Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 03, 2007

Hitguj » Views and Comments » Current Affairs » बातम्यांचे / लेखांचे संकलन » Political » Archive through July 03, 2007 « Previous Next »

Satishmadhekar
Sunday, July 01, 2007 - 2:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे खरे असेल काय?

http://www.dailypioneer.com/indexn12.asp?main_variable=front%5Fpage&file_name=story1%2Etxt&counter_img=1



Vijaykulkarni
Sunday, July 01, 2007 - 3:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

का तुमच्या नेहमीच्या पध्दतीप्रमाणे पुडी सोडून दिलीत?

छे हो,
पुडी सोडण्याची कला मला अजून अवगत झाली नाही.


Chinya1985
Sunday, July 01, 2007 - 4:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छे हो,
पुडी सोडण्याची कला मला अजून अवगत झाली नाही.

अच्छा म्हणजे अजुन ती कला अवगत करण्याचा सराव चालला आहे तर.
बाप रे!!!!मग कला अवगत झाल्यावर तुम्ही काय कराल?????


Marhatmoli
Sunday, July 01, 2007 - 4:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"अलिकडच्या काळात आपण अशा किती बायका पाहिल्या आहेत? केशवपन ही प्रथा अजून जिवंत आहे असे आपल्याला म्हणायचे आहे का?

ज्या वाईट प्रथा केव्हाच संपलेल्या आहेत, त्याची आताच्या काळात संदर्भहीन उदाहरणे देणे कितपत योग्य?"


Satishmadhekar ,

माझ उदाहरण संदर्भहिन कस काय ठरत? मुळात आपल्या धर्मातल्या सुधारणा अधोरेखित करण्यासाठि मी हे उदाहरण दिल होत.माझ्या आधिच्या post मधल वाक्य परत देतेय.

"हिंदु किंवा बर्याच इतर धर्मात कालबाह्य रुढि सुधारणेच्या प्रवाहात नष्ट होतात. उदा. सतिप्रथा, केशवपन हुंडा इत्यादि. तुम्हि उल्लेख केलेलि कांदापोहे पध्धत पण काळानुसार बदलते आहे. "

आज केशवपनाचि रुढि अस्तित्वात नाहि पण ति पुर्णपणे नष्ट व्हायला बरिच दशके लोटलित हि वस्तुस्थिति आहे. मुळात घरात असलेल्या बालविधवांबद्दल (कुठल्याहि) पुरुषाला आकर्षण निर्माण होवु नये म्हणुन त्यान्चे केस काढुन त्याना विद्रुप करण्याचि हि अमानुश परंपरा सुरु झालि 'उंदिर मारलेत कि प्लेग पसरणार नहि' अशातलाच उरफ़ाटा प्रकार. वाइट नजर असलेल्या पुरुषांचा बंदोबस्त करण्याचा विचारहि नाहि बायकाना विद्रुप केल कि काम फ़त्ते. (अर्थात याचा फ़ारसा उपयोग झाला नाहिच, ज्योतिबा फ़ुलेंचा दत्तक मुलगा हा अश्याच एक अभागि विकेशा स्त्री चा अनौरस मुलगा होता.) पण या प्रथेमुळे अनेक तरुण विधवांना (ज्यांना घरात असा काहि धोका नव्हता) दर महिन्याला येण्यार्या न्हाव्यांच्या 'वाहत्या गंगेत हात धुवुन घेण्याच्या' (हो तेहि पुरुषच) प्रव्रुत्तिच्या रुपाने स्त्रीजन्माचे भोग भोगायला लागलेत.

त्यातुनच पुढे केस काढुन आलवण नेसल्याशिवाय विधवा बायकाना देवपुजा आणि सोवळ्यातिल स्वयंपाक करता येणार नाहि असा प्रघात सुरु झाला आणि मग निव्वळ या कारणासाठि अनेक वयस्क विधवाना केशवपन कराव लागल.

मी बघितलेल्या दोन विकेशांपैकि एक हि माझ्या आजिचि मावसबहिण. हि बालविधवा होति. १९९४ मध्ये गेलि. दुसरि माझ्या एक मैत्रिणिचि आजि लहानपणि बघितलि होति. मी स्वत: जरि या दोनच बघितल्या असल्या तरि माझ्या आइने अश्या बर्याच सोवळ्या स्त्रीया बघितल्या आहेत. त्या काळि त्या घरोघरि असायच्या.

पुरोगामि (?) महाराष्ट्रात ह्या अमानुष परंपरेचि साक्षिदार होण्याच भाग्य! जर मला लाभु शकत तर तुलनेत कर्मठ समजल्या जाणार्या दक्षिण भारतात अजुनहि अश्या दुर्दैवि स्त्रीया आहेत ह्यात मला तरि मुळिच अतिशयोक्ति वाटत नाहि.


Vijaykulkarni
Sunday, July 01, 2007 - 8:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केशवपनाच्या क्रूर प्रथेला बळी पडलेल्या दोन अभागी स्त्रिया मझ्या नात्यातल्या होत्या. त्याही १९९५ च्या सुमारास गेल्या.
त्या काळी एखद्या विधूर पुरुषाला त्याच्या म्रुत पत्नीचे निधन होताच दुसर्या मुली सान्गून यायच्या. आणी स्त्रियान्च्या वाट्याला हे भोग.

ही राक्शसी प्रथा जिवन्त होती तेव्हा एकाही धर्ममार्तन्डाला त्याविरुद्ध काही करावेसे वाटले नाही.

शेवटी ही प्रथा गेली ती स्त्री शिक्शण आणी समाजात आलेल्या एकन्दर जाग्रूती मुळेच



Bee
Monday, July 02, 2007 - 3:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"हिंदु किंवा बर्याच इतर धर्मात कालबाह्य रुढि सुधारणेच्या प्रवाहात नष्ट होतात. उदा. सतिप्रथा, केशवपन हुंडा इत्यादि. तुम्हि उल्लेख केलेलि कांदापोहे पध्धत पण काळानुसार बदलते आहे. ">>

हुंडा पद्धती कुठे कालबाह्य झाली आहे. अजूनही सर्रास घेतातच की हुंडा.

Satishmadhekar
Monday, July 02, 2007 - 5:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> आचार्य धर्मेन्द्र महाराज हे विहिम्प च्या मार्गदर्शक मन्डळाचे आज सदस्य आहेत. राजस्थानतल्या सतीच्या प्रथम वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचे पुरोहित होते ते. त्यान्च्यावर खटला सुद्धा चालू होता. त्यान्ची कोर्टाने नन्तर सुटका केली.

कुलकर्णी,

मी अजून तुमच्या "आचार्य धर्मेन्द्र महाराज हे राजस्थानातल्या प्रथम वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचे पुरोहित होते" हा आरोप सिद्ध करण्याच्या पुराव्याची वाट पहात आहे. पुरावा द्या नाहीतर खोटा आरोप केला म्हणून माफी मागा.


>>> शेवटी ही प्रथा गेली ती स्त्री शिक्शण आणी समाजात आलेल्या एकन्दर जाग्रूती मुळेच

काहीतरी गोंधळ दिसतोय. मागच्या एका पोस्टमध्ये तुम्ही म्हणाला होता की ही प्रथा दक्षिण भारतात अजूनही चालू आहे. आणि आता तुम्ही म्हणत आहात की ही प्रथा गेली म्हणून. दक्षिणेत तर शिक्षणाचे प्रमाण खूप जास्त आहे अशी आमची समजूत आहे. त्यामुळे ही प्रथा तर तिथे खूप पूर्वीच नष्ट झाली असली पाहिजे. पण तुम्ही म्हणता त्याप्रमाणे ही प्रथा अजून चालू दिसते. म्हणजे एक तर दक्षिण भारतातल्या सुशिक्षित महिलांवर शिक्षणामुळे जागृती आलेली नसणार किंवा तुम्ही पुडी सोडली असली पाहिजे (याचीच शक्यता जास्त :-)).

ही प्रथा गेली की अजून चालू आहे हे नक्की एकदा ठरवा. आणि नेहमीप्रमाणे पुडी सोडली असली तर तसे कबूल करा.



Satishmadhekar
Monday, July 02, 2007 - 5:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> आज केशवपनाचि रुढि अस्तित्वात नाहि पण ति पुर्णपणे नष्ट व्हायला बरिच दशके लोटलित हि वस्तुस्थिति आहे.

मर्‍हाटमोळी,

ही रूढी नष्ट होऊन अनेक दशके लोटली हे मला मान्य आहे. पण इथले अनिसचे काही समर्थक अनिस केशवपनासारख्या अंधश्रद्धेविरूद्ध आंदोलन करते असे म्हणतात. जी प्रथा नष्ट होऊन खूप काळ लोटला आहे त्याविरूद्ध आंदोलन करून काय साध्य होते?


Shrigopal
Monday, July 02, 2007 - 5:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

tavleen singh chaa IE chaa lekh vacha
Communist va tyanchi pille Hindu Dharma vishya kasa apaprachar
karatat yache uttam udharan ahe

Hindu Dharmavishya abhyas karayla ata aplya mulana Western(US/Europe)University jave lagte !!

Rajiv Malhotranche kam mhanunach mahatvache ahe

http://www.expressindia.com/fullstory.php?newsid=88942

(Engrajit lihilyabaddal skamasva....Marathi lihinyache prayatna suru ahet)

Chyayla
Monday, July 02, 2007 - 6:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रीगोपाल, तवलीनसिंगचा लेख खरच वस्तुस्थितिला धरुन आहे. आणी याचीच तर चीड येते.

भारताचा पहीला नागरिक म्हणुन, सगळ्यात उच्च व्यक्ति जी देशाचे प्रतिनिधित्व करणार तिच्याकडुन असले अन्धश्रद्ध व बेजबाबदार विधान ऐकुन सार्या भारताची मान परत शरमेनी झुकतेय आणी असे महाभाग भारताचे राष्ट्रपती होणार. विदेशामधे भारताची काय प्रतिमा होणार याचा थोडा तर विचार करायला हवा होता.

प्रतिभा ताई तिच्या आलाकमानने दाखवलेल्या मार्गावरच जात आहे. तिच्या आलाकमानने अन्तारात्म्याचा आवाज ऐकला होता आता ह्या प्रेतात्म्याचा आवाज ऐकत आहे...

Tatyavinchu
Monday, July 02, 2007 - 6:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर बाबानु कवादरन वाcतुया मुस्लमान हीन्दु की काय. आर लोक आपल्या देशाला हिन्दुस्थान म्हनत्यात मग त्यात भांदायचा का? गर्वान महन बर आपन हिंदु हायते.

Uday123
Monday, July 02, 2007 - 7:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

(भविष्यात) प्रेतात्म्याचा आवाज एकला, आणी राष्ट्रपती राजवट (अथवा तत्सम महत्वाच्या) लागु करण्याच्या विधेयकावर स्वाक्षरी केली, ही बातमी वाचायला मिळाली तर आश्चर्य नको वाटायला.



Deshi
Monday, July 02, 2007 - 7:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सही. आपले लोक भारी असतात. काय कधी कुठे बोलतील काही नेम नाही. तरी बर कुळकर्णी काही म्हनत नाहीयेत याच्यावर कारण त्या त्यांच्याच पक्षाचा आहेत नाहीतर त्यांनी भाजपा वर कि बोर्ड उठवला असता.
असेच त्यांना पाक व्याप्त काश्मीर वर हल्ला करुन तिथ्ले दहशत्वादी तळ उडविन्याचे पण स्वप्न पडु देत.


Vijaykulkarni
Monday, July 02, 2007 - 10:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनिसचे काही समर्थक अनिस केशवपनासारख्या अंधश्रद्धेविरूद्ध आंदोलन करते असे म्हणतात.
कूणी बुवा?
मागच्या एका पोस्टमध्ये तुम्ही म्हणाला होता की ही प्रथा दक्षिण भारतात अजूनही चालू आहे.

केशवपन झालेल्या स्त्रिया दक्शीणेत दिसतात असे लिहिले होते, प्रथा चालू आहे असे नाही.

तुम्ही पुडी सोडली असली पाहिजे

नाही हो, तुमची शिकवणी लावल्याशिवाय मला ते जमणार नाही.

राजस्थान घटना घडली तेव्हा इन्टरनेट नव्हते पण तरीही तुम्हाला जरून पुरावा देयीन. श्रीराम लागून्बद्दल तुम्ही केलेल्या विधानाबाबत अशी अपेक्शा बाळगावी का?



Svsameer
Monday, July 02, 2007 - 11:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दोन वर्षापुर्वी करार केलेल्या कंपन्याबरोबरच पुन्हा सामंजस्य करार
राजकारणी किती पोकळ दावे देशात जाउन करतात याचं हे एक उदहरण. आणि कृपया त्याला कॉंग्रेस विरुद्ध भाजपा असा फाटा फोडु नका. कारण माझ्या दृष्टिने दोघेही एकाच माळेचे मणी आहेत


Satishmadhekar
Tuesday, July 03, 2007 - 5:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> तुम्ही पुडी सोडली असली पाहिजे

>> नाही हो, तुमची शिकवणी लावल्याशिवाय मला ते जमणार नाही.

म्या पामर काय तुम्हाला शिकवण देणार? मी एक साधाभोळा, हिंदू धर्मावर श्रद्धा ठेवणारा गरीब माणूस. मी तुमच्यासारखा "बुद्धिप्रामाण्यवादी", "अंधश्रद्धाविरोधक", "निधर्मी" नाही. तुमच्यासारख्या थोर महापुरुषाला मी काय शिकवण देणार?

मी अतिरेक्यांना शिक्षा द्या अशी क्रूर मागणी करणारा, तर तुम्ही मानवतावादी. अफजल जरी अतिरेकी असला तरी तो कुटुंबवत्सल, ७-८ पोराबाळांचा पोशिंदा, निष्पाप, धार्मिक मुसलमान असल्यामुळे त्याला फाशी देऊ नका असा तुमचा मानवतावादी दृष्टीकोन! तर मी अतिरेक्यांना शिक्षा द्या अशी मागणी करणारा जातीयवादी!

विश्व हिंदू परिषदवाले सती प्रथेला पाठिंबा देतात असे तुम्ही बिनधास्त सांगता ते खरे असले पाहिजे. पण आम्ही करंटे त्याचा पुरावा मागतो. तुमच्यासारख्या थोर माणसावर आम्ही अविश्वास दाखविला. कुठे फेडणार आहोत ही पापं आम्ही?

तुम्ही पुड्या सोडता असा आम्ही खोडसाळ आरोप केला तरी तुम्ही चतुराईने पुरावा न देता आणि चिडून न जाता नम्रपणे आमची शिकवणी लावायची तयारी दाखविली, यातच तुमचा मोठेपणा आहे.

खरं सांगू का, पुड्या सोडणे, खोटे आरोप करणे, ढोंगीपणा, भोंदूगिरी इ. सदगुणांसाठी मीच शिकवणी लावण्याच्या प्रयत्नात आहे. तुम्ही घ्याल का मला तुमचा विद्यार्थी करून? हे गुण शिकवण्यासाठी तुम्हाला एखादा चांगला समाजवादी किंवा कॉंग्रेसवाला माहीती असेल तर सांगा. अ. नि. स. वाले असले तर उत्तमच. नाही तर लागू, भाई वैद्य, सप्तर्षी इ. पैकी कुणाला तरी चिठ्ठी द्या, म्हणजे मला त्यांच्या शिकवणीला ऍडमिशन मिळेल.

निदान तोपर्यंत तरी विश्व हिंदू परीषदेतले काही जण सती प्रथेला समर्थन देत होते हा आरोप खोटा आहे असे आपण मानूया का?


Satishmadhekar
Tuesday, July 03, 2007 - 6:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> तरी बर कुळकर्णी काही म्हनत नाहीयेत याच्यावर कारण त्या त्यांच्याच पक्षाचा आहेत नाहीतर त्यांनी भाजपा वर कि बोर्ड उठवला असता.


कुलकर्णी अशा प्रसंगी चतुराई दाखवून गप्प असतात. टीका करायची का कौतुक करायचे की मौन पाळायचे, हे, कृत्य करणारी व्यक्ती कोणत्या पक्षाची / संघटनेची आहे यावर अवलंबून असते. कारण टीका किंवा कौतुक हे कृत्यावर अवलंबून नसून त्या व्यक्तीवर अवलंबून असते.

आ. नि. स. ने केलेली अंधश्रद्धेची व्याख्या अगदी सोपी आणि सुस्पष्ट आहे. त्यांच्या व्याख्येनुसार भाजप, रा.स्व.संघ इ. हिंदू संघटनांचे कोणतेही कृत्य म्हणजे अंधश्रद्धा. आणि कॉंग्रेस, साम्यवादी, समाजवादी इं. ची सर्व कृत्ये म्हणजे "डोळस श्रद्धा". या व्याख्येबद्दल कोणाचा आक्षेप असेल असे मला वाटत नाही.

प्रतिभा पाटील या "निधर्मी" कॉंग्रेस पक्षाच्या आहेत. त्यामुळे त्या आत्म्याशी बोलल्या तर तो "बुद्धीप्रामाण्यवाद" समजला पाहिजे. जर भाजप किंवा संघवाले असे काही म्हणाले तर ती "अंधश्रद्धा" समजून अनिसवाल्यांच्या मदतीने आंदोलन केले पाहिजे.

वाजपेयी जर सत्यासाईबाबांच्या दर्शनाला गेले तर ती "अंधश्रद्धा" आणि जर शिवराज पाटील, कै. शंकरराव चव्हाण यांनी त्यांची भक्ती केली तर तो "सर्वधर्मसमभाव".

भाजपवाल्यांनी जर मुस्लीम अतिरेक्यांना शिक्षा द्या असे म्हणले तर तो "जातीयवाद" आणि समाजवादी, कॉंगेसवाल्यांनी तो निष्पाप आहे असे म्हणले तर तो "मानवतावाद".

गणेशविसर्जन बंद करा असे म्हणले तर तो "बुद्धीप्रामाण्यवाद" आणि जर मुसलमानांच्या पुस्तकावर आधारीत खास मुसलमानांसाठी केलेले अन्यायकारक कायदे रद्द करा असे म्हणले तर तो "मुस्लीमद्वेष".

वाजपेयींनी १९९८ मध्ये अणुचाचणी घेतली ते "साम्राज्यवादाचे चिन्ह" तर इराणच्या अणुकार्यक्रमाला विरोध म्हणजे त्या "देशाच्या सार्वभौमत्वावर हल्ला".

हिंदूंच्या बाजूने बोलले की तो "जातीयवाद आणि संकुचित मनुवादी वृत्ती", तर अहिंदूंच्या बाजूने बोलले की तो "सर्वधर्मसमभाव."


>>> असेच त्यांना पाक व्याप्त काश्मीर वर हल्ला करुन तिथ्ले दहशत्वादी तळ उडविन्याचे पण स्वप्न पडु देत.

काहीतरीच काय! अशा हल्ल्यात निष्पाप मुसलमान अतिरेकी मारले जातील ना! आणि फायदा काय? निष्पाप हिंदू नागरिकांचे प्राण वाचतील एवढाच ना?

त्याऐवजी संघाच्या शाखांवर बंदी घालून मॅडमला खूष करण्याचे स्वप्न प्रतिभाबाईंना पडेल. त्यामुळे "धर्मनिरपेक्षतेचे" रक्षण होईलच. शिवाय मुस्लीम मतांचा बोनसही मिळेल.


Mandard
Tuesday, July 03, 2007 - 10:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुम्बईकडे २६ जुलै सारखा पाउस झाल्यास आपत्कालिन व्यवस्था नाही इति आबा पाटिल उपमुख्यमन्त्री. मग हा प्रोब्लेम कसा सोडवायचा. जर या सरकारला हा प्रोब्लेम सोडवता येत नसेल. तर मुम्बईला दिल्ली सारखे स्वतंत्र राज्य करा. मग प्रोब्लेम थोडातरी कमी होइल. महाराष्ट्रातील इतर नेत्यांना या महानगरीचे प्रश्न सोडवायची काहीही इच्छा नाही आहे.

Kedarjoshi
Tuesday, July 03, 2007 - 12:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


पानी जायला ज्या जागा पाहीजेत जसे रस्तावर उतार, ड्रेनेज सिस्टीम हे सर्व ठिकानी नाहीये. उघडे नाले हा मोठा प्रॉब्लेम आहे. कारण त्यावर लोक अतिक्रमन करतात. त्यांना हटवायला गेले की बोंब मारनारे लोक, मानवी हक्क वाले लगेच बोंबा मारायला सुरु करतात व ते अतिक्रमन विरोधी पथक गेले की लगेच ती जागा परत ती लोक ताब्यात घेतात.

राजकारणी लोक ह्यावर काहीही करत नाहीत कारण मतांचा प्रश्न. ईतर नागरिकांचे सोडा त्या बांग्लादेशीयांना पण आपल्या महा सरकारने हाकलुन दिले नाही.

ह्यावर एक मोठा उपाय आहे पण तो कोणीही अमंलात आननार नाही.
मुंबै ला येन्या येऊन राहायचे व नोकरी करायची असेल तर तो तेथील नागरीक आहे याचा पुरावा देन्याची अट असली पाहीजे. म्हनजे थोडक्यात देशातल्या देशात व्हिसा सिस्टीम. चायना ने बिजींग व शांघाय या दोन शहरांच्या वाढीला रोख्यन्यासाठी ही व्यवस्था स्विकारली. त्यामुळे चायनिज लोकांना त्या शहरात जायला परवाना लागतो ( वा लागायचा). कदाचित ही व्यवस्था स्विकारली तर बरेच प्रश्न कमी होतील. पण यात भरपुर खर्च आहे (म्हणजे परत भ्रष्ट्राचार).
पण त्या शहराचा वाढीला रोख लावला तर भरपुर प्रश्न नाहीसे होतील हे सर्वांनाच माहीत आहे पण करनार कोण?


Vijaykulkarni
Tuesday, July 03, 2007 - 1:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

satish ,
http://www.pucl.org/Topics/Gender/2004/sati-acquittal.htm

PUCL may be biased but BBC?

http://news.bbc.co.uk/1/hi/world/south_asia/2523277.stm



मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators