|
Santu
| |
| Saturday, June 09, 2007 - 4:51 am: |
| 
|
शेंडे पारा विषारी आहे.त्याचे विमान बनवने कित्पत सुरक्षित))))अरे पारा विषारी आहे का अम्रुत आहे हा प्रश्न इथे नाहि. इथे प्रश्न आहे विमान उडाले की नाहि याचा? तळपदे काहि संशोधक नव्हते.पण त्यानी जुन्या भारतिय शास्त्राचा वापर करुन विमान desigin केले कि नाहि याचा. उठ्सुठ भारतिय ज्ञानाचा अपमान करनार्या काहि देशी (काळ्या) साहेबाना ही मोठि चपराकच होती. तळप्द्याच विमान आदळले)))) आद्ळु दे ना १५०० फ़ूट जावुन आदळले "तुमच्या" राइट बन्धु सारखे १२० फ़ूटा वर गेले असते तर नसते आदळले. तळपद्याविषयी माहिति मिळत नाहि.))))आता हि आधी माहिती वाच मग बोल तळपद्या विषयी माहिति. www.indiacause.com/columns/OL_040312.htm_22k http://www.indiadivine.org/audarya/vedic-culture/190078-ancient-hindus-could-navigate-air.html या लिन्क वर तुला सगळी माहिती मिळेल. अरे माझ्या पहिल्या पोस्ट मधेच नासाच्या ion ईन्जिन ची माहिति दिली आहे ति न वाचताच तु म्हणतोय नासाची माहिती कुठे म्हणुन. याला काय म्हणावे बर च्यायला तुला पुर्ण अनुमोदन
|
Chyayla
| |
| Saturday, June 09, 2007 - 6:18 am: |
| 
|
अरे क्ष, राष्ट्रीय अभिमान, अस्मिता, सन्स्कृती, थोर पुरुष, ज्ञान विज्ञान या सगळ्यान्चा जाणुन बुजुन अपमान करणे हेच तर सगळ्यात मोठे पॉलिटिक्स आहे.
|
Saavat
| |
| Saturday, June 09, 2007 - 7:51 am: |
| 
|
क्ष,तुम्ही भाबडा प्रश्न, योग्य वेळी विचारलात. वरची चर्चा politics पेक्षा सव्य नाही. वेद,रामायण, महाभारत सर्व हिंदूचे 'धर्मग्रंथ' आहेत.पण काही त्याला 'संदर्भग्रंथ' मानतात,तर काहीजण 'रम्य महाकाव्ये' मानतात, तर काही 'निव्वळ थोतांड', मानतात. प्रत्येकाचे हे असे मानने, हे ज्याचे त्याला, आपापल्यापरिने, समजूती प्रमाणे खरेच वाटत असते आणि त्यात काही 'त्या-त्या', व्यक्तीसंदर्भाने पाहीले तर चुकीचे आहे असे म्हणता येत नाही. अध्यात्मशास्त्राची सुरूवात ही धर्मातूनच होते. आणि ती पुर्णपणे व्यक्तिगत असते. एकदम झूंडीने सगळ्यांना 'मोक्ष' मिळाला, असे कधी होत नाही. त्यामूळेच व्यक्तिपरत्वे प्रत्येकाच्या सुरुवातीच्या प्रश्नाचे स्वरूप, आणि त्याची संभावित उत्तरे, ही वेगवेगळी भासू(असू नाही) शकतात. मुद्याची गोष्ट म्हणजे, 'सेतु' च्या रामायणकालीन आस्तित्वावरून, 'श्रीराम' होते-का नाही,हे जस ठरवता येत नाही, हे ठरवीने जसे चुकीचे आहे तसेच, त्या सेतूच्या असण्या-नसण्याने हिंदू मध्ये काही अध्यात्मिक फ़रक पडेल असे म्हणनेही पुर्णपणे चुकीचे आहे. काही गोष्टी नुसत्या तर्काच्याअनुषंगाने पटने अवघड असते, तसेच काही गोष्टिंचा विज्ञाननिष्ठ पुरावा देणे, किंवा विज्ञानाच्या कसोटीवर घासून, प्रयोगाचे असणे-नसणे ठरविणे, हेपण बरोबर नाही. उदाहरणार्थ,जसे मानवाच्या कानाला ऐकू येण्याची frequency Range ही 20Hz - 20kHz असते, तर त्याच्या अलीकडे-पलीकडे अजून बरेच काही असू शकते, हा तर्क काहींना पटेल, तर काही म्हणतील शक्यच नाही. हे असे शक्य आहे-नाही असे वाटणे, हे 'वाटणे', जरी असले, तरी 'सत्य' काही वेगळेच असू शकते, हे पण मानावयास प्रत्यावास नसावा.ज्यांनी मानले,आणि शोधले, त्यांना अजून पूढचे सापडले, पण तरिही, ते अजून पुढचे शोधतच आहेत, कारण त्यांना पटले आहे की आपल्याला न समजलेले अजून काहीतरी आहे. मानवाने स्वत:च्या बुध्दिचा वापर करून अनेक विस्मयकारक शोध लावले, आणि ही प्रक्रिया आजतागायत चालू आहे आणि राहील. नवीन शोध लागत आहेत, जुने कालबाह्य होत आहे. या सगळ्याच शोधांचा खरेपणा, हा मानवाला असणार्या पाच ज्ञानेंद्रियानी ग्रहण केलेल्या ज्ञानावरच पुर्णपणे अवलंबून आहे. जर उद्या मानवाला अजून एक-सहावे ज्ञानेंद्रिय मिळाले तर, कदाचित 'शोधाचे ' असणे-दिसणे वेगळे असू शकते आणि तरिही ’सत्य’ हे वेगळे असू शकते. आता हे 'सत्य' नक्की काय आहे, याचा शोध अनादीकालापासून चालु आहे. या शोधातूनच अनेक खंडण-मंडणांचा, मतमतांचा, संप्रदायांचा, विविध धर्मांचा जन्म झाला.आणि सर्व धर्म, तत्वज्ञ एकच सांगतात की, ’सत्य’ हे शरिराबाहेर नसून, शरिराच्या आतच आहे. तेव्हा अंतर्मुख होऊन जो पर्यंत ती-ती व्यक्ती स्वत:चा शोध, स्वत:च घेत नाही, तो पर्यंत हा प्रवास असाच चालू रहाणार. आता समारोपाकडे, ज्यांना शास्त्रीयदृष्टिकोनातून, 'सेतु' वर प्रयोग करायचे आहेत, त्यांच्या साठी, सेतुचे असणे गरजेचे आहे. जोपर्यंत शास्त्रज्ञ नक्की काही ठरवत नाहीत, तो पर्यंत त्यावर शास्त्रीय पण आंधळी-चर्चा करणे हा वेळेचा अपव्यय आहे. ज्यांना वाटते की हा 'सेतु', धार्मिक आणि राष्ट्रिय अस्मितेशी निगडीत आहे, त्यांच्या साठी, ’रात्र वैर्याची आहे’, कारण ’सेतु’ पे़क्षाही महत्वाच्या अनेक गोष्टीवर लक्ष आणि कृतीची गरज आहे. ज्यांना वाटते ’सेतु’, आध्यात्मिकदृष्टीने महत्वाचा आहे, त्यांनी अध्यात्माचा मूळमंत्र लक्षात घ्यावा, तो म्हणजे, ’मोक्ष’ म्हणजे आपण कशाने तरी बांधलेले आहोत हे अज्ञान,अविद्या,भास दूर होणे.’ तेव्हा अजून कुठल्यातरी नसलेल्या-भासमय बंधनात स्वत:ला अडकून घेण्यापेक्षा, स्वत:ला वाटणार्या, अगोदरपासूनच असलेल्या बंधनातून मोकळे होणे महत्वाचे आहे. ’मोक्ष’ हे जर अंतिम ध्येय असेल, तर स्वत:ला ’रिते’ करायचे पहाणे जरूरी आहे. ज्यांना काही देणेघेणे नाही, त्यांचा तर प्रश्नच नाही. धन्यवाद!
|
Santu
| |
| Saturday, June 09, 2007 - 8:15 am: |
| 
|
कारण सेतु पेक्षा महत्वाच्या गोष्टिवर लक्ष व क्रुतिचि गरज आहे)))) कुठल्या गोष्टिवर लक्ष देण्याची गरज आहे. अस आपल्याला वाटते. मोक्ष हे धेय असेल तर रिते होण्या ची गरज आहे))))तुम्हि सुध्दा इथे लिहित आहत म्हणजे उगिच वेळ घालवत आहात का?किंवा उगिच बंधनात अडकत आहात असे आप्ल्याला वाटत नाहि का? त्या पेक्षा काहिच न केल्यास "रिते"होण्याची प्रक्रिया अधिक वेगाने होईल असे मला वाटते. आपल्याला काय वाटते?
|
सावत मोक्ष मिळवायचे वेगवेगळे मार्ग आहेत. असो हा एक वेगळा मुद्दा आहे. सेतु का तोडला जाउ नये यावर गेले ८-९ दिवस चर्चा झाली आहे ती वाचावी. द्वारका सापडुनही कृष्णाबद्दल प्रश्न आहेत???म्हणजे तुम्ही थोडक्यात काहीही दाखवले सांगितले तरी ते मानणार नाही असे दिसते. अहो मुलभुत elements टाकले की result येणारच की. H आणी Cl टाकल्यावर HCl बनणारच. तसेच मी लिहिले होते की अमिनो आसिड म्हणजे हायड्रोजेन, ऑक्cइजन, कारबन, काही बेसेस हे प्रयोगशाळेत बनवण काही फ़ार मुश्किल नाही. त्यामुळे ते शास्त्रज्ञानी बनवल्यास त्यात फ़ार मोठ साध्य केल अस काही नाही. 'रामायणावरती असे काही संशोधन चालू आहे का? ' ठिक आहे रामायणासारख्या अथवा वेदिक विमानासारख़्या गोष्टींवर नीट research व्हायला हवा. त्याचे पुरावे शोधण्यास पुर्ण जिवन काही लोकांना द्यावे लागेल. पण हे करण्यासाठी भारतिय सरकार प्रोत्साहन देत नाही. असे रामायणावर संशोधन सुरु झाले तर तुमच्यासारखे लोक त्याला विरोध करतिल हेही नक्किच. संशोधन केल्यास पुरावे मिळतिलही पण त्यासाठी आवश्यक finance पण मिळाला पाहिजे. विमान बनवण्यासाठी वगैरे infrastructure ची गरज असते ते पण मिळत नाही. तुम्ही लिहिता'भविष्यातली विमाने तळपद्यांच्या सिद्धांतावर आधारित बनू लागली तर अगदी नक्कीच. तोपर्यंत फार हुरळून जाऊ नये.' अहो राइट बंधुंच्या विमानात सुधारणा झाल्या वगैरे पण हे तळपद्यांच्या बाबतित होणार का???मला तर काहिच chances दिसत नाहित. मी काल इथल्या एका परदेशी माणसाला सांगितले तर तो पण एकदम उत्साहित झाला (हा मनुष्य भारताशी दुरदुरवरुन संबंधीत नाही) पण तुमच्यासारखे लोक तळपद्यांच्या विमानातिल दोष काढण्यातच जास्त interested आहात. तुम्हाला भारतिय विमानाबाबत ना आनंद झाला ना त्याचा अभिमान वाटला. थोडक्यात तुम्हाला कितिही पुरावे दाख़वले तरी तुम्ही भारत मागास होता असेच म्हणनार असे दिसते. परदेशी व्यक्तिनी सर्व घटक elements टाकुन बनवलेल्या अमिनो आसिडचा तुम्हाला अभिमान पण वेदिक बनावटिच्या विमानाबद्दल तुम्हाला कणभरही अभिमान नाही. यावरुनच तुमचा दृष्टिकोण स्पष्ट होतो. जय श्रीराम च्यायला!!!!!
|
Saavat
| |
| Saturday, June 09, 2007 - 9:55 am: |
| 
|
>>>किंवा उगिच बंधनात अडकत आहात असे आप्ल्याला वाटत नाहि का? संतू, नमस्कार! कसे आहात? चर्चेत मुद्दा मांडायच तुमच कसब,व्वा! ...आता बंधनातून सुटलो. >>>सावत मोक्ष मिळवायचे वेगवेगळे मार्ग आहेत. असो हा एक वेगळा मुद्दा आहे. चिन्मय, (छान नाव आहे!) अरेरे, माफ़ करा. मला वाटले, युगे अठ्ठाविस विटेवरी उभा असणारा,पुंडलिकाने उभा केलेला, सातव्या शतकातला,विठ्ठल आणि मोक्ष यांचा काहीतरी संबंध असावा. .... ’रामकृष्णहरि’. BTW, तुम्हाला ’गंगादेवीचे फ़ोटो’,प्रदर्शनासाठी मिळाले का? च्यायला, Where are you?
|
Santu
| |
| Saturday, June 09, 2007 - 11:53 am: |
| 
|
सावट बघा कशी मुद्द्याला बगल दिलित.काय क्रुति करायची.कुठल्या मुद्द्यावर जास्त लक्ष द्यायचे या बद्द्ल तर 'मार्गदर्शन" केले नाहितच. राष्ट्राच्या अभिमानाचे काहि मुद्दे असतात काहि खुणा असतात. त्याला धक्का लागल्यावर पेटुन उठणे हे तर जिवंत माणसाचे लक्षण आहे. म्हणुन तर आपण शिवाजिला मानतो त्यानी जर "मोक्षाचा" धोशा लावला असता तर तुमच्या माझ्या हनुवटि खालि दाढि ठेवावी लागलि असती. म्हणुन तर एखादा संभाजी मरण पत्करतो पण आपले स्वत्व बदलत नाहि. एखादि पद्मिनि जळुन जाणे पत्करते.पण शिल शाबुत ठेवते. महाराणा प्रताप ला कितितरि मोठि जहागिर मिळालि असति पण त्याने रानावनात भटकणे पसन्द केले. जिवंत माणसाला मोक्षाची अपेक्षा ठेवता येईल मेलेल्या नव्हे
|
वेदिक बनावटिच्या विमानाबद्दल तुम्हाला कणभरही अभिमान नाही. यावरुनच तुमचा दृष्टिकोण स्पष्ट होतो. कोणत्या वेदात आहे हे? वेद आपल्यापैकी कुणी वाचले आहेत का? तळपदेन्चे विमान हे हान्ग ग्लायडर सारखे असावे, इन्धन न वापरणारे. अर्थात ते ही अभिमानास्पद आहेच. भरतीयाना अभिमान वाटाव्या अशा अनेक गोष्टी असताना पुर्वी आपण विमान उडवीत होतो अशा भम्पक गोष्टीन्चा अभिमान का? आणी त्यावर शन्का काढणार्याला देशद्रोही,सुडोसेकुलर असे म्हणणे?
|
Santu
| |
| Saturday, June 09, 2007 - 1:45 pm: |
| 
|
हि पहा वैदिक विमानाचि desighns हे आहे शकुन विमान 
|
Santu
| |
| Saturday, June 09, 2007 - 1:48 pm: |
| 
|
हा आहे नकाशा रामाच्या विमान प्रवासाचा 
|
Santu
| |
| Saturday, June 09, 2007 - 1:52 pm: |
| 
|
वैदिक सुंदर या प्रकारच्या विमानाचे desighn 
|
Santu
| |
| Saturday, June 09, 2007 - 1:54 pm: |
| 
|
वैदिक सुंदर या विमानाची अजुन एक drawing 
|
Santu
| |
| Saturday, June 09, 2007 - 1:56 pm: |
| 
|
हे आहे त्रिपुर विमान 
|
Santu
| |
| Saturday, June 09, 2007 - 1:59 pm: |
| 
|
हे आहे तळपद्यांच पारा इन्धन वपरलेल्या मरुत सखा या विमानाचे desigin अशी प्रक्रिया होते इन्धनाची 
|
Chyayla
| |
| Saturday, June 09, 2007 - 3:27 pm: |
| 
|
काही गोष्टी नुसत्या तर्काच्याअनुषंगाने पटने अवघड असते, तसेच काही गोष्टिंचा विज्ञाननिष्ठ पुरावा देणे, किंवा विज्ञानाच्या कसोटीवर घासून, प्रयोगाचे असणे-नसणे ठरविणे, हेपण बरोबर नाही. ’सत्य’ हे शरिराबाहेर नसून, शरिराच्या आतच आहे सावट तुमचे आणी माझे विचार या बाबतित पुर्णपणे जुळतात आहेत. ज्यांना वाटते की हा 'सेतु', धार्मिक आणि राष्ट्रिय अस्मितेशी निगडीत आहे, त्यांच्या साठी, ’रात्र वैर्याची आहे’, कारण ’सेतु’ पे़क्षाही महत्वाच्या अनेक गोष्टीवर लक्ष आणि कृतीची गरज आहे या मुद्याबाबत मला थोडेसे बोलावेसे वाटते कारण तुमच्यातला एक महत्वाचा दुवा निसटल्या सारखा जाणवतो. अध्यात्म एवढे सन्कुचित कसे असु शकते? सुर्य असेल तर त्याचे तेज सर्वत्र फ़ाकणारच. तसेच अध्यात्मिक बैठक असेल तर त्याचेही तेज सन्सारातील, समाजातील, राष्ट्रातील कर्तव्ये कर्मे करताना सर्वत्र फ़ाकणारच त्याला असे सन्कुचित ठेवता येणार नाही... हो अगदी राजकारण व समाजकारणातही. तुम्हाला काही उदाहरणे देतो. ज्ञानेश्वरान्नी ताटी लावुन स्वता: पुरता विचार करत बसले असते तर? पण त्यानी जनकल्याणार्थ ताटी उघडली व ज्ञानेश्वरीने हा महाराष्ट्र तृप्त केला. सन्त तुकाराम, एकनाथ यान्नीही समाजव्यवस्थेवर आसुड ओढले होतेच. आताचे उदाहरण दीले तर लोकमान्य टीळक, गान्धी, स्वा. सावरकर, सन्घाचे प. पु. गोळवलकर गुरुजी जे सन्यास घ्यायला गेले होते तेन्व्हा त्यान्च्या गुरुन्नीच त्याना त्यान्च्या अध्यात्मिक तेजाचा उपयोग राष्ट्रकारणार्थ, समाजाच्या भल्यासाठी परत पाठवले व तशी आज्ञा दीली व त्यान्नी सुद्धा गुरुची आज्ञा मानुन स्वता:चा मोक्ष साधण्याचे स्वार्थ सोडुन राष्ट्रकार्यासाठी जीवन वेचले आहे. तेन्व्हा समाजकारण, राजकारण आणी समाज, राष्ट्र यान्च्या भल्यासाठी अध्यात्मिक बैठक असु शकते हे लक्षात घ्या. तुम्हाला स्वामी विवेकानन्दान्चे उदाहरण माहितिच असेल त्याना आधी मुर्तिपुजा फ़ालतु वाटायची पण सुक्ष्म विचार केल्यावर अध्यात्मिक उन्नतिसाठी प्रतिमा, मुर्तिपुजा यान्चे महत्व त्याना पटले. एवढच काय एका राजान्सोबत घडलेला प्रसन्ग ही आहे त्यात ते महाराजाना त्यान्च्या वडीलान्च्या फ़ोटोवर थुन्कण्याचे म्हणतात पण ते करु शकत नाही या उदाहरणाद्वारे त्यानी प्रतिमाचे महत्व पटवुन दीले. तसेच राममन्दीर, रामसेतु, रामायण हेही त्याच प्रकारे अध्यात्मिक, धार्मिक, राष्ट्रीय प्रतिमा म्हणुन महत्व ठेवुन आहेत. कबुल आहे की मोक्ष मिळायला यान्ची गरज नाही पण तोपर्यन्त पोचवायला हे एक उत्तम साधन आहे, सेतु आहे, एक जीवन्त उदाहरण आहे, आशा व विष्वास आहे. त्याला तोडणे कितपट योग्य आहे? तुम्ही भलेही त्या अध्यात्मिक पोचले असाल पण जर सामान्य जनान्चा विचार करुन बघा. तुम्ही ज्याला बन्धन समजता कारण तुमची पातळी वेगळी आहे म्हणुन पण तोच ईतरान्साठी पुढे जाण्याचा सेतु आहे. त्यान्च्यासाठी ह्या प्रतिमा अन्याय सहन करुन उगाच उखडण्याचा हा कसचा आग्रह आहे? मला तुम्हाला हेच विचारायचे आहे उद्या तुमचे घर विनाकारण जमिनदोस्त करण्यास आले तरी तुम्ही तुमच्या अस्मितेचा, स्वता:च्या परीवाराचे रक्षणाचे कर्तव्य सोडुन अन्याय सहन कराल? तेन्व्हाही तुम्हाला ईतर महत्वाच्या गोष्टी आठवतील? तरी अध्यात्मिक बैठकितुन समाजकारण व राजकारण असु शकते हा मुद्दा लक्षात घ्यावा. शिवाय ईथे अध्यात्मिक, धार्मिक, राष्ट्रीय अभिमानाचे प्रतिक या व्यतिरिक्त वैज्ञानिक, नैसर्गिक, सामरिक, आण्वीक उर्जा स्त्रोत असे अनेक महत्व ठेवुन आहे, दुसरा चान्गला पर्यायी मार्ग उपलब्ध असतानाही मुद्दाम सेतु तोडण्याचा अट्टाहास व जो (सेक्युलर उद्देश) आहे त्याला विरोध आहे. हेही लक्षात घ्यावे. सन्तु खुपच छान माहिती पुराव्यासह दीली आहे मि पण सन्ग्रही ठेवत आहे, धन्यवाद.
|
Santu, तुम्हि छान माहिति दिलित, हि माहिति कुठल्या website वर किंवा पुस्तकात उपलब्ध आहे का? ह्या विषयावर मला जरा विस्ताराने वाचन करायचे आहे.
|
संतु जाम भारी पोस्ट्स देत आहत keep it up !!!!! सावत तुम्हाला नाव आवडले.धन्यवाद. तुम्ही diplomatic पध्दतिने लिहित आहत. त्यामुळे आम्ही जरा फ़िके पडु असे वाटते (च्यायला आणि संतु नाहि फ़िके पडणार). तुम्ही मानाल अथवा नाही मात्र भक्ती मार्गानेही मोक्ष मिळवता येतो. त्यामुळे विठ्ठल आणि मोक्ष यांचा संबंध नाही हे मी मान्य करु शकत नाही. भक्ती मार्गात पण ३ steps असतात.पहिली म्हणजे neophyte भक्त. ३री म्हणजे liberated soul . या लोकांना सर्व गोष्टी देवाच्या परवानगीनिच होत आहेत अस दिसत.त्यांच्या मते तुम्ही एकतर देवाचे सेवक असता नाहितर मायेचे सेवक असता.माया सुध्दा देवाचिच एक शक्ती आहे त्यामुळे तुम्ही जर मायेचे सेवक असाल तरी तुम्ही indirectly देवाचे सेवक असता. पण माझ्यासारख़ा सामान्य अजुन 1st step वरच आहे. त्यामुळे मला देवाचि मुर्ती, देवाची मंदिरे, धर्मग्रंथ, देवाची स्थाने इत्यादिंबाबत attachment आहे. त्यामुळे देवाने बनवलेल्या सेतु कारण नसताना तोडला जातो हे बघुन मला व माझ्याप्रमाणे करोडो neophyte भक्तांना त्याचा विरोध करावासा वाटतो. असो. यावर वेगळी चर्चा होइल. मला गंगादेविचे फ़ोटो मिळाले नाहित हो. तुमच्याकदे असतिल तर पाठवण्याची कृपा करावी. विजयराव विमान उडवण्यात कसला आलाय भम्पकपणा??
|
शेंडेन तुम्ही फ़क्त दोनच प्रश्नांची उत्तरे द्या- १)तळपद्यांनी वेदिक मॉडेलने विमान उडवले यावरुन पुर्वी भारतात विमाने उडवली जात होती हे सिध्द होते की नाही???? २)ह्या विमानावरुन वेदिक विमाने ही कवीकल्पना हे तुमचे वक्तव्य चुकिचे ठरते का नाही???
|
विज्ञानाने नवीन ग्रह, उपग्रह शोधले त्यांचा पंचांगात काही उपयोग केला गेला का? खगोलशास्त्रातले काय शोध भारताने आपल्या पारंपारिक पंचागाद्वारे लावले? >>>>>>>>>>>> शेंडे तुम्ही पंचागावर ( म्हण्जे खगोल शास्त्राच्या वैज्ञानिक दृश्टी वर बोलायचे झाले तर) आताचा जो अधिक मास आहे ( अधिक मास ही शास्त्रीय कल्पना आहे, भोंदु नाही) तो कसा आला याचा अभ्यास आपण करु शकता. १९६० च्या आसपास पुण्यात म दा व व दा भट या दोन भांवानी नेपच्युन चा शोध लावला व त्याचे परिनाम पत्रीकेवर कसे होतात हे एक सिध्दांता द्वारे मांडले. ती पुस्तके बाजारात उपलब्द आहेत ती आपण वाचु शकता. पंचागाचा जर वैज्ञानिक विचार केला तर आपणास आध्ळुन येईल की नासा जेव्हा आज सुर्यग्रहन आहे असे म्हणते ते दाते पंचाग वा ईतर पंचागात एक वर्षा आधी लिहीलेले असते. टिका न करता अभ्यासु वृतीने जर आपन पंचाग पाहाल तर मी काय म्हणतो ते वैज्ञानिक कसे आहे हे लक्षात येऊ शकते. राहीली गोष्ट नविन शोध जसे आकाश गंगा वा ईतर ग्रह, तर यात आपण आज मागे आहोत हे नक्की पण आपण खुप पुढे होतो हे मी एका अध्यातिमक उदा वरुन सिद्ध करु शकतो तुम्ही सत्य नारायनाची वा ईतर कुठलीही धार्मीक पुजा पाहीली असेल तर त्यात नव ग्रहाची पुजा असते, हे नव ग्रह कुठले ह्याची आपल्याला माहीती जर असेल तर आपण पंचागावर प्रश्न्च विचारला नसता. आपण ते नव ग्रह शोधावेत व प्रत्येक सुपारी काठेवतात याचे शस्स्त्रीय कारण जानुन घ्यावे. म्हणजे निदान पंचागा बाबत आपला गैरसमज दुर होऊ शकतो. हे नवग्रह युरोप अमेरिकेतील विध्व्दानांनी शोधन्या अगोदर भारतीय खगोल शास्त्राने (पंचाग) शोधले आहीत. उनीव आहे ते कसे शोधले याची, पण शोधले याचा पुरावा अनेकदा आपल्या रोजच्या जिवनात दिसतो जसे ती पुजा वा अधिक मास वैगरे.
|
१९६० च्या आसपास पुण्यात म दा व व दा भट या दोन भांवानी नेपच्युन चा शोध लावला हा हा हा त्या नवग्रहात सुर्य कसा? तो तर तारा. चन्द्र कसा? तो तर उपग्रह. राहू केतू कुटून आले? वेदिक विमानाच्या आक्रुतीमध्ये इन्ग्रजी शब्द कसे? Neptune was discovered by Johann Galle in 1846
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|