Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through September 10, 2007

Hitguj » Views and Comments » General » माझी आवडती मराठी मालिका » Archive through September 10, 2007 « Previous Next »

Swasti
Friday, May 18, 2007 - 8:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूनम , समजेलही कदाचित . पण त्यात इतकी पात्र आहीत ( आणि बर्याचदा त्यांच्या वयातला फ़रक लक्षात येत नाही ) कि कोणाचा कोण कळेपर्यंत दमछाक होते . तरीही बघा प्रयत्न करून .

सध्याची माझी ही आवडती मालिका आहे. कारण -- चांगली रहस्यकथा , एकएक रहस्य हळुहळु उलगडणारी पटकथेची शैली , सर्वांचा सहज अभिनाय आणि मुख्य म्हणजे पुनर्जन्म , भास्-विभास , ज्योतिष , काळी जादू या गोष्टी असुनही त्या बटबटीत होणार नाही याची घेतलेली कळजी .

एक छोटसं उदा . . शुभ्रा आजोबांना विचारते " तुमचा पुनर्जन्मावर विश्वास आहे का ?" ते तिला नेहमीची आत्मा , देह यांची फ़िलोसोफी सांगतात आणि शेवटि म्हणतात " अग , तुमच्या physics मध्येही नाही का सांगितलय - उर्जा कधी निर्माण किंवा नष्ट होत नसते ति फ़क्त निरनिराळी रुपे घेते ."

माझ्यासरख्या science च्या मुलीला ही analogy पुरेपुर पटली
पण शेवटी आपापली मत आहेत


Neelu_n
Friday, May 18, 2007 - 10:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>'सासू-सून, नणंद-भावजय पेक्षा बरी' इतकाच तिचा दर्जा!
पूनम... वंदना गुप्तेचा कावेबाजपणा आणि त्या जान्हवीचा बावळटपणाकडे जाणारा भोळा स्वभाव बघुन थोड्या दिवसाने ह्या सिरिअलचा दर्जा पण तसाच होइल असे वाटतय. जस्सी सिरयलचे कसे झाले पाहिलस ना. नंतर नंतर ते ऑफिस वगैरे सगळे सोडुन देतात. एकमेकांना शह देण्याच्या कामातुन त्यांना वेळ मिळाला तर ना.

मनस्मि.. तुम्हि म्हणताय ते खरय. काहि दिवासापुर्वी टिव्हीवरच कुणीतरी मुलाखतीत सांगितले होते दुरदर्शन हे समाजप्रबोधनाचे चांगले साधन असुनसुध्हा बहुतेक दिग्दर्शक त्याचा फायदा घेत नाही. सगळे तेच चालले असते. मारझोड, कपट्-कारस्थाने, सासु सुना वाद. सगळे अतिरंजित. खर वास्तव दाखवणारे फारच कमी. त्यातल्या त्यात टिपरे कुटुंब अगदी घरच्या सारख वाटत.:-)


Mandard
Friday, May 18, 2007 - 10:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Go to Zee Marathi website you will get the complete story. Then no need to watch Asambhav at all.

Sach_b
Friday, May 18, 2007 - 11:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दुसरी गोष्ट. तुम्ही मुलगी लहान असताना इतका विचार करताय,, उद्या ती जाणती झाल्यावर तिला "चांगले संस्कार" देताना तिच्यावर कुठलीही बंधने आणु देऊ नका. कारण अमर्याद स्वातंत्र्यापेक्षा बंधने जास्त मुलाना बिघडवतात.

आणि सीरीयल्सचा इतके मनावर घेऊ नका. त्यानी आयुष्यात कधी कॉलेज धड पाहिलं नसतं. आयटी कंपनी तर दूरची बात झाली.


तुमच्या मताशी मी एकदम सहमत आहे..पण बंधन आवश्यक आहेत. फक्त ती अमर्याद नसावीत... शिवाय अशा मालिकांत गुंतुन पडन देखील योग्य नाही..

Sayuri
Saturday, May 19, 2007 - 4:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'गुड मॉर्निंग महाराष्ट्र' पाहताना जाम हसायला येतं. एकतर शीर्षक संगीतातले 'गुड मॉर्निंग महाराष्ट्र' ह्या शब्दांचा उच्चार ऐकून कोणीतरी इंग्लिश कुत्रा चावलेली व्यक्ति हे म्हणतेय याची खात्री पटते. :-) वाढदिवस शुभेच्छांच्या निमित्ताने मुलामुलींच्या नवनवीन नावांविषयी शिक्षण होत राहते. (आज ऐकलेली नावे: 'विश्रांती', 'खुशाल' ) शुभेच्छा देणार्‍या व्यक्तींची नावे/उपनावे पण अचाट असतात. त्या दिवशी 'जाडी आई', 'भावड्या' इ. लोकांनी शुभेच्छा पाठवल्या होत्या. हे वाचताना सचित पाटीलने दाबलेलं हसू नजरेतनं सुटलं नाही. :-) यासमवेत जोडीला चेहेर्‍यावर अगम्य भाव असलेल्या बालकांचे फोटो! एवढ्या एवढ्या चिंट्या मुलींचे मेकअप फासलेले (खासकरुन लिपस्टिक) आणि विशेष वेशभूषा केलेले फोटो बघून प्रचंड करमणूक होते. आज एका नखाएवढ्या मुलीचा अगदी मंगळसूत्र, मुंडावळ्यांसकट काढलेला फोटो दाखवला. जन्माला आलाल्या काही कालावधी लोटायच्या आतच बोहल्यावर चढवायची चाललेली प्रॅक्टिस बघून खूप हसू आले.

Meemarathi
Wednesday, June 20, 2007 - 8:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

kay mitrahoo asambhav madhye sadhya kay chaloo aahe ??? Koni sangoo shakel ka >>??

Dhanu66
Sunday, July 01, 2007 - 5:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हाय,
मला एक प्रश्न विचारायचा आहे.

स्वप्न सूराचे, युद्ध तारयानचे याच्या फ़ायनल राउन्ड मध्ये जे पर्फ़ोमन्स ज़ाले, त्यात आधी गाणे आधी टेप करून मग स्तेज वर नुसते ओठ हलवतात का? आम्हाला अशी शन्का आली म्हनून विचारते.

तुम्हाला काय वाटते?


Sayuri
Sunday, July 01, 2007 - 5:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Yes, Dhanu66 you are right.
Amhalahi asach watla

Arun
Monday, July 02, 2007 - 4:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या मित्राने सांगितल्या प्रमाणे, या सगळ्या कार्यक्रमाचे recoding आधीच झालेले होते. आजकाल बर्‍याच live programs मध्ये हे सर्रास चालते म्हणे ........... :-)

Paarava
Monday, July 02, 2007 - 5:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

namaskar mitraano. amhalahi tich shanka aali. aani te khare aahe. Milind Ingale chi tr nehami pramane ekach ganyaawar lip movement...."gaarava".

sadhyaa suru asalelya malikaan paiki retelicast asaleli "" gangadhar tiparey" chaanch aahe.
"bhatkanti" pn chaan.

Sayuri
Thursday, August 09, 2007 - 4:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हल्ली झी मराठीवर 'महाराष्ट्राचा महासिनेमा' म्हणून एक प्रसंग दाखवतात...त्यात तो (माझ्या मते) पक पक पकाक मधला सक्षम कुलकर्णी शिवाजीराजे झालाय आणि सुलोचनाबाई त्याला "आमच्याच राज्यात आमच्याच लोकांत शिवबा एक राज्य उभारु शकत नाही?" असं काहीसं विचारतात...
मला असं विचारायचं आहे की सुलोचनाबाईंचा तो प्रसंग कोणत्या चित्रपटातला आहे?


Saee
Monday, August 27, 2007 - 11:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हिन्दी मालिकेबद्दल कुठे लिहायच? DD National ला रविवारी रात्री साडेआठला एक कोरियन मालिका लागते हिंदीत डब केलेली, 'घर का चिराग' नावाची. ( Jewel in the palace चे हिन्दी भाषांतर )
शाही मुदपाकखान्यातल्या स्त्री आचारी (कोर्टलेडीज), त्यांची प्रशिक्षणे आणि नियुक्त्या, त्यातली राजकारणे, राजवाडे आणी शाही महालांचे सेट्स, वेशभुषा, अप्रतिम अभिनय, हजारो प्रकारचे जीवाणू, वनस्पती, मसाले वापरुन तयार केले जाणारे पदार्थ, क्रोकरीज, उत्तम छायाचित्रण सगळंच पहाण्यासारख आहे. आता बरेच भाग झालेत तरी पाणी घालून वाढवणे, रटाळ संवाद असा एकही प्रसंग नाही. बर वाटतं बघायला. जरुर बघा.

मॉड्स, प्लीज योग्य bb वर हलवा.


Zakki
Monday, August 27, 2007 - 5:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हिन्दी मालिकेबद्दल कुठे लिहायच? DD National ला रविवारी रात्री साडेआठला एक कोरियन मालिका लागते हिंदीत डब केलेली, 'घर का चिराग' नावाची.

मला वाटते मायबोली जशी मराठी साठी आहे, तश्या हिंदी, कोरियन इ. भाषांसाठी, किंवा एकूणच मालिकांसाठी कुठलीतरी साईट असेलच, जिथे त्यावर मराठी भाषिकांखेरीज इतर भाषा बोलणारे लोकही लिहू शकतात.

Dhanu66
Thursday, August 30, 2007 - 4:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हाय,
मला हैरी पोटर विषयी लिहायचे आहे.

बर्याच जणाना आवडत असेल, नसेल ही आवडत.

कूठे लिहू?


Saee
Thursday, August 30, 2007 - 7:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगं हॅरी पॉटरसाठीच्या कित्ती साईट्स आहेत, तिथे लिही ना! - इति झक्की.

धनू, मायबोलीकरांना सांगायचे आहे असं स्पष्ट लिही. मी ते नमूद करायला विसरले होते तर मला कसं मासलेवाईक उत्तर दिलं बघ झक्कींनी:-)


Dhanu66
Saturday, September 08, 2007 - 4:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो, मला मायबोली वरच लिहायचे आहे.

कुठे लिहीता येईल? इतर साईट्स वर लिहीण्यात मजा नाही ना!


Maanus
Sunday, September 09, 2007 - 2:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे बघ इथे लिही
/hitguj/messages/103385/123713.html

Mansmi18
Sunday, September 09, 2007 - 1:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुम्हाला वाटते का कि मराठी सारेगमप मधे partiality होत आहे?

ती मधुवन्ती बोरगावकर खरच एवढी चांगली आहे का? नी मिळण्याएवढी? It is almost की त्याना ती पुढे जायला हवी आहे. ती फ़ारच वाइट गाते तरीही तिला नी मिळत आहे. का आता यातही विदर्भ, मराठ्वाडा असे preference येणार आहे?


Psg
Monday, September 10, 2007 - 6:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mansmi अनुमोदन! 'नी' मिळण्याइतकी flawless गायली ती? देवकीनी तर इतकं कौतुक केल्याचं आठवत नाही कोणाचं!
general observation असं आहे आमचं की आम्हाला ज्याचं गाणं खूप आवडतं त्याला हमखास कमी मार्क मिळतात!!! मग काय, आपल्याला काही कळत नाही म्हणायचं आणि फ़त गाणं ऐकायचं! परिक्षक मात्र सगळे खरच मान्यवर आहेत. त्यांचं ऐकायला मिळतं हेच समाधान!


Ksha
Tuesday, September 11, 2007 - 12:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ती फ़ारच वाइट गाते
>>
मी आत्ताच youtube वर बघितले तिच्या गाण्यांचे videos . चांगली गाते ती मुलगी. वाईट वगैरे तर नक्कीच नाही.

तिने म्हटलेले विठ्ठल माझी माय सुरेखच आहे.


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators