|
Saavat
| |
| Thursday, May 31, 2007 - 7:03 am: |
| 
|
अरे भ्रमर-विहारा, तिकडे, 'झक्की' ला 'अहो-जाहो म्हणा', असा आग्रह करणारा तू, इकडे 'श्रीराम' आणि ' ऋषीवाल्मिकी', विषयी काही चकार शब्द काढत नाहीस, उलट 'भावना दुखवत असतील तर लिहू नका', असा अनाहूत सल्ला तू देतोस, याच्या मागचा तूझा विचार ध्यानात नाही आला गड्या! जरा समजावून सांगशील का? का V.C. च्या अखत्यारित हे बसत नाही? आणि 'दिवा' घे रे बाबा! नाहीतर तूझ्या भावना दुखवायच्या!!
|
Santu
| |
| Thursday, May 31, 2007 - 7:08 am: |
| 
|
हा कुमार केतकरांचा अग्रलेख फ़ार छान आहे. http://www.loksatta.com/daily/20070529/edt.htm
|
>>> हा कुमार केतकरांचा अग्रलेख फ़ार छान आहे. कुमार केतकर लिहिणार म्हणजे वाचण्याची अजिबात आवश्यकता नाही. न वाचता सुद्धा त्याच्यात काय आहे ते सांगता येतं. या अग्रलेखात त्यांनी संघ परिवाराचा - "निगरगट्ट, निर्लज्ज, कोडगे, नालायक, बेशरम, भ्रष्टाचारी, अतिरेकी" असे शेलके शब्द वापरून उद्धार केला असेल, आणि-किंवा सोनिया, मनमोहन, लालू यांची तोंड फाटेपर्यंत स्तुती केली असेल.
|
Santu
| |
| Thursday, May 31, 2007 - 7:27 am: |
| 
|
स्लारति तु म्हणतोस त्या प्रमाणे रामाला समुद्राचा उथळ पणा कसा कळला अरे त्या साठि "पलिकडचा" बिभिषण होता ना लोकल माहिति पुरवायला. त्या साठि dampy level ची वा सर्व्हे ची गरज नाहि या सर्व गोष्ट नसताना. पिरॉमिड उभारलेच ना? नदिचा उतार पाहण्यासाठि अलेक्झॉडर ने पण स्थानिक माणसाचा वापर केला होता. तसेच अब्दालिने पण पनिपत च्या वेळि अशिच यमुना ओलांडुन भाउच्या पाठिवार आला होता. गलबते का बांधलि नाहित.))))अरे जंजिरा ताब्यात येत नव्हता म्हणुन मराठ्यानी पण अशिच खाडि बुजवायचा प्रयत्न केला होता.कारण समोर्च्या आग ओकणार्या सिद्दिच्या तोफ़ा. लक्षात ठेव जग जिकंणारया नेपोलियन ला english खाडि कधिच गलबतानी ओलांडता आलि नव्हति
|
Santu
| |
| Thursday, May 31, 2007 - 7:47 am: |
| 
|
सतिश केतकरा बद्दल माझे मत तुझ्या सारखेच आहे. पण हा अग्र्लेख त्याला अपवाद आहे. अगदि सगळ्याची मस्त हजामत केलि आहे त्यात.
|
Slarti
| |
| Thursday, May 31, 2007 - 7:47 am: |
| 
|
संतु, तुला असं म्हणायचं आहे का की रावणाकडे २०-३० मैल पल्ल्याच्या तोफा असताना आणि / किंवा त्याच्याकडे नौसेना असताना त्याने सेतू पूर्ण होऊ दिला ? भर समुद्रात तर रामसेना त्याच्यासाठी sitting duck ठरली असती. (राम येत आहे हे त्याला महिती होतेच. शूर्पणखा, मारिच, इ.इ. आणि तो सेतू बांधत आहे हेही त्याला कळाले असणारच.) शिवाय त्या सेतूची रुंदी किती आहे ? ते सैन्य तिकडे जमिनीच्या जवळ आले असता त्यांना खिंडीत गाठून मारल्यासारखे मारता आले असते.
|
Slarti
| |
| Thursday, May 31, 2007 - 8:02 am: |
| 
|
मला आताच माझा बावळटपणा लक्षात आला. गलबतांचा वापर केला गेला नसावा कारण उथळ समुद्र ! असो. तरी बाकीचे मुद्दे उरतातच.
|
Santu
| |
| Thursday, May 31, 2007 - 8:06 am: |
| 
|
स्लारति तोफ़ा नव्हत्या पण प्रचंड शिळा फ़ेकणारया गोफ़णि असतिल. त्याप्रकार्चि एक गोफ़ण glaDiater या सिनेमात दाखवलि आहे. त्याला काहितरि संस्क्रुत मधे नाव आहे ते काय आठवत नाहि. नौसेना असताना सेतु पुर्ण होवु दिला)))अरे जंजिरा येथे सेतु बहुतेक पुर्ण केलाच होता तेव्हढ्यात मुघल (औरन्गजेब ?)नी हल्ला केल्यामुळे मराठ्याना तिकडे जावे लागल;(चिमाजि किंवा संभाजि) हे सर्व तोफ़ाच्य मारयातच केले.. अजुन एक उदाहरन द्यायचे तर अजिक्यतारयावर औरंगजेबाने पण तोफ़ाच्या मारयातच खंदक खोदुन स्फ़ोटकानि बुरुज उडवुन दिला होता. त्यामुळे तोफ़ाच्या वा दगडाच्या मारयात पुल उभारणे हि गोष्ट अश्यक नाहि. किंवा रामाकडे तशी capeble नौसेना नसेल म्हणुन सेतु उभारणे हा पर्याय त्याने स्विकारला असेल.
|
Giriraj
| |
| Thursday, May 31, 2007 - 10:03 am: |
| 
|
केतकर जेव्हा राजकिय विषय टाळून लिहितात तेव्हा वाचनिय असतात त्यांचे लेख.. बाकी राजकिय लेख म्हणजे कॉंग्रेस आणि सोनिया स्तुति असतात!
|
Santu
| |
| Thursday, May 31, 2007 - 10:53 am: |
| 
|
मला वाटते त्या गोफ़णिना संस्क्रुतात भ्रुशुंडि म्हणतात. कारण महभारता युध्दात भ्रुशुंडिच्या दगडि मार्याचे वर्णन वाचल्यासारखे आठवते
|
मला परत काही प्रश्न पडले : 'या' भूभागापासून ते 'त्या' भूभागापर्यंत समुद्र साधारण उथळ आहे हे रामाला कसे कळाले >>> रामायनात असे लिहीले आहे की जेव्हा एवढा मोठा समुद्र पार करायची चिंता रामला लागतो तेव्हा त्याला जांबुवंत समुद्र देवतेची आराधना करन्याचा सल्ला देतात, तशी पुजा झाल्यावर समुद्रदेवता प्रग्ट होऊन मार्ग दाखवीतात. (आता आपण पेगन्स असल्यामुळे समुद्र देव होऊ शकतो). प्रश्न राहातो तो तोफा का नाही मारल्या. त्यासाठी रावणाला अनेक लोकांनी विनवनी केली की सैन्य येत आहे, रावण पण (येथील अनेक बुध्दीवंता पेक्षा जास्त अंहकारी असल्यामुळे त्याने दुर्ल्क्ष केले व राम समुद्र पार झाला. दुसरा तर्क असा की त्याची राजधानी ही लगेच बिच वर नसावी की लगेच तो घाबरुन जावा. त्याने विचार केला असनार की समुद्र पार जरी झाला तरी तो आपल्या पर्यंत येऊ शकनार नाही कारण त्याची नओसेना अडवेल. जंजीरा ला सेतु चिमाजी आपा बाधंत होता. त्याला तिन वेळेला मोहीम सोडावी लागली पण शेवटी त्याची फत्ते झाली. (हे अगदी लेटेस्ट उदा आहे व त्याला पुरावे आहेत). एकाद्यावेळी कोणती स्टट्जी घ्यावी ह्यात पराक्र्मी लोकांची पण गडबड होते नाहीतर हिटलर व नेपोलियन हारले नसते. तसेच रावणाचे झाले.
|
Santu
| |
| Thursday, May 31, 2007 - 1:30 pm: |
| 
|
हि नाणि आहेत. पल्लव राजा अपराजितवर्मन(९००इ.स.) याची यात अस दर्शवल आहे कि राजा रामसेतु ला तिर्थाटना साठि गेला. हा १२०० वर्षा पुर्विचा पुरावा दाखवतो की तिथे सेतु होता 
|
Santu
| |
| Thursday, May 31, 2007 - 1:39 pm: |
| 
|
तसेच जाफ़ना(आता श्रीलन्केत) येथील काहि तमिल राजे जे स्वतहाला आर्यचक्रवर्ती म्हणवुन घेत ते आणखि एक पदवि स्वतहा ला लावुन घेत ति म्हणजे सेतुकवलम(याचा अर्थ सेतु चे रक्षण कर्ते) आता या त्यांच्या नाण्यात तमिल मधे सेतु लिहलेले आहे. 
|
Santu
| |
| Thursday, May 31, 2007 - 1:49 pm: |
| 
|
हा आहे नेदरलंड मधे बनलेला नकाशा(१७४७इ.स.) यात रामन कॉइल(रामसेतु) चा उल्लेख आहे 
|
Slarti
| |
| Thursday, May 31, 2007 - 2:36 pm: |
| 
|
संतु, तू दाखवलेली चित्रे पुरावा म्हणून निरुपयोगी आहेत कारण ती फक्त एवढेच दर्शवितात की सेतू होता. सेतू होता त्यात वाद नाहीच आहे, तो मानवनिर्मित आहे की नाही हा मुद्दा आहे. दुसरे म्हणजे ही नाणी / नकाशे वगैरे खूप नवी आहेत. रामायण ज्या काळात घडले तेव्हाचे काही आहे का ? तिसरे म्हणजे रामायणकालीन नाणी दाखवली तरी त्यावरून परत एवढेच सिद्ध होईल की सेतू होता, तो रामाने बांधला हे कसे कळणार (जोपर्यंत रामायणकालीन अशा गोष्टींवर असे स्पष्ट उल्लेख आढळत नाही तोपर्यंत) ? चौथे म्हणजे रामायण हे संपूर्ण भारतीय उपखंडात व आग्नेय आशियात लोकप्रिय असल्याने या उपखंडातील किंवा आग्नेय आशियातील प्राचीन नाण्यांवर / शिलालेखांवर रामायणासंबंधी उल्लेख असतील तर त्याने रामायण अथवा सेतूविषयीचा दावा सिद्ध होत नाही. त्याने एवढेच सिद्ध होते की रामायण त्या भागांतसुद्धा ज्ञात होते. मी मागे काही मुद्दे उपस्थित केले आहेत मनुष्यबळासंबंधी वगैरे, त्यावर काही चर्चा व्हावी.
|
Slarti
| |
| Thursday, May 31, 2007 - 2:49 pm: |
| 
|
समुद्रदेव ? मग तुम्हाला असे म्हणायचे आहे का की सेतू वानरांनी बांधला ? मग त्यासंबंधीसुद्धा मी काही प्रश्न विचरले आहेत.
|
स्लार्ती, इतक्या पूर्वी घडलेल्या गोष्टींचे पुरावे सापडणे अशक्य आहे. सापडले तरी ते चांगल्या अवस्थेत असायला पाहिजेत. समजा चांगल्या अवस्थेत असले तरी ते कशावरून त्याच काळातले होते, कशावरून त्यात काल्पनिक चित्रे नव्हती असे अनेक मुद्दे उपस्थित होऊ शकतात. ताजमहाल पुरातन वास्तू आहे म्हणून त्याच्या आसपास बांधकाम करू दिले जात नाही, पुर्वी कुतुबमिनार मध्ये येत होता म्हणून रेल्वेमार्गच बदलण्यात आला. त्याचप्रमाणे रामसेतू ही एक नैसर्गिक पुरातन संपत्ती आहे. तिचे जतन करायचे का ती व्यापारी उपयोगाकरता नष्ट करायची? २००३ मध्ये झालेल्या क्रिकेट विश्वकरंडकाचा एक सामना नामिबीयातत होता. मैदानात एक झाड होते. ते सीमारेषेच्या थोडे आत होते. ते झाड न पाडता त्या ठिकाणी सीमारेषा आत वळवून नेली होती. एका साध्या झाडाकरता सीमारेषेची लांबी कमी केली होती. हा सेतू श्रीरामाने बांधला किंवा नाही हे एकविसाव्या शतकात कुणीच सिद्ध करू शकत नाही. अनेक हिंदूंची तशी श्रद्धा आहे. प्रश्न हा आहे की एक निसर्गाचा ठेवा आपण नष्ट करायचा का नाही? इथे श्रद्धा, भावना इ. गैरलागू आहे. निसर्गाची मोडतोड करायची का हा खरा प्रश्न आहे. केल्यास त्याचे काय दुष्परिणाम होतील याचा कुणी अभ्यास केला आहे का? तसेच या दुष्परिणामांच्या तुलनेत होणारे फायदे किती हे बघणे आवश्यक आहे.
|
Slarti
| |
| Thursday, May 31, 2007 - 3:05 pm: |
| 
|
माढेकर, ताजमहाल व कुतुबमिनार हे वादातीत मानवनिर्मित आहेत व इतिहास म्हणून जतन करायला पाहिजेत. इथे तो इतिहास आहे का नाही हाच मुळात मुद्दा आहे. तरीदेखिल भावनेचा मुद्दा गैरलागू आहे असेही मी म्हणणार नाही कारण बहुसंख्य जनता त्या सेतूला 'मानते'. तर या भावनांकडे दुर्लक्ष करणे सरकारकडून अपेक्षित नाही, निदान लोकशाहीत तरी. असो. तो एक वेगळाच विषय होईल. तुमचा दुसरा मुद्दा एकदम मान्य. तो सेतू पाडल्याने तेथील पर्यावरणावर काय परिणाम होणार आहे याचा विचार व्हायलाच हवा. good point . btw , मी तर असे वाचले की भाजप सरकार असताना या प्रकल्पाला हिरवा कंदील मिळाला होता, ते कसे ?
|
Svsameer
| |
| Thursday, May 31, 2007 - 4:23 pm: |
| 
|
निसर्गाची मोडतोड करायची का हा खरा प्रश्न आहे. केल्यास त्याचे काय दुष्परिणाम होतील याचा कुणी अभ्यास केला आहे का? तसेच या दुष्परिणामांच्या तुलनेत होणारे फायदे किती हे बघणे आवश्यक आहे. >> सतीश हा लाख मोलाचा मुद्दा उपस्थीत केला आहेस. खरं तर याच मुद्द्यावर जास्त चर्चा झाली पाहिजे
|
समुद्रदेव ? मग तुम्हाला असे म्हणायचे आहे का की सेतू वानरांनी बांधला ?>.. स्लर्टी, मी पुढे कंसात लिहीले की आपण पेगन्स आहोत. याचा अर्थ आपल्या साठी ही पंचतत्वे पण देव आहेत, वारा, सुर्य, अग्नी, झाड, दगड हे पण देव आहेत मग समुद्र का नाही? (हे माझे वैयक्तीक मत नाही तर आपल्या मायथॉलॉजीत लिहीले आहे). वानरांनी तो बांधला याला पुरावा काय? पुरावा नाही. मला तर वाटत वानरांनी पण तो बांधला नाही तर माणंसानी बांधला. हे कसे काय? परत एकदा आठवुन पहा पुराणातील गोष्टी, त्यात असे आढळेल की बहुतेक प्राण्यांचा नावाने लोक होते, जसे नागलोक, वानर, अस्वल. तर माझ्या तर्कानुसार ते सर्व नाग, वानर वा अस्वल नसुन ते माणंस होते व फक्त त्या जनावरांचे झेंडे ते घ्यायचे. कारण त्या काळी टोळ्या नी माणंस राहायचे. मग नाग व अस्वल युद्धात नाग हारले अशी कुठेतरी गोष्ट आहे. याचा अर्थ असा होऊ शकतो की नागाचा झेंडा असनार्या माणसांना अस्वलाचा झेंडा (जांबुवंत) असनार्या लोकांनी हारविले. नंतरच्या काळात मात्र मोखीक पध्दतीने ज्ञान प्रसारित होताना नाग लोक वा कपी लोक हे प्रत्यक्ष नाग वा वानर मानले जाउ लागले असावेत. म्हणुनच तो सेतु वानर निर्मीत नाही तर माणव निर्मीत असावा. (परत एकदा हा माझा तर्क आहे त्याल पुरावा नाही, मी संशोधक ही नाही).
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|