Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 03, 2007

Hitguj » Views and Comments » Current Affairs » बातम्यांचे / लेखांचे संकलन » Political » Archive through June 03, 2007 « Previous Next »

Chinya1985
Friday, June 01, 2007 - 9:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी परत लिहितो आहे खालिल पुस्तक जरुर वाचावे.त्यात बरेच पुरावे आहेत राम आणि रामसेतुबद्दल
''रामाच्या पाउल वाटांवरुन केलेली वाटचाल'

खालील लिन्क पण वाचावी-
http://www.rediff.com/news/2007/apr/25tarun.htm

वर त्सुनामीबाबत मुद्दा निघाला होता-अगदी बरोबर आहे की त्सुनामीचा धोका सेतू तोडल्यास वाढतो आहे.
प्रो.टेड मर्फ़ी जे त्सुनामी एक्स्पर्ट आहेत त्यांनी सरकारला warn केल आहे की जर सेतु तुटला तर त्सुनामिचा धोका वाढेल. मागच्या त्सुनामीत केरळला कमी धका बसला त्याच कारण आहे रामसेतु.
अजुन एक मुद्दा असा की सध्याच्या सेतुसमुद्रम प्रकल्पाला alternative एक दुसरा मार्ग आहे ज्यामुळे रामसेतुला बाधा पोहोचणार नाही आणि सेतुसमुद्रमचा उद्देशही सार्थ होइल. सरकारनी तो पर्याय का नाही घेतला याला काहिच स्पष्टीकरण नाही.माझ वैयक्तिक मत आहे की डिएमके या हिंदुविरोधी पक्षाला हा सेतु तोडायचाच आहे आणि त्यामुळेच केन्द्र सरकार पण विरोध करत नाही.

केदारने दिलेली रामायणाची माहिति अगदी बरोबर आहे त्या कथेवरुन आठवल की जेन्व्हा वालिचा वध झाला तेन्व्हा प्रभु रामावर वाली चिडुन म्हणाला (मरण्यापुर्वी) 'हे रामा तुझ्यासारख़्या सत्यवानाकडुन ही अपेक्क्षा नव्हती'.तेन्व्हा केदारनी लिहिलय त्याप्रमाणे रामाने उत्तर दिले शिवाय प्रभु म्हणाले 'की तु एक वानर आहेस आणि ज्याप्रमाणे शिकार करताना ती पळुन जाउ नये म्हणुन क्षत्रियांना चोरुन वार करायचा अधिकार आहे त्याच अधिकारानी मी तुझा वध केलाय.त्यामुळे माझ्याकडुन तुला मारताना चुक झालेली नाही' त्यानंतर वालीनेसुध्दा रामाने जे केले ते बरोबरच केले असे मान्य केले.




Maitreyee
Friday, June 01, 2007 - 11:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

radiometric method ही खडकांचे वय ठरवताना वापरली जाते,
'इथे पहा'
ती कार्बन ची जी पद्धत आहे ती जीवाश्मांसाठी वापरतात.
मला हीच उत्सुकता आहे की असा काही अभ्यास केला गेला आहे का तिथे? कुणाला अजून माहिती असल्यास वाचायला आवडेल.

Vijaykulkarni
Friday, June 01, 2007 - 11:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला तर एखाद्या देवळात रामायणाच्या पुराणाला बसल्यासारखे वाटते :-)

आपल्य देशात निम्म्या लोकान्ना प्यायला शुद्ध पाणी मिळत नाही. रामसेतु, राममन्दिर असले निरर्थक विषय पेटवणे जरूर आहे का?

कॉन्ग्रेसला पर्याय नाही.



Kedarjoshi
Friday, June 01, 2007 - 11:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला तर एखाद्या देवळात रामायणाच्या पुराणाला बसल्यासारखे वाटते >>>

काय करनार कुलकर्णी तुम्ही काही ऐकायलाच तयार नाहीत म्हणुन पुराण सांगावे, आय मिन लिहावे लागते.


Sahilshah
Saturday, June 02, 2007 - 12:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुळकर्णी साहेब,


तुम्ही म्हणता की देशातल्या निम्म्या लोकाना प्यायला पाणी नाही आणि ६० पैकी ५० वर्ष राज्य केलेल्या कॉग्रेस ला पर्याय नाही!

ये बात हजम नही हुइ



Chyayla
Saturday, June 02, 2007 - 12:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे असे म्हणु नका कुळकर्णी तुम्हाला काय "गाढवासमोर वाचले रामायण" हे सुचवायचे आहे का?

अहो केदार, विजय रावान्ची हे शरणागतीचे निषाण आहे जेन्व्हा खुसपट काढुन त्यान्च्या स्वता:वर उलटले, त्यान्चे मुद्दे फ़ुसके म्हणुन सिद्ध झाले की मग त्याना आठवतात असल्या समस्या, पाणी, वीज भाकरी वैगेरे... आता परत ईथे त्यान्चे तर्क, मुद्दे सम्पल्याचे निषाण त्यानी लावल्याचे दिसतेय... विजयजी भेटु या मग थोड्या विश्रान्ती नन्तर. नव्या खुसपटासोबत... पण तुमच्यामुळे या मायबोलीवर खरच जीवन्तपणा आहे आणी मजा आहे.

शैलेश...

चिन्या तो रेडिफ़चा लेख खरच वाचनिय आहे, त्यात कालिदास लिखित रघुवन्शमचाही पुरावा दीला आहे तसेच ईतरही पुरावे जबरी आहेत. एका ठिकाणी तर स्पष्ट लिहिले आहे The bridge's unique curvature and composition by age reveals that it is man-made पण ज्याना काय नुसता विरोधासाठी विरोध करायचा आहे त्यान्ची ईकडे कीव यावे असे तर्क व चेष्टा सुरु आहे. ही खोड जुनीच.
खरच सेतुसमुद्रमला चान्गले पर्याय उपलब्ध असताना असलेला पुरातन ठेवा तोडायचा आणी तेही स्वता:चे सेक्युलरत्व सिद्ध करण्यासाठी हे अजबच आहे. त्या नादात ईतक्या सगळ्या विधायक आक्षेपाना जाणुन्बुजुन दुर्लक्ष करणे म्हणजे काय समजावे.

मैत्रेयी तुझा मुद्दा ठीक आहे हे सगळ सन्शोधन करताही येइल पण आधी तो सेतु वाचवणे महत्वाचे नाही का? असो मी जे म्हटले की सेतु मानवनिर्मित असो की निसर्गनिर्मित तरी हा ठेवा उध्वस्त करणे कितपत सायुक्तिक आहे असे म्हणायचे आहे, तुला हे पटतय का?


Satishmadhekar
Saturday, June 02, 2007 - 9:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> कॉन्ग्रेसला पर्याय नाही.

अगदी खरं आहे तुमचं म्हणणं विजयराव. मी तुमच्याशी संपूर्ण सहमत आहे.

भारताला पूर्ण रसातळाला न्यायचं असेल तर कॉंग्रेसला अजिबात पर्याय नाही. बघा ना. कॉंग्रेसने पंजाब पेटवून दिला, राजस्थानमध्ये आग लावली . . . भारताची संपूर्ण राखरांगोळी झाल्याशिवाय ती इटालियन महिला आणि तिचे लाळघोटे स्वस्थ बसणार नाहीत. परत त्यांना तुमच्यासारख्या कुलकर्ण्यांची साथ आहेच. मग भारताचं वाटोळं व्हायला कितीसा वेळ लागणार!


Maitreyee
Saturday, June 02, 2007 - 12:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सेतु मानवनिर्मित असो की निसर्गनिर्मित तरी हा ठेवा उध्वस्त करणे कितपत सायुक्तिक आहे असे म्हणायचे आहे, तुला हे पटतय का?

हं, हे बाकी बरोबर आहे तुझे :-)
सतिश चा वरचा सागरी पर्यावरणावर काय परिणाम होईल हा मुद्दा पण अतिशय महत्त्वाचा आहे.


Chyayla
Saturday, June 02, 2007 - 12:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद मैत्रेयी...

मित्रान्नो मला एकन्दरीत सरकारचा सेतु तोडण्याचा अट्टाहास पहाता तालिबनची बामियान मधील मुर्ती फ़ोडण्याची घटनेची आठवण येते. सारे जग त्याना विनवणी करुन सान्गत होते तरी त्यानी स्वता:चा कट्टरपणा सिद्ध करायला त्या फ़ोडल्याच. तशीच या सरकारची ही ईथे सेक्युलर कट्टरता दीसुन येत आहे. तालीबान व Pseudo Secular सरकार यान्ची मानसिकता एकच.

बर असेही नाही की हा सेतु म्हणजे गुलामगिरीचे चिन्ह आहे उलट त्यामागे आहे आपला गौरवशाली ऐतिहासिक ठेवा, करोडो भारतियान्चा भावना, श्रद्धा यान्चा प्रश्न, नैसर्गिक सरन्क्शण भीन्त शिवाय उपल्ब्ध असलेले पर्याय हे पहाता हा सेतु तोडणे कोणत्याच द्रुष्टीने योग्य वाटत नाही.


Slarti
Saturday, June 02, 2007 - 3:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काही मुद्दे मांडतो आणि थांबतो.
१. माझ्या कुठल्याही post मध्ये मी रामाच्या अस्तित्वावर किंवा रामायणाच्या खरेखोटेपणावर शंका घेतली नाहीये. उलट रामाचे अस्तित्व गृहीत धरूनच मी बोलत होतो. याचे मुख्य कारण असे की मुद्दा फक्त रामसेतूचा होता. मुळात मला हेच कळाले नाही की 'रामाने सेतू बांधणे वा न बांधणे' याचा रामाच्या अस्तित्वाशी काय संबंध ? अगदी गृहीत जरी धरले की तो रामाने बांधला नाही तरी त्यावरून रामच अस्तित्वात नव्हता हे म्हणणे सुतावरून स्वर्ग गाठणे आहे. याची मला कल्पना असल्याने मी फक्त रामसेतूसंबंधी प्रश्न विचारले होते. एवढेच नव्हे, तर माझ्या माहितीप्रमाणे मी कुठेही 'पुरावा' मागितला नाही. उलट स्पष्ट लिहिले आहे की पुरावा मागत नसून तर्क कळाला नाही म्हणून विचारत आहे. याच कारणाने जाणकारांना विनंती केली. संतूने जी काही छायाचित्रे इथे ठेवली ती पुरावा म्हणून. तेव्हा मला पुरावे अपेक्षित नसूनसुद्धा केवळ त्याच्या विचारांत मला जाणवलेली त्रुटी दाखवण्यासाठी तिथे लिहिले.
२. उत्सुकता आहे (किंवा होती) ती हे काम कसे केले गेले असेल त्याबद्दल. म्हणून मनुष्यबळासंबंधी प्रश्न. इतकेच नव्हे, तर मी वानरांच्या वापराची शक्यतादेखिल नाकारत नाही (परत, तो विषय नाही), म्हणून मी त्यांच्या संख्येबद्दल, training बद्दल प्रश्न विचारले होते. मला जे अंदाज पाहीजे होते ते यासंबंधी. यासंदर्भात केदारचा 'झेंड्यांवर प्राणी' असण्याचा मुद्दा मला intersting वाटला. नौदल, उथळ समुद्र वगैरेंबद्दलही मला कुतूहल होते म्हणून विचारले, त्यात राम मूर्ख कसा होता वगैरे काहीही नाही. 'बिभिषणाकडून रामाला कळवले गेले' हे स्पष्टीकरण पटले. तिथे आधीच उथळ भाग होता, त्यात थोडा भराव टाकून सेतू केला असेल हा तर्कसुद्धा माझ्या नुकताच डोक्यात आला. च्यायलाने तो मांडला आहे. मला अशा प्रकारचे 'अंदाज' अपेक्षित होते. रामायण खोटे वगैरे सिद्ध करायला मांडा ठोकून बसलो नाहीये (निदान इथेतरी). मला खरोखर तत्कालीन logistics जाणून घेण्यात रस आहे, किंबहुना होता. त्यामुळेच गलबतांच्या मुद्यामागील तर्क चुकीचा आहे हे जाणवल्याने स्वतःच तो तर्क खोडून काढला आहे.
३. रामसेतूचे वय अजूनही आपल्याला निर्विवाद सिद्ध करता येत नाही याची मला खरोखर कमाल वाटते हे मी स्पष्ट लिहिले आहेच. carbon-dating/radiometric method का वापरले जात नाही कोण जाणे ?
४. माढेकरांनी लिहिले की इथे भावनेचा प्रश्न गैरलागू आहे. हे मला पटत नाही हेसुद्धा मी सांगितले आणि त्याचे कारणसुद्धा स्पष्ट केले आहे. प्रश्न भावनेचा आहेच, विश्वासाचा आहेच. जर बहुसंख्य ( = majority ) लोकांना त्या सेतूसंबंधी तीव्र भावना (मग धार्मिक असोत वा कुठल्याही) असतील तर सरकरने तो पाडू नये. ते लोकशाहीस अनुसरून आहे असे माझे मत आहे. इथे हे लक्षात ठेवणे महत्वाचे की वाद आहे तो जनता आणि लोकनियुक्त सरकार यांच्यामध्ये. हा दोन भिन्न जाती अथवा धर्मांमधील वाद नाही. याच कारणामुळे मी असेही मानतो की (समजा) तो सेतू मानवनिर्मित नाही हे सिद्ध होऊनसुद्धा जर लोकांना तो भावनिक कारणांसाठी पाडला जाऊ नये असे वाटत असेल तर तो मुळीच पाडला जाऊ नये. तो सेतू ठेवून होणारे आर्थिक नुकसान सहन करायची जर बहुसंख्यांकांची तयारी असेल तर त्याबाबतीत सरकार काहीही करु शकत नाही (फारतर ते जनतेस त्यांचे मत पटवून द्यायचा प्रयत्न करू शकते, पण बळजोरी करू शकत नाही). जनतेला इथे भावना महत्वाच्या वाटत असतील तर so be it . प्रत्येक गोष्ट आर्थिक फायदे-नुकसान अशी तोलता येत नाही. शिवाय आता पाडले आणि उद्या जर असे सिद्ध झाले की ती मानवनिर्मितच आहे तर तेव्हा आपला 'बैल गेला....' होईल त्याचे काय ?
५. मी आस्तिक आहे की नास्तिक, राम आहे की रावण (किंवा माणूस आहे की माकड) हा विषय चर्चा करण्याइतपत महत्वाचा / उद्बोधक / मनोरंजक असेल तर आनंद आहे, पण त्यासाठी ही जागा उचित नाही.
६. धर्मग्रंथांमध्ये लिहिलेले शब्दशः खरे असे मानणार्‍यांबरोबर मी वाद घालू शकत नाही, ती इच्छाही नाही. श्रद्धा / भावना यांच्याशी खंडनमंडन होत नाही या माझ्या जुन्या अनुभवाला परत पुष्टी मिळाली असे समजतो आणि थांबतो.


Chinya1985
Saturday, June 02, 2007 - 3:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मैत्रेयी कार्बनिंगबद्दल माहिती वाचली.पण माझ्या कालच्या प्रश्नाला उत्तर मिळाले नाही.परत प्रश्न- "खडकांचे वय समजल्यास ते खडक त्या समुद्रात कधी आणले गेले हे कसे समजणार??"
दुसरा मुद्दा-"खडकांचे दोन वेगवेगळे प्रकार आहेत हा सुध्दा एका प्रकारचा पुरावा ठरतो की पुर्विच्या खडकांवर नवे खडक टाकुन सेतु बनला आहे.कारण खाली एक प्रकारचा खडक आणि वर एक प्रकारचा खडक आहे.".....याला तुझे उत्तर काय??
मी काल एक इंग्लिशमधील बातमी paste केली होती.ति वाचली का??? त्यामधे सेतुचे वय दिलेले आहे. माझ्यामते ते वय रेडिओआयसोटोप वगैरे method निच काढले असेल.

पर्यावरणावर तर खुपच परिणाम होणार आहेत. केरळमधील मच्छिमारांनी याला विरोध दर्शविला आहे कारण तेथिल मासे वगैरे या project मुळे नष्ट होणार आहेत. आपल्या देशाने त्सुनामीचा मुद्दा विसरू नये कारण सेतू पडल्यास केरळ व इतर राज्यांमधील त्सुनामीची तिव्रता वाढेल.

काल एक गोष्ट लिहायची विसरलो. इथे म्हणत आहेत की वाल्मिकी भारताच्या उत्तरेकडुन दक्षिणेपर्यंत फ़िरले असतिल आणि रामायण लिहिले असेल.शिवाय असही लिहिलय की हडप्पा,मोहोंदोजोडो वरुन हे prove होत की आपण मागास होतो(मला हे माहित नव्हत,माझ्या माहितिप्रमाणे हडप्पा,मोहोंदोजोडो शहर चांगले होते आणि drainage system पण अतिशय उत्तम होति.) पण ठिक आहे मुद्दा मांडणारा म्हणतोय की मागास होते तर आपण ते थोड्या वेळासाठी मान्य करु. बर मग हे सांगा की हे मागास वाल्मिकी भारततीलच नव्हे तर लंकेतिल ठिकाणेही कशी अचुक सांगतात? रामायणात लंकेतिल ठिकाणांचीही माहिती आहे. आणि आरमार नव्हते म्हणणारे याला काय उत्तर देतात??
विजयराव प्यायला शुध्द पाणी नाही याची एवढी चिंता आहे तर तुम्ही दररोज मायबोलीवर कशाला वेळ वाया घालवता आहत???सगळ्यांना पाणी शुध्द मिळेल यासाठी काहितरी करा. आणि रामायणातिल पुराण तुमच्या सोनिया मनमोहन च्या फ़ाल्तु भाषणांहुन कितितरि पटीनी चांगले आणि उपयुक्त आहे.बर महात्मा गांधींच्या(ज्यांनी शेवटच्या घटकेला 'हे राम'म्हटले होते) कोन्ग्रेसमधे हे होतय हे कळून तर तुमची तळपायाची आग मस्तकात जायला हवी.पण नाही बहुतेक महात्मा गांधिंपेक्षा सध्याच्या पोटभरू कोन्ग्रेसच्या नेत्यांबद्दल आपल्याला जास्त आदर असावा.
सतिशराव एक कुलकर्णी म्हणुन मी तुम्हाला सांगू इच्छितो की विजयरावांसारखे फ़ार कमी कुलकर्णी कोन्ग्रेसला साथ देतात.
च्यायला,तालिबानबरोबर केलेली कोन्ग्रेसची तुलना अगदी बरोबर आहे.


Chinya1985
Saturday, June 02, 2007 - 4:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्लार्तिनी स्वत:ची बाजु स्पष्ट केली हे बर झाल.
माझा उल्लेख न करता माझ्याशी चर्चा करणे निरर्थक हे त्यांचे म्हणणेही कळले.तरी हा विषय मी सुरु केल्याने त्यांच्या मुद्द्यांबद्दल लिहितो.

तुम्ही जर राम मानता तर ते भगवान होते हेही मानायला हवे.कारण रामाचे अस्तित्व रामयणातुन कळते आणि रामायणातील राम तुम्ही मानत असाल तर त्याच रामायनात ते भगवान होते हेही मानायला हरकत नाही.ज्याने ही स्रुष्टी हे जग,त्यातिल नियम बनवले तो त्या नियमांना बदलू शकतो हेही कळणे फ़ार अवघड नाही.

आता पुढे-तर्कातुन धर्म शिकायला ती काय detective serial नाही.धर्मग्रंथ देवाकडुन आले आहेत आणि तो देव आपल्यासारखा limited नाही त्यामुळे त्याने लिहिलेल्या गोष्टींवर आपण तर्क लढवून 'मीच तो महान,देवाने हे सर्व अस स्पष्ट लिहायला पाहिजे होते' असे म्हणून देवापेक्षा मिच मोठा अशी विचारसरणी सोडावी (स्लार्ती अशेच असतिल असे म्हणत नाही पण generally अशी माणस आढळतात).
सेतूच्या वयाबद्दल मी काल paste केलेली इंग्लिश बातमी वाचावी


Chyayla
Saturday, June 02, 2007 - 4:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्लार्ती, तुमची बाजु तुम्ही स्पष्ट केली व मी पण त्याचा आदर करतो. पण तुमचे आधीचे पोस्ट वाचुन तुम्ही ईतरान्प्रमाणे केवळ विरोधासाठी विरोध करता आहात असेच जाणवले. त्यातल्या त्यात तुमच्या बद्दल गैरसमज झाला असल्यास माफ़ी मागतो कारण चर्चा जर निकोप वातावरणात मुद्दे सुद झाली तरच त्याचा उद्देश सफ़ल होतो. . तेन्व्हा तुम्ही चर्चा सोडुन जाउ नये अशी ही ईछा: - आपलाच मायबोलीकर... लोभ असावा

तुमच्या मुद्यान्ची बरेचशी उत्तरे केदार व चिन्या, सन्तु यान्नी पण दीलीच आहेत.

तुमचा अजुन एक प्रश्न हा सेतु वानरानी कसा बान्धला असेल त्यावर माझाही एक तर्क आहे. की त्याकाळी वानर, एवढच काय मनुष्य हे महाकायच होते निदान आजच्या मानवापेक्षा निश्चितच विशाल होते. त्यान्च्यासाठी मोठे मोठे दगड, झाडे उचलुन टाकणे काहीच कठीण नव्हते. दगड टाकुन सेतु बनवण्याची बुद्धी त्यान्च्यात निश्चितच होती.
एवढच काय आदीम मानवाचा लाख वर्शापुर्वीचे स्वरुप हे अक्षरशा: हनुमान व ईतर रामायणात वर्णीत वानरान्शी मिळते जुळते आहे, त्याबद्दल ची नेमकी माहिती शोधतोय मिळाली की ईथे देइलच.

तोपर्यन्त ही एक माहितीपुर्ण चित्रफ़ीत ईथे देत आहे. ज्याना रामसेतु बद्दल खरोखरच जाणुन घ्यायची ईछा, उत्सुकता आहे त्यान्च्यासाठी. तात्पर्य चर्चा पुढेही चालु रहावी मला वाटत ही चर्चा या विशयाचा BB बनवुन तिथे हलवले तरी बरे राहील.

http://video.google.com/videoplay?docid=6509290413834157980


Vijaykulkarni
Saturday, June 02, 2007 - 4:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धर्मग्रंथ देवाकडुन आले आहेत आणि तो देव आपल्यासारखा लिमितेद नाही त्यामुळे त्याने लिहिलेल्या गोष्टींवर आपण तर्क लढवून 'मीच तो महान,देवाने हे सर्व अस स्पष्ट लिहायला पाहिजे होते' असे म्हणून देवापेक्षा मिच मोठा अशी विचारसरणी सोडावी

हे बायबल आणी कुराणाबाबत ही खरे आहे का?

बमियान बुद्ध मुर्थी तालिबानी लोकानी केवळ कुरापत म्हणून फोडल्या होत्या ( जशी बाबरी मशीद फोडली )

राम सेतु तोडण्या मागे दळणवळण सुधारणा हा हेतु आहे.

आणी भारतीयान्च्या मनात रामयणबद्दल असलेली श्रद्धा एक पुल तोडल्याने कमी होणार आहे का?

बर मग हे सांगा की हे मागास वाल्मिकी भारततीलच नव्हे तर लंकेतिल ठिकाणेही कशी अचुक सांगतात? रामायणात लंकेतिल ठिकाणांचीही माहिती आहे.

कोणती बरे?



Chyayla
Saturday, June 02, 2007 - 4:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विजयराव...

मी तुमच्या याच पोस्टची वाट पहात होतो


बर असेही नाही की हा सेतु म्हणजे गुलामगिरीचे चिन्ह आहे उलट त्यामागे आहे आपला गौरवशाली ऐतिहासिक ठेवा

हे वाक्य केवळ तुमच्याचसाठी लिहुन ठेवले होते. (मासा बरोब्बर गळाला लागलाच)

बरे रामसेतु बद्दल तर पुरावे त्यामानानी कमी आहे पण बाबराने आक्रमण करुन राममन्दीर तोडुन तिथे मशीद बान्धली यासाठी तर खणखणीत व भरभक्कम पुरावे आहेतच (पुराव्याने शाबीत) .. बौद्धानी आक्रमण केल्याचे तरी माझ्या माहितित नाही त्यामुळे बामियान बुद्धमुर्ती व बाबरी याची तुलनाच एक मुर्खपणा हे सान्गायलाच नको... मग आता बोला पुरावा असुनही तुम्हाला विरोधासाठी विरोध चालुच आहे ना? तुमचा हाच नाटकीपणा उघड करायचा होता ती सन्धी तुम्ही अपेक्षेप्रमाणे ताबडतोब दीलीत... तर आपण भेटलोच परत एका खुसपटीसोबत



Chinya1985
Saturday, June 02, 2007 - 10:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विजयराव तुम्ही माझ्या पोस्ट्स वाचा त्यात बायबल आणि कुराणाबाबत माझी मते दिली आहेत (कालची पोस्ट).

दुसरा मुद्दा-बाबरी मशिद राम मंदिर तोडुन बनवण्यात आली होती त्यामुळे ती तोडल्याने काहि चुक झाली असे मला वाटत नाही.उद्या तुमचे घर कोणी बळकावले आणि ते पाडुन नविन घर अथवा वास्तु बांधली. 'जशास तसे'पध्दतीने तुम्ही बळाचा वापर करुन ती जागा मिळवली आणि त्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी नवी वास्तु बांधली तर त्यात काय चुक???आमची राम मंदिराची जागा त्यांनी बळकावली ती आम्ही परत घेतली तर त्यात काय चुक????शिवाय मुस्लिम जर आम्हाला त्यांचे भाऊ मानतात तर ते स्वत्: ती जागा आम्हाला का देत नाहित???

दुसर म्हणजे दळणवळण्-जे सरकार कुतुब मिनार साठी मेट्रोचा मार्ग बदलत, ancient potteries and jewellery करोडो रुपये खर्च करुन museums मधे ठेवत तेच सरकार रामसेतु का तोडत???जेन्व्हा रामसेतुला सोडुन दुसरा मार्ग असताना??सुधारणा वगैरे ठिक. आपल्या मुस्लिम बांधवांना विचारा की मक्केतील,मदिनातिल धार्मिक ठिकाणी जर तेलाची प्रचंड खाण किंवा सोन्याची खाण वगैरे सापडली तर ती धार्मिक स्थळे उध्वस्त करायला काय हरकत आहे आणि ऐका त्यांचे उत्तर काय असेल आणि मग आम्हाला शिकवा दळणवळण
,सुधारणा वगैरे (हे करताना जरा सांभाळुन कारण मक्केबाबत असे बोलतोस म्हणुन तुमचा खुन पाडायलाही ते मागे पुढे पहाणार नाहित)

तुम्ही लिहिलय-'आणी भारतीयान्च्या मनात रामयणबद्दल असलेली श्रद्धा एक पुल तोडल्याने कमी होणार आहे का?'
मग बाबरी मशिद तोडल्याने अल्लाबाबत मुसलमानांची श्रध्दा कमी होणार आहे का???

वाल्मिकिंनी रामायणात 'अशोक वाटिकेचा'उल्लेख केलाय लंकेत अशोक व्रुक्ष आढळतात(वाटिका अजुनही अस्तित्वात असल्यास मला माहित नाही).शिवाय 'मन्नार 'हा लंकेतिल प्रदेश प्रभु रामांनी आणि हनुमानानी शोधला होता (त्याला संस्कुतमधे महातीथ म्हणतात).लंका अतिशय सुंदर होती असे रामायणात लिहिलय तेही खरेच,लंकेला 'रत्न द्विप' म्हटल आहे तेही खरेच्- Sri Lanka has the highest density of gem deposits compared to its landmass तेथे रत्नपुर नावाची एक जागा आहे जिथे खुप रत्न सापडतात. रामायणात लिहिलय की भरपुर रत्न तिथे होते आजही नद्यांच्या पात्रात वगैरे रत्न तिथे सापडतात. अजुनही बरिच ठिकाणे (लंकेतलि)रामायणात दिली आहेत पण परत तुम्ही म्हणाल मंदिरातिल पुराण सुरु झाले वगैरे.

विजयराव तुम्ही आम्हाला प्रश्न विचारता आणि आम्ही उत्तरे देतो. आम्ही विचारलेल्या प्रशांची पण उत्तरे द्या.


Santu
Sunday, June 03, 2007 - 12:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिन्या
तुमची कमाल आहे.
वा फ़ारच मुद्देसुद माड़अणि केलि. आहे.
विजय
आता या मुद्द्यला उत्तर द्या उगिच भाकरी थापत बसु नका.


Vijaykulkarni
Sunday, June 03, 2007 - 2:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाबराने आक्रमण करुन राममन्दीर तोडुन तिथे मशीद बान्धली यासाठी तर खणखणीत व भरभक्कम पुरावे आहेतच (पुराव्याने शाबीत)

कोठे बुवा?
की प्रवीण जि तोगडियानी सन्गितलीले ब्रह्मसत्य असे अम्ही मानायचे?
सन्त कबिरच्या साहित्यात रामजन्मभुमी तोडल्याचा साधा उल्लेख हे नाही.
की ते सुध्हा सुडो सेकुलर की काय होते?
आणी एवढा गोन्धळ घालून बाबरि मशिद पाडली त्या जागी मन्दिर बान्धायच्या गर्जना दर वर्शी करून मन्दिर अजूनही का नाही
भारताच्या सुदैवाने हा रामसेतुचा फटाका फुसका निघण्याची लक्शणे आहेत.
हिन्दु समाजात सुधारणा करायला वेळ नाही, पण पेटवा पेटवी करायला बर वेळ आहे?




New Delhi : Jagatguru Shankaracharya Adhukshjananda Tirtha of Jagannathpuri has demanded from the Union Government to clamp a ban on Rashtriya Swayam Sevak Sangh, Vishwa Hindu Parishad and Bajrang Dal for creating communal atmosphere in the country. He also urged the government to put an end to the ongoing move of the Modi administration to keep minorities under perpetual terror in Gujarat.



Vijaykulkarni
Sunday, June 03, 2007 - 2:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजुनही बरिच ठिकाणे (लंकेतलि)रामायणात दिली आहेत पण परत तुम्ही म्हणाल मंदिरातिल पुराण सुरु झाले वगैरे.

लन्केतील क्रिकेट स्टेडियम ची माहिती पण आहे असे ऐकले :-)

मुळात मुद्दा रामायणाच्या सत्यासत्यतेचा नाहीच. प्रत्यक्ष घडलेल्या घटनान्चे कल्पनारन्जन मिश्रित आणी रुपकात्मक लेखन हे सर्वानच मान्य आहे.

रामायणात वर्णलेल्या घटना ( पायसदान, अहिल्या..) या खरोखर आही तशा घडल्या असे आपण मानता का?


Chyayla
Sunday, June 03, 2007 - 3:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्या बात है.. विजय साहेब बातमी जरा पुर्ण देत जा अर्धवट बातमी वाचुन हुरळुन जाउ नका, असे Pseudo शन्कराचार्यान्ची काही कमी नाही. असले ऐरे गैरे पुष्कळ सापडतील.
असो त्यापुढील बातमी... (आदी शन्कराचार्यान्नी गोवर्धनपुरीला कधी मठ स्थापन केला बुवा?)
Goverdhanpuri is no mutt and Aadhokshjanand is no Shankaracharya

आता झाली ना पन्चाईत.


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators