|
आक्कांच्या वयाचा विचार करता त्यांना हा बदल भरपूर त्रासदायक आहे. स्वत्:ची खोली सोडून बाहेरच्या खोलीत झोपायला लागणे, का तर नातवाचे नवे लग्न झालेय, हे पचवणे अवघड आहे. म्हणूनच त्यांना ती खोली परत मिळताच गाढ झोप लागली असावी. जर निलाला सासूला खोलीतून बाहेर आणणे, तिला स्पष्ट कल्पना न देता, हे जमत असेल, तर दुसरे घर बघायचा निर्णय पोराच्या गळी उतरवणे पण जमायला पाहीजे लग्नाच्या आधीच. (विशेषत्: ऐपत असताना) आणि पोराला पण कळायला पाहीजे आजीला बाहेर झोपणे (किंबहूना आता सतत बाहेरच) त्रासदायक होईल ते. या आक्कांचा स्वभाव असेलही प्रथमपासून असा विक्षिप्त. पण कोणत्याही आजीसाठी हे त्रासाचे आहे असे मला वाटते.
|
Sashal
| |
| Wednesday, August 29, 2007 - 8:22 pm: |
| 
|
सव्यसाची, त्रासाचे आहे किंवा हा बदल easily accept करणं कठीण आहे हे मान्य आहे .. पण तुझ्या post वरून वाटतंय की ह्या गोष्टीत तू नीला च्या character ला सगळ्यांत जास्ती blame करतो आहेस आणी त्या अभय ला पण .. मला हे पटत नाही .. समजूतदारपणा दोन्ही बाजूंनीं हवा .. लग्न व्ह्यायच्या आधीच अक्कांनाही कळायला हवं की हा बदल होणार आणी नीला आणी अशोक ने सुध्दा हे त्यांच्याशी discuss करायला हवं .. anyways आपल्या समजात (म्हणजे Indian culture मध्ये) जे बर्याच बाबतीत lack of communication, frankness आहे तोच सगळ्यांत जास्त दोषी आहे .. आणी मी हे सुध्दा नमूद करू इच्छिते की लग्नानंतर मुलांनी वेगळा संसार थाटावा ह्या मताची मी आहे ..
|
Arc
| |
| Thursday, August 30, 2007 - 5:01 am: |
| 
|
अक्काना खलनायिक म्हणुन का present केले आहे? उतारवयात त्यानी तद्जोद करने म्हनजे त्यानच्यावरच अन्याय आहे. अर्थात कथा छान आहे ह्यात वाद नाही
|
Ajjuka
| |
| Thursday, August 30, 2007 - 5:47 am: |
| 
|
पूनम, कथा आवडली. पण मधेच संपवलीस, समाप्त ची पाटी अजून थोडी नंतर यायला हवी होती असं वाटलं. वरती काहींचे म्हणणे आहे की उतारवयात adjust करायला लागणे हेच चुकीचे आहे. अहो पण मग नवीन लग्न झालेल्या जोडप्याने सन्यास घ्यायचा का? मग लग्नच कशाला करायचं? निदान या कथेत त्यांना आर्थिकदृष्ट्या वेगळं होणं शक्य तरी होतं पण आज अशी अनेक घरं आहेत की जिथे हे ही शक्य नाही. तिथे काय? घरातल्या मोठ्यांनीच नको adjust करायला. निदान या बाबतीत तरी? केवढी नाजूक गोष्ट असते ही. थोडं विषयांतर.. मला अस एक कुटुंब माहीत होतं ज्यांच्याकडे चाळीच्या २ खोल्यांचं घर. घरात आइवडील आणि लग्न झालेले ४ भाऊ. आतली खोली वापरायचे दिवस वाटून घेतले होते त्यांनी. मग शक्य झाल्यावर हळू हळू एकेकाने आपापला जागेचा प्रश्न सोडवला. हे ऐकलं तेव्हा भयंकर धक्का बसला होता मला. पण त्या चार सुनांपैकीच एकीने मला हे सांगितलं ती मात्र 'आता काय करणार.. शक्य नव्हतं तर केलं adjust !' इतक्या सरळपणाने सांगत होती. कसलीही कटुता नव्हती शब्दांच्यात. मानलं तिला.. आपण स्वतःला ठेवून पाह्यलं त्या जागी तर सगळ्या गोष्टींची शिसारी येईल. असो विषयांतराबद्दल क्षमस्व..
|
Arc
| |
| Thursday, August 30, 2007 - 6:12 am: |
| 
|
exactly ajjuka मला हेच म्हणायचे आहे जागेचि सोय नसताना लग्न करतातच कसे लोक?आणि परवदत नसताना आई वदिल तरि इतकि मुले होउ कशी देतात?फ़ारसा awareness पण नसतो यबब्तित. अर्थात विषयान्तराबद्दल मीपण sorry . kshmaswa kase typayache?
|
Ajjuka
| |
| Thursday, August 30, 2007 - 6:31 am: |
| 
|
Arc , आज मुंबईसारख्या शहरात खाऊन पिऊन सुखी कुटुंबामधेही नवीन जागा ही गोष्ट कक्षेच्या बाहेरची असते. २५-३० च्या वयात एवढा पैसा शक्य होतोच असं नाही. मग काय चाळीशीपर्यंत वाट बघत बसायची? परत नवीन जागा शक्य होते ती इतकी दूर की रोजचं कामाला जाणं हे एक दिव्य होऊन बसतं. अश्या वेळेला काय करायचं? आहेत त्या खोल्यांच्यातच भागवायला लागतं अगदी एकुलता एक मुलगा असला तरी. मध्यमवर्गीय कुटुंबाचा साधारणपणे 2BHK असला आणि नातू एकटाच असला तरी कुणालातरी हॉलमधे जायची गरज पडतेच की. एवढी मुलं का होऊ द्यायची हे मान्य गं पण हे त्या मुलांच्या हातात आहे का? त्यांनी काय करायचं? आइवडीलांनी खूप मुलं जन्माला घातली याची शिक्षा स्वतःला करून घ्यायची लग्न न करून? शेवटी माणूस म्हणून काही बेसिक गरजा आहेतच ना. आणि लग्नाशिवाय त्या पुर्या करायच्या नाहीत हे आपण मानतो ना(सर्वसाधारणतः!). असो ही चर्चा दुसरीकडे हलवूया का?
|
पूनम, मला ही कथा आवडली. साधारणपणे अक्काच्या प्रकारातली माणसे सर्वत्र भेटतात. माझ्या एका मैत्रिणीच्या चुलत आजेसासुबाई होत्या. त्याचा नवरा लग्नानंतर अवघ्या महिन्यात गेला. तर या आजीबाई सतत अशीच कुरकुर करायच्या, जागेचं म्हणाल तर त्याचा अख्खा वाडा होता. पण तरी ही कटकट करायचीच. Arc तुमचा मुद्दा काही मला पटला नाही. जागेची कमतरता आहे म्हणून लग्नच करू नये का? आणि अगदी एक मुलगा एक मुलगी असलेल्या घरात देखील हे प्रश्न उठतातच ना. शेवटी काय आहे आणि काय नाही यापेक्षा जे काही आहे त्याकडे बघण्याचा द्रुष्टिकोन महताचा.... थोडा है थोडेकी जरूरत है....
|
जुन्या लोकांना इतका मोकळेपणा का लागतो? हा प्रश्न पडतो? कदाचित त्यांच्या वाट्याला सुखाचे क्षण कमी आले असतील म्हणूनही असे होते. आणि त्याकाळि एव्हढा मोकळे पणा नसायचाच. सव्यासाची चे म्हणने पटले. छान आहे गोष्ट.
|
Arc
| |
| Thursday, August 30, 2007 - 9:08 am: |
| 
|
ajjuka तु म्हणतीयेस ते Bomabay च्याबातित अगदि बरोबर पण असेल?पण मी आजही अशी बरीच कुतुम्बे पाहिली आहेत especially lower middle class,lower class and rural , आपली मुले म्हणजे आपली स्वतहची responsibility आहे हे त्याना मान्यच नसते. ती resposibility ते governmentchi आहे असे मानतात. and then they tend to have more kids. आणि मग हे जागेचे प्रश्न किम्बहुना इतेरही अनेक प्रश्न निर्माण होतात. unfortunately, birth control ह्या topic वेर कोणालाहि resoursce crunch ह्या point of view ने बोलयचे नसते. i completely agree that in above post watever i have wriiten sounds bit extreme. an individual should get married at right age,but still this awareness has to be there u should have kids only when u can afford to support them. i also, request admin to move this discussion to appropriate location so that others also can share their opinions.
|
Ajjuka
| |
| Thursday, August 30, 2007 - 9:18 am: |
| 
|
mule 1 havit ka 2 asa ek purvi discussion hota. tyavar yach POV ne mi kahi statements keli hoti. he discussion kuthetari yogya jagi halava ho mod. Jagecha prashna asa v&c madhe kadha. mala tu kay mhanateyas te patatay. pan ata aapala 'jagecha prashna' sutala ki mag lihite. ugach poonam chya goshtichya ithe nako hi charcha.
|
Ajjuka
| |
| Thursday, August 30, 2007 - 9:41 am: |
| 
|
/hitguj/messages/46/49687.html?1076858226 ya thikani he discussion zalele aahe.
|
Bee
| |
| Thursday, August 30, 2007 - 10:43 am: |
| 
|
४ खोल्यांच्या ब्लॉक मधे २ संसार आणि ५ माणसं बसवायची म्हणजे थोडीफार ऍडजस्टमेन्ट सगळ्यांनाच करायला लागणार होती..>> वर आगामी V & C चा विषय वाचून ही जागा ५ व्यक्तींसाठी इतकीही लहान वाटत नाही...
|
Ajjuka
| |
| Thursday, August 30, 2007 - 12:13 pm: |
| 
|
बी, ४ खोल्या म्हणजे बेडरूम्स दोनच. २ संसार म्हणजे २ जोडपी. त्यांना privacy नको का? म्हणजे ५ वं माणूस हे हॉलमधेच येणार ना? ते काय ५ bachlors नाहीयेत.
|
Ajai
| |
| Thursday, August 30, 2007 - 12:31 pm: |
| 
|
जागेचा प्रश्न अजुनही मुम्बई सारख्या शहरात मोठा प्रश्न आहे पण तडजोडिचा प्रश्न इथे V&C वर चर्चिण्या येव्हाढा गंभिर नसावा.कथेतिल घटना आणि म्हातारि व्यक्ति हे प्रातिनिधिक नसावी आणि अशा व्यक्ति अपवादानेच आढळत असाव्यात. आणि हे अपवाद इथे येवुन v&C वाचण्याची शक्यता नाहि. त्यामुळे या चर्चेला तसा काहि अर्थ नाहि.
|
Ajjuka
| |
| Thursday, August 30, 2007 - 1:10 pm: |
| 
|
खरंतर अजय इथल्या कुठल्याच चर्चेला खर्या आयुष्यात काही अर्थ नसतो हो. पण म्हणून चर्चा करायचीच नाही असं आहे का?
|
Maanus
| |
| Thursday, August 30, 2007 - 2:29 pm: |
| 
|
निरजा तुझी sun-sign pisces आहे का. just curious ऑर्कुट चा इथे काही संबध नाही. आता वरील विशयावर. माझे लग्न झालेले नाहीय, पन पुणेकर म्हणुन प्रत्येक ठिकाणी येवुन बोलणे हा माझा जन्मसिध्द हक्क आहे जेथे एक खोल्यांचे घर आहे ते लोक obviously त्या शहरात नव्याने रहायला आलेत. मी झोपडपट्टी मधे रहाणर्यांबद्दल बोलत नाहीय, त्यांच्या बद्दल बोलुन काही होणार नाही नव्याने चा अर्थ असा की, they came in city away from their parents place, in search of work few years back and settled down there. हे लोक तुम्ही म्हणता त्या situation मधे कधी गेलेच नाहीत, कारण त्यांचे नविन कुटुंब एका नविन जागेत सुरु झाले होते, त्या मुळे अशा वेळी कसे वागायचे हे त्यांना माहीत नाही. so yours is the first generation (in city life) to face this issue and answer is do the same thing what your parents did, search for job in different city. ह्या प्रकारे एकाच शहरात राहुन तुम्ही वेगळे वेगळे का रहाता असे कोणी विचारणार नाही व संबध पन चांगले रहातील. this is not generation gap, these are side effects of industrial evolution.
|
Antara
| |
| Thursday, August 30, 2007 - 2:55 pm: |
| 
|
हे काहीतरीच मोकळिक हवी या कारणासाठी दुसर्या शहरात जॉब का? एकाच शहरात, एकाच उपनगरात, एकाच कॉलनीत, सोसायटीत असे काही (जमत असले तर) का नको? गरजेला उपयोगी पडता येतं आणि ती काय ती मोकळिक पण मिळते की!लोक विचरतील म्हणून? त्यात काय चूक अथवा तोंड लपवण्यासारख आहे!
|
सशल, अक्कांना आधीच कळल होत हे कथेत आहे. अक्का आणि मावशींचे बोलणे चालू असते वगैरे. मी निलालाच दोषी धरत नाहीये. तिचा नवरा (अशोक?) आणि अभय हे पण अविचारी वाटतात. टक्केवारीच ठरवायची झाली तर अशोक सगळ्यात पुढे आहे. बाकी, भावनीक कारणांमूळे एकत्र रहाणे, आणि गरज म्हणून, यात खूप फ़रक आहे. या कथेत तरी गरज दिसत नाही. आणि भावनीक कारण फ़क्त निलाकडून दिसते आहे. (कदाचीत कथा छोटी ठेवायची म्हणून असेल). अज्जूका, जे लग्न करण्याची इच्छा धरतात त्यांना स्वत:च्या संसाराची जबाबदारी पूर्ण उचलायची ताकद असेल तरच करावे. शारीरिक गरज म्हणून फ़क्त लग्न करावे अशी आता तरी परिस्थिती नाही. इथे बापाच्या २ खोल्या आहेतच म्हणून अभय त्यातली एक स्वत्:ला अस करू शकतोय. जिथे अख्ख घर म्हणजे एकच खोली असेल तिथे त्यांनी पडदा लाऊ पण तरी लग्न करणारच असा विचार करावा का? जोडप्यांनाच फ़क्त एकांत हवा आणि एकटे असणार्याला नको? आणि मला तरी बेडरूम हीच फ़क्त पाहीजे तेंव्हा एकांत मिळू शकेल अशी वाटते. असो. वर लिहील्या प्रमाणे, भावनीक आणि आर्थिक गरजेमूळे एकत्र रहाणे याला खूप फ़ाटे आहेत, कंगोरे आहेत. त्या सगळ्यावर चर्चा करत बसलो तर मला आर्थिक चणचण निर्माण होईल
|
Sashal
| |
| Thursday, August 30, 2007 - 5:10 pm: |
| 
|
सव्यसाची, मी थोडी confuse झालेय तुझा response वाचून .. म्हणजे, esp. , "भावनीक कारणांमूळे एकत्र रहाणे, आणि गरज म्हणून, यात खूप फ़रक आहे. या कथेत तरी गरज दिसत नाही. आणि भावनीक कारण फ़क्त निलाकडून दिसते आहे. (कदाचीत कथा छोटी ठेवायची म्हणून असेल). " ह्यासाठी .. आणि, "जे लग्न करण्याची इच्छा धरतात त्यांना स्वत:च्या संसाराची जबाबदारी पूर्ण उचलायची ताकद असेल तरच करावे. शारीरिक गरज म्हणून फ़क्त लग्न करावे अशी आता तरी परिस्थिती नाही. इथे बापाच्या २ खोल्या आहेतच म्हणून अभय त्यातली एक स्वत्:ला अस करू शकतोय. जिथे अख्ख घर म्हणजे एकच खोली असेल तिथे त्यांनी पडदा लाऊ पण तरी लग्न करणारच असा विचार करावा का? जोडप्यांनाच फ़क्त एकांत हवा आणि एकटे असणार्याला नको? आणि मला तरी बेडरूम हीच फ़क्त पाहीजे तेंव्हा एकांत मिळू शकेल अशी वाटते. असो. वर लिहील्या प्रमाणे, भावनीक आणि आर्थिक गरजेमूळे एकत्र रहाणे याला खूप फ़ाटे आहेत, कंगोरे आहेत." हेही खूप पटलं .. आपल्याकडे तर ह्या बाबतीत प्रचंड revolution ची गरज आहे असं मला वाटतं .. म्हणजे population explosion आटोक्यात आणायचं असेल तर खरोखरच drastic measures adopt व्हायला हवी आहेत आजच्या समाजाकडून .. आणी मग ह्यातून अशीही arguments येणार की 'मग काय, ज्यांच्याकडे नीट रहायची, जेवाय्-खायची परिस्थिती नाही, त्यांना families असूच नयेत का' वगैरे .. मला अगदी पटतंय की हे easily said than done आहे पण आता इलाज नाहीये .. खरोखरच आपली उन्नती करून घ्यायची असेल तर असे "western influenced" विचार असायला हरकत नाही .. sociological/ economic experts कडे अजून वेगळं solution असेल तर छानच ..
|
Ajjuka
| |
| Thursday, August 30, 2007 - 5:11 pm: |
| 
|
सव्या, खूपच टोकाचे विचार रे. तू सांग आज वयाच्या २५-३० ला स्वतःचे घर घेणे कोणाला परवडू शकणारे? आणि नाहीतर त्याने ४०शी पर्यंत किंवा म्हातारं माणूस आटपेपर्यंत थांबायचं? आणि मग त्या दोघांनी वेळेत स्वतःचे घर घेतलेच समजा. तर मग जेव्हा आईवडीलांना गरज पडेल तेव्हा त्यांनी स्वतःच्या घरातही मन मारूनच रहायचे का?
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|