Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 13, 2007

Hitguj » Views and Comments » Current Affairs » बातम्यांचे / लेखांचे संकलन » Political » Archive through June 13, 2007 « Previous Next »

Shendenaxatra
Wednesday, June 13, 2007 - 1:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे जे काही ज्याला रामसेतू म्हटले जाते ते न तोडायला अनेकांची श्रद्धा एवढे कारण पुरेसे आहे.
भारत सरकारने श्रद्धेकरता अनेक तडजोडी केलेल्या आहेत. भारताच्या राष्ट्रगीतापासून ही तडजोड सुरू होते. तेव्हा रामायण हा इतिहास आहे असे सिद्ध करता आले नाही तरी श्रद्धाळू हिंदूंची भावना दुखावू नये म्हणून तो सेतू तोडू नये असे कोणी म्हटला तर मी त्याचे समर्थनच करेन.

अर्थात सरकारने आपला निर्णय जर फिरवला तर तो बदललेला निर्णय रामायण ऐतिहासिक असल्याचा पुरावा म्हणून वापरता येईल का? नाही.


Vijaykulkarni
Wednesday, June 13, 2007 - 2:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विजय कुलकर्णी ही व्यक्ती नसून प्रवृत्ती आहे. भाई वैद्य, कुमार केतकर, कुमार सप्तर्षी, पन्नालाल सुराणा इ. अशाच प्रवृत्तीची उदाहरणे.

इतक्या चान्गल्या माणसान्च्या रान्गेत मला बसवणे म्हणजे माझा सन्मान समजतो मी. गरिबान्चे प्रश्न घेवून अहिन्सक सन्घर्श करणारी माणसे ही.
मन्दिर मशिदिचे वाद पेटवणे, त्या दन्गलीत सत्तेची पोळी भाजणे, सतीप्रथेचे आणी चातुर्वर्ण्याचे समर्थन करणे असे प्रकार करीत नाहीत ते.
भारताच्या इतिहासात जे काही लिहीले आहे ते थोतांड आहे असा यांचा ठाम विश्वास असतो. मात्र अहिंदूंचे सगळे दावे ह्यांना खरे वाटतात.
(कोणते बरे?)बाबराने श्रीराममंदीर तोडून तिथे मशीद बांधली यावर यांचा अजिबात विश्वास नसतो.(का ठेवावा?तोगडियानी सान्गितलेले सारे ब्रम्हसत्य?)
मुळात श्रीरामायण हे थोतांड आहे अशीच यांची श्रद्धा असते. पण श्रीराम कसा अन्यायी होता, त्याने सीतेवर कसा अन्याय केला अशा रामायणातल्या गोष्टींवर हे कायम लेख लिहीतात.(कोणी लिहिले?)
मुख्य म्हणजे मुसलमानांना चुचकारले, भाजपवर टीका केली म्हणजे आपण पुरोगामी, विचारवंत, बुद्धिवादी ई. समजले जाऊ अशी यांची ठाम समजूत असते.(ह ह ह काहीतरीच)
ही मंडळी रा.स्व.संघ आणि लष्कर-ए-तोयबा यांना एकाच मापाने मोजतात.(काय बोवा फरक?)
ग्रॅहम स्टेन्सचा खून करणार् ०दया दारासिंगला फाशी द्यायला यांचा पाठिंबा असतो, पण अफजल गुरूला फाशी देणे म्हणजे मानवतेविरुद्धचा अपराध आहे असा यांचा प्रचार असतो.(दारसिन्ग खुनी आहे तर अफझल पोलिसान्च्या नाटकाचा बळी. यावर इतरत्र हे बरेच लिहिले आहे, पण वाचण्याची तसदी घ्याल की "अफझल ला फाशी द्या" ही चीज आळवत बसाल?)
यांना विशेषतः मुस्लीम अतिरेक्यांबद्दल अतिशय कळवळा वाटतो.(कशावरून?)
गोध्रा येथे रेल्वेच्या डब्याला लावलेली आग,(असे कोणे म्हणाले? की चोराच्या मनात चान्दणे?)
संसदेवरील हल्ला,(यावर्च्या एकाहि मुद्द्याचे उत्तर आलेले नाही.)
काश्मीरमध्ये आजवर झालेली सर्व हत्याकांडे इ. हिंदूंनी आणि भारतीय लष्कराने घडवून आणले असा तद्दन खोटा प्रचार हे करत असतात.
(सर्व? असे कोण म्हणाले?)
दुर्दैवाने अशा भोंदूंची संख्या भारतात खूप जास्त आहे.
(ते एक बरे आहे अन्यथा भारताचा सौदी अरेबिया झाला असता. )




Vijaykulkarni
Wednesday, June 13, 2007 - 2:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एका पुस्तकात त्याचे खंडीभर पुरावे पण दीले आहेत

पु ना ओक यान्चे हे पुस्तक मी वाचले आहे.

वेदिक काळात ऑस्ट्रेलिया भारताचा भाग होत, आणे ती आपली शस्त्र ठेवण्याची जाग होती अस्त्रालय या नाववरून ऑस्ट्रेलिया झाले असे ही आहे असे एका राष्ट्र्भक्ताने मला सान्गीतले होते. :-)


Chyayla
Wednesday, June 13, 2007 - 4:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वाह, विजय सायबाला चान्गल्च झोम्बलेल दीसतय. माढेकरान्च्या पोस्टाला पावतीच दीली म्हणायची की राव. BTW तुमचे वरचे सगळे आधीच चावुन चोथा झालेले आहे. आता उगाळुन काय फ़ायदा नाय गड्या. राहु द्या जी तिथच..

गरिबान्चे प्रश्न घेवून अहिन्सक सन्घर्श करणारी माणसे ही.
हा हा हा... हा तर एकदम सॉलिड जोक मारलात ... गरीबान्साठी सन्घर्श करायचा बुवा... मग गरीबाना गरीबच राहु द्यावे लागेल ना, गेले ५० वर्शाच्या वर ही भट्टी चान्गलीच जमली त्यात थोड्या तुम्बड्या भरल्या तर या बाकीच्या लोकाना काय त्रास होतोय कोण जाणे?

शेन्डेनक्षत्र आता तुम्ही एक एक गोष्ट मान्य करायला लागलात. आता तुम्हाला तळपद्यानी विमान उडवले याचा अभिमान वाटतो शिवाय श्रद्धेचा प्रश्न म्हणुन रामसेतु तोडु नये हेही मान्य केलेत. अभिनन्दन... आम्ही तरी वेगळे काय म्हणत होतो. अर्थातच हे तर केवळ दोनच कारणे झालीत याउपरही ईतरही ठोस कारणे आहेत ज्यासाठी सेतु तोडु नये.

श्रद्धेसाठी तडजोड... ह्यात थोडी शन्का आहे, ईथे तडजोड काय करावी लागतेय चान्गला पर्याय उपल्ब्ध असल्यावर??
तडजोड कुठे करावी याचही भान ठेवावे, नको तिथे तडजोड... त्यातल्या त्यात देशाच्या अभिमान, अखन्डता, सरन्क्षण, समृद्धी साठी ही तडजोड करावी हे काही पटत नाही. त्या पार्श्वभुमीवर राष्ट्रगीतातली तडजोड खरतर लज्जास्पद आहे. शिवाय व्होटब्यान्केच्या राजकारणालाही तडजोड म्हणाल काय?


Satishmadhekar
Wednesday, June 13, 2007 - 6:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> विजय कुलकर्णी ही व्यक्ती नसून प्रवृत्ती आहे. भाई वैद्य, कुमार केतकर, कुमार सप्तर्षी, पन्नालाल सुराणा इ. अशाच प्रवृत्तीची उदाहरणे.

>> इतक्या चान्गल्या माणसान्च्या रान्गेत मला बसवणे म्हणजे माझा सन्मान समजतो मी. गरिबान्चे प्रश्न घेवून अहिन्सक सन्घर्श करणारी माणसे ही.

विजय कुलकर्ण्यांच्या मते सोनिया गांधीसमोर लाळघोटेपणा करणे, सोनिया गांधी समोर शेपूट हलवून संघ परिवारावर भुंकणे आणि त्यांना अर्वाच्य शिव्या देणे, अतिरेक्यांना पाठिंबा आणि देशभक्तांची छीथू करणे, जातीयवाद आणि भ्रष्टाचाराचे समर्थन, मुस्लिमांचे लांगूलचालन, आणीबाणीला पाठिंबा, वृत्तपत्रातून खोट्या बातम्या देऊन अफवा पसरवणे इ. ढोंगी कृत्ये म्हणजे गरिबांच्या प्रश्नावर अहिंसक संघर्ष आणि यातच त्यांना सन्मान वाटतो.

Chinya1985
Wednesday, June 13, 2007 - 7:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चला सर्वांनी मान्य केलेच आहे की रामसेतु तोडला जाउ नये. विजयरव, शेंदेन यांच्या वागण्यात आपली चुक मानणे दिसत नाही. त्यामुळे कितिही पुरावे वगैरे दिले तरी हे मान्य करणारच नाहित की भारत मागास नव्हता. काल शेंडेन नी लिहिले होते की 'हजारो वर्षापुर्वी भारत प्रगत होता यावर ज्यांची निस्सिम भक्ती आहे तेच हा लेख मान्य करु शकतात.' कुणाच्याही निस्सिम भक्ती वर वार झाला तर त्याचा राग अनावर होतो. जसा 'भारत मागास होता' या शेंडेनच्या निस्सिम भक्तीवर वार झाल्यावर त्यांचा राग अनावर झाला.

Nandini2911
Wednesday, June 13, 2007 - 11:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही मंडळी रा.स्व.संघ आणि लष्कर-ए-तोयबा यांना एकाच मापाने मोजतात.(काय बोवा फरक?)
>>>>
हे वाक्य लिहिणारा माणूस एकदाही संघात गेलेला नाही किंवा लषकरच्या ट्रेनिंग कॅम्पला गेला नाही. मी दोन्हीकडे गेलेली नाही. मात्र तिथल्या माणसाना जरूर भेटलेली आहे.

अफ़ज़ल जर पोलिसाचा बळी असेल तर संसदेवर हल्ल करणार्याला शोधून तिथल्या तिथे गोळी झाडली गेली तर बरे होईल ना?


कोणते बरे?)बाबराने श्रीराममंदीर तोडून तिथे मशीद बांधली यावर यांचा अजिबात विश्वास नसतो.(का ठेवावा?तोगडियानी सान्गितलेले सारे ब्रम्हसत्य?)
>>>>
विजयजी, ही गोष्ट सिद्ध झालेली आहे. बाबराने मंदिर तोडून मशीद बांधली या गोष्टीचा राग आहे. जर मूळ ठिकाणी मंदिर बांधले आणि मशीद दुसरीकडे बांधली तर नाही का चालणार?

Santu
Wednesday, June 13, 2007 - 11:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला

आता आपण तळपद्याचे विमान होत ते यशस्वि उडाले.
याचे सर्व पुरावे दिले पण इथले स्वयंघोषित प्राच्य विध्या संशोधकानी
अजुन ते उडाले नव्हते याचा एक तरी पुरावा देवुन दाखवावा.
उगिच फ़ुकाची बड्बड काय कामाची.


Zakki
Wednesday, June 13, 2007 - 12:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जेव्हा एखादा आमच्याकडे विमाने होती याचा पुरावा म्हणून एखादा लेख देतो तेव्हा अशी गोलमाल माहिती त्यात असण्याची अपेक्षा नसते. निदान माझी तरी.

हे बरोबर आहे शेंडेनक्षत्र, परंतू आता या मायबोलीवर सगळे पुरावे कुठून आणणार? पण त्यांना वाटले असेल, की तुम्हाला खरच सत्य जाणून घ्यायची इच्छा असेल, तर त्यांनी सांगितलेल्या दिशेने पहाल तर कदाचित् तुम्हाला आणखी काही मिळेल, म्हणून तेव्हढेच लिहीले. नि सांगितले की आहेत आणखी १००० श्लोक, तेंव्हा वाटले तर शोधा.



Gobu
Wednesday, June 13, 2007 - 12:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नन्दिनी,
जर मूळ ठिकाणी मंदिर बांधले आणि मशीद दुसरीकडे बांधली तर नाही का चालणार?
काय बोलते आहेस तु?
बाबरी मशीदीचा विध्वन्स आणि गोध्रा दन्गल या दोन्ही अतिशय चुकीच्या गोष्टी घडुन गेल्या आहेत
आता आणखी एक चुक कशाला?
(या दोन्ही चुका झाल्यात हे खुद्द अटलजीनी कबुल केले आहे, तात्पर्य या गोष्टीबद्दल वाद नको!)
नवीन मन्दीर जरुर व्हावे (आणि मशिदही!)
पण याबाबतचा निर्णय स्थानिक लोकानीच चर्चा करुन सोडवावा, हेच योग्य!


Chyayla
Wednesday, June 13, 2007 - 1:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शेन्डेनक्षत्रान्चा पन्चान्गावारचा राग आता माझ्या लक्षात आला... अरे ते पन्चान्ग हे एक नक्षत्र विसरुनच गेले होते (शेन्डेनक्षत्र) साहजिकच आहे हो राग येण समजु शकतो. असो माझाही तुमच्याबद्दल अजिबात राग नाही. V&C मधे असे होणारच... तुमचे पोस्टही ईतर पोकळ दाव्याच्या द्वारे केवळ विरोध करणार्यान्च्या पन्क्तित बसल्या होत्या त्यामुळे काही कमी जास्त बोललो असेल तर माफ़ करावे. या रामसेतुच्या वादाचा शेवट गोड झाला त्यातच समाधान.

जय श्रीराम!!!


Zakki
Wednesday, June 13, 2007 - 2:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या रामसेतुच्या वादाचा शेवट गोड झाला त्यातच समाधान.


नक्की शेवट झाला का?

पण ते सिनेमा, नाटकांची चर्चा वगैरे राहिलेच की.

नि एकदम कशी पोकळी निर्माण होइल हो इथे. काहीतरी चालू करा परत? काय बरे?


Vijaykulkarni
Wednesday, June 13, 2007 - 4:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विजय कुलकर्ण्यांच्या मते सोनिया गांधीसमोर लाळघोटेपणा करणे, सोनिया गांधी समोर शेपूट हलवून संघ परिवारावर भुंकणे आणि त्यांना अर्वाच्य शिव्या देणे, अतिरेक्यांना पाठिंबा आणि देशभक्तांची छीथू करणे, जातीयवाद आणि भ्रष्टाचाराचे समर्थन, मुस्लिमांचे लांगूलचालन, आणीबाणीला पाठिंबा, वृत्तपत्रातून खोट्या बातम्या देऊन अफवा पसरवणे इ. ढोंगी कृत्ये म्हणजे गरिबांच्या प्रश्नावर अहिंसक संघर्ष आणि यातच त्यांना सन्मान वाटतो
which of these things dod panaalaal surana, kumar saptarshee do?



Chyayla
Wednesday, June 13, 2007 - 6:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की, आता सगळ्यान्च एकमत आहे की रामसेतु तोडु नये भले कारण श्रद्धेचे, ऐतिहासिक व ईतर कोणतेही असो. आणी वाद तो तोडु नये यासाठीच होता. त्यात ईतर गोष्टीन्वर वाद झाला त्यात माझ्या लेखी सगळ्यात चान्गली उपलब्धी ही झाली की रामसेतु सोबत वैदिक विमानाची उत्क्रुष्ट माहिती मिळाली ही माहिती मला पण नव्हती. त्यासाठी सन्तुला खरच धन्यवाद द्यायला पाहिजे.

तुम्ही तर "वाद सन्तोशी" दीसता तुम्हाला वाद पाहिजे काय? बघु या अजुन एखादे उपटसुम्भ सायब (काळे ईन्ग्रज) आले तर करु या वाद रामसेतुवरच. नाहितर विजयराव आहेतच की. त्यान्च्यामुळे मायबोलीच्या V&C वर जान आहे. सध्या ते सतिश माढेकरानी दिलेल कोड सोडवत आहेत त्यामुळे ते गोन्धळले आहेत असे दाखवत आहेत पण त्यानाही माहित आहे आणी त्या लोकान्च्या उचापती सगळ्याना माहितीच आहे... तरी ते सुटले की तुमची कामना पुर्ण करायला येतिलच. नाहीतर घ्या तुम्हीच काही तरी सुरु करा


Zakki
Wednesday, June 13, 2007 - 6:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विजय कुलकर्ण्यांच्या मते सोनिया गांधीसमोर लाळघोटेपणा करणे, सोनिया गांधी समोर शेपूट हलवून संघ परिवारावर भुंकणे आणि त्यांना अर्वाच्य शिव्या देणे, अतिरेक्यांना पाठिंबा आणि देशभक्तांची छीथू करणे, जातीयवाद आणि भ्रष्टाचाराचे समर्थन, मुस्लिमांचे लांगूलचालन, आणीबाणीला पाठिंबा, वृत्तपत्रातून खोट्या बातम्या देऊन अफवा पसरवणे इ. ढोंगी कृत्ये म्हणजे गरिबांच्या प्रश्नावर अहिंसक संघर्ष आणि यातच त्यांना सन्मान वाटतो.

'विजयकुलकर्णि प्रवृत्ति' बाबतीत तुमचे म्हणणे खरे असेल, पण विजय कुलकर्णि व्यक्तिबद्दल असे काही लिहीणे योग्य नाही. त्यांनी बिचार्‍यांनी एव्हढेच म्हंटले की इथे दिलेल्या तुमच्या 'पुराव्यावरून' त्यांना काही वादातीत, निर्णयात्मक निष्कर्ष काढता येणार नाही. असे मला वाटते.

दिसताना अर्थात् असे दिसते की ते स्वत:चे काही मत मांडण्यापेक्षा, किंवा काही पुरावे देण्यापेक्षा, दुसर्‍याच्या चुका किंवा उणिवा काढण्यातच जास्त लक्ष देतात.

हे नेहेमीच लक्षात ठेवावे की, चुका काढलेल्या कुणालाच आवडत नाहीत. तुम्ही दुसर्‍याचे मत बदलू शकत नाही. सगळा पुरावा इथे हजर करता येणे कठिणच. जर उत्सुकता असेल तर आपले आपण पहावे संशोधन करून. नाहीतर आपल्या बाजूचे पुरावे, जमतील तितके, द्यावेत. शक्यतो व्यक्तिगत उल्लेख टाळावे.


Gobu
Wednesday, June 13, 2007 - 7:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला यान्ची वाक्ये पहा ह मित्रानो...
(1)शेन्डेनक्षत्र आता तुम्ही एक एक गोष्ट मान्य करायला लागलात. आता तुम्हाला तळपद्यानी विमान उडवले याचा अभिमान वाटतो शिवाय श्रद्धेचा प्रश्न म्हणुन रामसेतु तोडु नये हेही मान्य केलेत...
(2)तुमचे पोस्टही ईतर पोकळ दाव्याच्या द्वारे केवळ विरोध करणार्यान्च्या पन्क्तित बसल्या होत्या...
(3)या रामसेतुच्या वादाचा शेवट गोड झाला त्यातच समाधान...
(4)आता सगळ्यान्च एकमत आहे की रामसेतु तोडु नये भले कारण श्रद्धेचे, ऐतिहासिक व ईतर कोणतेही असो...
...

गमतीचा भाग असा की यातील एकही गोष्ट कुणीही मान्य केलेली नाही!
बाकी, हसुन हसुन पुरेवाट होते ह!
मित्रहो, स्थानीक लोकाना या सेतुचा तोटा होत असेल आणि तो तोडावा असे त्यान्चे मत असेल तर तो जरुर तोडावा!
यामध्ये धर्म आणु नये, राजकारण आणु नये आणि धर्माचे राजकारणही आणु नये!
केवळ देशहीत पाहीले जावे, आणखी काहीही नकोय!
झक्की, आता कळले ना, या मुद्द्यावर एकमत झालेले नाहीय
आणि कोणी कितीही बकवास केली तरीही ते सर्वमत समजु नये!


Chinya1985
Wednesday, June 13, 2007 - 7:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गोबु या page ची पहिलिच पोस्ट वाचली नाही का???त्यात शेंडेन नी मान्य केल आहे की रामसेतु तोडला जाउ नये.
स्थानिकांना सेतुचा त्रास होतो आहे हा नविन शोध आहे. स्थानिक मच्छिमारांनी सेतु तोडायला विरोध केला आहे


Deshi
Wednesday, June 13, 2007 - 7:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्थानीक लोकाना >>>>>>

हे कोण स्थानीक लोक म्हणे?

बामीया तोडताना अफगाणी लोकांना असाच त्रास झाला होता का?

आणि रामायन, राम सेतु ही बकवास

देशहित म्हणजे काय? तर त्या देशात राहनार्य लोकांचे हित. आता सर्व लोकांचे हित साध्य होत नसते असे ग़ृहीत घरले तर मग जे मेजॉरिटी उरतात त्यांचे हित साध्य झाले पाहीजे ना? मग बाकी सर्व लोक म्हनतात की तो तोडु नये तर म्हग देशहिता विरुध्द गोष्ट होत नाही का?

गोबु धर्मा पुढे देश वैगरे कल्पना झुट्या असतात याला सर्व देशातील ईतिहास साक्षि आहे. कितीही धर्म निरपेक्ष म्हनवले तरी सर्व जन धर्म निरपेक्ष नसतात, तेथील बहुसंख्य जनता ज्या धर्माचे पालन करते तो त्या देशाचा धर्म. आपल्या आजुबाजुला पाहा. ज्या देशात तु राहतो त्या देशाला कोणाचा देश म्हणुन ओळखले जाते ते पाहा. अगदी अमेरिकेला पण ख्रिश्चन देश म्हनौनच ओळखले जाते.

तुझे म्हनने योग्य आहे कीधर्म वेगळा व देश वेगळ पण अरे भाऊ असे माननारे बोटावर मोजन्या ईतकेच आहेत म्हणुन कोणी त्यांचे ऐकत नाही. नाहीतर ईराक युध्द्दला बुशराव ने क्रुसेड म्हनले नसते. त्यामुले या कल्पना आपन बाजुला ठेवु. वाद घालायला हे जरी चांगले वाक्य असले तरी त्याचा उपयोग काहीही नाही.

मी हे तुझ्या विरुध्द पोस्ट लिहीले नाही तर ते वाक्य पाहील्या मुळे मला ते लिहावे वाटले.




Deshi
Wednesday, June 13, 2007 - 8:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


आणि हे देशहित कोण ठरवनार?
राज्यकर्ते की जनता की आणखी कोणी?

बुश त्याचा देशहिता साठी दुसर्या देशाला वाटेला लावतोय मग त्याला तु समर्थन करशिल का? नाही ना?

म्हणून देश, लोक हे सर्व धर्मावरच जगत असतात. काही जण फनटिक असतात तर काही जण नसतात. पण मग कुनाला त्याचा धर्माचा (जो चुकुन भेटतो) त्याचा अभिमान असला तर काय झाले. मला ही माझ्या धर्माचा अभिमान आहे पन म्हणुन मी काही फॅनटीक नाही, ईथले कुनीच नसावेत. म्हनुनच आपण धर्माला देशा पासुन वेगळे काढु शकत नाही.

जगात भारत सोडला तर किती देश धर्मनिरपेक्ष आहेत? एकही नाही. धर्म निरपेक्ष म्हणुन आपल्या देशाची वाट लावली आहे असे मला वाटते. (मी फनटीक नसुनही). नाहीतर बर्याच जुन्या प्रश्नांची आपोआप वाट लागली असती जसे मंदीर मस्जीद वैगरे प्रश्न. पाक मध्ये मंदीर तोडायला कोणी विरोध केलेला मी ऐकले नाही. आपण पाक सारखे नाही आहोत ही जानिव आहे मला पण मग आपल्यात जर कट्टरवादी निर्मान झाले तर आपण तसे होऊ अशी भिती वाटते. गंमत म्हनजे जेव्हा (१९४२ ते ४८) हे सर्व होत होते तेव्हाच आपण हिंदु राश्ट्र म्हणुन घ्यायला पाहीजे होते कारण जिनानी नाराच असा दीला की त्यांना हिंदु स्थानात राहायचे नाही.

भारतीय सोडले तर सर्व मुस्लीम राष्ट्रे आजही भारताला हिंदोस्थानच म्हणतात. ही केवढी वोनादाची बाब म्हणायची.

म्हनुनच धर्माशिवाय देश ही कल्पना उअपयोगाची नाही कारन ती आयडीयल आहे.


Chinya1985
Wednesday, June 13, 2007 - 9:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विजयराव, हिंदुंनी गोद्रा घडवले, संसदेवर आडवानिंनि हल्ला करवला कश्मिरमधे सर्व नाही पण बरेच बोम्बस्फ़ोट लष्कर घडवते,निर्दोश मुस्लिमांना फ़ेक एनकाउंटर मधे मारले जाते असे तुमचे मत आहे हे समजले. सोनियाजिंचे लोकाभिमुक,धर्मनिरपेक्ष,राष्ट्रवादी सरकार खुपच चांगले असे तुम्ही म्हणता हेही कळले.
आता मला एक सांगा की याच कोन्ग्रेसाच्या काळात आजही दररोज कश्मिरमधे, आसाममधे, मणीपुरमधे बॉम्बस्फ़ोट होतात, निर्दोशांच्या हत्या होतात, एनकाउंटरमधे निर्दोश मारले जातात हे कसे????????
आणि हे सर्व होउनही कोन्ग्रेसचे सरकार लोकाभिमुक, धर्मनिरपेक्ष, राष्ट्रवादी कसे आहे हेही स्पष्ट करा???


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators