Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 13, 2007

Hitguj » Views and Comments » Current Affairs » बातम्यांचे / लेखांचे संकलन » Political » Archive through July 13, 2007 « Previous Next »

Satishmadhekar
Friday, July 13, 2007 - 6:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> कायद्यापेक्षा काही व्यक्ती मोठ्या आहेत हे घटनेतच सांगितले आहे. उदा. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, सर्व मंत्री, राज्यपाल इ. नरपुंगव हे कायद्याच्या वर आहेत.
>> हे ही घटनेत कुठे आहे हे जरा कळले तर माझ्याही ज्ञानात भर पडेल असे वाटते...

माझा घटनेचा अभ्यास नाही. त्यामुळे मला घटनेचे नक्की कोणते कलम हे सांगता येणार नाही.

वर्तमानपत्रातून जे येते त्यावरून मी हे मत बनविले आहे. राष्ट्रपती हे पिनल कोडच्या बाहेरे आहेत असे तुम्हीच सांगितले आहे. कोणत्याही मंत्र्यावर खटला भरायला राज्यपालाची परवानगी लागते. राज्यपाल पक्षाचे हित समोर ठेवून परवानगी नाकारू शकतो किंवा अनंत काळापर्यंत परवानगीच्या अर्जावर बसून राहू शकतो. हे मंत्र्यांना दिलेले कायद्याचे संरक्षणच आहे. उद्या प्रतिभाताई राष्ट्रपती झाल्यावर त्यांच्या गैरकृत्यांची चौकशी आपोआपच बंद होईल. मायावतीला नुकतेच राज्यपालांनी भ्रष्टाराच्या खटल्यातून अभय दिले आहे.

एखाद्या व्यक्तीला (किंवा पदाला) पूर्णपणे कायद्याच्या बाहेर ठेवणे किंवा बाहेर न ठेवता असंख्य अडथळे निर्माण करून कायद्याचे हात तिथपर्यंत पोचणारच नाहीत अशी व्यवस्था करणे या दोन गोष्टीत फारसा फरक नाही.

अजून एक उदाहरण. पद्मसिंह पाटलांनी आपल्या कारखान्याच्या माध्यमातून कारगिल निधीचे ५२ लाख रुपये स्वाहा केले हे निर्विवाद सिद्ध झाले. अण्णा हजार्‍यांनी हे प्रकरण बाहेर काढल्यानंतर महाराष्ट्र सरकारने एक आयोग नेमून त्याची चौकशी केली. या आयोगासमोर पाटलांनी पैसे खाल्ल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर राज्य सरकारने कृती अहवाल तयार करून पाटलांवर खटला दाखल करणे आवश्यक होते. परंतु राज्य सरकारने आपल्या अधिकारात त्यांना मुक्त केले. भ्रष्टाचाराला दिलेले हे घटनात्मक संरक्षणच आहे.


Robeenhood
Friday, July 13, 2007 - 6:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केशवानन्द भारती प्रकरनावर मी यथावकाश लिहिणारच आहे.त्यासाठी काही बेसिक माहिती इथे लिहून पार्श्वभूमी तयार करावी लागणार आहे.
अज्जुका अप्पा बळवन्त चौकात ्घटनेची मराठी हिन्दी इंग्रजी पुस्तके पोत्याने मिळतात.(खरजेच्या मलमासारखी तशी ती ’सर्वत्र मिळतात’)५० रुपयापासून पाच हजार रुपयापर्यन्त!
पण नुसती शुद्ध घटना घेतली तर ती डोक्यावरूनच जाईल.त्यात कॊमेन्टरीज अथवा कॊन्टीट्यूशनल लॊची पुस्तके वाचल्यास उत्तम...

Chyayla
Friday, July 13, 2007 - 6:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"There is no need to review our constitution. Our constitution is perfect, We should find out if we have failed our constitution or if the constitution has failed us."

वरचे वाक्य ही अर्थात राष्ट्रपतींचे स्वता:चे मत नसावे कारण ते एका विषिश्ट पक्षाचे हितैशी होते. राष्ट्रपती, राज्यपाल पदे ही केवळ सोयीच्या राजकारणासाठीच असतात असा अतिशय चुकीचा पायंडा कॉंग्रेसने घातलेला आहे त्याचे प्रत्यंतर दर वेळेस आवर्जुन येतेच. वरचे विधानही त्यातलाच प्रकार आहे.

सतिश माढेकर एकदम मुद्याच बोललात. जे स्वता:ला संपुर्ण निर्दोष समजते त्यात सुधारणा होणे शक्य नाही. घटनेचा आढावा काही ठरावीक काळानंतर घेण्याची तरतुद घटनेमधेच असावयास हवी होती, काळानुसार काही गोष्टी बदलाव्या लागतात. त्यामुळे रॉबीनहुड तुम्ही कितीही म्हणालात की घटना खुप चांगली आहे, निर्दोष आहे तरी तसे म्हणायची ती फ़्याशनही आहे तुम्ही कोणतेही घटनेवरचे पुस्तक वाचा त्यात अश्या थोडाफ़ार फ़रकाने अवास्तव स्तुतीच केलेली आढळेल अगदी मान्य की घटना खुप विचार करुन लिहिली आहे तरी त्यात दोष रहाणारच काळाच्या कसोटीवरच ती किती सदोष आहे हे कळुन चुकले संपुर्ण घटना न वाचता सुद्धा ही बाब कोणाच्याही लक्षात येण्यासारखी आहे. नाहीतर याचीही गत प्रेषीताच्या न बदलणार्या धर्मग्रंथासारखी व्हायची आणी मग तर भलेच भले आहे. वाजपेयी सरकाराच्या अनेक चांगल्या निर्णयापैकी हाही एक योग्य निर्णय होता पण बाबासाहेब आंबेडकरांची घटनेच्या अपमान करण्यात येतो आहे अशी आरोळी ठोकुन त्याचे भावनिक राजकारण केल्याच अजुनही आठवते.

दोष घटनेमधे तर आहेच आणी त्यातल्या राबवण्यातही आहे त्यातील पळवाटा काढुन त्याचा उपयोग केल्या जातो ह्या पळवाटा तेंव्हा लक्षात येत नाही त्या काळानुसारच त्यातल्या पळवाटा, उणीवा लक्षात येतात.

बाकी सतिशजवळ माहितीचा उत्तम खजिना आहे हे पांडे प्रकरण तरी किती जणाना माहित असेल कुणास ठाउक.

केदारांची एक सुचना खरोखरच आवडली राजकिय व्यक्तिना विषेश अधिकार असावे पण विषेश वागणुक नसावी. कदाचित ही सायबाची गुलामगिरी करता करता भारतिय जनमानसला सवय पडली आहे. खरे तर एका आमदार खासदारावर किती खर्च केल्या जातो याचा हिशेब करता करता सामान्य जनान्चे डोळे पंढरे व्हायची वेळ यायची. अलिशान बंगले बळकावणे, वीजेचा, टेलीफ़ोन बीलांचा अतिरेकी वापर अर्थात त्याना काही सुट असावी पण त्याला काही तर मर्यादा असावी.


Robeenhood
Friday, July 13, 2007 - 6:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माढेकर थोडे थाम्बा , तुमचे बरेच समजांचे निराकरन होईल मग तुम्ही योग्य घटकाना दोष द्याल!

Satishmadhekar
Friday, July 13, 2007 - 6:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> माढेकर तुम्ही भारतिय राज्यघटना एकदा तरी सम्पूर्ण वाचली आहे काय? अपेक्षा आहे खरे उत्तर येईल...

मी घटना वाचलेली नाही. मी माझी मते आजूबाजूला घडणार्‍या घटना, माध्यमांनी केलेले विश्लेषण, प्रत्यक्षात आढळणारी वस्तुस्थिती अशांवरून बनवलेली आहेत.

घटनेत काय लिहीले आहे किंवा कायदा कसा सर्वांसाठी समान आहे असे वाचण्यापेक्षा, प्रत्यक्ष रोजच्या जीवनात भ्रष्टाचारी आणि गुन्हेगार कायद्याच्या संरक्षणातच मुक्तपणे धुमाकूळ घालतात आणि घटना आणि घटनेचे रक्षक घटनेचाच आधार घेऊन त्यांचा पाठीशी उभे राहतात यावरून माझी मते बनलेली आहेत.


>> (अर्थात ही घटना वाचण्याच्याच काय पन हातातही धरण्याच्याही लायकीची नाही हे तुमचे मत असेल तर मी हा प्रश्न मागे घेतो!)

तुमचा अंदाज खरा आहे. देशातल्या सर्व नागरिकांना समान वागणूक न देणार्‍या आणि असंख्य दोषांनी भरलेल्या घटने बद्दल मला फारसा आदर नाही.


Robeenhood
Friday, July 13, 2007 - 6:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि कृपया मीडीयावरून मते बनवू नका. प्रत्येक माध्यम हे गोबेल्स असते.तो व्यवसाय आहे.कोणती गोष्ट प्रोजेक्ट करायची , कशाचा क्याम्पेन उघडायचा याचे तन्त्र ठरलेले असते. आपण सुशिक्षीत आहोत. आपण सर्व सोर्समधून खात्री केली पाहिजे.अविनाश भोसले प्रकरन एकाच वृत्तसमूहाने लावून धरले.बाकीच्या च्यानेल, प्रिन्ट माध्यमाने गुळणी धरली.व्यवस्थापनाचे धोरण! बातम्यावर किती घटक परिणाम करतात हा तर फार गहन विशय. त्यावर नन्दिनी वगैरे लिहू शकतील.मी ते क्षेत्र सोडल्याला फारच दिवस झाले.

Chyayla
Friday, July 13, 2007 - 6:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रॉबीनहुड, पण या घटना ज्या प्रत्यक्ष घडल्या त्याही मिडियाने घडवुन आणल्या असे म्हणायचे आहे की काय? घटना घडल्यावर त्याचा व्यवसाय कसा करायचा हा मिडियाचा प्रकार सगळ्यानाच माहिती आहे. पण घटना तर घडली ना ते तर तुम्ही काय कोणीही नाकारु शकत नाही. त्यातल्या त्यात सतिशनी जितकी उदाहरणे दीलीत तेही प्रत्यक्ष घडले आहेत भले मिडिया त्याला कशीही प्रस्तुत करो.

Robeenhood
Friday, July 13, 2007 - 6:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी घटना वाचलेली नाही. मी माझी मते आजूबाजूला घडणार्‍या घटना, माध्यमांनी केलेले विश्लेषण, प्रत्यक्षात आढळणारी वस्तुस्थिती अशांवरून बनवलेली आहेत. >>>
तुमचा अंदाज खरा आहे. देशातल्या सर्व नागरिकांना समान वागणूक न देणार्‍या आणि असंख्य दोषांनी भरलेल्या घटने बद्दल मला फारसा आदर नाही. >>>

. तुमचे पोस्ट मी नन्तर पाहिले. अता तुमच्याशी चर्चा करण्याचे कारणच राहीलेले नाही. तुमचे समज दूर करण्याचे मला काही कारण नाही.
पण तुम्ही इथे जे काही गैरसमज इथे पसरवत होतात त्यासाठी मला काही वस्तुनिष्ठ गोष्टी नमूद कराव्या लागल्या इतकेच.



Robeenhood
Friday, July 13, 2007 - 6:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्यामुळे रॉबीनहुड तुम्ही कितीही म्हणालात की घटना खुप चांगली आहे, निर्दोष आहे तरी काळाच्या कसोटीवरच ती किती सदोष आहे हे कळुन चुकले संपुर्ण घटना न वाचता सुद्धा ही बाब कोणाच्याही लक्षात येण्यासारखी आहे.>>>>

तुम्ही काहितरी पोस्ट एडिट करून गडबड केलेली दिसते:-). मुळात तुम्हाला मलाच 'वाजवायचे' होते. असो, घटना न वाचणारांकडून मला माझी मते आणि कन्सेप्ट दुरुस्त करून घ्यायचे नाहीत. तुमचे 'प्रचाराचे' काम चालू द्या!

it is cathersis of emotions!


Satishmadhekar
Friday, July 13, 2007 - 6:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> वरचे पोस्ट वाचून आता मला तो प्रश्न माढेकराना विचारण्याची निश्चित वेळ आली आहे असे वाटते. कारण माढेकर घटनेचा प्रतिवाद करीत नसून माझा प्रतिवाद करीत आहेत अशी माझी निश्चित खात्री झाली आहे.

मी तुमच्या पोस्टचा प्रतिवाद करत आहे. तुम्ही प्रत्यक्षात कोण आहात याची मला माहिती देखील नाही. त्यामुळे तुमचा व्यक्तीगत प्रतिवाद करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

>>> आणि कृपया मीडीयावरून मते बनवू नका. प्रत्येक माध्यम हे गोबेल्स असते.तो व्यवसाय आहे.कोणती गोष्ट प्रोजेक्ट करायची , कशाचा क्याम्पेन उघडायचा याचे तन्त्र ठरलेले असते. आपण सुशिक्षीत आहोत. आपण सर्व सोर्समधून खात्री केली पाहिजे.अविनाश भोसले प्रकरन एकाच वृत्तसमूहाने लावून धरले.बाकीच्या च्यानेल, प्रिन्ट माध्यमाने गुळणी धरली.व्यवस्थापनाचे धोरण!

माध्यमांचा परिणाम कळत नकळत होत असतो. असे घडणे अपरिहार्य आहे. आपण स्वतः प्रत्येक ठिकाणी जाऊन सत्य परिस्थिती पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे एकापेक्षा जास्त माध्यमांद्वारे माहिती मिळवून स्वतःचे मत बनविता येते.

अविनाश भोसले प्रकरण ज्या वृत्तसमूहाने लावून धरले तो समूह फक्त एका विशिष्ट पक्षाच्याच विरूद्ध तावातावाने लिहितो. त्या वृत्तसमूहाचा ज्या पक्षाला पाठिंबा आहे त्या पक्षाच्या गैरकृत्यांबद्दल हा समूह चकार शब्द सुद्धा काढत नाही.

अशा वेळी फक्त त्या बातमी किंवा घटनेवरून आपण स्वतः विश्लेषण करून स्वतःचे मत बनवू शकतो. त्या बातमीच्या बरोबर त्या समूहाने जो स्वतःचा मालमसाला घातलेला असतो त्याकडे दुर्लक्ष करता येते.

उदा. ९ / ११ दुर्घटना झाली ही बातमी. या दुर्घटनेवर बराच खल झालेला आहे. तुम्ही ज्या समूहाचा उल्लेख केला त्या समूहाने तर स्वतः बुशने ही योजना आखली होती असे अनेक वेळा लिहीले आहे. इतर माध्यमातून लादेन विरूद्ध बोट दाखविले जाते. अशा वेळी हे कृत्य कोणी केले असावे, त्यामागे हेतू काय असावा, हे केल्यामुळे कोणाचा फायदा-तोटा झाला आहे इ. चे विश्लेषण करून तुम्ही स्वतः काही निष्कर्ष काढू शकता. त्यासाठी माध्यमांची सर्व मते ग्राह्य धरण्याची आवश्यकता नाही.


Paul
Friday, July 13, 2007 - 7:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जूका
D.D.BASU यांचे INDIAN CONSTITUION पुस्तक पहा. २३० ते २४० रु ना नक्की मिळेल
खूप खूप वेळा वाचावे लागेल, तेव्हा त्यातील बारकावे समजतील.


Ajjuka
Friday, July 13, 2007 - 7:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हुडा, पॉल धन्यवाद. वाचून पाहीन माझ्या बुद्धीला काही समजते का ते.

Robeenhood
Friday, July 13, 2007 - 8:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ते नक्कीच समजेल. कायदा म्हणजे कोडीफाईड कॉमनसेन्स असे म्हटले जाते. त्यामुळे काही माणसे स्वत्:च्या केसेस स्वत्: लढवू शकतात.कॉन्स्टिट्यूशनल लॉची पाठ्यपुस्तके वाचून बरेचसे समजेल. मीही कायद्याचा पदवीधर नाही. पण माझ्या कामाच्या अनुषंगाने मला तयारी करावी लागते. माझ्या विरुद्ध दाखल झालेल्या केसेसमध्ये मला माझा बचावही करावा लागतो :-). माढेकरांचे ऑब्जेक्शन असलेल्या पब्लिक सर्व्हंट इम्युनिटीचा IPC 197 तर मला पदोपदी सहारा घ्यावा लागतो अन्यथा माझ्या ऑफिसच्या प्रत्येक प्रकरणात समोरच्या माणसाने दाखल केलेया फौजदारी गुन्ह्यात दिवसातून दहा वेळा पोलीस मला अटक करायला येतील!!!(एका महानगरपालिकेसाठी जमीन मी सम्पादित करून ताबा दिला आहे. त्या जागेवर आता महापालिकेची मोठी इमारत उभी आहे. त्यावेळी मालकाने माझ्यावर क्रिमिनल ट्रेसपासचा १५ वर्षापूर्वी फौजदारी गुन्हा दाखल केलेला आहे. अजूनही त्या इमारतीसमोरून जाताना काळजाचा एक ठोका चुकतोच :-). अजून त्याला १९७ अन्वये शासनाने परवानगी दिलेली नाही. माढेकर असते तर नक्कीच दिली असती :-).. (माढेकर खरेच दिवा घ्या.) म्हणून मी वर कोठेतरी म्हतले आहे अशी इम्युनिटी का असते ते त्या क्षेत्रात काम केल्याशिवाय कळणार नाही...

त्यामुळे माझ्या वैय्यक्तिक 'सुरक्षे'साठी मला काही गोष्टी वाचणे भाग आहे कारण आम्हा सरकारी नोकरात एक म्हण आहे 'वाचाल तरच वाचाल!
असो, तात्पर्य जो पदवीधर आहे त्याला नक्कीच कायदा, घटना कळेल. घाबरण्याचे कारण नाही...)


मी वाचले म्हनजे गोलकनाथची केस मला माहीत नव्हती याची मला नाही म्हटले तरी खन्त वाटलीच होती.


Lopamudraa
Friday, July 13, 2007 - 8:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रोॅबिन्हूड हे सग्ळ कधीचे वाचायला मिळावे अस वाटत होतं.गोरखनाथ (की काय?) आनि केशवनंद भारती खटल्याब्द्दल वाचायची खुप उत्सुकता आहे कृपया लवकर लिहा.
मी इकडे फ़िरकलेच नव्हते मला वाटले ते नहमीचे फोटो सेशन चालु असेल..
v&C अशी चचा नेहमी होत राहो.


Robeenhood
Friday, July 13, 2007 - 8:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपे, तू सुटलीस या सगळ्या झमेल्यातून... :-)
तसा तुला रस असेल तर नेटवर सगळे आहेच. पन गोलकनाथचे मूळ प्रकरण नेट वर दिसत नाही. त्याला सुप्रीम कोर्ट रिपोर्टर बघावे लागेल. नेटवर गोलकनाथमधला ratio decidendi दिलेला दिसतो. हे सगळे टायपायला कंटाळवाणे वाटते. विशेषत्: वाचायला, जाणून घ्यायला कोणी उत्सुक नसेल तर....


Satishmadhekar
Friday, July 13, 2007 - 9:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> माढेकरांचे ऑब्जेक्शन असलेल्या पब्लिक सर्व्हंट इम्युनिटीचा

>>> अजून त्याला १९७ अन्वये शासनाने परवानगी दिलेली नाही. माढेकर असते तर नक्कीच दिली असती .. (माढेकर खरेच दिवा घ्या.) म्हणून मी वर कोठेतरी म्हतले आहे अशी इम्युनिटी का असते ते त्या क्षेत्रात काम केल्याशिवाय कळणार नाही...

तुमची केस नक्की काय आहे, ते मला माहिती नाही. त्यामुळे मी मतप्रदर्शन करू इच्छीत नाही.

पब्लिक सर्व्हंट इम्युनिटीच्या नावाखाली भ्रष्टाचारी आणि गुन्हेगारांना कायद्याचे संरक्षण द्यायला माझा विरोध आहे आणि यापुढेही राहील. माझ्या हातात अधिकार असते तर मायावती, लालू, पांडे बंधु, पद्मसिंह पाटील, नरसिंह राव हे व असे असंख्य गुन्हेगार पुढारी आयुष्यभर तुरुंगात बसले असते.




Lopamudraa
Friday, July 13, 2007 - 9:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नरसिंह राव >>> त्यांचे नाव या बाकिच्यात नका घेउ हो... एव्ह्ढे काही वाईट नव्हते ते.
रोबिन्हूड लिहा लिहा आम्ही वाचु.


Ajjuka
Friday, July 13, 2007 - 9:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हं.. बघतेच धाडस करून. काही प्रमाणात कायद्याची माहिती करून घ्यायची आता गरजच आहे मला. विशेषतः entertainment and trade शी संबंधित...

Satishmadhekar
Friday, July 13, 2007 - 10:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> नरसिंह राव
>> त्यांचे नाव या बाकिच्यात नका घेउ हो... एव्ह्ढे काही वाईट नव्हते ते.


निव्वळ झारखंड मुक्ती मोर्चा लाच प्रकरणच नव्हे तर हर्षद मेहता लाच प्रकरण, लोणची-मसाले सम्राट लखूभाई पाठक लाच प्रकरण, सेंट कीट्स फोर्जरी केस इ. इतर अनेक खटल्यात नरसिंहराव हे प्रमुख आरोपी होते. त्यांना एकाही खटल्यात शिक्षा न होता ते कसे सुटले हे गूढच आहे.

Chyayla
Friday, July 13, 2007 - 1:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुम्ही काहितरी पोस्ट एडिट करून गडबड केलेली दिसते. मुळात तुम्हाला मलाच 'वाजवायचे' होते. असो, घटना न वाचणारांकडून मला माझी मते आणि कन्सेप्ट दुरुस्त करून घ्यायचे नाहीत.

रॉबीनहुड, तुमचा गैरसमज का झाला कुणास ठाउक. कदाचित तुमच्या मताविरुद्ध लिहिल्यामुळे असे वाटले असेल. तसेच असेल तर माझ्यासोबत अनेक जण तुमची वाजवत आहेत हे लक्षात घ्या, किंवा तुम्हालाच वाजवुन घ्यायची हौस असावी. मला तरी माझे पोस्ट कोणत्याच दृष्टीनी वैयक्तिक वाटत नाही.

एक सामान्य नागरिक म्हणुन माझे ते घटनेच्या संदर्भात मत आहे. घटना नुसती वाचुन आंधळेपणे निर्दोष आहे म्हटले तर सगळे संपलेच यापेक्षा त्याचा प्रत्यक्ष लोकांसाठी उपयोग पहाणे जास्त उपयुक्त ठरेल कारण मला वाटत लोकशाहीत घटनेत लोकान्नी लोकांसाठी लोकांच्या भल्यासाठी बनवलेली घटना आहे निदान एवढे तरी वाचले होते. त्यामुळे घटना पुर्ण न वाचता ती वास्तवात कितपत लोकांसाठी उपयोगात आली आहे हे एक सामान्य नागरिक म्हणुन कोणालाही समजु शकत तेवढा Common Sense तरी आहे. आणी जर घटना खरच लोकांसाठी असेल तर सामान्य लोकांच्या मताचा आदर लोकशाहीत करणे आवश्यक आहे.

तुमच्या सारख्या ज्ञानी माणसाला ज्यान्नी घटनेचा खुप अभ्यास केला आहे मी कोण मते आणी दुरुस्त्या सुचवणार. ज्यान्नी घटना पुर्ण वाचली आहे समजली आहे त्यान्नीच मते मांडावे असे काही आहे मला ठाउक नव्हते. त्यामुळे मला माफ़ करावे कारण तुमच्याबद्दल एक आदर अजुनही आहे. कारण तुम्ही ईतरांसारखे नाहीत असे वाटले होते. बाकी तुमच चालु द्या...


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators