|
Ajjuka
| |
| Thursday, August 30, 2007 - 5:15 pm: |
| 
|
माणूस, नाही माझी sun sign pisces नाहीये. पण असं का वाटलं तुला?
|
तस नाही अज्जुका. जर आजीला त्रास होत नसेल तर ही तडजोड करायला हरकत नाही. कारण मग ते गोडीने होते. पण ती म्हातारी झाली आहे आणि तिला आता शारीरिक गरजेसाठी एकांताची गरज नाही तर मग खोली तरी कशाला अस ठरवण योग्य नाही. अक्कांचे चुकते आहे तडजोड करताना कुरकुर करणे, असा सूर होता त्याला माझा आक्षेप आहे. स्वत्:चे घर नाही घेऊ शकत मान्य आहे. पण भाड्याने तर घेऊ शकतात? आणि तेही परवडत नसेल तर जा की दुसर्या शहरात वगैरे. आपल्या आई वडीलांनी नाही खस्ता खाल्ल्या नवीन जागी कामानिमीत्त रहायला गेल्यावर? तुम्हाला मुंबईतच (किंवा टिंबक्टू) का रहायच आहे? माणसा, थोड्याफ़ार फ़रकाने मीही तेच लिहीणार होतो. फ़क्त लोक म्हणतात म्हणून शहर सोडणे मुर्खपणाचे आहे. एकाच बिल्डींग मधे रहा की अंतरा म्हणते तस. म्हणजे भावनीक गरज पण भागेल. सशल, कथा छोटी ठेवायची म्हणून कदाचीत अशोक, अभय वगैरे इतर पात्रांची भावनीक गरज दाखवली नसेल असे मी म्हटले. ह्याबाबतच गोंधळ झाला का तुझा?
|
Slarti
| |
| Thursday, August 30, 2007 - 5:54 pm: |
| 
|
गोष्टी parallel process कराव्या लागतात, करायच्या असतात. घर विकत घेण्यासाठी आपण हातात घराच्या किंमतीएवढे पैसे असण्याची वाट बघत नाही. अज्जुकाने दिलेले उदाहरण सुरेख आहे. स्वतःचे घर घेण्याची ऐपत नसताना लग्न केले तर जागा, एकांत वगैरे प्रश्न... ते घेण्याची ऐपत येईपर्यंत थांबले तर उशीरा होणार्या लग्नातून उद्भवणारे प्रश्न... शेवटी तडजोड तर करावीच लागणार, अशी नाही तर तशी. त्यात बात अशी की बहुतेक लोक पहिल्या प्रकारची तडजोड करतात, परिणामतः पहिल्या प्रकारची तडजोड करणे अधिक फायदेशीर ठरते. It's a kind of feedback loop.
|
अरे हो, मला पूनमचे (लेखीकेचा दृष्टिकोन) विचार वाचायला आवडेल. पूनम, कथा अगदीच वैचारीक खाद्य पुरवणारी झाली की ! अभिनंदन.
|
Slarti
| |
| Thursday, August 30, 2007 - 6:05 pm: |
| 
|
पूनमच्या कथेसंदर्भात अक्कांकडून तडजोडीची अपेक्षा थोडी एकांगी आहे असे मलाही वाटते. पण (सर्वसाधारणपणे) समजा राहते शहर सोडून जायचे नाही यासाठी घरातील बाकीच्यांची तडजोडीची तयारी असेल तर काय करणार ?
|
Maanus
| |
| Thursday, August 30, 2007 - 6:29 pm: |
| 
|
मला नीट वाक्यरचना जमत नाही... भावार्थ समजला म्हणजे झाले लोक काय म्हणतील याचा विचार कधीच करु नये. very true जेव्हा तुम्हाला खरच गरज असते तेव्हा तुम्हाला कोणताच नातेवाईक / मित्र कोणीच मदत करत नसते. तेव्हा लोकांच्या बोलण्याचा आपल्या वागणुकीवर जास्त परिणाम करुन न घेतलेलाच बरा असतो i guess everybody wants in-laws like Marie & Frank from everybody loves raymond
|
Supermom
| |
| Thursday, August 30, 2007 - 7:11 pm: |
| 
|
अक्कांकडून तडजोडीची अपेक्षा एकांगी आहे असं मला तरी नाही वाटत मुळीच. शेवटी घरात तडजोड ही प्रत्येकानंच करायची असते. कोणा एकानंही आडमुठी भूमिका घेऊन नाही चालत. घरात नवीन लग्न झालेलं जोडपं आलं की त्यांची हौसमौज आणि त्यांना एकांत देणं यात गैर ते काय?अक्कांनी नातसून बघितली, म्हणजे त्या एक समृद्ध आयुष्य जगलेल्या आहेत. आता नातू नि नातसून ह्यांना वेगळ्या खोलीची जास्त गरज आहे. प्रत्येक घरात प्रत्येक फ़ॅमिली मेंबरला वेगळी खोली देण्याइतकी ऐपत सर्वांची नसते. अशा परिस्थितीत कोणाची गरज जास्त हे परिस्थितीनुसार ठरवल्या गेलं तर काय चुकलं? भाड्यानं जागा घेणं पैशानं परवडत असलं तरी अजूनही आपल्याकडे वेगळं होण्याला भावनिक बाजू आहे. 'सून वेगळी झाली.' ही अजूनही वेगळ्याच तर्हेने घेतली जाणारी गोष्ट आहे. एकत्र राहून भांडाभांडी नि न पटणार्या तडजोडी करत आयुष्य घालवण्यात लोक धन्यता मानतात, पण वेगळं होणं बरेच लोक अजूनही वाईट समजतात. अन प्रश्न नुसत्या जागेचा नाही. अक्कांच्या विचित्र स्वभावाचाही आहे. बर्याच म्हातार्या माणसांना वयाबरोबरच आडमुठेपणाची देणगीही असते. पिझ्झा चावणार नाही म्हणून म्हणायचं नि वर खायचाही हे मी माझ्या आजीच्या बाबतीत डोळ्यांनी बघितलंय. आम्ही मुली लहान असताना आई बरेचदा आमच्या आवडीचे पदार्थ करीत असे. तेव्हा 'मला ते पचणार नाही. माझा स्वैपाक वेगळा कर. मी गरम पोळीच खाईन' असे ठासून सांगून आजी आईकडून साग्रसंगीत स्वैपाक तर करून घेईच, पण सगळे जेवायला बसले की बाकी पदार्थही व्यवस्थित खात असे. हे उगाच त्रास देणे झाले की नाही? थोडक्यात काय, घरातल्या सगळ्यांच्या आनंदात आनंद मानणारी व्यक्ती सगळ्यांना आवडते.उगाच आनंद नासवता कसा येईल हे बघणारी नाही.
|
Slarti
| |
| Thursday, August 30, 2007 - 8:22 pm: |
| 
|
कथेसंदर्भात बोलायचे झाले तर वयामुळे flexibility जाते हे कथेमध्ये कोणी लक्षात घेतलेले दिसत नाही. त्यामुळे ते मला एकांगी वाटले. वृद्ध लोकांचे दररोजचे routine अगदी set झालेले असते, त्यातील बदल हा आपल्याला trivial किंवा 'साहजिक' किंवा 'न्याय्य' वाटला तरी त्यांना नसतो. सर्वसाधारणपणे बोलायचे झाले तर, घरातील बाकीच्यांची जर तडजोड करण्याची इच्छा असेल तर... कोणाची गरज जास्त हे फार सापेक्ष आहे, तो निर्णय घेणे हा शेवटी संख्येचा खेळ होतो. आपल्या आजीलोकांची पिढी (होय, बहुतेक लोक तसे होते) आडमुठी होती हा स्वानुभव आहे. पण त्या पिढीतील बहुतेक लोक तसे का होते / झाले हेही लक्षात घेतले तर पाहिजे. त्या वर्तनाचे समर्थन नाही करत, पण असे विश्लेषण केल्याशिवाय त्यांच्या वागण्याचा थांग लागत नाही, तो थोडा लावता आला तर त्यांचे वागणे 'कोठून' येत आहे हे कळायला मदत होते आणि जगणे पूर्ण नाही तरी थोडे तरी सोपे होते.
|
Slarti
| |
| Thursday, August 30, 2007 - 8:32 pm: |
| 
|
>>> बर्याच म्हातार्या माणसांना वयाबरोबरच आडमुठेपणाची देणगीही असते. देणगीच असते असे नाही हो, तो येतो, रुजतो... या नाहीतर त्या रुपात. वृद्धत्व हे दुसरे बालपण असे उगीच म्हणत नाहीत...
|
Zakki
| |
| Friday, August 31, 2007 - 12:24 am: |
| 
|
anyways आपल्या समजात (म्हणजे Indian culture मध्ये) जे बर्याच बाबतीत lack of communication, frankness आहे तोच सगळ्यांत जास्त दोषी आहे . एकदम खरे. पण माझ्या अनुभवाप्रमाणे फक्त आपल्या समाजातच असे असते असे नाही तर इथेहि असतेच. पण तीच लोक बाहेर मात्र बोलतात. माझ्या बायकोच्या ऑफिसमधे सगळ्या पन्नाशीहून जास्त वयाच्या बायका आहेत. त्यातून ते इन्शुरंस क्लेमचे काम असल्याने दिवसभर, माझी सून कशी मुद्दाम वाईट वागते, माझ्या मुलीच्या सासरचे लोक म्हणजे अस्से आहेत ना, असल्या चर्चा दिवसभर चालू असतात. एकदा माझ्या बायकोने ते मला सांगण्याचा प्रयत्न केला. एक तर मला ते काही कळलेहि नाही, नि मी म्हंटले हे सगळे त्या बायका आपापल्या घरीच का बोलत नाहीत स्पष्टपणे? "तुम्हा पुरुषांना काऽही कळत नाही!" असे ८७ हजाराव्यांदा ऐकावे लागले.
|
Zakki
| |
| Friday, August 31, 2007 - 12:28 am: |
| 
|
बर्याच म्हातार्या माणसांना वयाबरोबरच आडमुठेपणाची देणगीही असते. हेहि सत्य. अगदी भरल्या घरात राहिले तरी खरे म्हणजे म्हातारी माणसे जरा उपेक्षितच रहातात (जसा मी, आपल्या GTG त!)
त्यामुळे ते स्वत:कडे लक्ष वेधून घेण्यासाठी, स्वत:चे महत्व अजून कमी झाले नाही हे दाखवण्यासाठी मुद्दाम असा आडमुठेपणा करतात!
|
Bee
| |
| Friday, August 31, 2007 - 1:59 am: |
| 
|
शारीरिक गरज म्हणून फ़क्त लग्न करावे अशी आता तरी परिस्थिती नाही. >> बापरे सव्यसाची खूपच पुढारलेले विचार झाले हे
|
Ajjuka
| |
| Friday, August 31, 2007 - 3:01 am: |
| 
|
>>पण ती म्हातारी झाली आहे आणि तिला आता शारीरिक गरजेसाठी एकांताची गरज नाही तर मग खोली तरी कशाला अस ठरवण योग्य नाही.<< shaareereek garajesaaThee ekaaMtaachee garaj naahee mhaNaje ekaTeelaa kholee kashaalaa asaM mhaNaNM naaheeye kathemadhe. ithe tyaaMnaa paryaay Thevalaach navhataa naaheetar tyaaMnee naatoo aaNi naveen naatasoon yaaMnaa hOlamadhech jhopaayalaa laavale asate. pariNaam 2 aayuShyaaMchee suroovaateelaach vaaT laagalee asatee. mhaNaje saMpoorN aayuShya jagalyaanaMtar, aaNi svataHchach kharaM asaM chaalavalyaanaMtarahee tyaa vyakteesaaThee jyaaMchaM aayuShya suroo hotaMy tyaaMnee aapalyaa aayuShyaavar kaajaLeech dharaayachee kaa? >>स्वत्:चे घर नाही घेऊ शकत मान्य आहे. पण भाड्याने तर घेऊ शकतात? आणि तेही परवडत नसेल तर जा की दुसर्या शहरात वगैरे.<< bhaaDyaane jaagaa ghyaa.. kharaMya aaNi mag sunenaM aalyaalyaa ghar phoDalaM ashee oraD hote tyaachaM kaaya? aaNi bhaaDyaane jaagaa ghyaayachee paristhitee asalee taree anekadaa tee miLat naahee. bar aaivaDeelaaMpaasoon phaar door jaaNaM paN manaalaa paTat nasataM, tyaaMnaa aayatyaaveLee kaahee garaj laagalee tar kaay karaayachaM he satat manaat asataMch. gharaachyaa soyeene nokaRyaa miLat naaheet. aaNi baaheragaavee jaa mhaNaNM khoopach soppaM aahe paN uttam asalelyaa nokaRyaa doghaaMnee soDoon deoon baaheragaavee nokaRyaa gheNe miLateel tashyaa hee avyavahaaryach naahee kaa? kaahee kShetra tyaa tyaa Tharaavik shaharaatach asataat udaharaNaarth naaTya aaNi chitrapaTaashee saMbaMdhit kaam karaNaaRyaalaa kiteehee nako vaaTale taree muMbaeetach yaave laagate. mag tumhee kaay kShetra badalaa asaM saaMgaNaar?
|
Ajjuka
| |
| Friday, August 31, 2007 - 3:03 am: |
| 
|
mazya devanagari window chya copy msg la error yetey.
|
Yog
| |
| Friday, August 31, 2007 - 3:49 am: |
| 
|
सव्या, लेका आता तूही एक "एकान्त" model वगैरे बनवायला घे. हव तर "एकान्त" म्हणजे काय असाही bb उघड. मग ओघानेच alone/lonely/ या शब्दान्च्या google/wikipedia व्याख्या सर्वाना नव्याने चर्चेला घेता येतील. पुढे विषय फ़ारच भरकटतो आहे असे वाटल्यावर जागेचा प्रश्ण मोहेन्जोदडो हडप्पापासून धारावीपर्यन्त कसा क्लिष्ट आहे आणि आता धार्मिक राजकरणामूळे अनधिकृत बान्धकामे अजूनही कशी उभी रहात आहेत पर्यायाने आधीच कमी पडणार्या जागेवर कसे अतिक्रमण होत आहे त्यामूळे शारिरीक, भावनिक, मानसिक, वासनिक कुचम्बणा होवून एकन्दर नव्या पिढीची life expectancy कशी कमी होत आहे अशी एक सारासार गोलाकार चर्चा करून मग तो bb mods च्या स्वाधीन करून मोकळे होता येईल.. त्यातून निष्कर्श निघे पर्यन्त admin नव्या देवनागरीकराणाची announcement करतील अशी आशा करूया.. हुश्श! (लिखाणातील गण गोत्र, मात्रा दुर्लक्ष करून फ़क्त content चा निर्भेळ आनन्द लुटावा अशी विनन्ती. चल मग good night भाभी.) 
|
Psg
| |
| Friday, August 31, 2007 - 5:35 am: |
| 
|
बरीच चर्चा झाली इथे माझेही ४ शब्द ऍड करते. प्रथम कथेतल्या आक्कांबद्दल- आक्कांचे पात्र असे आहे की त्यांना कोणत्याच प्रसंगाचा निर्भेळ आनंद घेता येत नाही.. अगदी एकुलत्या एका नातवाच्या लग्नाचाही. त्यामुळे जिथे संधी मिळेल तिथे कुचकेपणा करणं त्या सोडत नाहीत. स्लार्तीनी वर म्हणलंय त्याप्रमाणे म्हातार्या लोकांना तडजोड करणं जास्त कटकटीचं असतं कारण त्यांचं रूटीन सेट असतं. कबूल. पण जेव्हा घरात 'नवं लग्न' होतं तेव्हा, किमान तेव्हा तरी तुम्ही खुल्या दिलानी तडजोड करायला नको? आणि काय मोठीशी तडजोड आहे- की बाहेरच्या खोलीत झोपायला लागतंय. त्यांचं कपाट, बाकी सामान अजूनही त्यांच्याच खोलीत आहे. मग नव्या जोडप्याला आनंद मिळावा म्हणून इतकी छोटी तडजोडही नाही करू शकत आक्का? especially तेव्हा जेव्हा त्यांचं एक संपूर्ण आयुष्य जगून झालं आहे? उलट अभय-निधीला आक्कांना होणार्या त्रासाची कल्पना आहे म्हणूनच त्यांनी नवा टीव्ही घेतला. तर त्यांनी काढलेला हा तोडगाही आक्का रंगीत चष्म्यातून बघतात. बरं इतकंच नाही, तर आक्कांना नवीन जोडप्याच्या नाजूक बाबतीतही नको इतका interest आहे. मला कल्पना नाही की तुम्ही अश्या व्यक्ति पाहिल्या आहेत की नाही, पण अश्या व्यक्ति, esp. बायका असतात, ज्यांना लोकांच्या privacy त रस असतो. कोणत्या गोष्टीत तडजोड करायची आणि कोणत्या नाही याला limits असतात. काही गोष्टी आपण नाहीच सहन करू शकत. जेव्हा पाणी डोक्यावरून जातं तेव्हाच टोकाचे निर्णय घ्यावे लागतात नाईलाजाने. आता जनरली बोलायचं झालं तर जागेचे प्रश्न गंभीर आहेत. पण लोक काही ना काही मार्ग काढतातच. privacy म्हणजे साधं एकमेकांशेजारी बसून गप्पा मारणंही असतं हो, पण तितकंसं सुखही लाभत नाही काही जोडप्यांना. मग अश्या वेळी फ़क्त रात्री दुसर्या जागी झोपायला जाणं, वेगळं बिर्हाड मांडणं, किंवा आहे त्या जागेतच तडजोड करणं हे असं काही करावं लागतच. त्यावेळी घरातल्या सगळ्यांनीच थोडं सहकार्य आणि थोडी तडजोड केली तर काय हरकत आहे? एका कुटुंबातली लोकं इतकसं करू शकत नाहीत एकमेकांसाठी?
|
Bee
| |
| Friday, August 31, 2007 - 6:02 am: |
| 
|
अज्जुकाचे पोष्ट देवरूपात... शारीरीक गरजेसाठी एकांताची गरज नाही म्हणजे एकटीला खोली कशाला असं म्हणणं नाहीये कथेमधे. इथे त्यांना पर्याय ठेवलाच नव्हता नाहीतर त्यांनी नातू आणि नवीन नातसून यांना हॉलमधेच झोपायला लावले असते. परिणाम २ आयुष्यांची सुरूवातीलाच वाट लागली असती. म्हणजे संपूर्ण आयुष्य जगल्यानंतर, आणि स्वतःचच खरं असं चालवल्यानंतरही त्या व्यक्तीसाठी ज्यांचं आयुष्य सुरू होतंय त्यांनी आपल्या आयुष्यावर काजळीच धरायची का? भाड्याने जागा घ्या.. खरंय आणि मग सुनेनं आल्याल्या घर फोडलं अशी ओरड होते त्याचं काय? आणि भाड्याने जागा घ्यायची परिस्थिती असली तरी अनेकदा ती मिळत नाही. बर आइवडीलांपासून फार दूर जाणं पण मनाला पटत नसतं, त्यांना आयत्यावेळी काही गरज लागली तर काय करायचं हे सतत मनात असतंच. घराच्या सोयीने नोकर्या मिळत नाहीत. आणि बाहेरगावी जा म्हणणं खूपच सोप्पं आहे पण उत्तम असलेल्या नोकर्या दोघांनी सोडून देऊन बाहेरगावी नोकर्या घेणे मिळतील तश्या ही अव्यवहार्यच नाही का? काही क्षेत्र त्या त्या ठराविक शहरातच असतात उदहरणार्थ नाट्य आणि चित्रपटाशी संबंधित काम करणार्याला कितीही नको वाटले तरी मुंबईतच यावे लागते. मग तुम्ही काय क्षेत्र बदला असं सांगणार?
|
Deemdu
| |
| Friday, August 31, 2007 - 6:17 am: |
| 
|
exactly पूनम. मी actually असच काहीतरी लिहायला आले होते आत्ता इथे. आपल्याला मिळालं नाही ते निदान आपल्याच पुढच्या पिढीला आपण मिळवुन द्याव, इतकातरी समंजसपणा निदान वयामुळे तरी यावा माणसाला. प्रत्येक वेळेला वेगळ रहाण शक्य असेलच अस नाही. कथेतल्या आक्का हेकेखोर वाटतात. अर्थात प्रत्येकवेळी म्हातार्या लोकांनीच तडजोड करण अपेक्षीत नाहीये. पण निदान वयपरत्वे समंजसपणा यायल हवा. जसं त्यांच्या आडमुठे पणाकडे वयानुसार बघितलं जातं तसच, वयामुळे येणारं शहाणपण आणि समंजसपणा हाही विचार व्हायला हवा. आणि राहीला प्रश्न नाजुक बाबतीत लक्ष घालण्याचा, तर मला तरी ही प्रचंड मोठी विकृती वाटते. आवाज येत होते आतुन, म्हणुन बाहेर ऐकत थांबणे, आणि तेही वयाच्या ह्या टप्प्यावर..... शी........ बर पण पूनम ते संवाद तेव्हढे लिहीले असतेस तर..... मी अशीही कुटुंब बघीतली आहेत, की दुसर्या भावाच्या लग्ना आधी आधीच्या भावाला वेगळ घर सासुने स्वतः करुन दिल. आणि पहिलं घर दोनच खोल्यांच असल्याने नवीन जोडप्याच्या privacy साठी बिचारे सासु सासरे वयाच्या साठी नंतरही चाउथ्या मजल्यावरच्या दुसर्या मुलाकडे फक्त झोपायला म्हणुन जात होते. दुसर्या भावाचा flat तीन रुमचा होता, आणि बिचारे म्हातारा म्हातारी हॉल मध्ये झोपायचे. इतकी adjustment करणारे लोकही असतात.
|
Bsk
| |
| Friday, August 31, 2007 - 7:05 am: |
| 
|
आक्कांसारखा स्वभाव असणारी लोकं या जगात आहेत.. त्यामुळे त्यांनी असा हेकेखोरपणा करणे हे स्वाभाविक आहे. कुठल्याहि आनंदामधे सहभाग घेणारी वृद्ध लोकं असतात, तितकीच नसतातही.. त्यामुळे कथा पटली, आणि आवडली देखील.. फ़्लो छान आहे कथेला..
|
Ajjuka
| |
| Friday, August 31, 2007 - 8:23 am: |
| 
|
मॉडरेटर, या बी बी वरची माझी सर्व पोस्टस काढून टाकावीत ही विनंती.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|