Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 01, 2007

Hitguj » Views and Comments » Current Affairs » बातम्यांचे / लेखांचे संकलन » Political » Archive through June 01, 2007 « Previous Next »

Chinya1985
Thursday, May 31, 2007 - 5:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्लार्तीनी मांडलेले मुद्दे बहुतांश चुकिचे आहेत. 'बाप दाखव नाहितर श्राध्द कर' अशातला प्रकार आहे हा. आपण जगात प्रत्येक गोष्टीत पुरावा मागत नाही.प्रत्येक जणाला आईवडील असतात किती जणांनी DNA चाचणी केलेली असते?मग कशाहुन तुम्ही म्हणता की तुमचा बाप तुमचाच आहे म्हणून? स्लर्ति धार्मिक गोष्टींना पुरावे मागतोय असे पुरावे त्याने सर्व ठिकाणी मागावेत. आपण दररोज बातम्या वाचतो कशावरुन त्या खर्‍या?स्लर्तिनी तिथे पेपरवाल्यांना पुरावे मागावेत.मागतो का???आपल्याला पुस्तकांमधे माहिति मिळते ती कशावरुन खरि???तिथेही पुरावे मागा नव्हे स्वत्: पुरावे बघा आणि मग ठरवा.पण आपण असे करत नाही.कारण त्या गोष्टी authorities कडुन आलेल्या असतात आणि त्या खर्‍याच असे आपण ठरवतो. आपण सर्व गोष्टींची शहानिशा करत फ़िरत नाही. मी काल काही मुद्दे शेवटी दिले होते की आपण limited आहोत,आपण चुका करु शकतो. त्यामुळे आपण देव या सत्यापर्यंत आपल्या logic नी पोहोचू शकत नाही.म्हणुन आपल्याला धर्मग्रंथांची गरज आहे.कारण ते त्या सत्याकडुन आलेले आहेत. स्लार्ति नास्तिक असेल तर त्याच्याशी रामसेतु वर चर्चा जरुरी नाहि तर देवाच्या अस्तित्वावर चर्चा जरुरी आहे. आणि तो आस्तिक असेल तर त्याला मी इतकेच सांगु इच्छितो GOD and this world which is made by him is full of misteries मी पण पुर्वी स्लार्तिप्रमाणेच प्रश्न विचारायचो पन आता मला कळले आहे की i am limited n with my limited senses n limited mind i cann't reach God
त्यामुळे वानरांनीच सेतु बांधला याची मला खात्री आहे. आरमार नाही वापरला याचे उत्तर धर्मग्रंथ देतात की वानरसेना खुप मोठी होती.
शेंदेण्ला मी सांगु इच्छितो की शिविगाळ नाही केली तर त्यानी केलिय. सिध्ध आता झालेले नाही पण भविष्यात होउ शकते हे दाखवण्यासाठी मी तस लिहिल होत आणी मला म्हणायच होत की शास्त्रज्ञ म्हणतात ते नंतर खोटही ठरु शकत. अणुंबाबत चर्चेत मी सांगु इच्छितो की अशा बर्याच गोष्टी वेदिक साहित्यात आहेत की ज्या आपल्या शास्त्राने सिध्द केलेल्या नाहित पण भविष्यात होतिल. उदहरणर्थ वार्‍याचा वेग control करणे आणि अस्त्रासारखा उपयोग करणे.
विमाने सापडली नाहित म्हणजे ती नव्हती म्हणने म्हणजे खुनी सापडला नाही यावरुन खुनच झाला नाही अस म्हणन्यासरख आहे.
दुसरी गोष्ट सांगु इच्छितो की तुम्ही जर जाउन सेतु बघितला तर तो भारत श्रीलंका जोडतो असे दिसत नाही (म्हणजे बराच सेतु पाण्याखाली आहे). नासाच्या फ़ोटोत मात्र तो स्पष्ट भारत लांका जोडताना दिसतो.बर जर तुम्ही म्हणता की रामायण कल्पना आहे आणि आरमार नव्हते तर कल्पनाकाराला कसे कळले की हा भुभाग लंकेला जातो??तो तर याच कडेला होता? मंदिरातिल records म्हणतात की हजारो वर्षांपुर्वी आलेल्या भयंकर cyclone मधे बराच भाग तुटला होता. पण तुम्हा लोकांचा मंदिरावर विश्वास नाहि मग तुम्ही काय म्हणता याबद्दल?
समीर इथे यमराजाला पण प्रश्न विचारायला परवानगी आहे पण not in spirit of defeating or fighting but for getting knowledge .
नासाचा फ़ोटो जोडत आहे.
मी जेंव्हा चर्चा सुरु केली होती त्यातच म्हटल होत की हा आमच्या भावनेचा मुद्दा आहे म्हणुन तो सेतु तोडला जाउ नये


Chinya1985
Thursday, May 31, 2007 - 5:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

raamasetu

Chinya1985
Thursday, May 31, 2007 - 5:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नासानी म्हटल आहे की हा सेतु मानवनिर्मित नाही कारण त्या काळात माणुस भारतात होता हे सिध्द झालेल नाही.म्हणजे जगातले सर्वात मोठे निरिश्वरवादी सुध्दा जपुन मत देत आहेत. नासानी तो रामसेतु आहे मानन म्हणजे देव मानण्यासारख आणि moon conspiracy थिअरी मानण्यासारख आहे त्यामुळे त्यांच्याकडुन त्याची अपेक्षा नव्हतिच. केदारनी म्हटलेले मुद्दे बरोबर आहेत पण शेवटचा नाही.धर्म ही गोष्ट आपल्या मर्यादित इंद्रियांच्या बाहेरची आहे त्यामुळे वानर नाहित वगैरे मुद्दे चुकिचे आहेत.एक महत्त्वाचे वाक्य "जहां विचार और इंद्रियोंका अंत होता है वहां आध्यात्म शुरु होता आहे." या धर्मातिल गोष्टींना जश्या आहेत तशा घ्याव्यात नाहितर आपण त्या क्षेत्रात काहिच प्रगती करनार नाही.

Vijaykulkarni
Thursday, May 31, 2007 - 11:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

म्हणुन आपल्याला धर्मग्रंथांची गरज आहे.कारण ते त्या सत्याकडुन आलेले आहेत.

या धर्मातिल गोष्टींना जश्या आहेत तशा घ्याव्यात नाहितर आपण त्या क्षेत्रात काहिच प्रगती करनार नाही.

पण मग ख्रिश्चन आणी मुस्लीम धर्मातील गोष्टीना पण जशा आहेत तशा घ्याव्या का?

देवि हा रोग देविच्या अवक्रुपेमुळे होतो ही पुरातन अन्धश्रद्धा. बर्याच भारतीय भाषान्मधील त्या रोगाला असलेले नाव सुद्धा देवि हेच होते.

वैज्ञनीक द्रुश्टीमुळेच त्या रोगावर आपण मात करू शकलो.



Santu
Friday, June 01, 2007 - 4:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्लारति
ताजमहाल,कुतुब्मिनार वादातिति मानवनिर्मित आहेत))))याला
पुरावा काय? अशि काहि ब्लुप्रिंट किंवा त्यावेळच्या दिल्लि नगरपालिकेचा
काहि document आहे का?


Slarti
Friday, June 01, 2007 - 5:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ताजमहाल किंवा कुतुबमिनार नैसर्गिकरित्या कसा निर्माण होईल ? मॅक्स्वेलच्या राक्षसामुळे ? असो. पुरावे मिळणे अवघड आहे हेच सांगायचे आहे ना तुम्हाला ? ठीक आहे, समजले.

Santu
Friday, June 01, 2007 - 6:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ताज महाल किंवा कुतुब्मिनार नैसर्गिकरित्या कसा तयार होईल))))जसा रामसेतु होईल तसाच.


उद्या कोणि म्हनेल कि शिवाजिने अमुक अमुक किल्ला बांधला याचा काय पुरावा. खरोखर असा लिखित पुरावा आज उपलब्ध नाहि. आता शिव काल तर अगदी अलिकडचा मग इतक्या जुन्या बांधकामाचा पुरावा
मागणे हा खोडसाळ पणा झाला.


माझे म्हणने एवढेच म्हनने आहे कि जर इतक्या अलिकडच्या ताज चा जर पुरावा नसेल तर ४हजार वर्शा पुर्विच्या राम्सेतु चा लिखित पुरावा कसा असेल.पण रामायनात किंवा बाकिच्या वरिल कागद्पत्रात हा पुरावा आहे हजारो लोक कथात पुर्विच्या राज्याच्य नाण्यात हा पुरावा आहे.


Slarti
Friday, June 01, 2007 - 7:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>ताज महाल किंवा कुतुब्मिनार नैसर्गिकरित्या कसा तयार होईल))))जसा रामसेतु होईल तसाच.

बरं ठीक आहे, पुरावा आहे हे(सुद्धा) समजले.
anyway , मी जे प्रश्न विचारले होते ते लोकांचे त्यासंबंधी काही अंदाज (ज्ञानोद्भव वा तर्कोद्भव) असले तर ते कळावेत म्हणून. ते जर कळाले असते तर बरे झाले असते.


Chyayla
Friday, June 01, 2007 - 3:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिन्या, केदार आणी सन्तु तुम्ही खुपच छान मुद्दे मान्डलेत. पुर्ण अनुमोदन.

अरे जे हेच मानायला तयार नाहीत की रामाचा जन्म भारतात आणी तोही अयोध्येत झाला होता त्यान्च्याकडुन कसची अपेक्षा करता आहात. रामायणच खोटे का तर त्याचा काही भौतिक पुरावा नसुन केवळ मौखिक पुरावा आहे.

एखाद्या गोष्टीचा पुरावा लाखो वर्शे जतन करणे कठीण नव्हे अशक्य काम आहे. त्यासाठी खरेच आपले पुर्वज थोर विचारवन्त ऋशी मुनीना मानावे लागेल. त्यानी ही सन्स्कृती, ज्ञान, तर्क हे सगळे श्रुती, स्मृती या माध्यमाने जपली यात त्यान्ची दुरद्रुष्टी दीसुन येते.

रामायण हे काल्पनिक आहे असे म्हणणारे फ़ुटकळ कित्येक होउन गेले आणी सम्पले पण रामायण नाही सम्पले ते अजुनही तेवढेच टवटवीत आहे त्याचे आकर्षण लहान मुलाना गोष्टी रुपाने, तरुणाना तेवढेच प्रेरणादायी तर श्रेष्ठाना अजुनही तितकेच मार्गदर्शक आहे, यातच रामायणाचे यश आहे. तसेच ईथे केवळ आन्धळेपणे तर्कविरहीत केवळ विरोधासाठी विरोधात फ़ुटकळ पणे लिहिणारे सम्पतील पण रामायण नाही हे सान्गायची गरज नाही.

चला एवढ जरी म्हटले की काही तरी पुरावा असावा, तर तो रामसेतु जो रामायणात प्रत्यक्ष वर्णन केला आही लाखो वर्शापासुन त्याचा सतत उल्लेख होत आहे शिवाय कोणत्याही भारतियाला त्याबद्दल विचारा त्याला हे माहित नाही हे शक्यच नाही. तसाच रामसेतु अक्षरशा: भारत श्रीलन्केच्या दरम्यान सापडतो यापेक्षा अजुन काय भौतिक पुरावा हवा.

नशीब त्यानी हे म्हटले नाही की उत्तरेकडे राहणार्या वाल्मिकी ऋशीनी, दक्षिणेत जाउन हा सेतु आधीच बघुन ठेवला होता आणी त्यावरुनच रामायण लिहिले.

स्लार्टी तुझे तर्क फ़ारच तकलादु वाटतात एखाद्या गोष्टीला असेच किन्तु परन्तु लावत बसला आहेस त्यात तु स्वताच गोन्धळलेला दीसतोय, जसे गलबत चालवणे हे एक उदाहरण, बाकी मग तोफ़ा वैगेरे असले किती तरी मुद्दे निघु शकतात पण मुळात तुझे तर्कच हे पुर्ण कुचकामी आहेत याची जाणीव तुलाही झाली असेलच. अरे पण ईतका आटापिटा करायची गरजच तुला का पडावी. जे स्पष्ट पुरावे आहेत त्याला नाकारण्याची धडपड फ़ारच केविलवाणी दीसुन येतेय. तरी या पुढे काही तर्कसन्गत लिहिलेस तर चर्चा करायला मजा येईल.

मला तर हेही आश्चर्य वाटत रामायणातील वर्णीत नावे, स्थाने आजही त्याच नावानी अस्तित्वात आहे ते तर कुणी नाकारुच शकत नाही जसे, अयोध्या, लन्का, दन्डकारण्य, महाराष्ट्रातील पन्चवटी, गन्गा नदी, रामेश्वरम ईत्यादी यापेक्षा अजुन धडधडीत पुरावा काय पाहिजे, हे सुधा भौतिक पुराव्यातच मोडतात. त्यातल्या सन्तु तुम्ही खुपच छान पुरावे दीलेत ते निश्चितच दुर्लक्ष करण्यासारखे नाही आमच्या सगळ्यान्च्या माहितीत चान्गली भर घातलीस... धन्यवाद.
माझ आवाहन आहे की जे रामसेतुला मिथ्या म्हणतात त्यानी हे सगळे उल्लेख रामायणात नाही हे सिद्ध करावे. तुम्ही काय पुरावा मागताय आधी तो पुरावाच रामायणात नाही याबद्दल बोला म्हणजे तुमचे तर्क, ज्ञान कळेल तरी.

सगळ्यात शेवटी व महत्वाचे की एवढे पुरावे तर आहेच पण त्याउपरही महत्वाचे म्हणजे लाखो वर्शापासुन करोडो जनता जनार्दन रामायणावर श्रद्धा, विश्वास ठेवुन आहे त्यान्च्या भावनान्चा, श्रद्धेचा काहीच आदर नसु काय? त्यान्चा अनादरच व्हायला पाहिजे ही मानसिकता काय दर्शवते.

केदार तुमच्या एका पोस्ट मधे पर्यावरणाचा मुद्दा आला होता तोही विचार करण्यासारखाच आहे, मी असे वाचले आहे की मागे जो त्सुनामीचा तडाखा लन्केला व ईतर देशाना बसला त्यामानानी भारताला कमी बसला याचे मुख्य कारण रामसेतुने त्याची तिव्रता कमी झाल्याने. तेन्व्हा त्सुनामीपासुन सरन्क्शण व पर्यावरणाचा विचार करता रामसेतु जतन करण्यात खरच शहाणपणा आहे, शिवाय वर चर्चा केल्याप्रमाणे ईतरही कारणे आहेतच.


Maitreyee
Friday, June 01, 2007 - 4:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रामायण खरे का खोटे या वादात मला पडायचे नाहिये, पण एखाद्या कथा अथवा कादंबरीमधे वर्णन केलेलेई स्थळे खरी असण्याचा आणि ती कथा प्रत्यक्षात घडली असण्याचा काहीही संबंध नाही. स्थळे खरी आणि कथा काल्पनिक हे बहुसंख्य कथा कादंबर्‍यात दिसेल!
राहिला प्रश्न तो रामसेतू म्हणजेच रामयणात वर्णन केलेला सेतू आहे का नाही, मला हे खरच कळत नाहिये की याबद्दलचे अचूक सत्य तिथल्या दगडांच्या अभ्यासावरून कळू शकेल ना? अगदी पुराव्याने शाबित!:-)
तसे काही केले गेलेय का? नसेल तर का बर नाही!! उगीच कशाला वाद घालत बसयाचे


Chinya1985
Friday, June 01, 2007 - 4:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विजयराव ख्रिश्चन मिशिनरिज किंवा इस्लामिक दहशदाबद्दल तुम्ही बोलत असाल मि सांगु इच्छितो कि ते त्यांचा धर्म जसा आहे तसा घेत नाहित म्हणुन इतक्या समस्या निर्माण होतात. क्रुष्ण,शिव,अल्ला,ख़्रिस्त,जेहोवा,बुद्ध हे सर्व एकाच भगवानाची नावे आहेत.वेगवेगळ्या अवतारांनी अथवा अवतारी पुरुषांनी वेगवेगळ्या काळानुसार वेगवेगळ्या जागांमधे जन्म घेउन देवापासुन दुर गेलेल्यांना देवाकडे आणायचा प्रयत्न केला. त्यामुळे ख़्रिश्चन मिशिनरिज आणि इस्लामी कट्टरवादी म्हणतात की 'तुम्ही तुमच नाव बदला आणि मगच तुम्हाला स्वर्गात जाण्याचा मार्ग मोकळा होइल 'हे चुकिचे ठरते. काही आक्षेपार्ह गोष्टी या धर्मग्रंथांमधे असल्यास मला माहित नाही कारण या धर्मांचा माझा अभ्यास नाही.मी केदारला जे लिहिल होत ते हिंदू धर्मग्रंथांबद्दल लिहिल होत.कारण हिंदु धर्मग्रंथ मी बर्यापैकी वाचलेले आहेत.

देवी वगैरे गोष्टी अंधश्रध्दा होत्या त्याचा धर्मग्रंथांशी काही संबंध नाही. शिवाय हिंदू धर्म विज्ञानाच्या विरुध्दही नाही.

स्लार्ति म्हणतो ' मी जे प्रश्न विचारले होते ते लोकांचे त्यासंबंधी काही अंदाज (ज्ञानोद्भव वा तर्कोद्भव) असले तर ते कळावेत म्हणून. ते जर कळाले असते तर बरे झाले असते. '
म्हणजे कशाबद्दल अंदाज हवे आहेत तुम्हाला?जरा स्पष्ट लिहा.
फ़ोटो अपलोड यासाठी केला होता की हा खराच सेतु आहे आणि नैसर्गिक भुभाग नाही हे समजण्यासाठी.शिवाय असा समुद्रातिल सेतु जवळजवळ ४५किमी कुठे दुसरीकडे असल्याची माहीती नाही.जरी असेल तरी हा रामसेतू नाही हे त्याने prove होत नाही.

एक पुस्तक आहे ज्यामधे एका डॉक्टरांनी (पुरावे मागणारे) एक research केला त्यामधे त्यांनी हे पुरावे देउन सिध्द केले आहे की राम आणि रामसेतु ह्या कल्पना नाहित.पुस्तक आहे-
'रामाच्या पाउल वाटांवरुन केलेली वाटचाल'
हे पुस्तक जरुर वाचा. डॉ.बर्वे का कोणीतरी लेखक आहेत. ह्या पुस्तकातील पुरावे बरोबरच आहेत फ़क्त सनावळ्या जरा चुकल्या आहेत कारण त्यांचे पुरावे मिळणे अवघड होते.


Chyayla
Friday, June 01, 2007 - 4:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नशीब त्यानी हे म्हटले नाही की उत्तरेकडे राहणार्या वाल्मिकी ऋशीनी, दक्षिणेत जाउन हा सेतु आधीच बघुन ठेवला होता आणी त्यावरुनच रामायण लिहिले

मैत्रेयी तु माझ्या या मुद्याकडे साफ़ दुर्लक्श केलेले दीसतेय म्हणुन परत लिहितोय, तु जे स्थानाचे वर्णन व कथा याचा सम्बन्ध याबद्दल म्हणतेस त्यात विरोधाभास दीसुन येतोय.

त्यातल्या त्यात असला सेतु अस्तित्वातच आहे हेच माहित नव्हते. ईथे वर्णन आधी आले आहे आणी स्थान नन्तर. हे लक्शात आले का? तसे नसते तर तुझ्या म्हणण्याला अर्थ राहिला असता.

कदाचित तुझ्या या प्रश्नाचे उत्तर मी आधीच दीले होते असे वाटत नाही का?




Chinya1985
Friday, June 01, 2007 - 4:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद च्यायला!!!!आपले मुद्दे बरोबर आहेत.स्लार्ति म्हणतो की आरमार का नाही वापरले.त्याला हे माहित नसावे की बांग्लादेश युध्धाच्या वेळी भारतिय आर्मीनीही पुल बांधले होते मग याचा अर्थ असा का की भारताकडे नौदल नव्हतच?

मैत्रेयी दगडांवरुन तो सेतू मानवनिर्मित आहे का नाही कसे कळेल? दगड तर नैसर्गिक असतात.शिवाय लाखो वर्षात ख़डकांमधील फ़रक पण नष्ट होणारच की!!!

अस वाचण्यात आल आहे की पाण्याच्या खालील काही भागांमधे अजुनही तसा फ़रक आहे.म्हणजे खालचा खडक वेगळा आणि वरचा वेगळा (म्हणजे खडकाचा प्रकार वेगवेगळा आहे).मी परत लिहू इच्छितो की आपण केलेली वैज्ञानिक प्रगती अजुनही पुर्णत्वाला गेलेली नाही.


Maitreyee
Friday, June 01, 2007 - 5:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला,
माझे म्हणणे हे आहे की केवळ कथेतले अमूक एक वर्णनाचे स्थळ खरेच अस्तित्वात आहे हा त्या कथेच्या प्रत्यक्ष घडण्याचा पुरावा होऊ शकत नाही. तू जे विधान केले होतेस, की आयोध्या आहे, पंचवटी आहे, सेतू आहे हा रामयण घडल्याचा धडधडीत पुरावा आहे तर मी फ़क्त त्या तुझ्या त्या वाक्याच्या logical असण्यबद्दल बोलत होते रामयण खरे घडले अथवा नाही याबद्दल बोलत नाहिये :-)
चिन्या, अरे बाबा रामयणाचा काळ केव्हाचा आहे असे धरत आहेस तू? लाखो वर्षे असे बर्‍याचदा लिहिताना पाहिले मी. काही हजार वर्षे जुना आहे ना तो काळ? ५ ते १० हजार दरम्यान मला वातते.. बर आणि कितीही जुना काळ असू देत dating of ancient rocks is possible by radiometric methods .. गूगल केले तर अजून माहिती मिळेल यावर. यावरून पृथ्वीचे वय सुद्धा काढता येते (हो, इतकी वैज्ञानिक प्रगती झाली आहे :-) )तर सेतू चे का नाही येणर असे आपले माझे मत
:-O

Kedarjoshi
Friday, June 01, 2007 - 5:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


बरोबर त्या सेतु चे कार्बनींग व्ह्यायलच पाहीजे. (मी वर ही लिहीले पण हल्ली आमचे कोणी लक्षातच घेत नाही. .

कुल डाऊन यारो. रामायन खरे की खोटे ह्या वर आपण वाद खरच घालु शकत नाहीत. तो भावनांचा प्रश्न आहे.

मी आधी लिहील्या प्रमानेच एकतर वाल्मीकीला उत्तर भारता पासुन श्रिलंके पर्यंत (सेतु सहीत) सर्व भुभाग माहीती असला पाहीजे (जर कथा असेल तर) वा तो जसा घडला तसे त्याने लिहीले असेल. (मग ती सत्यकथा).
जर ती कथा काल्पनीक असेल तर मग वाल्मीकींना भारत व श्रिलंका भ्रमन करावे लागले असेल. मग निदान वाल्मीकी तरी खरा होते हे सिध्द होते नाही का?

फक्त प्रवास वर्णनात (बरेचदा) पाहीलेला सर्व भाग नावा सहीत आपण लिहीतो पण रामायन हे प्रवास वर्णन नसल्यामुळे ते खरे असावे असे उगीच वाटत असते. तसा रामायन व महाभारत या दोन्हीला साधनारी आणखी एक गोष्ट रामायनात आहे. (अभ्यासु, म्हणजे काल्पनीक कथा आहे असे म्हननार्यांनी ईकडे पण लक्ष द्यावे).

तर झाले काय की रामाने वालीचा वध लपुन केला. तर वाली मरताना म्हणाला राम तु हे काय केलेसे, निदान तुझ्या क्डुन ती अपेक्षा नाही, तर राम म्हणाला अरे वारे वाली ज्याच्याशी तुझे युध्द होते त्याची अर्धी शक्ती तुला प्राप्त होते असा तुला वर आहे मग मी तुझ्याशी उघड का लढु. पण हे जे काही झाले ते भरन्यासाठी माझ्या पुढील अवतारात तु माझ्यावर तसा वार करु शकतोस.

कट २.
महाभारतात मुसळामुले यादवकुलात युध्द होते. शेवटी त्या युद्धाला कंटाळुन कृष्ण निघुन जातो व एका वनात बसतो, त्याला हरिन समजुन शिकारी त्याची शिकार करतो.

तर हा तो च शिकारी जो पुर्वजन्मीचा वाली होता असे पुराणात लिहीले आहे.

मग व्यासांनी आधी रामायन वाचुन नंतर त्या कथेच्या साह्याने कृष्ण्न या करेक्टर चा मृत्यु घडवुन आनला का?

तर मुद्दा हाच की रामायण वा महाभारत खरे की खोटे ह्यावर वाद घालने योग्य नसावे. तो श्रधेच्या प्रश्न आहे.

कुलकर्णी देवी येतात असे कुठल्या धर्मग्रंथात लिहीले आहे? पुरावा द्याल का?

कालोघात अनेक गोष्टी आपल्या धर्मात आल्या जसी समुद्र प्रवास न करने? पण हे धर्म ग्रंथात कधीच न्हवते ते त्या वेळच्या होनार्या राजकीय घ्डामोडींनी आले. पण लोक असतात भाबडी, त्यांना सांगीतले की समुद्र प्रवास करु नका, मग झाले तो एक रुल झाला. ह्या अशा फालतु गोष्टी जनते पर्यंत धार्मीक पुढार्यांनी न्यायला पाहीजेत पण त्या तशा होत नाही की मात्र खंत आहे.
(वरचे समुद्र प्रवासाचे उदा कोणाला स्पश्टीकरना सहीत हवे असेल तर सांगा मी ते ईथे लिहुन काढेन)


Chyayla
Friday, June 01, 2007 - 7:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी फ़क्त त्या तुझ्या त्या वाक्याच्या logical असण्यबद्दल बोलत होते रामयण खरे घडले अथवा नाही याबद्दल बोलत नाहिये
असे होय मैत्रेयी... आल लक्षात, पण तुलाही माझा मुद्दा कळाला असावा

रावणाकडे २०-३० मैल पल्ल्याच्या तोफा असताना आणि / किंवा त्याच्याकडे नौसेना असताना त्याने सेतू पूर्ण होऊ दिला ? भर समुद्रात तर रामसेना त्याच्यासाठी sitting duck ठरली असती. (राम येत आहे हे त्याला महिती होतेच. शूर्पणखा, मारिच, इ.इ. आणि तो सेतू बांधत आहे हेही त्याला कळाले असणारच.) शिवाय त्या सेतूची रुंदी किती आहे ? ते सैन्य तिकडे जमिनीच्या जवळ आले असता त्यांना खिंडीत गाठून मारल्यासारखे मारता आले असते.

अरे रावणा (आता राम नाही म्हटल्यावर) याला कोणी तरी रामायण ऐकवा रे... रामायणात ईतक स्पष्ट दीले आहे की रावणाला किती गर्व झाला होता, क्षुल्लक मानव, वानरे त्याच काय बिघडवणार, शिवाय त्याला स्वाताच्या शक्तिची घमेन्ड यामुळे तो गाफ़िल राहिलेला असतो, ईतरानी त्याला वेळोवेळी सावध करुनही तो कार्यवाही करत नाही. तेन्व्हा कुठुन आल्या तोफ़ा, खिन्डी न Sitting Ducks काहीतरीच काय हे?

चला आता परत मुळ मुद्द्यावर...
केदार, मैत्रेयी तुम्ही जे कार्बनिन्गचे म्हणता तेही ठीक आहे. पण माझा एक तर्क असाही आहे. त्या जागी आधीच नैसर्गिक सेतु अस्तित्वात असावा पण उथळ पाण्यामुळे दीसला नसावा जेन्व्हा त्याचा शोध लागला तेन्व्हा वानर सेनेने झाड, दगड वरवर टाकुन सेतु बनवला असावा. अर्थातच वानर काही ईतकी प्रगत नव्हती त्यामुळे नैसर्गिक साधनान्चा त्यानी उपयोग केला असावा.
कालान्तराने ते दगड वाहुन जाण्याचीही शक्यता असु शकते. तेन्व्हा तो सेतु मानव निर्मित असो वा निसर्गनिर्मित वा अर्ध मानव निर्मित असो यानी काही फ़रक पडत नाही. त्या सेतुचा रामायणात उल्लेख आहे हीच बाब पुरेशी झाली असे मला वाटते.


Chyayla
Friday, June 01, 2007 - 7:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरेच्या स्लार्तीचा मुद्दा केदारनी आधीच खोडुन काढला होता तर...

हिंदु धर्मामध्ये हा कडवेपणा कधी पासुन आला बुवा? बहुधा बाबरी मशीद तोडल्यानंतर असावा

एसव्हीसमीर... तुम्ही त्याही पुर्वी म्हणजे शिवाजी महाराजान्च्या काळात जाण्याचे धाडस ठेवायला पाहिजे होते कारण शिवाजीन्नी मुस्लिमान्च्या ताब्यात असलेला प्रदेश तोडला व हिन्दवी स्वराज्य स्थापन केले होते ना. अफ़जलखानाचा तर हिन्सा करुन वध केला.

एकवेळ तुम्हाला या गोष्टीन्चा राग, द्वेष आहे हे मान्य पण मला हीच भाषा ईतरान्च्या कडवेपणा विरुद्ध दिसुन येत नाही यावर माझा आक्षेप आहे. तुम्हाला हिन्दु म्हणजे, भ्याड, अस्मिता हरवलेला, स्वता:च्या खोट्या स्वघातकी सहिष्णुतेचा उदो उदो करत ईतरान्साठी आत्मबलीदान (की बळीचा बकरा) असाच अपेक्षीत असावा. त्याने विधायक विरोधही करु नये व दुसर्यान्चे दातही त्याचा घशात घालु नये अशी आशा. ह्या गोष्टी मला तरी कधीच पटण्यासारखा नाही. असो ह्या मुद्यान्ची चर्चा बर्याच ठिकाणी झाली व त्याला चपखल उत्तरेही मिळालीत पण... असो शेवटी मळमळ कुठे तरी काढणारच ना. मला वैयक्तिक नाही जायचे तुमच्याविरुद्ध पण तुमच्या माहितीसाठी ईतर BB आहेत हा मुद्दा विचार करायला. उदा. निरुपयोगी...
शेवटी दीवा घेणे कारण तुमच्या सारख्या वरीष्ठ मायबोलीकराला हे सान्गावे लागतय हे बर नाही वाटत.


Shendenaxatra
Friday, June 01, 2007 - 8:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कार्बनिंग वगैरे उल्लेख वरती आले आहेत. हे कार्बन डेटिंगशी संबंधित असावे असा माझा अंदाज आहे. म्हणून हा खुलासा. माझ्या माहितीप्रमाण ही पद्धत केवळ प्राणी व वनस्पतींच्या अवशेषावर वापरता येते. दगडावर नाही. दगडात जीवाष्म असले तर गोष्ट वेगळी. रामसेतूचे दगड जीवाष्मांनी बनले आहेत का?
आणि तथाकथित सेतुच्या दगडांचे वय समजले तरी ते कुणी पूल बांधायला वापरले का ते निसर्गत्:च ते दगड तिथेच पडून होते हे कसे समजणार?


Kedarjoshi
Friday, June 01, 2007 - 9:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही पद्धत केवळ प्राणी व वनस्पतींच्या अवशेषावर वापरता येते. दगडावर नाही.>>>>

मला दगडाचे कार्बनींग करता येत नाही हे माहीती न्हवते. पण मग दगडा पासुन बनलेल्या हत्यार्यांची डेट कशी ठरविली जाते.



Chinya1985
Friday, June 01, 2007 - 9:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सायन्स फ़ार पुधे गेलेले नाही हे वचुन जर मैत्रेयीला राग आला असल्यास क्षमस्व.कार्बनिंगबद्दल physics मधे वाचले होते पण आता आठवत नाहि.क्रुपया थोडक्यात समजवावे. शिवाय खडकांचे वय समजल्यास ते खडक त्या समुद्रात कधी आणले गेले हे कसे समजणार??क्रुपया स्पष्ट करावे कारण मि सध्ध्या physics पासुन खुपच दूर आहे.
मैत्रेयी तुझा मुद्द कळला. पुढिल बातमी वाचावी-
WASHINGTON (PTI) -- The NASA Shuttle has imaged a mysterious ancient bridge between India and Sri Lanka, as mentioned in the Ramayana.
The evidence, say experts matter-of-factly, is in the Digital Image Collection.
The recently discovered bridge, currently named as Adam's Bridge and made of a chain of shoals, 30 km long, in the Palk Straits between India and Sri Lanka, reveals a mystery behind it.
The bridge's unique curvature and composition by age reveals that it is man-made. Legend as well as Archeological studies reveal that the first signs of human inhabitants in Sri Lanka date back to the primitive age, about 1,750,000 years ago and the bridge's age is also almost equivalent
Space images taken by NASA reveal a mysterious ancient bridge in the Palk Strait between India and Sri Lanka. The recently discovered bridge currently named as Adam&laqno;s Bridge is made of chain of shoals, c.18 mi (30 km) long.
The bridge&laqno;s unique curvature and composition by age reveals that it is man made. The legends as well as Archeological studies reveal that the first signs of human inhabitants in Sri Lanka date back to the a primitive age, about 1,750,000 years ago and the bridge&laqno;s age is also almost equivalent.
This information is a crucial aspect for an insight into the mysterious legend called Ramayana, which was supposed to have taken place in tredha yuga (more than 1,700,000 years ago).
In this epic, there is a mentioning about a bridge, which was built between Rameshwaram (India) and Srilankan coast under the supervision of a dynamic and invincible figure called Rama who is supposed to be the incarnation of the supreme.
This information may not be of much importance to the archeologists who are interested in exploring the origins of man, but it is sure to open the spiritual gates of the people of the world to have come to know an ancient history linked to the Indian mythology.
त्रेता युगातिल ही गोष्ट आहे म्हणुनच तर ह्याचे पुरावे सापडण अवघड आहे.मी परत लिहितोय महाभारत ५००० वर्षापुर्वी झालय रामायण तर त्याहुन कितितरि जुन आहे.
शिवाय खडकांचे दोन वेगवेगळे प्रकार आहेत हा सुध्दा एका प्रकारचा पुरावा ठरतो की पुर्विच्या खडकांवर नवे खडक टाकुन सेतु बनला आहे.


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators