|
कुलकर्णी त्या पुढचे वाक्य वाचा. (त्याचा पत्रीके वर काय परीनाम होतो ते ........ ) आधी तुम्ही ते पुस्तक वाचा पाहु, मग आपण त्या वर बोलु. राहु आणि केतु हे खर्या अर्थाने ग्रह माणले जात नाहीत. ती सुर्य व चंद्र यांच्य भ्रमनातील एक स्तिथी आहे. जर वैज्ञनीक अर्थ लावायचे असतील तर पृथ्वी, चंद्र व सुर्य यांचे भ्रमन ह्यावर पुस्तक वाचावीत. अहो तुम्ही जरा त्या शास्त्राचा अभ्यास करा मग त्यावर आपण बोलु. मी असे म्हणत नाही की पोथात लिहीलेल सर्व खर आहे पण जे आज खर आहे असे वाटु शकत त्याला तरी हो म्हणा की. जसे त्या विमानाच्या प्रतीकृत्या, ते ग्रंथ ईंग्रजानी भाषांतरीत केले आहेत, तुम्ही नी मी नाही म्हणुन ईंग्रजी वाक्य, शब्द, येतील असे वाटते.
|
good that we got the diagrams. can we send these aeroplane design to IIT mumbai dept of Areodynamics? they can figure out whether this will fly. This might be a good BTech project. using mercury as fuel looks incredible.
|
Santu
| |
| Sunday, June 10, 2007 - 4:29 am: |
| 
|
कु लकर्णी अरे म्हराठित लिही ना.
|
Santu
| |
| Sunday, June 10, 2007 - 4:37 am: |
| 
|
मराठमोळी हि सर्व माहिति सुषमा लोन्ढे यांच्या या साईट वर मिळेल http://hinduwisdom.info/index_new.htm या साईट वर वैदिक विमान म्हणुन वेगळा सेक्शन आहे.
|
Deshi
| |
| Sunday, June 10, 2007 - 6:09 am: |
| 
|
using mercury as fuel looks incredible>>>>> You missed the whole point dude. These designs are not just for using murc as fuel but they are just designs and we do not know what fuel they used. May be you can try one using some diff. fuel like hydro or Nitro or even white fuel.
|
Gobu
| |
| Sunday, June 10, 2007 - 10:11 am: |
| 
|
ही विमानाची चित्रे म्हणजे अतीरन्जीत कल्पना आहे, त्यात शास्त्रीय काहीही नाही त्रिपुर विमानाच्या वरच्या भागात ईलेक्ट्रीक पॉवर जनरेटर दाखवला आहे, हे तर अगदीच हास्यास्पद! आणि पारा याचा ईन्धन म्हणुन वापर हे तर अगदी अगदी... सावट, तुमचे मत पटले हो आपल्याला, आणि हो बिन्धास्त लिहा! विजयभाऊ, योग्य लिहीलेत, पुर्ण अनुमोदन!
|
Santu
| |
| Sunday, June 10, 2007 - 11:40 am: |
| 
|
विजय उर्फ़ गोबु तु बर्याच उशीरा जागा झाला वाटते
|
Saavat
| |
| Sunday, June 10, 2007 - 12:53 pm: |
| 
|
>>>त्यान्च्या गुरुन्नीच त्याना त्यान्च्या अध्यात्मिक तेजाचा उपयोग राष्ट्रकारणार्थ, समाजाच्या भल्यासाठी परत पाठवले व तशी आज्ञा दीली व त्यान्नी सुद्धा गुरुची आज्ञा मानुन स्वता:चा मोक्ष साधण्याचे स्वार्थ सोडुन राष्ट्रकार्यासाठी जीवन वेचले आहे. तेन्व्हा समाजकारण, राजकारण आणी समाज, राष्ट्र यान्च्या भल्यासाठी अध्यात्मिक बैठक असु शकते हे लक्षात घ्या. च्यायला, तुम्ही मांडलेला हा मुद्दा महत्त्वाचा आणि योग्य असल्यामुळे, आपण अजून खोलवर पाहू, कारण संतुंनी मला विचारलेल्या प्रश्नाच उत्तरही यातच आहे. हिंदूवैदिक तत्वज्ञानानुसार, मनुष्य जन्माचे सर्वोच्च ध्येय आहे, फ़क्त आणि फ़क्त ’मोक्षच’. आता हा मोक्ष मिळवण्याचे मार्ग ज्ञानयोग,कर्मयोग आणि भक्तियोग तात्विकदृष्ट्या वेगळे वाटले तरी, ते मुलत: एकच आहेत. श्रीकृष्णांनी, श्रीमद्भगवतगीते मध्ये पार्थास, कर्मसन्यास न घेता, कर्मयोगी होण्यास उपदेश केला. आपल्या भारतवर्षाला, आजच्या काळात सर्वात जास्त निकड कुणाची आहे, तर या कर्मयोग्यांची.(हे संतुंच्या प्रश्नाचे उत्तर आहे.) कर्मयोगी म्हणजे, ’जो प्रारब्धा’ नुसार वाट्याला आलेली कर्तव्यकर्मे सचोटीने-प्रामाणिकपणे पार पाडतो, आणि ते कर्म, त्याच्या फ़ळासहीत, परमेश्वरास अर्पण करतो. म्हणजेच कर्मफ़लात आसक्ती न ठेवता, जो कर्म करतो, तोच कर्मयोगी. असा कर्मयोगी, हा जिवंतपणीच ’मोक्ष’ पावलेला असतो, मुक्तात्मा असतो. कारण कर्मात आसक्ति नसल्यामूळे, त्याच्या कर्मफ़ळापासून, भोगण्यापासून तो मुक्त असतो.अस कर्म तो धर्माला अनुसरुनच करत असतो. (छ्त्रपति शिवाजीराजे हे ’कर्मयोगी’ होते) अशा कर्मयोग्याची कर्मे, भले ती स्वत:करिता असुदेत, समाजाकरिता असुदेत किंवा अखिल मानव जातीकरिता असुदेत, ती कायम त्या त्या वेळच्या, वेगवेगळ्या परिस्थितील लोकांचे भले करणारीच होत असतात.कारण आपण आपल काम जेव्हा त्याच्या मोबदल्यानुसार ठरवून करतो, त्यावेळेस त्या कामात-कर्मात न्यून्य आपसुकच येते, पण ज्यावेळी कर्म परिणामाची-फ़ळाची काहीच अपेक्षा नसते,त्यावेळी ते काम आपल्याकडून पुर्ण शक्तीने, सर्वसमावेशक बुद्धीने, धर्माच्या सांगण्यानुसार चांगले असणारेच होते. याच्या पुष्ट्यार्थ चिन्मय यांनी जे लिहलय ते ही पाहू, >>>त्यांच्या मते तुम्ही एकतर देवाचे सेवक असता नाहितर मायेचे सेवक असता.माया सुध्दा देवाचिच एक शक्ती आहे त्यामुळे तुम्ही जर मायेचे सेवक असाल तरी तुम्ही indirectly देवाचे सेवक असता. वैदिक तत्वज्ञानानुसार, मुळ परब्रम्ह हे निराकार, निर्गुण, निष्क्रिय आहे. या परब्रम्हाच्या संकल्पाने, शक्तीची निर्मिती झाली आणि ही सृष्टि निर्माण झाली. परमेश्वराने जरी हा सृष्टि निर्माण करण्याचा संकल्पकेला असला तरी शक्ती-चैतन्याशिवाय संकल्प पुर्णत्त्वास जाणे शक्य नव्हते, कारण संकल्पानुसार, planning नुसार काम करणे हे शक्तिचे कार्य आहे, तर मुळ परब्रम्ह हे कार्य रहित आहे. संत-गुरु हे परमेश्वराचे रुप आहेत, तर कर्मयोगी हे शक्तीरुपी आहेत. कोणताही सतसंकल्प जर सिद्धीस जावयाचा असेल तर दोन्हीही जरुरी आहे. >>>मुर्तिपुजा फ़ालतु वाटायची पण सुक्ष्म विचार केल्यावर अध्यात्मिक उन्नतिसाठी प्रतिमा, मुर्तिपुजा यान्चे महत्व त्याना पटले. >>>तुम्ही मानाल अथवा नाही मात्र भक्ती मार्गानेही मोक्ष मिळवता येतो. भक्तियोगात, सगुणा पासून सुरवात करून, शेवटी अद्वैत साधायचे असते.त्यामूळे मुर्तिपूजा,नामस्मरण हे गौण नसून, सध्याच्या काळात सर्वोत्तम मार्ग आहे. असो, श्रीरामाचा सेतु, तोडून टाकावा, हे सांगण्याची माझी पात्रता नाही, लायकी नाही. पण ’सेतु’ ठेवण्यामागचा हेतू-निर्णय हा कर्मयोग्याचा असावा. तो एखाद्या धर्मांधमाथेफ़िरूचा नसावा, ज्याला खरा धार्मिक(आध्यात्मिक) मनुष्य कोणाला म्हणायचे, याचे यथार्थ ज्ञान नाही, असे प्रामाणिकपणे वाटते. धन्यवाद!
|
Chyayla
| |
| Sunday, June 10, 2007 - 1:49 pm: |
| 
|
श्रीरामाचा सेतु, तोडून टाकावा, हे सांगण्याची माझी पात्रता नाही, लायकी नाही. पण ’सेतु’ ठेवण्यामागचा हेतू-निर्णय हा कर्मयोग्याचा असावा. तो एखाद्या धर्मांधमाथेफ़िरूचा नसावा सावट नेहमीप्रमाणे तुम्ही छानच लिहिले तुमची पोस्ट वाचणे एक आनन्द असतो. तरी या शेवटच्या ओळीबद्दल बोलायचे आहे. सेतु तोडु नका असे म्हणणारे धर्ममाथेफ़िरुच आहेत हे तुम्ही कशावरुन ठरवुन टाकले? उलट जे तोडण्याचा अट्टाहास करत आहेत त्यान्च्या माथेफ़िरुपणा तुम्हाला दिसु नये हे महान आश्चर्य आहे,निदान तुमच्याकडुन, एवढी चान्गली पोस्ट लोहिण्यार्याकडुन कडुन अशी अपेक्षा नव्हती. स्वता:च्या सन्स्कृती, परम्परा यान्चा अभिमान सोडुन दुस्वास करणे म्हणजे खरा अध्यात्मिक व धार्मिक असे म्हणायचे काय? नाहीतर तो अगदी धर्मान्ध माथेफ़िरुच हे कसे? तुमचे म्हणणे असे आहे की दुसर्याला केवळ खुष करण्यासाठी अन्याय सहन करुन बलिदान द्यावे? कारण या नश्वर शरिराचा तरी का मोह ठेवावा? शिवाजी महाराजान्ना कर्मयोगी म्हणणारे अगदी मनापासुन बोलत असाल तर तुमचे अभिनन्दन नाहीतर तुम्ही ज्यान्ची बाजु घेउन लिहिण्याचा प्रयत्न करत आहात त्यान्नी शिवाजी महाराजाना आधीच माथेफ़िरु ठरवले आहे. पण मला प्रामाणिक पणे वाटते की तुम्ही अन्यायाच्या विरुद्ध बोलायचे सोडुन उलट भलावण करत आहात? ह्याला कोणता माथेफ़िरु म्हणायचा? (सेक्युलर माथेफ़िरु? )विचार करावा. सध्या वेळ नाही तुमच्या या मुद्याचे सविस्तर उत्तर देउन जाब विचारायचा आहेच तेन्व्हा सध्या ईतकेच
|
सावत, भक्तिची सुरुवात सगुणातुन होउन निर्गुणात त्याचा अंत होतो अस मला वाटत नाही. इशोपनिशदातिल एका श्लोकामधे हे स्पष्ट होते की निर्गुणाच्या पुढे परत सगुण असे रुप आहे.'वैदिक तत्वज्ञानानुसार, मुळ परब्रम्ह हे निराकार, निर्गुण, निष्क्रिय आहे' हेही पुर्णसत्य नाही. परब्रह्म सगुण साकार आहे यालाही वेदिक पुरावे आहेत. यावर वेगळी चर्चा होइल ती आपली इच्छा असल्यास जरुर करु पण २०-२५ दिवसांनंतर कारण येत्या काही दिवसात मला जरा कमी वेळ आहे. अजुन एक मला अरे तुरेच करा जस पहिल्या पोस्ट मधे केल होत तस गोबू विमानाची चित्रे अतिरंजित असतिल तर तळपद्यांचे विमान उडालेच कसे???
|
तळपद्यान्चे विमान उडाले कशावरून? ते विमान याच चित्रावरून तयार केले याला काय पुरावा? इथे पुण्यातले कुणी आहे का? केसरी च्या कार्यालयाला फोन करून जुने अन्क आहेत का विचाराल का क्रुपया? शिवाय अगस्ती मुनीन्चा मुळ ग्रन्थ सापडणे अशक्य नसावे. भान्डारकर मध्ये तर नक्की मिळेल. ही सर्व घटना एखाद्याने व्यवस्थीत डॉक्यूमेन्ट केली तर तो अवश्या अभिनन्दनास पात्र ठरेल. शिवाय शन्कासुरान्ची तोन्डे कायमची बन्द होतील ते वेगळेच.
|
Chyayla
| |
| Sunday, June 10, 2007 - 5:25 pm: |
| 
|
सावट, ईश्वर सगुण की निर्गुण हे न सुटलेले कोडे आहे जसे अन्ड आधी की कोम्बडी आधी? वेदान्नी या विषयाचा सखोल अभ्यास व सन्शोधन केले, वेद म्हणजे मानवी मनाची, बुद्धीची परमोच्च अभिव्यक्ति असावी ज्यानी या सत्याचा शोध लावायचा पुर्ण प्रयत्न केला, शेवटी तेही "नेति नेति" म्हणुन थाम्बले. सुर्याचा प्रकाश आहे म्हणुन सुर्याच अस्तित्व प्रमाणित होते तसेच सगुण आहे म्हणुन निर्गुणही प्रमाणित होते त्याला नाकारु शकत नाही. (असो हा माझा तर्क करण्यचा प्रयत्न आहे) गणिताच्या भाशेत शुन्य आहे तसेच अनन्तही ( Infinity ) आहे अनन्तही शेवटी शुन्यात सामावते तर शुन्यातुन परत अनन्त निर्माण होते. म्हणजे शुन्य हे अनन्तात तर अनन्त हे शुन्यात विलिन होते. आहे ना गम्मत दुसरा विचार करुन बघा हे विश्व, ब्रह्मान्ड कितिही अफ़ाट म्हटले तरी शेवटी ते कशात तरी सामावलेच असेल ना? काही पोकळी काही space तर असावी ज्यात हे सामावले असेल? बर मग ही Space तरी कशातुन आली? विचार करा. असो तर हे सगळ मती गुन्ग करणारे आहे आणी त्याच उत्तर मन, बुद्धी या माध्यमाने कधीच कळु, समजु शकणार नाही. कारण तो त्यान्चा विषयच नाही, जसे त्वचेचा विशय आहे स्पर्श त्याप्रमाणे हे समजणे हा मन, बुद्धिचा विशयच नाही, ते पन्चेन्द्रियान्च्या अवाक्यातले नाही, कितीही प्रयत्न केला तरी ते काही तरी आहे असे वेदान्प्रमाणे आपणही थाम्बु. आधुनिक विज्ञान त्यामुळे फ़ारच सन्कुचित, मर्यादित आहे कारण ते मन, बुद्धी या पलीकडे जायला तयार नाही. याच्यावरही जायचे तर तिथे सुरु होतो अध्यात्माचा प्रान्त व तो अनुभुतिशिवाय शक्य नाही पण तोपर्यन्त ते थोतान्ड आहे म्हणण म्हणजे अज्ञानाची कीवच करावी लागेल.
|
Santu
| |
| Monday, June 11, 2007 - 12:37 pm: |
| 
|
वा च्यायला क्या बात है.
|
विजयराव तुम्ही स्वत्:ला शंकासुर म्हटले ते आवडले. अगदी बरोबर लिहिलत. पण केसरीनी कशावरुन खरी बातमी दिलि??? may be पतंग उडवला असेल तळपद्यांनी??ते विमान थोडिच???त्यामुळे कशाला केसरीच्या कार्यालयात फ़ोन करा, त्यांना शोधायला लावा, इतके कुटाणे करा???कारण केसरिवल्यांनी बातमी होती हे सांगितल्यावर तुम्ही हाच मुद्दा मांडाल की बातमी कशावरुन चुकिची नव्हती????त्यामुळे उगच तिथे फ़ोन वगैरे करुन वेळ घालवण्यापेक्षा आधी च तुम्ही म्हणा ना की बातमी खोटी होती. आपण काही इथे court सुरु केलेले नाही संतू नी जरुरिपेक्षा जास्त पुरावे दिले आहेत विमान उडाले हे सांगण्यासाठी. त्यामुळे सरळ मान्य करा की तुमचे वक्तव्य चुकिचे होते.
|
Zakki
| |
| Monday, June 11, 2007 - 1:24 pm: |
| 
|
राजकारणातून अध्यात्माकडे! शिवाय 'नेति, नेति'. म्हणजे इथेच ही 'चर्चा' संपणार का?
|
Uday123
| |
| Monday, June 11, 2007 - 1:48 pm: |
| 
|
थोड विषयांतर(!) होते आहे. US heritage body has supported preseravation of Ram-setu. Pl find the link. http://www.rediff.com/news/2007/jun/11setu.htm http://www.freerepublic.com/focus/f-news/1847439/posts?page=7
|
धन्यवाद उदय!!! पण हे लोक थोडी ऐकणार आहेत???हिंदुंचा सेतु हा तोडलाच पाहिजे हा सर्वात पहिला agenda आहे ह्या लोकांचा
|
Gobu
| |
| Monday, June 11, 2007 - 2:03 pm: |
| 
|
सन्तु, तुमचे बकवास मत पटले नाही तर असे आरोप करायची तुमची जुनी खोड आता इथे सर्वाना माहीत आहे! तुमच्या या सवयीमुळेच इस्लामी दहशतवादाच्या बिबिवर योग्य चर्चा होऊ शकली नाही! तुमच्यामुळेच कित्येक लोकानी तेथे जाणे टाळले, याची कल्पना आहे का तुम्हाला? अहो जरा सुधारा स्वतला!! (सध्या तरी एवढेच, मी अजुनतरी सभ्यपणा सोडलेला नाही!)
|
>>> तळपद्यान्चे विमान उडाले कशावरून? ते विमान याच चित्रावरून तयार केले याला काय पुरावा? तळपद्यांचे विमान उडाले नाही हे तरी कशावरून? ते विमान याच चित्रावरून तयार केले नाही याला काय पुरावा?
|
Zakki
| |
| Monday, June 11, 2007 - 3:02 pm: |
| 
|
राजकारण, अध्यात्म, भारतातली पुरातन कालातील प्रगति, पुरावे, साक्षी सर्व काही कसे मस्त जुळून आले आहे. आता आपण शास्त्रीय संगीत व नाटक सिनेमे यांची चर्चा इथेच करू. त्याचा पण राजकारणाशी संबंध असतोच. जसे सरकारनामा हा चित्रपट. (सोडली मी फुसकुली! आता एक आणखी चर्चा - सरकारनामा हा चित्रपट राजकारणाशी संबंधित आहे का? त्याला पुरावा काय? )

|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|