|
Gs1
| |
| Wednesday, June 27, 2007 - 5:26 am: |
| 
|
सतीश, छान आहे कहाणी. 
|
>>> माझ्या माहितीप्रमाणे जेव्हा प्लास्टर ऑफ़ पॅरीसच्या मुर्ती तलाव किंवा विहिरीत विसर्जित केल्या जातात तेव्हा plaster च्या नैसर्गिक गुणधर्मामुळे तलाव किंवा विहिरीत जे पाण्याचे जिवंत झरे असतात की ज्यामुळे विहिर अथवा तलावाला सतत पाणी मिळत राहते ते बंद होऊन तो जलसाठा आटून जातो. त्यामुळे अश्या जलाशयांत plaster च्या मूर्ति टाकणे अयोग्य आहे. यासाठी प्लॅस्टरच्या मूर्ती बनवण्यावर बंदी घालून फक्त शाडूच्याच मूर्तींना परवानगी द्यावी. प्रदूषणाचे कारण पुढे करून मूर्तीविसर्जनाला बंदी घालणे आणि गणेशविसर्जन ही अंधश्रद्धा आहे असे म्हणणे हा यावरील उपाय नव्हे. नाहीतर कारखान्यांमूळे, कत्तलखान्यांमुळे, झोपडपट्टीमुळे, फटाक्यांमुळे, सांडपाण्यामुळे वर्षातले ३६५ दिवस होणारे प्रदूषण टाळण्यासाठी अनिसवाले काय करतात असे प्रश्न विचारले जातात आणि अर्थातच असे प्रश्न ऐकून अनिसवाल्यांची दातखिळी बसते.
|
अगदी बरोबर. मातिच्या मुर्ती बनवा. आम्ही नाही विरोध करणार मात्र ही सर्व अंधश्रध्दा असे म्हणनार असेल कोणी तर विरोध करावाच लागेल. सतिशराव लागुंची बायको मेली का मारली ह्याबद्दल मलाही माहिती आहे पण सत्यपरिस्थिती लिहिली तर विजयराव विषयांतर करतिल हे मला माहित होते म्हणुन ती मेली असे मी म्हटले होते. बघा विजयरावांनी केलेच विषयांतर.
|
खालिल लिंक पहा- http://www.expressindia.com/fullstory.php?newsid=88709 विजयराव, यावर तुमचे काय म्हणने आहे?? तुमच्या सोनियाजिंच्या आवडत्या प्रतिभा पाटिल पण अंधश्रध्दाळु आहेत. आता त्यांनी राष्ट्रपती बनावे का नाही??
|
>>> विजयराव, यावर तुमचे काय म्हणने आहे?? तुमच्या सोनियाजिंच्या आवडत्या प्रतिभा पाटिल पण अंधश्रध्दाळु आहेत. आता त्यांनी राष्ट्रपती बनावे का नाही?? भाजप आणि संघवाल्यांच्या त्या अंधश्रद्धा. इतरांचा तो बुद्धिवादी दृष्टीकोन! आपल्या त्या प्रतिभाताई, दुसर्याचा तो भैरवसिंग!
|
Mandard
| |
| Wednesday, June 27, 2007 - 7:53 am: |
| 
|
अहो पण सेनेने भाजपाला टांग मारुन प्रतिभा पाटील यांना पाठिंबा दिला. सेनेने कोणते डिल केले.
|
>>> अहो पण सेनेने भाजपाला टांग मारुन प्रतिभा पाटील यांना पाठिंबा दिला. सेनेने कोणते डिल केले. नारायण राणेला मुख्यमंत्री करायचे नाही या अटीवर सेनेने प्रतिभाबाईंना पाठिंबा दिला.
|
मला पॉलिटिक्स मधलं फारसं कळत नाही. एक बालबोध शंका आहे. इथले रथीमहारथी त्याचे निरसन करतील अशी आशा आहे. आपल्या मित्रपक्षांशी आणि त्यातही ज्यांच्याशी वर्षानुवर्षं युती आहे त्या शिवसेनेशी चर्चा न करताच भाजपने शेखावतांना उमेदवार म्हणून घोषित केले का? तसे असेल तर भाजप शिवसेनेकडून पाठिंब्याची अपेक्षा कसे करू शकतो?
|
>>> आपल्या मित्रपक्षांशी आणि त्यातही ज्यांच्याशी वर्षानुवर्षं युती आहे त्या शिवसेनेशी चर्चा न करताच भाजपने शेखावतांना उमेदवार म्हणून घोषित केले का? शिवसेनेशी चर्चा न करताच भाजपने शेखावतांना उमेदवार म्हणून जाहीर केले असे मला वाटत नाही. राजकरणात कायमचे मित्र किंवा शत्रू कोणीही नसते. राजकारण हे तडजोडीची कला आहे. शिवसेनेने एकदा एक विशिष्ट भूमिका घेतल्यावर (प्रतिभाताईंना समर्थन देण्याची) त्या भूमिकेचे समर्थन करणे हे आवश्यक ठरते. म्हणुन तर शेखावत सौदेबाजी करतात, आम्हाला विश्वासात घेतले नाही अशी फुसकी कारणे देऊन समर्थन केले जाते. सुबोध मोहित्यांनी काही महिन्यांपूर्वी नारायण राण्यांच्या नादाला लागून शिवसेना सोडून कॉंग्रेसमध्ये गेले तेव्हा 'उद्धव ठाकर्यांना दूरदृष्टी नाही' म्हणून मी शिवसेना सोडून कॉंग्रेसमध्ये जात आहे, असे फुसके कारण दिले होते. नारायण राणे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेची मते फोडण्याची तयारी करत होते. तसे झाले असते तर शिवसेनेचे अजून एकदा नाक कापले गेले असते. शेखावत निवडून येण्याची शक्यता खूप कमी आहे. त्यामुळे त्यांना मते देऊन मते वाया घालविण्यापेक्षा प्रतिभाताईंना पाठिंबा देऊन आपली अडचणीची परिस्थिती टाळावी आणि मराठी महिलेला मते दिल्याचे श्रेय मिळवावे ही शिवसेनेची योजना. आणि त्याचे समर्थन करण्यासाठी फुसकी कारणे पुढे केली जात आहेत.
|
Chyayla
| |
| Wednesday, June 27, 2007 - 10:46 am: |
| 
|
यासाठी प्लॅस्टरच्या मूर्ती बनवण्यावर बंदी घालून फक्त शाडूच्याच मूर्तींना परवानगी द्यावी. प्रदूषणाचे कारण पुढे करून मूर्तीविसर्जनाला बंदी घालणे आणि गणेशविसर्जन ही अंधश्रद्धा आहे असे म्हणणे हा यावरील उपाय नव्हे सतिश, मानल बुवा तुम्हाला एकदम बरोबर मुद्दा आहे तुमचा. अनिस ला प्रदुषणापेक्षा गणेश मुर्तिन्च्या विसर्जनाची जास्त काळजी आहे आणी ईथे परत अनिस च्या छुप्या अजेन्ड्याची पोल उघडल्या गेली व त्यान्च्या प्रामाणिकतेबद्दल सन्शय निर्माण होतोच. खायचे आणी दाखवायचे दात वेगळेच. एवढेच जर प्रदुषणाची काळजी असेल तर सरकारच्या मागे लागुन प्लास्टर ऑफ़ पॅरिस वर बन्दी नाही घालणार... तरी काही सान्गता येत नाही तिकडे परत ते मागणी करायचे की गणेश मुर्ति बनवण्यावरच बन्दी घालावी. बाकी कहाणी मस्तच...
|
ही बातमी वाचून निधर्मी, पुरोगामी, विचारवंत, अनिसवाले, रामदास आठवले, साम्यवादी, समाजवादी वगैरेंचा खूप चडफडाट होईल. http://www.expressindia.com/fullstory.php?newsid=88715
|
Sunilt
| |
| Wednesday, June 27, 2007 - 2:05 pm: |
| 
|
Satishmadhekar , ही बातमी पुन्हा पुन्हा अनेकवेळा वाचली पण त्यात कुणाचा चडफडाट होण्यासारखे काही आढळले नाही. Australia तील हिंदूंची संख्या गेल्या दहा वर्षात दुप्पट होऊन ती सध्या ०.७ % आहे. आता भारतातून Australia ला जाण्यार्यांच्या संख्येचा विचार केला तर हे सहज शक्य आहे. परंतु, याच बातमीतील आणखी एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का? तेथील बौद्धांची संख्यादेखील दुपटीने वाढून २ % गेली आहे टीप: हिंदुत्ववाद्यांनी स्व्तला हिंदू धर्माचे ठेकेदार मानू नये. हिंदुत्ववादी नसलेल्या हिंदूंची संख्या फारच मोठी आहे.
|
Slarti
| |
| Wednesday, June 27, 2007 - 3:24 pm: |
| 
|
अनिसचा प्रदूषणनिवारणाशी नक्की संबंध काय ? विसर्जनाच्या दिवशी मूर्ती गोळा करण्यामगे त्यांचा उद्देश नक्की काय आहे ? अनिसची याबाबतची भूमिका संदिग्ध वाटते. तुम्ही अंधश्रद्धा निर्मूलनच्या झेंड्याखाली उभे राहणार आणि मग प्रदूषणाचे कारण पुढे करणार असाल तर ते लोकांना पटणे शक्यच नाही. त्यांच्या या कामाला हिंदुधर्माभिमान्यांनी विरोध केला तर त्यामागे हे कारण असावे. मला वाटते की मूर्तीविसर्जन व प्रदूषण यांचा संबंध त्यांना पटवून देणे व त्यावर कृती करणे हे शक्य आहे, अनिसने केल्यामुळे वेगळाच संदेश जातो आणि मूळ मुद्याकडे दुर्लक्ष होते. वास्तविकतः अनिसने हे काम हातात घेऊन पर्यावरणवाद्यांची जास्त पंचाईत केली आहे असे मला वाटते. आधी जे लोक थोडेफार ऐकून घेण्याच्या मनस्थितीत होते तेही अनिसच्या सहभागामुळे विरोध करू लागले. श्रद्धेवर घाव न घालता हे काम केले पाहिजे हे त्यांना कळत नाही का ? आणि त्यांना त्या प्रथेचा एक तत्व म्हणून विरोध करायचा असेल तर त्यांनी निदान त्याची सांगड प्रदूषणाशी घालून घोळ घालू नये. अशाने प्रदूषणाचा अतिशय महत्वाचा मुदा बाजूलाच राहतो.
|
Slarti
| |
| Wednesday, June 27, 2007 - 3:27 pm: |
| 
|
>>> आपल्या त्या प्रतिभाताई, दुसर्याचा तो भैरवसिंग!

|
कुणी काही म्हणा पण येत्या निवडणुकीनन्तर सोनियाजी पन्तप्रधान होणार आणी लाल किल्यावरून भाषण करणार असे जळगावचे सुप्रसिद्ध ज्योतिर्विद अवधूत पटवर्धन यानी सायन पद्धतीने सान्गीतले आहे. आता बोला
|
Chyayla
| |
| Thursday, June 28, 2007 - 1:25 am: |
| 
|
सुनिल साहेब, बौद्ध असो वा हिन्दु यान्च्यात कोणी एकामेकाचे शत्रु नाहीत. पण जिहादीन्साठी मात्र ईतर सगळे काफ़िरच आहेत ना? आणी त्यान्ची दाढी कुरवाळण्याच्या ठेकेदारी धोक्यात आल्याने या मन्डळीचा चडफ़डाट नाही होणार तर काय? मला वाटत तुमचाही तो झालेला दीसतोय. पण लपवणार कसा मग द्या शिव्या.. मात्रुभुमीची, समाजाची उस्फ़ुर्तपणे सेवा करणे म्हणजे ठेकेदारी कशी काय बुवा? तुमच्या ठेकेदारीला अजुन एक चपराक आपल्या देशात आपण सरस्वती वन्दनेचा सेक्युलर तिरस्कार करतो पण अमेरिकेतले सिनेटचे १२ जुलैचे अधिवेशन हे वैदीक मन्त्रोचारानी प्रारम्भ होत आहे त्यासाठी रन्जन झैद याना आमन्त्रित करण्यात आले आहे. सोनियाला पन्तप्रधान व्हायची घाई झाली आहे म्हणुन तर रबर स्ट्याम्प राष्ट्रपती हवा आहे, आधी कठपुतळी पन्तप्रधान आता राष्ट्रपती.. आगे आगे देखो होता है क्या? "तुम्ही अजुनही इटालीचे नागरिकत्व ठेवुन आहात तुम्हाला पन्तप्रधान होता येणार नाही" असे स्पष्ट बोलणारे कलाम चाचा म्हणुन तर नकोत. बाकी प्रतिभाताईन्च नाव देण्यामागे पवारान्च राजकारण मानाव लागेल.
|
Sunilt
| |
| Thursday, June 28, 2007 - 2:20 am: |
| 
|
मातृभूमीची आणि समाजाची उस्फुर्त सेवा हिंदुत्ववादी नसलेले हिंदू करीत नाहीत असा तर आपला गैरसमज नाही ना? कारण आपण करतो तीच काय ती देशभक्ती असा गंड तुम्हा लोकांना फार !!!!!!!!!
|
Chyayla
| |
| Thursday, June 28, 2007 - 3:49 am: |
| 
|
छे: हो कसचा गैरसमज पण तुम्ही त्याला चरफ़डत ठेकेदारी म्हणताय त्याबद्दल बोललोय. बाकी सगळे मुद्दे व्यवस्थित टाळलेत... कस काय जमत बुवा तुम्हाला? तुमचा हिन्दु, हिन्दुत्व, हिन्दुत्ववाद, हिन्दु धर्म व हिन्दु सन्स्कृती याचा बराच गोन्धळ उडालेला दीसतोय. आम्ही ज्याबद्दल बोलतोय त्या हिन्दु सन्स्कृती मधे सगळेच आले बौद्ध, सनातन वैदीक, जैन, शिख, देशप्रेमी, सहिष्णु, धर्मनिरपेक्ष मुस्लिम, ख्रिश्चनही (म्हणुनच बौद्ध व हिन्दु शत्रु नसल्याचे लिहिले कारण ते एकाच भुमीतुन एकाच सन्स्कृतीतुन निर्माण झालेले आहेत)... साहेब थोडे सन्कुचित धर्मान्धातुन बाहेर पडा आणी बोला स्वता: डोळे झाकुन ठेवलेत तरी बाकीच्यान्चे उघडे आहेत याचही भान ठेवा. मतान्ध सम्पुआ ने नेमलेल्या न्या. रन्गनाथ मिश्रा यान्चा अहवाल आला. त्यान्च्या शिफ़ारशीन्प्रमाणे १)हिन्दु अनुसुचित जातीना जे १५ टक्के आरक्षण नोकर्या व शिक्षणात आहे, त्यापैकी १० टक्के मुस्लिमाना व ५ टक्के ख्रिश्चनाना देण्यात यावे. २)मागासवर्गियाना जे २७ टक्के होते त्यापैकी ६ टक्के मुस्लिमाना व २.४ टक्के ख्रिश्चनाना द्यावे. आणी विषेश म्हणजे जे हिन्दु धर्मातुन (जैन, बुद्ध, शिख धरुन) मुस्लिम व ख्रिश्चन धर्मात गेले त्यानाच या सवलती राहतील अशी नोट जोडली आहे. या सगळ्याचा अर्थ सुज्ञास सान्गण्याची आवश्यकता नाही. तर औरन्गजेबाने हिन्दुन्चे धर्मपरिवर्तन व्हावे म्हणुन जिझिया कर लावला होता आणी आजचे औरन्गजेबी सरकार तेच काम या पद्धतिने करतेय असे दीसते... सुनिलरावाना असले हिन्दु की ठेकेदार अपेक्षीत आहेत असे वाटते. कारण ह्यान्चे देशाला धार्मिक आधारावर तोडण्याचे उपद्व्याप त्याना चालतात, वरुन याना खरे देशप्रेमी म्हणायचे.. कलाम चाचा काही सत्ता मिळवुन द्यायच्या उपयोगाचे नाहीत म्हणुन ते नकोत (मुस्लिम असुनही) ढोन्गी कॉन्ग्रेसीना खरोखरच मुस्लिमान्च्या भल्याची ईतकी चाड असती तर असे केले असते का? पण त्याना फ़क्त त्यान्ची मते आणी त्यान्चा उपयोग हवा नाहीतर देशप्रेमी कलाम चाचासारखे त्याना पण असेच दुर ढकलण्यास मागे पुढे पहणार नाहीत हे परत एकदा सिद्ध झाले. म्हणुन तर धार्मिक आधारावर आरक्षण, सवलती, वेगळा कायदा करुन त्यान्च्यातली देशप्रेमाची भावना मारुन धार्मिक उन्माद वाढवण्याचे प्रयत्न कायम सुरु असतात. शिवाय हिन्दु, हिन्दु सन्घटनान्ची तथाकथित भीती दाखवली की काम फ़त्ते.
|
>>> कुणी काही म्हणा पण येत्या निवडणुकीनन्तर सोनियाजी पन्तप्रधान होणार आणी लाल किल्यावरून भाषण करणार असे जळगावचे सुप्रसिद्ध ज्योतिर्विद अवधूत पटवर्धन यानी सायन पद्धतीने सान्गीतले आहे. आता बोला अभिनंदन विजयराव! या बातमीने तुम्हाला आनंदाच्या उकळ्या फुटताना दिसत आहेत. या बातमीने सोनियाच्या सर्व चमच्यांना आनंद होईल अशी माझी श्रद्धा आहे. शेवटी काही झाले तरी सोनिया ही श्वेतवर्णी, म्हणजेच तिच्याकडे दैवी शक्ती असणार. आणि श्वेतवर्णीयांना कृष्णवर्णीयांवर राज्य करण्याचा नियतीनेच अधिकार दिलेला आहे. सोनिया कृष्णवर्णी असती तर तिच्या लाळघोट्यांनी तिचा शूद्रांमध्ये समावेश केला असता. पण तिच्या श्वेतवर्णामुळे तिच्यापुढे लोटांगण घातले तर १०८ अश्वमेध यज्ञ केल्याचे पुण्य मिळते. असो. या बातमीने आनिसवाले सुद्धा प्रफुल्लित होतील. भविष्य, ज्योतिष इं चा जर चांगल्या कामासाठी वापर होत असेल तर ते का विरोध करतील? एक शंका. सोनियाला पंतप्रधान होण्यासाठी पुढच्या निवडणुकीपर्यंत कशाला थांबायचे आहे? सोनिया २००४ पासून अघोषित पंतप्रधान आहेच की. आताचे पंतप्रधान हे निव्वळ नामधारी असून ते तिच्या तालावर नाचतात.
|
सुवर्णदेवतेची कहाणी - २ ___________ ऐका महाराजा सुवर्णदेवतेची कहाणी. कलीयुगात सुवर्णदेवता जम्बुद्वीपातल्या असुरांच्या उद्धारासाठी अवतार धारण करून जम्बुद्वीपावर राज्य करत होती. तिथे द्वादशबुद्धी नावाच्या एका आटपाट नगरात एक शरद कुमार नावाचा क्षत्रिय रहात होता. क्षत्रिय असून सुद्धा त्याला क्रीडा प्रकारांची अतिशय आवड होती (म्हणजे आपल्याला क्रीडाप्रकार खूप आवडतात असे तो सांगत असे. विशेषतः त्याच्या वृध्दापकाळात त्याला चेंडूफळीच्या कोषागाराचे प्रमुख केले गेले तेव्हापासून आपण क्रीडापटू असल्याचे तो सांगू लागला.) आपल्या सहकार्यांना पायात पाय घालून पाडणे, प्रेमाने आलिंगन देऊन पाठीत खंजीर खुपसणे, एका संघाकडून खेळत असताना अचानक विरुद्ध बाजूच्या संघाकडून खेळायला लागून आपल्या स्वतःच्याच संघाला पराभूत करणे अशा अनेक क्रीडाप्रकारात तो निपुण होता. पुढे त्याच्या पंथाला जेव्हा जम्बुद्वीपात राज्य गमवावे लागले, तेव्हा आपल्या पंथाचे महत्व वाढविण्यासाठी त्याने सुवर्णदेवतेची उपासना करून तिला प्रसन्न करून घेतले आणि तिला आपल्या पंथाच्या प्रमुख देवतेचे स्थान स्वीकारण्याची प्रार्थना केली. सुवर्णदेवता त्याच्या पूर्वकर्मांमुळे अर्थातच त्याच्याबद्दल साशंक होती. त्याची प्रार्थना ऐकून तिने त्याला विचारले, "हा वसा सोपा नाही. उतशील, मातशील आणि घेतला वसा टाकून देशील." हे ऐकून शरदकुमाराने तिला सांगितले, "माते, उतणार नाही. मातणार नाही. घेतला वसा टाकणार नाही." आणि तिच्यापुढे लोटांगण घालून आजन्म तिची भक्ती करण्याचे तिला वचन दिले. कालांतराने सुवर्णदेवता आपल्यापेक्षा इतर भक्तांवर जास्त कृपादृष्टी ठेऊन आहे अशी पापशंका त्याच्या मनात आली आणि त्याने सुवर्णदेवतेला दूषणे देत तिच्या पंथाचा त्याग करून स्वतःचा एक नवीन पंथ स्थापन केला. परंतु त्याच्या नवीन पंथाला फारसा पाठिंबा मिळाला नाही. साम्यवादी, यवन, म्लेंच्छ, फिरंगी, समाजवादी, अनिसवाले इ. असुर त्याच्याबरोबर न जाता मूळच्या पंथातच राहून सुवर्णदेवतेची भक्ती करू लागले. त्याच्या विश्वासघाताने चिडलेल्या सुवर्णदेवतेने त्याला शासन देण्याचे ठरवले. काही मासातच जनतेने शरदकुमारच्या पंथाला वाळीत टाकून आपण सुवर्णदेवतेचीच भक्ती करतो हे दाखवून दिले. राज्य गमावण्याच्या भीतीने शरदकुमारच्या पंथातील त्याचे भक्त त्याला सोडून पुन्हा एकदा सुवर्णदेवतेच्या भजनी लागले. आपली चूक लक्षात येताच शरदकुमारने सुवर्णदेवतेची माफी मागितली आणि आपले उर्वरीत आयुष्य तिच्याच सेवेत घालविणार असल्याचे जाहीर केले. शरदकुमारच्या खर्याखूर्या, प्रामाणिक पश्चातापामुळे, सुवर्णदेवतेने त्याला उदार मनाने क्षमा केली आणि अधिकारपदाचे वरदान देऊन त्याचा उद्धार केला. अशा तर्हेने सुवर्णदेवतेने पाखंडी भक्ताला त्याच्या विश्वासघाताची शिक्षा दिली आणि त्याचबरोबर त्याने क्षमा मागताच त्याला पावन करून घेतले. असा आहे या सुवर्णदेवतेचा महीमा. तुम्हीसुद्धा या देवतेची मनोभावे भक्ती करून तिचा कृपाप्रसाद प्राप्त करून घ्या. ही साठा उत्तराची कहाणि पाचा उत्तरे सुफळ संपूर्ण. जो कोणी या कहाणीचे रोज प्रातःकाळी पठण करेल त्याचे सुवर्णदेवता भ्रष्टाचार, तस्करी, लबाडी, फसवणूक, चौर्यकर्म अशा सर्व कुकर्मांपासून रक्षण करेल. जय माताजी! जय १० जनपथ वाली!
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|