Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 21, 2007

Hitguj » Views and Comments » Current Affairs » बातम्यांचे / लेखांचे संकलन » Political » Archive through May 21, 2007 « Previous Next »

Sunilt
Thursday, May 17, 2007 - 11:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एन्काऊंटरचा पंचनामा आणि तोदेखिल रिबेरो यांच्याकडूनच !!

१५ मेच्या महाराष्ट्र टाईम्स मधिल हा लेख ...



'एन्काऊंटर'च्या मेथडला रामराम ठोका!

हिंस प्राण्याने एकदा शिकार करायला सुरुवात केली की रक्ताची चटक लागतेच. तशी एन्काऊंटर स्पेशालिस्टांनाही लागते. नंतर 'शिकार' ही बाब रुटीन व्हायला लागते. समाजासाठी येथेच खरा धोका निर्माण होत असतो. 'मसीहा' स्वत:च गुन्हेगार बनण्याची प्रक्रिया जोमाने सुरू होते. वदीर्तले गुन्हेगार तयार व्हायला लागतात. खाकी रंगातल्या या गुन्हेगारांना रोखणे कठीण होऊन जाते.

दहशतवादी फक्त बंदुकीची भाषा बोलतात, पण गुन्हेगारी टोळ्यांचे तसे नसते. स्वत:चे अस्तित्व टिकवण्यासाठी ते राजकीय आणि न्यायालयीन व्यवस्था पोखरून काढतात. या टोळ्यांचे म्होरके राजकारणी, नोकरशहा, कनिष्ठ-वरिष्ठ पोलिस अधिकारी, साक्षीदार, सरकारी वकील, जेलर अगदी न्यायाधीश अशा सर्व प्रभावी घटकांना विकत घेत असतात.

कायद्याच्या कचाट्यातून सुटका करून घेण्यासाठी गुन्हेगारी टोळ्या मोठ्या प्रमाणावर लाच देतात. अशा 'गढूळ' वातावरणात एन्काऊंटर स्पेशालिस्ट जन्माला येतात आणि जोमाने फोफावतात. मध्यमवर्ग मात्र गोंधळलेल्या अवस्थेत जगत राहतो. आपले आयुष्य इतके असुरक्षित कसे झाले आहे हे त्याला नीट समजते असे नाही. न्यायप्रक्रियेत होणारी दिरंगाई आणि अट्टल गुंडांचीही होणारी निदोर्ष सुटका हेच गुन्हेगारी वाढण्याचे मूळ कारण आहे, असेच मध्यमवगीर्यांना वाटते. गुन्हेगारी जगताची पाळेमुळे नष्ट करण्याची जबाबदारी कोणीतरी घेतली पाहिजे असे ते मानतात. त्यासाठी लागतो एखादा 'मसीहा'. एन्काऊंटर स्पेशालिस्टच्या रूपात मसीहा त्यांना लाभतो.

मध्यमवगीर्यांच्या या मसीहांची जमात आता भारतातील सर्व राज्यांत दिसू लागली आहे. भ्रष्टाचाराचा आलेख वाढत जातो तसे गुन्हे आणि गुन्हेगार फोफावतात आणि त्यांच्याच सावलीतून एन्काउंटर स्पेशालिस्ट उगवायला लागतात. त्यांचं सगळ्यांना कौतुक वाटतं. त्यांना असे 'प्रेम' हवेहवेसेच वाटते. पोलिस दलाच्या उतरंडीत त्यांना अधिक मान आणि महत्त्व मिळायला लागते. त्यांचे रक्त सळसळायला लागते. काही तरी करून दाखवण्याची उमीर् उफाळून येते आणि हे मसीहा भ्रष्टाचाराच्या चिखलात रूतत जातात. ते अटळच असते म्हणा. हिंस प्राण्याने एकदा शिकार करायला सुरुवात केली की रक्ताची चटक लागतेच. तशी एन्काऊंटर स्पेशालिस्टांनाही लागते. नंतर 'शिकार' ही बाब रुटीन व्हायला लागते. समाजासाठी येथेच खरा धोका निर्माण होत असतो. मसीहा स्वत:च गुन्हेगार बनण्याची प्रक्रिया जोमाने सुरू होते. वदीर्तले गुन्हेगार तयार व्हायला लागतात. खाकी रंगातल्या या गुन्हेगारांना रोखणे कठीण होऊन जाते. ते एखाद्या टोळीच्या कच्छपीच लागतात. दुसऱ्या टोळीच्या सदस्यांची माहिती घेतात अन् त्यांचा खातमा करत राहतात. एक टोळी दुसऱ्या टोळीला संपवण्यासाठी एन्काऊंटर स्पेशालिस्टांचा स्वत:साठी वापर करून घेते. एन्काऊंटर स्पेशालिस्टांचा हा प्रकार म्हणजे 'मान्यताप्राप्त' गुन्हेगारीच म्हणायला हवी, पण त्याची सामान्य लोकांना गंधवार्ताही नसते.

सुरुवातीला अविचारी वरिष्ठ पोलिस अधिकारी एन्काऊंटरला प्रोत्साहन देतात. सामान्य लोकांकडूनच त्यांना पाठिंबा मिळतो, हे पाहून राजकारणीही या मसीहांना गोंजारत राहतात. त्यामुळे ते जणू 'आयकॉन' ठरतात. प्रसारमाध्यमे त्यांच्या कर्तृत्वाची वाहवा करतात. त्यांचे 'कर्तृत्व' सिनेमा सेल्युलॉईडवर उतरवतो. पण असा काळ येतो, जेव्हा हे मसीहा कॉन्ट्रॅक्ट किलर बनतात. खाकी वदीर्तल्या या कंत्राटदारांचा वापर उद्योग जगतातील मंडळी शत्रू संपवण्यासाठी वापरतात. कुटंुबातील नको असलेल्या सदस्यांना उडवले जाते. असे झाले की कुठून तरी 'धूर' येतोय, हे लोकांना जाणवते आणि त्याची चर्चा सुरू होते. अहमदाबादमध्येही लोकांमध्ये कुजबूज सुरू होती की, बिल्डर आणि संगमरवराचे व्यापारी खंडणीबहाद्दर सोहराबुद्दिनला 'संपवण्यास' उत्सुक होते.

मुंबईतील एन्काऊंटर स्पेशालिस्ट भ्रष्टाचारात बरबटलेल्या एका माजी 'बिग बॉस'वर आरोपाच्या फैरी झाडत होते, असे अत्यंत गलिच्छ आणि दुदैर्वी चित्र अगदी अलीकडल्या काळात पाहायला मिळाले होते. प्रसार माध्यमांमध्ये इतक्या खुलेपणाने आरोप पूवीर् कधी झाले नव्हते. 'सुपीरिअर' आणि 'सुपरव्हाइस्ड' यांच्यातील रेषा एन्काऊंटर हीरोंच्या विशेष वर्गाने मिटवून टाकली आहे, हेच दिसते.

आता काही वरिष्ठ पोलिस अधिकारीही एन्काऊंटर स्पेशालिस्टांच्या रांगेत जाऊन बसू लागल्याचे गुजरातमध्ये सध्या गाजत असलेल्या प्रकरणावरून स्पष्ट होते. ही बाब आणखी खेदजनक आहे. गुजरातमधील आयपीएस अधिकारी 'सुपरव्हाइज' करणारे मध्यममागीर् मानले जातात, पण त्यांनाच 'रॅम्बो इमेज'ची बाधा झाली तर गोष्टी आपल्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत असाच त्याचा अर्थ असतो आणि या रोगावर तात्काळ औषधोपचार केले पाहिजेत. मानवी हक्कांविषयी जागरूक असणाऱ्या कार्यर्कत्यांनीच फक्त त्याची दखल घेणे जरुरीचे आहे असे नव्हे, सामान्यांनीही त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

एन्काऊंटर स्पेशालिस्ट हा फिनॉमेनन नेमका काय आहे हे लोकांनी प्रथमत: समजून घ्यायला हवे. न्यायप्रणाली आपले काम चोखपणे बजावत नाही असे लोकांना वाटते म्हणूनच ते एन्काऊंटर स्पेशालिस्टांना पाठिंबा देतात. त्यांचा हा दृष्टिकोन योग्य आहे, पण त्यावर कायद्याच्या चौकटीबाहेरच्या उपाययोजनांना प्रोत्साहन द्यायचे नसते, हेही लोकांना समजायला हवे. न्यायप्रक्रिया पुन्हा रुळावर आणणे हाच त्यावरचा उपाय असतो. जेसिका लाल केसनंतर वरच्या कोर्टांनी जनप्रक्षोभाची दखल घेतली आहे. न्यायप्रणाली स्वत:ची सिस्टिम पुन्हा ठीकठाक करू लागली आहे, असे दिसते. खालच्या कोर्टांनीही त्याचे अनुकरण केले पाहिजे.

आता आपल्यात सुधारणा करण्याची वेळ प्रॉसीक्युटर आणि चौकशी अधिकाऱ्यांची आहे. भ्रष्टाचारामुळे या मंडळींची सामान्यांना न्याय मिळवून देण्याची क्षमता कमी होत चालली आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. त्यांच्या वरिष्ठांवर नागरी समाजानेच आता दबाव टाकायला हवा. वरिष्ठ या शद्बात 'राजकीय संस्थे'तील सदस्यांचाही समावेश होतो. त्यांच्यावरही दबाव आणायला हवा. राजकीय पुढाऱ्यांचे भवितव्य लोकांच्या मतांवर अवलंबून असते. जनमत अव्हेरणे त्यांना कुठल्याही परिस्थितीत परवडणारे नाही. त्यामुळे लोकांच्या दबावाला ते सकारात्मक प्रतिसाद देतीलच आणि राजकीय नेतेमंडळींची इच्छा असल्यास ते प्रॉसीक्युटर आणि पोलिस यंत्रणा यांच्यावर दबाव आणू शकतात आणि जनहिताचा आग्रह धरू शकतात. पण सध्या राजकीय नेते एन्काऊंटर्सना उत्तेजन देऊन सोपा मार्ग पत्करत आहेत.

जेसिका लाल प्रकरणामुळे न्यायव्यवस्था जनहिताबाबत दक्ष झाली आहे. सोहराबुद्दिन शेख प्रकरण आणि अॅलिस्टर परेराच्या शिक्षेचा फियास्को या नंतर आता पोलिस यंत्रणेचेही डोळे उघडतील, अशी आशा करू या. सोहराबुद्दिनच्या प्रकरणातील दोनपैकी एक तरुण आयपीएस अधिकारी एम. एन. दिनेश अत्यंत कर्तबगार मानला गेला होता पण दोन-चार एन्काऊंटर स्पेशालिस्टांच्या आक्रमक पवित्र्यापुढे आणि त्यांच्या दबावामुळे दिनेशसारखा अधिकारी दुष्कृत्यात वाहवत गेला. योग्यवेळी या सर्व प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करायला हवा होता, पण तसे झाले नाही. पण लोकच एन्काऊंटरमुळे प्रभावीत होत असतात, तेव्हा राजकीय पाठिंबा त्यांना सहजच मिळत जातो.

गुजरात प्रकरणापासून राजकीय व्यवस्था आणि पोलिस यंत्रणेला धडा शिकता येईल. अशा 'शॉर्टकट मेथड'ला आता रामराम करायला हवा, हे त्यांना समजायला हवे. न्याय-व्यवस्थेनेही 'न्याय'मार्गावर ठामपणे उभे राहायला हवे; कारण कर्तव्यदक्षतेचे भान ती विसरली आहे असे वाटत आहे. भयग्रस्त सामान्य जनता पुन्हा एन्काऊंटर स्पेशालिस्टांसाठी आक्रोश करायला लागेल, त्याआधी न्यायव्यवस्थेत सुधारणा व्हायला हव्यात.

- ज्युलिओ रिबेरो

माजी पोलिस आयुक्त, मुंबई





Santu
Friday, May 18, 2007 - 5:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोकच एन्काउन्टर मुळे प्रभावित होत असतात))))लोक का प्राभावित होतात
कारण आपलि निष्प्रभ न्याय प्रणालि.जिथे अफ़जल सारखा
कुख्यात अतिरेकी अजुन जिवंत आहे.व अबु सालेम सारखे
दहशत्वादि निवड्णुक लढण्याच्या तयारित आहे तिथे एन्काउन्टर ला पर्याय नाहि.

या रिबेरो ने मुम्बैत व पंजाबात स्वतहा काय दिवे लावले
शेवटि एन्काउन्टर वाले केपीएस गिल व मुमबै पोलिसच कामाला आले.

रीबेरोंच्या काळात तर दावुद चे वर्चस्व वाढले


Avinash_kale
Friday, May 18, 2007 - 1:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आजच्या (१७-५) लोकसत्ताच्या अंकात भाजपाचे नेते गोपीनाथ मुंडे म्हणताहेत की महाराष्ट्रात योग्य नेता मिळल्यास मायावतींचा ब.स.प. चमत्कार करु शकतो. जेष्ठ नेते प्रमोद महाजन यांच्यनंतर भाजपचा महाराष्ट्रातील चेहरामोहरा बनलेल्या मुडेंच्या या बोलण्यामगचा विचार तो काय असावा???

Satishmadhekar
Friday, May 18, 2007 - 1:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे वाचा.

http://www.esakal.com/esakal/esakal.nsf/MiddleFrame?OpenForm&MainCategory=Sampadakiya&category=Sampadkiya_Vishesh


काय गंमत आहे पहा. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत बसपा वगळता इतर सर्व पक्षांचा पराभव झाला. पण बहुतेक माध्यमे भाजपची कशी जिरली या आनंदात आहेत. भाजपच्या बरोबरीने कॉंग्रेस आणि सपाला देखील लोकांनी नाकारले. कम्युनिस्टांना तर एक देखील जागा मिळाली नाही. राज बब्बर आणि विश्वनाथ प्रताप सिंग यांनी भरपूर प्रयत्न करून सुद्धा जनमोर्चा या त्यांच्या पक्षाला एकच जागा मिळाली.

परंतु सर्व माध्यमे भाजपच्या पराभवाचाच ठळक उल्लेख करत आहेत.

कॉंग्रेसच्या अभिषेक सिंघवी, कपिल सिब्बल, सोनिया गांधी यांनी तर जाहीरपणे तथाकथित जातीयवादी आणि भ्रष्टाचारी शक्ती पराभूत झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. जर उत्तर प्रदेशच्या मतदारांनी खरोखरच जातीय आणि भ्रष्टाचारी पक्षांच्या विरुद्ध कौल दिला असेल, तर, भाजप सोडून इतर पराभूत पक्ष जातीय किंवा भ्रष्टाचारी किंवा दोन्ही असले पाहिजेत.

पराभवाबद्दल फक्त भाजपची टिंगल उडवणे म्हणजे 'मी चिखलात पडलो तरी चालेल, पण तुझ्या अंगावर शिंतोडे उडल्याचा मला आनंद आहे' अशी वृत्ती आहे.


Satishmadhekar
Friday, May 18, 2007 - 2:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> आजच्या (१७-५) लोकसत्ताच्या अंकात भाजपाचे नेते गोपीनाथ मुंडे म्हणताहेत की महाराष्ट्रात योग्य नेता मिळल्यास मायावतींचा ब.स.प. चमत्कार करु शकतो. जेष्ठ नेते प्रमोद महाजन यांच्यनंतर भाजपचा महाराष्ट्रातील चेहरामोहरा बनलेल्या मुडेंच्या या बोलण्यामगचा विचार तो काय असावा???


अविनाशराव,

लोकसत्ताला, विशेषत: कुमार केतकरांना, भाजप, शिवसेना आणि संघाबद्दल पुड्या सोडायची सवय आहे. ते सातत्याने यांच्याबद्दल अफवा पसरवून वाचकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असतात. १९९९ च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी केतकर महाराष्ट्र टाईम्स मध्ये होते. शरद पवार भाजप-सेनेशी हातमिळवणी करणार असा त्यांनी मटामधून सातत्याने प्रचार केला. पवारांना अपेक्षेपेक्षा खूप कमी जागा मिळाल्या आणि शेवटी त्यांनी कॉंग्रेसबरोबर युती केली.

शिवसेना फुटणार, शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष आहे, सेना-भाजप युती तुटणार अश्या वावड्या केतकर सतत लोकसत्तामधून उडवत असतात. केतकरांचा भाजपद्वेष सर्वांना माहित आहे. लोकसत्ताला आणि केतकरांना कुणीही गांभीर्याने घेत नाही. तुम्ही सुद्धा घेऊ नका.


Vijaykulkarni
Friday, May 18, 2007 - 11:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


कुख्यात अतिरेकी अजुन जिवंत आहे.

एखाद्या व्यक्तीबद्दल तो अतिरेकी आहे असे दहा हजार वेळा लिहिले तर लोकान्ना ते पटेल अशी भाबडी आशा.....

असो, इशरत ची चकमक खोटी आहे हे मी चार वर्शान्पुर्वीच ओळखले होते. लोकन्ना आता समजले.



Satishmadhekar
Saturday, May 19, 2007 - 8:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विजयराव,

इशरतची चकमक खोटी हे कुणी ठरवलं? तिच्या जमातीच्या लोकांनी का कुमार केतकरांनी?


Avinash_kale
Saturday, May 19, 2007 - 6:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकदा एखादा मनुष्य एखादि चुक कबुल करतो म्हणजे त्याचे पुर्ण जीवनच चुकांनी भरलेले आहे असा अर्थ काढणे बरोबर नाही. मान्य आहे की गुजरातमध्ये झालेली चकमक बनावट होती म्हणुन लगेच इशरत मारली गेलेली चकमकपण बनावट होती का तर तिथेही तोच अधिकरी होता, असा काढने चुकीचे ठरेल. सुमारे तीन वर्षांपुर्वी झालेल्या हि चकमक बनावत नव्हती हे तेव्हाच आज तक या वाहिनीने सप्रमाण सिध्द केले होते.

Jaymaharashtra
Saturday, May 19, 2007 - 9:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काल हैद्राबाद येथे झालेला बॉंबस्फोट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केला असा जावई शोध कुलकर्णी न लावतील तर नवलच म्हणायचे?मालेगाव झाले तेंव्हा अशीच आवई उठली होती.
हुजी का फ़ुजी अशी कुणीतरी संघटना या स्फोटामागे आहे असा पोलिसांचा दावा आहे. कालच जनमत या वाहिनीवर एक चर्चासत्र आयोजीत केले होते. त्यात जे निमंत्रित वक्ते होते त्यामधे कॉग्रेसचे एक वरिष्ठ नेते नाव माहित नाहि(मला फ़क्त कॉग्रेस म्हणजे नेहरु गांधी घराणे इतकेच माहित आहे).तर त्यांच्या मते भारताच्या इतर देशांना लागुन असलेल्या सीमांपैकी किमान ४०% सीमा या porous आहेत म्हणजे त्या वर कुणाचेही नियंत्रण नाही आणि त्या नियंत्रित करणे देखिल केंद्र सरकारच्या आवाक्या बाहेरचे आहे आता या वक्तव्या वर हसावे की रडावे?आज स्वातंत्र्य मिळून
६० वर्षे झाल्यावरही जर आपण आपल्या सीमा सुरक्षित करु शकलो नसु तर काय उपयोग आहे त्या केंद्र सरकारचा आणि जो अपार पैसा देशाच्या तथाकथित सुरक्षेसाठी खर्च केला जातो त्याचा?
आणि या बॉबस्फोटात बळी गेल्यांच्या कुटुंबियांना राज्यसरकारने ५ लाखाची मदत आणि केंद्र सरकारने १ लाखाची मदत जाहीर केली. संवेदनशिलतेचा अजब नमुना आहे.मुंबई बॉबस्फोटातिल मृतांच्या नातेवाईकांना किति मदत दिली हे त्या पिडितांनाच विचारलेले बरे?
या देशात हिंदु मरतो त्याला किंमत नाही पण जे या देशाला नेस्तनाबुत करण्याची स्वप्ने बघतात आणि देशविघातक कृत्यात भागही घेतात त्यांच्या मृत्युची किंमत मात्र जास्त
कुलकर्णी
इसरत जंहा प्रकरण खरे कि खोटे हे ठरवायला जावु नका तुम्हीच तोंडघशी पडाल.त्याची सत्यता पडताळायची असेल तर ठाण्यात जावुन डावखरेंना भेटा व त्यांनी आणि त्यांच्या सुडोसेक्युलर पक्षाने इसरतच्या कुटुंबाला देवु केलेला मदतिचा धनादेश परत का घेतला? त्याचे कारण विचारा. निदान डावखरे तरी प्रामाणिक उत्तर देतील तुम्हाला अशी आशा आहे.
जय हिंद!
जय महाराष्ट्र!


Vijaykulkarni
Sunday, May 20, 2007 - 3:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुडोसेक्युलर पक्षाने इसरतच्या कुटुंबाला देवु केलेला मदतिचा धनादेश परत का घेतला?

कारण त्या सुडोसेकुलर पक्शाला सत्यापेक्शा मतान्ची जास्त काळजी होती म्हणून.

आणी हो, सोहरबुद्दीन ची चकमक खोटी होती हे गीता जोहरीनी शोधून काढल्यावार सुध्हा विहिम्प ने ते मान्या कर्रयला महिना घेतला.



याच आजतक वाहीनी ने लोकसभेच्या हल्ल्यात प्रोफेसर जीलानीला दोशी ठरवीले होते. शिवाय आजतक या वाहीनी कडे अशी कोणती महिती होती?
कारण त्या हल्ल्यानन्तर कसून तपस कर्र्रोन ही महरश्त्र पोलिसाना काहीही आढळले नाही.


मान्य आहे की गुजरातमध्ये झालेली चकमक बनावट होती

देर आयेत, दुरुस्त आयेत.

आणी इशरत च्या गाडीमध्ये ढीगभर ए के ४७ आणी बॉम्ब होते तर एकाही पोलिसाला अर्ध्या तासच्या चकमकीत जखम झाली नाही? की गोळ्याना चुकविण्याची "मिथून चक्रवर्ती" कला पोलिसाना अवगत आहे? :-)




Satishmadhekar
Sunday, May 20, 2007 - 9:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> आणी इशरत च्या गाडीमध्ये ढीगभर ए के ४७ आणी बॉम्ब होते तर एकाही पोलिसाला अर्ध्या तासच्या चकमकीत जखम झाली नाही? की गोळ्याना चुकविण्याची "मिथून चक्रवर्ती" कला पोलिसाना अवगत आहे?

जातीयवाद्यांची ही नेहमीचीच युक्ती आहे. म्हणे इशरतकडे भरपूर शस्त्रे असून सुद्धा पोलिस जखमी न होता ती आणि तिचे साथीदार मेले याचाच अर्थ ती चकमक बनावट होती. कदाचित तिला किंवा तिच्या साथीदारांना पोलिसांवर हल्ला करायची संधीच मिळाली नसेल. कदाचित पोलिसांनी कशाच्या तरी आड लपून सुरक्षित राहून त्यांना टिपले असेल. पण पोलिस जखमी झाले नाही म्हणून ती चकमकच खोटी! हे अजब तर्कशास्त्र आहे. इशरत मेल्यानंतर लष्करे-तोयबाने इंटरनेटवर इशरत त्यांच्या संघटनेकरता काम करत होती असे जाहीर केले होते. तरी सुद्धा ती निष्पाप! आणि तिचे घर ठाण्यात असताना ती इतर तीन तरूणांबरोबर मध्यरात्री गुजरातमध्ये नक्की काय करत होती? त्यांच्याकडे शस्त्रे कशाकरता होती?

२-३ वर्षांपूर्वी वीरप्पन असाच मारला गेल्यावर तथाकथित (अ)मानवी संघटनांनी त्याला बनावट चकमकीत मारले होते असा गळा काढला होता. त्यांचे अगदी हेच तर्कशास्त्र होते. वीरप्पन एकही गोळी न झाडता मेला म्हणजेच ती चकमक बनावट होती असा त्यांचा दावा होता.

लोकसत्ता आणि केतकरांची ही जुनी खोड आहे. त्यांच्या तर्कानुसार, अफगाणिस्तानवर हल्ला करायला निमित्त मिळावे म्हणून ९-११ हे बुशने स्वत:च घडवून आणले होते. डिसेंबर २००१ मध्ये भारतीय संसदेवर झालेला हल्ला हा अडवानींनी मुसलमांना बदनाम करण्यासाठी स्वत:च केलेला बनाव होता. मार्च २००२ मध्ये काश्मिरमध्ये मुस्लिम अतिरेक्यांनी ३५ शिखांना मारले होते. तो बनाव भारतीय लष्कराचाच होता (अर्थातच शांतताप्रिय, निरुपद्रवी मुस्लिमांना बदनाम करण्यासाठी). गोध्रा येथे रेल्वेच्या डब्याला संघाच्याच लोकांनी आग लावली होती (अर्थातच शांतताप्रिय, निरुपद्रवी मुस्लिमांना बदनाम करण्यासाठी).

लोकसत्तात अशी मूर्खपणाची असंख्य उदाहरणे सापडतील. लोकसत्तात छापून येते त्यावर विश्वास ठेवणे किंवा त्याला महत्व देणे हे मुर्खपणाचे लक्षण आहे.

अतिरेक्यांच्या कृत्यांना अशा नागरिकांचा पाठिंबा मिळतो, म्हणूनच तर त्यांच्या कारवाया चालू आहेत.


Jaymaharashtra
Sunday, May 20, 2007 - 10:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्री सतिश
अत्यंत समर्पक आणि मार्मिक उत्तर दिले आहेत. केतकरांसारख्या पिवळी पत्रकारीता करणार्‍या तथाकथित पत्रकारांमुळेच या
(अ)मानवतावादवाल्यांचे तथाकथित सेक्युलर पक्षांचे( संधिसाधु राजकारण आणि केवळ मतांसाठी मुसलमानांचे लांगुलचालन करणारे पक्ष) या दहशतवादी संघटना आणि देशद्रोही मुसलमानांचे फ़ावते.
आज दया नायक यांच्यावर खटला चालवण्यास CBI असमर्थ आहे कारण बनावट चकमकींच्या संदर्भात पोलीसांकडे सबळ पुरावे नाहीत.
कर्तव्यदक्ष पोलिस अधिकार्‍यांवर खटले चालवुन त्यांचे मानसिक खच्चिकरण करायचे इतकेच काम कुमार केतकर आणि त्यांचे कच्चेबच्चे करत आहेत.
केतकरांना तर भलते जावई शोध लावायचे व्यसनच जडले आहे.
कुलकर्णी
तुमच्या कडे हैद्रबाद येथे झालेल्या बॉबस्फोटाबद्दल स्पष्टीकरण आहे का?उगिचच उचललि जिभ लावली टाळ्याला असे करु नका. आणि ज्यांचा तुम्हाला इतका कळवळा आहे त्या जमातीच्या हाती जर तुम्ही (जर हिंदु असाल तर?) दंगलिच्या काळात सापडलात तर तुम्ही त्यांचे समर्थक असलात तरि तुमचे सर कलम करायला ते मागे पुढे पाहणार नाहित आणि तुमची मते देखिल त्याक्षणी तुम्ही घसा फोडुन मांडलित तरि ते ऐकुन घेणार नाहित. हे मुद्दाम लक्षात असु द्या. मी स्वानुभावावरुन हे सांगते आहे.

जय हिंद!
जय महाराष्ट्र!


Avinash_kale
Sunday, May 20, 2007 - 12:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि बॉम्ब्स्फोट घडवणार. कसेतरीच वाटते. देशात कुठेही मुस्लिमांवर किंवा त्यांच्या मशिदिंवर हल्ले झाले तर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेच केले हे काहि धर्मांध संघटनांचे कामच आहे. कुलकर्णी साहेब आपण असे बोलने नक्कीच योग्य नाही. कधी ऐकायलाही आले नाही कि भारतात सतत होत असलेल्या मंदिरांवरच्या हल्ल्यासठी कुठल्या मुस्लिमाने सिमी किंवा तत्सम संघटनेस जबादार धरले. उलट या धर्मांध संघटनाच परकिय शक्तिंचे स्वकिय कुत्रे आहेत.


Vijaykulkarni
Sunday, May 20, 2007 - 1:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डिसेंबर २००१ मध्ये भारतीय संसदेवर झालेला हल्ला हा अडवानींनी मुसलमांना बदनाम करण्यासाठी स्वत:च केलेला बनाव होता. मार्च २००२ मध्ये काश्मिरमध्ये मुस्लिम अतिरेक्यांनी ३५ शिखांना मारले होते. तो बनाव भारतीय लष्कराचाच होता

या दोन गोष्टी मात्र खर्या आहेत.

सन्सदेवरील हल्य्यबाबत अरुन्धती रोय यानी एक पुस्तकच लिहून अनुत्तरीत प्रश्ना उपस्थीत केले होते. अर्थ्तात कुणी उत्तर दिले नाही हे खरे.

आणी त्या शिखान्च्या हत्याकन्डाला जबबदार असणर्या पाच " अतिरेक्याना" लश्कराने ठार केले. अर्थात ते पाचही जण डी एन ऍ चाचणीत निर्दोश निघाले हा भाग वेगळा.

आणी वीरप्पन ची चकमक तुम्हाला खरी वाटते? :-) कर्नाटकातल्या शेम्बड्या पोराला सुद्धा हसू ये ईल.
किन्वा वीरप्पन चकमकीवर विश्वास ठेवणारा एकमेव नागरिक म्हणून कर्नाटक
सरकर एखादे सुवर्ण पदक देऊ करेल :-)
दिवा घ्या.




Chinya1985
Sunday, May 20, 2007 - 7:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विजयराव,आडवणींनी संसदेवर हल्ला चढवला हे तुम्ही इतक्या आत्मविश्वासानी सांगत आहात की जणुकाही त्यांनी तुमची परवानगी घेउनच ते काम केले असावे. राहीली गोष्ट अरुंधती रॉय यांची.त्या सर्वच गोष्टींना विरोध करतात.

आणि आडवाणी आजकाल (म्हणजे सत्तेत आल्यानंतर) मुस्लिमांविरुध्द काहीच बोलत नाहीत की काही करत नाहीत.ते मुस्लिमांविरुध्द कसला सुड उगवणार??

दुसरी गोष्ट संसदेवर हल्ला करुन मुस्लिम बदनाम झालेत का???

आपल्याच लष्कराने शिखांना मारले अस तुम्ही आत्मविश्वासाने म्हणता म्हणजे थोडक्यात मुस्लिम अतिशय सोज्वळ आणि शांतताप्रिय आहेत असे तुमचे मत दिसते.तुमच्या थिअरीज चांगल्या आहेत मग मुंब ई बॉम्ब ब्लास्ट कुणी केला???का तोही संघाने करविला??पाकिस्तानव्याप्त काश्मिरमधे अतिरेक्यांना प्रशिक्षण कोण देते??भारतिय लष्कर की पाकिस्तानी लष्कर???काश्मिरमधे दररोज बॉम्बस्फ़ोट कोण करवत???पुन्हा भारतिय लष्कर का???

विरप्पन चकमक खरी नव्हती तर मग तुमची याविषयीची थिअरी काय???


Satishmadhekar
Monday, May 21, 2007 - 4:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विजय कुलकर्ण्यांचे स्पष्टीकरण वाचून माझे डोळे उघडले आहेत. मला खालील गोष्टींची खात्री पटलेली आहे.
१) २००१ मध्ये संसदेवर झालेल्या हल्ल्यामागचे खरे सूत्रधार अडवाणी हे होते. शांतताप्रिय मुसलमांना आणि मानवतावादी पाकिस्तानला बदनाम करण्यासाठी ही खोटी चकमक घडवून आणण्यात आली होती.

२) ९-११ च्या हल्ल्यामागचा खरा सूत्रधार बुश हा स्वत:च होता. कारण अफगाणिस्तावर हल्ला करण्यासाठी निमित्त तयार करणे.

३) इशरतची चकमक बनावाट होती. ती महाविद्यालयात शिकणारी एक साधीभोळी मुलगी होती. ती आपल्याबरोबर तीन मुसलमान तरूणांना घेऊन गुजरातमध्ये समाजसेवा करण्यासाठी गेली होती. वाटेत वाघ, सिंह आडवे आले तर संरक्षणासाठी म्हणून तिच्याकडे बंदुका, बॉंब वगैरे होते. गुजरात पोलिसांनी तिला मारले कारण वरीलप्रमाणेच.

४) वीरप्पन हा अहिंसावादी आणि गांधीवादी समाजसेवक होता. तो खेड्यातल्या लोकांची सेवा करत असे. पोलिसांना लाच द्यायला त्याने नकार दिला म्हणून खोट्या चकमकीत त्याला मारले.

५) १९९९ मधले कारगिल युद्ध हा वाजपेयींचा बनाव होता. निवडणूक जिंकता यावी म्हणून खोट्याखोट्या युद्धाची योजना त्यांनी तयार केली होती.

६) मालेगाव व हैद्राबाद येथील मशिदींवरील हल्ले आणि समझौता एक्स्प्रेसवरील हल्ला संघाच्या लोकांनी केला होता. गोध्रा येथे रेल्वेच्या डब्याला संघाच्याच लोकांनी आतून आग लावलेली होती.

७) काश्मीर मधील शिखांचे हत्याकांड सैनिकांनी घडवून आणलेले होते.

८) १९९३, २००२, २००३, २००६ व आतापर्यंत मुंबईत झालेले सर्व बॉंबस्फोट हे अतिरेकी स्वरूपाच्या संघाने केलेले होते.

९) १९४७ पासून आतापर्यंत झालेले सर्व बॉंबस्फोट व दंगली या पाठीमागे संघाचा हात होता. १९९८ मध्ये अडवाणींनी आपल्याबद्दल सहानुभूती निर्माण करण्यासाठी कोईमतूर येथे बॉंबस्फोट घडवून आणले. यात बिचार्‍या हाजी नदाफ उगाचच पकडले. तो तर हाज करून आलेला अहिंसावादी मुसलमान होता.

१०) शांतताप्रिय, निरूपद्रवी, अहिंसावादी आणि देशभक्त मुसलमानांना आणि पाकिस्तान व बांगलादेशाला बदनाम करण्यासाठी संघ अशी कृत्ये करत असतो.

विजय कुलकर्णी, कुमार केतकर, अरुंधती रॉय, नंदिता हक्सर अशासारख्यांच्या प्रयत्नाने संघाचे पितळ उघडे पडलेले आहे.




Chyayla
Monday, May 21, 2007 - 5:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सतीश... खी खी खी.. अजुन एक सन्घाने मुद्दाम विजय उर्फ़ राजन साहेबाना सन्घावर शाब्दिक हल्ला करण्यास नेमले आहे जेणेकरुन सन्घाबद्दल सहानुभुती निर्माण होइल. व सन्घाचा प्रचार अजुनच झपाट्याने होण्यास हातभार लागेल... कस पकडल? हिन्दीत एक म्हण आहे.. नन्गे से खुदा डरे.. मी तर आधीच घाबरलो विजय सायबाला.

Marhatmoli
Monday, May 21, 2007 - 5:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सोमवारच्या लोकसत्ता मधिल सम्पादकिय वाचलत का कुणि? मी तर सुन्न झाले वाचुन. इंदिरा गांधिंचे समर्थन करण्यासठि ना. ग. गोरे आणि एस. एम. जोशि यान्च्या सारख्या विभुतिंवर (ज्यांचि देशभक्ति आणि त्याग वादातित आहे ) संशय फ़क्त केतकरच घेवू शकतात. या माणसाला काय म्हणावे खरोखर कळत नाहि.


Satishmadhekar
Monday, May 21, 2007 - 6:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> सोमवारच्या लोकसत्ता मधिल सम्पादकिय वाचलत का कुणि? मी तर सुन्न झाले वाचुन. इंदिरा गांधिंचे समर्थन करण्यासठि ना. ग. गोरे आणि एस. एम. जोशि यान्च्या सारख्या विभुतिंवर (ज्यांचि देशभक्ति आणि त्याग वादातित आहे ) संशय फ़क्त केतकरच घेवू शकतात. या माणसाला काय म्हणावे खरोखर कळत नाहि.


केतकर नेहमीच लोकसत्तामधून गरळ ओकतात (सापांची आणि पालींची क्षमा मागून मी हे विधान करत आहे). संघपरिवाराला झोडपून काढताना ते 'निगरगट्ट, कोडगे, निर्लज्ज, बेशरम' असे खालच्या पातळीवरचे शब्द वापरतात. मागे वाजपेयींबद्दल त्यांनी 'वाजपेयी म्हातारचळ लागल्यासारखे बरळत आहेत' असे लिहीले होते. ते संपादक असून सुद्धा एखाद्या नवशिक्या पत्रकाराला असते एवढी सुद्धा मॅच्युरीटी त्यांच्याकडे नाही. अतिशय खालच्या पातळीवरील भाषा वापरून संघपरिवाराला झोडपणे हीच त्यांची पत्रकारीतेची व्याख्या आहे आणि हाच त्यांचा एककलमी कार्यक्रम आहे. 'सकाळ' सारखी वृत्तपत्रे कधीही एका पातळीखाली घसरत नाहीत. मात्र केतकरांच्या लिखाणाला काहिही ताळतंत्र उरलेला नाही.

मात्र सोनिया गांधी, लालू यांच्याबद्दल लिहीताना त्यांच्या लिखाणात फक्त चमचेगिरी आणि लाळघोटेपणाच आढळतो. ते जे लिहीतात त्याच्या बरोबर विरूद्ध अर्थ आपण घ्यायचा असतो.

फक्त महामूर्खच केतकर आणि लोकसत्तावर विश्वास ठेवतात.


Jaymaharashtra
Monday, May 21, 2007 - 9:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा!! श्री सतिश,
क्या बात है! अगदी शुद्ध मराठीतच बोलायचे झाले तर शालजोडीतला आहेर दिलात असे म्हणायला हरकत नाही.
केतकरांसारख्या स्वतःला विद्वान म्हणवणार्‍या दांभिक,नको त्यांची तळी उचलुन धरणार्‍या पत्रकारांमुळेच आज सगळ्या पत्रकारीता या शाखेचीच वाट लागली आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणवुन घेणारी पत्रकारिता अगदी रसातळाला गेली आहे आणि केतकरांसारखे या क्षेत्राला पार बुडवल्याशिवाय शांत व्हायचे नाहीत असेच दिसतय.
सगळ्यात वाईट एका गोष्टिचे कि ते ठाणेकर आहेत आणि हि वस्तुस्थिति आंम्हा ठाणेकरांसाठी अत्यंत लांछनास्पद आहे.
कुलकर्ण्यांची तर बहुतेक मती भ्रष्ट झाली आहे ते काय लिहित आहेत ते बहुतेक त्यांना स्वतःलाच समजत नाहि असे दिसतय.
जय हिंद!
जय महाराष्ट्र!


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators