|
" The King who won that battle is called as Shalivahan " केदार, शालिवाहनाने "हुण" सैन्याचा नाश केला अस कुठेतरि वाचल्याच आठवतय. हे हुण म्हण्जे आजच्या China चे रहिवासि होते का? कि हि दोन वेगवेगळि सैन्ये होति ज्यांचा शालिवाहनाने वेगवेगळ्या वेळि पराभव केला?
|
Asami
| |
| Thursday, July 19, 2007 - 12:22 am: |
| 
|
मंगोल वंशीय लोकांना हुण म्हणतात
|
Slarti
| |
| Thursday, July 19, 2007 - 1:04 am: |
| 
|
शालिवाहनाने (गौतमीपुत्र सातकर्णी) शकांचा प्राभव केला ना ? हूणांशी हर्षवर्धन किंवा त्याच्या वडिलांनी युद्ध केले असे काहीतरी वाचल्याचे स्मरते. केदार, चू.भू.दे.घे.
|
हे हुण म्हण्जे आजच्या China चे रहिवासि होते का>>> स्लर्टी तुझे बरोबर ते शकच होते, मी ही आधी हुण असेच लिहीले. confuse मंगोल वशांची लोक म्हणजे चिनी, जापानी, सयामी वैगरे. हे युध्द चिनी व सयामी लोकांनी आपल्यावर लादले. ते सुरु झाले सम्राट विक्रमादित्या पासुन ( ई.स पुर्व ६०), व खर्या अर्थाने संपले ते शालीवाहनाच्या काळात ( तो विक्रमादित्याचा नातु, ई.स. ७४ मध्ये, म्हणुन आपण शालीवाहन शक १९२६ आज म्हणतो.) सावरकरांनी एक छोटेखानी पुस्तक लिहीले आहे त्यात तुला जास्त माहीती मिळु शकेल. पुस्तकाचे नाव बहुतेक हिंदुईजम आहे. कुलकर्णी तुम्ही नेहमी प्रमाने विशयाची गल्लत करताय. तिबेट चे उदा लागु होत नाही कारण. १ तिबेट च्या राजाने भारताने आक्रमन केले आहे तुम्ही मदतीला या असा चिन कडे खलीता पाठवला न्हवता. २. भारताने आक्रमन केले न्हवते. ३. चिन ला भविश्यात भारतावर हल्ला करायचा असेल तर तिबेट गट्ट करने योग्य वाटले. ४. चिन अहिंसक वा निधर्मी नाही. वरवर पाहाता जरी चिन साम्यवादी दिसत असला तरी तो साम्यवादी नाही साम्राज्यवादी आहे. चिन ने भारताचा १९६२ मध्ये घशात घातलेला भाग दिला नाहीच शिवाय अरुनाचल प्रदेश देखील त्यांचाच आहे अशी पुस्ती जोडली होती. त्यामुळे तिबेट व काश्मीर हे सफरचंदशी सफरचंद होउ शकत नाही. दंगल हा शब्द मी एवढ्यासाठी लिहीला की जर त्या काळी मुस्लीम जनतेला काश्मीर भारतात विलीन होऊ द्यायचा नसता तर त्यांनी हरकत घेतली असती. तशी हरकत घेतल्याची कुठेही नोंद नाही. तुम्ही मुळ मुद्दा न समजुन घेता केवळ शब्दांना का पकडताय. शिवाय मी वर लिहीले होते की मग जर एवढीच तेथील स्वातंत्र्याची चाड असेल तर त्या स्वतंत्र काश्मीर वर हल्ला का केला? ह्यावर आपले मत काय? म्हण्जे हल्ला त्यांनी करायचा, परतवुन आपण लावायचा व त्यावर परत हल्लेखोर वा घुसखोर म्हणु घ्यायचे हे बर आहे. आपण वरील एका मुद्द्याचे तरी सविस्तर उत्तर द्या. (मध्येच दुसरा मुद्दा काढायच्या आधी उत्तर अपेक्षीत आहे.)
|
Slarti
| |
| Thursday, July 19, 2007 - 1:41 am: |
| 
|
शालिवाहनाने शकांचा पराभव केला. शिवाय त्याने विक्रमादित्याचाही पराभव केला असे मानतात. हे दुसरे विधान विवाद्य मानले जाते. पण सातकर्णी विक्रमादित्याचा नातू होता हे मात्र खरे नसावे. त्यांची घराणी वेगळी मानली जातात. शालिवाहन हा सातवाहन होता. राजधानी पैठण होती. विक्रमादित्य हा एकतर गुप्त घराण्याचा किंवा परमार घराण्याचा मानला जातो आणि राजधानी उज्जैन होती. दुसरे म्हणजे शालिवाहन शक बहुतेक उत्तर भारतात मानला जात नाही, शालिवाहन शक हा महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र इथे प्रचलित आहे. उत्तरेत विक्रम संवत प्रचलित आहे. असेही मानले जाते की शालिवाहन शक सुरु होण्याचे कारण म्हणजे त्याने विक्रमाचा पराभव केला. परत, चू.भू.दे.घे.
|
हो विक्रमादित्य हा परमार घरान्याचा आहे. व त्यांचा राजधान्या वेगवेगळ्या आहेत. भविष्य पुराना नुसार शालीवाहन हा विक्रमादित्याचाच नातु होता. त्याचा मुलगा हा फक्त १० वर्षेच राज्यावर होता. विक्र्मादित्याने शकांचा पहील्यांदा पराभव करुन युदीष्टीर शक स्थापण केले होते. त्यालाच बहुदा विक्रम संवत्सर पण म्हणतात. मी हे पोस्ट लिहील्यावर भविष्यपुरानावर गुगल केले त्यात ही साइट मीळाली. http://www.encyclopediaofauthentichinduism.org/articles/52_the_dynasties_of.htm ईथे बरीच माहीती आहे. एकुन तिन मोठे विक्रमादीत्य होते त्यांचा बरेच्दा कन्फुजन होते. Cambridge History of India हा संदर्भ ग्रथात देखील हीच माहीती आहे.
|
>>> पन्नास वर्षानन्तर ही आपण सार्वमत का घेत नाही? काही गोष्टी जनमतांवर सोपवता येत नाहीत हे बहुतेक येथील लोकांना माहीती असावे. देशातला प्रत्येक निर्णय सार्वमताने घेतला तर फार थोड्या अवधीत देशाची वाट लागेल. देशहिताच्या काही बाबतीत कठोर निर्णय घ्यायलाच लागतात. उद्या अमेरिकेत द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादा असावी का या प्रश्नावर बहुसंख्य अमेरिकन 'नसावी' असे मत देतील. तसेच उत्पन्नावर आयकर असावा का या प्रश्नावर बहुसंख्य जनता 'नसावा' असे मत देईल. मग अशा जनमताप्रमाणे निर्णय घेतले तर देश खड्ड्यात जाईल. काश्मीरात सार्वमत घेण्यासाठी एक पूर्व अट आहे. त्या अटीप्रमाणे पाकिस्तानने आता व्यापलेल्या काश्मीरच्या भूप्रदेशातून आपले सैन्य काढून घेणे हे सार्वमत घेण्यासाठी सक्तीचे आहे. त्याशिवाय तिथे सार्वमत घेता येणार नाही असा लिखित करार आहे. परंतु पाकिस्तान तसे करणार नाही. त्यामुळे सार्वमत घेता येणार नाही. ते जाऊ देत कुलकर्णी, विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांवर केलेल्या खोट्या आरोपांबद्दल कधी माफी मागणार आहात?
|
Uday123
| |
| Thursday, July 19, 2007 - 5:32 am: |
| 
|
शिवाय आजही आपण सार्वमत का घेत नाही या प्रश्नाला उत्तर काय द्यावे? सार्वमत हे आजच्या परिस्थीतीत कालबाह्य ठरते. १९४८ ची परिस्थिती आज निर्माण करता येईल का? बाहेर घाबरून (घालवून) निघुन गेलेले हिन्दु लोक, ऊत्तर काश्मिर च्या लोकांना सहभागी कसे करायचे? आणी कोण हे काम करेल? दक्षीणेत (भारताच्या निवडनुक आयोगाच्या website http://www.eci.gov.in/StatisticalReports/ElectionStatistics.asp वरून) आतापर्यंत ८ वेळा विधानसभेच्या निवडनुका झाल्यात, एकंदरीत मतदानाची टक्केवारी खाली कंसात देत आहे, १९६२ (४०.३४ %) १९६७ (५८.७९ %) १९७२ (६२.१७ %) १९७७ (६७.१९%) १९८३ (७३.२४ %) १९८७ (७४.८८ %) १९९६ (५३.९२ %) २००२ (४३.७०%) तेथील लोकांनी, स्वत: आपले सरकार निवडले, एक्-दोन वेळा नाही तब्बल ८ वेळा, काही काळ राष्ट्रपती राजवट हा अपवाद वगळता. जगात सर्वच लोकांना आपले सरकार निवडण्याचा हक्क नाही आहे हो. हे भारताच्याच बाजुने सार्वमत कां ठरु नाही?
|
काही दिवसांपूर्वी दैनिक 'सकाळ' मध्ये गणपती या दैवतावर एक व्यंगचित्र प्रसिद्ध झाले होते. 'सकाळच्या' काही वाचकांनी या व्यंगचित्राबद्दल नाराजी व्यक्त केली होती. 'सकाळ'ने या विषयावर इतर वाचकांच्या प्रतिक्रिया मागविल्या होत्या. या प्रतिक्रिया खालील संकेतस्थळावर वाचता येतील. http://www.esakal.com/esakal/07182007/Sakalvishesh847E73069C.htm इतरांच्या बरोबरीने, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष, श्री. नरेंद्र दाभोळकर यांनी देखील एक पत्र लिहून आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. आपल्या प्रतिक्रियेत त्यांनी त्यांना विरोध करणार्यांचा 'हिंदू फॅसिस्ट धर्मरक्षक' असा उल्लेख करून त्यांच्यावर टीका केली आहे. मागील वर्षी 'दा व्हिन्सि कोड' या चित्रपटाविरूद्ध काही ख्रिश्चन संघटनांनी निदर्शने केली. पंजाब, आंध्र प्रदेश, तामिळनाडू इ. राज्यांनी या चित्रपटाला त्यांच्या राज्यात बंदी घातलेली आहे. मागच्याच वर्षी एका डॅनिश व्यंगचित्रकाराने काढलेल्या महंमदाच्या व्यंगचित्राविरूद्ध महाराष्ट्रासह अनेक राज्यात मुस्लीमांनी निषेध मोर्चे काढले होते. उत्तर प्रदेशमध्ये तर याविरूद्ध हिंसक दंगल होऊन ३-४ व्यक्ती गोळीबारात ठार झाल्या. याच्या तुलनेत 'सकाळ'च्या वाचकांनी तर अत्यंत निरुपद्रवी मार्गाने म्हणजे पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे. परंतु या ख्रिश्चन संघटनांचा किंवा मुस्लीम संघटनांचा 'फॅसिस्ट', 'तालिबानी' अशा शब्दात दाभोळकरांनी कधी उद्धार केल्याचे निदान मी तरी ऐकलेले अथवा वाचलेले नाही. बहुतेक 'फॅसिस्ट' या शब्दाची दाभोळकरांची व्याख्या धर्मानुसार वेगवेगळी असावी. मायबोलीच्या सभासदांपैकी काहीजण अनिसचे कट्टर समर्थक आहेत. दाभोळकरांनी हिंदूंप्रमाणे इतर धर्मीयांवर सुद्धा टीका असेल तर ते वाचण्यासाठी लिंक पाठवावी.
|
Asami
| |
| Thursday, July 19, 2007 - 11:50 am: |
| 
|
केदार चीनी जपानी वंशांच्या लोकांमधे mangoloids असतात पण vice versa is not always true इथे थोडी अधिक माहिती आहे. हुण Office मधे एक Uyghur मुलगी आहे. she claims herself as hun. Strangely her dialect is much closer to urdu than mandarine etc. I can recognize few words in her conversation
|
Asami
| |
| Thursday, July 19, 2007 - 11:55 am: |
| 
|
मायबोलीच्या सभासदांपैकी काहीजण अनिसचे कट्टर समर्थक आहेत. दाभोळकरांनी हिंदूंप्रमाणे इतर धर्मीयांवर सुद्धा टीका असेल तर ते वाचण्यासाठी लिंक पाठवावी. >>वरील विधान वाचून सहज सुचले ते असे की अनिस चे समथक असतिल तर दाभोळकर ह्या व्यक्तीच्या व्यक्तीच्या प्रत्येक विचारांचे समर्थक असलेच पाहिजे किंवा for that matter अगदी अनिसच्या प्रत्येक कामाचेही समथक असलेच पाहिजे असे जरूरी आहे का ? Disclaimer : मी वरील archives नी current page मधील कोणाही व्यक्ती, id , पक्ष, विचारधारा, धर्म, पंथ, जात, संघटना etc चा समर्थक किंवा विरोधक नाही.
|
>>> मायबोलीच्या सभासदांपैकी काहीजण अनिसचे कट्टर समर्थक आहेत. दाभोळकरांनी हिंदूंप्रमाणे इतर धर्मीयांवर सुद्धा टीका असेल तर ते वाचण्यासाठी लिंक पाठवावी. >>वरील विधान वाचून सहज सुचले ते असे की अनिस चे समथक असतिल तर दाभोळकर ह्या व्यक्तीच्या व्यक्तीच्या प्रत्येक विचारांचे समर्थक असलेच पाहिजे किंवा for that matter अगदी अनिसच्या प्रत्येक कामाचेही समथक असलेच पाहिजे असे जरूरी आहे का ? असे जरूरी नाही. माझा आक्षेप आहे तो दाभोळकरांच्या पक्षपाती वृत्तीला. दाभोळकर हिंदू संघटनांना 'फॅसिस्ट' असे संबोधत असतील, तर इतर धर्मातल्या व्यंगचित्र, चित्रपट वगैरेंना विरोध करणार्या लोकांना सुद्धा त्याच मापाने मोजले पाहिजे. परंतु जेव्हा जेव्हा अहिंदू असा विरोध करतात तेव्हा मात्र दाभोळकर सोयीस्कररीत्या मौन पाळतात. वृत्तपत्रातून वाचकांच्या पत्रात पत्र लिहून आपला निषेध व्यक्त करणे हा अगदी सौम्य आणि लोकशाही मार्ग झाला. पण लगेच दाभोळकरांनी आपली प्रतिक्रिया देऊन हिंदू 'फसिस्टांचा' उद्धार केला. पण हीच व्यक्ती मी दिलेल्या इतर दोन समानधर्मी प्रसंगाच्या वेळी (जे पत्रलेखन करून निषेध नोंदवण्यापेक्षा जास्त हिंसक होते) मात्र गप्प होते.
|
सतिप्रथा आणी विहिम्प याबद्दल लिहून विहिम्प चे पितळ उघडे पाडल्याबद्दल मी क्षमा मागतो. आणी सकाळ मध्ये नरेन्द्र दाभोळकरानी लिहिलेल्या पत्रात आक्षेपार्ह असे काय आहे हे कितिही डोके खाजवले तरीही समजले नाही. दाभोळकरान्चा रोख फोन वरून चित्रकाराला धमकी देणार्यान्वर आहे. पत्र लिहून निषेध करणार्यान्वर नाही, ही साधी गोष्ट समजू नये? दाभोळकरनी मुस्लीम धर्मान्धान्वर टीका केली नाही म्हणून त्याना हिन्दू धर्मान्धान्वर टीका करण्याचा हक्क नाही असे म्हणणे बालिशपणाचे आहे. एखादा रोगी डॉक्टर ला असे विचारेल का की तुम्ही माझ्यावर उपचार करण्या आधी इतर सर्वान्वर का करित नाही.
|
>>> सतिप्रथा आणी विहिम्प याबद्दल लिहून विहिम्प चे पितळ उघडे पाडल्याबद्दल मी क्षमा मागतो. माझी खात्री होतीच की दाभोळकरांच्या ढोंगबाजीला पाठिंबा द्यायला तुम्ही पुढे सरसावणारच. प्रत्यक्षात विश्व हिंदू परिषद आणि सतीप्रथेबद्दलच्या खोट्या आरोपांबद्दल तुमचं स्वतःचंच पितळ पूर्णपणे उघडं पडलेलं आहे. आणि ते सुद्धा अनेक वेळा. विश्व हिंदू परीषदेच्या नेत्यांवर तुम्ही जे आरोप केले ते पूर्णपणे खोटे असल्याचे निर्विवाद सिद्ध झाले. तरी सुद्धा त्याबद्दल माफी न मागता तुम्ही स्वतःचीच पाठ थोपटून घेत आहात. काय म्हणावं तुमच्या या कर्माला? तुम्ही खोटारडे आहात हे सिद्ध होऊन सुद्धा "पडलो तरी पाठ वर" या उक्तीप्रमाणे तुमचे वर्तन आहे आणि याची तुम्हाला अजिबात खंत देखील वाटत नाही. >>> दाभोळकरनी मुस्लीम धर्मान्धान्वर टीका केली नाही म्हणून त्याना हिन्दू धर्मान्धान्वर टीका करण्याचा हक्क नाही असे म्हणणे बालिशपणाचे आहे. दाभोळकरांना सर्व धर्मांवर टीका करायचा हक्क आहे. परंतु ते फक्त हिंदू धर्माच्याच निरूपद्रवी मुद्द्यांवर टीका करतात. इतर धर्मांच्या समाजविघातक मुद्द्यांवर ते गप्प का बसतात? बहुतेक आपल्याविरूद्ध फतवा निघेल याची भीती वाटत असेल किंवा इतर धर्मांच्या विरूद्ध बोलले तर आपल्याला "जातीयवादी", "प्रतिगामी", "फॅसिस्ट" इ. समजले जाईल याची काळजी वाटत असेल. असे वागणे म्हणजेच ढोंगीपणा. अर्थात तुमची आणि त्यांची नाळ बरोबर जमते, कारण तुम्ही दोघे एकाच माळेचे मणी. >>> एखादा रोगी डॉक्टर ला असे विचारेल का की तुम्ही माझ्यावर उपचार करण्या आधी इतर सर्वान्वर का करित नाही. जर त्या रोग्याला साधे खरचटले असेल किंवा किरकोळ आजार असेल आणि इतर रोग्यांना भयंकर जीवघेणे आजार असतील, तर, तो रोगी नक्की डॉक्टरला सांगेल की माझ्या किरकोळ दुखण्याकडे लक्ष देण्यापेक्षा गंभीर आजार झालेल्या इतर रोग्यांकडे आधी लक्ष द्या. समजा तुम्हाला किरकोळ खरचटले म्हणून तुम्ही एखाद्या डॉक्टरकडे गेलात आणि तुमच्या आधीच तिथे भयंकर जखमी झालेले अनेक रुग्ण आलेले असले, तर अशा परिस्थितीत डॉक्टर आणि सर्व परिचारिका इतरांकडे संपूर्ण दुर्लक्ष करून फक्त तुमचीच सेवा करत बसल्या तर ते चुकीचे नाही का? दाभोळकर आणि त्यांच्या समानधर्मीयांचे अगदी असेच आहे. ते हिंदूंच्या निरूपद्रवी आणि कालबाह्य मुद्द्यांवर टोकाला जाऊन टीका करतात, पण भारतातल्या इतर धर्मीयांच्या भयंकर समाजविघातक कृत्यांबद्दल मात्र सोयीस्कर मौन पाळतात. ढोंगीपणा अजून काय वेगळा असतो?
|
मग जर एवढीच तेथील स्वातंत्र्याची चाड असेल तर त्या स्वतंत्र काश्मीर वर हल्ला का केला? ह्यावर आपले मत काय? म्हण्जे हल्ला त्यांनी करायचा, परतवुन आपण लावायचा व त्यावर परत हल्लेखोर वा घुसखोर म्हणु घ्यायचे हे बर आहे. आपण वरील एका मुद्द्याचे तरी सविस्तर उत्तर द्या. (मध्येच दुसरा मुद्दा काढायच्या आधी उत्तर अपेक्षीत आहे.)>> कुलकर्णींकडुन उत्तर अपेक्षीत, नेहमी ते प्रश्न विचारतात आज माझी बारी असामी त्या लिंक बद्दल धन्यवाद.
|
खालील लिन्क मध्ये सोलापूर मुख्य मध्ये तिसरी बातमी वाचा. हे म्हणजे किरकोळ खरचटणे? अगदी आठवड्यापुर्वीची घटना आहे ही. कालबाह्य आणी निरुपद्रवी? दाभोळकरान्ना विरोध करणारे आणी मुस्लीम धर्मात सुधारणान्चा विषय निघताच इस्लाम खतरेमे अश्या आरोळ्या ठोकणारे यान्त काहीही फरक नाही. http://2007.lokmat.com/php/archive/index.php?date=2007-7-09
|
कुलकर्णी, ही निव्वळ गुन्हेगारीची केस आहे. अशा केसमध्ये संशयित गुन्हेगारांना अटक करून योग्य ती कारवाई केली पाहिजे. भारतात दरवर्षी कोट्यावधी बाळंतपणे होतात. त्यामधला एखादाच असा मूर्खपणा करताना दिसतो. जर बाळंतपणासाठी मोठ्या संख्येने असे प्रकार होत राहिले तरच त्याकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. अशा क्वचित कधीतरी होणार्या प्रकारापेक्षा १४०० वर्षांपूर्वी लिहिलेल्या पुस्तकातले कालबाह्य झालेले अन्यायकारक नियम २१ व्या शतकात सुद्धा जबरदस्तीने लादण्याला विरोध करण आवश्यक आहे. या 'महाभयंकर' घटनेला तब्बल एक आठवडा होऊन गेला तरी दाभोळकर व अनिसने काही कृती केल्याचे वाचले नाही. बहुतेक 'सकाळ' मध्ये हिंदुत्ववाद्यांवर टीका करणारे पत्र लिहिण्यात ते मग्न असतील, म्हणून त्यांना वेळ झालेला दिसत नाही. किंवा तो मांत्रिक मुस्लीम असल्यामुळे त्यांनी सोयिस्कर मौन धारण केले असेल. अनिसने अशा भोंदू मांत्रिकांना विरोध केला मी नक्कीच पाठिंबा देईन. पण अनिसवाले आहेत कुठे? 'श्रीगणपती' या हिंदूंच्या दैवतावर अनिसचा आणि दभोळकरांचा (आणि पर्यायाने तुमचा) विशेष राग दिसत आहे. गणेशविर्सजनाला पर्यावरणाचे फुसके कारण पुढे करून ते संभावितपणे विरोध करतात, आणि गणपतीच्या व्यंगचित्राला वाचकांनी अहिंसक मार्गाने पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली दाभोळकरांच्या व्याख्येनुसार ते पत्रलेखक लगेच 'हिंदू फॅसिस्ट' होतात. साहजिकच आहे, श्रीगणपती ही बुद्धीची देवता समजली जाते. श्रीगणपतीने आपल्याला सारासार विचार करण्याची बुद्धी न दिल्यामुळे तुमचा सर्वांचा श्रीगणपतीवरचा राग समजू शकतो. तुम्ही "लोकमत" सारखे "पाक्षिक" वाचता आणि त्यात छापलेले गंभीरपणे घेता यावरून सुद्धा हे सिद्ध होते. भोळ्याभाबड्या जनतेला खोटी आश्वासने देऊन फसवणारे पुढारी आणि एका विशिष्ट धर्माच्या लोकांच्या श्रद्धांवर आघात करणारे आणि इतर धर्माच्या अनिष्ट अंधश्रद्धेबाबत सोयीस्कर मौन पाळणारे अनिसवाले यांच्यात काहीही फरक नाही. ते जाऊ देत. तुम्ही विश्व हिंदू परीषदेच्या नेत्यांवर केलेल्या खोट्या आरोपांबद्दल कधी माफी मागणार? विचार करा. अजूनही वेळ गेलेली नाही. स्वतःची चूक मोठ्या मनाने कबूल करून माफी मागा आणि विषय संपवून टाका.
|
कुलकर्णी, तुम्ही "लोकमत" रोज मन लावून वाचता वाटतं?
|
आणि गणपतीच्या व्यंगचित्राला वाचकांनी अहिंसक मार्गाने पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली दाभोळकरांच्या व्याख्येनुसार ते पत्रलेखक लगेच 'हिंदू फॅसिस्ट' होतात. हिंदू फॅसिस्ट हा शब्द पत्रलेखाना नव्हे तर धमकी देणार्याना उद्देशून होता हे एखाद्या सहावी ड मधल्या विद्यार्थ्याला सुद्धा समजेल.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|