|
Mahesh
| |
| Monday, May 21, 2007 - 2:15 pm: |
| 
|
लालभाईंची कमी जाणवते कधी कधी... काश ते लिहीत असते तर...
|
कुमार केतकर त्या लेखात म्हणतात की गेल्या १५ वर्षात जेवढा हुडगुस हिंदु अतिरेक्यांनी (हा त्यांचा नवा शोध) घातला आहे तो मुस्लिम किंवा शिख अतिरेक्यांनी घातलेला नाही.माझ्यामते जे एवढे बॉम्बस्फ़ोट होतात ते सर्व हिंदुच करवतात अस त्यांच म्हणण असाव.काश्मिरमधे तर जवळ्जवळ दररोज बॉम्ब्स्फ़ोट होतात ते पण केतकरांच्या मते हिन्दुच घदवुन आणत असावेत. विजयराव,तुम्ही म्हणालात की हैद्राबाद बॉम्ब्स्फ़ोट संघानी घडवीले.मग कॉंग्रेसच्या मुख्यमंत्री राजशेखर रेड्डी यांनी परकिय शक्तिंचा हात आहे अस का म्हटलय???
|
त्या लेखात त्यांनाच कळाले नाही काय म्हणायचे आहे ते. त्यामुळे अनेक मुद्दे एकाच लेखात मांडले जेने करुन लक्षा एका मुद्यावरुन लगेच दुसरीकडे जावे. शिख, हिंदु दहशवाद? कॉंग्रेस, प्रजा समाजवादी जनसंघ व भरीस भर खलीस्थानवादी. केतकर रिटायर कधी होनार आहेत? ह्या वयात संवग प्रसिध्दीच्या मागे ते का लागलेत?
|
Dinesh77
| |
| Monday, May 21, 2007 - 7:16 pm: |
| 
|
केतकरला VRS ची नाही तर CRS (Complusary Retirement)ची गरज आहे.
|
विजयराव,तुम्ही म्हणालात की हैद्राबाद बॉम्ब्स्फ़ोट संघानी घडवील असे मी कधी म्हणालो? आणी मेढेकरसाहेब, आपण दिलेल्या ११ पैकी कोणती विधाने मी केली आहेत? माझ्या तोन्डी असली हास्यास्पद विधाने टाकून आपली करमणूक होत असेल तर मला आननद आहे. वाटेत वाघ, सिंह आडवे आले तर संरक्षणासाठी म्हणून तिच्याकडे बंदुका, बॉंब वगैरे होते. तिच्याकडे हे सारे होते याला पुरावा काय, तर एका बडतर्फ झालेल्या पोलिस अधिकर्याचे म्हणणे? बाकी केतकरान्चा सोमवारचा अग्रलेख वाचून काहीही कळले नाही. बहुद रविवारी रात्री रम आणी सोडा यान्च्या प्रमाणात गफलत झाली असावी. चालायचेच, वाढते वय.
|
>>> लालभाईंची कमी जाणवते कधी कधी... काश ते लिहीत असते तर... लालभाई नसले म्हणून काय झालं, विजयभाई आहेतच की या व्यासपीठावर. बाहेर तर कुमारभाईंसारखे असंख्य आहेत अतिरेक्यांबद्दल सहानूभूती असलेले. हे सर्व भाई म्हणजे व्यक्ती नसून एक प्रवृत्ती आहे. व्यक्ती बदलल्या तरी प्रवृत्ती बदलत नाही. यातूनच 'अतिरेकी सुद्धा वाट चुकलेली माणसे असतात, त्यांना सुद्धा बायका-मुले असतात, त्यांना परिस्थितीमुळे नाईलाजाने वाईट गोष्टी करायला लागल्या, त्यांना सुधारायची संधी दिली पाहिजे' असा प्रचार सुरू होतो. वीरप्पनने १२९ लोकांची बेकायदेशीरपणे हत्या केली तरी त्याला मात्र बचावाची आणि सुधारायची संधी दिली पाहिजे असे यांचे मत असते. वीरप्पनने पूर्वी एकदा शरण येतो असे सांगून एका पोलिस अधिकार्याला एकटेच भेटायला बोलावले आणि तो आल्यावर निघृणपणे त्याचे शिर धडावेगळे करून त्याची हत्या केली. पण त्याच्यावरची कारवाई मात्र संपूर्णपणे कायदेशीर असली पाहिजे असा यांचा आग्रह असतो. वीरप्पनला पाठिंबा देताना त्याने १२९ नागरिकांचा जगण्याचा हक्क हिरावून घेतला हे यांच्या लक्षात सुद्धा येत नाही. मुस्लीम अतिरेकी तर यांचे विशेष लाडके. भारतात आजवर मुस्लीम अतिरेक्यांनी केलेली सर्व अतिरेकी कृत्ये १९९२ आणि २००२ च्या घटनांची प्रतिक्रिया आहे असा यांचा ठाम विश्वास आहे. केतकर तर संघ परिवाराचा 'हिंदू अतिरेकी संघटना' असा कायम उल्लेख करतात आणि त्यांना लष्करे-तोयबा, हिजबुल अशा क्रूर अतिरेकी टोळ्यांच्या मापाने मोजतात. यामागची कारणमीमांसा अगदी सोपी आहे. अतिरेक्यांच्या विरूद्ध बोलले की तुम्ही जातीयवादी, प्रतिगामी व हिन्दू अतिरेकी विचारांचे आणि अतिरेक्यांना कळवळा दाखविला की तुम्ही आपोआप मानवतावादी, निधर्मी आणि पुरोगामी विचारांचे असता. जगात प्रत्येक देशात थोड्याफार प्रमाणात हे (अ)मानवतावादी असतातच. अमेरिकेत सुद्धा नोएम चोस्की आहेच की. पण इतर देशात यांचे प्रमाण फारच कमी असते. पण भारतात मात्र यांची पैदास प्रचंड आहे. अशा (अ)मानवतावाद्यांचे प्रमाण आणि देशातील अतिरेकी कारवाया यांचा परस्परांशी समप्रमाणात संबंध आहे. यांची संख्या जेवढी जास्त तितक्या जास्त प्रमाणात त्या देशात अतिरेकी कारवाया होत असतात. भारतात अतिरेकी मोकाट सुटलेत ते यांच्या पाठिंब्यामुळेच.
|
Santu
| |
| Tuesday, May 22, 2007 - 7:56 am: |
| 
|
Post edited by moderator. Please refrain from posting perosnal attack or foul language.
|
केतकरांनी मायबोलीवर मिळालेली स्तुतीसुमने वाचलेली दिसतात. आजच्या अग्रलेखात त्यांनी युपिए सरकार्विरुध्द बर्याच गोष्टी लिहिल्या आहेत पण सोनिया किंवा मनमोहन हे सरकारच्या सुमार कामगिरीला जबाबदार आहेत असे मात्र त्यांना वाटत नाही असे दिसते.कारण त्यांच्याविरुध्द काहिच लिहिलेले नाही.
|
Santu
| |
| Wednesday, May 23, 2007 - 5:36 am: |
| 
|
मॉड actualy मला लालभाई लिहायचे होते पण ल च्या जागि ड झाले व लाल चे लांड झाले त्याबद्दल सॉरी
|
Zakki
| |
| Wednesday, May 23, 2007 - 4:05 pm: |
| 
|
सतिश मेढेकर, तुमच्या बहुतेक सगळ्या मुद्द्यांना १०० टक्के पाठिंबा. अहिंसा, मानवतावाद ही सुसंस्कृतपणाची लक्षणे आहेत. पण त्याच्या जोडीला स्वसरंक्षण, स्वदेशाभिमान, यांची योग्य जोड दिली नाही तर सगळाच मूर्खपणा. जसे तिखट, मीठ, मसाला सगळेच लागते स्वैपाकात, पण त्याचे प्रमाणहि महत्वाचे. fake encounter ही चिंतेचीच बाब आहे. निदान सरकारी अधिकार्यांनी त्याची काळजी घेतली पाहिजे. नाहीतर त्याचे दुष्परिणाम वर कुणि लिहीलेच होते. तर काय करणार? काही लोकांना खूप तिखट रस्सा आवडतो, तसे आहे. मग काय? एकच आहे. इथे तसे बोलणारे लोक, एकतर्फीच आहेत. fake encounter चा निषेध करताना, न्यायालयाने कायदेशीर रीत्या विरप्पनला दोषी ठरवले होते, ते खरे नाही, असेहि हे लोक म्हणतात. सरकारने केलेले सगळेच खोटे, असे त्यांचे मत. काय करणार? अजूनहि पृथ्वी सपाट आहे, नि मनुष्य चंद्रावर गेलाच नाही असे समजणारे लोक आहेत या जगात.
|
पुन्हा तेच, वीरप्पन ला मी पाठिम्बा दिला असे का वाटावे? वीरप्पन एकदाचा गेला हे हत्ती आणी माणसान्साठी आनन्दाचीच घटना आहे. त्याला जिवन्त पकडून त्याच्या मागे असलेले कोण यान्च छाडा लावून मग त्याल हतीच्या पायी दिले असते तर बरे झाले असते. नोम चोम्स्की यानी इराक वरील अमेरिकेच्या हल्ल्याला प्रखर विरोध केला आहे. खे असंख्य आहेत अतिरेक्यांबद्दल सहानूभूती असलेले. अतिर्क्यान्बद्दल नाही पण अतिरेकि म्ह्णून शिक्का बसलेल्या निश्पाप लोकान्बद्दल जरूर सहनुभुती आहे.
|
Chyayla
| |
| Friday, May 25, 2007 - 2:53 am: |
| 
|
उत्तरप्रदेशच्या निअवडणुक निकालाच्या निमित्याने... काय पण गम्मत आहे म्हणायची दलीत मतान्चे राजकारण करणारे उच्चवर्णियाना कायम शिव्या द्यायचे आणी देतातही त्यातल्या त्यात सन्घ भाजपाला तर विचारुच नका. आणी आज त्याच उच्चवर्णियान्च्या सहायाने उत्तरप्रदेशात घवघवीत यश मिळवले. rediff वर वाचताना एका व्यक्तिने छान मुद्दा मान्डला की ब्राह्मण व एकन्दरीत उच्चवर्गाने देश, धर्म सन्स्कृती यान्च्या सरन्क्षणासाठी वेळोवेली पाठीम्बा दीलेला आहे आज मायावतीला दीला तसेच ईतिहासकाळात चन्द्रगुप्त सारख्या क्षुद्रालाही पाठीम्बा दीलाच होता. दुसरीकडे भाजपाला जी मते मिळाली ती मागास जातीन्ची तर नेहमीची ब्राह्मणान्ची मते मायावतीला. यात जातिय अभिनिवेश जरुर आहे, कारण दुर्लक्षीत होण्याची भावना होतीच पण तरीही एका दलीताला समर्थन, विश्वास ठेवाण्याएवढा मोठेपणाही मानावाच लागेल. मग खरे जातियवादी कोणाला म्हणायचे? ईकडे लिहिणारेही जातियवादाच्या आन्धळ्या द्वेशापायीच जिहादचे समर्थन करतात व देशविधायक गोष्टीन्ना कायम विरोध करताना ईथेच आपण पहात आहोत. जो वर्ग कायम दलीत राजकारणीन्च्या मागे मेन्ढरान्सारखा फ़रफ़टत जातो जे आपण ईकडे महाराष्ट्रातही रीपब्लिकन पार्ट्यान्च्या केवळ खुर्चीसाठी लाळघोटेपणा करत स्वाभिमान गहाण टाकणार्या त्यान्च्या नेत्यान्कडेच बघा. मला ही उत्सुकता आहे त्यान्च्याकडुनही अशी अपेक्षा करता येइल? शिवसेनेनीही आधीच शिवशक्ती व भिमशक्तिच्या एकत्र येण्यासाठी आवाहन केले होते. पाहु त्याचे काय होते? अर्थात मायावतीसाठीही सगळे सोपे नाही पण त्यातच तीचा कस लागणार हे नक्की.
|
Chyayla
| |
| Friday, May 25, 2007 - 6:03 am: |
| 
|
निश्पाप.. तसेही अतिरेकी जिहादी स्वता:ला निश्पापच मानतात कारण ते त्यान्च्या धर्माच्या शिकवणुकीला प्रामाणिक आहेत. त्यामुळे प्रत्येक अतिरेकी त्याला शिक्का लागो न लागो हा निश्पापच नाही का?
|
तसेही अतिरेकी जिहादी स्वता:ला निश्पापच मानतात कारण ते त्यान्च्या धर्माच्या शिकवणुकीला प्रामाणिक आहेत. हो, पण ते कायद्याच्या द्रुष्टीने अतिरेकी च आहेत. आणी त्यान्च्या विशयी सहनूभुती असण्याचे क्करण नाही. आणी धर्मान्ध स्वत:ला निश्पापच समजतात, मग टोपीचा रन्ग कोणताही असो.
|
Gobu
| |
| Friday, May 25, 2007 - 4:57 pm: |
| 
|
चला आपण ही लिहावे आता इथे! जगात प्रत्येक देशात थोड्याफार प्रमाणात हे (अ)मानवतावादी असतातच. अमेरिकेत सुद्धा नोएम चोस्की आहेच की. पण इतर देशात यांचे प्रमाण फारच कमी असते. पण भारतात मात्र यांची पैदास प्रचंड आहे. सतीशभाऊ, हे तुमचेच विचार आहेत का? विश्वास बसत नाही! भारतात मानवतावादी जास्त आहेत असे नाही भारतात कायदा कसा विकत घेता येतो आणि कायद्याने कोणाला आणि कधी न्याय मिळतो हे मात्र सर्वाना माहीत आहे खरोखरीच निर्दोष असलेल्या व्यक्तीला त्रास होवु नये आणि न्याय मिळावा हे सर्वसामान्य भारतीयाला वाटते त्यात काय चुक बुवा? (राजकीय घडामोडीवर मला काही लिहायचे नाही)
|
च्यायलानी उत्तर प्रदेशबाबत मांडलेल्या विचारांशी मी सहमत आहे. उच्चवर्णीय लोकांविरुध्द जरा जास्तच बोलल जात.
|
रामसेतु तोडला जातोय ही हिंदुराष्ट्रासाठी अतिशय शरमेची गोष्ट आहे. आपला देश धर्मनिरपेक्ष नाहिच कारण ज्या देशाच्या ८०% जनतेच्या भावनांशी जुडलेला रामसेतु तोडला जातो तो देश धर्मनिरपेक्ष असुच शकत नाही. ज्या देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी त्यांच्या शेवटच्या श्वासात 'हे राम' म्हणुन ज्या भगवानाच स्मरण केल तोच प्रभुरामाचा सेतु त्याच कॉंग्रेसच्या राज्यात तोडला जातो यावरुन कॉंग्रेस्सवाल्यांना गांधीजिंबद्दल बोलायचा काहिच अधिकार नाही कारण त्यांनी गांधींची विचारसरणी कधिच सोडून दिली आहे. तो मंत्री टी. आर. बालू म्हणतो की तो सेतु रामानीच बांधला हे सिद्ध करुन दाखवल्यास मंत्रिपद सोडिन. अरे मुर्खा लाखो वर्षापुर्वीच्या वास्तुचा कसला पुरावा? सेतु बांधताना बघितलेले साक्षिदार पाहिजे का तुला?? लेखी पुरावा तर आहेच की रामायण हा. का त्याकाळी पण आजकाल सारखे टेन्डर देउन पुल बांधायचे? तुझी एखादी जमिन पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही तुझिच आहे याचा पुरावा काय??आणि पुरावा आज नाही कारण सायन्स इतक पुढ गेलेल नाही अजुन की नक्की सांगायला सेतु मानवनिर्मित की नाही. आणि नसला पुरावा तरी काय आमच्या भावनांशी जुडलेला हा प्रश न आहे.
|
लाखो वर्षापुर्वीच्या वास्तुचा लाखो वर्षापुर्वी माणसाला कपडे घालायला लागूनच जेमतेम पन्नस हजार वर्शे झाली.
|
>>> माणसाला कपडे घालायला लागूनच जेमतेम पन्नस हजार वर्शे झाली. कशावरून? हे कुणी ठरवलं? म्हणजे त्यापूर्वी माणूस कपडे वापरत नव्ह्ता याचा काही पुरावा आहे का कोणाकडे?
|
विजयराव, तुम्ही कुठल्या माणसांबद्दल बोलताय हे माहिती नाही. आम्ही भारतीय लाखो वर्षांपासून कपडे घालत आहोत आणि लाखो वर्षांपासुन आमच्या इथे civillisation आहे. पाश्चिमात्यांची 'डार्विन' थिअरी चुकिची आहे कारण भारतात येउन एका foreigner archaeologist नी हे दाखवून दिलेले आहे की माणुस लाखो वर्षांपुर्वी इथे राहत होता कारण जमिनीच्या खालील layers मधे विविध दागिने, earrings ,किमती कपड्यांचे अवशेष वगैरे सापडले आहेत.त्यानी त्यावर पुस्तकेही लिहिली आहेत.मी त्या पुस्तकांची नावेसुध्दा काही दिवसात कळवतो.बहुतेक तुम्हाला जग म्हणजे पाश्चिमात्य देश आणि मुस्लिम देश वगैरेच वाटत असाव त्यामुळे तुम्ही नेहमिच आपल्या सर्व गोष्टींना विरोध करत असता.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|