Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 20, 2007

Hitguj » Views and Comments » मायबोली-हितगुज » लिखाणावरील प्रतिक्रीया » Archive through April 20, 2007 « Previous Next »

Mansmi18
Thursday, April 19, 2007 - 4:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो आम्ही तुमच्या मनोरन्जनासाठी लिहितो. नाहीतर तुम्हाला बाजुला बसुन मज्जा कशी बघता येइल?:-)

Robeenhood
Thursday, April 19, 2007 - 4:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोकहो,

बोलण्यावर फसू नका...

पाठीमागे धरलेला घासलेटाचा डबा अन कापडी बोळे अन काडेपेटी दिसलेली नाही वाटते अजून तुम्हाला...

सावधान!!!!!....


Peshawa
Thursday, April 19, 2007 - 6:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


अज्जुकाच्या प्रतिक्रिया न आवडणे सम्जु शकतो पण तिने कशा प्रतिक्रिया द्याव्यात हा पुर्णत: तीचा प्रष्ण (अगदी माजोर्ड्या वाटल्या तरी) आहे असे वाटते. त्यातुन तिने नन्दिनीच्या कथेला दिलेला अभिप्राय न आवड्ल्यास नंन्दीनीने तिला " त्याच शब्दात " उत्तर दिले तरी समजु शकतो. प्रसंगी admin कडे धाव घेणे समजु शकतो पण अज्जुकाने माय्बोलीवर कसे वागावे हे कोणत्या अधिकाराने इथले id सांगतात हे मात्र समजले नाही.

--------------------
>>>मला मान्य आहे की मला तुझं लिखाण वाचून जे वाटलं ते केवळ माझं इंटरप्रिटेशन असेल. पण मग आपल्याला ज्या हेतूने प्रतिक्रिया द्यायची आहे त्याचं इंटरप्रिटेशन आपल्याला पाहिजे तितपतच, आणि पाहिजे तेच समोरच्याच्या मनात केलं जाईल याची खबरदारी आपण घ्यायला नको का? >>>

फ ह्या दोन वाक्यात विरोधाभास आहे का?... कारण जर आजुका सांगतीये की तिचे अभिप्राय कसे interpret करा तर ते न ऐकता जर केवळ वाचणार्याला कसे वाटले हेच महत्वाचे असेल तर बोलणे खुंटते
---------------
असेही म्हणता येइल
अज्जुकाचे बोलणे आपल्याला झेपत नसेल तर दुर्लक्ष कराता येते पण केवळ तिची माय्बोलिवरील अभिव्यक्ती जशि आहे तसे आपल्याला स्विकरता येत नसेल तर आपल्या कोते पणावर आत्मसंशोधन करणे देखील जास्त गरजेचे होते


PS: माझे व्याकरण नियम कच्चे असल्याने (आणी broswer अही फ़रसा सहाय्यक नसल्याने)भाशेची जी मोडतोड होते त्या बद्दल दिलगीर आहे.


Mansmi18
Thursday, April 19, 2007 - 7:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पेशवे,

जसे तिला अभिव्यक्तीचे स्वातन्त्र्य आहे तसे इतराना त्याना काय वाटले हे मान्डण्याचे स्वातन्त्र्य आहे. जसे इतर तिचे पोस्टकडे दुर्लक्ष करु शकतात तसे तीही करु शकते. मग इतराना कोत्या मनोव्रुत्तीचे म्हणणे कितपत योग्य आहे? आत्मपरीक्षण एकतर्फ़ी व्हावे का?

खर सान्गु का? असे दुसर्याला वाटेल तसे बोलणे, "मी मी माझेच खरे, मला कोण बोलले तर मला काही फ़रक पडत नाही" , या प्रकारच्या सूरात बोलण्याची आणि ऐकण्याची सामान्य लोकाना सवय नसल्याने असे इतरान्शि जरी कोणी बोलले तरी काही वेळा ते सहन होत नाही आणि चार गोष्टी सान्गाव्याशा वाटतात. मला वाटते इथे जे लिहिले जाते ते या आत्मीयतेपोटीच लिहिले जाते. मला नाही वाटत वैयक्तीक आकसापोटी असे कोणी लिहिले असेल.

धन्यवाद.


Zakki
Thursday, April 19, 2007 - 11:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की अहो मग हाच स्पष्टवक्तेपणा ईतरान्नीपण म्हणजे प्रतिक्रियान्वर प्रतिक्रिया देउन दाखवला असे तुम्हाला नाही का वाटत?.

अहो बरोबर आहे, त्यांनीपण स्पष्टवक्तेपणाच दाखवला असे मला जरूर वाटते. अज्जुक्का यांनी लगेच मायबोली सोडून जाण्याची भाषा सुरू केली म्हणून त्यांना तसे म्हंटले.

खरे तर इथे होतय् काय की 'मी स्पष्टवक्ता आहे, पण तुम्ही मात्र स्पष्टवक्ता असलात तरी माझ्यावर टीका करू नका' असेच दोन्ही बाजू बोलताहेत. का बरे? कुणि ऐकणार आहेत थोडेच? कुणि 'माझे चुकले, नि उद्यापासून एकदम १८० डिग्रीतून फिरेन' असे कुणि म्हणणे कठिण आहे. तर स्पष्टवक्तेपणा प्रमाणेच मितभाषी हि असावे, असे मला वाटते.

ज्यांना इथे येऊन नुसती धुळवड करायची आहे (म्हणजे माझ्यासारखे,) त्यांना कोण काय बोलणार?, त्यांचा हेतू स्पष्ट आहे.


Savyasachi
Friday, April 20, 2007 - 12:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाकी अज्जुका, मूळ कथा डेली सोप होते आहे अस म्हणता म्हणता त्यावरची चर्चा डेली सोप झाली की :-)

Limbutimbu
Friday, April 20, 2007 - 4:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झाल का? .. ..

Chyayla
Friday, April 20, 2007 - 4:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झाल का? .. ..

झाल असेल तर मी येतो आता काडी करायला... लिम्बुटिम्बु

अहो झक्की ती सहानुभुती मिळवण्याची युक्ति होती... काही मासे गळाला फ़सलेत.. पण तुम्हीसुद्धा..


Bhramar_vihar
Friday, April 20, 2007 - 5:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झाल का? .. ..
घासलेटचा ट्यांकर आला

Rahulphatak
Friday, April 20, 2007 - 5:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सर्वप्रथम फ ह्याचे स्पष्ट विचार संयमितपणे मांडल्याबद्दल अभिनंदन !

१० जण सांगूनही जर वृत्ती बदलतच नसेल तर कळत नकळत त्रास होतो आणि त्यावर गप्प रहाणे म्हणजे तो त्रास वाढवून घेणे आहे.

कुठलीही व्यक्ती पूर्ण चांगली किंवा वाईट अर्थतच नसते. वाईट वृत्ती किंवा असे म्हणूयात की सकारात्मक नसलेली वृत्ती ही वाईटच असते आणि ती व्रूत्ती बाळगून असलेली व्यक्तीच तिला आळा घालू शकते. दुसरे कुणी नाही.

एकदा झालं दोनदा झालं चारदा झालं तरी पुन्हा तेच !

आता मी हे पोस्ट का लिहीत आहे

१. ह्या 'नकारात्मक वृत्ती' मुळे गेल्या वर्षीच्या वर्षा विहार च्या संयोजकांना कसा त्रास झाला हे सांगण्यासाठी.

२. इथे अज्जुकाच्या 'स्पष्टवक्तेपणा' बद्दल कुणाच्या काही मोहक कल्पना असतील तर त्याना दुसरी बाजू कळावी ह्यासाठी


नन्तर काही चिखलफेक होण्या आधी काही मुद्दे मी आधीच स्पष्ट करु इच्छितो : (कृपया काही आत्मस्तुती आढळली तर क्षमा असावी)

१. कुणाच्याही कसल्याही (लहान अथवा मोठ्या) 'कर्तुत्वा' बद्दल मला कसलाही पोट्शूळ, हृद्यविकार, दमा वगैरे नाही माझ्या बुद्धीचा आणि कर्तुत्वाचा मला पुरेसा अभिमान आहे. अकारण वा सकारण गर्व नाही.
२. क्वचित येणार्‍या नकारात्मक प्रतिक्रिया मी तितक्यच खुल्या दिलाने स्वीकारल्या आहेत. बर्‍याच प्रतिक्रिया सकारात्मक असतात ह्याचा सर्व लिहिणार्‍या / न लिहीणार्‍या माय्बोलीकरना माझे सर्वच लिखाण अतिशय आवडते असा कुठलाही गैरसमज माझा नाही आहे.
३. फुकट वाद घलण्याऐवजी मी कथा, ललीत लेख, क्वचित कविता, चित्रकला ह्या माध्यमातुन काही सकारात्मक करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याने काही जणाना तरी जो आनंद मिळतो त्या समाधानास तुलणा नसे !
४. विषय निघाला आहे म्हणून लिहीत आहे. कुणाच्याही खांद्यावर बंदूक ठेवायचा प्रशनच नाहीये. बंदूक आणि तोफा उचलायला माझी लेखणी समर्थ आणि खान्दे सशक्त आहेत. आज काही गप्प बसण्याची वेळ नाहीये.
५. थोर लोकांकडून तर शिकावेच पण आपल्यापेक्षा काही किंवा सर्व बाबतीत कमी असलेल्यांकडूनही शिकता येते ह्या मताचा मी तरी आहे.


तर आता त्या घटनेबद्दल आणि वृत्तीबद्दल :

१. गेल्या वर्षी (२००६ च्या) वर्षाविहारची तयारी संयोजक मंडळ उत्साहाने करत होते.. ज्यात मीही खारीचा वाटा उचलत होतो. तेव्हाच एका संयोजकाच्या नजरेस अज्जुकाचे दुसर्‍या BB वर लिहीलेले हे खोडसाळ पोस्ट पडले

दुसर्‍या एका ID ला उत्तर देताना ती असे म्हणते :
xyz , तू जा हां ववीला.. काय आहे ना की आम्हाला ५ तास सांस्कृतिक शिस्तपालन करुन मजा येत नाही रे..


काय संबंध ? संबंध काय ?
आता ह्याला शेंडा बुडखा नसलेले खोडसाळ पोस्ट म्हणत नाहीत का ?

दोस्तीखात्यात टप्पल मारणे वेगळे आणि असे कारण नसताना नकारात्मक बोलणे वेगळे.

तरीसुद्धा आम्ही सर्व संयोजकानी एकमाताने असा निर्णय घेतला ह्या शेर्‍याकडे पूर्ण दुर्लक्ष करुन आपले काम त्याच नेकीने पुढे चालू ठेवणे. ह्याचा फायदा असा झाला की व. वि. अत्यंत यशस्वी झाला. (व. वि. वरील प्रतिक्रिया खात्रीसाठी बघाव्यात. ज्यात प्रथमच भेटलेल्या लोकांच्याही अनेक प्रतिक्रीया आहेत.) अतिशय छान अश्या टीम वर्क चे ते फलित होते !

कुठली 'सांस्कृतिक शिस्त' ? नियोजन बद्ध कार्यक्रम करणे म्हणजे सांस्कृतिक शिस्त ? ज्या कार्यक्रमाला स्वतः यायची शक्यता नाही, अमुक तमुक आला तरच मी येईन असे लिहीणे (म्हणजे बाकी सगळे भुक्कड आहेत ? ) यावर काय बोलावे ?

थोडक्यात "मी वाट्टेल ते लिहीणार, माझ्यावर झालेली टीका ही पोट्शूळ, आकस ह्यापायी आणि ती करणारे मूर्ख." हा त्या वृत्तीचा एक भाग.

सतत आक्रमक राहीले नाही तर नुकसान होईल असे अजब तर्कशास्त्र, आपले सतत कोणी वाकडे करणाच्या प्रयत्नात आहे (लोकाना दुसरे उद्योग नाहीत ? आणि काय वाकडे करणार कुणी कुणाचेही ? ) हा अजून एक भाग.


ह्या सर्व वृत्तीचाच मी तीव्र निषेध करतो !!!



Limbutimbu
Friday, April 20, 2007 - 5:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला, भ्रमा...
लेको, हिथ एक सबुद बोलायला फुरसत नाही हे! प्रतिक्रिया कसल्या देतो मी?
ट्यान्करची बात सोड.......
राफाने आख्खी तेलाची खाण खोदुन वर उघडली हे ते बघ!

(हुडाच्या मागे धावत जातो)
DDD

Limbutimbu
Friday, April 20, 2007 - 6:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्या दुसर्‍या बीबी ची लिन्क सन्दर्भ तपासुन पहाण्याअसाठी मिळू शकेल काय???

Ajjuka
Friday, April 20, 2007 - 6:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ, ओव्हरस्मार्ट वाटण्याबद्दल....
प्रतिक्रिया कोणाला... नंदीनीला.. ती कोण आहे? तर एक पत्रकार. तर या सगळ्य़ा गोष्टींशी पत्रकार परिचित असतात हे गृहित या शब्दांमागे आहे (माझ्या बऱ्याचश्या पत्रकार मित्रांना माहित असतं या अनुभवातून आलेले हे गृहित.) पण ते समजून घ्यायची तुमची इच्छा दिसत नाही. इतरांना अपरिचित असलेले शब्द/ संकल्पना मला माहित आहेत म्हणजे मी कुणीतरी मोठी असं माझंतरी मत नाहीये. कारण मला माहित नसलेल्या अनेक गोष्टी तुम्हाला माहित असणारंच आहेत हे मी जाणते. पण तुम्हाला अपरिचित असलेले शब्द मी वापरले तर राग येतोय असं दिसतंय. इतरांसाठी हे शब्द अपरिचित असतील तर ज्यांना माहितीयेत त्यांनीही वापरू नये असा सूर तुमच्या सांगण्यात दिसतो. तो अजिबात पटण्यासारखा नाही. मी माझं मत चुकीचं असू शकतं हेही म्हणलंय पण तेही तुम्हाला वाचायचं नाहीये किंवा चुकीच्याच अर्थाने घ्यायचंय. पहिल्याच पोस्ट मधे ’कमीपणा देण्यासाठी हे म्हणत नाहीये’ हेही सांगितलंय म्हणजे माझा हेतू मी स्पष्ट केलाय पण तुम्हाला facts चा विपर्यासच करायचा आहे.
दिवाळी अंकातल्या प्रतिक्रियांबद्दल.. मी तेव्हाही तिथेही स्पष्ट केले होते की कुणावर वैयक्तिक टिका मला करायची नाही जे काय होते ते लिखाणाबद्दलच बोललेले होते/ आहे. त्या दोघींना त्यांच्या लिखाणाला negative प्रतिक्रिया यावी हे आवडले नव्हते. ते त्यांनी स्पष्ट केले. अश्विनी ने त्याबद्दल अढी धरली तर सुमतीला प्रतिक्रिया पटली नसली तरी ते तिला वैयक्तिकरित्या म्हणलेले नाही हे लक्षात आले त्यामुळे तिने अढी धरली नाही (नंतर आमचे फोनवर संभाषण झाले वेगळ्या संदर्भात.. तेव्हा मला हे जाणवले.)
बर तुम्ही एवढं बोलताय प्रतिक्रियांबद्दल.. माझ्या लिखाणाला फडतूस, भिकार असे खूपच मवाळ शब्द वापरण्यात आले आहेत. त्यावर तर मी एका शब्दाने काही म्हणले नाहीये हे बघा. की माझ्या लिखाणाला हे सगळं म्हणणं योग्य आहे असं तुमचं म्हणणं आहे?
संपदा, मुळात मी खूप कमी लिहिते. लिहिते ते सगळे मायबोलीसाठीच असते, मायबोलीवरच येते असेही नाही. तसेच चांगल्या लिखाणाचे निकष माझ्या डोक्यात ठरलेले आहेत त्यामुळे त्या निकषांवर ते मला जोवर योग्य वाटत नाहीत तोवर मी ते लोकांच्यासमोर ठेवत नाही(कविता सोडून..). अनेक drafts असे फेकून दिलेले आहेत करून. तरीही मी अत्यंत वाईट लेखिका आहे असे म्हणणे असेल तर असायला माझी काही हरकत नाही. माझ्या कथेला/कवितेला आलेल्या स्तुतीपूर्ण प्रतिसादापासून बेक्कार म्हणणाऱ्या प्रतिसादापर्यंत सगळेच प्रतिसाद हे एक मत आहे याच पद्धतीने घेते मी. सगळेच प्रतिसाद मला काहीतरी शिकवतात जेव्हा त्या प्रतिसादात वाईट म्हणले तरी ते का याची फोड करून सांगितलेली असते. बाकी ’वा छान’ किंवा ’शी घाण’ एवढेच असलेले दोन्ही प्रतिसाद एकाच पद्धतीने घेते मी.
इथे बोलावे लागले कारण तू स्वतःला शहाणी समजतेस का, तुला अक्कल नाहीये अश्या स्वरूपाच्या प्रतिक्रिया आल्या म्हणून...
आणि हो मला आणि इथल्या अनेकांना आजही माझ्या प्रतिक्रियेमधे काही चुकीचे वाटत नाही अगदी त्यांचे मत वेगळे असले तरी.

बाकी राहुल, तुझा पोटशूळ नक्की कश्यामुळे आहे हे पूर्ण माहितीये मला. पण त्यावर इथे मी बोलत नाही म्हणजे तू जे म्हणशील ते ऐकून घेईन असेही नाही.
आणि झाले ना तुमचे ववि यशस्वी? चांगलय की.. मग?
मी GTG जमवले होते तेव्हा माझ्यावर पण अनेक पद्धतीने शरसंधान झाले होते. ते होणारच. होतेच. मी नाही रडले त्याबद्दल कुणापुढे. काहीही करायला जा लोक सर्व बाजूंनी बोलतातच. तुला तू करत होतास ते योग्य वाटलं ना? आणि म्हणून तू केलंस ना तुला हवं होतं ते झालं तर. का वाहत्या गंगेत हात धुवून घेतल्यासारखं कुठलातरी राग कुठेतरी काढायचा...
आणि BTW तुझा खरा राग ज्या गोष्टीवर आहे ना त्याच प्रक्रियेतून बाकी सगळी मुलंही गेली होती. आणि आता ते मला त्याच प्रक्रियेसाठी धन्यवाद देतात.

Admin
Friday, April 20, 2007 - 6:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मंडळी या एकाच विषयावर भरपूर चर्चा झाली आहे. तुम्हाला या मुद्यावर लिहिण्यासारखं अजून पुष्कळ असेलही पण ते आता थोडं आवरतं घ्यायला लागा. म्हणजे ते कोर्टात शेवटचं closing arguments असतं ना तसं. शक्यतो हा BB बंद करावा लागू नये अशी आशा आहे. थोडक्यात इथे भाग घेणार्‍या प्रत्येकाला जे काही सांगायचं आहे ते एकदाच सांगून थांबणं शक्य आहे का? अवघड आहे पण प्रयत्न करून पहा. कारण एकदा BB बंद केल्यावर ते closing argument करायचाही chance मिळणार नाही.

(खरं तर मनातल्या मनात मी हा विषय संपवला होता पण आता तुम्ही म्हणताच आहात तर लिहितोच एक दणदणीत closing argument असेही कृपया करु नका :-) )


Ajjuka
Friday, April 20, 2007 - 6:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>काही दिवसांपूर्वी ' नाव आणि प्रतिमा ' बीबीवर झकासरावाने तुझ्या कामाबद्दल माहिती कळल्यावर तुझं कौतुक केलं होतं. तेव्हादेखील ' सगळ्या मायबोलीला माहीत आहे.. तुम्हाला नव्याने कळलेलं दिसतंय ' टाइप ताठकॉलर उत्तर दिलं होतंस. तुझ्या यशाबद्दल तुझं कौतुक आहेच.. पण मुळात तुझी कर्तबगारी तमाम मायबोलीकर जनतेला माहीत असावी असं तरी का गृहित धरावं?!! कहर आहे! <<
याला खरंतर फक्त जळजळ च म्हणता येईल.. कारण जे काही तपशील होते जे झकासला माहित नव्हते ते साधारण त्या वर्षभराच्या काळामधे संपूर्ण मायबोलीला खरंच माहीत होते. आणि नंतरही अनेकदा त्याच गोष्टीचे संदर्भ अनेक ठिकाणी अनेकांच्या पोस्टमधे आलेले आहेत. अजूनही येतात. तेव्हा बोलण्याबोलण्यातून ते अनेकांना माहित असेल हे गृहित धरणे यात कहर बिहर काही नाही. साधं सरळ लॊजिक आहे. आणि मला ते मिरवायचे असते तर मी सतत ओरडून सांगत बसले असते. मी तो संदर्भही आणत नाही. पण आला संदर्भ तर मला का अभिमान वाटू नये? मी केलंय ना ते? का नसावा अभिमान.. का आता माझ्या प्रोफाईल मधून ते संदर्भही मी काढून टाकावेत अशी अपेक्षा आहे? कॊलर ताठ असण्यावर आक्षेप असेल तर त्याला तुझी जळजळ एवढेच कारण मानता येईल..


Viveki
Friday, April 20, 2007 - 7:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



फ तुम्ही अगदी संयमित शब्दात अज्जुकाचे पितळ उघडे पाडले आहे. मीपण पुराव्यानिशी दाखवून दिले तर माझ्यावर मूर्ख वगैरे शिव्यांचा भडीमार केला. आता तुम्ही तयार रहा. निगेटिव्ह प्रतिक्रियेला आक्षेप नाही, उद्दाम आणि वैयक्तिक अपमान करणार्‍या भाषेला आहे हे उदाहरणासह दाखवले तरी अज्जुका आणी तिने उभे केलेले एक दोन सर्थक वेड पांघरून पेडगावला जात आहेत आणि पुन्हा पुन्हा निगेटिव्ह प्रतिक्रियांनाच आक्षेप घेतला आहे असे भासवत आहेत आणी ते डिफेंड करत आहेत. यांच्याबद्दल झोपलेल्याला उठवता येते झोपेचे सोंग घेतलेल्याला नाही असे मीनु म्हणते ते खरेच आहे.

राहूल तुमचा मुद्दा मात्र इथे कसा काय लागू होतो ते कळले नाही. वविच्या राजकारणाबद्दल बोलायचे तर तो वेगळा विषय होईल. पण तेही बोलले पाहिजे म्हणजे किमान पुढचे ववि तरी निकोप वातावरणात पार पडेल. तुम्ही अज्जुकाचे एक वाक्य धरले आहे, पण ववि संयोजनात सिंहगड रोडच्या गटाने शिरकाव केल्यापासून भयंकर गटबाजी कशी सुरू केली अहे त्याचे काय ? पूर्वी अंबर कर्वे आणि इतर सर्व असतांना नक्कीच सर्वांना सामावून घ्यायचे जास्त प्रामाणिक प्रयत्न होते.

इथे तुम्हाला न आवडणारे किंवा इथल्या लोकप्रियतेमुळे तुम्हाला डोईजड होतील अशा दोन प्रकारच्या लोकांनी येउ नये म्हणून तुम्ही काय काय राजकारण केले तेही लिहा ना मग. शिवाय एवढे करून मिल्याने वृत्तांतात लोकांनि तेव्हा त्यात सर्वच जण असा गटातटाचा बाउ न करता सामिल झाले असते तर खुप बरे वाटले असते असा मानभावीपणे मिठाचा खडा टाकला होता त्याचे काय. म्हणजे गटबाजी तुम्ही करायची आणि बोल दुसर्‍यांना लावायचे.

लिंब्याने एक मजेशीर काल्पनिक वृत्तांत लिहिला तर त्याला ववि संयोजकांनी फटकारले की वविला न आलेल्यांनी वविबद्दल लिहू नये. मग कधीतरी असे विधान की वविच्या संयोजनात सहभाग नसलेल्यांनी वविबद्दल विधाने करू नेयेत. हे काय चालू होते ? ववि संयोजकात शिरकाव झाला म्हणजे इथे काय लिहायचे हेही तुम्हीच ठरवणार वाटत ? तुमचा मुद्दा एकदम चुकीचा अस्थानी आहे.

अस्थानी असला तर असो, अज्जुका आणि तुम्ही अशक्य आहात, अजुन येउ द्या

This was my conculding post. any discussions about vavi politics can be done on other bb.

Nandini2911
Friday, April 20, 2007 - 7:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Admin आपली आज्ञा शिरसावंद्य मानून मी ही काहीतरी बोलणार आहे..

मुळात हा वाद चालू झाला त्याच्याही आधी मीही कथा अर्धवट सोडण्याच्या मागे होते. अर्थात त्याला माझी वैयक्तिक कारणे होती.

दिनांक २ एप्रिलला कथा सुरू झाली.
पहिल्याच पोस्टनंतर आलेले संघमित्राचे पोस्ट मी हसत खेळत घेतले होते. त्याचीही भाषा उपरोधिकच होती. पण ती कुठेही टोचणारी नव्हती. नंतरच्या सर्व प्रतिक्रिया या "लवकर लिही" याच स्वरूपच्या होत्या. संघमित्रानेच ९ एप्रिलला कथा पुढे बालाजी वळणावर जाऊ नये असं म्हटले.

यानंतरही लवकर लिही किती वाट पहायला लावतेस वगैरे पोस्ट्स येतच राहिल्या. पण मी प्रचंड बीझी होत गेले. आपल्याच जिवलग व्यक्तीशी मृत्यूबरोबर चाललेली धडपड पहात होते. तेरा तारखेला अज्जुकाची पहिली प्रतिक्रिया आली. तिचं पहिलंच वाक्य होतं "लोकाना व्यसन लावण्याइतकं चांगलं नक्कीच लिहितेस.." क्या बात है.. !! अजून काय complement हवी?

पुढे तिने मी डेली सोप लिहू नयेत हेही लिहिलं होतं. मी शक्यतो प्रतिक्रियाना पर्सनल मेल करून उत्तरे देते पण एवी तेवी वेळॅवर कथा येत नसल्याबद्दल सगळ्याच बीबीवर कानपिचक्या मिळाल्या होत्या. त्यामुळे मी एक पोस्ट टाकले की सध्या शक्य वेळेवर पोस्ट करणे शक्य होत नाही आहे, प्लीज समजून घ्या.

या पुढे अज्जुकाचे आलेले उत्तर माझ्या डोक्यावरून गेले.
Romanticism संपला.. १८६० मधे? म्हणजे आमच्या आयुष्यात romance नसावा का? Modernism वगैरे मला कळत नाही. मी Literature ची विद्यार्थिनी नव्हते. त्यामुळे स्टोरी संपल्यावर डिस्कस करू हेही मी सांगितले होते.

त्यावर "बाई गं.. माझ्याकडून शिकण्यासारखं आहे म्हणतेस पण तसे मला मुळीच वाटत नाही. आणि मी शिकवण्यासाठी अभिप्राय ही दिला नाहीये. तसा सूर जाणवला असेल तर क्षमस्व. बाकी तुझी तू स्वतःच्या विचारानेच, स्वतःला तपासून बघतच, introspect ने खूप काही शिकशील. ते तुझ्यातच आहे. "
हे उत्तर मला मिळाले. परत मी clueless ..
एक तर मी कामात प्रचंड बिझी होते. NDTV ची टीम आली होती. म्हणजे मी पूर्ण रात्र ऑफ़िसमधे होते. रविवार अख्खा कामात गेला. दिवसाच्या शेवटी मीइ collapse व्हायची शिल्लक होते. त्यातच माझा रेहान सेरीइयस झाल्याची बातली आली. मला तिथे जाण्यासाठी सुध्दा वेळ नव्हता. मला माझंच सुदरत नव्हते. तरीही मनाला विरंगुळा म्हणून मायबोलीवर आले.
प्पह्ते तर
"आणि चर्चेचं म्हणत असशील तर कधीही तयार किर्तन लावायला... ही ही ही " काय अर्थ या हीहीचा? पण मी जास्त लक्ष दिले नाहि. दरम्यान पेंढ्याने त्याच्या मताप्रमाणे कथेची समीक्षा केली.

"अरे नाही बाबा.. ते एक माझं मत आहे केवळ. ते चुकीचंही असू शकतं. माझा कसला अभ्यास ब्वा? " हे उत्तर... अभ्यास नाही तर सल्ले का देता? ठीक आहे पण मग दुसर्‍याला हिणवल्यासारखं का बोलावं..
मी विचार केला जाऊ दे... सीनीयर बाई आहे. उगाच कशाला वादात पडा. इथे कथा वेळेवर पोस्टायला होत नाही आणि वाद विवाद कशाला?
यानंतर सहस्रबुध्धे नावाची पोस्ट आली. त्यात तुम्ही भांडयच्या मूडमधे का असता हा विषय होता. परत पेंढ्याने इथे चर्चा करू नका हे मत मांडलं.

To be continued


Lukkhi
Friday, April 20, 2007 - 8:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा बी बी बंद नाही झाला का अजुन?

admin , ववि साठी एक नवीन बी बी उघडता येईल का?

आणि तुमच्या या उखाळ्या पाखाळ्यांमध्ये हा बी बी ज्या हेतूने उघडला आहे (जो की मायबोलीवरील प्रतिभावंतांच्या आणि साहित्यिकांच्या साहित्यावर निकोप चर्चा व्हावी) त्या हेतूकडे दुर्लक्ष होते आहे.

नंदिनीने दुर्दैवाने कथेचा पुढचा भाग टाकला नसल्याने तुम्हांस लिहिण्यासारखे काही नसेल तर कवितांच्या बी बी वर जा, आणि त्या कवितांबद्दल (जर चुकून काही समजलेच तर) काही प्रतिक्रिया द्या... तेवढाच नवकविंना तुमच्या पांडित्याचा फायदा होईल.



Pha
Friday, April 20, 2007 - 8:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>कॊलर ताठ असण्यावर आक्षेप असेल तर त्याला तुझी जळजळ एवढेच कारण मानता येईल..
.. तुझ्या यशावर मी जळतोय, इथे तुला परोपरीने समजावू पाहणारे लोक तुला मायबोलीवरून हुसकावू पाहतायत, लोकांचा पोटशूळ उफाळून आलाय.. अशक्क्य आहेस! तू इतक्या आत्मकेंद्री आवर्तात फसलीयेस की तुला या सर्व प्रकारातून कसकसल्या फॅंटसीज् सुचतायत!
>>आला संदर्भ तर मला का अभिमान वाटू नये? मी केलंय ना ते? का नसावा अभिमान..
अभिमान असावा, पण तो कशा पद्धतीने व्यक्त करावा? काही पोच असते की नाही?
जाऊ दे झालं.. अशीच तडकफडक बोलत-लिहीत जा (अन् त्याला स्पष्टवक्तेपणाचं लेबल लावीत जा).. संधी मिळाली रे मिळाली की अशाच स्वतःच्याच हाताने स्वतःच्या आरत्या ओवाळून घेत जा, कोणी काही समजावू पाहू लागलं की त्यांच्यावर अशीच वस्सकन् चालून जा!!


Nandini2911
Friday, April 20, 2007 - 8:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

यानंतर अज्जुकाने माझ्या कथेचा बीबी हा रणांगण करण्याचा पण उचलल्यासारखा पोस्ट लिहिले. वर खाली "पेंढ्या तुझं खरंय... नंदीनी.. तुझ्या कथेत मधे हा फाटा फुटायला कारणीभूत झाल्याबद्दल क्षमस्व. " हेही!!!
ठिक आहे. त्यानंतर ही चर्चा वेगळ्या बीबीवर हलवण्याची विनंती केली. Mod साहेबाना माझे शेवटचे पोस्ट तिथेच ठेवावेसे वाटले.. "त्यामुळे सगळ्याचे बोलून झाले की सांगा... "हे पोस्ट दीनवाणे दिसायला लागले.

शिफ़्ट टू दिस बीबी.....

अज्जुका, राजनकुल, सहस्रबुद्धे आणि विवेकी याचे धमासान चालू होते. i was least intersted अरे जिथे प्रतिक्रिया कळलीच नाही तिथे चांगली वाईट positive negative की फ़रक पैन्दा है??
मजा वाटली ती मला या पोस्टमधे..
"मी अत्यंत शांतपणे, कुठलाही शहाणपणाचा आव न आणता केवळ एक मत म्हणून सूचना केल्या होत्या. आता जिला केल्या होत्या तिला माझे शब्द समजले
.........
Sorry, but i dont agree with this.. :-)

"जे मला बुद्धी, कर्तुत्व, अनुभव यामधे सेनिओर
करावा इतकी. तेव्हा हव्वे तितके बोंबलत बसा.. " अज्जुका,,, सेम पिंच.. :-)

पण मी तेव्हा काहीच लिहिलं नाही.... कारण मी खरंच माझ्या व्यापात गुंतले होते. आणि मला निष्कारण वाद घालायला आवडत नाही. वाद तिथे घालावा जिथे समोरच्याला तुमचे मत मान्य नाही पण तुमच्या मताचा आदर आहे.. म्हटलं चालू दे.. आता आपली कथा तर सुरळीत चालू राहील. पण छे!! मी बोलले नाही म्हणून मी वादातून बाहेर पडले असा थोडीच होतो?
कारण "नंदीनी तुला जर मी शहाणपणाचा आव आणतेय असे वाटत होते तर तेव्हाच तसे बोलायचे होतेस. उगाच दुसऱ्यांच्या खांद्यावरून या बंदुका डागायची गरज नव्हती" बाप रे.. कुणाचे खांदे? कुणाच्या बंदुका? इथे हे वरचे जे कोण लोक आहेत ते काळे का गोरे मला माहित नाही आणि मी त्याना माझ्या बाजूने बोला असं सांगतेय?

पुढे बर्याचशा चर्चेनंतर "त्यात कोणाही ’नोर्मल’ माणसाला दुखावण्यासारखे काय आहे हे सांगा आणि मग उपदेश करण्यास या. उद्धट, खडूस, शहाणपणाचा आव, फडतूस लिखाण हे सगळे माझ्याबद्दल वापरलेले शब्द आपणास दिसले नसतीलच. "

मी abnormal आहे हे परत सिद्ध झाले.. :-)

आणि वर उल्लेखलेले कुठलेही विशेषण मी अज्जुका काय कुणासाठीच वापरले नाहीत.

"तसे केले नाही आणि एखादी प्रामाणिक पण नेगतिवे प्रतिक्रिया आली तर निदान तिथल्या तिथे ते न आवडल्याचे नमूद करावे. प्रतिक्रियेवर ’आपण नंतर चर्चा करू’ असा मानभावीपणा दाखवून मग दुसऱ्यांच्यापुढे रडून त्यांच्या तोंडून प्रतिक्रिया देणाऱ्यास शिवीगाळ करवून घेऊ नये. "

मी रडत आहे हे दृश्यच हास्यास्पद आहे. बाबाचा अपघात, रेहानचे आजारपण यावेळेला मी रडले नाही आणि एका कथेवरच्या प्रतिक्रियेसाठी मी रडतेय? माझा बॉस आजही लेख नीट लिहीलाअ नाही की कचर्याच्या डब्यात माझ्यादेखत फ़ेकतो. तेव्हा मी रडत नाही. अणि आता??? अज्जुकाजी तुमची कल्पनाशक्ती अफ़ाट आहे.
मला झकासराव या व्यक्तीचे इथे कौतूक वाटते. वाद मिटवण्यासाठी त्याने खूप प्रयत्न केले. संघमित्राने माझ्या बाजुने कुणी तरी उडी घेतल्यावर मी उत्तर दिलं असं म्हटलय..
मी कथेची सुरुवात केल्यापासूनच माझ्या कथेला वाचक आहेत हे मला महित होतं. त्यामुळे या वाक्याला फ़ारसा अर्थ उरत नाही. कथेच्या बीबीवर मला तू पुढे लिही या सूचना येतच होत्या.. त्यामुळे वाद की कथा हा विचार करण्याची मला गरजच नव्हती. या सगळ्या मधे मला दिनेशदानी सल्ला दिला की कथा पूर्ण करूनच पोस्ट कर. accpted dineshadaa
मी कथा delete करायला सांगितली कारण त्या कथेचं sandwich झाले होते. कथा आणि प्रतिक्रिया एकमेकात हरवल्या होत्या.. मी कथा copy-paste केली कारण मला ती परत लिहायची होती. पर अभी मैने मायबोली की ताकद देखी कहा थी?



मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators