|
Chyayla
| |
| Monday, July 16, 2007 - 2:56 pm: |
| 
|
मंदार, मी त्यातल्या काश्मिर संबधीत ओळी तिथे लिहिल्या आहेत लेडी माउन्टब्याटनच्या मार्फ़त गवर्नर माउंटब्याटनने काश्मिर संबंधात नेहरुना प्रभावित केले होते. सरदार वल्लभभाई पटेल होते म्हणुन ईतर संस्थाने भारतात विलीन झालीत केवळ एक काश्मिर त्याना हाताळायला दीला होता त्याचाही विचका करुन टाकला. थोडे फ़ार काश्मिर जे आहे त्याचेही श्रेय गृहमंत्री सरदार पटेलान्ना जाते. भारत स्वतन्त्र झाल्यावर एकदा सरंक्षण मंत्री सैन्याच्या आधुनिकिकरणाचा प्रस्ताव घेउन गेले. नेहरुन्नी त्याला केराची टोपली दाखवली भारत हा अहिंसावादी देश आहे आपलयाला याची गरजच काय. अरे पण भारताने काय अहिंसेच्या नावाने स्वसरंक्षण पण करु नये काय ईतका गाफ़ीलपणा तोही देशाच्या बाबतित. बाकी १ /3 काश्मिर आजही पाकिस्तानच्या ताब्यात आहे. व एक कायमची डोकेदुखी आपण घेउन बसलो आहोत. सतिश मी त्याना भोळसटपणा अजिबात म्हणणार नाही आहे तो शुद्ध मुर्खपणाच. १९६२ चे चीनचे आक्रमण हा अजुन एक मोठे अपयश होते. चीनसोबत पंचशील करार करुन ते निर्धास्त बसले होते सोबतच साम्यवादींची साथ होतीच. चीन आक्रमण करत आहे असे सांगुनही त्यान्नी अक्षम्य असे दुर्लख़्ष केले शिवाय हिन्दी चीनी भाई भाई म्हणुन पोकळ नारा देत शहामृगाप्रमाणे आलेल्या संकटापासुन पळण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. परीणाम चीनचे कडवे आक्रमण. सोबत कम्युनिस्टांची फ़ुस की चीन कधी भारतावर आक्रमण करणार नाही. चीनविरुद्धच्या युद्धात बर्फ़ात लढण्यासाठी सैनिकांजवळ साधे गरम कपडे व बुटही नव्हते परीणाम प्रचंड प्राणहानी.
|
नेहरूनी खरे तर डिप्लोमसीपेक्षा इमोशनल राजकारण केले. त्यात अनेक अक्षम्य चुका केल्या ही बाब खरी आहे. त्यात सरदार गेल्यावर तर प्रॉब्लेमच झाला.मात्र एडविना प्रकरणाचा त्यांच्या निर्णयांशी काही संबंध दिसत नाही. तो एक मनुष्यस्वभावाचा कोपरा मानता येईल. माढेकरांचा एक मुद्दा मला आवडला. आणि तो माझ्या मनात बरेच दिवस घोळतो आहे. पण असे बोलणे या देशात चोरी आहे. खरेच काश्मीरच्या बाबतीत भारत एवढा का पझेसीव्ह होता काही कळत नाही. हरीसिंहांचे मत भारतात यायचे नव्हतेच. (अर्थात नंतर काश्मीरची चटणी झाली असती एवढे आन्तरराष्ट्रीय राजकारण त्याना कुठले कळायला?)नेहरू जिथे फसले तिथे त्यांची काय कथा. काश्मीरचा प्रश्न मुळातच हरीसिंगाच्या चावटपणामुळे निर्माण झाला. पुढे त्या विचक्याला सगळ्यानीच यथाशक्ती 'हातभार' लावला. हरिसिंगाने टोळीवाल्याना श्रीनगरपर्यन्त घुसू दिले अन त्यानन्तर श्रीनगरचे वीज केन्द्र ताब्यातून गेल्यावर अंधार झाल्यावर त्याने भारताची मदत मागितली! श्रीनगर सुटले पण कुठलेही घुसलेले सैन्य मागे रेटताना फार त्रास होतो. त्या काळच्या आपल्या सैन्याच्या मर्यादा (ज्या १९६२ पर्यन्त कायमच होत्या)लक्षात घेता त्या घुसलेल्या सैन्याला सीमापार नेणे शक्य होते असे वाटत नाही. अर्थात त्याकाळातली देशाची साधन सामग्री लक्षात घेता आपण कुठलेही युद्ध पेलू शकलो नसतो. पण भारताने काश्मीरच्या नादी लागायला नको होते असे मलाही वाटते! पण नेहरू मुळात काश्मिरी असल्याने ते बहुधा जास्त भावुक असावेत काश्मीरबाबत. अर्थात प्रत्येक राज्यकर्त्याच्या चुका असतात. त्याचे परिणामही मोठे असतात. पण नेहरूंचे योगदानही मोठे आहे. दुसर्या महायुद्धोत्तर काळात जगाची फेरमांडणी होत असताना राजकीय हितसंबंध स्पष्टही व्हायचे होते त्या काळात! इंदीरा गांधींसारख्या तडफेची त्यावेळी गरज होती मात्र!
|
अर्थात त्याकाळातली देशाची साधन सामग्री लक्षात घेता आपण कुठलेही युद्ध पेलू शकलो नसतो>>>>>> मी तुलना त्यावेळचा पाक व भारत अशी करतोय. पाक च्या तुलनेत आपल्याकडे जास्त शक्ती तेव्हा होती. जर ते श्रिनगर घेउ शकत होते तर आपणही ते वापस घेउन लाहोर कडे जाउ शकलो असतो. अभाव होता इछाशक्तीचा व व्हिजन चा. ते नेहरु कडे न्हवते. शिवाय आमच्यावर हल्ला केला हो असे म्हणत रडत रड्त ते युनो कडे गेले जी अजुन मोठी चुक त्यामुळे भिजत घोंगड पडलय. ईदिरांगाधींनी १९७१ ला जो कनखरपणा दाखविला तो जर नेहरुंनी १९४८ मध्ये दाखविला असता तर काश्मीर प्रश्न तेव्हाच निकालात लागला असता. जरी काश्मीर वेगळा राहीला असता तरी तो पाक ने गिळला असताच. (निदान युध्दाचा नादाने आपण तो घशात घालायला हवा असता. आज म्हणजे तो घास उगीच अडकलाय व वैद्यालाच जास्त पैसे दयावे लागतायत). ४८ ते ६० मध्ये भारताने (नेहरु सरकार) ने काय मोठे केले तर प्लानींग कमीशन स्थापण करुन पंचवार्षीक योजना आनने. पंण माझ्या मते तरी त्यात फक्त नेहरुनी पुढाकार घेतला न्हवता. एक दोन मोठे विज प्रकल्प व भाकरा नानगल काय ते आणले सर्वांंनी त्यांना भारतीय ओद्योगीक क्रांतीचे जनक मानले. ते तसेही आलेच असते कारण ती काळाची गरज होती. मिश्र अर्थव्यवस्था आनुन तर नुकसान करुन घेतले. (मी थोडा समाजवादी व थोडा भांडवलवादी असे त्यांचे म्हणने) मिश्र अर्थव्यवस्था तेव्हा फक्त एका देशाने राबविली होती व तो देशही नुकताच दुसर्या महायुद्दातुन स्वतंत्र झाला होता. त्या अर्थव्यस्थेमुळे भ्रष्ट्राचार वाढीसच लागला. मोरारजी (आण्खी एक हलकट माणुस) तेव्हा अमेरिकन अर्थव्यवस्था राबवा म्हणुन पाठीमागे लागले होते, ते झाले असते तर कदाचित आपण बरेच पुढे गेलो असतो. शेवटी नाईलाजाने, बळजबरी १९९१ ला भांडवलशाही ला आपण झुकत माप दिल. माझ्यामते तर त्यांनी आपल्या देशाचे नुकसानच केले. (जरी त्यांचा मनात प्रगती करायची असली तरी).
|
Chyayla
| |
| Monday, July 16, 2007 - 5:28 pm: |
| 
|
मी तुलना त्यावेळचा पाक व भारत अशी करतोय. पाक च्या तुलनेत आपल्याकडे जास्त शक्ती तेव्हा होती. जर ते श्रिनगर घेउ शकत होते तर आपणही ते वापस घेउन लाहोर कडे जाउ शकलो असतो. अभाव होता इछाशक्तीचा व व्हिजन चा. ते नेहरु कडे न्हवते अगदी बरोबर.. मला वाटत जर हा प्रश्न सरदार वल्लभभाई पटेलांकडे हाताळण्यास दीला असता तर त्यान्नी तो केंव्हाच निकालात काढला असता. बरे दुसरी गोष्ट भारतिय सैनिक जीवाची बाजी लावुन टोळीवाल्याना बाहेर रेटण्यात यशस्वी होत होते जवळपास २ / ३ काश्मिर मुक्त सुद्धा केला होता. आणी अचानक जिंकत आलेली लढाई नेहरुच्या मुर्खपणामुळे थाम्बवावी लागली. सैनिकान्चा अतिशय सन्ताप झाला होता पण काही ईलाज नव्हता. हरिसिंहच काय तेंव्हा भारतातले कित्येक संस्थान भारतात विलिन व्हायला तयार नव्हते हैद्राबादच्या निझामाने तर पाकिस्तानात शामिल व्हायची तयारी करुन ठेवली होती गृहमंत्र्यानी वेळीच पोलिस कार्यवाही करुन ते सन्स्थान ताब्यात घेतले आता कोणी बोम्बला की काही करा हैद्राबाद पाकिस्तानात जायचे नाव ही घेउ शकत नाही अशीच गरज होती काश्मिरच्या बाबतित. तसेही कायदेशीर रित्या हरिसिंगाने भारतात विलिन होण्यावर सहमती दर्शवली होती. त्यामुळे काश्मिर भारताचाच भुभाग होतो. केवळ मुस्लिम लोकसंख्या जास्त आहे, पाकिस्तान दावा करतोय म्हणुन भारताने काश्मिर मधे लक्ष घालायला नको होते हे वाक्य तेही भारतियानी म्हणणे अतिशय दुर्दैवी आहे. त्यांची घोषणा लक्षात घ्या "हसके लिये पाकिस्तान, लडके लेंगे हिन्दुस्थान" ही मानसिकता काय दर्शवते?
|
नेहरुंनी स्वप्नाळूपणे समाजवादी राज्यपद्धती राबवली. ते हेकट आणि अहंकारी असल्याने दुसर्या कुणाचा विचार तपासणे वगैरे भानगड नव्हती. समाजवादात सर्व काही सरकार चालवणार. पंचतारांकित हॉटेलांपासून लोखंड, कोळसा, अल्युमिनियम पर्यंत सगळे काही सरकार चालवणार. त्याची फळे भोगतोच आहोत. अर्थव्यवस्था खुली होईपर्यंत फियाट व आंबेसेडर सोडल्यास तिसरी कार शोधून सापडत नसे. अनेक वर्षे त्या कारमधे काहीही सुधारणा नाहीत. नेहरु गांधी परिवाराच्या खास मर्जीतले बजाज, बिर्ला, वालचंद ह्यांनाच वाहने बनवायला परवानगी. स्कूटर, मोटरसायकलीही तसेच. कित्येक वर्षे मोजून पैसे देऊनही वाहन मिळवायला नंबर लावावा लागे! दोन तीन वर्षे वाट पहावी लागे. फोन, वीज, रेल्वे सगळ्या क्षेत्रात भ्रष्टाचार, ढिलाई, राजकारण आली. सार्वजनिक क्षेत्रातले बहुतांश उद्योग बंद पडत आहेत. हे सगळे खाचखळगे न ओळखता समाजवादी अर्थव्यवस्था राबवण्याचे "श्रेय" नेहरूंचेच.
|
Zakki
| |
| Monday, July 16, 2007 - 11:42 pm: |
| 
|
नेहेरुंबरोबर आमच्या आधीच्या नि आमच्या पिढीला तेव्हढेच दोषी धरले पाहिजे. लोकशाही आल्यावर या गोष्टी देशाला घातक आहेत हे ओळखून त्या विरुद्ध आवाज उठवायला कुणाला सुचले नाही. आपल्या लोकांनी आता नेहेमी सरकारने हे करावे, ते करावे असे म्हणण्या ऐवजी, किंवा नेत्यांच्या चुका काढत बसण्या ऐवजी समाजाला सुशिक्षित नि जागरुक करून त्यांच्या मतदानाच्या हक्काची जाणीव करून द्यायला पाहिजे. दुर्दैवाने जनता अजूनहि संकुचित स्वार्थवृत्तिमुळे नको त्या लोकांना निवडून देते.
|
Uday123
| |
| Tuesday, July 17, 2007 - 3:40 am: |
| 
|
१९६२ च्या युद्धातील अपयशाची चिकित्सा करणारा, ब्रुक्स्-भगत अहवाल, तब्बल ४४ वर्ष नंतरही सामान्य भारतीयांस उपलब्द नाही आहे. का? ४४ वर्षा नंतर, "It is of not public interest" म्हणजे आश्चर्य वाटते. मागच्या लोकांच्या चुकांनी पुढचे लोक शहाणे होतात, (यश अपयशाची) चिकित्सा व्हायला ४४ वर्षानंतरही हरकत असावी? rediff वर ३ लेख वाचण्यात आले, http://www.rediff.com/news/2002/oct/08max1.htm
|
>>> अशीच गरज होती काश्मिरच्या बाबतित. तसेही कायदेशीर रित्या हरिसिंगाने भारतात विलिन होण्यावर सहमती दर्शवली होती. त्यामुळे काश्मिर भारताचाच भुभाग होतो. केवळ मुस्लिम लोकसंख्या जास्त आहे, पाकिस्तान दावा करतोय म्हणुन भारताने काश्मिर मधे लक्ष घालायला नको होते हे वाक्य तेही भारतियानी म्हणणे अतिशय दुर्दैवी आहे. त्यांची घोषणा लक्षात घ्या "हसके लिये पाकिस्तान, लडके लेंगे हिन्दुस्थान" ही मानसिकता काय दर्शवते? भारताने काश्मीर प्रश्न हाताळण्यात अतिशय मूर्खपणा केला असे माझे मत आहे. मुळात मुस्लीम बहुसंख्या असलेले श्रीनगर भारतात घ्यायलाच नको होते. आणि घेतल्यावर ते पूर्णपणे कायदेशीर विलीन करून घ्यायला पाहिजे होते. तसेच सीमा सुद्धा पुर्णपणे बंद करायला पाहिजे होत्या. हे न करता काश्मीरला विशेष दर्जा देऊन भारताचे तिथे फारसे नियंत्रण राहणार नाही ही नेहरूंनी घोडचूक केली. आज काश्मीरमध्ये भारतातले बहुसंख्य कायदे लागू होत नाहीत. काही वर्षांपूर्वी वाजपेयींनी मंत्रीमंडळातल्या मंत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण घालण्याचा कायदा केला. काश्मीर वगळता इतर सर्व राज्यांना हा कायदा लागू झाला. उर्वरीत भारतातले आयकरासारखे कायदे काश्मीरला लागू नाहीत. काश्मीरमधून भारताला करांच्या किंवा इतर मार्गांनी फारसे उत्पन्न मिळत नाही. याउलट काश्मीरच्या एकूण खर्चापैकी जवळपास ७५ टक्के खर्च हा भारत सरकारने दिलेल्या अनुदानातून होतो. काश्मिर हा भारतासाठी आतबट्ट्याचा व्यवहार ठरला आहे. काश्मिरमध्ये कोणताही अकाश्मिरी स्थावर मालमत्ता घेऊ शकत नाही किंवा त्या राज्याचा नागरिक होऊ शकत नाही (कोणत्याही अकाश्मिरीला तिथल्या मतदार यादीत नाव नोंदवता येत नाही). याउलट काश्मिरी संपूर्ण भारतभर कुठेही जाऊन राहू शकतात. यावर अजून कडी म्हणजे, नेहरूंनी काश्मीर प्रश्न संयुक्त राष्ट्रसंघात नेऊन तो कायमस्वरूपी आंतरराष्ट्रीय करून टाकला आणि भारताच्या परराष्ट्रधोरणामध्ये एक कायमची पाचर मारून ठेवली. आता अशी स्थिती आहे की पाचर काढता येत नाही आणि काढायचा प्रयत्न केल्यास बोट अडकून राहते. भारताने आजवर काश्मीर अट्टाहासाने स्वतःच्या ताब्यात ठेवण्यासाठी अगणित आर्थिक आणि मानवी किंमत मोजलेली आहे. त्या बदल्यात भारताला काहिही फायदा मिळालेला नाही. तिथले लोकसुद्धा भारताशी कृतघ्नपणे वागत आहेत (अर्थात काश्मिरमध्ये बहुसंख्य मुस्लीम असल्यामुळे देशाशी प्रामाणिक न राहणे हे स्वाभाविकच आहे. मुस्लीम कोणत्या देशात तो देश आपला समजून राहतात?). भारताने काश्मीर संदर्भात भावनिक अभिनिवेश बाजूला ठेऊन व्यावहारिक तोडगा काढणे आवश्यक आहे. निदान आपला दगडाखाली सापडलेला हात तरी सोडवून घेतला पाहिजे. सर्वात प्रथम हे लक्षात घेतले पाहिजे की काश्मीर भारताच्या ताब्यात ठेवल्यामुले भारताचा फक्त तोटाच होत आहे. फायदा अजिबात नाही. माझ्या मते भारताने जम्मू (हिंदू बहुसंख्या) आणि लडाख (बौद्ध बहुसंख्या) स्वतःच्या ताब्यात ठेवावे आणि श्रीनगरवरील ताबा सोडून द्यावा. हे करताना दोन्ही प्रदेशातील लोकसंख्येची धर्माच्या आधारावर अदलाबदल करावी. म्हणजे श्रीनगरमधले हिंदू (कुणी शिल्लक असलेच तर) जम्मू मध्ये घ्यावेत आणि जम्मू व लडाख मधले मुस्लीम श्रीनगरला पाठवून द्यावेत. अर्थात हे सर्व करण्याच्या आधी पाकिस्तान अतिरेकी अड्डे बंद करेल व दाऊद, शकील वगैरे फरारी अतिरेक्यांना भारताच्या ताब्यात देईल याची खात्री करून घेणे आवश्यक आहे. हे झाल्यावर जम्मू आणि लडाख कोणताही विशेष दर्जा न देता भारतीय संघराज्यात विलीन करून ध्यावेत आणि भारताची संपूर्ण सीमारेषा भक्कम कुंपण घालून बंद करावी. हे सर्व झाल्यावर पूर्वीच्या श्रीनगरमधील नागरिकांना भारतात प्रवेश करण्यासाठी व्हिसा वगैरे मध्ये अजिबात सवलत देऊ नये. तसेच सध्याची दिल्ली-लाहोर बस, समझौता ट्रेन वगैरे (यातून अतिरेकीच स्वस्तात आणि कमी वेळात भारतात घुसतात) बंद करावी. आता शेवटचा प्रश्न असा की श्रीनगर भारतातून बाहेर काढल्यावर त्याचे पुढे काय होणार? त्यासाठी दोन पर्याय आहेत. एकतर ते पाकिस्तानमध्ये विलीन होऊ शकते किंवा ते स्वतंत्र राष्ट्र म्हणून राहू शकते. पाकिस्तानमध्ये विलीन झाल्यावर तिथल्या नागरिकांचे हाल कुत्रा सुद्धा खाणार नाही. ते जर स्वतंत्र राष्ट्र केले गेले तर अमेरिका, चीन व पाकिस्तान मध्ये त्याच्यावर ताबा मिळविण्यासाठी चढाओढ होईल. शेवटी या बड्या राष्ट्रांच्या सत्तालालसेमुळे तिथे यादवी माजेल. एकदा ते भारताच्या बाहेर गेले की तिथल्या नागरिकांचे काय होईल याची चिंता भारताने करू नये. श्रीनगरच्या कृतघ्न नागरिकांना भारताने असंख्य सवलती देऊन लाड केले तरी भारतात रहायची इच्छा नाही. मग ते भारताबाहेर गेल्यावर खड्ड्यात का जाईनात. अर्थात श्रीनगरच्या यादवीचा भारताला सुद्धा भविष्यात त्रास होईल. परंतु याला पर्याय नाही. श्रीनगर भारतात असले किंवा भारताच्या बाहेर असले तरी भारताची ती कायमस्वरूपी डोकेदुखी आहे (अर्थातच श्रीनगरची मुस्लीम बहुसंख्या याला कारणीभूत आहे. श्रीनगरमध्ये हिंदू बहुसंख्य असते तर कधीच फुटीरतावाद बोकाळला नसता). भारताने आजवर काश्मीरवर प्रचंड खर्च केलेला आहे आणि असंख्य नागरिकांचा व सैनिकांचा बळी दिलेला आहे. हा खर्च व मानवी बलिदान यामुळे वाया जाणार आहे. परंतु भविष्यात काश्मीरमध्ये भारताला अजून पैसे ओतावे लागतील आणि अजून बळी द्यावे लागतील. काश्मीरच्या लोकांची कृतघ्न मनोवृत्ती कधीही बदलणार नाही, त्याचा विशेष दर्जा रद्द करणे कधीही शक्य होणार नाही आणि अतिरेकी कारवाया कधीही थांबणार नाहीत. पण निदान श्रीनगर भारताबाहेर काढले, तर, फुटीरतावादाच्या, अतिरेकी हल्ल्याच्या आणि मानवी व वित्तहानीच्या बर्याचश्या समस्या कमी होतील.
|
हे जर खरे असले तर नेहरूंनी बाईच्या नादात देशहीताचा बट्ट्याबोळ केला असे म्हणता येईल. http://www.expressindia.com/fullstory.php?newsid=89644
|
Chyayla
| |
| Tuesday, July 17, 2007 - 8:17 pm: |
| 
|
सतिश, केवळ काश्मिर दील्यानी पाकिस्तान आणी मुस्लिम शांत होतील? एवढा पाकिस्तान देउनही काय आपली डोकेदुखी संपली काय? मुळात काश्मिर ही समस्या नाही तर तिथले मुस्लिम व त्यापेक्षा त्यान्चा अलगाववाद कुरवाळणारे दांभिक धर्मनिरपेक्ष (हे तर काश्मिरच काय पुर्ण देशालाच लागु आहे) शासन ह्या मोठ्या समस्या आहेत. त्यापेक्षा ३७० कलम रद्द करणे, लदाख, जम्मु आणी काश्मिर असे तीन भाग पाडुन काश्मिर बाबत उपाय योजना आखणे, चीन प्रमाणे मुस्लिमबहुल भागात देशप्रेमी जनसंख्या वाढवणे. हे करणे जास्त सयुक्तिक आहे पण असे वाटते एक वेळ पाकिस्तान भारतात शामिल करणे सोपे पण ईथल्या सेक्युलर वाद्यांचे देशहीतासाठी मन वळवणे कठीण आहे. एवढच काय तुम्ही ज्या उपायान्चा विचार मांडलात तेसुद्धा प्रामाणिकपणे राबवण्याबाबत शंकाच आहे खास करुन जम्मु मधले मुस्लिमही पाकिस्तानात पाठवणे वैगेरे. काश्मिर हा दुर्गम असला तरी सरंक्शण व लश्करी दृश्ट्या अतिशय महत्वाचा भाग आहे. चीनचेही त्यावर बारीक लक्ष आहे. त्यानी आधीच रेल्वे सीमावर्ती भागात आणली आहे. जर हा भाग पाकिस्तानमधे गेला तरी डोकेदुखी राहणारच आहे. तसे मुस्लिम म्हणजे धरले तर चावते अन सोडले तर पळतय अशी परिस्थिती आहे. खरे म्हणजे हे सगळ फ़ाळणीच्या वेळेसच काश्मिर विशय नीट हाताळला असता तर ही समस्या नसती बनली. आणी ईतर संस्थाने आपण विलिन केलीच होती ना अगदी मुस्लिम बहुल हैद्राबदही मग काश्मिरही त्याचप्रमाणे सामिल करायला हवे होते. मुळात फ़ाळणी झाली तर झाली पण त्याची अम्मलबजावणी अतिशय चुकीची झाली. फ़ाळणीच्या आधी हिन्दु मुस्लिम नागरिकांची अदला बदल करणे अत्यंत आवश्य्क होते. आणी नेमके तेच केले गेले नाही व लाखो निरपराधांची (कत्तल) हिंसा स्वघातकी अहिंसेच्या हेकेखोरपणामुळे झाली अहिंसेच्या नावाखाली ईतका प्रचंड रक्तपात? हाच चुकीच्या अहिन्सेचा मोठा पराभव होता व त्यामुळेच झालेला महात्मा गान्धीन्चा वध ह्या गोष्टी ईतिहासात नमुद झाल्यात. एक विचार असा होता की फ़ाळणी टाळणे काहीच कठीण नव्हते पण जेंव्हा देशापेक्षा व्यक्ति मोठी ठरते व स्वार्थी बगळ्यांचे वैयक्तिक राजकारण आड येते त्यावेळेस देश म्हणजे कीस झाड की पत्ती. तो तर केवळ एक जमीनीचा तुकडा ठरतो... आठवा.. तिबेट जेंव्हा चीनच्या घशात घातला तेन्व्हा ह्याच नेहरुने जीथे गवताचे पातेही उगवत नाही अशा प्रदेशाचा काय फ़ायदा असले बेजबाबदार उद्गार काढले होते. फ़ाळणीपेक्षाही भयंकर परिस्थिती अमेरिकेच्या ईतिहासात वांशीक संघर्शाच्या वेळेस होती बरीच यादवी माजली होती, ठीकठीकाणे युद्धे व देशाचे किती तुकडे पडतील अशी भयंकर परिस्थिती होती पण अब्राहम लिंकन सारख्या दुरदर्शी नेत्याने देशाची कोणतीही फ़ाळणी न होउ देता अमेरिका एकसन्ध ठेवली कारण त्यानी व्यक्तिपेक्षा देशाला मोठे मानले असे आपल्याकडे का शक्य नाही झाले.
|
Chyayla
| |
| Tuesday, July 17, 2007 - 8:33 pm: |
| 
|
उदय, १९६२ चे युद्ध, नेहरुंचा बाईलवेडेपणा यासोबत बर्याच गोष्टी आहेत त्याबद्दल सत्य कधी बाहेर येइल का अशी शन्का आहे. उदाहरणार्थ.. १) १९६५ च्या पाकिस्तान युद्धाच्या वेळेस भारताचे पंतप्रधान लालबहादुर शास्त्री (गैर गांधी, नेहरु कुटुम्बातले) यांचा ताश्कंदला झालेला गुढ मृत्यु की राजकिय हत्या. २) संजय गांधीचा मृत्यु हेही एक राजकिय महत्वाकांक्शेपायी केली गेलेली हत्या वाटावी ईतके गुढ. ३)क्वात्रोची मामाचे बोफ़ोर्स प्रकरण. ४)नेताजी सुभाशचन्द्र यान्चा विमान अपघात काही जण दावा करतात की ते त्यानन्तरही जीवन्त होते. सध्याच्या सरकारजवळ तर त्यांच्याबद्दल काहीच माहिती नाही असे धक्कादायक वृत्त आहे. ५)ताज्या बातमीत व्ही जी. पाटील हत्याप्रकरणी मुम्बई हायकोर्टाने CBI वरच ताशेरे ओढलेत. प्रत्येक पानावर प्रतिभा पाटील यांचे नाव असुनही त्याबाबतित चौकशी का केल्या गेली नाही? वरच्या गोष्टी कितीही विश्वास ठेवायच्या म्हटल्या तरी सामान्य तर्काला पटत नाहीत. यांचे रहस्य कधी उलगडेल काय?
|
Zakki
| |
| Tuesday, July 17, 2007 - 9:52 pm: |
| 
|
मला नाही वाटत की या सर्व गोष्टीतले सत्य बाहेर आले तरी काही फरक पडेल. झाले गेले होऊन गेले, आता आज मला सत्ता कशी मिळेल, नि मला पैसे कसे मिळतील याकडेच सर्वांचे लक्ष आहे. अगदी राजकीय नेते, ज्यांच्याजवळ शंभर कोटी रुपये आहेत असे म्हणतात, त्यांनाहि त्यात आणखी भर घालण्याची चिंता आहे. सत्याची चिंता, इतिहासातून शिकणे, यात त्यांना काहीच गम्य नाही. त्याचा जनतेचे, देशाचे भले करण्याबाबत तर अजिबात नाही! म्हणजे काय बरोबर नाही हे सांगून सुद्धा ते बरोबर करण्याची त्यांची इच्छा नसते. तेंव्हा तुमच्यासारखे, ज्यांना सत्याची चाड आहे, नि ज्यांचे मन देशाची परिस्थिती पाहून हे असे का, नि हे कसे सुधारेल याबद्दल व्यथित होते, असे लोकच यात लक्ष घालतील. मग कदाचित् त्यातलेच कुणितरी भारतासाठी एक दीर्घकाळ चालेल अशी strategy बनवू शकतील. मी तुम्हास सुयश चिंतितो.
|
चौक डॉट कॉम या पाकिस्तानी साईटवर मी कधी कधी जातो. काश्मीर वर भारताचा हक्क असून पाकिस्तान ने निम्मा भाग बळजबरीने बळकावला ही आपल्याला ज्या प्रामाणीक पणे वाटते तसेच काश्मीर आपलाच आहे आणी भारताने तो बळकावला आहे असे त्याना वाटते. बहुसन्ख्य प्रजा मुस्लीम असल्याने राजा हिन्दू असला तरीही काश्मीर पाकिस्तानात जायाला हवे होते या त्यान्च्या मुद्द्याचा प्रतिवाद कसा करणार? शिवाय आजही आपण सार्वमत का घेत नाही या प्रश्नाला उत्तर काय द्यावे? अमेरिकेत काम करताना एका चिनी माणसाशी चान्गली मैत्री झाली. त्यान्च्या शाळेत शिकविला जाणारा भारत चीन युद्धाचा इतिहास आपल्य अगदी विरुद्ध आहे.
|
आणी भारताने तो बळकावला आहे असे त्याना वाटते. बहुसन्ख्य प्रजा मुस्लीम असल्याने राजा हिन्दू असला तरीही काश्मीर पाकिस्तानात जायाला हवे होते या त्यान्च्या मुद्द्याचा प्रतिवाद कसा करणार? शिवाय आजही आपण सार्वमत का घेत नाही या प्रश्नाला उत्तर काय द्यावे?>>>>> ओहो म्हणजे हरिसिंहा ने स्वतंत्र राहायचा निर्नय त्यांना माहीती न्हवता का? मग जर एवढीच तेथील स्वातंत्र्याची चाड असेल तर त्या स्वतंत्र काश्मीर वर हल्ला का केला? मग त्या राजाने भारताला बोलावले तर त्याचे काय चुकले. नंतर तो भारतात समाविष्ट होत आहे असे समजल्यावर तेथील जनतेने दंगल (तेव्हा) का केली नाही? की त्यांना ही भारतात येने मान्य होते? या प्रश्नांचे उत्तर काय आहेत त्या साईट वर? ईराक मधे जायला पाहीजे का? या विषयावर इथे अनेकदा जनमत घेतले गेले त्या सर्व जनमंताना जायला नाही पाहीजे असेच उत्तर आले मग तरी येथील मिल्ट्री तेथे का आहे? काही गोष्टी जनमतांवर सोपवता येत नाहीत हे बहुतेक येथील लोकांना माहीती असावे. काश्मीर टाका देऊन. निदान अर्थव्यवस्थेवर्चा भार कमी होईल. पण अजुन १० वर्षांनतंर तेथुन परत अतिरेकी आले तर? आज बाग्लांदेशाचे काय झाले आहे हे आपणास माहीती असेलच. अमेरिकेत काम करताना एका चिनी माणसाशी चान्गली मैत्री झाली. त्यान्च्या शाळेत शिकविला जाणारा भारत चीन युद्धाचा इतिहास आपल्य अगदी विरुद्ध आहे>>> असनारच व असायलाच पाहीजे. कारण ते ' त्या ' देशाशी निष्टा असनारे नागरिक घडवु पाहात आहेत. आपण फक्त हिंदी चिनी भाई भाई वर बसलो आहोत. या चिन्यांचे हे पहीलेच आक्रमन अशी ९९ टक्के भारतीयांची समजुत आहेत पण या आधी १० लाख चिनी घेऊन त्यांनी आक्रमन केले होते व ते आपण परत्वुन लावले हे कुठे माहीत. कारण जो खरा ईतिहास आहे तोच ते मांडत नाहीत कारण त्यांना जातियवादा ची भिती वाटते. मुसलमानी ईतिहास तर काहीही मांडला जात नाही. निदान जे अत्याचार आपल्या जनतेवर झाले ते तरी निट मांडायला पाहीजेत. उलट आपल्याकडे आपण सोडुन ईतर कसे ग्रेट होते याचाच गवगवा केला जातो. ५० वर्षानंतर आता काही ईतिहासकार खरा ईतिहास माँडत आहेत. माझ्या अमेरिकन मित्राने मला १९७१ मध्ये भारताने कसे युध्द सोडुन दिले कारण अमेरिकेची ७ वी प्लीट पाक ला मदत करायला निघाली व त्यामुळे भारताने आहे तसे युध्द सोडले अशी त्याची भावना आहे. ते खरे आहे काय? अनेक वादांनंतर व असनार्या पुराव्यांनंतर त्याने मान्य केले की भारतने अमेरिका यायच्या आत पाकड्यांना शरनागती पत्कारने भाग पाडले. यावर ती साइट काय म्हनते? पाकीस्थान्च्या लोकांचे उदा काय देता सायबा. मी तुम्हाला आपल्याच देशातील एका उच्च शिक्षीत मुसलमानाचे उदा देतो. त्याचे नाव आहे परवेझ हसीन. एका मोठ्या आय्टी कपंनीत तो माझा सहकारी होता मुंबईत. त्याचा म्हनन्या प्रमाने भारताला आपल्या दोन्ही बाजुला ( east and west ) पाक नको होता. तेव्हा बाग्ला east pak होते म्हनुन भारताने हल्ला करुन तो बाजुला काढला व बांग्लादेश तयार केला. आता हे तुम्ही खरे मानाल काय? मानत असाल तर सांगा ते खरे कसे? पुर्व पाकवर अनन्वीत अत्याचार त्यांचाच देशाने केले, आपण त्यांना स्वतंत्र व्ह्यायला मदत केली तर उलट आज तेच आपल्या विरुध्द. घटना एकच पाहनारे दोन म्हणुन दोन व्हर्जन असनारच कुलकर्नी. यात मोठे काय? खरे आपण स्व्त शोधुन बघायला पाहीजे.
|
Zakki
| |
| Wednesday, July 18, 2007 - 1:38 pm: |
| 
|
१९७१ मधे व्हिएटनाम युद्ध जोरात चालू होते, व अनेऽक अमेरिकन त्याविरुद्ध होते. आपले सैनिक इतक्या लांब जाऊन दुसर्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी का मरताहेत, असा प्रश्न तेंव्हा होता. (मी अमेरिकेतच होतो तेंव्हा, नि आत्ताच्या इराकविरोधी चळवळीच्या कितीतरी पटीने जास्त व्हिएटनामला विरोध होता.) म्हणून निक्सनला ते सातवे आरमार वगैरे तिथेच गप्प बसवून ठेवावे लागले. त्याच वेळी किसिंजर, जो अमेरिकेचा Secretary of State होता, त्याने असे उद्गार काढले होते की 'BangalAdesh is a bottomless pit' . म्हणजे कितीहि मदत केली तरी तो देश खड्ड्यातच राहील. म्हणून निक्सनने काही केले नाही. भारतानेहि अत्यंत शहाणपणाने त्यांना जे हवे होते ते मिळाल्यावर लगेच युद्ध थांबवले. १९९० मधे अमेरिकेने कुवेट व सद्दाम बद्दल तोच शहाणपणा दाखवला. या वेळी इराकवर हल्ला का, याची बरीच वाजवी कारणे जनतेसमोर आलेली नाहीत. ती मी इथे लिहीली तरी त्यात भारतीयांना काहीच गम्य नाही. भारताच्या अहिंसा इ. तत्वात ते बसत नाही. शिवाय भारतीयांना मुसलमानांचे अतिशय प्रेम! त्यांना ते पटणार नाही. एक मात्र खरे की आजचे युद्ध व त्या अनुषंगाने करण्यात येणारे सर्व प्रकार हे अत्यंत incompetent नि arrogant to the point of lying असे आहेत. सध्या जरी सैनिक परत आले, तरी पुढे मागे लवकरच अमेरिका या ना त्या कारणाने, उघड किंवा छुप्या मार्गाने इराकमधे जाईलच, कारण जोपर्यंत तेल आहे, इस्राईल आहे, तोपर्यंत अमेरिकेचे हितसंबंध तिथे गुंतलेले आहेत. सध्या फक्त सौदी अरेबिया अमेरिकेचा मित्र आहे, तो सुद्धा फक्त तिथला Dictator . इराणच्या शहा प्रमाणे त्याला केंव्हा उडवून लावतील, याचा भरोसा नाही. बुश कुटुंबाचे नि त्यांचे अत्यंत खाजगीतसुद्धा संबंध आहेत, त्यामुळे बुशला काहीतरी माहित आहे जे इतरांना नाही!
|
पण या आधी १० लाख चिनी घेऊन त्यांनी आक्रमन केले होते व ते आपण परत्वुन लावले हे कुठे माहीत. can you elaborate ? our opinion about kashmir is a function of whether we are born in India or Pakistan.
|
I knew you are going to ask that question. (thats why I put that quote there) . You can read Bhavishya Purana, The King who won that battle is called as Shalivahan, (jhyach Shak aaj aapan laavato). our opinion about kashmir is a function of whether we are born in India or Pakistan>> Ref my post I have said -- घटना एकच पाहनारे दोन म्हणुन दोन व्हर्जन असनारच कुलकर्नी. यात मोठे काय? खरे आपण स्व्त शोधुन बघायला पाहीजे बर ते मी जे प्रश्न विचारले आहेत त्याची उत्तर त्या साइट व आहेत का? तुम्ही वाचले असल्यास लिहाल का?
|
निज़ामने स्वतन्त्र रहायचा निर्णय घेतला होता तरीही भारतने हैदराबाद सामील करून घेतलेच ना? आणी तिबेट मधल्या जनतेने दन्गल केली नाही म्हनून त्याना चीन मध्ये जाणे मान्य होते का? पन्नास वर्षानन्तर ही आपण सार्वमत का घेत नाही? काही गोष्टी जनमतांवर सोपवता येत नाहीत हे बहुतेक येथील लोकांना माहीती असावे. म्हणजे राज्यकर्त्याना जनमतापेक्शा जास्त कळते का? इराक मध्ये अमेरिकेने जाणे योग्य होते असे म्हणायचे आहे का?
|
Zakki
| |
| Wednesday, July 18, 2007 - 11:16 pm: |
| 
|
अमेरिकेच्या मते इराकमधे जाणे योग्यच नव्हे, तर आवश्यक होते, म्हणून गेले. आता पुढे घोळ घातला, नालायकपणामुळे. पण जाण्यासाठी प्रचंड बहुमताने हल्ला करायला अमेरिकन जनतेने पाठिंबा दिला होता. हे कारण अमेरिकेला पुरेसे आहे. योग्य आहे का नाही हे जगातल्या इतर पुचाट देशांनी ठरवावे. काही करण्याची त्यांच्यात नाही ताकद, म्हणून नुसतेच शिव्या देत बसणार. भारतातले लोक काय म्हणतील, इतकेच काय, रशिया, चीन काय म्हणतील याची सुद्धा त्यांना पर्वा नाही. हे अहिंसा, morality , जग काय म्हणेल असले प्रश्न देशाच्या हिता आड येत नाहीत बलवान राष्ट्रांना. बाकी जगात कुणाला हिंमत असेल तर थांबवा. वास्तविक ज्याप्रमाणे इराण, कोरिया यांच्यावर sanctions आणतात तसे अमेरिकेच्या बाबतीत करण्याची कुणाचीहि इच्छा नाही नि ताकद नाही. 'सर्वे गुणा: कांचनमाश्रयंते'. भारतातले लोक मारे शेखी मिरवतात, आमच्या मुळे अमेरिकेचे काँप्युटर चालतात. मग तुम्हाला अमेरिकेचे वागणे पसंत नसेल तर थांबवणार का अमेरिकेशी व्यापार करण्याचे? मुळीच नाही. नि केले तरी चिनी, आयरिश हे सगळे टपून बसले आहेतच. ते morality , अहिंसा या फुकाच्या गप्पा. मायबोलीवर वेळ घालवायला ठीक आहेत. पैसे महत्वाचे.
|
Zakki
| |
| Wednesday, July 18, 2007 - 11:27 pm: |
| 
|
काश्मीरसाठी सार्वमत घेण्यात पैसे खर्च करण्याची काही गरज नाही. ते लोक भारतात सामिल व्हावे असेच म्हणणार!पाकिस्तान त्यांना काय देणार? डोंबल? त्यापेक्षा भारतातच राहून भारतविरोधी करवाया करू, भारत सरकारच्याच पैशाने, असे ठरवण्याइतकी अक्कल असेलच त्यांना. मुशर्रफ हुषार आहे, नि भारतीय नेते म्हणजे काय पण विचारता? सगळी अक्कल इटालियन बाई नि मुसलमानांकडे गहाण ठेवलेली! ते काश्मीरला कधीहि भारतात सामावून घेऊन हिंदूंना तिथे जायला नि जमिनी विकत घ्यायला, रहायला परवानगी देणार नाहीत. कायदाच आहे भारतात तसा! विजयसारख्या हुषार लोकांना सुद्धा त्यांनी brainwash केले, मर्यादित secular , म्हणजे हिंदूंविरुद्ध नि मुसलमानांच्या बाजूने बोलायला शिकवले. तद्दन भारतीय secular !!
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|