Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 15, 2007

Hitguj » Views and Comments » Current Affairs » बातम्यांचे / लेखांचे संकलन » Political » Archive through June 15, 2007 « Previous Next »

Slarti
Thursday, June 14, 2007 - 10:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक मिनिट. माझ्या आधीच्या posts मध्ये रामायणाच्या सत्यासत्यतेविषयी मी काही लिहिलेच नाहीये. पण माझा संदर्भ देण्यात आला म्हणून स्पष्ट करत आहे. राम नावाचा राजा होऊन गेला ही शक्यता मान्य करतो, पण रामायणातील काही भाग शब्दशः घेणे मला अतीरंजीत वाटते, काही ठिकाणी अतिशयोक्ती आणि रुपक वापरले आहे असे माझे मत आहे. त्यामुळे मी रामायण जसेच्या तसे मान्य करत नाही. बाकी तुमचे चालू द्या.

Vijaykulkarni
Thursday, June 14, 2007 - 11:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेढेकर साहेब,
कुमार केतकर पोटार्थी सम्पादक आहेत.
उद्या राखी सावन्त पन्तप्रधान झाल्या तर त्यान्ची ही तारीफ करतील.

असो. पन्नालाल सुराणा हे प्रसिद्ध समाजवादी, पुरोगामी, निधर्मी विचारवंत वगैरे वगैरे. भाई वैद्य, कै. ना.ग. गोरे, मृणाल गोरे इ. त्यांचेच सहकारी. सुराणांनी १-२ महिन्यांपूर्वी 'सकाळ'मध्ये मुसलमानांच्या मदरशांमध्ये धर्मांधतेचे आणि अतिरेकीविचारांचे शिक्षण दिले जाते, हे कसे खोटे आहे आणि वस्तुतः मदरसे कसे आधुनिक शिक्षण देतात, तिथे आधुनिक शास्त्र कसे शिकवले जाते, मुसलमान प्राचीन काळापासून शास्त्र, गणित इ. मध्ये कसे पुढारलेले होते इ. गोष्टी एका लेखामध्ये लिहिलेल्या आहेत.
(यावरून त्यान्च्यावर बावळट पणाचा आरोप फार तर करता यील. मी तो लेख वाचलेला नाही. क्रुपया लिन्क असेल तर द्याल का? आणी अरबी लोकानी पुर्वी प्रगती केलि होती हे मान्य कर्ण्यात चुक काय? )
कुमार सप्तर्षी 'सत्याग्रही' नावाचे मासिक चालवतात. त्या मासिकाचा कुठलाही अंक वाचा आणि मी जे लिहिले आहे त्याबद्दल स्वतःची खात्री करून घ्या. २००४ च्या ऐन दिवाळीत, जयललिताने राजकीय फायदा मिळविण्यासाठी सूडबुद्धीने कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य श्री जयेन्द्र सरस्वती यांना खुनाच्या खोट्य
(खोट्या? तो खटला अजून सुरु पण झाला नाही. )

त्यावेळी लोकसत्ताने शंकराचार्यांविरूद्ध मोठी मोहीम उघडली होती. कुमार सप्तर्षींनीसुद्धा त्या मोहिमेत हात धूऊन घेतले होते. कालांतराने न्यायालयाने या खटल्यात श्री शंकराचार्यांना गुंतवणे हे संशयास्पद असल्याचे सांगून राज्य सरकार आणि पोलिसांच्या भूमिकेबद्दल संशय व्यक्त केला आणि तो खटला राज्याबाहेरच्या न्यायालयात हलविला.
(पण त्यान्ची निर्दोश मुक्तता केली नाही.
याच कुमार सप्तर्शीने तीस एक वर्शान्पुर्वी पुण्यात शन्कराचर्यान्बरोबर जह्हीर वाद घातल होत के जाति प्रथ अनिष्ट आहे. शन्कराचर्यानी जाते प्रथेचे समर्थन केले. तुमचा पाठिम्बा कुणाला? )
बाकी रामसेतु बद्दल म्हणाल तर सोनियाजी जो निर्णय घेतील तो आपल्या सार्यान्च्या भल्याचाच असेल :-)




Slarti
Thursday, June 14, 2007 - 11:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुलकर्णी, सोनियाजी जो निर्णय घेतील तो त्यांनी घेतला असल्यामुळे सर्वांच्या भल्याचा असेल असे तुम्हाला म्हणायचे आहे का ? किंवा दुसर्‍या शब्दांत सोनियाजींचा निर्णय म्हणजे भला निर्णय असे ध्वनित करायचे आहे का तुम्हाला ?

Deshi
Friday, June 15, 2007 - 12:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरेच्चा. गमंतच झाली. वरिल पोस्ट मध्ये केदार ने मांडलेल्या मुद्यांचा म्हणजे उत्तरांचा परत प्रति प्र्श्नात रुपांतर न करता विजय कुलकर्णींनी आवरते घेतले.
मुद्दे बहुतेक पटले का?
मुग्यांनी मेरु पर्वत तर गिळला नाही ना? बाकी तुमची पुजा चालु द्या. बरोबरच आहे जय कॉंग्रेस जय सोनीया


बाकी चालु द्या आम्ही बगताव.

Shendenaxatra
Friday, June 15, 2007 - 1:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पंचांगात सूर्य व चंद्रग्रहण अचूक सांगितले जाते.

ग्रहणाच्या वेळा भारतीयांना इतक्या महत्त्वाच्या का वाटत होत्या? कारण तेव्हा कर्मकांडे करायची असतात. दानधर्म, स्नान, उपास वगैरे. ती करता यावीत ही ह्या अचूक होर्‍यामागची प्रेरणा. कदाचित कुठल्या राजाने वा राजांनी बराच पैसा घालून ज्योतिर्विद लोकांना संशोधन करायला लावले
असेल आणि कालांतराने आपण त्यात तरबेज झालो. पण याचा फायदा काय? कर्मकांडे वेळच्या वेळी करता आली हा? हा काही फार मोलाचा फायदा नाही.
पाश्चिमात्यांना असली कर्मकांडे जरुरी नसल्याने त्यांनी तसे काही शोधले नाही. ग्रहणाच्या वेळी उपास तापास न केल्यामुळे त्यांचे फार नुकसान झाले असे वाटत नाही. मात्र ज्ञानाच्या तहानेमुळे त्यांनी साध्या डोळ्यांना न दिसणार्‍या गोष्टी शोधल्या.
१. ग्यालिलियो:- चर्चचा विरोध पत्करुन, जीव धोक्यात घालून सुर्यावरचे डाग शोधले. सूर्य कशाचा बनला आहे, सौर वादळे, त्याचे पृथ्वीवर
होणारे परिणाम ह्या दिशेने उचललेले पहिले पाऊल. दुर्बिणीतून गुरूचे उपग्रह शोधून चर्चने मांडलेल्या पृथ्वीकेंद्रित सिद्धांताला मोठ्ठे भगदाड पाडले. खगोलविज्ञानाचे खरे ज्ञान होण्याच्या दिशेने उचललेले हे एक महत्त्वाचे पाऊल.
२. केपलर, न्यूटन्: ग्रहांच्या कक्षांविषयीचे ज्ञान.
गुरुत्वाकर्षणाचा नियम शोधला जो एक मूलभूत बलाचे
गणिती समीकरण सांगतो. न्युटनमुळे विज्ञान कितीतरी
पुढे गेले. रोजच्या जिवनात वापरल्या जाणार्‍या गोष्टी जसे पूल, घरे, वाहने ह्यांचे डिझाईन बनवताना न्युटनचे गतीचे सिद्धांत वापरले जातातच.
ह्या थोर वैज्ञानिकांनी आधीच्या वैज्ञानिकांचे शोध समजून घेतले आणि त्यात आपली भर घातली. शोधांची अशी उतरंड रचली गेल्यामुळॅ आधुनिक विज्ञानाने दैदिप्यमान प्रगती केली आहे.

मी उलट असे म्हणेन की धार्मिक हिंदू लोकांना आम्च्याकडे सगळे होते असे म्हणायची फार जुनी खोड आहे. पाश्चिमात्य विज्ञानाला नावे ठेवणे
आणि वेदपुराणांचा नको इतका उदो उदो करणे म्हणजे संस्कृतीचा अभिमान अशी काहींची समजूत झाली आहे.
त्यात पुन्हा ज्या प्रकारचे लेख हे पुरावे म्हणून उद्धृत केले जातात ते बघता आमच्याकडे सगळे
होते म्हणणार्‍या पंथाचे लोक कुठलेही संशोधन केल्याशिवाय नुसते रिकामे आणि पोकळ दावे करत आहेत हे स्पष्ट लक्षात येते.
ह्या गोष्टींवर वा मनोवृत्तीवर टीका केली की काळा इंग्रज, सेक्युलर, हिंदुद्वेष्टा असे म्हणायची फ्याशन आली आहे. पण जमल्यास सावरकरांचे साहित्य वाचा. तेही विज्ञाननिष्ठ (म्हणजे आधुनिक विज्ञान)
होते. त्यांनीही हिंदुंच्या आत्मकेंद्रित, कूपमंडुकी वृत्तीवर आसूड ओढलेले आहेत. त्यांना असली विशेषणे लावाल का?


Satishmadhekar
Friday, June 15, 2007 - 5:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> मेढेकर साहेब, कुमार केतकर पोटार्थी सम्पादक आहेत.
उद्या राखी सावन्त पन्तप्रधान झाल्या तर त्यान्ची ही तारीफ करतील.

विजय कुल्कर्णी, हे खरे नाही. वाजपेयी ६ वर्षे पंतप्रधान होते. तुमच्या मताप्रमाणे केतकरांनी त्या काळात वाजपेयींचे लांगूलचालन करायला पाहिजे होते. परंतु त्या काळात देखील ते सोनियासमोरच शेपूट हलवून भाजपला अर्वाच्य शिव्या देत होते. सर्व समाजवाद्यांचा हिंदू संघटनांवर राग असतो. हिंदू संघटनांवर टीका करण्यासाठी ते परकीयांशी सुद्धा हातमिळवणी करतात.

>>> (यावरून त्यान्च्यावर बावळट पणाचा आरोप फार तर करता यील. मी तो लेख वाचलेला नाही. क्रुपया लिन्क असेल तर द्याल का? आणी अरबी लोकानी पुर्वी प्रगती केलि होती हे मान्य कर्ण्यात चुक काय? )

सगळेच समाजवादी असा बावळटपणा आयुष्यभर कसे करत आलेत? मदरशांमध्ये फक्त कुराण व मुस्लीम धर्माचे शिक्षण दिले जाते. अनेक मुस्लीम अतिरेक्यांना मदरशांमधून निधी आणि मदत मिळत असल्याचे आढळून आले आहे. मदरशांना पाठिंबा म्हणजे धर्मांध मुसलमान आणि अतिरेक्यांना पाठिंबा. असा पाठिंबा आयुष्यभर देणारे बावळट नक्कीच नसतात.

अरबी लोकांनी पूर्वी प्रगती केली होती किंवा नाही हा इथे मुद्दाच नाही. खरं सांगायचं तर आपला धर्मग्रंथ आणि आपला धर्म तेवढा खरा बाकी सर्व काफीर असं समजणारे आणि स्त्रियांवर आणि इतर धर्मीयांवर अत्याचार करणारे काय प्रगती करणार?


>>> (पण त्यान्ची निर्दोश मुक्तता केली नाही. याच कुमार सप्तर्शीने तीस एक वर्शान्पुर्वी पुण्यात शन्कराचर्यान्बरोबर जह्हीर वाद घातल होत के जाति प्रथ अनिष्ट आहे. शन्कराचर्यानी जाते प्रथेचे समर्थन केले. तुमचा पाठिम्बा कुणाला? )

तो खटला अजून चालू आहे. त्यामुळे जशी त्यांची अजून निर्दोष मुक्तता झालेली नाही त्याचप्रमाणे त्यांना अपराधी देखील घोषित केलेले नाही.

शंकराचार्यांनी जातीप्रथेचे अजिबात समर्थन केलेले नाही. ते जातीप्रथेचे समर्थन करतात याला तुमच्याकडे काही पुरावा आहे का? माझा पाठिंबा अर्थातच शंकराचार्यांना. ते सप्तर्षींसारखे ढोंगी नाहीत. सप्तर्षींना इतर समाजवाद्यांप्रमाणेच हिंदू शब्दाची अंलर्जी आहे. २-३ वर्षांपूर्वी त्यांच्या प्रभात रस्त्यावरच्या फ्लॅटमध्ये (ते समाजवादी असूनसुद्धा प्रभात रस्त्यासारख्या श्रीमंत भागात राहतात) ३-४ जणांनी घुसून म्हणे मोडतोड केली होती. त्यांचा संशय हिंदू संघटनांवर आहे. गंमत म्हणजे पुणे महानगरपालिका, महाराष्ट्र राज्य आणि केंद्रात सुद्धा त्यांच्या पक्षाची सत्ता असून सुद्धा आजतगायत पोलिसांना कोणालाही पकडता आलेले नाही. म्हणजे त्यांचा आरोप एकतर खोटा तरी असला पाहिजे किंवा ही मोडतोड त्यांच्यापैकीच कुणीतरी केली असली पाहिजे. बिचार्‍या शंकराचार्यांनी असा काही खोटेपणा केला नाही. ऐन नरकचतुर्दशीच्या दिवशी पहाटे त्यांना सूडबुद्धीने पकडले, तरी सुद्धा ते मुकाट्याने दोन महिने तुरुंगात जाऊन बसले. न्यायालयाने राज्य सरकार आणि तिथल्या पोलिसांवर कडक ताशेरे ओढून त्यांच्यावर अविश्वास व्यक्त केला आणि खटला राज्याबाहेर हलविला.


>>> बाकी रामसेतु बद्दल म्हणाल तर सोनियाजी जो निर्णय घेतील तो आपल्या सार्यान्च्या भल्याचाच असेल

अगदी खरं आहे तुमचं म्हणणं. सोनिया ही इटालियन महिला कायम (स्वतःच्या) भल्याचेच निर्णय घेते. क्वाट्रोची चे लंडन मध्ये अडकलेले पैसे सोडविणे, त्याला अर्जेंटिनामधून परत आणता येऊ नये अशी व्यवस्था करणे, अतिरेकी अफजल गुरूला फाशी देऊ नये अशी व्यवस्था करणे, स्वतःच्या कुटुंबीयांची (जावयासकट) विमानतळावरील सुरक्षेतून मुक्तता करणे, 'पोटा' सारख्या कायद्याला विरोध करणे, सावरकरांच्या स्मारकाला विरोध करणे, मुसलमांना आरक्षण देणे, KGB या गुप्तहेर संघटनेशी संबंध ठेवणे ही सर्वांच्याच भल्याची कामे आहेत.







Santu
Friday, June 15, 2007 - 5:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शेन्डे
हिन्दुना आपल्या कडे सगळे होते असे म्हणाण्याची जुनी खोड आहे.))) शेन्डे तुझे हे विधान पुर्वग्रह दुशीत आहे. अरे हिन्दुना हे म्हणण्याची गरज नाहि. हे बघ काहि गोर्‍या साहेबानि काय म्हतले आहे. हिन्दु च्या प्राचीन ज्ञाना बद्दल.

डिक टेरेसि the god paarticale's auther and omni(science magazine founder) हा काय म्हणतो. indian cosmologist first to
estimate the age of earth at four billion year.they come closest to the modern idias of atomism,quntum phisyscs

हे काय कुणि 'तथाकथित' "मागास" धार्मिक हिन्दुनी म्हटले नाहि.

आणि हे बघ ही दुसरी "गोरी" विदुषि काय म्हणते
हिचे नाव nancy wilsob ross ही लेखक आहे world of zen व times left corner या पुस्तकाची.व asia sosacity of new york च्या बोर्ड वर होती.
ती काय म्हणते ते कान उघडे ठेवुन ऐक

ति म्हनते" many ancient indian theories about the universe strtlingaly modern in scopeand worthy of the people who invented zero as well as algebra,and its application ofastronomy and geometry,in the opinion ofmonier-williaums they determines the moons synodical motion much before greeks. आणि तु ज्या गालिलिओ व कोपर्निकस बद्दल सांगत होता त्या बद्दल ति काय म्हणते ते बघ.

ति म्हणते" much before coparnikas and gaalilio there was a astonishing statement in "brhamanaa"the section of "veda"that'the sun never set or rises when people think sun is setting it dosent set but chnges side.
म्हणजे गालिलिओ वैगेरे लोकाच्या अगोदर हिन्दुच्या वेदात हे लिहिले होते.


Santu
Friday, June 15, 2007 - 6:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तु सुध्दा भ्रुगु संहिता वाच त्यात "बोगस" असे काहिच वाटत नाहि
तर एखादे scince चे पुस्तक वाचतोय असा आप्ल्याला भास होतो.
त्यात विश्वाच्या उत्पत्ति बद्दल प्रुथ्वि वरच्या जिवना च्या सुर्वाति बद्दल माह्ति आहे हे एखाद डार्विन च पुस्तक वाचल्या सार्खच वाटत.

अर्थात जो अर्थ या "गोर्‍या "साहेबाना दिसला तो अर्थ अजुन काहि "काळ्या" साहेबाच्या पचनी पडत नाहि.

आता हा बघ एक फ़्रेन्च साहेब काय म्हनतोय ते. हा आहे guy sormaan आहे the ginius of india फ़्रेन्च मधे le genie i"inde" चा लेखक.

हा आहे visiting scholar of hoover institute and leader of new liberlism in france. हा म्हनतो" the bible is yard stik for mesuring time but the infinitely vast time cycle of india suggest that world is much older
than anything bible has spoken of.

म्हनजे "अनंत" infinity हि कल्पना हिन्दुन्चिच.

पण तुमचे आपल एकच तुण तुण की हिन्दु मागास.
मला वाटत हा हिन्दु द्वेष्टा "जीन" gene जो तुमच्या अंगात भिनलाय.त्याचा शोध घेतला पाहिजे कारण हा सर्व त्याचाच प्रताप दिस्तोय.


Chyayla
Friday, June 15, 2007 - 7:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शेन्डेन माझ्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही टाळायचा प्रयत्न करत आहात. पन्चान्गाचा उपयोग कशासाठीही करो ते काय महत्वाचे नाही. ते शोधले ते महत्वाचे आहे. भारतियाना ही चान्गली सवय होती की विज्ञान केवळ ते शोधत नव्हते ते जगत होते अगदी रोजच्या जीवनात. सामान्य जनाना ती सवय देवा धर्माचे नाव घेउन त्यान्च्यात श्रद्धेनी रुजवली कारण हिन्दु जीवन पद्धती जशी ज्ञानी लोकान्साठी आहे तशीच ती सामान्य अडाणी लोकान्साठी पण आहे.

साधे उदाहरण तुळशीभोवती प्रदक्षिणा भले त्याला नाव पुजेचे दीले पण आधुनिक विज्ञानाने ही पुष्टी केली आहे की तुळशीमधुन मोठ्या प्रमाणात शुद्ध प्राणवायु चा पुरवठा होतो जो आरोग्यास हितकारी आहे. म्हणजे हिन्दु सन्स्कृती हा शोध लावुन केवळ थाम्बली नाही तर प्रत्यक्ष रोजच्या जीवनात अन्गीकार केला "सर्वेपी सुखिना: सन्तु, सर्वे सन्तु निरामया" ही सहज सन्स्कृती आहे. नाहीतर आज ईतके शोध लागुनही माणुस सुखी का नाही?

राहता राहीला प्रश्न केवळ हे आमच्याकडे आधीच होते असे सन्शोधन न करता बोलणारे कीन्वा त्यावर सन्शोधन का नाही केले?

त्याचे एकदम सहज उत्तर असे की केदारनी सान्गितल्याप्रमाणी आपण केवळ ईन्ग्र्जान्चे १५० वर्शाची गुलामगिरी लक्षात घेतो पण त्यापुर्वी जगातल्या अत्यन्त असहिष्णु कट्टर अशा मुस्लिमाच्या गुलामगिरीत सुमारे १००० वर्शे हा देश खितपत पडला होता. सारा देश त्या गुलामगिरीत पिचुन निघाला त्याला असले सन्शोधन करायला वेळ आणी आवश्यक शान्ती होती कुठे होती? त्यामुळे हे सगळे मागे पडणे साहजिकच आहे. पण त्या सन्स्कारामुळेच आपण तावुन सलाखुन कोणत्याही रुपाने का होइना ही सन्स्कृती टीकवुन ठेवली. बाकी जिथे मुस्लिमान्चे आक्रमण झाले तिथली सन्स्कृती कशी नामशेश झाली हे सान्गायची आवश्यकता आहे का? मुस्लिमान्नी या देशाची सन्स्कृती, ज्ञान मिटवण्याचा किती प्रयत्न केला कित्येक मन्दीरे, ग्रन्थालये जाळलीत तक्षशिला, नालन्दा असे जागतिक किर्तिचे विद्यापिठ जाळलीत. माझ्या माहितीप्रमाणे त्यानी नालन्दाचे ग्रन्थालय जेन्व्हा जाळले तेन्व्हा ते ग्रन्थालय ६ महिने जळत होते. अशा प्रकारे आपल्या समृद्ध विज्ञान, सन्शोधनाला खीळ बसलेली कोणी कसे लक्षात घेत नाही?

आज आपल्याला थोडी शान्ती लाभली जरी जिहादीन्चा परत या देशावर ताबा मिळवण्याचे जुने मनसुबे तेवढ्याच निश्चयाने चालु आहे तरी.

आता आधुनिक विज्ञान तेच शोध परत लावत आहे त्यामुळे साहजिकच आज आपण आपले जुने सन्दर्भ पडताळुन पहात आहोत. याचा खरे तर अभिमान वाटायचा दीला सोडुन तुम्ही पण या देशाच्या सेक्युलर पिल्लावाळीच्या सुरात सुर मिळवुन तुम्ही सुद्धा ही परिस्थिती न समजता रडगाणे गाता याचे वाईट वाटते. त्याना तर या देशाचा स्वाभिमान जागृत होणे नकोच आहे. त्यात तुमची ही भर घालुन देशाच्या अप्रत्यक्ष शत्रू मधे कशाला भर घालावी हे माझे मत आहे.

मागे झक्कीना पण अशीच झक्की आली होती व त्यानी पण अशाच प्रकारे लिहुन हिन्दुन्नाच नावे ठेवले होते. पण लक्षात घेतो कोण? नावे ठेवणे, निरर्थक टीका करणे सोपे आहे ज्यामुळे आपाण काहीतरी विषेश करतो असा (दु)र्भाव जागृत होतो आणी तुम्ही तेच करत आहात याचा विचार सुज्ञान्नी करावा. त्यापेक्षा सत्य परिस्थिती समजुन विधायक कार्य केल्यास तुमचीही साथ लाभेल.


Mahesh
Friday, June 15, 2007 - 7:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोकहो, घमासान चर्चेमधे व्यत्यय आणून निराळीच बातमी लिहितो आहे, त्याबद्दल माफ करा.
राष्ट्रपतीपदाची उमेदवारी प्रतिभा पाटील यांना मिळाली आहे. आणी स्पर्धेत दुसरे तुल्यबळ कोणी नसल्याने, ही निवड निश्चित झाल्यासारखीच आहे. देशातील पहिली महिला राष्ट्रपती ही महाराष्ट्राची व्यक्ती होणार ही महाराष्ट्राला अभिमानास्पद बाब आहे. जय हिंद जय महाराष्ट्र.
बातम्यांचे संकलन असा बोर्ड आहे, म्हणून ही बातमी लिहिली. धन्यवाद.


Santu
Friday, June 15, 2007 - 7:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला
अरे या मुसल्मानाचे पांढरे पाय भारताला लागल्या पासुनच
आपल्याला उतरति कळा लागली. आज त्यांची सत्ता गेली म्हणुन तर
हजार वर्षानी भारत परत प्रगति पथावर आहे.
आप्ल्या बरोबर स्वतंत्र झालेल्या पाकिस्तान बान्गला देश ची हालत डोळ्या समोरच आहे.

मुस्लिम सत्ता येण्याच्या आधी भारतच जगाची "अमेरिका" होता.

हि आपली नव्हे तर इअजिप्त इराण येथिल प्रगत संस्क्रुत्या पण अशाच लयाला गेला तिथे आता काय चाललल्य ते सर्वाना ठाउकच आहे.


Satishmadhekar
Friday, June 15, 2007 - 8:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> राष्ट्रपतीपदाची उमेदवारी प्रतिभा पाटील यांना मिळाली आहे. आणी स्पर्धेत दुसरे तुल्यबळ कोणी नसल्याने, ही निवड निश्चित झाल्यासारखीच आहे. देशातील पहिली महिला राष्ट्रपती ही महाराष्ट्राची व्यक्ती होणार ही महाराष्ट्राला अभिमानास्पद बाब आहे.

प्रतिभा पाटील यांनी मनमोहन सिंगप्रमाणे निव्वळ सोनियाची कळसूत्री बाहुली म्हणून न राहता भारताच्या राष्ट्रपती म्हणून स्वतःच्या बुद्धीने आणि विचारांने काम करावे. नाही तर कळसूत्री बाहुली / बाहुला महाराष्ट्रातला असला किंवा इतर कुठल्याही राज्याचा असला तरी काय फरक पडतो?

सोनियाची पहिली निवड शिवराज पाटील किंवा सुशीलकुमार शिंदे होते. दोघेही कट्टर सोनियानिष्ठ, स्वाभिमानशून्या आणि लबाड आहेत. दोघांनाही निवडले नाही हे बरं झालं. नाहीतर दोघेही पूर्ण पाच वर्षं सोनियाच्या घरचे नोकर म्हणून वावरले असते.


Chinya1985
Friday, June 15, 2007 - 8:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज वेळ नाही उद्या लिहितो सविस्तर.फ़क्त एकच सांगतो-
शेन्डेन भारतियांचे खगोलशास्रिय ज्ञान हे सर्व पंचांगात आले असे कोणि म्हटले???पंचांग म्हणजे संपुर्ण भारतिय खगोलशास्त्र असे कोणी म्हटले???त्यामुळे पंचांगात हे कुठे आहे ते कुठे आहे विचारण म्हणजे log table बघुन याच्यात integration,derivatives कुठे आहे अस म्हणन्यासारख आहे.


Gobu
Friday, June 15, 2007 - 10:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सोनियाची पहिली निवड शिवराज पाटील किंवा सुशीलकुमार शिंदे होते. दोघेही कट्टर सोनियानिष्ठ, स्वाभिमानशून्या आणि लबाड आहेत. दोघांनाही निवडले नाही हे बरं झालं. नाहीतर दोघेही पूर्ण पाच वर्षं सोनियाच्या घरचे नोकर म्हणून वावरले असते.
... पुर्ण अनुमोदन!
पण प्रतिभाताई ही काही वेगळ्या वागतील असे वाटत नाही!


Chyayla
Friday, June 15, 2007 - 2:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गोबुला पुर्ण अनुमोदन, तसेही कॉन्ग्रेसला "रबर स्ट्याम्प" राष्ट्रपतीच हवा आणी तीच त्याची परम्परा आहे.

Zakki
Friday, June 15, 2007 - 3:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

E-business वाल्यापेक्षा रबर स्टॅंपवाला(किंवा वाली) परवडेल. काँप्युटर, इंटरनेट इ. च्या आधी पासून भारतात e-business सुरु झालेला आहे. अधिक माहिती साठी लोकाग्रह असेल तर कुठेतरी लिहीन.

Vijaykulkarni
Friday, June 15, 2007 - 5:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मदरशांना पाठिंबा म्हणजे धर्मांध मुसलमान आणि अतिरेक्यांना पाठिंबा.

हे जरा फारच..

प्रभात रोड वर रहण्यात काही चुलिचे नाही.
त्यानी तो पैसा कस मिळविल यावर सारे आहे.

साधे उदाहरण तुळशीभोवती प्रदक्षिणा भले त्याला नाव पुजेचे दीले पण आधुनिक विज्ञानाने ही पुष्टी केली आहे की तुळशीमधुन मोठ्या प्रमाणात शुद्ध प्राणवायु चा पुरवठा होतो जो आरोग्यास हितकारी आहे
?

खरं सांगायचं तर आपला धर्मग्रंथ आणि आपला धर्म तेवढा खरा बाकी सर्व काफीर असं समजणारे आणि स्त्रियांवर आणि इतर धर्मीयांवर अत्याचार करणारे काय प्रगती करणार?

हे वर्णन कोणत्याही धर्मातल्या कट्टर लोकान लगू पडते




Chyayla
Friday, June 15, 2007 - 6:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण मला आता मोठ्ठा प्रश्न पडला की आतापर्यन्त सगळे पुरुष होते म्हणुन राष्ट्रपती होते पण आता एक महिला होत आहे... तर काय म्हणावे?

Shendenaxatra
Friday, June 15, 2007 - 6:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक स्त्री राष्ट्रपती होत असेल तर राष्ट्राध्यक्षा म्हणावे. राष्ट्रपत्नी हे शब्दश्: भाषांतर योग्य नाही.
तज्ञांनी खुलासा करावा.


Shendenaxatra
Friday, June 15, 2007 - 7:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पंचांगाविषयी तपशीलात जाण्यामागचे कारण हे की वरती कुणीतरी पंचांग हे आपल्या प्रगतीचा एक शिखरबिंदू होता. आणि त्यातील ग्रहणांची निदाने अचूकपणे करणे म्हणजे तर शिखराचे उच्च टोक.
तर त्याला मी उत्तर दिले. ग्रहणाचे भाकित अचूक करु शकलो तरी आपण त्या ज्ञानाचा उपयोग निव्वळ निरर्थक कर्मकांडे करायला केला.
त्यातून सूर्याविषयी वा चंद्राविषयी नवे ज्ञान काय मिळवले? उलट राहुने की केतूने सूर्याला गिळले आहे आणि जपतप, उपास, स्नान, दान वगैरे केल्याशिवाय सूर्याची सुटका नाही असले काहीबाही आचरट
समज करून घेतले होते.

आमच्याकडे सग्गळे सग्गळे ज्ञान होते पण त्या दूष्ट मुसलमानांनी
ते नष्ट केले हो असे रडणारेही अनेक भेटतात. मला वाटते विमाने कशी बनवावीत हे ज्ञात असते तर रानटी मुस्लिम टोळ्यांकडून आपण पराभूत कसे झालो? विमानातून वा हायड्रोजनने भरलेल्या बलूनने जर सैन्याने टेहळणी करुन आपला व्यूह आखला असता तर एक जबरदस्त बळ मिळून आपण मुस्लिम आक्रमकांना चारीमुंड्या चीत करायला हवे होते. तीच गोष्ट शस्त्रास्त्रांची. त्यात जर आपण अफाट प्रगती केली होती तर धर्मांध रानटी टोळ्यांकडून आपण मार का खाल्ला? गेलाबाजार निदान ज्योतिष विद्या जर प्रगत होती तर असले भयानक संकट येणार आहे ह्याचा पत्ता तरबेज ज्योतिषांना का लागला नाही?

नालंदा वा तक्षशिला इथले ग्रंथ जाळले त्यामुळे आमचे ज्ञान नष्ट झाले म्हणणार्‍यांसाठी. आज विज्ञानाने जे ज्ञान निर्माण केले
आहे ते कुठले एक वा दोन वा दहा विद्यापीठे भस्मसात झाली तर नष्ट
होणार नाही. निदान समस्त पाश्चात्य संस्कृती अष्मयुगात फेकली
जाणार नाहीच. मग आमचेच असे का झाले? कदाचित इतके भव्य दिव्य ज्ञान त्या ग्रंथात नसेलही.


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators