Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 07, 2007

Hitguj » Views and Comments » Current Affairs » बातम्यांचे / लेखांचे संकलन » Political » Archive through June 07, 2007 « Previous Next »

Shendenaxatra
Wednesday, June 06, 2007 - 9:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुन्हा ये रे माझ्या मागल्या.
रामायण झाले ह्याची विडियो फिल्म उत्खननात मिळावी असा कुणाचा आग्रह नाही. निदान शिलालेख, नाणी, भांडी कुंडी, गाडगी मडकी असे काही मिळेल का नाही?
खरोखरच रामायण लाखो वर्षे जुने असेल तर पुरावेही तुकड्यातुकड्यांनीच मिळणार.
प्राचीन काळातील जीवाष्म इतके तर नक्कीच सांगतात की अमक्या एका काळात अमक्या प्रकारचे जीव पृथ्वीवर होते. त्या तर्‍हेचे एकाहून जास्त अवशेष सापडले तर सिद्धांताला पुष्टी मिळते आणि तो खोडणे जास्त कठीण बनते. एखाद्या नमुन्यामुळे किती माहिती मिळते ह्याला मर्यादा असणारच.
रामायणाचे तोकडे पुरावे मिळाले तर ते पुरावा थोडा कमजोर असेल. अधिक काही मिळाले तर बळकट.
प्रस्थापित कांस्ययुगीन संस्कृती जसे मेसोपोटेमिया, इजिप्त व मोहंदजडो ह्या साधारण ७००० वर्षापूर्वी झाल्या (अतीरंजित रामायणासारख्या संस्कृती वादाचा मुद्दा आहेत म्हणून बाजूला ठेवू). ह्या संस्कृतींचे अवशेष मिळालेले आहेत. जर रामायणकाळातली संस्कृती काहीच्याकाही प्रगत असेल (विमाने, शस्त्रास्त्रे इत्यादी) तर त्यांचे पुरावे मिळणे अशक्य असू नये.
बिग बंग बिन पुराव्याची थियरी नाही. तार्‍यांची गती, रेडियो तरंग, वेगवेगळ्या तार्‍यांचे अंतरंग वापरून अशी थियरी मांडली गेली आहे. इतर भोंदू थियर्‍यांसारखी ती तितकी तकलादू नाही.

पुरावा मिळेपर्यंत पुरावा नसल्याची कबुली देण्याचा प्रांजळपणा धार्मिक लोक का दाखवत नाहीत? आम्ही धार्मिक आहोत आम्हाला पुरावा देण्याची गरज नाही असे म्हणणे अत्यंत उर्मटपणाचे आहे.
भोंदू बुवा लोक कसे आम्ही कृष्णाचे अवतार आहोत असे सांगतात. पुरावा वगैरे साफ झूट त्याची आठवण होते.
गेल्या २००-३०० वर्षात जीवसृष्टीचा विकास ह्यावर आधुनिक विज्ञानाने जितकी उत्तरोत्तर प्रगती करून दाखवली आहे ती बघता हीच परंपरा पुढेही चालू राहील असे मानायला प्रत्यवाय नसावा.



Chinya1985
Wednesday, June 06, 2007 - 9:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ठिक आहे मानले शिलालेख़,भांडी,नाणी वगैरे नाही पण हे सापडणार नाही असे कोणी सांगितले???? सापडण अवघड आहे असेच आमचे म्हणने.

'मेसोपोटेमिया, इजिप्त व मोहंदजडो' येथे अवशेष मिळाले म्हणजे इतर कुठे तसे मिळणार नाहित असे का???तुम्ही जी ठाम समजुत करुन घेतलेली आहे की रामायण महाभारत महाकाव्य आहेत इतिहास नाही ती कुठल्या basis वरुन??

आपली सध्याची जी प्रगती आहे त्याहुन अतिप्रगत संस्कृती पुर्वी नव्हतिच असे कोणीही ठामपणे म्हणु शकणार नाही. जयंत नारळीकरांसारखा निरिश्वरवादी, निधर्मवादी पण असे म्हणत नाही त्यांचे 'वामन परत न आला' पुस्तक वाचावे.त्यात त्यांनी अशी संस्क्रुती असु शकते अशी कथा लिहिली आहे. शिवाय जुन्या काळी population पण कमी होते त्यामुळे अशे अवशेष सापडण्याचे पण chances कमी होतात.

बिग ब्यांगबद्दल मला बरिच माहिती आहे. आपल्याला असे दाख़वण्यात येते की थिअरी तकलादु नाही पण थिअरी चुकिची ठरण्याचे अनेक chances आहेत. astronomy ,astrophysics मधे अनेक तकलादू थिअरिज आहेत. मंगळावर पाणी आहे का नाही हे सुध्दा शास्त्रज्ञ सांगु शकत नाहित. त्यांच्यासाठी इतर तारे, तार्यांचे अंतरंग हा फ़ारच दुरचा पल्ला आहे ( माझ्या डोक्यात ८ते १०वी खगोलशास्त्रच फ़ार मोठ खुळ होत त्यामुळे मला यातिल गोष्टी कशा आहेत चंगल माहित आहे)

'भोंदू बुवा लोक कसे आम्ही कृष्णाचे अवतार आहोत असे सांगतात.'
ते तसे नाहित ह्याला पुरावा आहे. ते म्हणजे धर्मग्रंथ.

मी परत लिहितोय की
ज्याप्रमाणे धर्म विज्ञानाला लागणारे पुरावे देउ शकत नाही त्याप्रमाणे विज्ञान आध्यात्मिक अनुभव देउ शकत नाही. गोष्ट सोपी आहे समजायला- धर्म आणि विज्ञान वेगवेगळि क्षेत्रे आहेत त्यामुळे त्यांच्यातिल मापदंड पण वेगवेगळे आहेत


Shendenaxatra
Wednesday, June 06, 2007 - 10:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


***ठिक आहे मानले शिलालेख़,भांडी,नाणी वगैरे नाही पण हे सापडणार नाही असे कोणी सांगितले???? सापडण अवघड आहे असेच आमचे म्हणने.
***
जर ही चर्चा नीट वाचलीत तर रामायण काळातले पुरावे मिळणे अशक्य आहे असे अनेकदा म्हटले गेले आहे. ते मला खोडून काढायचे होते. आपण तसे म्हटले नसेल तर दुर्लक्ष करा पण असे म्हटले गेले आहे.
साधारणत्: असा संकेत आहे की ज्याला अमके एक झाले असे सिद्ध करायचे असते त्याने त्याचा पुरावा द्यायचा असतो. अमके घडले नाही ह्याचा पुरावा हाच की कुणी घडल्याचा पुरावा देऊ शकलेला नाही हाच.
रामायण खरे नाही ह्याला काय पुरावा हा प्रश्न निरर्थक आहे. जोवर ठोस पुरावा मिळत नाही तोपर्यंत तो काल्पनिक आहे म्हणणार्‍यांची बाजू वरचढ असणार.
रामायण हा अध्यात्माचा भाग कसा काय आहे? अमका एक राजा, त्याला तीन राण्या, त्याने यज्ञ केला, त्याला चार कर्तृत्ववान मुले झाली आणि मग त्यात सीता, हनुमान, रावण इत्यादी. हा एक तर इतिहास आहे किंवा एक रम्य गोष्ट आहे. ह्यात अध्यात्म कुठे आले?

जाता जाता,
मंगळावर पाणी असल्याचे भरपूर पुरावे नासने शोधले आहेत. अगदी अलिकडे मे २००७ मधेही एक पुरावा सापडला आहे.


Vijaykulkarni
Wednesday, June 06, 2007 - 11:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

याचा अर्थ वैज्ञानिकाने काहिही सांगितले तरी तुम्ही मानाल?

भोन्दु बुवानी सान्गितले म्हणून तुम्ही कोम्बडी कापुन स्वस्थ बसाल?

'भोंदू बुवा लोक कसे आम्ही कृष्णाचे अवतार आहोत असे सांगतात.'
ते तसे नाहित ह्याला पुरावा आहे. ते म्हणजे धर्मग्रंथ.

कोणते हे धर्मग्रन्थ? कुराण? बायबल, गीता? सत्यसाईबाबा महात्म्य



Vijaykulkarni
Thursday, June 07, 2007 - 12:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पन्चागाबद्दल काय म्हणु शकु. त्यामुळे कुठेतरी त्यात तथ्य असावे हे पटते.
आर्य लोक मूळचे इराणचे.
तेथे आकाश निरभ्र असल्याने ग्रह तारे स्पष्ट दिसतात.
त्यान्च्या नियमीत निरिक्शणाने हे शास्त्र विकसित झाले.
ग्रहणान्च्या वेळा अचुक सान्गण्यचे शास्त्र कौतुकास्पदा आहे आणी भारतीयाना त्याचा
अभिमान जरूर असावा पण प्रुथ्वी पासुनचे ग्रहान्चे अन्तर वगैरे महिति त्याना नव्हती.

लो टिळकान्चे आर्क्टीक होम ओफ़ वेदाज हे अभ्यासपुर्ण पुस्तक इन्टरनेट वर उबलब्ध आहे.




Shendenaxatra
Thursday, June 07, 2007 - 12:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

**'भोंदू बुवा लोक कसे आम्ही कृष्णाचे अवतार आहोत असे सांगतात.'
ते तसे नाहित ह्याला पुरावा आहे. ते म्हणजे धर्मग्रंथ.
**
उलट मी म्हणेन जेव्हा जेव्हा पृथ्वीवर धर्माला ग्लानी येते तेव्हा तेव्हा मी अवतार घेतो असे गीतेत कृष्णाने ठणकावून सांगितले आहे.
त्यामुळे याबाबतीत गीता अवतार कल्पनेला पुष्टीच देते नाही का?


Dhumketu
Thursday, June 07, 2007 - 4:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुठे आहे ते पुस्तक? लिंक आहे का? गुगल करीनच.. पण ईथे पण देता आले तर बरे... बाकी तुमचे चालू द्या..

Satishmadhekar
Thursday, June 07, 2007 - 5:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> आर्य लोक मूळचे इराणचे.

विजयराव, याबद्दल काही पुरावा आहे का तुमच्याकडे? ते जर मूळचे इराणचे असते तरे तिथे त्यांच्या दैवतांची देवळे, धर्मग्रंथ वगैरे काही पुरावे का सापडत नाहीत?

ब्रिटिशांनी इथल्या समाजात फूट पाडण्यासाठी आर्यांच्या आक्रमणाच्या कल्पनिक कथा निर्माण केल्या. ब्रिटिश जाऊन ६० वर्षे होत आली तरी तुमच्यासारखे याच्यावर अजूनही विश्वास ठेवतात हे भारताचे दुर्दैव आहे.

जर आर्यांचे मूळ वसतिस्थान इराणमध्ये असते, तर, ज्यांनी भारतावर तथाकथित आक्रमण करून इथे प्रचंड वास्तू, संस्क्रुती, ग्रंथ, विज्ञान इ. निर्माण केले, ते त्यांनी त्यांच्या मूळ वसतिस्थानात सुद्धा निर्माण केले असलेच पाहिजे आणि ते इराणप्रमाणेच त्याच्या आजूबाजूच्या देशांमध्ये (इराक, इस्त्रायल, जॉर्डन, सीरीया इ.) सुद्धा सापडले पाहिजेत. परंतु त्या प्रदेशात कुठेही असा पुरावा सापडत नाही.

आर्य नावाची जमात ब्रिटिशांच्या कुजक्या डोक्यातून निर्माण झाली. अशी जमात कधीही अस्तित्वात नव्हती. असलीच तर ती भारतातच होती. कुठलीही जमात तिच्या मूळ स्थानापासून इतरत्र पसरत जाते. मूळ स्थानात त्या जमातीचे जास्तीतजास्त अवशेष सापडतात. आजूबाजूला थोड्या प्रमाणात सापडतात.

हे तथाकथित आर्य सुरवातीपासून भारतातच होते. म्हणून भारतात त्यांच्या वास्तव्याचे सर्वाधिक पुरावे आढळतात. ते इराणमधून आले व इथल्या मूळच्या द्रविड लोकांवर त्यांनी आक्रमण ही शुध्द थाप आहे. भारतातून त्यांची संस्कृती भारताबाहेर पसरत गेली. भारत हा मध्य मानला तर पूर्वेला मलेशिया-इंडोनेशिया, दक्षिणेला श्रीलंका, पश्चिमेला अफगाणिस्थान पर्यंत त्यांची संस्कृती पसरत गेली. उत्तरेला चीनची संस्कृती ही सुद्धा खूप जुनी आहे. तसेच मध्ये हिमालयाचा अडथळा आहे. त्यामुळे नेपाळच्या पलिकडे आर्यांचे फारसे अस्तित्व आढळत नाही. नुकताच रशियामध्ये विष्णूचा एक पुतळा सापडला. म्हणजे काही प्रमाणात रशियापर्यंत सुद्धा भारताची संस्कृती आढळून येते.

विजयराव जरा डोकं वापरून विचार करा. अभारतीयांनी लिहिलेल्या खोट्य कथांवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका.


Mandard
Thursday, June 07, 2007 - 6:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्य नावाची जमात ब्रिटिशांच्या कुजक्या डोक्यातून निर्माण झाली. अशी जमात कधीही अस्तित्वात नव्हती.---------------

ह्याचा तरी पुरावा आहे का? हिटलर पण स्वताला आर्य समजत असे. नाझी लग्नात एक शपथ होती. "मी आर्य वंशिय असुन सर्व गुप्त रोगांपासुन मुक्त आहे":-). असो चर्चा कुठच्या कुठे गेली. रामसेतु तर लोक विसरुन गेले.


Satishmadhekar
Thursday, June 07, 2007 - 6:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> आर्य नावाची जमात ब्रिटिशांच्या कुजक्या डोक्यातून निर्माण झाली. अशी जमात कधीही अस्तित्वात नव्हती.---------------

ह्याचा तरी पुरावा आहे का? हिटलर पण स्वताला आर्य समजत असे. नाझी लग्नात एक शपथ होती. "मी आर्य वंशिय असुन सर्व गुप्त रोगांपासुन मुक्त आहे":-). असो चर्चा कुठच्या कुठे गेली. रामसेतु तर लोक विसरुन गेले.

असेल कदाचित. म्हणजे जर्मनी हे आर्यांचं अजून एक वसतिस्थान झालं. मग आर्यांच्या संस्कृतीचे पुरावे (भव्य देवळे, ग्रंथ, देवांच्या मूर्ती, यज्ञपरंपरा, शिल्पकृती इ.) जर्मनी, इराण, उत्तर ध्रुव आणि त्याच्या आजूबाजूच्या ठिकाणी सापडायला नको का?

आर्य हे इराण, जर्मनी, उत्तर ध्रुव अशा कुठल्याही ठिकाणी असले तरी त्यांनी भारताबाहेरून येऊन इथल्या द्रविडांवर आक्रमण करून त्यांना दास बनवलं ही मात्र शुद्ध थाप आहे.


Vijaykulkarni
Thursday, June 07, 2007 - 10:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जोतिबा फुलेनी केलेले रामायणाचे विश्लेशण वाचले आहे कुणी?

http://www.vaidilute.com/books/tilak/tilak-contents.html


also google mittani and hittites

Chinya1985
Thursday, June 07, 2007 - 10:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सतिशरावांनी लिहिलेले बरोबर आहे. आर्य मुळात भारतातिल आणि ते भारतातुन इतर ठिकाणी गेले होते. रशिया, अजरबाइजान वगैरे ठिकाणी विष्णुच्या मुर्त्या खरच सापडल्या आहेत. आर्यांची भाषा संस्कृत याबद्दल तर वाद नसावेत असे वाटते. ही भाषाच सर्वात जुनी आणि देवांची भाषा आहे असे द्रविडिअन भाषेतिल धर्मग्रंथ पण मानतात.
हिटलरची थिअरी स्वत्:ची होती ती बरोबर मानण्यात काही अर्थ नाही.

गिता अवताराला पृष्टी देत नाही असे मी म्हटलेले नाही. भोंदु बाबा अवतार नाही ह्याला गिता पृष्टी देते अस मी म्हटलय. अशा बाबाला सरळ प्रश्न विचारा 'कृष्णाने म्हटलेय की परमात्मा म्हणुन तो प्रत्येक माणसामधे असतो आणि प्रत्येक माणसाच्या कृत्यांकडे तो लक्ष देत असतो ( as a witness ). मग बाबा अस सांगा की मी काय विचार करतोय???कारण तुम्ही परमात्मा असाल तर माझ्या मनात काय चालु आहे ते तुम्हाला माहित असेल '.याचे उत्तर तो बाबा देउ शकत नाही.
विजयराव भोंदु बाबावर तुमचा विश्वास असेल माझा नाही त्यामुळे मी कोंबडी वगैरे कापणार नाहिच. देवावर विश्वास असला म्हणजे कुठल्याही ऐर्‍या गैर्‍यानी सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवा अस धर्म सांगत नाही.
'रामायणात अध्यात्म कुठे??? ही तर एक गोष्टच.' ह्याला काहिच अर्थ नाही. अहो त्या राजाला झालेल्या मुलांमधे एक जण 'परमेश्वर' होता आणि परमेश्वरानी केलेल्या घटनांमधे अध्यात्म नाही म्हणने एकदम चुकिचे आहे. शेंडेन तुम्हाला आध्यात्म धर्म यांचे ज्ञान नसल्यास त्याबद्दल उगिच चुकिच्या समजुती करुन घेउ नका.
रामायणाचा पुरावा तुम्ही लोक मान्यच करणार नाही. जर काही सापडले तरी 'यावरुन रामायण घडले म्हणने म्हणजे सुतावरुन स्वर्ग गाठणासारख आहे.' असे तुम्ही म्हणाल. नाहितर रामसेतु सारखा दुसरा सेतु जगात कुठेही नाही (नैसर्गिक), आणि खालिल खडक वेगळा आणि वरिल खडक वेगळा असे (आणि इतरही)पुरावे असुनही तो तोडाच असा अट्टाहास तुम्ही लोकांनी धरलाच नसता. नासाने सुध्दा तो मानवनिर्मित नाही कारण त्याकाळात भारतात माणुस सापडलेला नाही अस सावध विधान केलेले आहे.
'ज्याला अमके एक झाले असे सिद्ध करायचे असते त्याने त्याचा पुरावा द्यायचा असतो अमके घडले नाही ह्याचा पुरावा हाच की कुणी घडल्याचा पुरावा देऊ शकलेला नाही हाच.'
चुकिचे आहे म्हणने. एखाद्याला पोलिसांनी पकडले गुन्हा केल्याबद्दल तर कोर्टात मी तिथे नव्हतो, दुसरिकडे होतो असा पुरावा सादर केला जातो.
शिवाय रामनाम आणि त्याची मंदिरे यांमधुन त्याच्या भक्तांना जे आध्यात्मिक अनुभव येतात ते त्या लोकांसाठी पुरावेच ठरतात रामाच्या अस्तित्वाचे.
मंगळावर पाणी नाही असे कितितरी पुरावे आहेत असे हेच लोक ५-६ वर्षापुर्वी म्हणत आणि जणुकाही पुर्ण मंगळ त्यांनी जाउन तपासला आहे अशेच त्यांचे दावे होते.


Mandard
Thursday, June 07, 2007 - 10:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जर रामसेतुची केस जिंकायची असेल तर पौराणिक मुद्द्यांपेक्षा पर्यावरण व संरक्षण या मुद्द्यांवर लढवावी लागेल की ज्यासाठी सबळ युक्तिवाद कोर्टात करता येइल. पण या मधे मग भाजपाला आपली पोळी भाजुन घेता येणार नाही. एकंदरीत या मुद्द्यांवर त्यांना किती मते मिळतील हा एक प्रश्नच आहे.

Satishmadhekar
Thursday, June 07, 2007 - 11:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> जोतिबा फुलेनी केलेले रामायणाचे विश्लेशण वाचले आहे कुणी?


हे वाचण्याची अजिबात आवश्यकता नाही. लेखकाच्या नावावरूनच काय लिहिले असेल हे कळू शकते. एकांगी लिखाण करणारे त्यांच्या प्रत्येक लिखाणामधून एकच बाजू सतत मांडत असतात.

उदा. लोकसत्तामध्ये काय छापून येतं किंवा कुमार केतकर काय लिहीतात हे प्रत्यक्ष वाचण्याची अजिबात जरूर नाही. ते काय तारे तोडतात ते सर्वांना माहित आहे.

अजून एक उहाहरण - स्वतःला जोतिबांचे शिष्य, मानवतावादी, पुरोगामी, फुल्यांच्या साहित्याचे संशोधक इ. बिरूदं लावून घेणार्‍या हरी नरकेंचे एकूण ४ लेख वाचण्याचा योग गेल्या ३-४ आठवड्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाला स्थगिती दिली. सर्व लेखांमध्ये नरक्यांनी या निर्णयावर कडाडून टीका केलेली आहे. चारही लेखांमधला ९० टक्के भाग सारखा आहे. सर्व लेखात ब्राह्मणांवर सुद्धा कडक टीका आहे. ब्राह्मणद्वेष त्यांच्या लिखाणातून स्पष्ट जाणवतो. आता यापुढे कधीही नरक्यांचे लेख वाचायचे नाहीत असे ठरविले आहे. कारण ब्राह्मण कसे नालायक आहेत आणि इतर मागासवर्गीय (म्हणजे माळी, सुतार, शिंपी इ.) ब्राह्मणांमुळे कसे निरक्षर आणि गरीब राहिले एवढंच त्यांच्या लिखाणात असतं.


Santu
Thursday, June 07, 2007 - 11:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ज्योतिब फ़ुले चे ईन्ग्रज प्रेम सर्व श्रुत आहे.
त्यामुळे त्यानी केलेले वीश्लेशण रामायणाचे विश्लेषण.
हे हिन्दुचा मानभंग करणारेच असणार.
या जोतिबाला १८५७ चा उठाव करणारे सुध्दा आवाडत नसत.म्हणुन तर त्याने राणि लक्ष्मीबाई च्या च्यारित्र्यावर सुध्दा शिंतोडे उडवायला कमी केले नव्हते.


Santu
Thursday, June 07, 2007 - 11:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असले ब्रीटिश धार्जिणे भडभुंजे हि
तत्कालीन सत्ताधार्यांची गरज होति.
आताच्या ही आहे.


Santu
Thursday, June 07, 2007 - 12:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे काहि लोकांनि पुष्पक विमान हे काहि थोतांड आहे असे लिहिले आहे.
असे नसुन वेदकालिन विमानाचे desigin वरुन विमान बनवण्याचा प्रयोग हा
मुम्बाईत चौपाटिवर झाला होता १८९५ साली.

हे विमान बनवले होते तळपदे नावाच्या एका यांत्रिकाने. ते वेदाचे गाढे अभ्यासक होते.त्यानी आपल्या पत्नी व आर्किटेक्ट मित्राच्या मदतिने.
भारद्वाजाने ज्याचे वर्णन केले होते त्या सहाव्या व आठव्या प्रकारच्या म्हनजे पुष्पक व मारुत सखा या वैदिक डीझाईन वर हे विमान आधारीत होते

१८९५ ला याचे demonstration मुम्बै येथे चौपाटि वर जाहिर कार्यक्र्मात झाले.याला बडोदा नरेश महाराजा सयाजिराव व न्यायमुर्ति माधवराव रानडे हजर होते हे विमान १५०० फ़ूट उडाले व safe laand झाले.
म्हणुन सयाजिरावानि तळपदे याना गौरविले होते हे सर्व तत्कालिन दैनिक केसरि मधे छापुन आले होते.

नंतर दुर्दैवाने तळपदे यांची पत्नि वारली.त्या मुळे त्यांचा interest कमी झाला.
त्याच्या म्रुत्यु नंतर हे मशीन त्यांच्या वारसानी १९१७ मधे rally brothers या ब्रिटिश निर्यातदारांना विकले.

तेव्हा वेद हे अगदि शास्त्रिय आहेत यात शंका नाहि.



Santu
Thursday, June 07, 2007 - 1:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगस्त्य संहितेत hydrgen gas पाण्यापासुन कसा वेगळा
करावा याचे वर्णन आहे. यात छ्त्र म्हणजे बलून च्या साहाय्याने
उडन्याचे तंत्र सांगितले आहे.

भारद्वाजाने जो यंत्र सर्वस्व हा ग्रन्थ लिहिला त्यात वैमनिक शास्त्र
म्हनुन वेगळा सेक्शन आहे

याचाच वापर या तळपदेनी केला.



Sunilt
Thursday, June 07, 2007 - 1:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



Israel's lost 40 years

By Meir Shalev

I WAS born during the 1948 war, which we Israelis refer to as the War of Independence. At the time, we were fighting against the Palestinians and the Arab nations, who refused to accept the U.N. Partition Plan that would have divided Palestine into two states for two peoples.

Nineteen years later, during the Six-Day War of 1967, which started on June 5, it was my turn to fight. I took part in the battles for the Golan Heights. Several weeks after the war ended, I was given a short furlough and went home, to Jerusalem. My father led us on a tour of the places that had been off-limits to us until that time.

Forty years have passed since the Six-Day War. My parents are no longer alive. I can no longer argue about politics with my father. The truth is, we put a stop to that while he was still alive. We discovered that it is was much more pleasant and interesting to argue about literature.

Forty years have passed, and Israel has indeed choked. The country is busy dealing with one matter: the occupation — the territories, the Palestinians, terror, holy sites, the establishment and evacuation of settlements. Forty years have passed, and Israel has neglected everything that the Israel of 1948 wished to occupy itself with: education, research, welfare, health.

"Forty years" is not just some round number. It is a period with traditional meaning, a number through which God tends to emphasise its will. The flood continued for 40 days and 40 nights; Moses remained on Mt. Sinai for 40 days and 40 nights; the Jewish people wandered the desert for 40 years; Jesus sequestered himself there for 40 days. It seems to me that God is sick of religious figures and generals and politicians who claim to speak in his voice. He is taking advantage of this mathematical moment and letting everyone know that now is the time to settle up.

Forty years after that great victory, he is showing us that it is not only the Palestinians who are paying the price of occupation and settlement; the Israelis are as well. Forty years, and Israel is forced to decide which is more important: the lives of its sons and daughters or the graves of its ancestors.

Forty years of an army whose main occupation has been manning roadblocks, detaining suspects, assassinating enemies and guarding settlements have brought us to the high level of arrogance and low level of capability that the Israeli Defence Forces displayed during last year's war in Lebanon.

Forty years of deceitful, villainous dealing in the occupied territories have caused corruption to seep into our own politics and society. Forty years, and we must come to terms with the fact that Israel cannot cultivate democracy at home and apartheid in the backyard.

Forty years, and for the first time one can hear voices doubting whether the Jewish state will be around for another 40.

—Los Angeles Times

The writer is a columnist for the Israeli daily Yediot Aharonot.



Chyayla
Thursday, June 07, 2007 - 2:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असाच लेख मुस्लिम राष्ट्रात लिहिला असता तर जास्त वास्तविक असता फ़क्त ४०च्या ऐवजी ४००, ४००० असा आकडा आला असता.


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators