|
Slarti
| |
| Monday, June 11, 2007 - 3:13 pm: |
| 
|
>>>आता आपण शास्त्रीय संगीत व नाटक सिनेमे यांची चर्चा इथेच करू. त्याचा पण राजकारणाशी संबंध असतोच. जसे सरकारनामा हा चित्रपट.
झक्की, अगदी अगदी.
|
medhekar, extraordinary claims require extraordinary proofs.
|
वरती ज्या काही आकृती, बातम्यांचे उल्लेख केले जात आहेत ते तितकेसे ठोस वाटत नाहीत. बर्याचशा गोष्टींमधे स्युडो सायंटिफिक परिभाषा वापरली आहे. निदान पारा किंवा अन्य काय ते इंधन ऊर्जा कशी निर्माण करते, त्याने हवी तितकी लिफ्ट कशी मिळते ते तरी सांगा. त्याहीपेक्षा उत्तम म्हणजे आय आय टी चे एरोनॉटिकल विभाग वा अन्य सर्वमान्य संस्थेने (उदा. इस्रो) ह्यातील डिझाईने अभ्यासून ती चोख आहेत असा निर्वाळा देणे, शक्य असल्यास तशी मॉडेल विमाने बनवून वा सिम्युलेशन करून तपासून बघणे जास्त ठोस पुरावा देईल. पण तसे का होत नाही? तळपद्यांचे ग्लायडर हा एक अभिमानास्पद प्रयोग म्हणता येईल पण त्यातून वेदकालात विमान वाहतूक सर्वत्र होती असा निष्कर्ष काढणे ही फार लांबची झेप आहे. रामायण हे वेदकालाच्या आधी झाले का नंतर? रामायणात विमानाचा उल्लेख किती तपशीलात आहे? हे सगळे तंत्रज्ञान मागमूस न ठेवता नष्ट का झाले? भारताला भेट दिलेल्या कुठल्या चिनी, वा पाश्चात्य प्रवाशांनी विमानाची वर्णने लिहिली आहेत का? प्राचीन काळात भारताविषयी वर्णने लिहिणारे अनेक परदेशी प्रवासी झाले आहेत. त्यातूनच बरीच ऐतिहासिक गूढे उलगडली आहेत.
|
>>> medhekar, extraordinary claims require extraordinary proofs. अगदी बरोबर. तळपद्यांचे विमान उडाले नव्हते असा तुमचा दावा असेल तर तसं तुम्ही सिद्ध करायला पाहिजे. नुसत पोकळ दावे करून उपयोग नाही. तुम्ही 'केसरी'च्या कार्यालयात जा, जुने अंक शोधा आणि सिद्ध करा की अशी कोणतीही बातमी केसरीमध्ये आलेली नव्हती. म्हणजे तुमचा दावा आपोआपच सिद्ध होईल. तोपर्यंत तरी तळपद्यांचा विमान उडवण्याचा प्रयोग यशस्वी झाला होता यावर विश्वास ठेवावाच लागेल.
|
रामसेतूला 'रामसेतू' न म्हणता 'ऍडम्स ब्रिज' किंवा 'पूल-ए-महंमद' असे काहीतरी म्हणावे. म्हणजे मग तो तोडण्याचा प्रश्नच उपस्थित होणार नाही.
|
Chyayla
| |
| Tuesday, June 12, 2007 - 6:29 am: |
| 
|
सतिश माढेकर पुर्ण समर्थन, मला तर शेन्डेनक्षत्राचा स्वता:चा एकही मुद्दा त्यानी ठोसपणे सिद्ध करुन दाखवला नाही. केवळ कसेही करुन विमान उडालेच नव्हते असा आटापिटा चालवला आहे पण काय करणार त्यान्च्या दुर्दैवाने ते उडाले व मोठे दुख असे की केसरीनी नोन्दही घेतली. पण यान्चा पोकळ दावा सुरुच आहे. खरे म्हणजे ते त्यानाही जाणवल्याच दीसतय पण निव्वळ विरोधासाठी विरोध करायची खोड कशी जाणार बुवा मागल्या पोस्ट मधे काही प्रश्न विचारले होते त्याच उत्तर द्याल तर माझा आधुनिक विज्ञानाबद्दलचा द्रुष्टीकोण बदलेल व मला ते मान्य करायला कसचिही लाज वाटणार नाही. व तुमच्या सारखा केवळ विरोधासाठी विरोधही नाही करणार याची ग्यारन्टी .. ह आता बोला. अगदी खुले आवाहन तुमच्यासाठी. बर पन्चान्गाच काय? केदारनी म्हटल्याप्रमाणे वाचन, अभ्यास झाला असेल तर त्यान्च्या उत्तरान्ची वाट अजुनही पहात आहे. की ते पण नाय जमत? नसेल जमत तर नसत्या पोकळ बाता तरी मारु नका ही नम्र विनन्ती. बरे धार्मिक, ऐतिहासिक, सावट यान्चा अध्यात्मिक पैलुही झाला याशिवाय, सामरिक, भौगोलिक, राजकिय, सरन्क्षण महत्वाचे शिवाय असलेले उपलब्ध पर्याय.. असे बरेच मुद्दे बाकी आहेत तेन्व्हा वाट पहातोय की तरी एवढ सगळ असुनही सेतु का तोडावा? याचे काही तरी ठोस कारण कळण्यासाठी. त्यातला निदान एकतरी मुद्दा तुम्ही आतापर्यन्त खोडु शकला असता तर चर्चा पुढे नेता आली असती.
|
>>> सतिश माढेकर पुर्ण समर्थन, मला तर शेन्डेनक्षत्राचा स्वता:चा एकही मुद्दा त्यानी ठोसपणे सिद्ध करुन दाखवला नाही. केवळ कसेही करुन विमान उडालेच नव्हते असा आटापिटा चालवला आहे पण काय करणार त्यान्च्या दुर्दैवाने ते उडाले व मोठे दुख असे की केसरीनी नोन्दही घेतली. पण यान्चा पोकळ दावा सुरुच आहे. खरे म्हणजे ते त्यानाही जाणवल्याच दीसतय पण निव्वळ विरोधासाठी विरोध करायची खोड कशी जाणार बुवा विजय कुलकर्णी ही व्यक्ती नसून प्रवृत्ती आहे. भाई वैद्य, कुमार केतकर, कुमार सप्तर्षी, पन्नालाल सुराणा इ. अशाच प्रवृत्तीची उदाहरणे. भारताच्या इतिहासात जे काही लिहीले आहे ते थोतांड आहे असा यांचा ठाम विश्वास असतो. मात्र अहिंदूंचे सगळे दावे ह्यांना खरे वाटतात. बाबराने श्रीराममंदीर तोडून तिथे मशीद बांधली यावर यांचा अजिबात विश्वास नसतो. मुळात श्रीरामायण हे थोतांड आहे अशीच यांची श्रद्धा असते. पण श्रीराम कसा अन्यायी होता, त्याने सीतेवर कसा अन्याय केला अशा रामायणातल्या गोष्टींवर हे कायम लेख लिहीतात. जर श्रीरामायण हे थोतांड असेल तर सीतेची कथा सुद्धा खोटी असली पाहीजे हा सारासार विचार यांच्या डोक्यातच येत नाही. मुख्य म्हणजे मुसलमानांना चुचकारले, भाजपवर टीका केली म्हणजे आपण पुरोगामी, विचारवंत, बुद्धिवादी ई. समजले जाऊ अशी यांची ठाम समजूत असते. ही मंडळी रा.स्व.संघ आणि लष्कर-ए-तोयबा यांना एकाच मापाने मोजतात. ग्रॅहम स्टेन्सचा खून करणार्या दारासिंगला फाशी द्यायला यांचा पाठिंबा असतो, पण अफजल गुरूला फाशी देणे म्हणजे मानवतेविरुद्धचा अपराध आहे असा यांचा प्रचार असतो. यांना विशेषतः मुस्लीम अतिरेक्यांबद्दल अतिशय कळवळा वाटतो. गोध्रा येथे रेल्वेच्या डब्याला लावलेली आग, संसदेवरील हल्ला, काश्मीरमध्ये आजवर झालेली सर्व हत्याकांडे इ. हिंदूंनी आणि भारतीय लष्कराने घडवून आणले असा तद्दन खोटा प्रचार हे करत असतात. दुर्दैवाने अशा भोंदूंची संख्या भारतात खूप जास्त आहे.
|
शेन्डेन, रामायण वेदकालीन आहे. तेही मान्य नसेल तरी ठिक. रामायण एक मिनिटासाठी सोडा.फ़क्त एवढच सांगा की तळपद्यांच्या वेदिक ग्रंथांच्या अभ्यासातुन विमान बनले आणि उडाले यावरुन प्राचीन भारतात विमाने उडत होती हे सिध्द होते अथवा नाही??? इस्रो वगैरे लोक निर्वाळा देउन त्यांनी विमाने बनवली तर ते विश्वासार्ह हा आग्रहही चुकिचा. ए.पी.जे. अब्दुल कलामांच्या आत्मचरित्रात त्यांनी लिहिल आहे की एक यंत्र (बहुतेक हॉवर्क्राफ़्ट ) त्यांनी बनवले होते पण नंतर ते यंत्र वापरले गेले नाही. आज तेच यंत्र भारत परदेशातुन आयात करतो.याचा अर्थ असा नाही की कलामांनी ते यंत्र बनवलेच नव्हते
|
Santu
| |
| Tuesday, June 12, 2007 - 11:18 am: |
| 
|
चिन्या झोपेच्या सोंग घेतलेल्या माणसाला जागे करता येत नाहि. गोबु उर्फ़ विजय तुमचे बकवास मत))))हे तुमी कसे ठरवाणार अरे. काही पुरावा देता आला नाहि तर लगेच अस काहितर बोलुन बाजु मारुन नेणार. तुम्ही लोकानी बकवास निरर्थक पोकळ ई ई विचाराचा रतिब घातलाय त्याची काय वाट. आहो सुधरा जरा ))) अरे तुम्हिच जरा सुधरा. काहितरी पुरावा देवुन वाद घाला. शेन्डे नक्षत्र आक्रुत्या बातम्या ठोस वाटत नाहि)))) म्हनजे काय हे भोंगळ विधान झाले. अरे मी मागच्या पोस्ट मधे लिन्क दिलिय ते भारद्वाजाचे english भाशांतर वाचा. विमान उडाले ना तळपद्याचे. हे तर खोटे नाहि ना.केसरीत जावुन पहा. तळपदे first airoplane maker अस टाईप करुन गूगल मधे शेकडो लिन्का मिळतील. मग आता काय अजुन पुरावा द्यायचा.
|
Chyayla
| |
| Tuesday, June 12, 2007 - 3:08 pm: |
| 
|
धन्यवाद सन्तु, तुमच्या अभिप्राय व ठोस पुराव्याबद्दल, माढेकर अगदी बरोबर बोललात तुम्ही तर एकाच पोस्ट मधे चपखलपणे ही प्रवृत्ती मान्डलीत. कॉन्ग्रेसी राजवट त्यान्चे समाजद्रोही राजकारण आपसात भान्डणे लावण्याचे प्रकार, जातियवाद परत एकदा समोर आला पण मिडिया मात्र नेहमीप्रमाणे कमालीचे मौन बाळगुन आहे हा त्यान्चा दुट्टप्पीपणा. १) सच्चर समिती द्वारे, मुस्लिमाना आरक्षण याद्वारे मुस्लिमान्चे लान्गुलचालन तेही धर्माच्या आधारावर २) जाति आधारित आरक्षण त्याद्वारे जतियवाद पसरवण्याचा प्रयत्न ३) पन्जाबातील सत्ता गेली मग आता डेरा सच्चाला हाताशी घेउन उफ़ाळलेला सन्घर्श या डेरा सच्चाने कॉन्ग्रेसला साथ दीली होती, पन्जाब सारखा प्रान्त शान्त असुनही त्यातही जातिय तणाव करण्याचा प्रयत्न आताच पाहिला. ४) गुजरात मधले शहाबुद्दीन प्रकरण त्याद्वारे गुन्हेगार, दहशतवादी याना समर्थन देण्याचा आटापिटा. एवढा आटापिटा आम आदमीसाठी निघाला असता तर? ५) सगळ्यात ताजे उदाहरण राजस्थान मधे गुज्जरान्ची आरक्षणाची मागणी त्यासाठी झालेली हिन्सा त्यामागिल खलनायक सचिन पायलट यानी आधी निर्लज्ज पणे समर्थन दीले पण जेन्व्हा ते आन्दोलन ईतर कॉन्ग्रेसशासित राज्यात पसरल्याबरोबर तसेच मिणा समाजाने दीलेल्या प्रत्युत्तरामुळे डोळे उघडावे लागले. ६) ताज्या घडामोडीत क्वात्रोची मामा सुट(व)ला शेवटी ह्या क्लुप्त्या दुधारी आहेत, त्यान्च्यावरही उलटणारच. पण समाजात कटुता निर्माण व्हायची ती तर निर्माण झालीच ना शिवाय या जखमा भरायलाही तितकाच वेळ लागतो. पण हे सगळे प्रकार का केल्या जातात हे सुज्ञास सान्गण्याची गरज नसावी.
|
फ़क्त एवढच सांगा की तळपद्यांच्या वेदिक ग्रंथांच्या अभ्यासातुन विमान बनले आणि उडाले यावरुन प्राचीन भारतात विमाने उडत होती हे सिध्द होते अथवा नाही??? य्लाच म्हनतात सुतावरून स्वर्ग
|
रामायणात विमानाचा उल्लेख किती तपशीलात आहे? हे सगळे तंत्रज्ञान मागमूस न ठेवता नष्ट का झाले? तंत्रज्ञान नष्ट होन्याचे कारण हे मोखीक पध्दतीने ज्ञानाचा प्रसार असु शकते. नंतरच्या काळात कदाचित शिकविनार्या लोकांनी ते ज्ञान पुढे शिकविले नसेल कारन तेव्हा लिहीने ही प्रक्रीया न्हवती. भारताला भेट दिलेल्या कुठल्या चिनी, वा पाश्चात्य प्रवाशांनी विमानाची वर्णने लिहिली आहेत का? प्राचीन काळात भारताविषयी वर्णने लिहिणारे अनेक परदेशी प्रवासी झाले आहेत. त्या काळात भारतात तसे प्रवासी आले असतील का? (पाश्चात्य, कारण तेव्हा ते आपल्य एवढे प्रगत न्हवते हे निदान हडप्पा वैगरे संस्कृतीने दिसुन येते). परत तुम्ही म्हणताय की ते लिहीले का न्हवते. तर लिहीने ही प्रक्रीया तेव्हा न्हवतीच नाही का? पुढे आलेल्या चिनी प्रवाश्यांनी भारता बद्दल बरेच काही चांगले लिहीले आहे. मुळात चिनी प्रवासी हे भारतात बोध्द धर्माच्या उदयानंतरच यायला सुरु झाले आणी रामायन काल हा त्या आधी च्या होता. तक्षशिला व नालंदा विद्यालयात जे शिक्षन मिळत होते त्याची नोंद आहे. ती आपण बघावी, आपल्याला आश्चर्य वाटेल अशा विशयंवर संशोधन केले जाते असे चिनी प्रवाशांनीच लिहीले आहे. प्रश्न उरतो तो रामयना कितीदा उल्लेख आहे याचा तर तो उत्तरखंड सुरु होन्या आधी दोनदा आहे. १. रावन सितेला आकाशमार्गाने पळवुन नेतो तेव्हा व २. राम युध्द जिंकुन वापस येतो तेव्हा. उत्तरखंडा नंतर तसा उल्लेख नाही. आधी विमान प्रवास सर्वत्र होता असे राम सेतु च्या बाजुने मत मांडनार्यानी कधी म्हनलेले आठवत नाही.
|
कसला सुतावरुन स्वर्ग?????अहो जर वेदकालिन विमाने ही कवीकल्पना होती तर मग त्यांनी दिलेल्या पद्धतिने विमान बनलेही नसते आणि उडालेही नसते. ज्याअर्थी ते बनले आणि उडाले त्याअर्थी ती पध्दत बरोबर होती, आणि त्या अर्थाने पुर्वी विमान बनले होते.जर ते बनलेच नसते तर त्यांनी पध्दत लिहिलिच कशी???? आणि विमान न बनवता जर अचुक पध्दत त्यांनी लिहिली असेल तर ते फ़ारच genius असले पाहिजेत नाही का???रसायनशास्त्रातिल पुस्तकातिल reactions जर आपण घरी करुन पाहिल्या तर त्या बरोबर निघतात.का???कारण त्या पध्दतिचे प्रयोग रसायनशाळेत यशस्वी झालेले असतात. आणि त्यांच्या यशानंतरच ते पुस्तकात छापले जाते. समजा, तुम्हाला कोणीतरी पुस्तक दिले. त्यात एखादे यंत्र कसे बनवायचे असे दिलेले आहे. तुम्ही ती procedure follow केली आणि यंत्र बनले तर त्याचा अर्थ असा होत नाही का की त्या लेखकाने ते यंत्र पुर्विच बनवले होते???यंत्र न बनविताच ते बनवण्याची procedure कोणी लिहुच कशी शकेल???जरा लॉजिक लावा!!!
|
http://www.indiadivine.org/audarya/vedic-culture/190078-ancient-hindus-could-navigate-air.html ह्या पानावरचा लेख वाचला. परंतु ह्यात अनेक गोष्टी गोलमाल लिहिलेल्या आहेत. सुरवातीला हायड्रोजनवर चालणार्या बलूनचा उल्लेख वरवर तरी शास्त्रशुद्ध वाटतो. पण वीज कशी बनवली जायची, हायड्रोजन बलूनमधे कसा भरका जायचा, बलून कशाचे अनवायचे ह्याबद्दल काही नाही. नंतर चक्क अमक्या युगात विमाने मंत्राने उडायची असा उल्लेख आहे. हे अगदीच कायच्या काही. नंतर निव्वळ असे उल्लेख की १०० श्लोक अमकी माहिती देतात, ५००० श्लोक तमकी. पण माहितीचा पत्ता नाही. नुसते अभेद्य, अछेद्य, अदाह्य असले शब्द. हे शब्द बनवणे सोपे आहे. पण विमानाला असे बनवणे महाकठिण. कुठल्या धातूंवर काय प्रक्रिया केली जाते, कसलाही पत्ता नाही. आज आपल्याला आधुनिक विज्ञान बर्यापैकी कळते. ही प्राचीन वर्णने खरी असतील तर त्याचे वर्तमान विज्ञानात अनुवाद करणे अवघड नसावे. पण ह्या लेखात नुसते गोलमाल काहीतरी लिहिले आहे. आमच्याकडे सगळे काही लाखो वर्षापूर्वीच होते अशी ज्याची निस्सीम भक्ती असेल त्यालातिला हे सगळे तर्ककठोर व शास्त्रीय वाटेलही. मला वाटत नाही. पुन्हा एकदा माझे असे म्हणणे की सर्वप्रथम कुण्या संस्कृत व तंत्रज्ञान जाणणार्याने ह्याचा आधुनिक विज्ञानाच्या परिभाषेत अनुवाद करावा. कुठल्यातरी नामवंत संस्थेत (म्हणजे सनातन धर्म संस्था नव्हे तर ए डी ए, आय आय टी, इस्रो वा फार उंच झेप असेल तर नासा) हे डिझाईन तपासून घ्यावे. शक्य असल्यास खरोखरची प्रतीकृती बनवावी. निव्वळ १०० वर्षापूर्वीच्या (तळपदे) प्रयोगाला डोळे मिटून स्वीकारू नये. कारण त्याचीही पुरेशी महिती नाही. हे झालेच तर मग आधुनिक विज्ञान ह्या गोष्टीचा स्वीकार करु शकेल की प्राचीन काळात आमच्याकडे विमाने होती. तळपद्यांचे विमान त्या काळात कौतुकास्पद असले तरी ते अगदीच प्राथमिक अवस्थेतले होते. त्याच्या जोरावर वेदकाळात विमाने सर्रास उडत होती असे म्हणणे चुकीचे आहे.
|
Chyayla
| |
| Tuesday, June 12, 2007 - 10:24 pm: |
| 
|
तळपद्यांचे विमान त्या काळात कौतुकास्पद असले तरी ते अगदीच प्राथमिक अवस्थेतले होते प्रथमावस्था (तुमच्या समजुतीने) निदान तेवढे तरी होते... काही का असेना, याचा अर्थ असा की विमान ही कल्पना नव्हती तर सत्य होते, बास्स... हेच तर आम्ही म्हणतोय राजा तुम्हाला खरोखरच विज्ञान प्रयोग म्हणजे काय याची माहिती असती तर "प्राथमिक अवस्था" हा शब्दप्रयोग नसता वापरला. ते पुर्ण विकसित विमान नव्हतेच व त्याकडुन तसली अपेक्षाही नव्हती. तर ते होते केवळ प्रारुप ( Model ). तरी या Model मुळे सुद्धा विमानाच महत्व तसुभरही कमी होत नाही. तुम्ही स्वता:ला विज्ञानवादी म्हणवता निदान तुमच्याकडुन विज्ञान प्रयोगाचे किरकोळ ज्ञानही नसावे ही अपेक्षा नव्हती. एकन्दरीत तुमचाच विज्ञानाचा अभ्यास हा प्राथमिक स्वरुपाचाही नाही हे तुम्हीच सिद्ध केले. आणी इस्रो ने नासाने कोणीही सन्शोधन करो स्वागतच आहे त्याला कोण अडवतय? आणी ईथेही कोणी विरोध केल्याच दीसत नाहिये.
|
अगदी बरोबर च्यायला!!!तळपद्यांनी एकच विमान बनवले, लगेच ते perfection होते असे आम्हिही म्हटले नव्हते. नासा इस्रो यांनी जरुर संशोधन करावे.विमाने सर्रास उडत होती असेही म्हटले नव्हते विमाने होती का नव्हती असा प्रश्न केला आहे. जर ती नव्हती तर तळपद्यांचे विमान उडालेच कशे??? आणि तुम्ही जी लिंक गोलमाल म्हणता आहात तो एक लेख आहे. त्यात काही procedure दिलेली नाही.तुम्हाला जर त्यात रस असेल तर तुम्ही स्वत्: या ग्रंथांचा अभ्यास करा. आधुनिक विमान कसे बनवायचे याची procedure पण तुम्हाला अशी कुठे एका लेखात मिळणार नाही. तुम्हला जर फ़ारच उत्सुकता असेल तर तुम्ही अभ्यास करा या ५००० श्लोकांचा.
|
Zakki
| |
| Tuesday, June 12, 2007 - 10:30 pm: |
| 
|
ह्या पानावरचा लेख वाचला. परंतु ह्यात अनेक गोष्टी गोलमाल लिहिलेल्या आहेत अहो पण असे एक लेख वाचून सगळी माहिती मिळते का? बालवर्गापासून कॉलेज संपेपर्यंत गणिताची, भाषेची, शास्त्राची किती पुस्तके वाचलीत तेंव्हा तुम्हाला काही गोष्टींचे ज्ञान झाले? मग सगळे एका लेखात किंवा एका पानात वाचून कळणार नाही. जेंव्हा असे दिसते की पूर्वी लोकांना हे काहीतरी माहित होते तर जुन्या आणखी खूप पुस्तकांचा शोध लागायला नको का? तो कोण लावते आहे का? आणि सर्रास म्हणजे किती? १९६० साली नागपूरहून फक्त चार विमाने उडत एका रात्री. कधी कधी एखादे विमान येतच नसे. लोकसंख्या तरी किती होती? रामासारखे लांब पल्ल्याचा प्रवास करणारे किती होते? त्यांना किती विमाने लागत असतील? त्या प्रत्येक विमानाची माहिती कशी अश्या एखाद दोन लेखावरून कळेल? तर आधी या संबंधी पूर्ण माहिती मिळेस्तवर बाकीचे सगळे Conjecture . जसे अगदी black hole नि इतर गोष्टी यांचे आधी नुसते Conjecture केले. अणूरचना हे हि केवळ गणिताने केलेले conjecture . त्यावर बरेच संशोधन झाले तेंव्हा जरा जरा विश्वास बसेल असे शास्त्र तयार झाले. ते समजायला किती डझन पुस्तके नि लेख वाचावे लागतील तेंव्हा तुम्हाला सुरुवातीपासून आत्तापर्यंतची माहिती मिळे? नि तोपर्यंत तुम्ही अणू रचना, इ. गोष्टी मानणार नाही का?
|
Zakki
| |
| Tuesday, June 12, 2007 - 10:51 pm: |
| 
|
मला पण भारताबद्दल अभिमान आहे. भारतीयांनी हजार वर्षापूर्वी बरीच प्रगति केली होती यावर विश्वास आहे. मलाहि हिंदू धर्माबद्दल नितांत श्रद्धा आहे. एकच चुकते! गेल्या हजार वर्षात तर सोडा, पण गेल्या शंभर वर्षात सुद्धा जागे राहून आपला धर्म सांभाळणे, आपल्या धर्मातील ज्या गोष्टींबद्दल आपल्याला अभिमान वाटतो, तीव्र भावना आहेत ते सर्व रक्षण करणे यादृष्टीने काऽहीहि प्रयत्न केले नाहीत. नुसते आपले म्हणायचे आम्ही ना ग्रेट! मग करा की जरा संशोधन, काढा ते सगळे हरवलेले शोधून. नुसते एक लेख घेऊन त्यावरून आम्ही एकदम ग्रेट होतो असे कुणि कट्टर हिंदू देखील मानणार नाहीत. नुसते कुणि सेतू मोडतो म्हणाले की हे जागे होणार नि फुकटची बोंबाबोंब करणार. अगदी स्वातंत्र्यापूर्वीपासून मुसलमानांकडून आपल्या धर्माला, धार्मिक गोष्टींना धोका आहे हे माहित होते. कुणि काय केले त्याच्याबद्दल? काही नाही. आता कुठली तरी जुनी पुराणी बाबरी मशिद पाडून तिथे म्हणे देवाचे मंदिर बांधणार!! माझी खात्री आहे, जरी ते मंदीर बांधले तरी पाच वर्षात ते इतके घाणेरडे बनेल (कारण त्याची व्यवस्था, स्वच्छता कोण करणार? ) की पुन: तिथे कुणि जाणार नाही. मग पुन: आपल्या मुसलमानांचे कुत्रे असलेल्या, हिंदूंचे कट्टर शत्रू असलेल्या पुढार्यांनी ते पाडून तिथून रस्ता काढतो, किंवा तिथे चर्च बांधतो म्हंटले की मग हे सगळे पुन: बोंबाबोंब करायला तयार!! हिंदूंची म्हणे मेजॉरिटी आहे, मग हे असले सडके लोक का तुमचे नेते? असे म्हणतात, लोकशाहीत तुमच्या लायकीप्रमाणे तुम्हाला नेते लाभतात. ते जितके खराब त्याहून त्यांना बहुमत देणारे तुम्ही खराब! असल्या लोकांचे कधीहि कुणि ऐकणार नाही, त्यांना कुणि किंमत देणार नाही. सेतूबद्दल हिंदूंनी गेल्या शंभर वर्षात काय केले? एव्हढा आदर, नि भावना होत्या तर काही त्याच्या देखभाली साठी काय केले? आम्ही काही करणार नाही, नि तुम्हीहि काही करायचे नाही अशी भूमिका घेतलीत तर तुम्हाला कुणि जगात काय भारतातले हिंदू पण विचारणार नाहीत!! नि ते इथे दिसतेच आहे.
|
Nanya
| |
| Wednesday, June 13, 2007 - 1:28 am: |
| 
|
झक्कीकाका खरे बोललात अगदी. एकदम पटेश.. BTW ते ताज महाल पण मंदीर होते असे म्हणतात आणी एका पुस्तकात त्याचे खंडीभर पुरावे पण दीले आहेत. कोणि खरेच ते पुस्तक वाचले आहे का? किंवा ताज महाल पाहिला आहे का हे पुरावे वाचल्यानंतर? त्या दाव्यामध्ये कितपत तथ्य आहे? रामसेतूला 'रामसेतू' न म्हणता 'ऍडम्स ब्रिज' किंवा 'पूल-ए-महंमद' असे काहीतरी म्हणावे. म्हणजे मग तो तोडण्याचा प्रश्नच उपस्थित होणार नाही. हे १००% पटले.. कारण मग तो bridge secular होतो..
|
**** अहो पण असे एक लेख वाचून सगळी माहिती मिळते का? जेव्हा एखादा आमच्याकडे विमाने होती याचा पुरावा म्हणून एखादा लेख देतो तेव्हा अशी गोलमाल माहिती त्यात असण्याची अपेक्षा नसते. निदान माझी तरी. विमानाच्या माहितीत कुठले धातू वापरले जात, कुठले इंधन, ऊर्जा कशी बनते असे काही असायला हवे. अमक्या ग्रंथात अमक्या धातूचा उल्लेख आहे. तो म्हणजे आज आपण ज्याला तमका म्हणतो तो धातू वा अलॉय असे काहीतरी. विमान अभेद्य बनवयला अमका धातू वा पदार्थ, अदाह्य करायला अमका पदार्थ असे काही दिलेले नाही. नुसते १००० श्लोक असे वर्णन करतात २००० श्लोक तसे वर्णन करतात असे पोकळ वर्णन कशाला? अमक्या युगात मंत्र म्हटले की विमाने उडायची असले विधान बघितले की ह्या लेखाची लायकी कळते. लाखो की हजारो वर्षापूर्वी आमच्याकडे विमाने होती असे काहीच्या काही धाडसी विधान करायचे तर त्याला भक्कम पुरावा पाहिजेच. कारण बाकीचे जग तेव्हा ह्या तंत्रज्ञानापासून खूप मागे होते असे प्रस्थापित पुरावे सांगतात. इतके धाडसी विधान करायला सकस पुरावा हवा. नुसते गोलमाल नको. ज्यांना हे सगळे होते ह्याची आधीच खात्री आहे त्यांनी असले निरर्थक लेख पुरावे म्हणून देण्याऐवजी कुठल्याशा नामवंत संशोधन संस्थेला संबंधित मूळ साहित्य योग्य त्या तपशीलासकट द्यावेत आणि आपले नाणे चोख आहे असे सिद्ध करवे. अन्यथा तसे काही नव्हते म्हणणार्यांचेच पारडे जड आहे. तळपद्यांच्या विमानाविषयी इतकी त्रोटक माहिती आहे की कुठलेसे प्राथमिक विमान की ग्लायडर काही मिनिटे उडाले आणि कोसळले एवढेच थोडेफार सिद्ध होते. त्यात वैदिक ग्रंथांचा किती सहभाग होता नी तळपद्यांची कल्पकता किती हे सगळे गौडबंगालच आहे.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|