.

इन्दिरा गान्धीन्च्या हत्येनन्तरही काही गुन्ड प्रव्रुत्तीची माणसे हायवे वर उभी होती. शिख ट्रक ड्रायवराना बदडणे, त्यान्चा माल लुटणे वगैरे..

अश दन्गलखोरान्चा केवळ दन्गल करणे हाच हेतू असतो.

एखादा लाचखोर सरकारी अधिकारी पकडला गेला की कसा कान्गावा करतो "इतर ही खातात मग मलाच का पकडता !" तसाच दाणीन्च्या लेखाचा सूर आहे. शिवाय १९८४ चे दन्गलखोर हिन्दुच होते.

>> विजयराव, तुमच्या विचारसरणीप्रमाणे तुमचे इतिहासाचे ज्ञानदेखील चुकीचे आहे.

अशी शेरेबाजी करून तुम्हाला आनन्द होत असेल तर माझी हरकत नाही.



Uday123
Friday, November 02, 2007 - 12:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शिवाय १९८४ चे दन्गलखोर हिन्दुच होते.

असे तुम्हाला वाटते, आणी तुम्हाला असे वाटणे ही तुमची चुक नाही आहे.

दंगलखोर हे कॉग्रेसी गुंड होते. उलट हिन्दु लोकांनी असंख्य शीख बांधवांचा जीव वाचवला, त्यांच्या कुटुंबान्ना आपल्या घरात लपविले/ आसरा दिला. कॉग्रेसी गुन्डांना नंतर केन्द्रात मंत्रीपदे बक्षीस मिळाली.

आजतागायत दहा
commissions झालेत (latest is Nanavati), पण दुर्दैवाने पिडितांना न्याय मिळाला नाहीच, मिळेल असे वाटत नाही.

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators