Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 09, 2007

Hitguj » Views and Comments » Current Affairs » बातम्यांचे / लेखांचे संकलन » Political » Archive through June 09, 2007 « Previous Next »

Chinya1985
Thursday, June 07, 2007 - 4:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संतू धन्यवाद अतिशय माहितिपुर्वक पोस्ट होती. पण हे लोक हे मानणार नाहित म्हणतिल 'एक विमान बनवल तर कुठे आकशाला हात लागतात?? 'आणि मग सध्याच्या विमानांचा संदर्भ देउन म्हणतिल ' हे कुठे आहे, ते कुठे आहे'. अहो परदेशी तज्ञही हे मान्य करतात की modern science चे शोध भारतात फ़ार पुर्विच लागले आहेत पण हे लोक इतके भारतविरोधी आहेत की ते हे कधिच मान्य करणार नाहित.

ज्योतिबा फ़ुलेंचे रामयण विश्लेशण का वाचावे??? त्यांची त्या क्षेत्रात काय authority होती???

मंदार, हिंदुविरोधी गोष्टींसाठी हे डिएमके कोन्ग्रेसवाले पर्यावरण संरक्षण हे मुद्देच चुकिचे आहेत असे दर्शवतिल. म्हणतिल अनेक पर्यावरणविरोधी प्रकल्प देशात आहेत सर्वच बंद करायचे का संरक्षणाबाबत म्हणतिल की आत्तापर्यंत इथुन कधिच हल्ला झालेला नाही पुढेही होणार नाही. एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की सेतुमुळे भारत, लंकेत एक barrier आहे. आणि श्रीलंकेहुन काही शे कीमी अंतरावरिल एक बेट चिननी घेतले आहे आणि तिथे ते एक नौदल तळ बांधत आहेत. म्हनजे पुढे भारताविरुध्द युद्ध करताना वरुन पायदळ आणि खालुन नौदल असा हल्ला करण्यासाठी. सेतुमुळे पश्चिमेकडिल भारताचा भाग तसा सुरक्षित आहे. सेतु तोडल्यावर तसा नौदल तळ ते श्रीलंकेत बांधणार नाहित हे कोणि सांगितले??या सर्व गोष्टींची सरकारला जाणिव आहे पण हिंदुविरोध केलाच पाहिजे बाकी संरक्षण वगैरे नंतर असे हे लोक आहेत.भाजपा वाले पण काही विश्वासार्ह नाहित, सत्तेसाठी हपापपलेले आहेत. विरोध करतात पण आंदोलन वगैरे नाही करणार.


Shendenaxatra
Thursday, June 07, 2007 - 6:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ज्योतिबा फुल्यांचे आर्यांच्या उगमस्थानाविषयीचे विचार हास्यास्पद
आहेत. हा माणूस फारसे शिकलेला नव्हता. काही अजेंडा मनात ठेवून त्याने आपले विचार मांडले. ते खोडून काढणे अत्यंत सोपे आहे. आत्ता माझ्याकडे ह्याचा संदर्भ नाही. दोन चार दिवसात शोधून काढतो आणि काही उदाहरणे देतो. ह्यांचे काही विचार वाचून असे वाटते की ह्या माणसाबद्दल एक हाईप निर्माण केली गेली आहे. असो.

पुष्पक विमानाविषयी. तळपद्यांनी जर विमान उडवून दाखवले असेल तर उत्तमच. पण ह्यात किती माणसे बसत होती? इंधन काय होते? हायड्रोजन? इतका हायड्रोजन साठवणार कसा? माझ्या मते हायड्रोजन इतका हलका असतो आणि आपल्या नेहमीच्या तपमानाला तो द्रव बनवता येत नाही त्यामुळे तो वाहनात इंधन म्हणून वापरायला
खूप मर्यादा आहेत. हा प्रयोग तसा अलिकडेच झाल्यामुळे ह्याविषयीचे पुरावे मिळायला अडचण असू नये.

ज्या ग्रंथावरून हे विमान बनवले गेले ते कुठल्या काळात लिहिले गेले? नुसते वेदकालीन म्हणून पुरत नाही. नक्की कुठला काळ? आणि हा काळ कसा निर्धारित केला? रामायणात नक्की हेच विमान होते का? त्यात लिहिले आहे की विमानात राम, लक्ष्मण आणि सीता बसले होते.
हायड्रोजनवर चालणारे विमान इतके लोक सामावून घेऊ शकेल का? कसे?
ह्या एकमेव प्रयोगाने सगळे वेद खरे असे कसे सिद्ध होते?

इतके उच्च तंत्रज्ञान असे हवेत विरून गेल्याप्रमाणे लुप्त कसे होईल? ते आणि त्याची कीर्ति
सर्वदूर पसरली का नाही? मोठ्यामोठ्या राजांनी तशी विमाने बनवून का नाही घेतली? आपल्या बाकी अनेक कला आणि तंत्रज्ञान शतकानुशतके टिकले आहे. (उदा. ढाक्याची मलमल, पैठणी, विशिष्ट पद्धतीची भांडी, संगीत, नृत्य) हेच कसे नष्ट झाले?





Slarti
Thursday, June 07, 2007 - 6:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक खुलासा : big bang हा तकलादू ( ?? ) सिद्धांत नाही. background microwave radiation हा त्याचा मुख्य पुरावा आहे. शिवाय तार्‍यांचे अंतरंग कळायला त्या अंतरंगांत जावे लागत नाही, मंगळावर पाणी आहे की नाही हे कळण्यासाठी प्रत्यक्ष मंगळावर जावे लागत नाही. radio-astronomy खुटखुटीत आहे, धन्यवाद.

Chinya1985
Thursday, June 07, 2007 - 7:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्लार्ति काय लिहिताय?????मंगळावर जाव लागत नाहि???मग एव्हडे करोडो डॉलार्स देउन कशाला नासा यान तिथे पाठवतय???? इथुनच सर्व समजत असत तर ५-६ वर्षापुर्वी ह्या लोकांनी तिथे पाणी नाहिच अस ठामपणे सांगितले नसते.कसल background microwave radiation धरुन बसला आहात??? काही दिवसंपुर्विच बातमी होती की big bang खोटी ठरवणारी नवी थिअरी लवकरच येणार आहे. bang बिग थिअरी खरी मानली तर universe unlimited नाहिच असे दिसते आणि ते unlimited आहे हा तर खगोलशास्त्राची माहिती असलेला कोणीही सांगेल.

शेंडेन हे विमान होते म्हणजे अजुनही विमाने असतिल नव्हे???लगेच हायद्रोगेन च्या विमानातुन राम, लक्ष्मण, सिता कसे गेले म्हणने बरोबर नाही. एक विमान त्यांनी बनवुन दाखवले अजुनही वेगवेगळी विमाने असतिल की.



Shendenaxatra
Thursday, June 07, 2007 - 7:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तळपद्यांनी हे विमान बनवले होते. कुठल्याशा पुराणातून वाचून त्यांनी ते बनवले. तळपद्यांनी आपली कल्पनाशक्ती, आपले आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान वापरून त्यात फेरफार केले असणे शक्य आहे. केवळ ह्या माणसाने एक विमान उडवले म्हणून वेदकाळात तशी विमाने उडत होती असे कसे म्हणता येईल?
ज्या ग्रंथातून ते बनवले असे म्हणतात तो ग्रंथ किती जुना आहे? हा काळ कसा ठरवला गेला? हे तंत्रज्ञान वाहतुकीचे विमान बनवण्याइतके सरस होते का?
रामायण खरे होते हे सिद्ध करायला हा पुरावा कसा ठरू शकतो तेही जरा सांगा.


Deshi
Thursday, June 07, 2007 - 9:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजुनही रामयन खरे की खोटे यावरच का?
शेंडे तुमचे म्हणने बरोबर आहे. कुठेही काही पुरावा नाही. आपण लोक उगीच नसत्या भलामन्या करत होतो आता हे ही बघा ना
० च्या शोधा भारतीयांनी लावला म्हणतात, पुरावा काही नाही.
कोटील्या ने अर्थशास्त्र लिहीले ते चाणक्याने लिहीले म्हनतात (कोटील्य व चानक्य एकच यात अजुनही दुमत आहे)
हळदीचे पेटंट तर अमेरिकेने घेतले म्हणेजे आपण २ - ५ हजार वर्षापासुन अमेरिकेकडुन हळद घ्यायचो नाही का?
तेच बासमती तांदळाचे. त्याचा शोध तर टेक्सास मधे लागला नाहीका?
तात्वीक दृश्ट्या तुमचे म्हनने की पुराव द्या हे बरोबर असले तरी पुरावा देऊ शकत नाहीत ही fact आहे हे तुम्हालाही माहीती असताना वाद का लांबवता?
चिन्या राव तुम्हाला माहीतीये की शेंडेंना पुरावाच पाहीजे मग तुम्ही तरी का भांडताय, शेंडे नी विमान न्हवते असे म्हणले की ते नसनार का?
आता तळपद्यांनी हाय्ड्रोजन वर चालनारे विमान बनविले याबद्दल काही दुमत नसावे. केसरी मध्ये तो पुरावा मिळेल, शेंडे तुम्ही जर पुण्यात असाल तर केसरीचे आर्काईव्ह बघा.
हायड्रोजन व आता BMW येनार आहे हे आपल्याला माहीती असेलच. नाहीतर गुगल करा त्यात दिसेल.


Shendenaxatra
Thursday, June 07, 2007 - 9:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देशी,
आपण मुख्य मुद्दा सोडून नसते फाटे का बरे फोडत आहात? पेटंट, शून्य वगैरेंचा घोळ कशाला घालताय उगाच? कितिही उपरोधाने लिहिले तरी आपण मूळ मुद्द्याला बगल देताय हे लक्षात आल्यावाचून रहाणार नाही.
आपण फोडलेल्या फाट्यांना उत्तर द्यायचे म्हटले तर प्रत्येक मुद्द्याला एक नवा विषय सुरू करावा लागेल. तेव्हा आपण त्याविषयी नंतर कधीतरी बोलू. सध्या रामायणाबद्दल बोला.
रामसेतू हा मानवनिर्मित आहे, तो रामाने बांधला, रामायण हा आमचा इतिहास आहे नुसते रम्य महाकाव्य नव्हे. ह्यापैकी कुठला मुद्दा सिद्ध होईल असा काही पुरावा देता आला तर बघा.


Chinya1985
Thursday, June 07, 2007 - 9:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शंडेन तुम्ही काल लिहल होत की 'रामयणाची व्हिदिओ' तर नाहि मागत आहे ना तेन्व्हा मला जरा धक्का बसला होता की हे शंडेनच म्हणत आहेत ना?? पण आजच्या पोस्ट्स वाचुन नाही बसला धक्का. विमान बनवले तरी कोठुन हेच का रामयणातले, कधीचा धर्मग्रंथ वगैरे सुरुच केले त्यावरुन तुम्हाला रामायणाची व्हिडिओ च द्यावी लागेल. ती बघितली तरी ती कशावरुन खर्‍या रामयणाची अस म्हणाल. जाउ द्या तुम्ही जर एकदा मनाची समजुतच करुन घेतली की एखादि गोष्ट नाहिच तर तुम्हाला कितिही पुरावे दिले तरि तुम्ही काहितरी पळवाटा काढालच. ते पुराण कुठल्या कालखंडातिल अस विचारलय. पुराण कधी लिहिल गेल हे कळेलही पण ते किती पिढ्यान पिढ्या मौखिक रित्या चालत आल हे कसे कळेल???

देशी तुम्ही लिहिलत ते एकदम बरोबर आहे. तुम्ही लिहिलय 'चिन्या राव तुम्हाला माहीतीये की शेंडेंना पुरावाच पाहीजे मग तुम्ही तरी का भांडताय, शेंडे नी विमान न्हवते असे म्हणले की ते नसनार का? '
मी पण हाच विचार करत होतो, शेंडेन्ला सायन्सबद्दल पुरावे मगितले की म्हणतात थांबा १० हजार वर्ष मिळेल पुरावा. मात्र रामायणाबाबत पुरावा त्यांना आत्ताच हवा. बिना पुराव्याचे 'बिग ब्यांग, जिवसृष्टी' मान्य करतिल पण रामायण नाही करणार.

शेंडेन राम अस्तित्वातच नव्हते तर त्यांचे नामस्मरण केल्याने त्यांच्या भक्तांना आध्यात्मीक अनुभव कसे आले असते हेही सांगा.


Chinya1985
Thursday, June 07, 2007 - 9:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रामसेतुचे खालचे खडक वेगळे आणि वरचे खडक वेगळे याचा अर्थ असा नाही होत का की खालिल मुळच्या खडकांवर नविन खडक ताकुन सेतु बांधला आहे???तसेच त्याचे unique curvature पण असेच दर्शवते की हा सेतू नैसर्गिक नाही. यावर तुमचे काय मत आहे???

Shendenaxatra
Thursday, June 07, 2007 - 11:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नामदेव, ज्ञानेश्वर व तुकाराम हे संत विठोबाचे नाव घेत घेत अध्यात्म करत होते. आध्यात्मिक क्षेत्रात हे लोक मोठे अधिकारी समजले जातात. त्यांनाही आध्यात्मिक अनुभव आला असेलच.
मग काय विठोबाही ऐतिहासिक पुरुष होता म्हणायचे का? मग अनेक अभंगात उल्लेखलेली वैकुंठ ही खरोखरची जागा आहे का? (पुण्यातली स्मशानभूमी नव्हे!)


Deshi
Friday, June 08, 2007 - 12:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मग अनेक अभंगात उल्लेखलेली वैकुंठ ही खरोखरची जागा आहे का?>>>
जर त्यांनी सांगीतलेले अद्यात्म खरे असेल तर वैकुंठ ही खराच असायला हवा नाही का?


http://www.hindunet.com/forum/showflat.php?Cat=&Number=54006&page=0&view=collapsed&sb=5&o=&fpart=1

Chyayla
Friday, June 08, 2007 - 2:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी पण हाच विचार करत होतो, शेंडेन्ला सायन्सबद्दल पुरावे मगितले की म्हणतात थांबा १० हजार वर्ष मिळेल पुरावा. मात्र रामायणाबाबत पुरावा त्यांना आत्ताच हवा. बिना पुराव्याचे 'बिग ब्यांग, जिवसृष्टी' मान्य करतिल पण रामायण नाही करणार.

चिन्या... बरोब्बर बोललास, समोरची व्यक्ति प्रामाणिक असेल तर पुरावे व मुद्देसुद चर्चा करता येते नाहीतर उताणे जरी पडले तरी आमच नाक वरच होत असे म्हणणारे भेटतात.

देशी नेहमी प्रमाणे फ़ारच छान लिहिलेस. वाचायला मजा येत आहे.

पन्चान्गाचे श्रेश्ठत्व त्यान्चे उच्च गणित, खगोल ज्ञान राहिले बाजुला... ते वाईट का तर त्याचा उपयोग मुहुर्त शोधण्यासाठी करत होते म्हणुन... आता अशा वाक्यावर काय बोलाव कुणी? कीव करावी आणी द्याव सोडुन... त्याना आधुनिक विज्ञानने विकसित केलेल्या Atomic Energy चा पण किती राग येत असावा कारण त्यानी तर जगाचा विध्वन्स होउ शकतो ना बिचार पन्चान्ग कुणाच नुकसान तरी करत नाही.


Santu
Friday, June 08, 2007 - 5:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शेंडे
हा ग्रंथ कधी लिहिला गेला))))हा ग्रंथ लिहिला महर्षि भारद्वाज यांनी
४बी.सी. मधे. तो सापडला १८७५ मधे. त्याचे english भाषांतर हे केले mr.j.r.joyser. mysore यानी १९७९ मधे. जरी हा ग्रंथ चौथ्या शतकातला असला तरी भारद्वाजानी यात असे नमुद केले आहे की हा ग्रंथ त्यानी पुर्विच्या प्राचिन माहितिच्या आधारे लिहिला आहे.व त्या प्राचिन रुशींची त्यानी नावे सुध्दा दिलि आहेत.

रामायनात हेच विमान होते हा))))))रामायणात या ग्रंथा तील पुश्पक या प्रकाराचे विमान होते.

हायड्रोजेन वर हे विमान चालेल का))))मी हे विमान हाय्ड्रोजेन वर
चालेल असे म्हटले नाहि. अगस्ति संहितेत छत्र म्हनजे बलून च्या सहाय्यने उडता येते असे म्हटले आहे व तिथे हय्ड्रिजेन लागतो असे म्हटले आहे.

तलपदे यांच विमान mercury propellant होते यात
यात खालिल प्रमाणे प्रक्रिया होते mercury propelent was first first veporised fed into the thurster discgarged chember ionised converted into plasama by combinatition of electron broke down electricaly then acceslareted through screnn smaal openings at velocity of 3000km per mint आणी हे नासानि पण आता करुन पाहिले आहे

ईतिहास कार ईव्हान कोष्टका यानी पण तळपदे याना first creator of air craaft म्हटले आहे. राईट बंधुंच्या आधी आठ
वर्षे तळपदे यानी हे विमान बनवले होते
तळपदे यांनी ion engine हे या विमानात
वापरले होते. हे robert godaard च्या कितितरि आधी तळपदे यानी करुन दाखवले.
या godaard ला liqid fuel चा जनक मानतात. त्याने त्याच्या रॉकेट मधे प्रथम
ion engine वापरले(१९०६)


याची माहिती या लिन्क वर आहे.
http://www.groupsrv.com/religion/about164901.html


Chinya1985
Friday, June 08, 2007 - 9:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शेंडेन मी तुम्हाला परवाच लिहिल होत की तुम्हाला धर्म, अध्यात्म यांची माहिती नसल्यास उगाच चुकिच्या समजुती करुन घेउ नका. अहो, विठ्ठल म्हणजे साक्षात 'भगवान श्रीकृष्ण'. त्यांना विठ्ठल म्हणतात कारण ते विटेवर उभे आहेत (विट+तळ). कृष्ण आणि रुक्मिणी पंढरपुरला कसे आले माहित नसावे. आणि वैकुंठ म्हणजे विष्णुचे स्थान जिथे या जगाप्रमाणे दु:ख नाहित. स्वर्गाहुनही पुढे आहे ते.(आता याला पुरावा मागु नका आमच्या कडे नाही पुरावा).

संतु, क्या बात है!!!!

देशी धन्यवाद.
'त्याना आधुनिक विज्ञानने विकसित केलेल्या Atomic Energy चा पण किती राग येत असावा कारण त्यानी तर जगाचा विध्वन्स होउ शकतो ना'
नाही हो च्यायला आधुनिक गोष्टींचा नाही येत त्यांना राग. ते चिडतात जेन्व्हा भारतिय गोष्टी चांगल्या म्हटल जात तेंव्हा. आधुनिक काहीही चांगले असे हे म्हणतात कारण ते पाश्चिमात्यांकडुन येते ना!!!!


Shendenaxatra
Friday, June 08, 2007 - 8:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या विधानाचा उत्तम विपर्यास केला जात आहे.
मानवाला जीवसृष्टी निर्माण करता यायला १० हजार वर्शे द्या असे मी म्हटले होते.
जीवसृष्टीच्या उत्पत्तीविषयी तुकड्यातुकड्याने पुरावे शोधणे आणि संकलित करणे चालूच आहे. त्यात एका शास्त्रज्ञाने मूलभूत द्रव्यापासून विशिष्ट परिस्थितीत अमिनो आसिड बनते असे म्हटले होते. आणि प्रयोगशाळेत करुनही दाखवले. कदाचित हा कयास चुकीचा आहे निष्पन्न होईल. पण शोध लावण्याच्या दृष्तीने हा एक शास्त्रीय प्रयत्न तर नक्कीच आहे. रामायणावरती असे काही संशोधन चालू आहे का?
एकाच प्रकारचे वेगवेगळ्या काळातले पुरावे मिळाल्यास एखाद्या सिद्धांताला पुष्टी मिळते. अमक्या काळात अमके डायनोसॉर होते असा सिद्धांत मांडला आणि तसे अवशेष वेगवेगळ्या भागात मिळाले तर तो सिद्धांत बळकट होतो.

**
शेंडेन राम अस्तित्वातच नव्हते तर त्यांचे नामस्मरण केल्याने त्यांच्या भक्तांना आध्यात्मीक अनुभव कसे आले असते हेही सांगा.
**
ह्या विधानाचे उत्तर म्हणून मी विठ्ठलाचे उदाहरण दिले होते. विठ्ठल म्हणजे जर कृष्ण असेल तर पुन्हा रामायणाप्रमाणेच महाभारताबद्दलही प्रश्न आहेच.




Shendenaxatra
Friday, June 08, 2007 - 9:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भारतीय पंचागामुळे जे हुरळून जात आहेत त्यांनी असे सांगावे की आधुनिक विज्ञानाला न उलगडलेले कुठले गूढ ह्या पंचांग वाल्यांना कळले आहे का?
१००० वर्षापुर्वी जे पंचांग होते त्यात काय काय सुधारणा झाल्या? गेल्या हजार वर्षात विज्ञान किती पुढे गेले ह्याच्याशी पंचांग, भारतीय खगोलशास्त्र ह्यांची तुलना होते का?
विज्ञानाने नवीन ग्रह, उपग्रह शोधले त्यांचा पंचांगात काही उपयोग केला गेला का?
खगोलशास्त्रातले काय शोध भारताने आपल्या पारंपारिक पंचागाद्वारे लावले?
उगाच आक्रस्ताळेपणा न करता कृपया ह्याची उत्तरे द्या.
१०००-५०० वर्षापूर्वी ही गोष्ट नक्कीच अभिमानास्पद होती. आजही ऐतिहासिक वारसा म्हणून अभिमानास्पद आहे. पण तेवढेच.


Shendenaxatra
Friday, June 08, 2007 - 9:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तळपद्यांच्या विमानाविषयी पुरेशी माहिती मिळत नाही आहे.
पार्‍याचा वापर नक्की कसा केला गेला? ही रासायनिक प्रक्रिया आहे का? असल्यास कुठली कुठली संयुगे बनतात? पारा हा कमालीचा जड आणि विषारी पदार्थ आहे. त्याचे विमान बनवणे कितपत सुरक्षित आहे?
वरती म्हटले आहे की नासा ह्यावर संशोधन करत आहे. कुठे लिंक मिळाली तर ह्या दाव्यावर विश्वास ठेवेन.
भविष्यातली विमाने तळपद्यांच्या सिद्धांतावर आधारित बनू लागली तर अगदी नक्कीच. तोपर्यंत फार हुरळून जाऊ नये.
तळपद्यांचे विमान १५०० फूट वर जाऊन खाली आदळले (क्रश्ड) असा उल्लेख आहे. त्यात माणूस बसलेला नव्हता असे दिसते आहे. त्यामुळे राईट बंधूंचे श्रेय त्यांना हिरावून घेता येणार नाही.


Vijaykulkarni
Friday, June 08, 2007 - 9:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mercury propelent was first first veporised fed into the thurster discgarged chember ionised converted into plasama by combinatition of electron broke down electricaly then acceslareted through screnn smaal openings at velocity of 3000km per mint

?


Chyayla
Saturday, June 09, 2007 - 2:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भारतीय पंचागामुळे जे हुरळून जात आहेत त्यांनी असे सांगावे की आधुनिक विज्ञानाला न उलगडलेले कुठले गूढ ह्या पंचांग वाल्यांना कळले आहे का?
१००० वर्षापुर्वी जे पंचांग होते त्यात काय काय सुधारणा झाल्या? गेल्या हजार वर्षात विज्ञान किती पुढे गेले ह्याच्याशी पंचांग, भारतीय खगोलशास्त्र ह्यांची तुलना होते का?
विज्ञानाने नवीन ग्रह, उपग्रह शोधले त्यांचा पंचांगात काही उपयोग केला गेला का?
खगोलशास्त्रातले काय शोध भारताने आपल्या पारंपारिक पंचागाद्वारे लावले?
उगाच आक्रस्ताळेपणा न करता कृपया ह्याची उत्तरे द्या.
भारतिय पन्चान्गामुळे जे चवताळलेले आहे त्यान्च्या आक्रस्ताळे प्रश्नाना उत्तर (देत नाही कारण त्याना सान्गुन काही फ़रक पडत नाही तर हे ईतर मायबोलीकरान्साठी)

आधुनिक विज्ञानाला जे गुढ उकलण्यासाठी दुर्बीणी, अन्तरिक्ष यान, उपग्रह या साधनान्चा वापर करावा लागला तश्या साधनान्ची गरज त्याना पडली नाही आणी तरी त्यानी ईतके नव ग्रह शोधुन काढले त्यात राहु केतु सारखे काल्पनिक छेदन बिन्दु सुद्धा शोधुन काढले ते आजच्या आधुनिक साधनान्नीही सिद्ध होतात. मला ईथे त्यान्च्या शोधापेक्षा त्यान्चे ज्ञान मिळवण्याच्या पद्धतिचे कुतुहल वाटते जे आधुनिक विज्ञानाला अजुनही जमले नाही. ग्रहान्च्या गती, त्यान्चा आकार, वर्णन, रुप, रन्ग जसेच्या तसे खरे ठरले ह्याला आजचे विज्ञानही पुष्टी करते. जरा कल्पना करुन बघा सुर्यग्रहणाचा काळ तन्तोतन्त कसा जुळतो त्याला किती उच्च गणीत व ग्रह, सुर्यान्ची भ्रमणगती चा विचार करावा लागतो.

हो आजही ज्योतिश शास्त्रात सन्शोधन सुरु आहे नुकतेच जे ग्रह शोधण्यात आले त्याचाही विचार करण्यात येतो. ते ग्रह फ़ारच दुर असल्यामुळे त्यान्चा विशेश प्रभाव पडत नाही त्यामुळे त्यान्चा विचार आधी केला नव्हता.

खगोलशास्त्राचे ज्ञान असल्याशिवाय पन्चान्गच होउ शकत नाही. तेवढी अक्कल सामान्य भारतियाला असते ती ईतरानाही मिळो ही त्या रामाला प्रार्थना. त्यान्ची तुलना कसची हा प्रश्नच प्रचन्ड अज्ञान किन्वा मुद्दाम आक्रस्त्तळेपणा दर्शवतो

तळपदेन्ची लिन्क आधीच दिली, अजुन कोणती लिन्क देउन फ़ायदा नाही, स्वता: पुढे होउन प्रयोग करा एवढीच जिज्ञासा असेल तर परत फ़ाटे फ़ोडायची गरजच काय?

एकाच प्रकारचे वेगवेगळ्या काळातले पुरावे मिळाल्यास एखाद्या सिद्धांताला पुष्टी मिळते
म्हणजे रामसेतुचा पुरावा मिळाल्यामुळे रामायणाच्या सिद्धान्ताला पुष्टीच मिळली म्हणायची

होय रामायणावरही सन्शोधन सुरु आहे, सन्तुनी दीलेली उत्क्रुष्ट माहिती वाचण्याचे कष्ट घेतले असते तर केवळ आन्धळेपणे विरोधाला विरोध करण्याची खोड दीसुन आली नसती.

जय श्रीराम!!!






Ksha
Saturday, June 09, 2007 - 4:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

यात political काय आहे काही कळेल का?

ए. भा. प्र.


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators