Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 14, 2007

Hitguj » Views and Comments » Current Affairs » बातम्यांचे / लेखांचे संकलन » Political » Archive through June 14, 2007 « Previous Next »

Chyayla
Wednesday, June 13, 2007 - 11:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की तुमची ईछा पुर्ण झाली आणी माझ्या अन्दाजाप्रमाणे उपटसुम्भ प्रश्न आलाच.

मित्रहो, स्थानीक लोकाना या सेतुचा तोटा होत असेल आणि तो तोडावा असे त्यान्चे मत असेल तर तो जरुर तोडावा!

यान्ना फ़ाजील गम्मत दीसत आहे असे वाटते व त्यावर जबरदस्तिचे हसुही जोडुन दीले... व्वा पर बात कुछ जमी नही गोबुजी. कारण याचा अर्थ एक तर तुम्ही पोस्टच नीट वाचल्या नाहीत. निदान असली फ़जिती टळली असती.

असो चिन्यानी लगेच माहिती दीली की स्थानिक मछिमारान्चा विरोध आहे, शिवाय सारे भारतवासी हे स्थानिकच आहेत त्यातल्या बहुसन्ख्य जनतेचा विरोध आहे... आता बोला


Vijaykulkarni
Wednesday, June 13, 2007 - 11:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विजयजी, ही गोष्ट सिद्ध झालेली आहे. बाबराने मंदिर तोडून मशीद बांधली या गोष्टीचा राग आहे. जर मूळ ठिकाणी मंदिर बांधले आणि मशीद दुसरीकडे बांधली तर नाही का चालणार?

बाबरच्या बाबरनामा मध्ये याचा उल्लेख नाही.
त्याने खरेच राम मन्दिर पाडून मशिद बान्धली असती तर त्याचा तेम्भा जरूर मिरविला असता.
तुलसिदास यानी सुद्धा उल्लेख केला नाही.

अयोध्येत शेकडो मन्दीरे आहेतच
आणखी एक कशाला?
त्याने कुणाचा फायदा होणर?
दक्शीणा उकळणारे आणी फुले नारळ विकणारे यान्चाच ना?

शिवाय खर्या रामभक्तानी घरातल्या जुन्या कालेन्डर
वरच्या रामच्या फोटोची पूजा मनोभावे केली तरी राम प्रसन्न होतो.
शबरीची उष्टी बोरे खाणारा देव तो,
भक्तान्ची अर्थिक परिस्थीती पाहून किन्वा देऊळ सनगमरवरी आहे का यावरून क्रुपा करायल तो आस्था चानेल वरचा बुवा आहे कि काय?

मशीद तोडताना काढलेले फोटो पहा.
एकाच्या तरी चेहेर्यावर अध्यत्मिक भाव आहेत का?

आणी हो, तळपद्यान्च्या विमानबद्दल गेली वीस वर्शे नुसते ऐकतो आहे.
भारद्वाज मुनीन्चा मूळ ग्रन्थ मिळणे एवढे अशक्या आहे?







Shendenaxatra
Thursday, June 14, 2007 - 1:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मंडळी इतक्या घाईघाईने समारोपाचे भाषण करायला घेतील असे वाटले नव्हते.

रामसेतू नामक नैसर्गिक वा मानवनिर्मित पूल तोडावा का हा विषय चर्चेच्या सुरवातीला होता.
त्यातून आपल्याकडे विमाने व अन्य आधुनिक तंत्रज्ञने होती का आणि रामयण महाभारत हे ऐतिहासिक ग्रंथ आहेत का काल्पनिक हे वाद उद्भवले. माझ्या मते ह्या दोन मुद्द्यांचे अजूनही निराकरण झालेले नाही. पुरावा म्हणून जे काही लेख दिले होते ते पुरेशी माहिती देत नाहीत. त्यामुळे रामायणाच्या सत्यतेविषयी ठोस कुठलाही पुरावा नाही आणि प्राचीन भारतात विमानविद्या प्रगत ह्यालाही नाही.

थट्टा समजू शकतो. पण पंचांगावर माझा राग वगैरे नाही. उलट योग्य तो अभिमान आहे. पण ग्यालिलियो, न्युटन, केपलर वगैरे रथी अतिरथींच्या संशोधनापुढे पंचांग खूपच मागासलेले आहे. अलीकडच्या ६००-७०० वर्षात आपण त्यात कुठलीही महत्त्वाची भर घातलेली नाही. त्यामुळे त्या बाबतीत पंचांग ही खेद वाटण्याची गोष्त आहे.


Chyayla
Thursday, June 14, 2007 - 1:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुलसिदास यानी सुद्धा उल्लेख केला नाही

महाशय, तुलसिदासान्चा रामचरितमानस हा विशय होता रामायणाचा त्यात राममन्दीरच काय ईतर तत्कालीन गोष्टीन्बद्दल सुद्धा माहिती नाही. आणी ते त्यात असेल अशी अपेक्षा करणे एक मुर्खपणाच आहे. (कुठलासा द्वेष पसरवणार्या फ़ालतु लेख वाचुन (आणी ते म्हणजे ब्रह्म सत्य अशी ठाम समजुत करुन) मते सान्गण्यापेक्षा स्वता:च्याही डोक्याने विचार करुन मते मान्डावी.

सन्तुनी जे पुरावे दीले त्यात तर सरकारी दरबारी सुद्धा स्पष्ट उल्लेख आहे मग हा पुरावा तर एकदम सॉलिडच Authentic व कायदेशीर म्हणावा लागेल. त्यातल्या त्यात ईन्ग्रजान्नीसुद्धा नोन्द ठेवली एखाद्या भारतियानी ठेवली असती तर तिथेच वाट लावली असती.


पण ग्यालिलियो, न्युटन, केपलर वगैरे रथी अतिरथींच्या संशोधनापुढे पंचांग खूपच मागासलेले आहे.
शेन्डेनक्षत्र तुम्हाला आधीच म्हटले अभ्यास करुन या आणी असल्या बाता मारु नका? एवढ्या सगळ्यानी समजावले तरी तुमच काहीना काही रडगाण सुरुच आहे. स्वता:चा मनाला येइल आणी वाट्टेल तसे लिहिता आहात याला काही अर्थ आहे का? तुम्हाला वाटले ते मागासलेले आहे म्हणुन काय ते खरच मागासणार का? खरच तुमचाच टोला तुम्हाला परत लागु होतो. स्वता:ला माहित नाही म्हणुन ईतराना माहित नाही असे समजु नका.

ग्यालिलिओ, केप्लर यान्नी जे शोध एकट्यानी लावले त्यापेक्षा जास्त ग्रह, खगोलीय ज्ञान व सगळ्यात महत्वाचे त्यान्च्या भ्रमण कक्षा, गती, वेळ, आकाशातील स्थान निष्चिती, राशी, नक्षत्र (शेन्डेनक्शत्र सोडुन )सगळे एकट्या पन्चागात होते त्याची आणी ग्यालिलिओ आदीन्ची तुलनाच अशक्य आहे. त्यामानाने उलट त्यान्चे सन्शोधन पन्चागापुढे फ़ारच प्राथमिक होते. त्याना वर्शभर आधी सुर्यग्रहण व चन्द्रग्रहणाच्या वेळा काढता येत होत्या का? आणी तेही एका सेकन्दाचीही चुक न करता? याच उत्तर द्या नाहीतर तुमचा मुद्दा चुकीचा आहे हे सिद्ध झालेच आहे पण सोबत मान्यही करा. निदान एवढा प्रामाणिकपणा तुमच्यात असेल अशी आशा करतो.

निदान एवढ सान्गुन आता तुम्हाला अभिमान तरी वाटतोय नाहीतर पन्चागाबद्दल तुम्हीच काय काय लिहिले आठवते का? त्यात सन्शोधन नाही झाले यात दोश आपला आहे पन्चागाचा अजिबात नाही. आणी सन्शोधन का नाही झाले तर तुमच्याच सारखे दळभद्री सेक्युलर सरकारचे सान्स्कृतिक खच्चिकरणाचे व भारतिय ज्ञान म्हणजे तद्दन खोटे, मागासलेले अश्या पुर्वग्रहित दृष्टीकोन ठेवल्यामुळे, व आत्मग्लानी ग्रसीत हिन्दुन्मुळेच (उदाहरणासाठी तुमच्याकडेच व विजय सायबाकडेच पहा) आता काही हिन्दु सन्घटना हा भारताचा सान्स्कृतिक अभिमान जागृत करीत आहेत म्हणुन एवढ तरी होतय, तरी ज्याना सन्शोधन करायचे ते बिचारे करतच आहेत.

हो एका मुद्याचा समारोप केला आहे तो म्हणजे सेतु तोडु नये याबद्दलचा. आता येउ द्यात की बाकी मुद्दे... मजा येत आहे



Chyayla
Thursday, June 14, 2007 - 2:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता तुम्हाला तुलसिदासान्वर विश्वास आहे नाही का? चला तर मग ठीक आहे आपण आता पाहुच की तुलसिदासान्वर किती विश्वास आहे ते?

त्याच तुलसिदासान्नी रामचरितमानसमधे रामाचा जन्म अयोध्येत झाला एवढच काय रामसेतुचा व विमान उडण्याचे वर्णन केले आहे... मग आता तुम्ही का नाही दाखवला विश्वास?... तुमची ढोन्गबाजी ईथेच उघडकीस झाली सायब.

तुलसिदासच काय देशातल्या प्रत्येक प्रमुख भाशेत व काही परकिय भाशेत सुद्धा अनेक लेखकान्नी रामायण लिहिले आहे व सगळ्यान्मधे या वरील गोष्टीन्चे सुन्दर वर्णन एकमतानी व स्पष्टपणे केले आहे.

बोलो सियावर रामचन्द्र की जय!



Sunilt
Thursday, June 14, 2007 - 3:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राम मंदिराच्या तमाशाला आता पुरेसे प्रेक्षक मिळत नाहीत म्हणून हा राम सेतूचा गोंधळाचा प्रयोग चालला आहे.

गाजराची पुंगी ..... नाहीच वाजली तर कालांतराने आणखी एखादा वग येईलच !!!!!!!!!!

हे राम !!!!!!


Chyayla
Thursday, June 14, 2007 - 6:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय आहे.. राममन्दीर तर झाले बान्धुन छोटेसे का असेना, भव्य बनवायचे.. लागेल अजुन वेळ बाकीचे बसलेत गळा काढत बाबरी पडली म्हणुन बोम्बलत.. बसु देत बापडे, शिवाय न्यायालयिन प्रकरण.. त्यामुळे...

BTW सुनिल तुमचीच वाट पहात होतो...
आणी हे रामसेतु तोडण्याचे प्रकरण सेक्युलरान्चे कारस्थान त्यानीच काढलेले हे विसरला का राव? बाकी मुद्याच तेवढ बोला.


Satishmadhekar
Thursday, June 14, 2007 - 6:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> विजय कुलकर्ण्यांच्या मते सोनिया गांधीसमोर लाळघोटेपणा करणे, सोनिया गांधी समोर शेपूट हलवून संघ परिवारावर भुंकणे आणि त्यांना अर्वाच्य शिव्या देणे, अतिरेक्यांना पाठिंबा आणि देशभक्तांची छीथू करणे, जातीयवाद आणि भ्रष्टाचाराचे समर्थन, मुस्लिमांचे लांगूलचालन, आणीबाणीला पाठिंबा, वृत्तपत्रातून खोट्या बातम्या देऊन अफवा पसरवणे इ. ढोंगी कृत्ये म्हणजे गरिबांच्या प्रश्नावर अहिंसक संघर्ष आणि यातच त्यांना सन्मान वाटतो
>> which of these things dod panaalaal surana, kumar saptarshee do?

विजयराव,

मी माझ्या पोस्टमध्ये ढोंगी प्रवृत्तीची प्रातिनिधिक उदाहरणे म्हणून नमुन्यादाखल भाई वैद्य, कुमार केतकर, पन्नालाल सुराणा आणि कुमार सप्तर्षी यांचा उल्लेख केला होता. त्यापैकी फक्त पन्नालाल सुराणा व कुमार सप्तर्षी यांच्याबद्दलच तुम्हाला शंका आहे असे दिसते. म्हणजेच माझे मत भाई वैद्य आणि कुमार केतकर यांच्याबद्दल योग्य आहे आणि त्याबद्दल तुम्हाला शंका नाही असा मी अर्थ घेतो (चू.भू.दे.घे.).

असो. पन्नालाल सुराणा हे प्रसिद्ध समाजवादी, पुरोगामी, निधर्मी विचारवंत वगैरे वगैरे. भाई वैद्य, कै. ना.ग. गोरे, मृणाल गोरे इ. त्यांचेच सहकारी. सुराणांनी १-२ महिन्यांपूर्वी 'सकाळ'मध्ये मुसलमानांच्या मदरशांमध्ये धर्मांधतेचे आणि अतिरेकीविचारांचे शिक्षण दिले जाते, हे कसे खोटे आहे आणि वस्तुतः मदरसे कसे आधुनिक शिक्षण देतात, तिथे आधुनिक शास्त्र कसे शिकवले जाते, मुसलमान प्राचीन काळापासून शास्त्र, गणित इ. मध्ये कसे पुढारलेले होते इ. गोष्टी एका लेखामध्ये लिहिलेल्या आहेत.

कुमार सप्तर्षी 'सत्याग्रही' नावाचे मासिक चालवतात. त्या मासिकाचा कुठलाही अंक वाचा आणि मी जे लिहिले आहे त्याबद्दल स्वतःची खात्री करून घ्या. २००४ च्या ऐन दिवाळीत, जयललिताने राजकीय फायदा मिळविण्यासाठी सूडबुद्धीने कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य श्री जयेन्द्र सरस्वती यांना खुनाच्या खोट्य खटल्यात गुंतवले. त्यावेळी लोकसत्ताने शंकराचार्यांविरूद्ध मोठी मोहीम उघडली होती. कुमार सप्तर्षींनीसुद्धा त्या मोहिमेत हात धूऊन घेतले होते. कालांतराने न्यायालयाने या खटल्यात श्री शंकराचार्यांना गुंतवणे हे संशयास्पद असल्याचे सांगून राज्य सरकार आणि पोलिसांच्या भूमिकेबद्दल संशय व्यक्त केला आणि तो खटला राज्याबाहेरच्या न्यायालयात हलविला.

मला वाटते ही उदाहरणे पुरेशी आहेत.



Chinya1985
Thursday, June 14, 2007 - 7:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विजयराव, तुम्ही काल विचारलेल्या प्रश्नांना उत्तर दिले नाही म्हणुन परत विचारतो-
विजयराव, हिंदुंनी गोद्रा घडवले, संसदेवर आडवानिंनि हल्ला करवला कश्मिरमधे सर्व नाही पण बरेच बोम्बस्फ़ोट लष्कर घडवते,निर्दोश मुस्लिमांना फ़ेक एनकाउंटर मधे मारले जाते असे तुमचे मत आहे हे समजले. सोनियाजिंचे लोकाभिमुक,धर्मनिरपेक्ष,राष्ट्रवादी सरकार खुपच चांगले असे तुम्ही म्हणता हेही कळले.
आता मला एक सांगा की याच कोन्ग्रेसाच्या काळात आजही दररोज कश्मिरमधे, आसाममधे, मणीपुरमधे बॉम्बस्फ़ोट होतात, निर्दोशांच्या हत्या होतात, एनकाउंटरमधे निर्दोश मारले जातात हे कसे????????
आणि हे सर्व होउनही कोन्ग्रेसचे सरकार लोकाभिमुक, धर्मनिरपेक्ष, राष्ट्रवादी कसे आहे हेही स्पष्ट करा???

अयोध्येत शेकडो मंदिरे आहेत मग अजुन कशाला.मग सांगा की तिथे बाबरी मशिदही नको असे तुमचे म्हणने आहे का???कारण मशिदीही जरुरिपेक्षा जास्त आहेत या देशात.

शेंडेन तुम्ही माझ्या मागिल पोस्ट्स वाचलेल्या दिसत नाहित त्या नीट वाचा. तुमच्याशी चर्चा करणे निरर्थक आहे असेच दिसते.


Santu
Thursday, June 14, 2007 - 8:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गाजराची पुन्गी..... वाजली नाहि तर अजुन एक वग )))) अश्या कित्येक पुंग्या सेक्युलर नाच्यानी आतापर्यत
मोडुन खाल्ल्यात. आठवा पन्नास वर्षाचा ईतिहास.

हे राम ,))))
घाबरु नका अजुन तुम्हाला गोळी घातलेली
नाही


Satishmadhekar
Thursday, June 14, 2007 - 8:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> बाबरच्या बाबरनामा मध्ये याचा उल्लेख नाही.
त्याने खरेच राम मन्दिर पाडून मशिद बान्धली असती तर त्याचा तेम्भा जरूर मिरविला असता.
तुलसिदास यानी सुद्धा उल्लेख केला नाही.

कदाचित बाबराने असंख्य मंदिरे पाडली असतील की त्याची मोजदाद करणे सुद्धा अशक्या झाले असेल. अयोध्येमध्ये, जिथे मूळचे श्रीराम मंदीर तोडून मशिद बांधली तिथे एक शिलालेख होता. त्यावर बाबराचा सरदार मीर बाकी याने मुळचे मंदीर तोडून मशिद बांधली असे कोरलेले होते.

तुलसीदासांनी का उल्लेख केला नाही हे त्यांनाच माहिती. ते काही प्रत्येक घटनांची नोंद ठेवणारे 'आजतक' किंवा 'लोकसत्ताचे' वार्ताहार नव्हते. या घटनेचा सोडाच पण त्या काळात घडलेल्या इतर अनेक घटनांचा त्यांनी उल्लेख केला नाही, म्हणजे त्याचा अर्थ त्या घटना घडल्याच नाहीत असा अर्थ होतो की काय?


Gobu
Thursday, June 14, 2007 - 10:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुनिल, स्वागत! बर्‍याच दिवसानी बुवा! पहा तरी काय चालले आहे इथे! म्हणे सेतु तोडण्याबाबत एकमत झालेय सर्वान्चे!
चिन्या, पाहीलस आता शेन्डे काय म्हणतात ते! त्यानी रामाच्या सत्यतेवरच शन्का घेतलीय, मी काय वेगळ लिहील होत बुवा!
च्यायला, तुमचे लिखाण वाचुन मला हसावे की रडावे हेच कळत नाही!
अहो, तुम्ही असे लिहीलेत की सेतु तोडण्याला स्थानिक लोकान्चा, बहुसन्ख्य लोकान्चा, हिन्दुत्ववादी पक्षान्चा सगळ्याचा विरोध आहे..
आता इतक्यान्चा विरोध असेल आणि सेतु तोडण्यात कुणाचाच फायदा नसेल तर मग हे लोक काय वेडे आहेत का, जे प्रचन्ड जनमताचा विरोध डावलुन सेतु तोडायला निघालेत!
लोकशाहीत हे शक्य तरी आहे का?
कै च्या कै ह!
(बाकी तुमच्या अफाट बुध्दीचे फार कौतुक वाटते हो! अहो,किती पटकन निष्कर्श काढता हो तुम्ही! आणि तो ही नेहमी चुकीचाच)!!!


Satishmadhekar
Thursday, June 14, 2007 - 11:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> अयोध्येत शेकडो मन्दीरे आहेतच आणखी एक कशाला?
त्याने कुणाचा फायदा होणर? दक्शीणा उकळणारे आणी फुले नारळ विकणारे यान्चाच ना?

मंदीर हे भक्तीसाठी उभारायचे असते, फायद्याकरता नाही. आणि मंदिरामुळे कुणाचा फायदा होणार असेल तर तुम्हाला का वाईट वाटतंय?

>>> शिवाय खर्या रामभक्तानी घरातल्या जुन्या कालेन्डर
वरच्या रामच्या फोटोची पूजा मनोभावे केली तरी राम प्रसन्न होतो.

देवळातल्या मूर्तीची पूजा केली तरी सुद्धा होतो. त्यामुळे मंदीर उभारायला काहीच हरकत नाही.


>>> शबरीची उष्टी बोरे खाणारा देव तो, भक्तान्ची अर्थिक परिस्थीती पाहून किन्वा देऊळ सनगमरवरी आहे का यावरून क्रुपा करायल तो आस्था चानेल वरचा बुवा आहे कि काय?

बरोबर आहे. अयोध्येत श्रीरामजन्मभूमीवर संगमरवरी देवळाच्याऐवजी साधं विटांचं मन्दीर निर्माण केलं तर तुमची काही हरकत नाही ना?

एकंदरीत श्रीरामाचे अस्तित्व तुम्हाला मान्य आहे असं दिसतय. हेही नसे थोडके. नाहीतर रामायण ही काल्पनिक कथा आहे असं काही पुरोगामी, निधर्मी, आणि बुद्धिवादी विचारवंत म्हणतात.


>>> मशीद तोडताना काढलेले फोटो पहा. एकाच्या तरी चेहेर्यावर अध्यत्मिक भाव आहेत का?

श्रीरामजन्मभूमीवरचे मूळचे मंदीर तोडून बांधलेली मशीद तोडताना चेहर्‍यावर आध्यात्मिक भाव असायला पाहिजेत असं भारतीय राज्याघटनेच्या कुठल्या कलमानुसार बंधनकारक आहे? मूळचे मंदीर तोडताना बाबराच्या चेहर्‍यावर कुठले भाव होते?


Gobu
Thursday, June 14, 2007 - 11:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विजयकुल यान्नी मान्डलेली वरील मते ही फार टोकाची असतीलही पण चुकीची मुळीच नाहीत!
अयोध्येत मन्दीर बान्धा आणि मशिदही बान्धा, अहो श्रध्देला आमची ना नाही, १ काय १० मन्दीरे बान्धा!
पण हे सामोपचाराने आणि चर्चेने होऊ द्या की!
यावर मुद्द्यावर कोणी आपली पोळी भाजणार असेल तर हे मात्र सर्वस्वी चुक आहे
अहो धर्माधर्मात कशाला वैमनस्य पेरता!
याने देशाचे काय भले होणार आहे?


Limbutimbu
Thursday, June 14, 2007 - 12:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>> >>> अयोध्येत शेकडो मन्दीरे आहेतच आणखी एक कशाला?
जगात कोट्यावधी बाप्यान्ची लोकसन्ख्या हे!
पण माझा बाप म्हणुन आपण कुणा एकाकडेच बोट दाखवतो ना???? DDD
तसच हे हे!
ते मन्दिर बाबराने, परकिय आक्रमकाने तोडले म्हणुन तेच परत बान्धायचे!
(अगदीच रहावल नाही हो लिहिल्यावाचुन)


Chinya1985
Thursday, June 14, 2007 - 1:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गोबु तुम्ही गेल्या १०-१२ दिवसांची चर्चा नीत वाचा त्यात हे सर्व discuss करुन झालेय.

Gobu
Thursday, June 14, 2007 - 1:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिन्या, हे घे आजचीच पोस्ट आहे ही शेन्डेंची...
त्यामुळे रामायणाच्या सत्यतेविषयी ठोस कुठलाही पुरावा नाही आणि प्राचीन भारतात विमानविद्या प्रगत ह्यालाही नाही...

Chyayla
Thursday, June 14, 2007 - 1:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अस कस पुरावा नाही तुलसिदासान्च रामचरितमानस आहे ना? विजय साहेबाना तुलसिदासान्चा पुरावा चालतोय की. विमान विद्या.. जरा डोळे उघडुन पोस्ट वाचा सगळे आधीच चर्चेत आले आहे शिवाय विमानाबद्दल त्याना अभिमानही वाटुन गेला.. आहेत कुठे? .

अयोध्येत मन्दीर्-मशीद दोन्ही बान्धायची म्हणता.. ठीक आहे एकदम मन्जुर पण त्या आधी काबा येथेही मशीद तोडुन मन्दीर्-मशीद दोन्ही बान्धावे. कशाला धर्मा-धर्मात वैमनस्य पेरावे? नाही का हो गोबुजी.


बाबराचा सरदार मीर बाकी याने मुळचे मंदीर तोडून मशिद बांधली असे कोरलेले होते.
सतिश माढेकर हा पुरावा माझ्या लक्षातच नाही आला, आता मीर बाकीनेच लिहिले (पुराव्याने शाबीत) म्हणजे हा तर सेक्युलर पुरावा झाला त्याना मानायला काहीच अडचण नाही.

च्यायला, तुमचे लिखाण वाचुन मला हसावे की रडावे हेच कळत नाही
तुम्ही विचारले म्हणुन सान्गतो ईतरही सेक्युलर पिल्लावळ रडतच आहेत त्यात तुमची भर घालाच... बरे रडणे झाले की जे प्रश्न शेन्डेनला विचारले त्याच उत्तर द्या की झाल. ठीक आहे मग उत्तरान्ची वाट पहातोय.

आता इतक्यान्चा विरोध असेल आणि सेतु तोडण्यात कुणाचाच फायदा नसेल तर मग हे लोक काय वेडे आहेत का, जे प्रचन्ड जनमताचा विरोध डावलुन सेतु तोडायला निघालेत
बरे तुम्ही सान्गा सेतु का तोडावा ईतका विरोध असतानाही? तोही पर्याय उप्लब्ध असताना... लोकशाहीतच शहाबानो प्रकरण, धर्म जातीच्या नावावर आरक्षण, ईन्दीराची आणीबाणी असे अनेक प्रचन्ड जनमताच्या विरोधातही घडलेच ना? मग आता बोला वेडे कोण?

Kedarjoshi
Thursday, June 14, 2007 - 2:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अयोध्येत मन्दीर बान्धा आणि मशिदही बान्धा, अहो श्रध्देला आमची ना नाही, १ काय १० मन्दीरे बान्धा!
पण हे सामोपचाराने आणि चर्चेने होऊ द्या की!
यावर मुद्द्यावर कोणी आपली पोळी भाजणार असेल तर हे मात्र सर्वस्वी चुक आहे
अहो धर्माधर्मात कशाला वैमनस्य पेरता!
याने देशाचे काय भले होणार आहे>>>>>>

गोबु,
राम आहे की नाही यात वाद असेलही. पण भारतातील बहुसंख्य जनतेने मान्य केले की रामयन व महाभारत झाले. तर

अयोद्या येथील मंदीरा साठी अनेक संघर्ष झाले आहेत. गुरु गोवींदसिग हे शिखांचे दहावे गुरु, ते देखील एक लढाई या साठी लढलेले आहेत. १९४९ मध्येच खरतर ते मंदीर होनार होते, (सरदार पटेलांनी गुजरातेतील म्स्जीद तोडुन तिथे मंदीर बांधले हे आपणास माहीती असेलच, शिवाय ते कॉग्रेस चेच होते, भाजपा वा तथकथीत हिंदु पक्षाचे न्हवते) तर त्यांनी आण्खी दोन म्हण्जे काशी व अयोध्द्या हे प्रश्न निकालात काढायचे ठरवले. त्यात घोळ परत मुस्लीम लांगुलचालन करनार्यानंनी घातला व हे प्रकरन भिजत पडले.

नंतर अनेक्दा (१९४९ नंतर) सर्व पक्षिय बैठका झाल्या त्यात तोडगा निघाला नाही व सवोच्च न्यायालयाने जैसे थे अस आदेश दिला. म्हणुन मिंटीग झाल्या नाहीत हा आरोप खोटा आहे. सामोपचाराने प्रश्न्च मिटला नाही.

धर्मा धर्मात कशाचे वैमनस्य ---

अहो मग कुनात असेल. राव तु जरा डोळे उघडे करुन पुर्ण जगात काय चालले आहे हे बघ. सर्व धरमात वैमनस्यच आहे. हिंदु धर्म हा फार सहनशिल म्हणुन मस्जीद पाडल्यावर हिंदु धर्मातच दुखी होनारे लोक आहेत बामीया पाडल्यावर हिंदु धर्मातच फक्त पेपर मध्ये लिहीनारे षंड लोक आहेत.

हा तुझा पोळी भाजन्याचा मुद्दा मान्य. पण तेव्हा कोणीही भगवे व्ह्यायला तयार न्हवते म्हणुन भाजपाने पोळी भाजली, पण त्याला पर्याय न्हवता.

याने देशाचे काय भले होनार आहे

जर काशी, मथुरा, अयोध्या हे मंदीर असतील तर हाच मुद्दा मुस्लीम समाजाला लागु होत नाही का? त्यांई तो का मान्य करु नये. द्यावे मंदीर बांधुन तेथे. शिवटी त्यांचाही देशच आहे ना.

मशीद तोडताना काढलेले फोटो पहा. एकाच्या तरी चेहेर्यावर अध्यत्मिक भाव आहेत का? >>>>>
मग काय अरेरे मी न वापरात असलेली मस्जीद तोडतोय, देवा मला माफकर असे भाव हवेत का?

तुमच्या मुलाला (वैयक्तीक घेऊ नका) जर रागाने तुम्ही एक थापड मारत असाल तर काय प्रेम्ळ भाव असतात का? रागीट असतात की.

बाबरच्या बाबरनामा मध्ये याचा उल्लेख नाही.
त्याने खरेच राम मन्दिर पाडून मशिद बान्धली असती तर त्याचा तेम्भा जरूर मिरविला असता. >>>>>
किती मंदीराचा उल्लेख तो करेल?

अल्लादिन खिलजी ने जेव्हा विजयनगर चे साम्राज्य उध्द्वस्त केले तेव्ह्या त्याच्या नाम्यात कर्नाटकातील हजारो मंदीरे पाडल्याचा उल्लेख नाहीये पण शिवाजी महाराज जेव्हा कर्नाटकात गेले तेव्हा ते विजयनगर साम्राज्य धूळीला गेले, मंदीरांचा नाश झाला यामुळे कष्टी झाले होते असा त्यांचा बखरीत उल्लेख आहे मग काय शिवाजी महाराज पण येथे खोटे ठरनार का? कारन खिलजीच्या बखरनाम्यात त्याचा उल्लेख नाही.

(आपण ईतिहास देखील वाचावा, व सर्वांगाने वाचावा)


भारद्वाज मुनीन्चा मूळ ग्रन्थ मिळणे एवढे अशक्या आहे? >>>>.
अमेरिकेत वा ईतर कोठेही नुसते बसुन अशक्य आहे का? ग्रंथच सापडत नाहीत, पुरावे द्या म्हणने खरच सोपे आहे पण तसे पुरावे मिळन्यासाठी अनेक जुन मंदीरे, ग्रंथालये पालथे घालावे लागतात, कदाचित भांडारकर मध्ये तो ग्रंथ असेलही.

मुळात आपले बहुतान्श ग्रंथ हे ईग्रजांनी इग्रजी भाषेत १८०० चे १९०० च्या काळात अनुवादीत केले आहेत त्यामुळे तुम्हाला ते संदर्भ म्हणुन कुठल्याही इतिहास संग्रहालयात मिळन्याची शक्यता आहे, पण त्या साठी फक्त टिका करुन उपयोगी नाही तर तिथे जाऊन बघने उपयोगी ठरेल.

ते जाऊ द्या गेला बाजार Grant Duff ला तर वाचुन काढा, तो कदाचित ईथेही मिळेल.


अयोध्येत शेकडो मन्दीरे आहेतच आणखी एक कशाला? >>>.
हा खर तर अस्मीतेचा प्रश्न असतो. फायद्याचा नाही.

उदा द्यायचे तर
१. केमाल पाशाने सत्तेवर आल्यावर तुर्कस्थानात काय बदल घडवुन आनले हे पाहावे.
२. रोम वर मुस्लीमांनी आक्रमन करुन तेथे राज्य केले, ते परत गोर्यांनी परतवुन लावले व रोम मध्ये काय बदल घडवुन आनले ह्याचे वाचन करने.

परत एकदा ईतिहास वाचा, मी ईथे त्या दोघांनी काय व कशात बदल केले हे लिहीत बसनार नाही व तो विषय ही नाही.

आपली अस्मीताच मेलेली आहे. याचे कारन आपल्यावर साधारन १००० वर्षे परकियांनी राज्य केले म्हणुन आपल्याला कशाचेच काही वाटत नाही.
आजची आपण भारत १५० वर्षे पारतंत्र्यात होता असेच म्हणतो पण वस्तुस्तिथी अशी की त्या आधी आपल्यावर मुस्लीमांनी राज्य केले हे विसरुन जातो, ते पण परकियच होते हे आपल्या ध्यानात येत नाही.

(ताक, मी देशीनी जसे आधी लिहीले तसा फनटिक नाहीये, त्यामुळे तसा संद्र्भ माझ्या लिखानाला जोडु नये)


Chinya1985
Thursday, June 14, 2007 - 4:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गोबु तु खरच सर्व पोस्ट्स वाच मग तुला कळेल की शेन्डेन्च्या विजयच्या सर्व पोस्ट्स ना समाधानकारक उत्तरे दिली आहेत.पण हे लोक मान्यच करत नाहित तर आम्ही काय करणार???आता किति वेळ तेच तेच प्रश्न विचारणार??? त्यापेक्षा मागिल सर्व पोस्ट्स वाचा. शेन्डेन मधेच २-३दिवस गायब होतो. या २-३ दिवसात आम्ही त्याच्या प्रश्नांची उत्तरे दिलेली असतात तो ती न वाचता परत तेच प्रश्न विचारतो. मागे असेच झाले पुरावे मागितेले शेन्डेनने आम्ही त्याबद्दल लिहिले आणि त्यात स्लार्ति सापडले. विजयराव, स्लार्तिने मान्य केले राम आणि रामायण त्यानंतर परत शेन्डेन आला आणि परत तिथुनच सुरुवात. आता तु पण नविन चर्चेत आला आहेस आणि परत तेच प्रश्न उपस्थित करत आहेस.म्हणुन म्हणतोय सर्व पोस्ट्स आधी वाचा

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators