Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 01, 2007

Hitguj » Views and Comments » Current Affairs » बातम्यांचे / लेखांचे संकलन » Political » Archive through July 01, 2007 « Previous Next »

Marhatmoli
Friday, June 29, 2007 - 11:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"चार विवाह, तलाक आणी पोटगी यावरून मुस्लिमान्चा इतका मत्सर योग्य नव्हे.
चार विवाहाबरोबरच चार वाढदिवस, चार अनिवर्सर्‍या लक्शात ठेवणे, चार सासू सासरे येतात. "


विजय कुलकर्णि,
ह्या विनोदाचि
खरोखर गरज होति का? इतक्या घृणास्प्द आणि रानटि प्रथेला समर्थन (विनोदासाठि देखिल) करण्याचा तुमचा हेतु नसेल अशि आशा करते. विकृत गोष्टिंचा मत्सर कसा काय केल्या जावु शकतो?

तुमचाच आदर्श ठेवुन तुमच्या विरोधकांनि 'सति प्रथेमुळे किंवा हुंड्याखातर जाळुन (नको असलेल्या) बायकांचि विल्हेवाट लावण्याचि सोय आमच्या धर्मात आहे म्हणुन आमचा मत्सर करु नका" अस इतर धर्मियांना ठणकावुन सांगाव काय?











Vijaykulkarni
Saturday, June 30, 2007 - 12:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मराठमोळी,
असल्या प्रथेला मी चुकुनही समर्थन देणार नाही.
एखाद्याची दुसरी पत्नी होण्याचे दुर्भाग्य कोणाच्याही वाटेला येवू नये असेच मला वाटते.
मुस्लीम समाजातल्या मुलीही दुसरी पत्नी व्हायला तयार होत नाहीत.
पण शेवटी एखादी प्रथा रानटी किन्वा कसे ही सुद्धा सापेक्ष गोष्ट आहे. कान्देपोहे प्रकारचे लग्न ही अमेरिकेतल्या मुलीना रानटी वाटेल.
मुस्लिमांना कायद्याने चार लग्ने करायची (पहिल्या बायका जिवंत असताना आणि त्यांच्याबरोबर घटस्फोट झालेला नसताना सुद्धा) परवानगी आहे. इतर कोणत्याही धर्माला अशी अन्यायकारक सवलत देण्यात आलेली नाही
या गोष्टीला तुम्ही सवलत म्हणता?
म्हणजे अशा सवलती अम्हालाही द्या असे म्हणायचे आहे का?
मुस्लीम स्त्रियाना निदान तलाक ची सोय तरी आहे.
हिन्दु स्त्रीला ती ही नाही. ( घतस्फोटाचा विधी किन्वा मन्त्र आहेत का? )
मुस्लीम धर्मात दत्तक घेणे किंवा देणे मान्य नाही. इतर कोणत्याही धर्माला अशी अन्यायकारक सवलत देण्यात आलेली नाही.
याला सवलत कसे म्हणता येते?

माझा आक्शेप आहे तो सति प्रथेचे समर्थन करणार्यानी मुस्लिमाना नाके मुरडण्याला



Shendenaxatra
Saturday, June 30, 2007 - 12:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

****मुस्लिम स्त्रीला तलाकची "सोय" आहे

आता ह्या विधानाला हसावे का रडावे कळत नाही.
स्त्रीचा नवरा कधीही तलाक तलाक तलाक असे म्हणून घटस्फोट देऊ शकतो. फोनवर, झोपेत, इमेलनेही चालेल की नाही ह्यावर मुल्ला मौलवी हिरीरीने वाद घालतात. ही स्त्रीकरता "सोय" हे कुठले तर्कट?
डोक्यावर टांगती तलवार असेल आणि ती कधीही खाली पडून कुणाची मान चिरू शकते अशी एखाद्याची स्थिती असेल तर ह्याला तो कधीही मरण्याची "सोय" आहे असे म्हणेल का?
काहीच्या काही काय बोलताय राव?
तोंडी तलाक ही रानटी पद्धत आहे. नवर्‍याची चूक आहे की बायकोची ह्याचा निवाडा करायला वाव नाही. बायकोला तोंडी तलाक देता येत नाही. स्त्रीपुरुष समानतेच्या युगात ह्या प्रथेला स्थान असता कामा नये.
इतकी साधी सोपी गोष्ट कळत नाही?


Kedarjoshi
Saturday, June 30, 2007 - 12:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे मायबोलीवरच तुम्हाला अनेक उदाहरणे सापडतील. शिवाय, सिंघल, तोगडिया, मोदी ई ची मुक्ताफळेदेखील तुम्ही ऐकली / वाचली असतीलच. या सर्वांच्या विचारसरणीचे मूळ कोठे आहे हे मी मुद्दामून सांगण्याची काही गरज नाही.
>>>>>

सुनील

सिंगल, तोगडीया, मोदी हे गेल्या दशकात फार तर १९९० नंतरच्या व्यक्ती आहेत. तुम्ही ते विधान लिहीताना ८ ते ९ दशके लिहीले आहे. जरा पाठीमागचे उदा द्या ना. हे सुरु कसे झाले ईत पर्यंत जाउयात.
वरच्या तिन्ही लोकांनी रिटलीऐशन म्हणुन अनेक काम केली आहेत पण ते कशाचे रिटलीऐशन होते?

येऊन जाउन हिंदु दहशदवाद हा बाबरी मस्जीदीवर येतो, त्या आधी तुम्ही देखील उदा द्यायला जाऊ शकत नाहीत कारण त्या आधी तसे न्हवते ही वस्तुस्तिथी आहे.

मायबोली च्या लोकांचे म्हनाल तर ते लोक समाजात द्वेश पसरवत नाहीत फक्त येथील (ते पण v&C ) वाचनारे लोकच त्या गोष्टी वाचतात.

आपणा कडुन मी वस्तुस्तिथी (८ ते ९ दशकातील) मांडन्याची अपेक्षा करत आहे.




बुश / ब्लेअर यांनी "दहशतवादाविरुद्ध" लढ्यण्याची घोषणा केली. जरी (अमेरीकेवर हला करणारे दहशतवादी मुस्लीम होते) तरी त्या लढाईला त्यांनी ख्रिश्चन विरुद्ध मुस्लिम असे स्वरूप येऊ दिले नाही>>>>>

सुनील आपल्याला २००३ सालच्या बुशरावांच्या क्रुसेड या विधानाचा विसर तर पडला नाही ना?

त्या शिवाय रोम मधील पोप रावांनी २००६ साली जे वक्त्य्व्य केले त्या साठी त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर माफी मागावी लागली हे आपणास माहीती असेलच.

तरीही पाक ला वा काही मुस्लीम देशांना हे राश्ट्र फेवर का करते याचे पोलीटिकल कारण आपनास माहीती असतील.


उद्या पुण्यात येशु जयन्ती चा कार्यक्रमाला सरकारी मदत द्यायला तुमची हरकत नसावी. पुणे तर भारतात आहे>>>>

कुळ्कर्नी साहेब भारताच्या राजधानी दिल्लीत २००४ की २००५ मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर मुस्लीम मेळावा होता त्या साठी ६ लाख मुस्लीम जमले होते. ( त्यामध्ये माझा येथील नेहमीचा टक्सी वाला पण गेला होता). मग त्या मेळाव्यास भारत सरकार ने मदत केली नाही असे वाटते की काय. की तेथील हिंदु लोकांनी बॉम्ब्स्फोट घडविले तेथे.

प्लीज आपण ही त्या स्माईली सोडुन मुद्दे मांडावेत मी कधीची वाट बघतोय. नाहीतर नेहेमी सारखे आता मी सोनीयाची आरती करायला जातो ये ब्रिदवाक्य म्हणुन जाल.

जाओगे तो अपनी बिबी और बेटिओंको यहिं रखके जाओं'?कुठे असता तुम्ही लोक तेंव्हा>>>>>

युस्वली तेव्हा ते दुसर्या ठिकानी धर्मनिरपेक्षते वर भाषण देत असतात. व हिंदु धर्म कसा सहनशिल आहे व हिंदुनी कसे सहनशिल राहावे यावर टाळ्या घेतात.

घतस्फोटाचा विधी किन्वा मन्त्र आहेत का? ) >>>>

कानुन हे हात एक मुस्लीम धर्म छोडके बाकीयो के लीये अभीभी लंबे है कुलकर्णी साहब. स्त्रीया कोर्टात जाऊ शकतात व तलाक घेऊ शकतात. पण मुद्दा हा नाहीये आपण नेहेमी सारखे दुसराच मुद्दा काढुन वेगळी कडे लक्ष ओढुन नये. काल पासुन फक्त चार बायका, चार सासरे ऐवढच वाचत आहे.

आपल्याला शहाबानो प्रकरनाचा विसर पडला का? तेव्हा काय झाले होते तुमच्या राजीवजींना. आम्हालाही कळुद्यात की जरा.


Marhatmoli
Saturday, June 30, 2007 - 4:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विजय,

माझ्या post ला उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्हि polygamy च समर्थन करन्याचा तुमचा उद्देश नव्हता हे वाचुन बर वाटल. तुमचा सापेक्षतेचा मुद्दाहि काहि अंशि पटला. पण एक गोष्ट लक्ष्यात घ्या कि हिंदु किंवा बर्याच इतर धर्मात कालबाह्य रुढि सुधारणेच्या प्रवाहात नष्ट होतात. उदा. सतिप्रथा, केशवपन हुंडा इत्यादि. तुम्हि उल्लेख केलेलि कांदापोहे पध्धत पण काळानुसार बदलते आहे.

१४०० वर्षे आधि सांगितलेलि असलि तरि कुराणातलि कुठलिहि गोष्ट हि कालबाह्य नाहि या विचारसरणिला अतिरेकि नाहि तर मग काय म्हणायच? या विचारसरणिचे भयानक परिणाम तालिबानि राजवटित आपण सगळ्यांनि बघितलेत. polygamy, public beheading अश्या गोष्टिंन आजहि सौदि अरेबियामध्ये कायद्याने परवानगि आहे. मग या गोष्टिंबद्दल कुणि संताप व्यक्त करत असेल तर त्यान्च चुकतय अस मला तरि वाटत नाहि.

शेवटचि गोष्ट, सतिप्रथेच समर्थन करणारे so called हिंदुहि माझ्यामते अतिरेकि rather रानटि आहेत.


Chinya1985
Saturday, June 30, 2007 - 8:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे केदार धर्मनिरपेक्षता ठिक आहे मी त्याचा विरोध करत नाही. पण आपल्या देशात धर्मनिरपेक्ष आहेच कोण??जे स्वत्:ला तसे म्हणवुन घेतात ते तर मुस्लिम धर्माधिष्टतेचे पुरस्कर्ते आहेत. हिंदुंनी सहनशील असाव पण लाचार असु नये.

Deshi
Saturday, June 30, 2007 - 11:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे चिन्या केदारच्या त्या वाक्यात उपरोध आहे. ( टाळ्या घेत होते). तुझ बरोबर आहे लाचार नसाव, आता काही लोकांना लाचारीच आवडते म्हणुन त्यांना ईतर हिंदु अतिरेकी वाटतात. हा बदल (लाचारी ते स्वाभिमानी) स्विकारायला काही शतके लागतील की काय? कारण १९९९ च्या कारगिल मध्ये ही आपल्या देशातील काही फुटीर गटांनी युध्दाविरोधी निदर्शने केली होती.

मराठमोळी मला नाही वाटत कोणी सति प्रथेला परत आणाव म्हणौन आंदोलन करत आहेत. तसे कोणी करनार नाही. आपल्या धर्मात कात टाकनारे लोक बरेच आहेत, ते चांगल्या गोष्टी लवकर स्विकारतात.

सुनील व कुल्कर्णीचे उत्तर अजुन यायचे आहे, वाचायला आवडेल ते काय म्हणतात वरच्या पोस्ट वर

}

Vijaykulkarni
Saturday, June 30, 2007 - 12:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुस्लीम धर्मातले विवाहविशयक कायदे रानटी आहेत यात शन्का नाही. ते वाचून कोणत्याही स्त्रीचा सन्ताप होणे सहजीक आहे.
पण त्यावर प्रामाणीक सन्तापाने आणी मुस्लीम स्त्रियान्च्या सहानूभुतीने टीका करणारे वेगळे आणी दुसर्या हेतूने करणारे वेगळे.

हिन्दु समाजातील जातीप्रथेवर सावरकरानी पण कठोर टीका केली आणे एखादा इसायी धर्मप्रसारक पण करतो. एकाची प्रामाणीक इच्छा होती की अतोनात नुकसान करणारी ही प्रथा बन्द पडावी. दुसर्याला फक्त माझा साबण कसा चान्गला हे सिद्ध करायचे असते.

सतीप्रथेचे समर्थन करणारे आजही विहिम्प मध्ये अगदी वरच्या पतळीवर आहेत.

दक्शीण भारतात केशवपन केलेल्या वयस्कर बायका अजूनही पहायला मिळतात. शहरी भाग सोडला तर विधवाना धर्मीक कार्यक्रमात चान्गली वागणूक मिळत नाही. या सर्या गोश्टीन्वर शन्कराचर्यानी टीका केली तर कसे वाटेल? आणी पोप ने केली तर?

शाबानो प्रकरणात राजिव ने चूक(पापच ) केली.


Kedarjoshi
Saturday, June 30, 2007 - 1:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चला कशाला तरी कुल्कर्णी साहेबांनी मान्यता दिली. मग तेव्हा आपण मुस्लीम समाजाती पुढार्या का बोल दिला नाही. जरा समजावुन सांगायचे की.

सतीप्रथेचे समर्थन करणारे आजही विहिम्प मध्ये अगदी वरच्या पतळीवर आहेत>>>>

हे परत एक दिशाभुल करनारे वाक्य.

त्याचा लिखीत पुरावा द्या. मग वाचक मानतील. उगीच लावला हात किबोर्ड ला व टाइप केले काहीतरी असे करु नका. तो पुरावा द्या मी विहीप विरोधी आंदोलनास मदत करेन.

पण त्यावर प्रामाणीक सन्तापाने आणी मुस्लीम स्त्रियान्च्या सहानूभुतीने टीका करणारे वेगळे आणी दुसर्या हेतूने करणारे वेगळे>>>
कुलकर्णी साहेब आपण पेपर वाचताना. त्यात ते ओरंगाबाद चे प्रसिध्द मुस्लीम पुढारी एकदा पुरोगामी बोलले होते (त्यांच नाव नेमक आठवत नाहीये) तर सायबा त्यांचाच मुस्लीम धर्मातील लोकांनी घरावर दगडफेक केली होती.
मुस्लीम समाजात पुरोगामी कोणीही बोलु शकत नाही वा वागु शकत नाही. (भारतात). त्यावर लगेच कार्यवाही केली जाते. ते जाउ द्या आपल्या सानिया मिर्झा ला पण मारन्याच्या धमक्या आल्या होत्या कारण ती स्क्रर्ट घालुन खेळ्त होती त्यामुळे धर्माचा अपमान होत होता. बिचारीला तिनदा विचार करावा लागला.

बर ते तिकड दुर ईरान, ईराक मध्ये काही लोकांना कोणीतरी दहशतवाद संपावा म्हणुन मारत आहे म्हणे. मग त्याचा भारतिय मुस्लीमांशी काय संबध, ते उगीच ह्याला का मारल, त्याला का फाशी दिल असे म्हणुन धरने धरत आहेत. त्याचा भारतीय मुसलमानांशी काय संबध. जरा समजावुन सांगा ना.

जाउ द्या हो. अनेक मुस्लीम काही चांगल्या भारतीय मुस्लीमांची वाट लावत आहेत हे सत्य आपन स्विकारत नाही आहात. डिनायल मध्ये जगन सोडुन द्या.

मुस्लीम दहशत्वादाचा मुद्याला उत्तर म्हणुन चार नवरे, सति प्रथा, जातियवाद असे मुद्दे नका देऊ. हे म्हणजे आपला बाब्या नापास झाला याचा दुखा पेक्षा समोरच्याचच्या कार्‍ट्याला कमी मार्क पडले याचा आनंद होय.


Satishmadhekar
Saturday, June 30, 2007 - 2:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> "चार विवाह, तलाक आणी पोटगी यावरून मुस्लिमान्चा इतका मत्सर योग्य नव्हे. चार विवाहाबरोबरच चार वाढदिवस, चार अनिवर्सर्‍या लक्शात ठेवणे, चार सासू सासरे येतात. "

>>> मुस्लीम स्त्रियाना निदान तलाक ची सोय तरी आहे.
हिन्दु स्त्रीला ती ही नाही. ( घतस्फोटाचा विधी किन्वा मन्त्र आहेत का? )

>>> माझा आक्शेप आहे तो सति प्रथेचे समर्थन करणार्यानी मुस्लिमाना नाके मुरडण्याला

>>> सतीप्रथेचे समर्थन करणारे आजही विहिम्प मध्ये अगदी वरच्या पतळीवर आहेत.


>>> दक्शीण भारतात केशवपन केलेल्या वयस्कर बायका अजूनही पहायला मिळतात.

अत्यंत मूर्खपणाची विधाने करणे आणि कुठलाही पुरावा न देता खोटारडे आरोप करणे कुलकर्ण्यांनी अजूनही सोडलेले दिसत नाहीये.







Marhatmoli
Saturday, June 30, 2007 - 2:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"दक्शीण भारतात केशवपन केलेल्या वयस्कर बायका अजूनही पहायला मिळतात. "


सतिश,

हा आरोप अगदिच बिनबुडाचा नाहिये, मी स्वत: माझ्या लहानपणि नागपुरात दोन विकेशा विधवा बघितल्या आहेत. पण एक गोष्ट मात्र नक्कि कि स्वातंत्र्योत्तर काळात (निदान महाराष्ट्रात) या प्रथेच समुळ उच्चाटन करण्यासाठि प्रयत्न केले गेले.


Chinya1985
Saturday, June 30, 2007 - 3:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सतीबद्दल लिहुन हिंदु धर्माचा विरोध करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. पण सती जाव असा नियम हिंदु धर्मग्रंथांमधे नाही हे विसरु नये. म्हणजे विधवेने सती जावे असे धर्म म्हणत नाही.
महाभारतात स्वेच्छेने गांधारी सती गेली होती. पण त्यावेळी तशी प्रथा नव्हती. काही शे वर्षांपुर्वी ही प्रथा सुरु झाली आणि स्त्रीयांना सक्तिने सती जावे लागत असे. वास्तविक कलियुगातिल स्त्री गांधारी सारखी पतिव्रता असुच शकत नाही(आणि पुरुषही प्रभु रामाप्रमाणे मर्यादापुरुषोत्तम असु शकत नाहित) त्यामुळे हिंदु धर्माप्रमाणे कलियुगात सती प्रथा चुकिचिच आहे. मुळात सती हे पार्वतिच्या अवताराचे नाव आहे. जेंव्हा स्वत्: शक्तिची देवता असुनही तिच्यासमोर शीवाचा अपमान होत होता आणि तो करणार्‍या राक्षसाचा वध ती करु शकत नव्हती ( कारण तो राक्षस तिचा पिता होता) म्हणुन तिने स्वत्:च्या शक्तिनी स्वत्:ला आग लावुन घेतली. आपण देवी देवता नसल्यामुळे त्यांची नक्कल करण्याची चुक आपण करू नये. कारण तशी गोष्ट आपण करुच शकत नाही. आपण केलेली नक्कलच ठरते.
मुळात वेदकालात भारतात स्त्रीयांना चांगले स्थान आणि स्वातंत्र्य होते. गार्गी मैत्रेयी ही त्याचिच उदाहरणे आहेत. मनु संहिता म्हणते 'जिथे स्त्रीयांना चांगले स्थान असते तिथे देव येतात आणि जिथे त्यांना चांगले स्थान नसते तिथे सर्व परिश्रम फ़ोल ठरतात.ते कुटुंब आणि तो समाज कधीच पुढे येउ शकत नाही जिथे स्त्रीया दु:खात जगतात' माझ्यामते मुस्लिमांनी केलेल्या आक्रमणांनंतर हिंदु स्त्रियांना उंबरठ्याच्या बाहेर न पडण्याची वेळ आली (सुरक्षेच्या कारणाने), तसेच मुस्लिम कुटुंबपध्दतीप्रमाणेच हिंदु पुरुषांनी स्त्रीयांवर आपले विचार लादायला सुरुवात केली.
बर्‍याच वेळा फ़ेमिनिस्ट लोक सीतेचे उदाहरण देउन विरोध करतात. कारण म्हणे एका माणसाच्या बोलण्यावरुन सीतेचा त्याग करणे चुकिचे होते. आणि सध्याच्या स्त्रीयांच्या प्रश्नांचे कनेक्शन थेट रामायणाला लावतात. पण हे करताना विसरतात की ज्याप्रमाणे सीतेला कारण नसताना राज्यातुन काढण्यात आले होते त्याचप्रमाणे रामालाही कारण नसताना १४ वर्षे वनवासाला पाठवण्यात आले होते.


Kedarjoshi
Saturday, June 30, 2007 - 4:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झ्यामते मुस्लिमांनी केलेल्या आक्रमणांनंतर हिंदु स्त्रियांना उंबरठ्याच्या बाहेर न पडण्याची वेळ आली (सुरक्षेच्या कारणाने), तसेच मुस्लिम कुटुंबपध्दतीप्रमाणेच हिंदु पुरुषांनी स्त्रीयांवर आपले विचार लादायला सुरुवात केली>>>>>

चिन्या अगदी महत्वाचा मुद्दा. समाज व्यवस्थेवर ईतिहासकारांनी अनेक पुस्तक लिहीले आहेत. तत्कालीन भारतीय हिंदुनी आपल्या स्त्रीया वाचविन्या साठी ही पध्दती स्विकारली. अन्यथा ही आपली संस्कृती नाही.


मनु संहिता म्हणते 'जिथे स्त्रीयांना चांगले स्थान असते तिथे देव येतात आणि जिथे त्यांना चांगले स्थान नसते तिथे सर्व परिश्रम फ़ोल ठरतात>>

मुळात दोन मनु झाले. एक जो विद्द्वान होता तो कदाचित वेदकालीन असावा.
दुसरा ज्याचे नाव घेऊन मनुस्मृती लिहील्या गेली. हा ग्रंथ मात्र साधारन १००० ते ११०० वर्षापुर्वीचा असावा असे आता ईतिहासकार म्हणत आहेत. ह्या मनुने शुद्र, स्त्री वैगर भेदभाव जास्त केला. तत्कालीन परिस्तिथी जर पाहीली, आधी त्यातच नंतर मुसलमानांचे आक्रमन, ते पाहाता स्त्रीया वाचविन्यासाठी असे फालतु बंधन त्यांचावर टाकले गेले असावे. व फालतु कर्मकांड आनली गेली असावीत ज्याने करुन ब्राम्हानांचे महत्व राज धर्मात वाढीस लागले.


Chinya1985
Saturday, June 30, 2007 - 4:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार, मी दिलेला संदर्भ वेदकालिन मनुबद्दल आहे.

Shendenaxatra
Saturday, June 30, 2007 - 8:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सती आणि तलाक ह्यांची तुलना अत्यंत बिनबुडाची आहे.
सध्या विषय कायद्याचा चालू आहे. कायद्याच्या दृष्टीने सती जाणे हा आत्महत्येचा गुन्हा आहे. कुणाला सती जायला भाग पाडणे हा खुनाचा फौजदारी गुन्हा आहे.
तोंडी तलाक वा मुस्लिमांचे बहुपत्नीत्व ह्याला कायद्याची संमती आहे. तेव्हा दोन रानटी, आदिम प्रथांपैकी एकाला कायदा मान्यता देतो आणि दुसर्‍याला गुन्हा मानतो असा दुटप्पी प्रकार भारतात होतो आहे.
सती प्रथेचे पुनरुज्जीवन करावे अशी कुण्या राजकीय पक्षाची मागणी असल्याचे ऐकिवात नाही. मात्र तलाकविरुद्ध काही कुणी म्हतले, मग तो कोर्टाने व अन्य कुणी तर मुल्ला मौलवी खवळून उठतात आणि इस्लाम खतरेमे आणि तत्सम आरोळ्या ठोकू लागतात, आणि स्वाभाविकच मोर्चे दंगली, दगडफेक असले कार्यक्रम होतात.
तेव्हा मुस्लिमांचा रानटीपणा आजही राजमान्य आहे आणि हिंदूंचा राजमान्य नाही हे लक्षात घ्या.


Vijaykulkarni
Saturday, June 30, 2007 - 9:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्याचा लिखीत पुरावा द्या.
तो पुरावा द्या मी विहीप विरोधी आंदोलनास मदत करेन.
केदार जोशी,
आचार्य धर्मेन्द्र महाराज हे विहिम्प च्या मार्गदर्शक मन्डळाचे आज सदस्य आहेत. राजस्थानतल्या सतीच्या प्रथम वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचे पुरोहित होते ते.
त्यान्च्यावर खटला सुद्धा चालू होता.
त्यान्ची कोर्टाने नन्तर सुटका केली.
अर्थात त्यावेळी या घटनेचे उदत्तीकरण करणर्यात कॉन्ग्रेस आणी भाजप दोन्ही पक्शाचे लोक होते.
मग, केव्हा येताय आमच्या आन्दोलनाला :-)

तत्कालीन भारतीय हिंदुनी आपल्या स्त्रीया वाचविन्या साठी ही पध्दती स्विकारली
मग बेन्टीक ने सती प्रथा बन्द पाडली तेव्हा त्यालाही काही कर्मठ लोकानी विरोध का केला


अत्यंत मूर्खपणाची विधाने करणे आणि कुठलाही पुरावा न देता खोटारडे आरोप करणे कुलकर्ण्यांनी अजूनही सोडलेले दिसत नाहीये.

असे पुरावे देवून बिचार्यान्च्या दु:खावर आणखी मीठ चोळणे मला मन्जूर नाही.

आणी हो, पुरावे न देता खोटारडे आरोप करणे हा आपला प्रान्त आहे माझा नव्हे ( आठवा स्रिराम लागू)


Chyayla
Sunday, July 01, 2007 - 1:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शेन्डेनक्शत्र तलाक व सती या बाबतित योग्य लिहिलेत, तसेच चिन्या सतीच्या बाबतित योग्य मुद्दा मान्डलास मुसल्मानान्पासुन स्त्रीयान्च शील रक्षण करण्यासाठी तो एकदम शेवटचा उपाय होता. धर्मामधे असे कुठेही सती बद्दल लिहिले नाही. कारण हिन्दु स्त्रीयाना प्राणापेक्षा शील रक्षण हे महत्वाचे होते. तसेच वेळ आली आणी समोर दुसरा काहीच उपाय नसताना शत्रुच्या तावडीत सापडुन भ्रष्ट होण्यापेक्षा हजारो राजपुत स्त्रीयानी जौहार करुन स्वता:ला जाळुन घेणे ईष्ट समजलेच ना.

मला वाटत या गोष्टीचा मुस्लिम शत्रुन्च्या मनावर थोडाफ़ार परिणाम झाला कारण स्त्री, सम्पती मिळवण्याच्या लालसेने धर्माचे नाव घेउन आक्रमण करुन लुट करणे हा त्यान्चा रानटीपणा होता. पण मग जेन्व्हा त्याना या प्रकारामुळे ते मिळेनासे झाले त्यामुळे ते अनुत्सुक असायचे.

तसेच पुढे केशवपन पण ह्याच लाचारीतुन आले होते विधवा स्त्रियाना सती जाण्यापेक्षा शत्रुच्या तावडीत सापडण्यापेक्षा जीवन्त राहुन व या प्रकारे विद्रुप राहुन त्यानी स्वता:चे रक्षण केले अर्थात धर्मामधे असे काही नियम नव्हतेच पुढे कालान्तराने काळ बदलला व त्यानुसार या गोष्टीन्ची गरजही नाही राहीली व शेवटी ते कालबाह्य झालेच. तरी अडाणीपणामुळे १,२ अपवादात्मक घटना मागच्या एक दोन दशकात घडल्या पण शेवटी तो अपवादच ती काही प्रथा, नियम नाही व कुणी त्याचे समर्थनही करत नाही. काही डाव्यानी मुद्दाम दीशाभुल करण्यासाठी विहिप चे नाव जोडले म्हणुन ते काय ब्रह्म सत्य झाले काय? ही तर जुनीच खोड आहे. ते काम तुम्हीही ईथे ईमाने ईतबारे कराहात ना?

अत्यन्त असहिष्णु व क्रुर जिहादीन्च्या शेकडो वर्शाच्या आक्रमणापुढे ईतर जगाप्रमाणे भारत पुर्णता: मुस्लिम (सेक्युलर) न होण्यामागे भारतिय स्त्रीयान्च्या बलिदानाचा फ़ार मोठा वाटा आहे. ते बलिदान असेच वाया जावु देउ नये.

आणी त्यान्ची क्रुरता आजही तितकीच कायम आहे कारगील युद्धाच्या वेळेस पाकिस्तान्यानी काही भारतिय सैनिकान्चे अपहरण करुन त्यान्चा अत्यान्तिक छळ व हाल हाल करुन मारले लिहवत नाही पण अगदी गुप्तांगसुद्धा कापुन ठार मारले व शेवटी अतिशय छिन्न विछिन्न प्रेत भारताच्या ताब्यात दीलीत, एवढच काय नुकताच असा प्रकार बन्गाल सिमेपाशी दीड दमडीच्या बांग्लादेशी सैनिकानी भारतिय सैनिकांसोबतही केलाच पण सरकार मात्र केवळ निषेध करुन षन्ढासारखे थाम्बुन गेले. वास्तविक पहाता आन्तरराष्ट्रीय नियमाप्रमाणे शत्रु देशाच्या सैनिकान्सोबत व्यव्हाराचे काही नियम असतात पण मुस्लिम जिहादीन्च्या धर्मान्धापुढे कसचे आले नियम काफ़िर कसे सम्पवायचे ही जुनीच परम्परा आहे. असो सान्गायचा उद्देश असा की अशा अत्यन्त क्रुर लोकानपासुन शील रक्षण करण्यासाठी सती जाणे ही लाचारी होती, प्रथा नव्हती.



Satishmadhekar
Sunday, July 01, 2007 - 7:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> आचार्य धर्मेन्द्र महाराज हे विहिम्प च्या मार्गदर्शक मन्डळाचे आज सदस्य आहेत. राजस्थानतल्या सतीच्या प्रथम वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचे पुरोहित होते ते.

ते या कार्यक्रमाचे पुरोहित होते याला काही पुरावा आहे का? का तुमच्या नेहमीच्या पध्दतीप्रमाणे पुडी सोडून दिलीत?

>>> त्यान्च्यावर खटला सुद्धा चालू होता. त्यान्ची कोर्टाने नन्तर सुटका केली.

याला सुद्धा काही पुरावा आहे का? का नेहमीप्रमाणेच थाप मारलीत. हे जर खरं असेल तर त्यांच्यावरचे आरोप खोटे होते हे कोर्टानेच सिद्ध केले आहे. त्यामुळे तुमचा पहिल्या वाक्यातील आरोप आपोआपच खोटा ठरतो.

अर्थातच कोर्टाचे निर्णय तुम्हाला मान्य नसतातच. अफजल गुरुला तब्बल तीन वेगवेगळ्या न्यायालयांनी दोषी ठरवून फाशीची शिक्षा दिली. तरी सुद्धा अफजल निर्दोष आणि कोर्ट खोटे असे तुम्ही म्हणताच ना!

सती प्रथा बंद होऊन दिडशे वर्षे होऊन गेली. या प्रथेला कायद्याने सुद्धा बंदी घातली. तरी सुद्धा सती प्रथा ही भारतात अजून अस्तित्वात आहे असा तद्दन खोटा दावा करून वि. हिं. प. वर तुमचे खोटे आरोप अजूनही चालू आहेत.


>>> मग, केव्हा येताय आमच्या आन्दोलनाला

अस्तिवात नसलेल्या प्रश्नाबद्दल केवळ ढोंगीच आंदोलन करू शकतात. मूळ प्रश्नाला बगल देणे असा त्यामागचा उद्देश असतो. असल्या अस्तित्वहीन प्रथेविरुद्ध आंदोलन करण्यापेक्षा मुस्लीमांना कायद्याने दिलेल्या अन्यायकारक सवलतींविरूद्ध आंदोलन करा.





Satishmadhekar
Sunday, July 01, 2007 - 8:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> हा आरोप अगदिच बिनबुडाचा नाहिये, मी स्वत: माझ्या लहानपणि नागपुरात दोन विकेशा विधवा बघितल्या आहेत.

अलिकडच्या काळात आपण अशा किती बायका पाहिल्या आहेत? केशवपन ही प्रथा अजून जिवंत आहे असे आपल्याला म्हणायचे आहे का?

ज्या वाईट प्रथा केव्हाच संपलेल्या आहेत, त्याची आताच्या काळात संदर्भहीन उदाहरणे देणे कितपत योग्य?


Satishmadhekar
Sunday, July 01, 2007 - 8:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> १००% मान्य शेंडेनक्षत्र. तोंडी तलाक इ जुनाट प्रथांमुळे मुस्लिम स्त्रियांची परिस्थिती भयाण आहे हे खरेच. आणि ती सुधारणे हेदेखील जरूरीचे आहे.

परंतु, आमचा अक्षेप आहे तो, ह्याचे कारण पुढे करून मुस्लिमांविरुद्ध द्वेष पसरणार्‍यांवर.

आमचा विरोध आहे तो अल्पसंक्याकांचे हक्क आणि धर्मनिरपेक्षता या नावांखाली कायदे करून अन्यायकारक सवलती देण्याला.

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators