Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 25, 2007

Hitguj » Views and Comments » Current Affairs » बातम्यांचे / लेखांचे संकलन » Political » Archive through June 25, 2007 « Previous Next »

Vijaykulkarni
Sunday, June 24, 2007 - 2:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्ल्यास्टर च्या गणेश मुर्ती विसर्जीत करून तळ्यान्चे प्रदुषण करू नका, त्या ऐवजी गणेशमुर्ती आणी निर्माल्य दान करा अशी योग्य चळवळ अन्नीस ने सुरु केली तर काही धर्मभिमन्यानी त्याला विरोध केला.

सुदैवाने महाराष्ट्राच्या काही शहरात ही सन्कल्पना मूळ धरू लागली आहे.


Mandard
Sunday, June 24, 2007 - 5:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गणपती विसर्जनामुळे जास्त प्रदुषण होत नाही. त्यापेक्षा जास्त मैला व सांडपाण्याने होते. अंनिसने या साठी काहीतरी केले पाहिजे. लिंबुचे याबाबतचे मोठे पोस्ट वाचल्याचे आठवते. कुठे होते ते आठवत नाही. उगिच उठसुठ हिंदुंच्या मागे लागायचे ते.

Satishmadhekar
Sunday, June 24, 2007 - 7:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गणेश विसर्जन वर्षात फक्त एकच दिवस केले जाते. याउलट वर्षातले ३६५ दिवस नद्यात सांडपाणी आणि कारखान्यांची दूषित द्रव्ये सोडली जातात. कत्तलखान्यातली प्राणी कापून मांस काढल्यावर उरलेली घाण, रक्त वगैरे वर्षातील ३६५ दिवस नद्यांमध्ये सोडले जाते. याबद्दल अंधश्रद्धा निर्मूलन समितीवाले कधीही चकार शब्द काढत नाहीत. बर्‍याच गणेश मूर्ती शाडूच्या असतात. भिजल्यावर त्या मातीच्या स्वरूपात पाण्याबरोबर वाहून जातात. त्यामुळे गणेश मूर्तींमुळे होणारे प्रदूषणाचे प्रमाण कमी असते.

हिंदू धर्माप्रमाणेच इतर धर्मात सुद्धा असंख्य अंधश्रद्धा आहेत. त्याबद्दल अं. नि. स. वाले गप्प असतात. गरीब बिचार्‍या हिंदू समाजाला झोडपण्यात यांची मर्दुमकी. लोकांकडून दान स्वरूपात मिळविलेल्या मूर्तींचे ते काय करतात हे फारसे कुणालाच माहीत नाही. अं. नि. स. वाले हे सुद्धा समाजवादी, कम्युनिस्ट, निधर्मी, मानवतावादी, पुरोगामी, विचारवंत, कॉंग्रेसवाल्यांप्रमाणे भोंदू आणि ढोंगी आहेत.



Satishmadhekar
Sunday, June 24, 2007 - 7:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या सरकारने देशभर रस्ते, महामार्ग निर्मितिचा जो धडाका लावला, मोबाईल क्रान्ती केली तसेच भारतातील सगळ्या नद्या जोडुन पाणी समस्या निवारणाची जी योजना केली होती व धडाका पहाता तेही अशक्य नव्हतेच.
तर ही उदाहरणे राजकिय पातळीवरही प्रामाणिक इछाशक्ति असेल तर होउ शकते हे सिद्ध झाले आहे.

भाजप सरकारने केलेल्या काही चांगल्या गोष्टींनासुद्धा अनेक तथाकथित विचारवंतांनी केवळ भाजप ती गोष्ट करत आहे म्हणून आंधळेपणाने विरोध केला होता.

राजस्थानातील राजेंद्रसिंह यांनी बंधारे बांधून काही गावातला पाण्याचा प्रश्न सोडवला याबद्दल त्यांना बरेच पुरस्कारही मिळाले. त्यांनी सुद्धा नद्या जोडण्याच्या कार्यक्रमाला विरोध केला होता. त्यांचे विरोधामागचे कारण अतिशय हास्यास्पद होते. त्यांच्या म्हणण्यानुसार जर भारतातल्या नद्या एकमेकांना जोडल्या तर वेगवेगळ्या नद्यांच्या पाण्यातले जीन्स एकमेकात मिसळून निसर्गावर वाईट परिणाम होईल. विरोधामागचे हे कारण हास्यास्पदच आहे. नितीन गडकर्‍यांना सुद्धा मुंबईतील उड्डाणपूल आणि पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गाबद्दल ढोंगी समाजवाद्यांची टीका सहन लागली होती.


Vijaykulkarni
Sunday, June 24, 2007 - 12:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बर् ०दयाच गणेश मूर्ती शाडूच्या असतात.
( आजकाल शहरान्तून प्ल्यास्टर च्या जास्त असतात)
भिजल्यावर त्या मातीच्या स्वरूपात पाण्याबरोबर वाहून जातात.
(हे केवळ नद्यान्च्या बाबतीत.
तळ्यान्मध्ये हे प्ल्यास्टर तळाशी साठून रहाते)
त्यामुळे गणेश मूर्तींमुळे होणारे प्रदूषणाचे प्रमाण कमी असते.
हिंदू धर्माप्रमाणेच इतर धर्मात सुद्धा असंख्य अंधश्रद्धा आहेत. त्याबद्दल अं. नि. स. वाले गप्प असतात.
(या वर हसावे कि रडावे?
इतर धर्मात अन्धश्रद्धा आहेत, आमच्यात ही राहू देत?
हे म्हणजे दवाखान्यातल्या एखाद्या रोग्याने
डॉक्टर ला हे विचारण्यासारखे आहे की
"इतर ही रोगी आहेत तु मलाच का इन्जेक्शन देतोस? "
शिवाय अन्नीस ने बर्याच मुस्लीम बुवान्चा सुद्ध्धा बुरखा फोडला आहे.
कोल्हापुर जिल्ह्यात यल्लमा देवीला मुली वाहण्याच्या क्रूर आणी अमानूश प्रथेविरुद्ध सलग सात वर्शे प्रयत्न करून पुरोगाम्यानी ती बन्द पाडली त्या वेळी हिन्दुत्ववाद्याना आपल्याच धर्मातल्या निष्पाप मुलिन्चा बाजार बन्द पाडायला वेळा नव्हता. त्यापेक्शा हजारो मैल दूरची मशिद पाडणे त्यना महत्वाचे वाटले.

लोकांकडून दान स्वरूपात मिळविलेल्या मूर्तींचे ते काय करतात हे फारसे कुणालाच माहीत नाही
ते दान घेणारा कुणीही सान्गेल.


Santu
Sunday, June 24, 2007 - 12:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निष्पाप मुसल्मान स्त्रियांच्या बुरख्या बाबत अनिस ने काय केले.
यसेच बकरी इद ला लाखो निष्पाप बकर्‍यांना हलाल
अंधश्रध्दे पोटि मारले जाते त्याबद्द्ल अनिस ने काय केले.

वर्षात एकदा गणेश मुर्ति बद्द्ल गळा काढणार्‍या अनिस ने रोज लाखो
लोकांचा मैला मुळा मुठेत सोडुन त्यांची गटारगंगा करणार्‍या पुणे महानगरपालिके बद्दल काय केले. निश्चितच मैल्याचे प्रदुषण हे गणेश मुर्ती
पेक्षा जास्त आहे.


Satishmadhekar
Sunday, June 24, 2007 - 2:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> निष्पाप मुसल्मान स्त्रियांच्या बुरख्या बाबत अनिस ने काय केले. यसेच बकरी इद ला लाखो निष्पाप बकर्‍यांना हलाल
अंधश्रध्दे पोटि मारले जाते त्याबद्द्ल अनिस ने काय केले.

काहीतरीच काय? असे जातीयवादी प्रश्न विचारू नका. फक्त हिंदू हा धर्म मागासलेला आहे. बाकी सर्व धर्म पुढारलेले आहेत. त्यांच्यात अंधश्रद्धा अजिबात नाहीत. उगाच असे प्रक्षोभक प्रश्न विचारून अल्पसंख्याकांच्या भावना दुखावू नका.

मात्र अं. नि. स. ने आजवर काय केले हा प्रश्नच आहे. माझ्या माहितीप्रमाणे अनिसने आजवर काहिही केलेले नाही. यांच्यातलेच लागू, तेंडुलकर वगैरे मंडळी ज्योतिष, मांत्रिक यांच्याबद्दल तावातावाने बोलत असतात. पण गहराई (यामध्ये एका मुलीला भूतबाधा होते आणि एक मांत्रिक ते भूत मंत्राने उतरवतो असे दाखविले आहे. लागूंची यात प्रमुख भूमिका आहे. लेखन बहुतेक तेंडुलकरांचे आहे.), अनहोनी (यात लागूने ज्योतिषावर विश्वास असणार्‍याचे काम कलेले आहे.) अशा चित्रपटातून अंधश्रद्धा पसरण्यास यांचाच पुढाकार असतो.

इतर समाजवाद्यांप्रमाणे अनिस ही सुद्धा ढोंगी आणि भोंदू समाजवाद्यांही टोळी आहे.

गणेश मूर्ती वाहत्या पाण्यात विसर्जन करणे यात काहीही अंधश्रद्धा नाही. विसर्जन हे केवळ निमित्त. यांचा खरा विरोध हिंदूधर्मीय गणपतीला देव मानून पूजा करतात याला आहे. पुण्यात फुरसंगीजवळ उरळी देवाची या गावात महानगरपालिकेने गावकर्‍यांचा विरोध असताना सुद्धा प्रचंड मोठा कचरा डेपो उभा केलेला आहे. पुण्यातला सर्व कचरा या डेपोत साठविला जातो. या डेपोमुळे उरळी आणि आजूबाजूच्या ३-४ गावांच्या आरोग्यावर अतिशय वाईट परिणाम झालेला आहे. तिथल्या सर्व विहिरी अतिशय प्रदूषित झालेल्या आहेत. अनिसला प्रदूषणाची एवढी काळजी असेल तर त्यांनी या कचरा डेपोविरुद्ध आंदोलन करावे.

माझी अशी सूचना आहे की, अनिसने आपले नाव बदलून हिंदू धर्म श्रद्धा विरोधी समिती असे नाव घ्यावे. त्यांच्या आजवरच्या कृष्णकृत्याला साजेसेच हे नाव आहे.



Vijaykulkarni
Sunday, June 24, 2007 - 9:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण गहराई (यामध्ये एका मुलीला भूतबाधा होते आणि एक मांत्रिक ते भूत मंत्राने उतरवतो असे दाखविले आहे. लागूंची यात प्रमुख भूमिका आहे. लेखन बहुतेक तेंडुलकरांचे आहे.), अनहोनी (यात लागूने ज्योतिषावर विश्वास असणार् ०दयाचे काम कलेले आहे.) अशा चित्रपटातून अंधश्रद्धा पसरण्यास यांचाच पुढाकार असतो.

एखाद्याने चित्रपटातून केलेल्या भुमिका वरून त्याचे
मुल्यमापन :-)
मग सन्जय दत्त, सलमान खान हे सद्गुणाचे पुतळे ठरतील.
लेखन बहुतेक तेंडुलकरांचे आहे.
बहुतेक नव्हे खरेच!
हा सुन्दर चित्रपट मी पाहिला आहे.
दुर्दैवाने तो पद्मिनि च्या एका पाठ्मोर्या सीन साठी जास्त प्रसिद्ध झाला.
अनहोनी सुद्धा मी पाहिला आहे, त्यात आक्शेपार्ह काहीही नाही.

माझ्या माहितीप्रमाणे अनिसने आजवर काहिही केलेले नाही.
:-) :-) :-)
अन्नीसा ने बर्याच भोन्दु बुवान्चा पडदा
फाडलेला आहे.
निष्पाप मुसल्मान स्त्रियांच्या बुरख्या बाबत अनिस ने काय केले.
बुरखा घालण्याची सक्ती अयोग्य नक्कीच आहे.
पण नवस फेडण्यासाठी देवीला मुलगी अर्पण करून नन्तर तिची रवानगी मुम्बईच्या कुन्टणखान्यात करण्याईतकी नाही.


Vijaykulkarni
Sunday, June 24, 2007 - 9:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एवढच काय आज विहिपने देशभरातील सन्त, साधु यान्चे एकत्रीकरण देशकार्यासाठी केले ते तर फ़ारच कठीण आहे.
अखाड्याचे साधु अतिशय अहन्कारी असतात व एक दुसर्यान्च्या मधुन विस्तवही जात नाही
हे मात्र खरे आहे
राखी सावन्त आणी मल्लिका पण एकमेकान्ची इतकी इर्षा करत नसतील :-)
इतक्या अहन्कारी माणसाना साधु सन्त म्हणणे योग्य आहे? आणी त्यान्चे मार्गदर्शन घेणे?



Chyayla
Sunday, June 24, 2007 - 11:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनिसला प्रदूषणाची एवढी काळजी असेल तर त्यांनी या कचरा डेपोविरुद्ध आंदोलन करावे.
तरी सतिश माढेकरान्च्या या प्रश्नाचे उत्तर नाही मिळाले

Vijaykulkarni
Monday, June 25, 2007 - 2:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनिसला प्रदूषणाची एवढी काळजी असेल तर त्यांनी या कचरा डेपोविरुद्ध आंदोलन करावे.
अन्नीस च्या मर्यादीत शक्तीमुळे हे शक्य नाही.
पण असलेली थोडीशी शक्ती ते चान्गल्या कामासाठी वापरतात हे ही नसे थोडके.



Santu
Monday, June 25, 2007 - 5:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्लॉस्टर च्या मुर्ती तळ्यात टाकुन प्रदुषीत करु नका)))विजय अहो
मुर्ती पेक्षा रोज जो मैला सोडला जातो त्याने नदी प्रदुशीत जास्त होते.
त्या बद्दाल तुमच्या अनीस ने काय केले.

इतर धर्मात अंधश्रध्दा आहेत आमच्यात राहु देत))))म्हनजे अनीस ही हिन्दु धर्म श्रध्दा विरोधी आहे हे तुम्ही मानता आणी बाकिच्या धर्मांना तुम्ही सुट देता.



Satishmadhekar
Monday, June 25, 2007 - 5:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> अन्नीस च्या मर्यादीत शक्तीमुळे हे शक्य नाही. पण असलेली थोडीशी शक्ती ते चान्गल्या कामासाठी वापरतात हे ही नसे थोडके.

कचरा डेपोची समस्या वर्षातले सर्व ३६५ दिवस आहे, तर गणेशमूर्तीविसर्जन वर्षातले फक्त एकच दिवस होते. कचरा डेपोविरूद्ध असलेली उपद्रवी शक्ती वापरून आंदोलन केलं तर हिंदू धर्मीयांच्या श्रद्धेला कसा धक्का पोहोचेल आणि 'पुरोगामी' असल्याचा दावा कसा करता येईल? पण जर गणेशविर्सजनाविरुद्ध बोंब मारली तर सवंग लोकप्रियतेचे सर्व हेतू साध्य होतात.


अनिसने कोणत्या बुवांचा बुरखा फोडला कोणास ठाऊक? हिंदूंच्या श्रद्धेला शिव्या घालणे एवढेच यांचे कार्य. त्यांनी स्वतःच्या भोंदूपणाचा आणि ढोंगीपणाचा बुरखा फाडणे आवश्यक आहे.



Satishmadhekar
Monday, June 25, 2007 - 7:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> अन्नीसा ने बर्याच भोन्दु बुवान्चा पडदा फाडलेला आहे.

तुमच्याकडे यातल्या काही बुवांची नावे आहेत का?

बाबा आढाव, भाई वैद्य, कुमार सप्तर्षी इ. भोंदू बुवांचा पडदा अं. नि. स. ने फाडल्याचे काही वाचनात आले नाही. तुमच्याजवळ लिंक असेल तर पाठवा.


Satishmadhekar
Monday, June 25, 2007 - 7:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे वाचा.

http://www.indianexpress.com/story/160431.html

प्रतिभाताईंनी आपल्या डझनभर नातेवाईकांची थकीत कर्जे माफ केलीत म्हणे. राष्ट्रपती झाल्यावर खबरदारी म्हणून हे पैसे कर्ज म्हणून न देता मदत स्वरूपात द्यावेत म्हणजे थकण्याचा, बुडवण्याचा आणि माफ करण्याचा प्रश्नच येणार नाही.

Chinya1985
Monday, June 25, 2007 - 10:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुठला तो दोन कौडीचा अन्निस!!!त्याला विजयरावांनी देव बनवला आहे. विजयराव तुम्ही हिंदु धर्म आणि धर्मियांचा इतका द्वेष का करता???काही मुस्लिम जगभरात बॉम्बस्फ़ोट घडवुन आणतात का तर म्हणे हे धर्मयुध्द आहे, जिहाद आहे. सर्व जग मुस्लिम बनवण्यासाठी हा मार्ग बरोबर आहे.
ही अंधश्रध्दा नाही का???हिला थांबवण जरुरिच नाही का??
आज भारतामधे हिंदु स्त्रियांची अवस्था मुस्लिम स्त्रियांपेक्षा कितितरी चांगली आहे. मुस्लिम स्त्रियांवर होणार्‍या अन्यायाविरुध्द हे लोक का उभे राहत नाहित???मुस्लिमांमधे तर किती तरी अंधश्रध्दा आहेत. त्या संपवण्यासाठी हे का प्रयत्न करत नाहित???


Lukkhi
Monday, June 25, 2007 - 2:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चला म्हणजे जो पर्यंत बाकीच्या धर्मात अंधश्रद्धा आहेत, तोपर्यंत मी माझ्या अंधश्रद्धा पाळू शकतो तर :-)
आणि मला त्याबाबत कुणी काही चांगले सांगितले तर सतीश आणि चिन्यासारखे लोक आहेतच माझ्या पाठीशी...
लगे रहो...


Chinya1985
Monday, June 25, 2007 - 4:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लुक्की वाट्टेल ते लिहु नको. आम्ही अंधश्रध्दा पाळा असे म्हटले नाही आहे. फ़क्त अंधश्रध्देविरुध्द लढणारे सर्वांचा विचार का करत नाहित असा प्रश्न केला होता. देवाला रिटायर करायला निघालेल्या श्रीराम लागु वगैरे मुर्ख लोकांचा तर मी नक्किच विरोधक आहे. ह्या माणसाच्या आयुष्यात वाइट प्रसंग आले बायको गेली वगैरे म्हणुन हा माणुस देव वगैरे मानत नाही. पण ह्याच्यासाठी सर्व जगाने देव मानण सोडायच ह्यासारखा मुर्खपणा नाही.

Vijaykulkarni
Monday, June 25, 2007 - 9:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाबा आढाव, भाई वैद्य, कुमार सप्तर्षी इ. भोंदू बुवांचा पडदा अं. नि. स. ने फाडल्याचे काही वाचनात आले नाही. तुमच्याजवळ लिंक असेल तर पाठवा.

नाही कारण हे लोक हातातून कुन्कु, अन्गारा काढणे, असल्या गोश्टी करीत नाहीत. :-)

सान्गली जिल्ह्यात काही ठिकाणी बारावी (आर्ट्स) च्या मुली देखील धीटपणे सत्य साईबाबा भोन्दु आहे हे भाषणात सान्गताना ऐकले आहे मी.
इथे अमेरिकेत काही उच्चशिक्शीत मित्र नेमाने सत्य साईन्च्या आरतीला जातात. तुमचे अटलजी पण गेले होते लोकसभा निवडणूकिपुर्वी आशिर्वाद मागायला. उपयोग झाला नाही हा भाग निराळा :-)



Chinya1985
Monday, June 25, 2007 - 9:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विजयराव,तुमचे शिवराज पाटिल तर फ़ार जुने भक्त आहेत सत्य साईबाबांचे. त्या भक्तिमुळेच त्यांच राष्ट्रपतीपद गेल. पण सत्यसाईबाबासारख्या भोंदु बाबाचे भक्त असणारे शिवराज तुमच्या सोनिया म्याडमचे उजवे हात आहेत, सोनियाजिंना त्यांच्या सत्यसाइबाबा भक्तिमधे काहिच चुकिच वाटत नाही हे कसे???????

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators