|
Slarti
| |
| Tuesday, May 29, 2007 - 8:22 pm: |
| 
|
दागिने म्हणजे धातूचे की दगडी (खनिजे वगैरे) ? आणि रामायणाचा काळ साधारण २५०० वर्षांपूर्वीचा मानला जातो ना ?
|
http://esakal.com/esakal/05302007/Specialnews57DA8341B7.htm मल्लिका बिपाशा सारखी मन्डळी आजही घालत नाहीत
|
रामायण व महाभारत हे खरोखर घडलेला इतिहास सांगतात का ती सुरस आणि रोचक पण कपोलकल्पित महाकाव्ये आहेत? लिखित ओळींखेरीज अन्य कुठलाही ठोस पुरावा नसल्यामुळे ही काल्पनिक म्हणणार्यांचे पारडे सध्या जड आहे. जर नाणी, शिलालेख, अन्य अवशेष वगैरे मिळाले तर त्यात काही इतिहास आहे असे म्हणता येईल. पाण्याखालती सापडलेल्या द्वारकेचे एक उदाहरण आहे जिथे काही सापडू शकेल. पण तसे कोणी करताना दिसत नाही. नुसती भावनाप्रधान वाक्ये टाकून काय उपयोग? खणखणीत पुरावा दिला तर सगळ्यांची तोंडे बंद होतील. मोहंदजडो, हडप्पा हे भारतातील आदि संस्कृतींचे अवशेष मानले जातात. रामायण व महाभारत हे त्याहीपूर्वीचे आहेत असे कुणाचे म्हणणे आहे का? असल्यास पुरावा काय?
|
>>> मोहंदजडो, हडप्पा हे भारतातील आदि संस्कृतींचे अवशेष मानले जातात. रामायण व महाभारत हे त्याहीपूर्वीचे आहेत असे कुणाचे म्हणणे आहे का? असल्यास पुरावा काय? हडप्पा वगैरे हे भारतातील आदी संस्कृतीचे अवशेष आहेत व त्यापूर्वी भारतात संस्कृती वव्हती याला पुरावा काय? हे कुणी ठरवलं? ब्रिटीशांनी इथल्या समाजात फूट पाडण्यासाठी, आर्य ईराण मधून येथे आले आणि इथल्या मूळच्या द्रविड लोकांवर हल्ला करून त्यांना गुलाम बनवले असा तद्दन खोटा इतिहास प्रसिद्ध केला. या थापेबाजीला आधार म्हणून दक्षिणेतल्या लोकांच्या त्वचेचा रंग आणि त्यांची भाषा वेगळी असल्याचा त्यांनी दावा केला. त्वचेचा रंग हा भौगोलिक स्थितीवर अवलंबून असतो. त्याचा संस्कृतीशी काहिही संबंध नाही. तसेच भारतात प्रत्येक ४०-५० मैलांवर भाषा बदलते. त्याचाही संस्कृतीशी काहिही संबंध नाही. इथल्या जनतेमध्ये सांस्कृतिक फूट पाडण्यासाठीच फिरंग्यांनी हा उद्योग केला.
|
प्रथम स्लार्तिचा प्रश्न-रामायण २५०० वर्षापुर्विचे नाही.महाभारत ५००० वर्षापुर्विचे आहे आणि रामायण त्याहुनही पुर्विचे आहे.दागिने कुठले हे मला माहित नाही कारण मी ती पुस्तके वाचलेली नाहित पुर्णपणे कारण तो मझा विषय नाही.सांगायचा मुद्दा हा होता की जी डार्विनची थिअरी आहे ती चुकिची आहे.कारण डार्विनने दिलेल्या मानवाच्या evolution पुर्वी पण माणुस होता. दुसरा प्रश्न विजयरावान्चा-केन्द्र सरकारच म्हणन आहे की तो रामसेतु नाही.विजयराव,केन्द्र सरकारवर एवढा विश्वास आहे तर मग अतिरेकी आणि संसदेवर हल्ला याबद्दल तुम्ही केन्द्र सरकारच का ऐकत नाही?? पुढचा प्रश्न-कुठल्याही गोष्टींचा प्रत्यक्ष पुरावा नाही म्हणजे ती गोष्ट चुकीची हे म्हणण चुकिच आहे. आज पुरावा नसेल पण भविष्यात मिळू शकतो. काही उदाहरणे- अभिमन्युने युध्दनिती आईच्या पोटात असताना शिकली याला पुर्वी शास्त्रज्ञ लोक म्हणत की हे कस शक्य आहे कारण fetus ला कान नसतात पण आता हे prove झाल आहे की आइच्या पोटात सुध्द्दा मुलाला ऐकु येत असते.म्हणूनच गर्भवतींनी हिंसक फ़िल्म्स पाहु नयेत अस डॉक्टर्स सुचवतात. दुसरा मुद्दा की पुनर्जन्म सायन्स मानत नाही कारण पुरावा नाही.पण आजच्या जगात जगभरातले psychologists regression चा आपल्या उपचारांमधे उपयोग करतात. आणि हे दाखवुन देत की पुनर्जन्म जरी prove होउ शकत नसला तरी त्यात तथ्य आहे. नाहितर regression theory चा काहिच उपयोग झाला नसता. अजुन एक पुर्विच्या शास्त्रज्ञांना हे पटायच नाही की कुंतीनी बीना sexual contact मुलाला जन्म दिला होता पण आताच्या जगात test tube baby हा प्रकार आला आहे. ज्यात तिच गोष्ट दिसते जी आमच्या धर्मग्रंथांमधे आहे. लाखो वर्षापुर्वी घडलेल्या गोष्टींचा पुरावा मिळण इतक सोप नाही.तुम्ही जर रामसेतुचा वरुन घेतलेला फ़ोटो बघितला तर लक्षात येइल की हा सेतू मानवनिर्मित जरुर असु शकतो. त्यामुळे भविष्यात ही गोष्ट prove जरुर होउ शकते.पण जर आपण तो सेतु तोडलाच तर ती शक्यताही मावळते. अजुन एक गोष्ट की बर्याच वेळा धर्मग्रंथातिल गोष्टी illogical वाटतात. पण म्हणून त्या चुकिच्या अशा conclusion वर येउ नये. कारण माणसाचे senses limited आहेत. त्यामुळे आपल्याला समजणार्या गोष्टींना पण limitations आहेत.
|
मी तर या पुढे असे म्हणेल की दक्षिनेतील सर्व भाषेंचे मुळ हे संस्कृत आहे हे तर सर्वज्ञात आहे म्हणजे जरी खरे आक्रमन झाले असेल तर येथील मुळे द्रविड हे जास्त विद्वान होते व आर्यांनी (इराणी ?) त्यांची भाषा स्विकारली वा ते द्रवीडीयन संस्कृतीशी एकरुप झाले. ते ईथे येन्या आधीच मुळ भारतीय प्रगत होते असे नविन ईतिहासकार मानत आहेत. या साठी जर पुरावे हवे असतील तर मी वाचलेले पुस्तक ह्या बी बी मध्ये मी काही ईतिहासाची पुस्तके नमुद केली आहेत ती वाचावी. रामायन वा महाभारताला पुरावा नाही हे जरी सत्य असले तरी आता मुळ द्वारका (बहुतेक पाक मध्ये) सापडली आहे. तसेच मदुराई येथे समुद्रात २० किलोमीटर मध्ये एक गाव सापडले आहे. पुरातत्व वाले त्या गावात काही जास्त मिळते का ते पाहात आहेत. त्या गावाच्या सापडन्यामुळे एक गोष्ट नक्की झाली की जो जुना महाप्रलय पुरांना मध्ये लिहीला आहे त्याला आता पुरावा सापडला. हा प्रलयाचा काळ हा बहुतेक महाभारत वा रामायनाच्या आधीचा काळ आहे. त्यामुळे जुने ते टाकावु असे म्हणने चुकीचे होईल. आर्य खरेच आले असते तर प्राची द्रवीडीयन पोथ्यात (साहीत्यात) नक्कीच त्याचा उल्लेख आला असता, तो तसा नाहीये यावरुनच आर्यन थेअरी किती चुकीचा व फुट पाडु आहे हे दिसुन येते.
|
केदार जोशी, आपले गृहितक साफ चूक आहे. तमिळ, कन्नड व मल्ल्याळी ह्या भाषा संस्कृतोद्भव नाहीत. त्यांनी संस्कृतमधून अनेक शब्दांची देवाणघेवाण केली आहे पण त्या भाषांचा मूळ गाभा वेगळा आहे. मी, तू, हो, नाही, जाणे, येणे, गाव, दूध अशा अत्यंत मूलभूत शब्दांकरता उत्तर भारतातील भाषा (जसे मराठी, गुजराथी, बंगली, हिंदी, ओरिया इत्यादी ) जे शब्द वापरतात ते संस्कृतमधील शब्दांच्या जवळचे आहेत हे सहज कळेल. त्याकरता फार शास्त्रीय ज्ञान असायची गरज नाही. त्याबरोबर हेही कळेल की कन्नड, तमिळ व मल्ल्याळी ह्या भाषांतले प्रचलित शब्द फार वेगळे आहेत. त्यांचे आपापसात साम्य आहे पण संस्कृतशी नाही. तीच गोष्ट आकड्यांची. दक्षिणी भाषांचे व्याकरणही खूप वेगळे आहे. निर्जीव वस्तुंना दक्षिणी भाषात केवळ नपुंसकलिंग वापरतात. उत्तरी भाषात बाकीही लिंगे वापरतात. हे सर्व फरक अत्यंत मूलभूत आहेत. त्यामुळे भाषाशास्त्रानुसार त्या भाषा वेगळ्या समजल्या जातात.
|
ब्रिटिश जाऊन आज साठ वर्षे व्हायला आली तरी आपण त्यांच्याच नावाने खडे फोडतो आहोत. आपण काही सकस संशोधन करत नाही. पुरावे देऊन ब्रिटिशांचे शोध खोटे ठरवणे मान्य आहे पण नुसते भावनिक होऊन त्यांना शिवीगाळ करणे किती दिवस चालवणार? वरती पुराणातील मासले देऊन सुतावरून स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न केला आहे तो केविलवाणा वाटतो. कुंतीची मुले आणि टेस्ट ट्युब बेबी, अभिमन्यूचे चक्रव्यूह भेदण्याचे ज्ञान आणि गर्भवतींनी हिंसक सिनेमे बघू नयेत असे संकेत इत्यादी. महाभारतात असेही आहे की सूर्याने, वायुने, इंद्राने आणि अन्य मंडळींनी कुंतीशी समागम केला आणि त्यातून पांडव झाले. असले भलते तर आज सिद्ध झालेले नाही ना? हे निव्वळ अतिरंजित वर्णन म्हणता येईल. मोहंदजडो बर्यापैकी मागासलेली संस्कृती म्हणता येइल. त्यांच्याकडे विमाने, विविध अस्त्रे, राजवाडे फार नसावेत. पण त्यांचेही अवशेष उरले आहेत तर तथाकथित काहीच्या काही प्रगत संस्कृतीचे काहीच अवशेष का मिळत नाहीत?
|
हे माझे गृहीतक नाही तर अनेक ईतिहासकारांचे आहे, अगदी परकीय सुध्दा. एखाद दोन वाक्याने त्या भाषा निगडीत नाहीत हे म्हणने कदाचित चुकीचे ठरेल. आपण केंब्रीज हिस्ट्री ऑफ ईंडीया हे पुस्तक वाचावे त्यात देखील एक चाप्टर फक्त भाषेवर आहे. तरी वादासाठी तात्पुरते असे जरी मान्य केले की त्या भाषा संस्कृतशी निगडीत नाहीत तरी मग त्या तुलनेने मागासलेल्या द्रविडीयन साहीत्यात आर्यन ईन्वेजन का नाही? तसेच आपण मिनाक्षी मंदीरा बद्दल देखील वाचन करावे. त्या आसपास खुप मोठे शहर सापडले आहे. ( बहुतेक गरुड पुरानात मी जे वर प्रलायाचे लिहीले आहे ते मिळेल). लेखन पध्दती खुप नंतर आली व त्या आधी ते ज्ञान हे मोखीक पध्द्दतीने ट्रान्सफर होत होते या बद्दल आपले दुमत नसावे. त्यामुळे जर त्या हजारो वर्षापुर्वी च्या गोष्टी होत्या हे लक्षात येईल. (मी लाखो म्हणल नाहीये व वर चिन्याकडुन चुकुन लाखो लिहीले गेल्याची शक्यता आहे). मोहन्जोदाडो व हडप्पा ह्या तुलनेने मागासलेल्या कदाचित असतीलही पण त्याच आधी मिळाल्या. कदाचित आता जास्त जुने शहर मिळनार नाहीत हे कशावरुन? हरियाना मध्ये देखील एका ठिकानी उत्ख्नन चालु आहे, तेथील पुरातत्व खात्यातिल लोकांनी बहुतेक ती जागा हडप्पा पेक्षा किती तरी हजार वर्षे जुनी आहे असे सांगीतले आहे. (मागील महीन्यात आज तक वर मी ऐकले). त्यामुळे जुने शहर मिळतीलच. राहीली गोष्ट विमान वैगरेची, तर त्या साठी मी आणखी एक उदाहरन देतो. फार जुन्या काळी आपल्या केआ ऋषीने जगातील सर्वात लहान गोष्टीचा शोध लावला. ती गोष्ट होती " अणू. " बहुतेक त्यांचे नाव कनिष्क आहे. ( CBDG ). जर अणू चा शोध लागला असेल तर विमान न्हवते असे म्हणने धाडसाचे ठरेल. हां काय नाही तर लिखीत स्वरुपात त्यांचा पुरावा नाही जसे विमान रामकडे होते हे आहे पण ते निर्मान कसे हे नाही. बर त्यात आणखी मजेशीर गोष्ट जर लेखक वाल्मीकी वा व्यास (रामायण, महाभारत) जर विमान आहे असे लिहीतो तर ती त्यची केवळ कल्पना शक्ती का? साधारणपने लेखक वा कवि हे रोज दिसनार्या होनार्या गोष्टी कथे, कवितेतुन मांडतात. मग दोन्ही लेखक केवळ कल्पनाशक्तीचा विकास करुन गोष्टी लिहीत होते का? तुमचा दुसरा मुद्दा म्हणजे ब्रिटीश. त्यावर तर त्यांचाच ईतीहासकारात दुमत होते व कशा वेग वेगळ्या गोष्टी ते लिहीत होते ह्याचे अनेक पुरावे आहे. त्या साठी आपण ग्रंट डफ चा मराठ्याचा इतिहास वाचावा. त्यात त्याने जे लिहीले ते त्याचा सम्कालीन एडवर्ड की ऐलीफिस्टन ने लिहीले नाही. ह्या वरुन सिध होते की त्यांना आपला इतिहास हा त्यांचा द्रुष्टीने लिहायचा होता. (एकजन शिवाजीला लुटारु म्हणतो दुसरा त्याला जानता राजा म्हनतो, एकजन मराठेशाही ला भेकड सम्जतो कारण ते गणीमी काव्याने ल्ढत होते तर दुसरा म्हनतो ते ग्रेट आहेत, पुढे पेशव्यांचा इतीहास डफ ने लिहीला आहे तो आपण वाचावा). ह्या एकाच उदाहरणावरुन ब्रिटीश कशे होते ते कळेल. आपना दुसरे आय्रन मेजर एक्साम्पल हवे असल्यात ते देखील देऊ शकतो.
|
Peshawa
| |
| Wednesday, May 30, 2007 - 7:40 pm: |
| 
|
मोहंदजडो बर्यापैकी मागासलेली संस्कृती म्हणता येइल. त्यांच्याकडे विमाने, विविध अस्त्रे, राजवाडे फार नसावेत. पण त्यांचेही अवशेष उरले आहेत तर तथाकथित काहीच्या काही प्रगत संस्कृतीचे काहीच अवशेष का मिळत नाहीत?>>> मागासलेली पुढरलेली हे कसे थरवतात? हे कळेल का? मग कही बोलता येइल..
|
अणू माहित होता तर विमान माहित नव्हते असे म्हणणे धाडसाचे ठरेल. काहीतरी काय? माझे प्रतिप्रश्न १. अणू ही संकल्पना आजच्या विज्ञानाला माहिती आहे तितकी तर्ककठोर पद्धतीने कणादाने सांगितली आहे का? माझ्या माहितीप्रमाणे नाही. आपल्याला मूलद्रव्ये माहित होती का? मला वाटते नव्हती. आपणास हे पटत नसल्यास कुठकुठली मूलद्रव्ये माहित होती ते सांगा. २. आणि अणु वरून एकदम विमानापर्यंत उडी कशी मारली आपण? विमान बनवायला वेगळ्या ज्ञानाची आवश्यकता असते. न्युटनचे नियम, हवेचे गुणधर्म, एरोडायन्यामिक्स वगैरे खूप वेगळ्या गोष्टी आहे. अणू हे फारतर सूक्ष्माचे ज्ञान म्हणता येईल. विमान बनवायला स्थूलाचे ज्ञान लागते. एक येते म्हणून दुसरे येईलच असे नाही. इतकी अफाट प्रगती जर आपण केली असेल तर मौखिक माध्यमातून ज्ञान टिकवण्याच्या मर्यादा का लक्षात आल्या नाहीत? कागद सदृश गोष्टींचा शोध का लावता आला नाही? इतके उपयोगी तंत्रज्ञान कालाच्या ओघात नष्ट कसे झाले? सर्वदूर पसरले का नाही? आजच्या काळात एखादे तंत्रज्ञान नष्ट झालेच तर जास्त वरचढ तंत्रज्ञान त्याची जागा घेते नाहीतर ते चिरंतन टिकते. तसे तेव्हा नाही झाले. म्हणजे बहुधा ह्या निव्वळ कविकल्पनाच असाव्यात. जे न देखे रवी ते देखे कवी अशी एक ओळ आहे. उदाहरण म्हणून बघा, शांता शेळक्यांनी "झाडावरती चेंडू लटकती शेतामधुनी ब्याटी" अशी एक ओळ असणारी कविता लिहिली आहे म्हणून हजार वर्षांनी असे म्हणणार का की तशी झाडे आणि शेते भारतात होती? कारण कवी जे दिसते तेच लिहितो, नाही का?
|
Nanya
| |
| Thursday, May 31, 2007 - 2:05 am: |
| 
|
पण बॉल ब्याट अस्तित्वात असल्याशिवाय का ही ओळ त्याना लिहिता आली? उद्या बॉल ब्याट ची शेते नव्हती म्हणजे बॉल, ब्याट ही नव्हते असे म्हणता येइल का?
|
कवी हा कल्पनेत रममाण होतो हे सांगण्याकरता हा खटाटोप. कळत नसेल तर अजून काही ओळी बघा पर ज्यांचे सोन्याचे ते रावे हेरावे ... पंख पाचुचे मोरांना टिपती पाखरे मोत्यंना पंख फडकती घोड्यांना मौज दिसे ही थोड्यांना रम्य, गेय पण पूर्ण काल्पनिक. कवी जे लिहितो त्यातील मूळ मुद्दल, वरचे व्याज वगैरे सगळे पूर्ण काल्पनिक असणे शक्य आहे हे सिद्ध करण्याचा हा खटाटोप. कविकल्पना हा शब्द कसा आला बरे? सबब, रामायणात विमान अशी कल्पना केली म्हणून खरोखर विमान अस्तित्वात होते असे आजिबात नाही. एखाद्या पक्षाकडे बघून अशी कल्पना सुचू शकते. ज्युल्स व्हर्नने पाणबुडी, रॉकेट वगैरे गोष्टींची कल्पना त्या गोष्टी बनायच्या खूप आधी केली होती. एच जी वेल्सने कालयंत्राची कल्पना केली होती. असे यंत्र आजतागायत कोणी बनवू शकलेला नाही. केवळ कल्पना. अशी अनेक उदाहरणे आहेत.
|
Slarti
| |
| Thursday, May 31, 2007 - 2:37 am: |
| 
|
'पुष्पक विमान परिणाम' जोरात दिसत आहे. राजेशने उपस्थित केलेले मुद्दे पटले. असो. परत रामसेतूच्या मुद्याकडे वळतो. माझ्या माहितीप्रमाणे त्या भागात समुद्र फारसा खोल नाहीये. तर तिथे असा पूल बांधण्यासाठी फार मोठ्या तांत्रिक ज्ञानाची अथवा प्रगतीची गरज नसावी. मनुष्यबळ मात्र बरेच लागेल. त्यामुळे प्रश्न हा आहे की 'जर तो सेतू रामनिर्मित असेल' तर ते काम नमूद केलेल्या वेळात पूर्ण करायला किती मनुष्यबळ लागेल आणि रामाने ते कसे जमवले (किंवा किती वानरे लागतील, ती रामाने कशी जमवली आणि त्यांना train कसे केले इ.इ... खरेतर ही परिस्थिती जास्त interesting वाटते... हजारो कामगार असतील तर पिरॅमीडसुद्धा बांधता येतात, वानरांकडून सेतू बांधून घेतला असेल तर बोला ) शिवाय त्या सेतूसाठी जे दगड वापरले आहेत ते कोठून मिळाले, त्यांना बांधकामाच्या जागी कसे आणले गेले इत्यादी प्रश्न आहेतच. यासंबंधी रामायणात अथवा इतरत्र कोठे काही उल्लेख आहे का किंवा त्यावर काही संशोधन झाले आहे का ? कृ.जा.प्र.पा. बाकी त्या सेतूचे वय अजूनही वादातीत सिद्ध करता येत नाही ही कमाल आहे...
|
Slarti
| |
| Thursday, May 31, 2007 - 2:57 am: |
| 
|
ता.क. शास्त्र मानते त्यापेक्षाही पूर्वी भारतात माणूस होता हे खरे असेल तर डार्विनचा सिद्धांत चुकीचा ठरतो हे कसे ते कळाले नाही. डार्विनने उत्क्रांतीवादाचा आणि नैसर्गिक निवडीचा सिद्धांत मांडला होता. वर्षे पुढेमागे झाली असलीच तर एक तर ती paleoanthropologists नी (मानवाष्मशास्त्रज्ञ ?? ) केलेली चूक असेल किंवा काही जीवाष्मे अजून सापडली नसतील. डार्विन चूक असेल तर निर्माणवादाकडे किंवा एरिक फॉन डॅनिकेनकडे बघावे लागेल.
|
मला हे म्हनायचे होते की जर अणु पर्यंत विज्ञान गेले असेल तर कदाचित विमान खरोखर असतील ही. ते न्हवते वा होते हे सिध्द होत नाही. त्यामुळे जसे आहे म्हननार्यांचे काही सिध्द होत नाही तसेच नाही म्हणनार्यांचे देखील होनार नाही. रामायणात जर त्या सेतु चा उल्लेख असेल तर वाल्मीकींना निदान तो, ती काल्पनिक कथा (?) लिहीताना ते माहीती तरी पाहीजे वा तेथे तो गेला असला पाहीजे, दोन्ही ग्रुहीतांमध्ये तो सेतु आहे हे नाकारता येत नाही, कारण त्याचा उल्लेख आहे व तो आजही अस्तित्वात आहे. तिच गोष्ट रामेश्वरम ह्या देवळाची. तिथे ईतक्या विचीत्र ठिकानी असे मंदीर बांधल्याचा उल्लेख रामायनात आहे व ते मंदीर आजही तिथे आहे. वरिल दोन्ही गोष्टीत परत एकदा वाल्मीकीला त्या आधीच माहीती पाहीजेत वा त्या घडताना त्याने लिहील्या पाहीजेत. दोन्ही गोष्टी होउ शकतात. तो सेतु रामाने बांधला की आधीच तिथे होता हे अजुनही कोनी सिध्द करु शकले नाही. तेथील दगडांचे कार्बनींग करायला हवे. जर राम वा कृष्ण खरे धरले नाहीत तर हिंदु धर्मातील अनेक गोष्टी व हिंदु तत्वज्ञान हे कथा आहे असेच मानावे लागेल. या साठी आधार हवा तो रिसर्च चा आणि ते हळु हळु चालु आहे त्यामुळे ते सर्व काल्पनीक आहे वा सत्य आहे ह्याला आत्तातरी वरील (मंदीर व सेतु वाल्मीकी ला माहीती असने) ह्याशिवाय काही पुरावा नाही. पण त्यामुळे त्या न्हवत्या हे म्हणने बरोबर आहे का? वाल्मीकी नी ती केवळ काल्पनीक कथा लिहीली याला पुरावा काय?
|
Slarti
| |
| Thursday, May 31, 2007 - 5:03 am: |
| 
|
वाल्मीकीला त्या सेतूबद्दलची माहिती असणे अशक्य नाही हे खरे. तो स्वतः तिथे गेला असेल किंवा त्याला त्या भागातील एखादी व्यक्ती भेटली असेल (भारतभर पदभ्रमण करणे अशक्य नाही). मला परत काही प्रश्न पडले : 'या' भूभागापासून ते 'त्या' भूभागापर्यंत समुद्र साधारण उथळ आहे हे रामाला कसे कळाले ? म्हणजे इथपासून तिथपर्यंत सेतू बांधता येण्याजोगा उथळ भाग आहे याची त्याला काय खात्री होती ? नाहीतर उथळ भाग व सेतूचे स्थान जुळतात कसे ? आता सागरी दळणवळण असेल तर हे ज्ञान स्थानिक लोकांना असेल. मग असे सागरी दळणवळण होते का ? आणि ते जर होते तर ३० मैल लांबीचा सेतु बांधायच्याऐवजी रामाने त्याच्या सेनेकडून दणादण होड्या / जहाजे / गलबते का नाही बांधून घेतली ? पुरावे नाही मागत, पण तर्क झेपला नाही म्हणून विचारत आहे. परत एकदा कृ.जा.प्र.पा. btw , माहिती असलेल्या गोष्टींवर आधारीत खरी वाटेल अशी गोष्ट लिहिणे हेही शक्य आहे. वाल्मीकी हा त्या काळचा Dan Brown असेल... 
|
काश्मीरमध्ये एका मशिदीत अल्लाचा एक केस ठेवला आहे म्हणे. तो केस अल्लाचाच आहे याला काय पुरावा आहे? २५-३० वर्षांपूर्वी तो केस चोरीला गेला होता. काही दिवसानंतर तो परत मिळाला. परत मिळालेला केस हा मूळचाच केस होता हे कशावरून? हा प्रश्न मुसलमानांना विचारला तर पुढच्या क्षणी ते प्रश्नकर्त्याला मारून टाकतील. गौतम बुद्धाच्या शरीराचे काही अवयव जगात वेगवेगळ्या बौद्धमठात ठेवलेले आहेते म्हणे. ते अवशेष बुद्धाचेच आहेत याला काय पुरावा आहे? येशू ख्रिस्ताचा जन्म जेरुसलेम मध्येच झाला होता याचा काय पुरावा आहे? मुळात येशू ख्रिस्त नावाची व्यक्ती होऊन गेली याला काय पुरावा आहे? या सर्व श्रद्धेच्या आणि विश्वासाच्या गोष्टी आहेत. हजारो वर्षानंतर त्या सिद्ध करणे खूपच अवघड आहे. रामायण, महाभारत, पुराणे यांचे देखील असेच आहे. ज्याला विश्वास ठेवायचा त्याने ठेवावा, ज्यांना नाही ठेवायचा त्यांनी ठेवू नये. परंतु त्यांनी विश्वास ठेवणार्यांच्या भावना दुखावू नयेत.
|
परंतु त्यांनी विश्वास ठेवणार्यांच्या भावना दुखावू नयेत. मग अशा गोष्टींवर चर्चा करु नयेत हे उत्तम! मुळात येशू ख्रिस्त नावाची व्यक्ती होऊन गेली याला काय पुरावा आहे? आता तुम्ही पण कुणाच्यातरी भावना दुखवता आहातच की!
|
Svsameer
| |
| Thursday, May 31, 2007 - 6:28 am: |
| 
|
हिंदु धर्मामध्ये हा कडवेपणा कधी पासुन आला बुवा? बहुधा बाबरी मशीद तोडल्यानंतर असावा. मला जो माझा हिंदु धर्म माहित आहे त्यात प्रत्यक्श यमधर्माला देखील प्रश्न विचारण्यात आला होता. प्रत्येक वेळि इतर धर्म कसे वाईट आहे हे सांगत बसण्यपेक्शा जर चालु असलेल्या मुद्द्यवर उत्तरं लिहिलित तर बरं होइल.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|