|
Chyayla
| |
| Sunday, July 22, 2007 - 5:26 am: |
| 
|
आमच्या गावाच्या बाहेर बन्या कुम्भाराच्या गाढवीला आम्ही राणी मुखर्जी म्हणतो, त्यामुळे पुरावा शोधायची गरज नाही विजय म्हणतात ते अगदी खर आहे आणी नैसर्गिक आहे.. ... मॉडस हे विषयाला धरुन लिहिणे सुरु आहे का? विचार करावा व असले पोस्ट माझ्याही पोस्टसोबत उडवावे ही विनन्ती. ते पुजार्याचा राहु देत बाजुला बाकी मग त्या अनिसला सोनिया आणी प्रतिभा पाटील कडे कधी पाठवताय?
|
कृपया खालिल लिंक वाचावी- http://www.indianexpress.com/sunday/story/206087.html नक्षलवादी म्हणजे फ़ार मोठा ताप होणार आहे आपल्या डोक्याला येत्या काही वर्षात. काश्मिर आणि नॉर्थ ईस्ट पेक्षाही जास्त धोकादायक आहेत त्यांचे हल्ले. सुरक्षाकर्म्यांचे मृत्यु(गेल्या ३ वर्षात)- नक्षलवाद्यांमुळे- ४०१ काश्मिरि दहशदवाद्यांमुळे- ३७० नॉर्थ्-ईस्ट्दहशदवाद्यांमुळे- १७६ सर्वसामान्य जनतेचे मृत्यु(गेल्या ३ वर्षात)- नक्षलवाद्यांमुळे- ११६३ काश्मिरि दहशदवाद्यांमुळे- ९८३ नॉर्थ्-ईस्ट दहशदवाद्यांमुळे- ८५० नक्षलवादी अथवा अतिरेक्यांचे मृत्यु(गेल्या ३ वर्षात)- नक्षलवादी- ५४९ कश्मिरि अतिरेकी- १५८० नॉर्थ ईस्ट अतिरेकी- ९१५
|
>>> ते पुजार्याचा राहु देत बाजुला बाकी मग त्या अनिसला सोनिया आणी प्रतिभा पाटील कडे कधी पाठवताय? प्रतिभा पाटलीणबाईंच्या अंधश्रद्धेबद्दल दाभोळकर आणि त्यांचे समर्थक एक चकार शब्द सुद्धा काढणार नाहीत. हेच जर एखाद्या भाजपच्या नेत्याने आत्म्याशी संभाषण केले असते तर दाभोळकर, लागू, तेंडुलकर, कुलकर्णी इं. नी आकाशपाताळ एक करून थयथयाट केला असता. या लोकांना भाजप आणि संघपरिवाराच्या डोळ्यातलं नसलेलं सुद्धा कुसळ दिसतं. पण कॉंग्रेस आणि तत्सम स्यूडोसेक्युलरांच्या दोनही डोळ्यात असलेली मुसळं मात्र अजिबात दिसत नाहीत. यालाच म्हणतात अंधश्रद्धा निर्मूलन! >>> त्या डुन्गरपुरच्या पुजार्याला येत्या शनिवारच्या रेस मध्ये कोणता घोडा जिन्कणार हे सान्गता येयील? किन्वा अन्नीस चे आव्हान स्विकारणे? त्यात काय विशेष, मी पण हे सांगू शकतो. तुम्ही १० लाख डॉलर माझ्याकडे अनामत म्हणून ठेवा म्हणजे मी कुठला घोडा जिंकेल ते सांगतो. मी सांगितलेला घोडा जिंकला तर तुमची अनामत रक्कम जप्त आणि नाही जिंकला तर सर्वच्या सर्व रक्कम तुम्हाला परत. बोला आहे तयारी आव्हान स्वीकारायची? अनिसचं कसलं आलंय आव्हान. ज्या लोकांची प्रतिभा पाटलीणबाईंच्या अंधश्रद्धेसमोर दातखीळ बसते ते काय आव्हान देणार कप्पाळ. आधी प्रतिभाबाईंच्या अंधश्रद्धेबद्दल निषेध व्यक्त करून त्यांना त्यांचा दावा सिद्ध करण्याचे आव्हान द्या आणि मग इतरांना आव्हान द्या.
|
महाराष्ट्राच्या ग्रामीण विशेषत्: आदिवासी भागात आतापर्यन्त नक्षलवादाचा प्रभाव जाणवत आहे. मात्र या ठिकाणी हेही लक्षात घेतले पाहिजे एका विशिष्ट आदिवासी भागतच त्याचा उद्रेक आहे. सातपुड्यातल्या आणि पश्चिम घाटातल्या आदिवासी भागात त्याचा उद्रेक जवळ जवळ नाहीच. १९९५ च्या सुमारास मात्र पश्चिमोत्तर महाराश्ट्रात (वायव्य)काही हालचाली दिसून आल्या होत्या.पण त्याना बळ मिळाले नाही.त्याची आर्थिक आणि राजकीय कारणे वेगळी आहेत. मात्र नजीकच्या भविष्यात पश्चिम महाराष्ट्राच्या शहरी भागात नक्षलवादी चळवळ फोफावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मग मात्र मोठाच अनवस्था प्रसंग ओढवण्याची शक्यता आहे. यापूर्वी एक मोठा सामाजिक तणाव अत्यन्त विकृत पद्धतीने कन्व्हर्ट झाला. म्हणजे बघा, पूर्वी गुन्हेगारी विश्वात बहुसंख्या मुसलमानांची असे. गेल्या वीस वर्षात अन्डरवर्ल्ड मध्ये महाराष्ट्रीय, मराठी नावे अधिक दिसू लागली आहेत. कारण काय? (आता तर त्यात उत्तर भारतीय नावे दिसू लागली आहेत नव्हे स्थिरावली आहेत.) त्याचे कारण म्हनजे सामन्तांच्या संपामुळे उद्ध्वस्त झालेल्या गिरणी कामगारांची मुले व त्यांची बेकारी. नवी मुम्बै आणि थळ वायशेत सिडको यांनी भूमीहीन झालेली मंडली सध्या काय करतात याची कोणाला कल्पना आहे का? मुम्बईच्या आसपास वाळू आणि खडीचे रॅकेट किती भयानक आहे याची कल्पना आहे का? त्यात किती खून होतात? यातून निर्माण होणारा कच्चा माल अन्डरवर्ल्डला आयताच मिळतो आहे. आता पुढचा नम्बर आहे सेझ उर्फ स्पेशल इकॉनॉमिक झोन मुळे निर्मान होणार्या स्थितीचा. सह्याद्रीतील प्रत्येक मोठ्या धरणाखाली कोकणात सेझ येतेय. उदारीकरणाचे भविष्यकालीन परिणाम भयंकर आहेत. शेतकर्याना इच्छा नसताना सेझला जमिनी द्याव्या लागत आहेत. कारण बेल्ट पद्धतीने सम्पादन चालू आहे. इस्ट इंडिया कम्पनी व्यापारासाठीच भारतात आली होती याची आठवण ठेवणे गरजेचे आहे. नवे 'इन्ग्रज' भारताच्या दारात उभे आहेत. त्यातून निर्माण होणारे तणाव भयावह असणार आहेत... नक्षल चळवळ ही अर्थव्यवहारच्या बाजूबाजूनेच वाढत असते. यावर कोणी काही अभ्यासपूर्ण मत देऊ शकेल काय?
|
रॉबीनहूड, तुम्ही जे लिहिले त्यात बरेचसे तथ्य आहे. उदारीकरणाचे फायदे ज्यांना अजिबात मिळालेले नाहीत, त्यातले काही जण नक्षलवादाकडे वळण्याची शक्यता नाकारता येईलच असे नाही. तुम्ही दिलेल्या सर्व उदाहरणांवरून एक वस्तुस्थिती स्पष्टपणे दृगोच्चर होते. ती म्हणजे, आर्थिक परिस्थिती आणि घरात खाणारी तोंडे यांचा अत्यंत घनिष्ठ संबंध आहे. घरात जेवढी मुले जास्त तेवढी घराची आर्थिक स्थिती कमकुवत. गंमत म्हणजे जे आर्थिकदृष्ट्या सधन आहेत आणि ज्यांना जास्त मुले परवडू शकतील, तेच कुटुंबसंख्या मर्यादित ठेवताना आढळतात. याऊलट ज्यांची आर्थिक परिस्थिती वाईट आहे व ज्यांना एक मूलसुद्धा जेमतेम परवडू शकेल, ते मात्र अनेक मुलांना जन्म देताना आढळतात. यात धार्मिक आणि सामाजिक अज्ञानाचा सिंहाचा वाटा आहे. मुलगाच हवा या इच्छेने मुलगा होईपर्यंत अनेक मुलींना जन्म दिला जातो. तसेच आपल्या धर्माची लोकसंख्या जास्तीत जास्त वाढवून आज ना भविष्यात आपल्या धर्माची मेजॉरिटी होईल आणि मग आपणच जगाचे राजे या मूलतत्ववादी शिक्षणामुळे असंख्य मुलांना जन्म दिला जातो. या दोनही समजूतींचे अज्ञान सारखेच घातक आहे. अनेक मुलांना जन्म दिल्यामुळे कुठल्याच मुलाचे व्यवस्थित संगोपन करता येत नाही. वर्तमान आणि भविष्यकाळात शारिरीक श्रमाला फारशी मागणी राहिलेली नसेल. त्याऐवजी बौध्दिक श्रमाचे जास्त मूल्य असेल. बाजारात मागणी असलेली कौशल्ये तुमच्याजवळ नसतील तर बाजारात तुम्हाला अजिबात टिकाव धरता येणार नाही. अशा परिस्थितीत आपल्याकडे जे नाही आणि जे सरळ मार्गाने मिळत नाही, ते दुसर्याकडून हिसकावून घेणे हा एकच मार्ग शिल्ल्क राहिलेला असेल. नक्षलवाद हे बळजबरीने हिसकावून घेण्याचेच एक स्वरूप आहे. हे टाळायचे असेल तर धर्म, जात इं चा विचार न करता सरसकट सर्वांवर कुटूंबनियोजनाची सक्ती करणे आवश्यक आहे. जनतेला जर आपले बरेवाईट कळत नसेअल तर राज्यकर्त्यांनी चांगल्या गोष्टींची सक्ती करणे आवश्यक आहे. तसे झाले नाही तर नक्षलवाद व अंतर्गत यादवीच्या झळीत जनतेबरोबरच राज्यकर्तेही त्यात भस्म होतील. सध्याच्या एकाही राजकीय पक्षात हे करण्याचे धैर्य आणि इच्छाशक्ती नाही.
|
नक्षलवादी चळवळीचे मुळ कारण आता नाहीसे झाले आहे. आता ते फक्त दरोडेखोर आहेत बाकी काही नाही. अदिवासींच्यां नावाखाली चालनारा मार्क्सवाद्यांचा नाच म्हणजे नक्षलवाद. छत्तीसगड मध्येतर नक्षलवादी संघटनेला तोंड देनारी प्रति संघटना पण बांधन्यात आली आहे, जे गावकर्यांचे नक्षलवाद्यांपासुन रक्षन करतात. ह्या तुनच ती चळवळ आता कोठे गेली आहे हे समजुन येते. माओवाद्यांनी नेपाळ मध्ये जसे जनतेसमोर मत मागीतले तसे काहीही न करता सामान्यजनतेला नागविने म्हणजे नक्षलवाद. त्यांनी त्यांचाच भावा कडुन (नेपाळी माओवाद) काही शिकायला पाहीजे. बिडी कामगारांचे ( वा एकुनच अदिवासींचे) शोशन का एक मोठी मुद्दा नक्षलवादी सांगतात व स्वतच त्यांचे शोषन करतात ही कसली आली क्रांती. लग्नाचा वर्हाडाला लुटने हे चंद्रपुर, गोंदीया, किनवट ह्या भागात तर कॉमन आहे, पैसे हवे असतील तर सामान्य जनतेला लुटा हे बहूतेक माओवाद शिकवतो. नक्षलवाद्यांकडे रॉकेट्स वैगरे आहेत. कोठुन मिळत असेल हे सारे. गावातील जनतेला पकडुन जंगल तोडुन त्यात रस्ते बनविले जातात, त्यांचा साथीदाराला पकडले तर तुरुंगावर हल्ला केला जातो. असा आहे नक्षलवाद. त्यांचा मागन्या मात्र कळाय्ला वाव नाही. इस्ट इंडिया कम्पनी व्यापारासाठीच भारतात आली होती याची आठवण ठेवणे गरजेचे आहे. नवे 'इन्ग्रज' भारताच्या दारात उभे आहेत. त्यातून निर्माण होणारे तणाव भयावह असणार आहेत... >>>> Agreed.पण हे झालेच असते. कम्युनिझम स्विकारला असता तर उशीरा झाले असते, ग्लोबलायझेन मध्ये हे होनारच. जर bmw चालवायची तर त्याला निर्मान करनारा प्लांट चालु करने भाग पडनारच. सेझ मध्ये जानारी सर्व जमीन ही पाण्याखालची नसेल. कोरडवाहु जमीन असेल तर नक्कीच शेतकर्यांना नोकरीचा जास्त फायदा होईल. (पण त्या साठी आपल्या सरकारने ज्याची जमीन गेली त्याला नोकरी मिळेल ही हमी न देता तसे कागदोपत्री दिली पाहीजे. जे सध्या अशक्य वाटते). नक्षल चळवळ (मुळ) ही आर्थीक विषमतेवर आधारीत आहे, त्यावरच ती मुळे धरनार पण आजची जी चळवळ आहे ती चळवळ नसुन दडपशाही आहे. कम्युनिझम मध्ये पण गरिबी ही असतेच. तशीच ती भांडवलशाही मध्ये पण असनार. उलट भांडवल शाही मुळे भारताला सर्वांगीन विकासाची संधी प्राप्त झाली आहे. सर्व जगाकडे नजर टाकली तर असे दिसुन येते की माओवाद हा एक फसलेला वाद आहे. त्याला फॉलो करनारे कुठलेही राश्ट्र आज वर नाही. चिनही नाही कारण चिन पुर्न माओवादी नाही. लालभाईंच मत वाचायला आवडले असते.
|
मुळात मार्क्सवादी विचारसरणीशी नक्शलवादी विचारसरणी जुळत नाही. नक्शल्यांचा एम. एल. ग्रुप आहे. भारतातल्या मार्क्सिस्टानी लोकशाही चौकट स्वीकारली आहे. नक्शल्यानी नाही. या नक्शल चळवळीबद्दल एका मार्क्सवादी आमदाराशी चर्चा करण्याचा योग आला. योग म्हणण्यापेक्षा ती करावी लागली. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की आमचा त्यांचा काही संबंध नाही. किम्बहुना ते आमचे विरोधकच आहेत. आम्ही निवडणुका लढवतो. रीतसर निवडून येतो अन प्रसंगी पराभवही स्वीकारतो. माझ्या एरीयात ते जर येऊन काम करणार असतील तर मी गेली ४० वर्षे काय करतोय? ते माझ्या मतदार संघात रुजणार नाहीत. तसेच झाले अर्थात. त्यामुळे मार्क्सवाद्यांची आणि नक्षल्यांची एकत्र मोळी बांधता येणार नाही.. चीननेही पोथीनिष्ठ कम्युनिझमचा कधीच त्याग केला आहे.(मात्र चीन जेवढा जगाच्या मेनस्ट्रीम मध्ये येईल तेवढा तो आर्थिक दृष्ट्या आपल्याला मार देईल असे मला वाटते.) नक्शल चळवळही पोथीनिष्ठ राहिली नाही. चारु मुझुमदार आणि हल्लीच्या नक्शल्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. मुळात नक्शल्यांचे बीजारोपण हे तिथल्या पोलिटिकल नेतृत्वाचे अपयश आहे. सरकारी यंत्रनेचे तर फार मोठे! मुळात दुर्लक्शित केल्याचा लोकाना फार राग येतो. पंजाबात अतिरेकाचे थैमान चालू असताना आमच्याकडे एक सांस्कृतिक गट आला होता. त्यात एक सरदार अधिकारी होता त्याच्याशी चर्चा करताना त्याने एक खन्त बोलून दाखवली आम्ही निवडून दिलेली popular governments तुम्ही पुन्हा पुन्हा बरखास्त करीत राहीलात तर अलगतेची भावना निर्माण होणारच. त्यावेळी इन्दिरा गांधीनी तसे केले होते. त्या चुकीच्या राजकारणाची परिणिती पुढे कशात झाली तो तर इतिहास आहे. पूर्वोत्तर राज्यातील लोकाना आपलेपण वाटावा असे भारत सरकारने काय केले आहे. तिथे काय चालू असते त्याचा उर्वरीत भारतातल्या लोकाना माहीतही नसते. आमचे एक मित्र पुण्यात एका राष्ट्रीयीकृत बॅंकेत आहेत. त्यांच्याकडे एकदा खाते उघडण्यासाठी काही चपट्या चेहर्याची, बसक्या गालाची,मिचमिच्या डोळ्याची माणसे आली आणि त्यानी सांगितले' we want to open an account with ur bank. OK Please show ur passport visa etc.-- manager. Ohh, we are Manipuris. We are Indians! म्हणजे आपल्याच देशातल्या लोकाना आपण ओळखत नाही आणि त्याना आम्ही भारतीय आहोत असे आवर्जून सांगावे लागते. अर्थात हा गमतीचा भाग झाला. मुळात आर्थिक दरी पडायला सुरुवात झाली की नक्षल्याना बी पेरणी करायला सोपे जाते.जसे समाजातल्या काही लोकांचे प्रश्न प्रस्थापित व्यवस्था सोडवू शकली नाही म्हणून मिशनर्यांचे फावले! प्रश्न प्रतिष्ठेचेही नव्हते. प्रश्न पोटाचेच होते. तिकडे जाउन सुटले की नाही तो भाग वेगळा. तात्पर्य, बहुसंख्येचे पोटाचे प्रश्न निर्माण होऊ नयेत. उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या नावाखाली मासा देऊन गळ काढून घेण्याचा प्रकार झाल्यास फार महागात पडेल!
|
रॉबिन तुमचे म्हणने पटले पण उदारिकरणाला दुसरा option आहे का??म्हणजे ग्लोबलायज़ेशन वगैरे न करता विकास साधला जाउ शकतो का??यावर तुमचे काय मत आहे?? तुम्ही लिहिलय -"मुळात नक्शल्यांचे बीजारोपण हे तिथल्या पोलिटिकल नेतृत्वाचे अपयश आहे. सरकारी यंत्रनेचे तर फार मोठे! मुळात दुर्लक्शित केल्याचा लोकाना फार राग येतो." हेच मी मागे लिहिल होत तेंव्हा तुम्ही भाकरी का स्वातंत्र्य असे उदाहरण दिले होते हे आठवतय ना??कारण त्या वेळि जनतेकडे दुर्लक्ष होणारच असे तुमचे थोडेसे मत होते. नॉर्थ ईस्टकडे आपण लक्ष दिलेले नाही हे बरोबर आहे. मणीपुरी दिसतात चिनी लोकांसारखे त्यामुळे त्यांना पासपोर्ट मागितल्यात काही गैर नाही. आमच्या एका मणीपुरी मित्राला चीनी माणसानी पासपोर्ट मागितला आणि तो बघितल्यावरच तो चीनी नाही यावर विश्वास त्याने ठेवला. नक्षलवाद्यांना कसे थांबवता येईल ????
|
Dhumketu
| |
| Tuesday, July 24, 2007 - 4:41 am: |
| 
|
आता नक्षलवादी चळवळ पुण्यासारख्या शहरात चालावायची वेळ आली आहे.. शहरी भागाकडेही दुर्लक्ष होऊ लागले आहे राजकारण्याचे.. हे सर्व मला bombay to goa सिनेमा मधील खादाड मुलगा होता तसे वाटते.. दिसले अन्न कि ओरबाड आणी खा.. त्याचा हॉटेल मधला सीन आताच्या राजकारण्याना चपलख बसतो..
|
नक्षलवादी चळवळीचे मुळ कारण आता नाहीसे झाले आहे. आता ते फक्त दरोडेखोर आहेत बाकी काही नाही. अदिवासींच्यां नावाखाली चालनारा मार्क्सवाद्यांचा नाच म्हणजे नक्षलवाद. >>> हे केदार जोशींचे विधान आहे. आणि ते बरोबरही आहे बरेचसे. नक्षलाईट हे पोथीनिष्ठ मार्क्सवादी नाहीत. त्यात लुटारू नक्कीच घुसले आहेत. चन्द्रपुरात तेन्दुपत्ता, कोल माईन्स, भ्रष्ट अधिकारी, पेपर मिलवाले यांच्या कडून खंडण्या वसूल करण्याचे कार्य आम्ही नक्षली आहोत या नावाखाली चालू आहे. तसे आम्ही दाऊदची माणसे आहोत असे सांगून खंडण्या बसूल करणारे आहेत इकडे. प्रत्यक्ष दाऊदचा अन त्यांचा संबंधही नसतो. तसेच. पन्जाबात अतिरेकी कारवाया चालू असताना घरगुती भांडणातून होणार्या हल्ल्यानाही दहशतवादी कारवाया म्हणून नाव दिले जाई. अथवा असे खाजगी खून अतिरेक्यानी केलेल्या हत्त्या भासविल्या जात. मुळात नक्शल प्रश्न केवळ कायदा आणि सुव्यवस्थेचा आहे की socio economical प्रश्न आहे याबाबत ठरवावे लागेल. only law and order problem सरकार आणि पोलीसही मानत नाहीत. त्यामुळे काही आर्थिक packages दिली आहेत. त्यामुळे फरक होतो पण दुकान बन्द होइल या भीतीने नक्शली पुन्हा आक्रमक होतात. मुळात वन आणि पोलीस खात्याच्या अत्याचारामुळे लोक दूर जातात अन त्याना नक्षली जवळ करतात असा अनुभव आहे. कॉन्क्रीटचे किमयागार या पुस्तकात उषा ताम्बे यानी एका उप अभियंत्याने नक्षल्यांशी चर्चा करून जीव धोक्यात घालून त्यांच्या एरियात रस्ता कसा बांधला याची कथा मुळातूनच वाचण्यासारखी आहे. असे समन्वयाचे प्रकार झाले पाहिजेत. वायव्य महाराष्ट्रात ही चळवळ रुजणार नाही हे आमच्या एका जिल्हाधिकार्याचे मत अगदी अचूक ठरले. त्यांचे म्हणणे होते की येथे ठेकेदार नाहीत अन पैसेही नाहीत अन खंडणीही नाही. आर्थिक उलाढाल नसल्याने लुटणार कोणाला? मात्र SEZ मध्ये हा प्रश्न निर्माण होऊ शकतो. कारण जमिनीचे पैसे कितीही मिळाले तरी रहात नाहीत व जमीन अन पैसे दोन्ही सम्पलेली माणसे अशा जाळ्यात सापडतात. आपण विकलेल्या जुन्या वाड्याच्या जागेवर पंचतारांकित हॉटेल उभे राहिल्यावर काय वाटते,पैसे मिळाले असले तरी, हे अनुभवल्याशिवाय कळणार नाही. amby valley मध्ये मूळ जमीनमालकाना पहायला सुद्धा बन्दी आहे! SEZ मध्ये किती सर्वपक्षीय पुढार्यांची पार्टनरशिप आही हा शोध घेण्याचा विषय आहे.. ND Patil हे काही कम्युनिस्ट पुढारी नव्हेत. त्यांची स्टेटमेन्ट्स अभ्यासण्यासारखी आहेत... }नक्षलवाद्यांना कसे थांबवता येईल ???? >>>> चिन्याचा हा खरा कळीचा प्रश्न आहे. एक नक्की, त्याना शिव्या देऊन समाधान मिळेल पण प्रश्न तिथेच राहील... आपला मुलगा वाईट संगतीला लागला याचे कारण घरातच नाहीना याचा प्रथन शोध घेतला पाहीजे...
|
Chyayla
| |
| Tuesday, July 24, 2007 - 5:42 am: |
| 
|
त्यात लुटारू नक्कीच घुसले आहेत. चन्द्रपुरात तेन्दुपत्ता, कोल माईन्स, भ्रष्ट अधिकारी, पेपर मिलवाले यांच्या कडून खंडण्या वसूल करण्याचे कार्य आम्ही नक्षली आहोत या नावाखाली चालू आहे रॉबीनहुड हा तुमचा मुद्दा बरोबर आहे काही लुटारु नक्षलवादी म्हणवुन घेतल्याने जणु त्याना एक प्रकारचे लुटण्याचे लायसन, कुठेतरी सामाजीक अन्याय होतो त्याचा प्रतिकार अशा प्रकारे बघण्याचा दृष्टीकोन होतो त्यातुन मग थोडीतरी सहानुभुती मिळवण्यास सोपे जाते. खर म्हणजे अशा दरोडेखोराना दरोडेखोरच समजले पाहीजे त्याला नक्षलवादी म्हणुन काही मुभा, सवलती द्यायची आवश्यकता नाही. पण राजकारण आणी भ्रष्ट शासनव्यवस्थेमधे हे कितपट शक्य आहे कुणास ठाउक. रॉबीन तुम्ही म्हणता की मार्क्सवाद आणी नक्षलवाद वेगळा आहे पण दोघांच तत्वज्ञान एकच आहे तो म्हणजे वर्गसंघर्ष फ़क्त तो संघर्श कुठे शस्त्राने तर जीथे शस्त्र चालत नाही तिथे प्रथम कायद्याच्या चौकटीत राहुन करण्याचा प्रयत्न आणी यशस्वी झाले की मग शस्त्रही घ्यायला त्यांची हरकत नसते त्यामुळे मार्क्सवाद, कम्युनिजम याची पुढची पायरी आणी कट्टर व्याव्हारीक बाजु म्हणजे नक्षलवाद किंवा तत्सम हिंसक चळवळ असा आजवरचा अनुभव. Socio Economic कारणामुळे जर नक्षलवाद आहे म्हटले तर त्याला दुर करण्यासाठी हा कोणता प्रकार आहे? थोडा विचार केला की खरे नक्षलवादी काय करतात तर सरकारी यंत्रणा, मालमत्ता, कायदा यांचा धिकार करुन त्याविरुद्ध शस्त्र हाती घेतात मग रेल्वे, पोलिस यांचे नुकसान, रस्ते आणी ईतर विकासात्मक कामे होउ द्यायची नाहीत कारण त्यामुळे सरकारी यंत्रणा पोलिस लवकर पोहोचतील आणी नक्षल्यांच्या दुकानदारीला धोका निर्माण होइल ही भीती. पण जर कधी समजा नक्षलवाद या प्रकाराने यशस्वी झाला म्हटले तर पुढे काय? याच उत्तर त्यांच्याकडेही नाही त्यान्नी स्वता:चे सरकारही बनवले तर मग लढणार कोणाविरुद्ध? म्हणजे क्रांती-प्रतिक्रांती हा प्रकार आलाच. खैर हा सगळा विचार नक्षलवाद्यानीच करणे गरजेचे आहे. आता खरच प्रश्न येतो की यावर उपाय काय? उपाय एकच तो म्हणजे त्या भागाचा आर्थिक्-सामाजिक विकास. आता तो कसा करायचा यावर चर्चा आणी उपाय व्हावयास हवा. तुमच्या पोस्ट मधुन त्यातल्या अडचणी कळल्यात.
|
नक्षलवादी इतिहासाचा पुर्ण आढावा इथे वाचा- http://www.hindustantimes.com/StoryPage/StoryPage.aspx?id=0b41af48-1ca9-49a1-b064-24843790d6e4&ParentID=a5d3fd46-0c94-448a-99c4-c2f774a625ee&&Headline=History+of+Naxalism
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|