Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 21, 2007

Hitguj » Views and Comments » Current Affairs » बातम्यांचे / लेखांचे संकलन » Political » Archive through June 21, 2007 « Previous Next »

Deshi
Wednesday, June 20, 2007 - 1:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

न्युटन हा कुणी अध्यात्मिक साधू नाही की त्याने सांगावे आणि आम्ही ते स्वीकारावे>>>>>

म्हणजे तुम्ही अध्यात्मीक साधु ने सांगीतलेले खरे मानता तर. पण मग तो वा ती अध्यात्मीक साधु खरा आहे याची खात्री कशी करनार? ..

अहो मग ईतका वेळ (दिवस) तर बाकीचे लोक अध्यात्म, श्रध्दा, वेद वैगरेचेच उदा. देत होते मग ते का खरे मानले नाही.

असो. तुमचा मुद्दा मात्र बरोबर आहे हे की सर्व गोष्टी आंधळ्या सारख्या स्विकारु नयेत. पण तसेच प्रत्येक गोष्टी ला पुरावा नसतो (निदान आत्ता आप्ल्या कडे नाही) म्हणुन त्या गोष्टी घडल्याच न्हवत्या हे म्हणन म्हनजे माझ्या घरी लाईट नाहीत तर ईंतरांच्या पण घरी नसतीलच असे आहे.

महेश ईथे कोणीही तुलना केली नाही, फक्त असे मांडले की तळपद्यांनी राईट बंधु च्या आधी विमान उडवले. (त्याला पुरावेही आहेत हे ही सिध्द झालेच आहे).
आणी ते विमान त्यांनी जुन्या ग्रंथाच्या सहायाने बनविले होते, म्हणजे पुर्वी कदाचीत आपल्या कडे विमाने होती हे सिध्द झाले असे म्हनायला हरकत नसावी



Mahesh
Thursday, June 21, 2007 - 3:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देशी, मी अनुमोदनच दिले आहे. टीका करणार्‍यांसाठी मूळ म्हण उलट करून लिहिली आहे.

Chinya1985
Thursday, June 21, 2007 - 6:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वेदांचे महत्त्व आपल्या लोकांना कळत नाही म्हणुन खालिल बातमी पेस्ट करत आहे.

"भांडारकर' संस्थेतील ऋग्वेदाची हस्तलिखिते "युनेस्को'तर्फे "जागतिक ठेवा' म्हणून घोषित

न्यूयॉर्क, ता. २० - भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेकडे असलेली ऋग्वेदाची तीस दुर्मिळ हस्तलिखिते "जागतिक ठेवा' म्हणून जतन करण्याचा निर्णय संयुक्त राष्ट्रांच्या शैक्षणिक, वैज्ञानिक, सांस्कृतिक संस्थेने (युनेस्को) घेतला आहे.
इ.स.पूर्व १८०० ते १५०० दरम्यानची ही हस्तलिखिते आहेत. "युनेस्को'ने स्थापन केलेल्या "मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर'च्या यादीतील पुरातन वस्तूंची संख्या आता १५८ वर पोचली आहे.

"युनेस्को'चे सरसंचालक कुचिरो मत्सूरा यांनी काल येथे ही माहिती दिली. "मेमरी ऑफ द वर्ल्ड प्रोग्रॅम'च्या आंतरराष्ट्रीय सल्लागार समितीची गेल्या आठवड्यात दक्षिण आफ्रिकेत प्रिटोरिया येथे बैठक झाली. त्या वेळी हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

जागतिकदृष्ट्या महत्त्वाच्या वस्तूंचे जतन करण्यासाठी १९९२ पासून ही यादी तयार करण्याचे काम सुरू झाले. अभ्यासकांना या वस्तू पाहायला मिळाव्यात, त्यांच्याविषयी माहितीचे आदानप्रदान करता यावे आणि त्यांच्या जतनासाठी निधी उभारण्याच्या उद्देशाने ही यादी तयार करण्यात येत आहे. काल समाविष्ट करण्यात आलेल्या गोष्टींमध्ये जगातील पूर्ण लांबीचा पहिला चित्रपट (द स्टोरी ऑफ केली गॅंग ः ऑस्ट्रेलिया, १९०६), स्वीडिश उद्योगपती अल्फ्रेड नोबेल यांच्या कुटुंबीयांजवळ असलेल्या १८४० ते १९०० दरम्यानच्या पुरातन वस्तू, इग्मार बर्गमन या स्वीडिश दिग्दर्शकाच्या संग्रहातील वस्तू, नेल्सन मंडेला यांच्याविरुद्धच्या न्यायालयीन सुनावणीची कागदपत्रे, फ्रान्समधील ११ व्या शतकातील भरतकामाचा नमुना आदींनाही "जागतिक ठेवा' म्हणून घोषित करण्यात आले आहे.

""भारताच्या सांस्कृतिक वारशाशी संबंधित असलेल्या गोष्टींना जेव्हा जगाकडून मान्यता मिळते तेव्हा सर्वच देशवासीयांसाठी ती एक आनंदाची बाब असते,'' असे केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री अंबिका सोनी यांनी सांगितले. पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेकडे असणाऱ्या २८ हजार हस्तलिखितांपैकी ऋग्वेदाची तीस हस्तलिखिते अमूल्य ठेवा आहे. ""ही हस्तलिखिते म्हणजे विद्वत्ता आणि सांस्कृतिक वारशाचे केवळ भारतातील नव्हे, तर जगातील अलौकिक उदाहरण आहे,'' असे युनेस्कोने म्हटले आहे.

या संदर्भात भांडारकर संस्थेचे मानद सचिव डॉ. मो. गो. धडफळे म्हणाले, ""आज दिल्ली येथील "नॅशनल मॅन्युस्क्रिप्ट्‌स मिशन'च्या संचालक सुधा गोपालकृष्णन यांच्याकडून संस्थेत आलेल्या फॅक्‍सवरून ही माहिती समजली. बर्लिन येथे नुकतेच जागतिक पातळीवरील दुर्मिळ वस्तूंचे प्रदर्शन झाले. या प्रदर्शनात ऋग्वेदाची दुर्मिळ हस्तलिखिते प्रदर्शित करण्यात आली होती. ती पाहून "युनेस्को'ने त्यांची निवड "जागतिक ठेवा' म्हणून करण्याचा निर्णय घेतला. "युनेस्को'चा हा निर्णय संस्थेसाठी अभिमानाचा आहे. ही दुर्मिळ हस्तलिखिते प्रारंभी ब्रिटिश अमलाखाली होती. पण त्यांचे महत्त्व जाणून त्यांनी ती पुण्यात डेक्कन कॉलेजकडे सुपूर्द केली. डेक्कन कॉलेजने भांडारकरच्या स्थापनेनंतर १९१७ मध्ये ती संस्थेकडे हस्तांतरित केली. जगप्रसिद्ध संस्कृत पंडित मॅक्‍सम्युलरने आपल्या "ऋग्वेदा' या ग्रंथासाठी ऑक्‍सफर्ड युनिव्हर्सिटीत याच हस्तलिखितांचा आधार घेतला होता. या निमित्ताने संस्थेच्या हस्तलिखितांच्या जतनाचे आणि अभ्यासाचे महत्त्व जागतिक पातळीवर अधोरेखित झाले आहे,'' असे ते म्हणाले. दरम्यान, युनेस्कोच्या या निर्णयाचे भारताने स्वागत केले आहे.

चार वेदातील सर्वांत प्राचीन वेद
- इंद्र, अग्नी, सोम, वरुण, विष्णू, रुद्र, बृहस्पती आदी वेदकालीन देवतांना आवाहन करणारी प्राचीन संस्कृत भाषेतील १०२८ सूक्ते
- एकूण १० मंडले
- २ ते ७ ही कुलमंडले (ऋषिमंडले)
-गृत्समद, विश्‍वामित्र, वामदेव, अत्री, भारद्वाज, वसिष्ठ, कण्व, अंगिरस
नवव्या मंडलात सोमदेवतेची एकत्रित सूक्ते


Bee
Thursday, June 21, 2007 - 8:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिन्मय, तू वेदांचा अभ्यास केला आहेस का?

बर्‍याचदा पाश्चिमात्य लोकांनीच भारतीयांचा इतिहास लिहून काढला आहे, भारताकडे काय चांगले आहे हे भारतीयांपेक्षा त्यांनीच अधिक जाणलेले आहे. कितीतरी उदाहरण देता येतील.


Sanghamitra
Thursday, June 21, 2007 - 8:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे वरचे सगळे discussion interesting असले तरी politics शी संबंधित कसे काय आहे म्हणे?

Bee
Thursday, June 21, 2007 - 9:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तेच तर.. नक्की काहीतरी politics चालले आहे इथे :-)

Chinya1985
Thursday, June 21, 2007 - 3:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वेदांचा मी अभ्यास वगैरे केलेला नाही पण धर्माशी संबंधीत काही गोष्टी वाचल्या आहेत. वेदिक साहित्य म्हणजे अथांग सागर आहे. मी काही गोष्टी वाचलेल्या आहेत. भविष्यात यासाठी नक्की वेळ देउन अभ्यास करिन. पाश्चिमात्यांनी आपल्या धर्माचा अभ्यास केला तर आनंदच आहे. अनेक उदाहरणे आहेत ही पण चांगलिच गोष्ट आहे. आपण पाश्चिमात्यांना आपला धर्म सांगायला हवा कारण आपल्याला त्याचे महत्त्व नाही. पास्चिमात्यांना आपण आंधळ्याप्रमाणे follow करतो.त्यामुळे पुढे जर त्यांनी या गोष्टी आपल्याला शिकवल्या तरी हरकत नाही.

इथे रामसेतुवरिल राजकारणावरुन चर्चा सुरु झाली होती. आम्ही फ़ारच मागास होतो असे म्हटल्याने विषयांतर झाले.

ज्या ग्रंथांना इथे गोलमाल म्हटले गेले ते ग्रंथ 'युनेस्को' च्या जागतिक ठेवा लिस्टमधे आले आहेत हे सांगण्यासाठी बातमी पेस्ट केली.


Shendenaxatra
Thursday, June 21, 2007 - 3:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वेद हा एक सांस्कृतिक ठेवा आहे. भारताबरोबर इतर जगालाही अमूल्य वाटावा. प्राचीन काळात माणसाने काही तत्त्वज्ञान निर्माण केले त्यात वेद एक महत्त्वचा घटक आहे. हे सगळे खरे.
पण युनेस्कोने असे कुठे म्हटले आहे की मानावाने प्राचीन काळात अफाट प्रगती केली होती आणि त्याबद्दल सारेकाही वेदात लिहिले आहे.
इथल्या मंडळींचा लाडका विषय विमानविद्या, अणूचे रहस्य वगैरे वेदात आहेत असे युनेस्को म्हणते का?

वेदात काहीच्या बाही पुढारलेले ज्ञान वगैरे काही नाही असे माझे मत. त्या काळत ऊर्वरित मानव जात जेवढी प्रगत होती तेवढेच प्रगत ज्ञान वेदात आहे. मागास ह्याचा अर्थ ज्यात विमाने, अणू, परमाणू असले अतीप्रगत काही नसेल असे. ह्यात उपरोध आहे. तुच्छता नाही. असो. पालथ्या घड्यावर पाणी टाकून काही होत साध्य नाही.
ह्याचा अर्थ मी वेद म्हणजे कचरा, क:पदार्थ असे म्हणत आहे काही कृपया समजू नये.

वेदातल्या काही गोष्टी मला विचित्र वाटतात. त्यातली एक म्हणजे बेडकाविषयी एक उपनिषद आहे. बेडूक म्हणजे पावसाची देवता असे काहीबाही समजून एक उपनिषद लिहिले गेले आहे. चू.भू.द्या. घ्या. हे काही फार प्रगत असल्याचे लक्षण नाही. कुणी समजावेल का की बेडकाला इतके महत्त्व का?
अर्थात इतक्या जुन्या काळात सर्व निसर्गनियमांचे ज्ञान नसल्याने असे लिहिले गेले असणे शक्य आहे.


Vaatsaru
Thursday, June 21, 2007 - 4:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>> विमान विद्या, अणूचे रहस्य वगैरे वेदात आहे...

मला हा प्रश्न कधीपासून पडला आहे.
समर्थ रामदासांनी ३०० वर्षांपूर्वी लिहिलेल्या मारुती स्तोत्रात ही एक ओळ आहे

" अणूपासोनी ब्रह्मांडा एवढा होत जातसे " म्हणजे सगळ्यात छोटे आणि सगळ्यात मोठे
आणि अजून एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की 'ब्रह्मांड' म्हंटले आहे - 'Universe'

जर ३०० वर्षांपूर्वी एवढी माहिती उपलब्ध होती तर वेदात असू शकत नाही का
जाणकार प्रकाश टाकू शकतील का ?



Robeenhood
Thursday, June 21, 2007 - 5:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पिंडी ते ब्रम्हांडी हे आपल्या तत्वज्ञानातील एक सूत्र आहे.आश्चर्य म्हणजे छोट्यातल्या छोट्या गोष्टीसारखीच रचना मोठ्यातल्या मोट्या रूपातही आहे. म्हणजे बघा अणूची रचना ज्या elipticle orbits ने झाली आहे तशीच रचना सूर्यमालेचीही आहे elipticle orbita नेच अन्तराळ्याच्या ग्रहकक्षा बनतात अन तारे त्याच्या केन्द्रात nucleus प्रमाणे असतात. अणूची रचना देखील गोल ऑर्बिटचा आकार धरून सुटली नाही ती elipticle orbit गृहीत धरूनच सुटली...


Chinya1985
Thursday, June 21, 2007 - 7:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शेन्डेन तुम्ही परत तेच लिहित आहात. आधी मी, संतु, देशी यांनी प्राचीन भारताविषयीचे पाश्चिमात्यांनी लिहिलेले विचार परत एकदा वाचा. त्यावरुन लक्षात येइल की प्राचिन भारत तत्कालिन जगापेक्षा पुढे होता. प्राचीन विज्ञान आणि सध्द्याचे विज्ञान याबद्दल चर्चा होउ शकते पण प्राचीन भारतिय विज्ञान आणि तत्कालिन जागतिक विज्ञान याबद्दल तर नक्किच चर्चा होउ शकत नाही. पृथ्वीच्या भोवती सर्व जग फ़िरते असे जग म्हणत होते तेंव्हा आम्हाला माहित होते की असे नाही. पृथ्वीच्या भोवती सुर्य फ़िरतो, तारे फ़क्त आकाशातिल ठिपके आहेत असे पाश्चिमात्य मानत तेंव्हा एका सुर्याच्या अस्ताच्या वेळि लाखो सुर्यांचा उदय होत असतो हे आम्ही जाणले होते. अणुबाबतही तेच. जगाला हे माहितही नव्हते की असे काही असु शकते पण आम्हाला हे माहित होते. इतर जगाकडे जेंव्हा आरोग्याचे ज्ञान फ़ारच थोडके होते तेंव्हा आमच्याकडे आयुर्वेद होते जे आजकाल पाश्चिमात्य देशांमधे पण लोकप्रिय होत आहे. पृथ्विचे वय जेंव्हा पाश्चिमात्य ४०००-५००० वर्ष मानत होते तेंव्हा ४अब्ज वर्ष जुनी पृथ्वी आहे असे आमचे म्हणने होते( मॉडर्न सायन्स हे वय ४.६अब्ज सांगते.). प्रकाशकिरण ७ रंगांपसुन बनलेले असते हे विष्णुपुराणात दिले आहे.
त्यामुळे प्राचीन भारत इतर देशांपेक्षा तर नक्किच पुढे होता. एव्हढेच काय ब्रिटिश येण्यापुर्वी जगाच्या GDP चा ३१% भाग भारतातुन येत होता.
ते बेडकाबद्दलचे उपनिषद तुम्ही वाचले आहे का???जर नाही तर फ़क्त कानावर पडलेल्या गोष्टींवरुन ते बरोबर की चुक ठरवणे सायंटिफ़िक दृष्टिकोणात मोडत नाही.


Savyasachi
Thursday, June 21, 2007 - 11:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रॉबीनच्या लिहिण्यावरून आठवले. कोणितरी आहेत ना ज्यांचा दावा आहे की शंकराची पिंड ही खरतर अणुची रचना आहे.


Shendenaxatra
Thursday, June 21, 2007 - 11:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मान्डुक्योपनिषदाविषयी
इंटरनेटवर असे मिळाले.


Manduka’ means Frog. A frog will not move step by step. It jumps.
Similarly this Upanishad takes a leap from the three states of consciousness(jagrat, swapna and sushupti) and deals about the Turiya, the fourth state, also called the transcendental state of consciousnsess.

Some scholars argue that this Upanishad was revealed to Varuna Deva,
the god of rains, who is in the form of a frog and hence the name Mandukya Upanishad.



खुद्द ह्या उपनिषदात नाही पण यजुर्वेदात मादी बेडकाला आमचा
नैवेद्य स्वीकार कर वगैरे प्रार्थना आहे. बेडकाची प्रार्थना करणे
हे आधुनिकतेचे, वैज्ञानिक प्रगतीचे लक्षण आहे का? मला नाही वाटत.
पण प्राचीन काळात अशा गोष्टी होत असत. अमेरिकेतील मूळ लोक, युरोपातील प्राचीन संस्कृती ह्याही निसर्गाच्या
प्रतिकांची पूजा करत होते. तसेच आपणही.

वरती भारताने लावलेले समस्त खरेखोटे शोध लिहिले आहेत. त्यात
अणु, सूर्याभोवती पृत्वी फिरते हे सत्य, आयुर्वेद हे उल्लेख आहेत.
हे सगळे शोध वेदातले वा वेदकाळातले आहेत हे कशावरून?
सुश्रुत, चरक हे वेदकाळातील लोक आहेत का? भास्कराचार्य, आर्यभट्ट
ह्यांनी जे शोध लावले आहेत ते फार प्राचीन नाहीत. वेद इतके नविन
नक्कीच नसावेत. तेव्हा सगळ्या शोधांचे श्रेय वेदांना देऊ नये.


आयुर्वेदाविषयी सांगायचे तर युनानी, चिनी अशा अनेक पारंपारिक उपचारपद्धती आहेत ज्या तितक्याच प्राचीन म्हणता येतील. आयुर्वेदाचे कितीही कौतुक केले तरी एक मोठी उणीव म्हणजे सूक्ष्म जीवाणू जसे ब्याक्टेरिया वा अन्य याविषयी आयुर्वेदाला काहीही माहित नव्हते.
माणसाला होणार्‍या रोगात सूक्ष्मजीवांचा मोठा वाटा होता आणि आहे. पण ते आपल्याला माहित नव्हते. स्वाभाविक आहे. सगळ्या जगाचे विज्ञान तेव्हा मागे होते आपलेही असणारच. ग्रीक तत्वज्ञांनी आटम ही कल्पना फार पूर्वी मांडली होती. पण त्या काळात विज्ञान फारच मागे असल्याने तर्ककठोर मांडणी, प्रयोग ह्यांचा अभाव होता. आपणही त्यातलेच.



Uday123
Friday, June 22, 2007 - 1:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

http://www.cnn.com/2007/WORLD/asiapcf/06/21/pakistan.nuclear.ap/index.html
पुन्हा एकदा शस्त्र स्पर्धा सुरु होते आहे का? अशी एक कुशंका, की न होणार्‍या युद्धाची भीती निर्माण करून आपला (शस्त्र पुरवण्याचा) उद्योग पुढे रेटायची खेळी?

Slarti
Friday, June 22, 2007 - 1:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हूड, अणूच्या रचनेत लंबगोलाकार भ्रमणमार्ग नाहीत. अणूची रचना सूर्यमालेसारखी नाही. there is a probabilistic distribution of electrons around the nucleus. In fact, the electron in hydrogen is most likely at constant distance from the nucleus. म्हणजे "भ्रमणमार्ग" गोलाकार झाला. अणूच्या रचनेसारखी विचित्र रचना इतर कुठे दिसत नाही (इतर अणू सोडून). 'पिंडी ते ब्रम्हांडी' याचा तुम्ही म्हणता तसा अर्थ करून घेता येत नाही.

Bee
Friday, June 22, 2007 - 3:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला आठवतं मृग नक्षत्राच्या सुमारास बांबूला बेडूक उताणे टांगून आणि भोवती कडुनिंबाचा पाला बांधून 'धोंडी धोंडी पाणे दे..!' अशी गर्जना करत प्रत्येक दारात काही लोक उभे राहत. मग त्यांच्या अंगावर बकेटभरून पाणी ओतले की ते परत जात. त्यांना बाकी इतर काही लागत नाही. हे असे विदर्भात बालपणी मी पाहिले आहे. हल्ली देखील काही भागात धोंडीवाले येतात मृग नक्षत्राच्या सुमारास.

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators