|
तळपदे आणि त्यांच्या विमान प्रयोगाविषयी माहिती खालील लिंक मध्ये आहे. http://www.gaudiya-repercussions.com/index.php?showtopic=2138 http://www.ivarta.com/columns/OL_040312.htm http://www.bibliotecapleyades.net/vimanas/esp_vimanas_8.htm http://www.indiadivine.org/audarya/spiritual-discussions/28930-aeronautics-ancient-india-we-did-first.html One day in 1895 (unfortunately the actual date is not mentioned in the Kesari newspaper of Pune which covered the event) before a curious scholarly audience headed by the famous Indian judge/ nationalist/ Mahadeva Govin-da Ranade and H H Sayaji Rao Gaekwad, Talpade had the good fortune to see his un manned aircraft named as ‘Marutsakthi’ take off, fly to a height of 1500 feet and then fall down to earth.
|
Peshawa
| |
| Monday, June 18, 2007 - 7:26 pm: |
| 
|
शेंडे म्हणतात >>> पण १५००-१६०० सालापासून पाश्चिमात्य विज्ञानाने जी घोडदौड सुरू केली आहे ती अपूर्व आहे. >>>> शेंडे आपण पुन्हा विज्ञानाला कुणा एका संस्क्रुतीच्या दावणिला बांधत आहात. विद्यान जरी संस्क्रुतीच्या रेट्यामधे वाढत असले तरी तो संपुर्ण मानवजातीचा ठेवा आहे. तुमच्या वाक्यातल्या पष्चिमात्य संस्क्रुतीने greek, arab, indian chinese ह्या संस्क्रुतीमधील ज्ञानाचे बोट धरुनच पहिली पावले टाकली आहेत. फ़िबोनॅन्सी ने कोर्डोबा (मध्ययुगातील, अरब राज्यकर्ते असलेल शिक्षणाचे महत्वाचे केंद्र) मधुन गणित शिकले. ज्याचा पुढे तुम्हि ज्याला आज पष्चिमात्य म्हणता त्या संस्क्रुतीने विकास केला (व त्यामुळॅ त्या संस्क्रुतीचाहि विकास झाला) अत्त जे विज्ञान दिसते ते फ़क्त पाषिमात्य संस्क्रुतीचे विज्ञान नाही आहे. वैज्ञानिकांची मान्दिआळी, उतरंड हि वेगवेगळ्या संस्क्रुत्यातून आलेली आहे.... वेदकाळात सगळेच होते हा विचार एक्प्रकारच्या न्युनगंडातुन येतो हे कळले तरी पुरे.... खरेच काय आले हे पुर्ण पडताळून न पहाता वेदकाळतील लोक मुर्ख होते हा विचार त्या न्युनगंडाचे आणखी एक रुप... असो
|
त्याला फाशी देऊ नका असे कळकळीने सांगणार्याच्या भूमिकेमागे तो मुसलमान आहे आणि त्याच्या बाजूने बोलले की आपण पुरोगामी, निधर्मी असल्याचे सिद्ध होते अशी भूमिका आहे. हे साफ चुक आहे. त्याला फाशी देवून या कटाचा एकमेव जिवन्त दुवा तुटू नये हा हेतु आहे. शिवाय अटके पासून खटल्याच्या प्रत्येक पायरीवर त्याच्यावर झालेला अन्याय हे आणखी एक कारण. आपल्याला पटो न पटो, त्याला फाशी देणे म्हणजे काश्मीर शान्ती प्रक्रिया आणखी दहा वर्शे मागे जाणार हे आणखी एक. त्या हल्यात मेलेले बाकिचे अतिरेकी कोण याचा उलगडा अजुनही झालेला नाही. त्या हल्यात असलेला सहावा अतिरेकी कोण? तो कुठे गायब झाला? त्या वेळची क्लोज सर्कीट फिल्म कुठे गायब झाली? हा हल्ला झाल्यानन्तर त्या कारस्थानाच्या मुळाशी जाण्याची कोणतीही इच्छा तात्कालीन प्रखर राष्ट्रवादी सरकार ने दाखवली नाही. केवळ राजकिय भान्डवल, "आर या पार की लडाई","ऑपरेशन पराक्रम (?)" वगैरे बुडबुडे. त्याची फाशी कायम करताना सुप्रीम कोर्टाने दिलेली कारणमिमान्सा बालिश आहे. या हल्याची कोणतीही चौकशी झालेली नाही. अफ़्ज़ल ने दिलेला कबुलीजबाब याशिवाय कोणताही पुरावा नाही. या सर्व प्रकारची पुन्हा एकदा चौकशी करावी, त्यानन्तर अफ़्झल दोशी आढळला तर अवश्य फाशी द्यावी. शतकातसुद्धा फक्त मुसलमानच त्यांच्या १४०० वर्षांपूर्विच्या पुस्तकाला प्रमाण मानून ४ लग्ने करतात माझ्या पहण्यातले बहुतेक सर्वे मुस्लीम एकपत्नी आहेत. ग्रामीण भारतत मुल होत नाही म्हणून दुसरे लग्न करणे अजुनही आढळते. महारश्त्र विधान्सभेचे किमन दोन हिन्दु सदस्या द्विपत्नीधारक आहेत. प्रत्य्के मुसल्मानाने चार लग्ने करणे शक्य नाहे हे गणीतान नापास न झालेल्या कुणालाही समजेल ते भारताशी एकनिष्ठ आहेत असा तुमचा गैरसमज तर नाही ना झालेला? या एकाच वाक्यत तुम्ही कलाम, प्रेम्जी, जावेद अख्तर वगैरेन्चा फडशा पाडलात.
|
विजयराव, माझ्याही प्रश्नांची उत्तरे द्या. शिवाय तुम्ही लिहिलेल्या सर्व गोष्टींची शहानिशा करुनच कोर्टाने अफ़झलला फ़ाशीची शिक्षा दिलेली आहे हे विसरु नये.
|
वैदिक विमानांच्या लेखात नासाच्या संशोधनाविषयी असे काहीबाही बेमालूम लिहिलेले असते की कुणाला वाटेल नासाने वेद वाचूनच ह्या संशोधनाला हात घातला आहे. पण नीट वाचले तर कळेल की तसे काहीही नाही. बुशने इराकवरील हल्ला आणि ९११ चा हल्ला ह्याचा काही संबंध नसताना भाषणातून तो आहे असे आखवायचा प्रयत्न अनेकदा केला आहे त्याची आठवण येते. असो. इंधन कुठले हे वापरल्यावर वेदकाळात विमाने होती हे मान्य करणार का? उत्तरावर अवलंबून आहे. उदा. काही मंत्र जे लईच पावरबाज होते ते म्हटल्यावर विमान आपोआप उडायचे म्हणालात तर काय प्रतिसाद मिळेल हे ओळखणे अवघड नाही! तसे उत्तर एका "तज्ञाने" आधी लिहिलेलेच होते. पार्यावर सूर्यकिरणे पडून अफाट ऊर्जा बनते असे काही सांगितलेत तरी तेच. विमान कसले बनले होते ह्याबद्दलही तेच. आणि हो तळपद्यांचे विमान कसले बनले होते, ते कुठल्या इंधनावर चालले तेही सांगा. ह्या मूलभूत प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळाली तर प्राचीन काळात विमाने होती असे म्हणण्याच्या दिशेने उचललेले एक लहानसे पाऊल म्हणता येईल. अमक्याचे खापरपणजोबा होते ह्याला पुरावा नाही म्हणून प्राचीन विमानाला पुरावा द्यायची गरज नाही हे कमालीचे तर्कदुष्ट विधान आहे. एखाद्याचे खापरपणजोबा किंवा खापरखापरपणजोबा टिळक वा वासुदेव बळवंत फडके वा गाडगेबाबा ह्यांच्याप्रमाणे कर्तृत्ववान असतील तर ते होते ह्याला ढिगाने पुरावे सापडतील. नसले तर कमी. तसेच, प्राचीन काळात क्षुल्लक गोष्टीचा पुरावा मिळवणे अवघड असेल. पण विमान हे प्रगत विज्ञानाचा अविष्कार आहे. अगदी आजही. कुण्या येर्या गबाळ्याला ते बनवणे जमत नाही. वेदकाळातही जर विमान असेल तर त्याला एक प्रगत वाहन मानत असतील आणि त्याला बर्यापैकी प्रसिद्धी मिळाली असेल त्यामुळे त्याचे पुरावे मिळायला हवेत. तशातही हा एक आततायी दावा आहे. उरलेले जग विमान बनवायच्या जवळपासही आलेले नसताना आपल्याकडे विमान होते हे म्हणणे जरा जास्तच आहे. त्यामुळे तसा ठोस पुरावा असल्याशिवाय तसे म्हटले जाऊ नये अशी इच्छा. वादाला फाटे फोडून विषय भरकटवला नाही तर बरे. कुणाची सोनियाभक्ती, मुस्लिम अनुनय ह्या गोष्टींचा प्राचीन विमानाशी काही संबंध नाही.
|
Mahesh
| |
| Tuesday, June 19, 2007 - 4:04 am: |
| 
|
कलाम यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता. तिसर्या आघाडीचा पाठिंबा. शेखावत यांनीदेखील केली तारीफ.
|
>>> त्याला फाशी देऊ नका असे कळकळीने सांगणार्याच्या भूमिकेमागे तो मुसलमान आहे आणि त्याच्या बाजूने बोलले की आपण पुरोगामी, निधर्मी असल्याचे सिद्ध होते अशी भूमिका आहे. >> हे साफ चुक आहे. त्याला फाशी देवून या कटाचा एकमेव जिवन्त दुवा तुटू नये हा हेतु आहे. शिवाय अटके पासून खटल्याच्या प्रत्येक पायरीवर त्याच्यावर झालेला अन्याय हे आणखी एक कारण. आपल्याला पटो न पटो, त्याला फाशी देणे म्हणजे काश्मीर शान्ती प्रक्रिया आणखी दहा वर्शे मागे जाणार हे आणखी एक. त्या हल्यात मेलेले बाकिचे अतिरेकी कोण याचा उलगडा अजुनही झालेला नाही. त्या हल्यात असलेला सहावा अतिरेकी कोण? तो कुठे गायब झाला? त्या वेळची क्लोज सर्कीट फिल्म कुठे गायब झाली? विजयराव, तुमचे बालीश प्रश्न वाचून हसू आलं. तुमच्या भूमिकेची आणि गोंधळलेल्या विचारसरणीची कीवही आली. भारतातले तथाकथित मानवतावादी मुसलमानांच्या प्रेमाने इतके आंधळे झालेले आहेत आणि निधर्मीवादाचे इतके व्यसनाधीन झालेले आहेत की ते आपल्या व्यसनाकरता क्रूर अतिरेक्यांचे समर्थन करायला मागेपुढे पहात नाहीत. ही वस्तुस्थिती जाणवून आजपर्यंत मुस्लीम अतिरेक्यांना मारलेल्या लाखो निरपराध नागरिकांबद्दल सहानूभूती दाटून आली आणि निष्पाप नागरिकांचे प्राण वाचवताना बळी पडलेल्या शेकडो सैनिकांचे, पोलिसांचे आणि संसदेतील सुरक्षारक्षकांचे बलिदान व्यर्थ जात आहे याची मनातल्या मनात खंत वाटली. असो. कुख्यात मुस्लीम अतिरेकी अफजलवर नक्की काय अन्याय झाला हे जरा सविस्तर सांगाल तर बरं होईल. या हल्ल्यात मेलेले बाकीचे अतिरेकी हे पाकिस्तानी मुस्लीम अतिरेकी होते. त्यांची नावे देखील जाहीर झाली होती. पण पाकिस्तानने नेहमीप्रमाणे त्यांच्याबद्दल आपल्या कानावर हात ठेवले. आपल्याला कदाचित हे आठवत असेल की १९९९ मध्ये झालेल्या कारगिल युद्धात पाकिस्तानी लष्करातील अनेक सैनिक मृत्युमुखी पडले होते. त्यांची लष्करातील ओळखपत्रे, नाव, घरचा पत्ता, हुद्दा अशा अनेक गोष्टी त्यांच्याजवळच्या कागदपत्रांतून समजल्या. परंतु त्या युद्धातील आपला सहभाग कळू नये म्हणून पाकिस्तानने आपल्या स्वतःच्या सैनिकांचे मृतदेह स्वीकारायला नकार दिला. संसदेवरील हल्ल्यात सहभागी असलेल्या आपल्या देशातल्या अतिरेक्यांची ओळख पाकिस्तानने नाकारली यात आश्चर्य काय? या खटल्यातला सहावा अतिरेकी कुठे ग़यब झाला, सहावा अतिरेकी खरोखरच होता की ही (अ)मानवतावाद्यांनी पसरवलेली अफवा आहे वगैरे प्रश्नांची उत्तरे सीबीआयच देऊ शकेल. १९९५ मध्ये पश्चिम बंगालमध्ये एका विमानातून शस्त्रे टाकण्यात आली होती. त्या विमानाचा चालक भारतातून पळून गेला. तो आजपर्यंत सापडलेला नाही. तुमच्या तर्कशास्त्राप्रमाणे तो पळून गेला म्हणजे पकडलेले इतर आपोआप निर्दोष ठरतात. त्याला फाशी दिली तर काश्मीर शांती प्रक्रिया १० वर्षे मागे जाणार म्हणून त्याला फाशी देऊ नये ही मागणीच मूर्खपणाची आहे. मुळात काश्मीरमध्ये शांतीच नाहीये. १० वर्षांपूर्वीचे काश्मीर आणि आताचे याच्यात फारसा फरक नाही. काश्मीरमध्ये जोपर्यंत मुस्लीम बहुसंख्य आहेत तोपर्यंत तिथे शांतता नांदणे अशक्य आहे. जिथे जिथे मुस्लीम मोठ्या संख्येने असतात तिथे ते अतिरेकी कृत्ये करून वेगळा देश तोडून मागतात (उदा. बोस्निया, चेचन्या, काश्मीर, फिलिपाइन्स, अमेरिकेतला लुईस फराक्कान इ.) त्याला फाशी दिली तर काश्मीर पेटून उठेल वगैरे धमक्या फारूक अब्दुल्ला, मुफ्ती मेहबूबा वगैरेंनी दिल्या आहेत. हा देशद्रोहाचाच प्रकार आहे. अशा धमक्यांना घाबरणे हे दुर्बलतेचे लक्षण आहे. या कारणावरून जर अफजलला मुक्त केले तर आणखी हजारो अफजल बंदुका आणि बॉम्ब घेऊन उभे राहतील. अशा स्वरूपाच्या धमक्या १९८२ मध्ये मकबूल भट्टला फाशी देऊ नये यासाठी सुद्धा येत होत्या. पण इंदिरा गांधींनी कणखरपणा दाखवून त्याला फाशी दिले. असा कणखरपणा आताच्या कोणत्याही नेत्यात नाही. सोनिया तर परकीय आणि मनमोहनसकट सर्वजण तिचे कळसूत्री बाहुले. म्हणून तर अफजल, मुफ्ती मेहबूबा सारख्यांचे फावले आहे. >>> हा हल्ला झाल्यानन्तर त्या कारस्थानाच्या मुळाशी जाण्याची कोणतीही इच्छा तात्कालीन प्रखर राष्ट्रवादी सरकार ने दाखवली नाही. केवळ राजकिय भान्डवल, "आर या पार की लडाई","ऑपरेशन पराक्रम (?)" वगैरे बुडबुडे. त्याची फाशी कायम करताना सुप्रीम कोर्टाने दिलेली कारणमिमान्सा बालिश आहे. या हल्याची कोणतीही चौकशी झालेली नाही. अफ़्ज़ल ने दिलेला कबुलीजबाब याशिवाय कोणताही पुरावा नाही. या सर्व प्रकारची पुन्हा एकदा चौकशी करावी, त्यानन्तर अफ़्झल दोशी आढळला तर अवश्य फाशी द्यावी. अफजलचा खटला तीन वेगवेगळ्या न्यायालयात चालला.तीनही न्यायालयांनी त्याला फाशीची शिक्षा सुनावली. हा खटला ३-४ वर्षे चालला होता. या हल्ल्याची कोणतीही चौकशी झाली नाही हे धादांत खोटे विधान आहे. त्याने स्वतः या कटाचा कबुलीजवाब दिलेला आहे. हल्ला करणार्या अतिरेक्यांना त्याने आपल्या घरी आश्रय दिला होता. त्यांना सर्व आवश्यक साधनसामग्री त्याने पुरविली होती. तो स्वतः या कटात सहभागी होता. हे सर्व सिद्ध झालेले आहे. याची नव्याने चौकशी करण्याची आवश्यकता नाही कारण तीन वेगवेगळ्या न्यायालयात या खटल्याचा कीस काढलेला आहे. समजा परत चौकशी होऊन त्याला फाशी सुनावली तरी तुमच्यासारखे अतिरेकीप्रेमी परत हेच मुद्दे काढणार. भारतीय घटनेनुसार सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर फेरचौकशीची ( review petition ) मागणी करता येते. ही प्रक्रियासुद्धा या खटल्यात पूर्ण झालेली आहे. तो मुसलमान आहे म्हणूनच निधर्मीवाद्यांचा एवढा आक्रोश चालू आहे. तो जर हिंदू असता तर अजिबात चौकशी न करता त्याला ताबडतोब फाशी देऊन टाका असा तुम्ही आग्रह धरला असता. >>> शतकातसुद्धा फक्त मुसलमानच त्यांच्या १४०० वर्षांपूर्विच्या पुस्तकाला प्रमाण मानून ४ लग्ने करतात >> माझ्या पहण्यातले बहुतेक सर्वे मुस्लीम एकपत्नी आहेत. ग्रामीण भारतत मुल होत नाही म्हणून दुसरे लग्न करणे अजुनही आढळते. महारश्त्र विधान्सभेचे किमन दोन हिन्दु सदस्या द्विपत्नीधारक आहेत. प्रत्य्के मुसल्मानाने चार लग्ने करणे शक्य नाहे हे गणीतान नापास न झालेल्या कुणालाही समजेल सर्व मुसलमान ४ लग्ने करतात की नाही हा दुय्यम मुद्दा आहे. त्यांना एवढी लग्ने करण्याचा कायदेशीर आधार आहे. त्यांचे लांगूलचालन करण्यासाठी त्यांच्या अन्यायी प्रथांना कायदेशीर संरक्षण देण्यात आले आहे. याला माझा आक्षेप आहे. >>> ते भारताशी एकनिष्ठ आहेत असा तुमचा गैरसमज तर नाही ना झालेला? >> या एकाच वाक्यत तुम्ही कलाम, प्रेम्जी, जावेद अख्तर वगैरेन्चा फडशा पाडलात. भारतात कलामांसारखे फक्त मूठभरच आहेत. बाकीच्यांच्या निष्ठा भारताला वाहलेल्या नसून त्यांच्या धर्माला वाहलेल्या आहेत. अमेरिकेने अफगाणिस्तान किंवा इराकवर हल्ला केला तर इथले मुसलमान मोर्चे काढून दंगली करतात पण पाकिस्तान, बांगलादेश, चीन इ. भारताची कुरापत काढतात तेव्हा इथले मुसलमान निर्विकार असतात. इंग्लंड, रशिया इ. ठिकाणि मुसलमानांवर अत्याचार होतो म्हणून इथले मुसलमान सुतक पाळतात पण पाकिस्तानी अतिरेकी निरपराध हिंदूंची हत्या करतात, बॉम्ब स्फोट करून हजारो लोकांना कायमचे पांगळे करतात तेव्हा इथले मुस्लीम थंड असतात. त्यांचा जगभरातले मुसलमान आपले वाटतात पण भारतातले अमुस्लीम त्यांना जवळचे वाटत नाहीत. भारताचे काहीही वाईट झाले तरी बहुसंख्य मुस्लीमांना काहीही वाटत नाही, पण पॅलेस्टाईन, चेचन्या मधल्या मुसलमानांबद्दल त्यांना आत्मीयता वाटते. मुशर्रफ जेव्हा २००१ साली भारतात आला त्याच्या सन्मानार्थ इथल्या मुसलमानांनी कव्वाली मुकाबला, गझलचे कार्यक्रम, मेजवान्या आयोजित केल्या होत्या. हा नराधम लक्षावधी हिंदूंच्या हत्येला कारणीभूत आहे हे ते लक्षात सुद्धा घेत नाहीत. धर्मांध मुस्लीम अतिरेक्यांचा भारतात वास्तव्य करणार्या बहुसंख्या मुसलमानांनी कधीही मनापासून निषेध केलेला नाही. आणि त्यांचे असे वर्तन फक्त भारतातच नसून प्रत्येक देशातले मुस्लीम असेच वागतात. असो. तुमच्यासारख्या मुद्दाम झोपेचे सोंग घेतलेल्यांना जागे करणे अशक्य आहे. दुर्दैवाने भारतात अशांचीच संख्या जास्त आहे. या विषयावर हे माझे शेवटचे पोस्ट आहे. यापुढे तुम्ही काहीही लिहीले तरी मी उत्तर देणार नाही याबद्दल तुमची खात्री असू दे. देव, अल्ला, येशू तुम्हाला सदबुद्धी देवो हीच प्रार्थना.
|
Zakasrao
| |
| Tuesday, June 19, 2007 - 8:11 am: |
| 
|
एक न्युज अशी आहे कि UPA ने कलाम यांच नाव राष्ट्रपती पदासाठी नाकारले. का बुवा ते धर्म निरपेक्ष आहेत म्हणुन का? एक भा.प्र. का ते रब्बर स्टॅम्प नाहियेत या सरकारचे म्हणुन? चांगला माणुस नकोय. ह्या देशाच काहि खर नाहि. सगळीकडे फ़क्त घाणेरड राजकारण. श्या!
|
Lukkhi
| |
| Tuesday, June 19, 2007 - 9:26 am: |
| 
|
एक न्युज अशी आहे कि UPA ने कलाम यांच नाव राष्ट्रपती पदासाठी नाकारले. >>अरे वा वा.... चला मुस्लिमांना भारतातून हाकलण्याचे UPA ने मनावर घेतले तर...! फार बरे वाटले हे वाचून
|
>>> एक न्युज अशी आहे कि UPA ने कलाम यांच नाव राष्ट्रपती पदासाठी नाकारले. का बुवा ते धर्म निरपेक्ष आहेत म्हणुन का? एक भा.प्र. का ते रब्बर स्टॅम्प नाहियेत या सरकारचे म्हणुन? चांगला माणुस नकोय. ह्या देशाच काहि खर नाहि. सगळीकडे फ़क्त घाणेरड राजकारण. श्या! दोन कारणे. १) ते गांधी घराण्याचे एकनिष्ठ सेवक नाहीत. २) २००४ मध्ये सोनिया गांधी पंतप्रधानपदाचा स्वतःसाठी दावा करण्यासाठी कलामांकडे गेल्या होत्या. त्या भेटीनंतर अचानक आपण पंतप्रधानपदाचा त्याग (!) करत असल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यावेळी काही कायदेपंडितांचे लेख प्रसिद्ध झाले होते. एका लेखाच्या म्हणण्यानुसार, भारतीय राज्यघटनेत अशी तरतूद आहे की सैन्यदलांचा मुख्य हा परकीय असू शकत नाही त्यामुळे कलामांनी सोनिया गांधी पंतप्रधान होऊ शकत नसल्याचे सांगितले. दुसर्या एका लेखानुसार भारतीय राज्यघटनेनुसार दुसरा देश स्थलांतरीत भारतीय नागरिकांना जे अधिकार देतो तेच अधिकार भारत त्या देशाच्या भारतात स्थलांतरीत झालेल्या नागरिकांना देता येतात. सोनिया गांधी (पूर्वाश्रमीच्या ऍंटोनिया मायनो) या ईटलीच्या नागरिक आहेत. इटलीमध्ये भारतीय नागरिकांनी इटलीचे नागरिकत्व घेतले तरी त्यांना निवडणूकीला उभे राहता येत नाही (शरद पवार यांनी १९९९ मध्ये सोनिया गांधींच्याविरूद्ध त्यांच्या परदेशी मुळावरून लुटुपुटीचे बंड केले होते. ते फक्त ४-५ महिने टिकले. ऑक्टोबर १९९९ पासून ते परत सोनियांच्या भजनी लागले. त्या शरद पवारांनीसुद्धा १९९९ मध्ये ही माहीती दिली होती.). कलामांनी या तरतुदीनूसार सोनिया गांधींना पंतप्रधान म्हणून मान्य करायला नकार दिला होता असे लेखात लिहीले होते. याचा राग मनात धरून UPA ने त्यांना विरोध केला असावा.
|
शेन्डेन तुम्ही त्या एका लेखामधुनच सर्व माहिती हवी हा हट्ट का धरत आहात?त्या लेखात काही त्रुटी आहेत म्हणुन सर्व काही गोलमाल म्हणने 'सुतावरुन स्वर्ग 'गाठणे आहे. मी मागच्याच पोस्टमधे लिहिले होते की या प्रश्नांची उत्तरे मला सध्या माहित नाहित. ती माहित झाल्यावर नक्की सांगेल. टिळक वगैरेंचे पुरावे सापडतिल पण ५०० ६०० वर्षापुर्वील लोकांचे कसले पुरावे सापडतिल???एखादी तलवार या व्यक्तिची आहे असे सांगितले तर ती त्याचिच होती ह्याला काय पुरावा???अशा वेळी लेखी गोष्टी पुरावा मानल्या जातात. पण लेखकाने खरेच लिहिले याला काहिहि पुरावा नसतो. तसे लेखी पुरावे रामायण, महाभारत आहेतच. तसेच इतर वेदिक ग्रंथांमधेही या गोष्टी झाल्या होत्या असे लिहिले आहे. वेद, पुराणे, उपनिशदे(जवळ जवळ १०९),महाभारत, भागवत इत्यादी साहित्य प्रचंड मोठे आहे. त्यामुळे ही सर्व महाकाव्ये म्हटली तर त्यांमधे ह्या सर्व गोष्टी फ़क्त कल्पना आणि एखाद्या गोष्टीची वेगवेगळ्या साहित्यात असलेली प्रमाणे ही गोष्ट अशक्यप्राय वाटते. तुम्ही वेदिक ग्रन्थ वाचलेले दिसत नाहित त्यामुळे त्यांच्या भव्यतेबद्दल तुम्हाला माहिती नसावी. वेगवेगळ्या ग्रंथांमधे एखाद्या घटनेबद्दल लिहिलेले असते तेन्व्हा इतिहासकार ती गोष्ट झाली असे मानतात. हेच वेदिक ग्रंथांच्य बाबतित आहे. त्यामुळे हा इतिहास आहे हे समजणे अवघड जाउ नये. उरलेले जग ते करु शकत नव्हते पण तरिही पिरयामिड्स बांधली गेलिच ना???मग विमान का बनु शकत नाही??शिवाय आम्ही जेजे पाश्चिमात्य लेखकांचे प्राचिन भारताबाबत विचार तुम्हाला लिहिले होते त्यातुनही हेच सिध्द होते की इतर जगाच्या पुर्वी बर्याच गोष्टी माहिती होत्या आम्हाला. विजयराव मी काल विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे द्या. जी उत्तरे शेन्डेननी लिहिली आहेत त्यांच्याबाबत नाही लिहिले तरि चालेल. अरे लुक्खी, कलामांसारख्या चांगल्या मुस्लिमांना भारतातुन हाकलत आहेत कॉंग्रेसवाले आणि अफ़झल वगैरे दहशतवादी मुस्लिमांना कवटाळत आहेत. रबर स्ट्यांप नाही आणि हिंदुविरोधी नाही म्हणुन कलामांना पाठिंबा मिळणार नाही कोन्ग्रेसकडुन.
|
Deshi
| |
| Tuesday, June 19, 2007 - 6:43 pm: |
| 
|
http://esakal.com/esakal/06192007/Specialnews6C1B261E60.htm न्युटन ने वर्तविला जगाचा अंत. विजय कुलकर्णी, शेंडे यांची मत ऐकायला आवडतील. ( की ते गोर्याने वर्तविल्यामुळे खरे माननार??)
|
Aarvee
| |
| Tuesday, June 19, 2007 - 7:06 pm: |
| 
|
तळपदे मुंबईच्या सर जे.जे.स्कूल आॅफ आर्ट मध्ये Hand and Craft शाखेचे शिक्षक होते.त्यांचे विमान पक्ष्याच्या आकाराचे ४ फूट बाय ६ फूट होते. विमान कोसळले हे खरे; पण उडले हे ही तेवढेच खरे. पुढच्या प्रयोगासाठी त्यांना ५० हजार रुपयांची गरज होती. त्यांना पन्नास रुपये देणारे एक हजार देणगीदार हवे होते. विमान प्रयोगानंतर त्यांना अनेक ठिकाणांहून व्याख्यांनांचे आमंत्रण आले होते. अहमदाबाद येथे त्यांनी ही मागणी परत फेडीच्या बोलीवर जनसमूहास केली होती. पण त्यांना त्यात अपयश आले आणि दुसरा प्रयोग ते करू शकले नाहीत. १९०७ मध्ये त्यांनी प्राचीन विमान विद्येचा शोध ही पुस्तिका लिहिली. तळपदे यांच्या मुंबईतील गिरगावात ड्युकर लेन (नगिनदास शहा मार्ग ) येथील घरी त्यांच्या विमानाचा सांगाडा त्यांच्या निधनानंतर अनेक वर्षे धूळखात पडून होता. खूप वर्षांनी म्हणजे त्यांचे चिरंजीवांचे ही वय झाले असताना भारत सरकारचे एक अधिकारी त्यांच्या कडून विमानाचे भाग व काही कागदपत्रे गोळा करून दिल्लीला गेले. ते अधिकारी एअर व्हाइसमार्शल सुरेन्द्रनाथ गोयल होते हे त्यांना नंतर कळले. पुढे तळपदे यांच्या नातवाने उरलेली सर्व कागदपत्रे बंगलोर येथील हिन्दुस्थान एरोनाॅटिक्सला सुपुर्द केली. सध्या तळपदेन्चे कोणीही थेट वंशज शिल्लक नाहीत. वरील माहीती प्रताप वेलकर यांच्या पाठारे प्रभुंचा इतिहास या पुस्तकामधून घेतली आहे. १९९४ मध्ये कोल्हापूर इथे भरलेल्या अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेत त्यांनी या विषयावर शोध निबंध वाचला होता. जाता जाता अजून एक नमूद करावेसे वाटते की १८९५ मधील डिसेंबर महीन्यात चौपाटीवर विमान उडले त्या दिवशी तेथे जमलेल्या सन्माननीय पाहुण्यांमध्ये माझे आजोबा आनंदराव विनायक अजिंक्य हजर होते.
|
आर्वी, तुमच्या महितीबद्दल अभार. कुणीतरी खरेच सन्शोधन करून तळपदेन्च्या जिद्दिची आणी मेहेनतीची माहिती समोर आणली पाहिजे. जुन्या काळचे बरेच टिळकान्चे चाहते केसरिचे सर्व अन्क सन्ग्रही ठेवत. पुढच्या भारत भेटीत केसरी कार्यलयात चक्कर टाकून जुने अन्क मिळतील का विचारेन. अरे बापरे, गोर्याने सान्गितलेले खरेच असणार! आत मी बान्केतून भरपूर कर्ज काढून मौज मस्तीत उडविणार. एकदा जग बुडले की कसले कर्ज आणी कसले व्याज. "भस्मीभुतस्य देहस्य पुनरागमनाय कुत:" काही जुन्या शस्त्रज्ञान्मध्ये विज्ञान आणी अन्धश्रद्धा यान्चे विलक्शण मिस्रण होते. लागरिथम च शोध लावणार्या नेपियर ने जगबुडीचे भविष्य वर्तविणारे पुस्तक लिहिले. आणी जगबुडीचे पुस्तक खपले नाही म्हणून निराश झाला.
|
न्युटनच्या बातमीविषयी हो हो हो नक्कीच. गोर्याने सांगितलेले खरेच असणार. ते काय वेदात लिहिलेले नाही! असो. हलकेच घ्या. न्युटन हा कुणी अध्यात्मिक साधू नाही की त्याने सांगावे आणि आम्ही ते स्वीकारावे. न्युटनच्या अनेक थियर्या चुकीच्या होत्या. प्रकाश हा कणांचा बनलेला असतो ही त्याची एक थियरी. त्याच्या जिवंतपणी त्याचा दबदबा असल्यामुळे अन्य वैज्ञानिकांची मते मागे पडली पण १९ व्या शतकात डायफ़्र्याक्शनच्या प्रयोगातून प्रकाश हा तरंगासारखा वागतो असे सिद्ध झाले. (अर्थात नंतर प्रकाश हा दुहेरी व्यक्तिमत्व बाळगून आहे असेही सिद्ध झाले). पण न्युटन म्हणाला आहे म्हणून तेच खरे माना असे विज्ञानाने कधी म्हटलेले नाही. प्रयोगातून सिद्ध होते तेच खरे ही विज्ञानाची भूमिका आहे. पोथीनिष्ठ विचार विज्ञानाचे आहेत का अन्य कुणाचे हे वरील चर्चा वाचणार्याला चटकन कळेलच! ह्या साली जग नष्ट होणार का? मी काही हा मूळ लेख वाचलेला नाही पण न्युटन हा एक थोर वैज्ञानिक होता पण तो कुणी ज्योतिषी नव्हता. त्याने लावलेल्या शोधात भविष्याचा वेध घेता येईल असे काही (माझ्या माहितीत तरी) नव्हते त्यामुळे मी ह्यावर फारसा विश्वास ठेवणार नाही.
|
Santu
| |
| Wednesday, June 20, 2007 - 4:33 am: |
| 
|
आर्वी घ्या पुरावा प्रत्यक्ष नातु सांगत आहे की. विमान उडाले आता अजुन कसला हवाय हवाय पुरावा. व्वा आर्वि .म्हणे पुरावा हावाय घे पुरावा. post edited by moderator. Please refrain from using foul language or personal attack.
|
Mandard
| |
| Wednesday, June 20, 2007 - 5:00 am: |
| 
|
संतु आर्वि नातु नसुन नात आहे. जरा प्रोफ़ाइल बघ. असो विमान उडाले होते तर. तसेच आर्वि यांचा आर्थिक मुद्दा पण विचारात घेतला पाहिजे. तेव्हा भारत पारतंत्रात होता. त्यामुळे आर्थिक मदत मिळणे ते पण प्रयोगासाठी शक्य नव्हते. त्यामुळे तळपदेंचे संशोधन मागे पडले असेल. असो रामसेतुचे काय झाले. ही चर्चा त्या मुद्द्यावरुन चालु झाली होती. तेव्हा विमान सोडुन परत मुळ विषयाकडे या. कलाम यांनी तिसर्या आघाडीला नकार कळवला. प्रतिभाताई प्रेसिडेंट होतील आता. काही दिवसांनी खास लोकाग्रहास्तव सोनिया जी पंतप्रधान पण होतील. येथे काही सांगता येत नाही.
|
Mandard
| |
| Wednesday, June 20, 2007 - 6:33 am: |
| 
|
Good info on indian greats - Shenden don't ask for proofs greatindians.doc (32.8 k) |
|
Santu
| |
| Wednesday, June 20, 2007 - 7:07 am: |
| 
|
मंदार नात तर नात. मुद्दा तो नाहि मुद्दा पुराव्याचा आहे. असा जबरदस्त पुरावा असताना उगिच आपलीच टिमकि टिमकि वाजवणार्या "साहेबांची" आता दातखीळ बसली का?
|
Mahesh
| |
| Wednesday, June 20, 2007 - 7:46 am: |
| 
|
तळपदे आणी राईट बंधुंची तुलना करताना दुसर्याचा तो बाब्या आणी आपले ते कार्टॅ असे होत आहे असे वाटते.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|