Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 22, 2007

Hitguj » Views and Comments » Current Affairs » बातम्यांचे / लेखांचे संकलन » Political » Archive through July 22, 2007 « Previous Next »

Satishmadhekar
Friday, July 20, 2007 - 5:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> दाभोळकरान्ना विरोध करणारे आणी मुस्लीम धर्मात सुधारणान्चा विषय निघताच इस्लाम खतरेमे अश्या आरोळ्या ठोकणारे यान्त काहीही फरक नाही.

आहे. थोडासा का होईना पण फरक आहे. दाभोळकरांना विरोध करणारे त्यांच्या पक्षपाती वागण्याला अहिंसक आणि लोकशाही मार्गाने विरोध करतात. तर इस्लाम खतरेमे अशा आरोळ्या ठोकणारे थेट बंदुका आणि बॉम्ब घेऊन येतात आणि आपल्या विरोधकांचा खात्मा करतात.

हा फरक लोअर केजीतल्या छोट्या बाळाला सुद्धा समजेल.


Robeenhood
Friday, July 20, 2007 - 5:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्या दाभोलकरच्या आयला******** ह्या नर्‍या दाभोलकरच्या आय फ़ुल्या फ़ुल्या फ़ुल्या आणी
असंख्य फ़ुल्या
>>>>>>
फुल्या फुल्या टाकण्याचे काहीच कारण नाही. काय वास्तव शब्द आहेत ते टाकायला काहीही हरकत नाही. मॉडरेटर वगैरे मंडळी कोणी इकडे येणार नाही. आणि त्याना घाबरण्याचेही कारण नाही, तेव्हा स्पष्टपणे बोला, लिहा. आडपडदा नको.

परदा नही जब कोइ खुदा से, बंदोंसे परदा करना क्या?


Zakki
Friday, July 20, 2007 - 5:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सहावी ड मधल्या विद्यार्थ्याला सुद्धा समजेल.

सहावी ड मधील विद्यार्थ्यांचा असा अपमान आम्ही खपवून घेणार नाही.

आम्ही आजच (नमाज़ पढून झाल्यावर,) इथे बाँब टाकून आमचा निषेध व्यक्त करू. शिवाय आणखी तीन चार ठिकाणी हि जाळपोळ, हिंसाचार लुटालूट करू.


आम्ही काही फॅसिस्ट नाही, नुसत्या धमक्या द्यायला! वाट्या काय तुमको?


Satishmadhekar
Friday, July 20, 2007 - 5:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> आम्ही काही फॅसिस्ट नाही, नुसत्या धमक्या द्यायला! वाट्या काय तुमको?

पण आम्ही फॅसिस्ट आहोत ना. म्हणून आमच्या तालिबानी स्वभावाला अनुसरून आम्ही 'लोकसत्ता' आणि 'लोकमत' मध्ये वाचकांच्या पत्रव्यवहारात पत्र लिहू.

Zakki
Friday, July 20, 2007 - 6:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो माढेकर नि कुळकर्णी, ती सती ची काय भानगड आहे? विहिं प. ने असे म्हंटले का, की आजपासून नवरा मेला की सगळ्या बायकांनी सती गेलेच पाहिजे, नि नाही गेल्या तर आम्ही त्यांना काही सौम्य शिक्षा करू. जसे, खड्ड्यात बसवून त्यांच्यावर त्या मरेस्तवर दगड फेकू किंवा त्यांचा हात किंवा पायच कापून टाकू, किंवा सूड म्हणून त्यांच्या मुलीबहिणींवर बलात्कार करू, वगैरे.

मुसलमान लोकांच्या धर्मात असे असते, आपल्या धर्मात का नको? म्हणजे आपल्या अंधश्रद्धांपेक्षा हे बरे, काय?


Deshi
Friday, July 20, 2007 - 6:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुळ्कर्नींची एक गोष्ट मात्र घ्यायला पाहीजे. त्यांना फक्त सति, अंधश्रध्दा वैगरे गोष्टींवर रान पेटवायला आवडते, प्रश्न विचारले की ते कधी उत्तर मात्र देत नाहीत. परत एखादी नविन बातमी चिटकवुन देतात. (जसे काही सर्व्च जन डॉक्टर कडे न जाता मांत्रीका कडे जातात). कॉंग्रेस चा परिनाम आहे का कुळकर्नी.

Vijaykulkarni
Friday, July 20, 2007 - 11:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाभोळकरान्च्या कार्यामुळे आपली दुकाने बन्द पडतील अशी भिति ज्याना वाटते तेच दाभोळ्कराना विरोध करतात.
आणी हो, अन्धश्रद्धा निर्मुलनाबरोबर व्यसन्मुक्तीचे सुद्धा काम करतात दाभोळकर.
तिकडे लक्श द्यायला तुम्हाल वेळ कुठे आहे म्हणा, तुमचे लक्श मुसल्मानान्च्या चार बायकान्वर! चावट कुठले



Satishmadhekar
Saturday, July 21, 2007 - 8:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> दाभोळकरान्च्या कार्यामुळे आपली दुकाने बन्द पडतील अशी भिति ज्याना वाटते तेच दाभोळ्कराना विरोध करतात.

दाभोळकरांनी कितीही कंठशोष केला तरी त्यांचा माल अजिबात खपत नाही. मुळात त्यांचा मालच हलक्या दर्जाचा आणि त्यातून स्वतः दुकानदारच बनेल. मग त्यांचा माल खपेल तरी कसा? अर्थात तुमच्यासारखी त्यांची काही जुनी गिर्‍हाइकं अजून त्यांचाच सडका माल वापरतात.

>>> आणी हो, अन्धश्रद्धा निर्मुलनाबरोबर व्यसन्मुक्तीचे सुद्धा काम करतात दाभोळकर.

कमाल आहे बुवा! एवढं सगळं करायला त्यांना वेळ मिळतो तरी कुठून. माझी अशी समजूत होती की त्यांचा सगळा वेळ हिंदूंच्या नावानं बोटं मोडण्यात आणि मुसलमानांच्या दाढ्या कुरवाळण्यात जातो.


Satishmadhekar
Saturday, July 21, 2007 - 9:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> अहो माढेकर नि कुळकर्णी, ती सती ची काय भानगड आहे?

भानगड वगैरे काही नाही. कुलकर्णी निधर्मी आणि पुरोगामी आहेत. म्हणून त्यांना अफजल गुरूसारख्या बिचार्‍या निष्पाप मुस्लीमांचा कळवळा येतो आणि त्यांचा हिंदू संघटनांवर अतिशय राग आहे. म्हणून ते गाडलेले मुडदे उकरून काढतात आणि हिंदू संघटनांच्या नावाने खोटे आरोप करून शिव्याशाप देतात.

Vijaykulkarni
Saturday, July 21, 2007 - 11:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी अशी समजूत होती की त्यांचा सगळा वेळ हिंदूंच्या नावानं बोटं मोडण्यात आणि मुसलमानांच्या दाढ्या कुरवाळण्यात जातो.

आपल्या अशा अनेक चुकीच्या समजूती बदलायला हव्यात.
शिशु शाखेशिवाय इतर ठिकाणे ही आहेत माहिती मिळविण्याची :-)

मुस्लीमान्वर आपला एवढा राग का?
एखाद्या मुस्लीम मुलीने प्रेमभन्ग केला का?
एका सीकेपी मुलीमुळे मी बारावीत नापास झालो. पण म्हणून सर्व सीकेपी लोकान्चा द्वेश करीत नही.



http://en.wikipedia.org/wiki/Narendra_Dabholkar


Santu
Saturday, July 21, 2007 - 2:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो रॉबिन
फ़ुल्या टाकल्या तरी पोस्ट उडवलेच बघा.
पन तुम्हि परत आमच्या फ़ुल्या लिहिल्या तेवढे ठेवले.
असो या निमित्तने तरी तुम्हि आम्हाला जिवदान दिले तर.



Santu
Saturday, July 21, 2007 - 2:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

post edited by moderator

Santu
Saturday, July 21, 2007 - 2:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

post edited by moderator.
Santu this is warning to refreain from posting abusive language. This is a discussion forum.

Satishmadhekar
Saturday, July 21, 2007 - 3:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अपेक्षेप्रमाणेच प्रतिभा पाटील जिंकल्या. तुम्ही राष्ट्रपती होणार हे एका मृतात्म्याने त्यांना आधीच संगितले होते. शेवटी मृतात्म्याची भविष्यवाणी खरी ठरली. मृतात्म्यांना अस्तित्व असते आणि ते जिवंत व्यक्तींशी संवाद साधून भविष्यात घडणार्‍या घटनांची पूर्वसूचना देतात हे सुद्धा या निमित्ताने सिद्ध झाले.

विशेष म्हणजे एखाद्या भाजपवाल्याने असे सांगितले असते तर अनिसवाले, निधर्मी, पुरोगामी, बुद्धीवादी, समाजवादी आणि साम्यवादी त्याच्यावर तुटून पडले असते आणि "प्रतिगामी", "अंधश्रद्धाळू", "सरंजामशाहीवादी", "जातीयवादी" अशा शेलक्या विशेषणांनी त्याचा उद्धार केला असता. पण प्रतिभा पाटील या एका निधर्मी आणि बुद्धीवादी पक्षाच्या प्रतिनिधी. साम्यवादी, समाजवादी, बुद्धीवादी अशा सगळ्या पुरोगाम्यांचा त्यांना पाठिंबा. त्यामुळे त्या सगळ्यांची आता अळीमिळी गुपचिळी.

पण निदान अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष श्री श्री नरेंद्रजी दाभोळकर आणि अनिसचे समर्थक तरी प्रतिभा पाटलांच्या विरोधात बोलतील असे वाटले होते. पण त्यांच्या पक्षाच्या विजयामुळे मृतात्म्यांचे अस्तित्व आणि मृतात्मे जिवंत व्यक्तींशी संभाषण करतात हे त्यांनी सुद्धा मान्य केलेले दिसते.

एका अर्थाने हा अनिसवाल्यांचा विजय आहे आणि पराभव सुद्धा आहे. त्यांच्या पक्षाचा राष्ट्रपती निवडून आला पण राष्ट्रपती अंधश्रद्धाळू निघाल्या.

पंतप्रधानपदापाठोपाठ राष्ट्रपतीपदावर देखील आपले बुजगावणे बसविण्यात ऍंटोनिओ माईनोंना यश मिळाले आहे.


Satishmadhekar
Saturday, July 21, 2007 - 3:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> आपल्या अशा अनेक चुकीच्या समजूती बदलायला हव्यात.
शिशु शाखेशिवाय इतर ठिकाणे ही आहेत माहिती मिळविण्याची

तुम्ही कुठून माहिती मिळवता? अनिसच्या पाळणाघरातूनच असणार. बाकी काही म्हणा, अनिसवाल्यांच्या बुद्धीची झेप एकंदरीत शिशुशाखेच्या पलीकडे गेलेली दिसत नाही. :-( दिवे घ्या.

Chyayla
Saturday, July 21, 2007 - 8:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डुन्गरपुरच्या पुजार्याने प्रतिभा पाटील यांच्याबाबतित केलेली भविष्यवाणी खरी ठरली त्या राजस्थानमधे राज्यपाल म्हणुन गेल्या तेन्व्हा डुंगरपुरला दर्शनाला गेल्या असताना तिथल्या पुजार्याने हे भाकित केले होते ही बातमी देवीसिंग शेखावत यान्नी जेन्व्हा प्रतिभा पाटील यांचा राष्ट्रपतीपदासाठी त्यांच्या नावाचा काही मागमुसही नव्हता अशा वेळेस दीली होती, आता तर सोनिया गांधीही भेटुन आल्यात म्हणे.

आता या बाबतित अनिस, दाभोळकर, ज्योतिश्य, भारतिय शास्त्र हे थोतान्ड वैगेरे म्हणणारे काय म्हणतात बघु या..

ही घ्या सविस्तर बातमी..
application/pdf
DungarapurPredictionCame True.pdf (29.4 k)


Sunilt
Saturday, July 21, 2007 - 10:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाभोळकरांनी कितीही कंठशोष केला तरी त्यांचा माल अजिबात खपत नाही. मुळात त्यांचा मालच हलक्या दर्जाचा आणि त्यातून स्वतः दुकानदारच बनेल. मग त्यांचा माल खपेल तरी कसा? अर्थात तुमच्यासारखी त्यांची काही जुनी गिर्‍हाइकं अजून त्यांचाच सडका माल वापरतात.

दाभोळकर आणि अनिस जर एवढी क्षूद्र असेल तर सोडून ध्या की. त्यांच्याविरुद्ध एवढी आगपाखड करण्याचे प्रयोजनच काय?

खरी गोष्ट अशी आहे की, मुसलमान जेवढे धर्मवेडे आहेत तेवढे हिंदू नाहीत ही खंत हिंदुत्ववाद्यांना आहे. आणि त्याला सेक्युलर हिंदू, अनिस इ कारणीभूत आहेत अशी त्यांची समजूत आहे. त्या डॅनीश व्यंगचित्रकाराविरुद्ध जगभरच्या मुसलमानांनी निदर्शने केली आणि आमचे शंकराचार्य अटकेत गेले तेव्हा दोन्-चार फुटकळ मोर्चे वगळता काही घडले नाही, याचे वैषम्य त्यांना वाटते.

पण, वस्तुस्थिती अशी आहे की, एक देव, एक प्रेषित आणि एक ग्रंथ ह्या पठडीतील धर्मांपेक्षा हिंदू धर्म फारच वेगळा आहे. बराचसा विस्कळीतदेखील आहे. त्यामुळेच सगळ्या हिंदूंना एकाच साच्यात बसविणे कदापीही शक्य नाही हे त्यांच्या लक्षात येत नाही. आणि मग ते अनिस, सेक्युलर इ विरुद्ध बोटे मोडीत बसतात.


Vijaykulkarni
Sunday, July 22, 2007 - 2:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्या डुन्गरपुरच्या पुजार्याला येत्या शनिवारच्या रेस मध्ये कोणता घोडा जिन्कणार हे सान्गता येयील?
किन्वा अन्नीस चे आव्हान स्विकारणे?
मदान नावाच्या एका भविष्यवेत्याने भाजप जिन्कणार नाही असे भविष्य वदविले होते गेल्या निवडणुकिपुर्वी. जेव्हा ते खरे निघाले तेव्हा त्याचा बराच बोलबाला झाला. नन्तर त्याने बुश आणे केरी मध्ये केरी जिन्कणार असे भाकित केले.


Uday123
Sunday, July 22, 2007 - 3:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाभोळ्करांना विरोध म्हणजे अंधश्रद्धा जोपसणे/ समर्थन करणे हा एक गैरसमज!

फ़क्त अनिस च काय ते अंधश्रद्धे विरुद्ध आहे हा दुसरा मोट्ठा गैरसमज!!



Disclaimer: पुरावा/ खंडन करणारी २-४ उदा तुम्हीच शोधून काढा, मागण्याची तसदी घेऊ नका.

Vijaykulkarni
Sunday, July 22, 2007 - 4:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राणी मुखर्जी चे खरे प्रेम माझ्यावरच आहे.

पुरावा/ खंडन करणारी २-४ उदा तुम्हीच शोधून काढा, मागण्याची तसदी घेऊ नका.



मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators