|
>>> घटनाकारांना हे माहीत नव्हते की या देशातील पुढारी इतकी खालची पातळी गाठतील. हेच क्रुत्य भाजपाचे सरकार वाचवायसाठी केले असते तर माढेकरांचा stand काय असणार? :-) सरकार वा सभापती भाजपाचे असोत वा कॉंग्रेसचे, माझा स्टॅंड तोच राहीला असता. माझ्या मते, सभापती व राज्यपाल हे कोणत्याही पक्षाचे न निवडता न्यायाधीश किंवा आय ए एस अधिकारी असावेत. तसेच एखाद्या आमदाराला बडतर्फ कराण्याचे किंवा त्याला मत देण्यापासून रोखण्याचे अधिकार फक्त न्यायालयाला असावेत. यामुळे पक्षपातीपणा निश्चितच कमी होईल. राज्यपाल हे पद प्रशासनासाठी निरूपयोगी आहे. किंबहुना राज्यपालांनी प्रशासनाला मदत करण्याऐवजी आपले पक्षपाती उपद्रवमूल्यच अनेक वेळा सिद्ध केले आहे. हे पद खरं तर कायमस्वरूपी रद्द केले तरी हरकत नाही.
|
Zakki
| |
| Monday, July 30, 2007 - 1:12 pm: |
| 
|
पण हे IAS अधिकारी तरी भ्रष्टपणा करून एखाद्या पक्षाच्या बाजूने निर्णय देणार नाहीत कशावरून? माणसाच्या वृत्तीचा भरोसा नाही हो! एकच मार्ग म्हणजे System of checks and balances , जशी अमेरिकेत आहे. पण त्याहि System मधे काय घोटाळे होतात हे माहितच आहे सर्वांना. जसे सध्या सगळे डेमोक्रॅट आपले रिपब्लिकन लोकांना काही ना काही कारणावरून गोत्यात आणायचे एव्हढेच करताहेत, देशापुढे किती प्रश्न आहेत, ते कसे सोडवायचे यात कुणालाच गम्य नाही!
|
>>> पण हे IAS अधिकारी तरी भ्रष्टपणा करून एखाद्या पक्षाच्या बाजूने निर्णय देणार नाहीत कशावरून? ही पण शक्यता आहेच. पण सत्ताधारी पक्षाचा सभापती हा नेहमी आपल्या पक्षाचाच स्वार्थ बघणार. IAS अधिकारी पक्षपाती नसण्याची शक्यता अशा सभापतीपेक्षा खूपच अधिक आहे. आणि मुख्य म्हणजे सभासदांना अपात्र ठरविणे, मतदान सत्ताधारी पक्षाच्या सोयीने घेणे असे त्रासदायक अधिकार सभापतीकडून काढून घेतले की पक्षपातीपणा पुष्कळच कमी होईल.
|
Slarti
| |
| Monday, July 30, 2007 - 3:09 pm: |
| 
|
IAS अधिकार्यांची स्वतःची काही राजकीय विचारसरणी असेलच आणि ते त्यानुसार एखाद्या पक्षाला झुकते माप देण्याची शक्यता आहेच. ते जर 'निष्पक्ष' असतील तर त्यांच्या निर्णयाचा अक्षरशः लिलाव होईल... जो पक्ष जास्त बोली लावेल त्याची बाजू घेतली जाईल. सांसदीय कामकाजात न्यायालयीन हस्तक्षेप किती पाहिजे ? लोकनियुक्त प्रतिनिधींना बडतर्फ करण्याचे अधिकार न्यायालयाला दिले तर लोकमताचा अनादर होतो; राज्यकारभारात लोकमतापेक्षा न्यायालय वरचढ असे होते.
|
Zakki
| |
| Monday, July 30, 2007 - 3:29 pm: |
| 
|
ते जर 'निष्पक्ष' असतील तर त्यांच्या निर्णयाचा अक्षरशः लिलाव होईल... जो पक्ष जास्त बोली लावेल त्याची बाजू घेतली जाईल. नाही हो, एव्हढे काही सगळे वाईट नसतील! निदान आशा तरी करू. खरे तर मागे एक मुद्दा मांडला होता की, जेंव्हा जनता एखाद्या पक्षाच्या उमेदवाराला निवडून देते, तेंव्हा अपेक्षा अशी की त्या पक्षाच्या तत्वप्रणालीने, त्यांच्या योजनेप्रमाणे देशाचे सर्व कारभार करावेत. त्या पक्षाला पुरेसे अधिकार दिले नाहीत तर ते साध्य होणार नाही. तसेच एकदा जनतेला पटवून दिल्यावर, संसदेत जेंव्हा एखादे 'बिल' मांडले जाते, ते सर्व जनतेच्या कल्याणासाठी कसे योग्य आहे, ते संसदेतील इतरांनाहि पटवून दिले पाहिजे. कोणताहि कायदा संसदेत चर्चिला जात असता, जनतेने त्याबद्दलची आपली मते स्पष्ट शब्दात संसदेच्या आपण निवडून दिलेल्या अधिकार्याला पोचवली पाहिजेत. याचा प्रत्यय नुकताच अमेरिकेत आला. प्रत्यक्ष प्रेसिडेंट व संसदेतील बहुमतवादी पक्ष यांनी जे immigration bill propose केले होते, ते लोकांनी पत्रे लिहून फेटाळून लावले! याला म्हणतात लोकशाही!
|
माढेकर साहेब, दाभोळकरान्च्या दिशेने एखादा दगड भिरकवल्याशिवाय अन्नप्राशन करणार नाही असा चातुर्मास धरला आहे का आपण? दिवा घ्या
|
माझ्यामते राज्यपाल, सभापती वगैरे लोकांनी स्वत्:हुन नि:ष्पक्षता दाखवली पाहिजे. पण सोनियाजींना सलामी दिल्यानंतर काहिहि केल तरी चालत अस कॉंग्रेसवाल्यांच मत बनत आहे आणि जितकी सोनियाभक्ती जास्त तितका मोबदला चांगला हे कळल्याने गल्लिबोळातिल नेत्यांपासुन राज्यपाल,राष्ट्रपतींपर्यंत सर्वांची जास्तित जास्त सोनियाभक्ती कोण करतो यात चढाओढ सुरु आहे.
|
Zakki
| |
| Monday, July 30, 2007 - 11:29 pm: |
| 
|
सगळ्या प्रॉजेक्ट्स मधे असेच असते हो. आधी अगदी डीटेलमधे प्रॉसेस ठरवतात, पण प्रत्यक्षात मनुष्य चुका करत असल्याने, पुरेसे ज्ञान नसल्याने प्रॉजेक्ट ला अडथळे येतात. तेंव्हा एकदम सगळी प्रॉसेस उलथि पालथि करण्यापूर्वी, लोकांचे ट्रेनिंग, त्यांना समजावणी देणे असे करून पहातात, नि ते जेंव्हा होते, त्यानंतर मग बघतात की प्रॉसेस सुधारायला पाहिजे का. इथेहि तेच. इतके सगळे लोक, एव्हढे स्वार्थी, नालायक नि अनैतिक असतील तर कुठलीहि प्रॉसेस कशी यशस्वी व्हावी?
|
कुलकर्णी, दाभोळकरांचा (आणि पर्यायाने तुमचा) पर्दाफाश केल्यामुळे तुमच्या अंगाची लाहीलाही झालेली दिसत आहे. निदान चातुर्मासात तरी खरं बोलायचं असा तुम्ही नेम धरा. खूप पुण्य लागेल.
|
दाभोळकरांचा (आणि पर्यायाने तुमचा) पर्दाफाश केल्यामुळे कुठे, शिशु शाखेवर? तेव्हा हिंदू धर्मात केवळ अपघाताने जन्माला आलेले तथाकथित मानवतावादी मुस्लीम द्वेष केल्याशिवाय तुम्ही खरे हिन्दु होणार नाही असे गीतेत कुठे लिहिले आहे का
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|