Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 11, 2007

Hitguj » Views and Comments » Current Affairs » बातम्यांचे / लेखांचे संकलन » Political » Archive through July 11, 2007 « Previous Next »

Zakki
Monday, July 09, 2007 - 7:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अर्थात त्याच मुलिशी

मग काय गंमत आहे त्यात? दुसर्‍या एखादीशी म्हंटले तर तो कोण 'शिंच्या गर्‍या' विचार तरी करेल!


रॉबिनहूड, या अश्या, संसदेत मारामारी करणार्‍यांना जनता का निवडून देते? उद्या अत्यंत गलिच्छ भाषा वापरली तर तेहि चालेल का? लाच घेऊन मते दिली तरी चालेल म्हणणारे न्यायाधीश नि नि लाच घेणारे सभासद कुठला आदर्श नवीन पिढीसमोर ठेवताहेत?

या सर्वांचा विचार करता, यावर काही कायदेशीर तोड काढली पाहिजे असे मला वाटते.

तसे इथेहि अनेक कायदे आहेत, पण कुणि इतक्या मोठ्या प्रमाणावर त्याचा दुरुपयोग केल्याचे ऐकीवात नाही. ज्यांनी पैसे खाल्ले त्यांच्यावर रीतसर खटला भरून बर्‍याच जणांना, चक्क तुरुंगात सुद्धा पाठवण्यात आले आहे. काही जणांनी आधीच राजिनामे दिले, पण तुरुंगवास चुकला नाही!

जनता लईच जागृत. स्वत: कायपण धंदे करतील पण प्रेसिडेन्टने जर एखाद्या intern बरोबर धंदे केले तर त्यालाहि, काही ना काही निमित्ताने जबरदस्त public मानहानीला तोंड द्यावे लागते. नाही म्हंटले तरी त्याचा परिणाम मतांवर होतोच.


Deshi
Monday, July 09, 2007 - 8:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माढेकरांनी जी उदाहरने दिली ती तर सत्य आहेतच. मग अशां बाबी रोखन्या साठी काही कायदा नाही का? पोलीसांना संसदेत का प्रवेश नसतो?

Vijaykulkarni
Tuesday, July 10, 2007 - 12:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गेल्याच आठवड्यात आचार्य धर्मेंद्र यांच्यावर केलेले तुमचे खोटे आरोप उघडे पडले.
कसे बुवा?
त्या कार्यक्रमाचे पुरोहित ते नव्हतेच असा तुमचा अजूनही आग्रह आहे का?

रॉबीन्हूड,
तुमचे पोस्ट वाचणे म्हणजे एक पर्वणीच.
लगे रहो.





Satishmadhekar
Tuesday, July 10, 2007 - 4:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> गेल्याच आठवड्यात आचार्य धर्मेंद्र यांच्यावर केलेले तुमचे खोटे आरोप उघडे पडले.
कसे बुवा?
त्या कार्यक्रमाचे पुरोहित ते नव्हतेच असा तुमचा अजूनही आग्रह आहे का?


कुलकर्णी,

तुम्ही पहिल्यांदा असे खोटे लिहीलेत की सतीप्रथेचे समर्थन करणारे वि. हिं. प. मध्ये उच्चपदावर आहेत. याचा पुरावा मागितल्यावर तुम्ही आचार्य धर्मेंद्र हे सतीच्या वार्षिक पूजेचे पुरोहीत होते असे अजून खोटे लिहीले.

याचाही पुरावा मागितल्यावर तुम्ही २ लिंक्स पाठविल्या. एका लिंकमध्ये तर स्वतः आचार्य धर्मेंद्र यांनी सती प्रथा ही भारताची धार्मिक परंपरा नाही असे स्पष्टपणे म्हणाले होते. त्यामुळे ते सतीप्रथेचे समर्थक आहेत हा तुमचा आरोप आपोआपच खोटा ठरला. त्याचप्रमाणे ते त्या कार्यक्रमाचे पुरोहीत होते असे कुठेही लिहीले नव्हते. त्यामुळे तुमचा दुसरा आरोपही खोटा निघाला.

आणि समजा आपण घटकाभर खरे मानले की ते त्या कार्यक्रमाचे पुरोहीत होते. पण म्हणून त्यांचा सती प्रथेला पाठिंबा आहे हे कोणी ठरवले? कदाचित पोटापाण्याचा व्यवसाय म्हणून ते पौरोहित्य करत असतील.

लागू, तेंडुलकर वगैरे मंडळी पोटापाण्यासाठी गहराई, अनहोनी वगैरे अंधश्रद्धा वाढवणार्‍या चित्रपटातून काम करतात आणि तरीसुद्धा अंधश्रद्धाविरोधी चळवळीत पुढे असतात. त्यांना मात्र तुम्ही अंधश्रद्धा वाढवणारे म्हणत नाही. मग आचार्य धर्मेन्द्र यांना तोच नियम का लागू नाही? अर्थात त्यांनी पौरोहित्य केले असे क्षणभर गृहित धरून मी हे लिहीत आहे. प्रत्यक्षात ते तिथे पुरोहीत होते असे अजून सिद्ध झालेले नाही. त्यामुळे खोट्या आरोपांना मी पाठिंबा देणार नाही.

तुमच्या स्वतःच्या लिन्क वाचून सुद्धा ते तिथे पुरोहीत होते असा अजून तुमचा आग्रह का? आणि अजूनही ते सतीप्रथेचे समर्थक आहेत असा तुमचा दावा आहे का? तसे असेल तर तुमचे आरोप सिद्ध करा. नाहीतर खोटे आरोप केले म्हणून माफी मागा.


Vijaykulkarni
Tuesday, July 10, 2007 - 12:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


आणि समजा आपण घटकाभर खरे मानले की ते त्या कार्यक्रमाचे पुरोहीत होते. पण म्हणून त्यांचा सती प्रथेला पाठिंबा आहे हे कोणी ठरवले?

हे म्हणजे एखाद्याने मी डान्स बार मध्ये गेलो होतो पण तिथे चहा घेत नव्हतो कशावर्रोन असे विचारण्यासारखे झाले.


Zakki
Tuesday, July 10, 2007 - 1:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो, एव्हढ्या रात्री दुसरी चहाची दुकाने उघडी कुठे असतात, जवळपास? म्हणून मग डान्स बारमधे जावेच लागते! हे माझे वैयक्तिक कारण.

याचा धर्मेंद्र या नटाशी किंवा गुरूशी काही संबंध नाही. पण उगाच निरर्थक चर्चा. कुणि सांगितले म्हणून आता कुणि सति जाणार आहे का? मग? उगीच आपला वाद घालायचा!




Satishmadhekar
Tuesday, July 10, 2007 - 2:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> आणि समजा आपण घटकाभर खरे मानले की ते त्या कार्यक्रमाचे पुरोहीत होते. पण म्हणून त्यांचा सती प्रथेला पाठिंबा आहे हे कोणी ठरवले?

>> हे म्हणजे एखाद्याने मी डान्स बार मध्ये गेलो होतो पण तिथे चहा घेत नव्हतो कशावर्रोन असे विचारण्यासारखे झाले.

बरोबर आहे. असे विचारायला काहीच हरकत नाही. डान्स बारमध्ये डान्स बघायला जाणार्‍यांप्रमाणेच डान्स करणारे पण जाऊ शकतात. आता तुम्ही डान्स बारमध्ये जाऊन मी कशावरून डान्स बघायला गेलो होतो असे विचारले तर लगेच पुढचा प्रश्न असा येईल मग तुम्ही डान्स करायला गेला होता का?

असो. तुम्ही दिलेले उदाहरण इथे अजिबात लागू पडत नाही. त्या कार्यक्रमाला इतर अनेक जण उपस्थित होते. तुमच्या अजब तर्कशास्त्राप्रमाणे ते सर्व जण सतीप्रथेचे समर्थक मानले पाहिजेत आणि निदान त्या गावात तरी दरवर्षी २-४ सती प्रकरणे होत असली पाहिजेत. पण तसे काही ऐकिवात नाही.

पुण्याजवळ थेऊरमध्ये रमाबाईंचे सती वृंदावन आहे. तिथे काही जण भेट देतात, गावातले काही जण फुले वगैरे अर्पण करून पूजा करतात. हे सर्वजण सतीसमर्थक मानले पाहिजेत आणि थेऊर मध्ये दरवर्षी अनेक सतीप्रकरणे होत असली पाहिजेत. पण तसे काही घडताना दिसत नाही.

सर्वात पहिल्यांदा तुम्ही खोटे आरोप केलेत. तुमचे आरोप खोटे आहेत हे निर्विवाद सिद्ध झाले तरी त्याबद्दल माफी न मागता दुसरे फाटे फोडायचा तुमचा प्रयत्न चालू आहे. अर्थात तुमच्यासारख्या निधर्मी, समाजवादी, मानवतावादी, बुद्धीवादी इ. "गुण" असलेल्याकडून असा खोटारडेपणाच अपेक्षित आहे.

अजूनही तुम्हाला एक संधी देतो. आचार्य धर्मेंद्र हे सतीप्रथेचे समर्थक होते / आहेत हा तुमचा आरोप सिद्ध करा नाही तर माफी मागा.


Satishmadhekar
Tuesday, July 10, 2007 - 2:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> याचा धर्मेंद्र या नटाशी किंवा गुरूशी काही संबंध नाही. पण उगाच निरर्थक चर्चा. कुणि सांगितले म्हणून आता कुणि सति जाणार आहे का? मग? उगीच आपला वाद घालायचा!

झक्की आजोबा,

कालबाह्य प्रथांवर वादविवाद करण्याची अनिस वगैरे मंडळींची जुनी खोड आहे. भारतात देवी रोग हद्दपार होऊन ३०-४० वर्षे होऊन गेली. गेल्या ३०-४० वर्षात भारतात देविचा रोगी आढळलेला नाही. १०० वर्षांपूर्वी कदाचित देवी हा रोग देवीच्या कोपामूळे होत असेल असे काही जण समजत असतील. परंतु आता रोगच अस्तित्वात नसल्याने ही समजूत देखील अस्तित्वात नाही. पण अजूनही अनिसवाले आपल्या कार्यक्रमात देवी रोगाबद्दलच्या समजूतीचा समावेश करतात. काही भरीव करता येत नसले की कालबाह्य झालेल्या देवी रोग, सतीप्रथा अशा विषयांवर परिसंवाद आयोजित करणे आणि हिंदू धर्माच्या गणेशविसर्जनासारख्या प्रथांना अंधश्रद्धा म्हणून पर्यावरणाच्या नावाखाली विरोध करणे हे यांचे कार्य. कालबाह्य झालेल्या प्रथांवरून खोटे आरोप करायचे आणि पुरावे मागितले की गप्प बसायचे ही यांची कार्यपद्धती.


Tatyavinchu
Tuesday, July 10, 2007 - 2:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्याच पोस्तात कुलकर्नीनी काही congress वाले पण होते असे सांगीतले आहे म्हणजे त्यांचा तर्कानुसार congress पण सति प्रथा माननारी आहे का? मग सोनीया सती का नाही गेल्या?

Zakki
Tuesday, July 10, 2007 - 4:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कारण त्या ख्रिश्चन आहेत. मायावती सारख्या बायकांनी सती जावे म्हणून त्यांचा सतीला पाठिंबा!

Vijaykulkarni
Tuesday, July 10, 2007 - 10:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुण्याजवळ थेऊरमध्ये रमाबाईंचे सती वृंदावन आहे. तिथे काही जण भेट देतात, गावातले काही जण फुले वगैरे अर्पण करून पूजा करतात.

हे सर्वजण रमाबाईन्बद्दल असलेला आदर व्यक्त करण्यासाठी जातात.
मी ही जाईन.
पण तेथे आलेल्यान्पैकी किती जण सती प्रथा आज ही असावी असे म्हणतील?

सर्वात पहिल्यांदा तुम्ही खोटे आरोप केलेत.
खोटे? ही घ्या आनखी एक लिन्क.
शिवाय राजमाता विजयाराजे ही होत्या.
या प्रकरणाविरुद्ध मोर्चा कुणी काढला? व्रुन्दा कारत

गणेश मुर्ती दान हे लोकान्च्या इच्छेनेच होते.
कायदा हातात घेणे, धाक दाखवणे असे घडत नाही.

अन्नीस जटानिर्मुलनाचा कार्यक्रम ही करते.
लहान लहान मुलीना देवीला सोडण्याच्या नावाखाली तीच्या आयुश्याची राख करणारे अमानूश प्रकार थाम्बविण्याचा प्रयत्न करते.
लहान लहान गावात बूवाबाजी करून लोकाना लुबाडणार्याना विरोध करते.
हिन्दू समाजातल्या अनिश्ट रूढीना विरोध करते.
हिन्दू मधल्या उणीवान्कडे लक्श द्यायला तुम्हाला वेळ कोठे आहे म्हणा, तुम्हाला मुस्लीमान्च्या चार लग्नाचीच काळजी.

आणी श्रीराम लागूनी चित्रपटात केलेल्या भुमिका आणी वास्तव यात फरक आहे.
सन्जय दत्त आणी सलमान खान हे गुणी तरूण आहेत आणी ह्रुतीक रोशन वर दहा गुन्डानी हल्ला केला तर तो त्याना लोळवेल असे तुम्हाला वाटते का? प्राण अमरीश पुरी हे प्रत्यक्श जीवनात तसेच आहेत का? काय हा मुग्धपणा.

आपण केलेल्या गोष्टीचा खुद्द आचार्य धर्मेन्द्र याना अभिमान आहे. त्यावर पान्घरूण घालण्याचा केविलवाणा प्रयत्न का करताय?


Vijaykulkarni
Tuesday, July 10, 2007 - 11:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

There have been times when Giriraj Kishore has turned his own utterances on its head and thought nothing of it. For instance, soon after Roop Kanwar sati hit the headlines, Giriraj Kishore went on record to say that the Hindu dharma had no space for sati. Years later, the practice, abolished by William Bentinck in 1828 — and now being assiduously revived by the VHP during its ‘Hindu Centenary Year’ — the acharya is defending the practice by saying that ‘‘there is nothing wrong if a woman who cannot bear the separation from her husband opts to join him in his funeral pyre’’. The VHP leader also said the revival of sati would not be out of tune with the VHP’s ideology of establishing a Hindu Rashtra.

http://www.expressindia.com/flair/20020317/1.html

actually all this is not needed. Just google
"sati VHP" or "sati dharmendra vhp" etc

Satishmadhekar
Wednesday, July 11, 2007 - 6:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुलकर्णी मुद्दाम भोळेपणाचा आव आणतात की खरंच त्यांची समज कमी आहे हे काही कळत नाही.

त्यांनी सुरवातीला काही आरोप केले. त्या आरोपांचा पुरावा त्यांना देता न आल्यामुळे त्यांनी खोटे आरोप केले हे आपोआपच सिद्ध झाले. आता त्यांनी नवीन लोकांवर आरोप केले आहेत. या आरोपांचा पुरावा मागितला मागितला की ते पुरावा न देता अजून नवीन लोकांची नावे घेतील. थोडक्यात म्हणजे "हिट ऍंड रन अवे" अशी त्यांची कार्यपद्धती आहे.

असो. त्यांचे आरोप सुरवातीपासून बघूया.

आरोप १) त्यांचा पहिला आरोप असा होता की विश्व हिंदू परीषदेमध्ये सती प्रथेचे समर्थन करणारे उच्चपदावर आहेत.

वस्तुस्थिती - या आरोपाचा कोणताही निखळ पुरावा आजवर त्यांना देता आलेला नाही. त्यामुळे हा आरोप धादांत खोटा आहे हे सिद्ध झाले.

आरोप २) त्यानंतर त्यांनी आचार्य धर्मेंद्र हे सतीप्रथेचे समर्थक आहेत असा आरोप केला.

वस्तुस्थिती - याचा आजवर कोणताही पुरावा त्यांनी दिलेला नाही. उलट त्यांनी दिलेल्या एका बातमीच्या लिंकमध्ये आचार्य धर्मेंद्र यांनी "सतीप्रथा ही भारताची संस्कृती नाही" असे विधान केले होते. त्यामुळे कुलकर्ण्यांचा हा आरोपही खोटा निघाला.

आरोप ३) त्यानंतर त्यांनी आचार्य धर्मेंद्र हे सतीमंदीराच्या एका समारंभाचे पुरोहीत होते असा जावईशोध लावला. आणि त्यांच्या उपस्थितीमुळे ते आपोआपच ते सतीप्रथेचे समर्थक ठरतात असे विचित्र तर्कशास्त्र मांडले.

वस्तुस्थिती - आचार्य त्या समारंभास उपस्थित होते असा कोणताही पुरावा आजवर मिळालेला नाही. समजा ते उपस्थित असते तरी ते त्यामुळे सतीप्रथेचे समर्थक कसे ठरतात? कदाचित पौरोहित्य त्यांचा व्यवसाय असू शकेल. आपल्या व्यवसायामुळे ते कसे सतीप्रथेचे समर्थक ठरू शकतात? लागू, तेंडुलकर वगैरे मंडळी व्यवसाय म्हणून अंधश्रद्धा वाढवणारे सिनेमे करतात, तरीसुद्धा ते अंधश्रद्धाविरोधी आहेत असा कुलकर्ण्यांचा ठाम विश्वास आहे. याच लॉजिकप्रमाणे आचार्य धर्मेंद्र सतीच्या समारंभाचे पुरोहीत असून सुद्धा प्रत्यक्ष जीवनात सतीप्रथेच्या विरोधात असू शकतात. परंतु लागू, तेंडुलकरांना जो न्याय कुलकर्णी लावतात, तोच न्याय मात्र आचार्य धर्मेंद्र यांना लावायला त्यांचा विरोध आहे. एखाद्या न्हाव्याने एखाद्या गुन्हेगाराची श्मश्रू केली किंवा एखाद्या वैद्याने एखाद्या गुंडावर उपचार केले तर कुलकर्ण्यांच्या तर्काप्रमाणे तो न्हावी आणि तो वैद्य त्या गुन्हेगाराचे समर्थक ठरतात.

अर्थात आचार्य धर्मेंद्र त्या कार्यक्रमाचे पुरोहीत होते असे केवळ क्षणभर गृहीत धरून मी हे लॉजिक मांडत आहे. प्रत्यक्षात ते तिथे उपस्थित होते किंवा त्या कार्यक्रमाचे पुरोहीत होते असे अजूनही कुलकर्ण्यांना सिद्ध करता आलेले नाही.

वरील तीन खोटे आरोप आपण सिद्ध करू शकत नाही हे जेव्हा त्यांच्या लक्षात आले तेव्हा माफी मागण्याऐवजी त्यांनी नवीन आरोप केले.

आरोप ४) राजमाता विजयाराजेही होत्या.

वस्तुस्थिती - हा खोटा आरोप सतीप्रथेच्या समर्थनासंबंधात आहे असे मी गृहीत धरतो. तसे नसेल तर कुलकर्ण्यांना खुलासा करावा. राजमाता विजयाराजे हा सतीच्या समर्थक होत्या याचा काय पुरावा आहे? कुलकर्णी पुरावा द्या नाहीतर एका दिवंगत व्यक्तीबद्दल केलेले खोटे आरोप मागे घेऊन माफी मागा. अगदी सोपं लॉजिक आहे. राजमाता जर सतीप्रथेच्या समर्थक असत्या तर आपल्या पतीच्या निधनानंतर त्या स्वतः सती नसत्या का गेल्या? त्याचप्रमाणे माधवराव शिंद्यांच्या विधवा पत्नीला सती जाण्यासाठी त्यांनी सांगितले नसते का? तसेच शिंद्यांच्या सख्या किंवा चुलत घराण्यात त्यांनी कुणाला सती जायला सांगितले नसते का?

हा सुद्धा खोटा आरोप आहे हे लगेचच सिद्ध होते.

आरोप ५) त्यांनी इंडियन एक्सप्रेस मधल्या एका लेखाची लिंक दिलेली आहे. त्या लेखामधलाच काही भाग त्यांनी उतरवून काढला आहे.

वस्तुस्थिती - हा लेख आहे. ही बातमी किंवा वृत्तांत नव्हे. या लेखात लेखकाने विश्व हिंदू परीषदेविरूद्ध भरपूर गरळ ओकले आहे. याचाच एक भाग म्हणून आचार्य गिरीराज किशोर यांच्याविरूद्धही लिहीले आहे. कोणत्याही लेखात लेखक स्वतःचे मत मांडत असतो. विश्व हिंदू परीषदेवर टीका करणे हा या लेखाचा उद्देश आहे. त्यामुळे अशा एकांगी दृष्टीकोनावर विश्वास ठेवता येत नाही. या बाबतीत कुलकर्ण्यांनी पुरावा देणे आवश्यक आहे.

वरील लेखात असे म्हणले आहे की गिरिराज यांनी सुरवातील सतीप्रथेला विरोध केला होता. परंतु आता ते पाठिंबा देत आहेत. हे जर खरे असेल तर गिरिराज हे विश्वासु गृहस्थ नाहीत आणि ते शब्द फिरवतात एवढेच म्हणता येईल. भविष्यात ते कदाचित पुन्हा एकदा सतीप्रथेविरूद्ध बोलू शकतील. त्यावेळी मग तुम्ही त्यांना क्लीन चिट द्याल का?

मुळात गिरिराज किशोर असे बोलले याचा पुरावा देणे आवश्यक आहे. एका पूर्वग्रहदूषित लेखातील वाक्ये हा आधार होऊ शकत नाही.

कुलकर्ण्यांनी युक्ती करून धर्मेंद्र यांच्यावर केलेले आरोप सिद्ध करण्याऐवजी विजयाराजे आणि गिरिराज या नवीन लोकांवर खोटे आरोप केले आहेत. यांच्याहीबाबतीत पुरावा देता नाही आला की मग अशोक सिंघल, वाजपेयी इंवर आरोप सुरू होतील.


>>> आपण केलेल्या गोष्टीचा खुद्द आचार्य धर्मेन्द्र याना अभिमान आहे. त्यावर पान्घरूण घालण्याचा केविलवाणा प्रयत्न का करताय?

हा कुलकर्ण्यांचा अजून एक खोटा आरोप. आचार्य धर्मेंद्र याॅह्यावरचे आरोप मुळातच खोटे आणि त्याचा त्यांना अभिमान वाटतो हे त्यापुढचा खोटारडेपणा.

कुलकर्णी, तुमचं पितळ पूर्ण उघडं पडलं आहे. आधीचे आरोप सिद्ध करण्याऐवजी नवीन आरोप करून आपल्या खोटारडेपणाला बगल द्यायचा केविलवाणा प्रयत्न का करता?


Satishmadhekar
Wednesday, July 11, 2007 - 9:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> या प्रकरणाविरुद्ध मोर्चा कुणी काढला? व्रुन्दा कारत

वृंदा कारट नावाच्या एका साम्यवादी महिलेने योगी रामदेव बाबा औषधात मानवी हाडे मिसळतात असा खोटा आरोप केला होता. त्यांनी आणि आरोग्य मंत्री अंबुमणी रामदास यांनी जंग जंग पछाडून सुद्धा हा आरोप त्यांना सिद्ध करता आला नाही.

हीच महिला सिंगूर आणि नंदिग्राम मध्ये गोळीबारात ३०-४० शेतकरी मृत्युमुखी पडल्यावर सुद्धा गप्प होती.

तुम्ही ज्या वृंदा कारतांचा उल्लेख केला आहे ती हीच साम्यवादी महिला की दुसरी कोणीतरी?

ही तीच असेल तर, पूर्वीच कालबाह्य झालेल्या सतीपूजनाविरूद्ध मोर्चा काढण्यापेक्षा, २००७ मध्ये गोळीबारात मेलेल्या शेतकर्‍यांच्यासाठी मोर्चा काढणे हे योग्य ठरेल.


Robeenhood
Wednesday, July 11, 2007 - 12:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रॉबिनहूड, या अश्या, संसदेत मारामारी करणार्‍यांना जनता का निवडून देते?>>>>>बोवाजी तुम्ही ज्या दीर्घ परम्परेच्या लोकशाहीत राहता तिथेही भामटे पार्लमेन्टात राहतातच.खरे तर अशी माणसे मते न देणार्‍या लोकांमुळे निवडून येतात!

एक प्रश्न आहे. अजितसिंगांनी मत देण्यासाठी लाच घेऊन मग ऐनवेळी मत बदलले. तेसुद्धा मतस्वातंत्र्य होत नाही का ? तेव्हा न्यायालयाने हस्तक्षेप कोणत्या आधारे केला आणि निर्णय कोणत्या आधारे दिला हे जाणून घेण्यात मला रस आहे. >>>>
झामुमची जी केस आहे तीच अजितसिंगांची केस. राव सरकारच्या विरोधात आलेल्या अविश्वासाच्या ठरावाच्या विरोधात म्हणजे रावांच्या बाजूने मत देण्यासाठी ४ झामुमच्या आणि अजित सिंग याना लाच देण्यात आली असा सी बा आय ने Anticorruption Act 1988 अन्तर्गत खटला दाखल केला होता. तो सुप्रीम कोर्टात पोचला त्यावर ५ न्यायमूर्तींचे खंडपीठ होते. अशी खंडपीठे नेहमी विषम संख्येची असतात.म्हणजे इक्वल होऊन निर्णय लोम्बकळत नाही :-).
त्यात वर वर्णन केल्याप्रमाने आर्टिकल १०५ प्रमाणे झामुमच्या खासदारानी मत देण्याच्या स.म्बंधात ही कृती केली असल्याचे ३ जजांचे मत झाल्याने व १०५ ची immunity मिळाल्याने झामुमचे लोक सुटले! मात्र अजीत सिंग यानी लाच घेऊन मतच दिले नाही.कोणत्याच बाजूने!! त्यामुले त्यांची लाच घेण्याची कृती ही मत देण्याशी संबंधित नसल्याने ती निव्वळ लाच ठरली आणिम्हणून ते शिक्षेस पात्र ठरतात कारण मत देण्यासंबंधी कृतीशी निगडीत असलेली इम्युनीटी त्याना मिळत नाही!कारण त्यानी मत देण्यासाठी पैसे घेतले हे सिद्ध होत नाही!!!
आहे की नाही गम्मत?

अमेरिकन सुप्रीम कोर्टात ब्र्यूस्टर केस म्हणून अशीच केस आली होती १९६२ मध्ये. त्या केसचा या केसमधील दोन्ही वकीलानी भरपूर वापर केला.त्यात मात्र ९ पैकी ६ न्यायमूतीनी अशी लाच हे करप्शनच असल्याचा निर्णय दिला होता. उरलेल्या ३ जजांचे मत होते की कुठल्याही खटल्याचे भय असेल तर सदस्य निर्भयपने मतदान करू शकणार नाहीत.
आपल्या कोर्टात बहुसंख्येने अमेरिकन अल्पमताचे मत उचलून धरले की मतस्वातंत्र्य हे अनिर्बंध आहे, आणि अल्पमताने बहुसंख्येचे!

या निकालाने राजकीय आणि कायदाक्षेत्रात खळबळच उडाली.
त्यात सीबीआयने review petition दाखल करण्याचा प्रयत्न केला पण ते फेटाळण्यात आले ते वर आलेच आहे.

जाता जाता...
अमेरिकन पद्धतीत एक फरक आहे. तिथे सेपरेशन ऑफ पॉवरच्या तत्वानुसार कोणी कोणालाहीमत दिले तरी कार्यकारी मंडळावर त्याचा परिणाम होत नाही. म्हणजे असे की क्लिंटनच्या महाभियोगात बर्‍याच डेमोक्रॅटानी त्याच्या विरोधात मते दिली.आणि बर्‍याच रिपब्लिकनानी क्लिन्टनसाहेबाच्या बाजूने. पण तेथे कार्यकारीमंडळाचे म्हणजे मंत्रीमंडळाचे आस्तित्व बहुमतावर अवलम्बून नसते. पक्षशिस्त तिथे महत्वाची नाही.परन्तु भारतासारख्या पार्लमेन्टरी पद्धतीत पक्षशिस्तीला अनन्यसाधारण महत्व आहे कारण त्यावर सरकार पडू शकते अथवा तयार होऊ शकते.म्हणून आपल्याकडे पार्टी व्हिपची कायद्यातच तरतूद केलेली आहे.त्यानुसार पक्षादेशानुसारच मतदान करावे लागतेऽन्यथा anti defection act नुसार सदस्यत्व रद्द होते. (मनमोहन सोनियाच्या तालावर का नाचतात याचे उत्तर यातून मिळावे अशी अपेक्षा!
)

असो पुढे जाऊ,
यावर कहर झाला लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी खासदारानी लाच घेतल्यानन्तर! मग मात्र या immunty च्या तरतूदीत बदल करण्याची निकड फारच भासू लागली.कारण लोक फारच तोंडात शेण घालू लागले होते. राजकारणी असले तरी त्याना किमान लाज असते हो!(अर्थात हा प्रकार ब्रिटीश पार्लमेन्टमध्येही झाला होता त्यामुळे लाजायचे कारण नाही!:-))


Tatyavinchu
Wednesday, July 11, 2007 - 1:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक गोश्ट मानावीच लागेल. सतिश माढेकर जे लिहीतात त्याला कुळकर्नी उत्तर देऊ शकत नाहीत. मधलच एखादे गृहीतक उचलुन त्यावर चर्चा घडवुन आनन्याचा प्रयत्न करतात व तो परत निश्फल ठरतो.

हे असेच कदाचित सेक्युलर लोक नेहमी करतात का? (पलायनवाद) जुन्या गोष्टी उकरुन नविन कडे दुर्लक्ष.

शिवाय जे कुलकर्णीचा मता सारखे आहेत ते तर गप्प च राहातात. (त्यांना बहुतेक मुद्देसुद मांडता येत नसेल).

त्या वृंदा कारत बाईने मग ईतर गोष्टींवर का नाही टाहो फोडला. की त्यात प्रसिध्दी मिळनार नाही, उलट आपल्याला उजवे ठरविले जाईल ही भिती तर या मागे नाही ना?


Robeenhood
Wednesday, July 11, 2007 - 1:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

2006 मध्ये खा. विजय दर्डानी राज्यसभेत (बील नं६/२००६)घटना दुरुस्तीसाटी बील आणले आहे. त्यात या आर्टीकल १०५ मध्ये बदल प्रस्तावीत केले आहेत. त्यात सदस्याच्या अशा भ्रष्ट कृतीना घटनेचे संरक्षन असणार नाही अशी तरतूद आहे.तर बघू या काय होतेय ते. त्यावर होणारी भाषणे शक्यतो ऐका, वाचा...

Robeenhood
Wednesday, July 11, 2007 - 2:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, राइट ओफ़ इन्फ़ॉर्मेशन हा कायदा तर जुना आहे ना??माझ्यामते तो कायदा रद्द करण्याचा ठराव आला होता मागच्या वर्षी. त्यावरुनच अण्णा हजारेंनी आमरण उपोशण करण्याची घोषणा केली होती मागच्या वर्षी.>>>>
राईट टू इन्फॊर्मेशन कायदा फार जुना नाही २००५ चा आहे.महराश्ट्रात मात्र तो स्टेट लॊ म्हणून २००२ ला लागू झाला होता. हा कायदा रद्द करण्याचा प्रस्ताव नव्हता त्यात काही दुरुस्त्या करायच्या होत्या, त्यात हजारेंचे काही आक्षेप होते...


Robeenhood
Wednesday, July 11, 2007 - 2:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पोलीसांना संसदेत का प्रवेश नसतो?>>>>

प्रत्येक संस्थेचे काही नियम, पावित्र्य असते.शाला अथवा विद्यापीठाच्या आवारातही कुलगुरुंच्या परवानगीशिवाय पोलीसाना कारवाई करता येत नाही.परिक्षा केंद्रातही सक्षम अधिकायाच्या परवानगीशिवाय पोलीसाना जाता येत नाही...मतदान केन्द्रात पोलीसाना मज्जाव असतो. त्याला प्रिसायडिंग ॊफिसरची परवानगी लागते.संसद सार्वभौम असल्याने तिच्या सदस्यावर कोनाचेही दडपण येऊ नये याची खबरदारी घेतली जाते.मात्र या संस्थांचे प्रमुख स्वत: पोलीसाना बोलावू शकतात.

Satishmadhekar
Wednesday, July 11, 2007 - 2:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> यावर कहर झाला लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी खासदारानी लाच घेतल्यानन्तर! मग मात्र या immunty च्या तरतूदीत बदल करण्याची निकड फारच भासू लागली.कारण लोक फारच तोंडात शेण घालू लागले होते. राजकारणी असले तरी त्याना किमान लाज असते हो!(अर्थात हा प्रकार ब्रिटीश पार्लमेन्टमध्येही झाला होता त्यामुळे लाजायचे कारण नाही!)

रॉबीनहूड,

तुम्हाला घटनेची चांगलीच माहीती आहे. माझ्या माहीतीप्रमाणे लोकसभेत प्रश्न विचारल्याबद्दल सदस्यत्व रद्द करण्याचा आणि इम्युनिटिचा संबंध नाही.

प्रश्न विचारल्यासाठी पैसे घेतल्याबद्दल सभासदांचे सदस्यत्व हे लोकसभेने बहुमताने रद्द केले. आपल्या घटने प्रमाणे लोकसभेतील उर्वरीत खासदार बहुमताने लोकसभेच्या कोणत्याही खासदाराचे सदस्यत्व रद्द करू शकतात. आणि न्यायालय त्यात हस्तक्षेप करू शकत नाही. १९७८ मध्ये इंदिरा गांधी चिकमंगळूरहून निवडून आल्या होत्या. परंतु जनता पक्षाच्या सरकारने लोकसभेत त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा ठराव मांडला आणि तो बहुमताने मंजूर केला. त्यामुळे श्रीमती गांधींची खासदारकी रद्द झाली. यासाठी (फुसके) कारण असे देण्यात आले होते की आणीबाणीतल्या गैरकृत्यांची चौकशी करणार्‍या शहा आयोगासमोर इंदिरा गांधींनी शपथेवर साक्ष देण्यास नकार दिला होता. अर्थात या सूडबुद्धीने केलेल्या क्रूत्याने इंदिरा गांधींनी १९७७ साली गमावलेली सहानुभूती परत मिळवायला सुरवात केली आणि १९८० साली दोन तृतीयांश बहुमत मिळविले.

सध्याच्या लोकसभेत UPA चे सर्व घटक एकत्र येऊन भाजप व शिवसेनेच्या सर्व खासदारांचे सदस्यत्व रद्द करावे असा ठराव मांडून तो बहुमताने मंजूर करून घेऊ शकतात. असे करण्याला घटनेची कोणतीही आडकाठी नाही. ठराव मंजूर झाल्यावर भाजप आणि शिवसेनेच्या सर्व खासदारांची खासदारकी रद्द होऊ शकते. परंतु शक्यतो कोणताही सत्ताधारी पक्ष असे करत नाही कारण त्यांच्याविरूद्ध जनमत जाण्याची शक्यता असते.

आताच्या लोकसभेतल्या खासदारांपैकी शिबू सोरेन तुरुंगात जन्मठेप भोगतो आहे तर महंमद शहाबुद्दीनला १० वर्षे तुरुंगात टाकले आहे. या दोन खासदारांचे गुन्हे प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेण्याच्या कृत्यापेक्षा कितीतरी गंभीर आहेत. त्यांचे सदस्यत्व रद्द करणे आवश्यक आहे. परंतु या दोघांचेही पक्ष सत्ताधारी आघाडीचा भाग असल्यामुळे ते अजून खासदारकी टिकवून आहेत.


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators