|
Dineshvs
| |
| Friday, April 20, 2007 - 9:02 am: |
| 
|
नंदिनी वेल सेड. कथा पुर्ण झाल्यावरच पोस्ट करायची. स्वतःला पटेपर्यंत तिचे पुनर्लेखन करत रहायचे. पण मग मात्र प्रतिक्रिया फारश्या मनाला लावुन घ्यायच्या नाहीत. पुढची कथा लिहायला घ्यायची.
|
////संपूर्ण मायबोलीला खरंच माहीत होते. ... मायबोलीकरांची संख्या सुरुवातीला होती तितकीच आहे काय? मला तर वाटतं की दिवसाला दोन चार तरी नविन सदस्य बनत असणार. अशा परिस्थितीमध्ये असे गैरसमज(संपूर्ण मायबोलीला खरंच माहीत होते.) चुकीचे आहेत. ////प्रतिक्रिया कोणाला... नंदीनीला.. ती कोण आहे? तर एक पत्रकार... खूप दिवस एखाद्या ठिकाणी राहिल्यावर ओळखी होणे साहजिक आहे. पण याचा संदर्भ सर्वांना कसा लागणार? लेखन कसं झालंय यात रुची ठेवावी. कोण लिहितो, तो काय करतो(पत्रकार वगैरे) हे थोडं व्यक्तिगत होतंय. कुणाच्याही बाबतीत. अर्थात इतरांनी लेखाच्या प्रतिक्रियेवर प्रतिक्रिया देण्याची काही गरज नाही असं मला वाटतं. प्रतिक्रिया देणे घेणे सर्वस्वी लेखक-वाचक असा संवाद असावा. वाचक-वाचक नको. कंपूबाजी अनेकदा प्रतिभेला खुंटवते. खोटी स्तुती उगाचच लेखकाला(लेखिकेला) त्याच त्याच प्रकारचं किंवा तसलंच सचूक(चुकांसहीत) लिहायला भाग पाडते. आणि खडूस टीका भले ती बरोबर असली आणि योग्य शब्दात नसली(योग्य==लेखकाला संदर्भ/अर्थ न लागण्यासारख्या) तर लेखक दिशाहीन होण्याची शक्यता असते. हे नवोदित जनांच्या बाबतीत जास्त होतं. जाणकारांना ह्याची सवय असते. तरीही टीकेचा संदर्भ लागणं महत्वाचं. नाहीतर ती सफ़ल होत नाही.
|
इती कथा प्रतिक्रिया संपूर्णम! (अशी आशा करुया), ऍडमिन, टाळं मारा या बिबिला!
|
Admin ह्यांच्या सूचनेला मान देऊन हे इथे शेवटचे पोस्ट. यशावर पोटशूळ हे खरचं विनोदी आहे !!! विवेकी, मी इथे का पोस्ट केले हे आधीच स्पष्ट केले आहे. तरीही योग्य मुद्दा अस्थानी असा जर तुमचा आक्षेप असेल तर ठीक. आता कृपया शांत डोक्याने विचार करा. तुमचा 2006 व.वि. संयोजनाविषयी काहितरी गैरसमज झालेला दिसतो आहे किन्वा करुन दिलेला दिसत आहे. काही ठळक मुद्दे मांडतो केवळ माझ्यापुरते. १. राजकारण आणि राजकारणी लोक ह्याविषयी माझ्या मनात अतिशय चीड आहे. मी माझ्या हृदयाचा तळापासून तुम्हाला सांगतो 'एका परंपरेने चालत आलेल्या पावसाळतल्या गेट टू गेदर ला माझ्या परीने मदत करणे' इतका स्वच्छ हेतू होता. मित्रा, मी संत असल्याचा आव आणतोय असे वाटल्यास माफ कर.. पण वस्तुस्थिती हीच आहे की ह्यात कसले रे राजकारण ? २. इतक्या साध्या हेतूने काम केल्यावर ह्यापुढच्या व. वि. वर माझ्या आणि इतरांच्या (त्या वेळचे बाकीचे संयोजक आणि इतर मायबोलीकर) मर्जीने काम करेन किंवा दूर राहीन. काय फरक पडतो ? व. वी. यशस्वी व्हायचे ते होईलच. कृपया तुम्ही गटबाजी शिरकाव वगैरे शब्द वापरू नका. ३. बरं असे करुयात का ? तुमच्या एकाच्या शब्दाखातर मी व. वि. संयोजन मंडळाचे सदस्यत्व घेत नाही ह्यापुढे. केवळ सहभागी व्ह्ययला येईन. (एकच विनंती आहे तुम्ही फक्त duplicate id नाही आहत न एव्हधी खात्री करून द्या. म्हणजे नसालच. तुम्ही म्हटल्याप्रमाणे. फक्त मी निर्णय घेतो आहे तो कुणा खर्या माणसासाठी एव्हढेच समाधान) ४. जवळजवळ सगळ्या.शीच इथे माझे चांगले संबंध आहेत. आता काहीशी परिचय आणि frequency of communication जास्त आहेत जसा कुणाचाही असतो. ५. तुम्हाला काही शंका असतील तर खुशाल मेल करा मला. बरं तुमच्या पोस्टमुळे वाईट वाटूनही मी नीट उत्तर दिले आहे तुम्हाला. कृपया तुम्हीही गैरसमजूती दूर करण्याचा प्रयत्न करा. तुमची खात्रीच असेल तर मात्र दुर्दैव आहे. मग काय ? मुद्दा नं. ३ !
|
तीन तासात माझा कंपनीचा मेल बॉक्स फ़ुल्ल झाला. मोबाईल तर कायम वाजतच होता. साता समुद्रापारवरून फोन आले. पुढे लिही... अर्धवट सोडू नकोस.. त्यातच स्वप्ना नाडकर्णीची प्रतिक्रिया वाचली... आणि स्क्रीन धूसर झाली.... कोण कुठली नंदिनी? घरच्याना तिच्या असण्यानसण्याची पर्वा नाही. जीवाभावाच्या मैत्रिणी हवे असलेल्या क्षणी सोडून गेलेल्या.. ज्या मुलीचा नाती आणि विश्वास यावरचा विश्वस उठलाय तिच्यासाठी इतकी माया? कोण आहेत हे लोक... मी ओळखत सुद्धा नाही... मी कथा लिहिली नाही लिहिली काय फ़रक पडतो? तरी हे लोक एवढा जीव का लावतायत पहिल्यान्दा.... आयुष्यात पहिल्यान्दा वाटलं की किती चांगली गोष्ट आहे की आपल्याला लिहिता येतं,... हे सगळं त्यामुळेच तर शक्य झालं.... Thanx Maayboli आणि thanx ajjuka पण मजा इथेच संपत नाहि.. "झकास, कोणी कुणाशी बोलावं याच्याशी माझा संबंध नाही पण नसेल पटलं तर सरळ सांगावं ना तसं. तुमच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे हा मानभावीपणा का? आणि मग आत ही कथा मी लिहिणार नाही इत्यादी नाटक... लिही.. लिहू नको.. तुझी मर्जी पण माझ्या डोक्यावर का खापर फोडतेस? तुला झेपत नाहीत नेगतिवे ओम्मेन्त्स उगाच इथे येऊन मी भांडखोरपणे आणि शहाणपणाचा आव आणत बोलले हे म्हणायची काय गरज? बाकी सहस्रबुद्दे, विवेकी आणि राजन्कुल ह्या मूर्खांकडे लक्ष द्यायची गरज नाही हे मला माहितीये पण एकंदरीत त्यांचा बोलविता धनी ती असावी असं वाटणं साहजिकच आहे. " त्याच्या मायला.... म्हणजे मी अशी काळे कपडे घालून अंधारात बसली आहे. कुणालाच माझा चेहरा दिसत नाहिये आणि हे सगळे वीर तिथे उभे आहेत. मी स्क्रीनवरती अज्जुकाची कमेंट वाचतेय.. जोरजोरात हसतेय आणि मग मूर्ख नं१.. तुम ये लिखो. नं २ तुम वैसा लिखो अशा सूचना करतेय.. ते सगळे "येस मेडेम " म्हणतायत.. मग मी "कौन है जो नंदिनीसे पंगा लेगा,," असा डायलॉग हाणतेय. वर या सगळ्या जीत कि खुशी मधे जश्न चालू झाला आहे. आणि माझ्या वीरानी पकडून आणलेला रितिक रोशन "धूम मचाले नाचतोय" अशी एक फ़िल्मी कल्पना बराच वेळ माझ्या मनात रेंगाळत होती. मान गये अज्जुकाजी.. कल्पनाशक्ती तर तुमची धावतेय भन्नाट. त्यानंतर Duplicate id वगैरेचा घोळ सुरू झाला. मला कामासाठी परत रात्रभर ऑफ़िसमधे मुक्काम करणे गरजेचे होते. रात्रभर काय करायचे म्हणून परत कथा कॉपी केली आणि पुढची दोन पोस्ट टाकली. मला वाटले की विषय संपेल पण नाही तो चालूच होता. चालू राहिलही. मला त्यात interest नाही. खरं तर मी कथा संपल्यावर बोलणार होते... पण admin आवरतं घ्यायला सांगितलय.. म्हणून हा पोस्टप्रपंच... मी लेखिका नाही.. पण मला गोष्ट सांगता येते. प्रत्यक्ष ऐकाल तर इथे वाचण्यापेक्षाही चांगली वाटेल.. ही आत्मस्तुती नाही. सत्य आहे. रेडीओचा तीन वर्षाचा अनुभव आहे. त्यामुळे प्रतिक्रिया नेगतीव्ह येवो किंवा पॉझिटीव्ह... मला वाचकाची कमी नाही.. मी मुळात लोकप्रियतेच्या पलिकडे यायला तयार नाही. मी जशी आहे तशी लिहिणार. उगाच एखादं क्लासिक लिहिण्यात मला interest नाही. माझ्या वाचनाने एका जरी वाचकाला समाधान मिळालं तरी तेवढे यश मला पुरे. मला स्वत्: कडून फ़ार अपेक्षा नाहित्त. पण सर्व मायबोलीकरानी दाखवलेलं प्रेम आणि माया यासाठी धन्यवाद. आणि सर्वात जास्त धन्यवाद, अज्जुकाला "आपहीने तो ये नजारा हमे दिखाया.. शुक्रिया..." ता.क. हे एवढे लिहिण्यापेक्षा कथा पूर्ण केली असती तर बरे झाले असते ना....
|
Meggi
| |
| Friday, April 20, 2007 - 10:02 am: |
| 
|
नंदिनी, तुझ्यात खूप potential आहे. तुझ्या कामातुन आणी व्यापातुन बाहेर आलीस की आरामात कथा लिही. तुझ्या कथेची वाट बघु आम्ही. तू तुझं मन मोकळं केलसं हे खूप छान केलस.. रेहानला लवकर बर वाटु दे.
|
Shonoo
| |
| Friday, April 20, 2007 - 12:20 pm: |
| 
|
नंदिनी " मला वाचकाची कमी नाही.. मी मुळात लोकप्रियतेच्या पलिकडे यायला तयार नाही. मी जशी आहे तशी लिहिणार. उगाच एखादं क्लासिक लिहिण्यात मला इन्तेरेस्त नाही. माझ्या वाचनाने एका जरी वाचकाला समाधान मिळालं तरी तेवढे यश मला पुरे. मला स्वत्: कडून फ़ार अपेक्षा नाहित्त. " हे अगदी माझ्या मनातलं बोललीस. प्रत्येकाने स्वत: ठरवावं की त्याला वा तिला कशा प्रकारचं लेखन करायचंय. सगळेच लेखक एका प्रकाराचं लिहायला लागले तर वाचकांचं काय? लवकर गोष्ट पूर्ण करशील अशी आशा आहे. आणि तुझ्या व्यक्तिगत अडचणींवर त्वरित मात करण्यासाठी शुभेच्छा.
|
Zakki
| |
| Friday, April 20, 2007 - 12:38 pm: |
| 
|
नंदिनी, मी तर अनेकदा म्हणत असतो, की मायबोलीवरील 'चर्चा' म्हणजे एखाद्या तुफान विनोदी नाटकाची किंवा सिनेमाची गोष्ट होऊ शकेल! केवळ गोष्ट कशी लिहावी या पासून सुरुवात करून एक पूर्ण दोन अंकी नाटक (फायनल ड्राफ्ट) उभे राहिले, नि गाजले. मग इथे तर काय, संवाद लिहून झालेच आहेत, आता फक्त व्यक्तिरेखा उभ्या करायच्या. एक शिवी देणारी मुलगी, एक उगीचच बाजूला बसून नुसती commetary करणारा म्हातारा, अश्या अनेक व्यक्तिरेखा पण इथेच आहेत. कधी लिहीता मग नाटक अथवा सिनेमा? तुम्ही नि अज्जुक्का मिळूनच लिहा, म्हणजे मग कुणीच कुणावर टीका करायला नको.

|
Lukkhi
| |
| Friday, April 20, 2007 - 12:39 pm: |
| 
|
मी मुळात लोकप्रियतेच्या पलिकडे यायला तयार नाही. मी जशी आहे तशी लिहिणार. उगाच एखादं क्लासिक लिहिण्यात मला इन्तेरेस्त नाही. अगदी अगदी... इथे आम्हालाही कुठे इंटरेस्ट आहे क्लासिक वाचण्यात... नंदिनी, तुम्ही जसं लिहिताय त्यामुळे आमचं खूप मनोरंजन होतं... लवकर लवकर पुढचे भाग येउद्यात (किंवा गोष्ट शेवटपर्यंत लिहून झाल्यावर एकदमच पोस्टा... कसेही...).
|
Mansmi18
| |
| Friday, April 20, 2007 - 1:21 pm: |
| 
|
(हे माझे शेवटचे पोस्ट्-- नन्दिनी तुम्ही "डेलि सोप" टाईप, रोमन्टिसिस्म आणि प्रि-मॉडेर्निस्म टाईपच लिहा हो (म्हणजे १८६० च्या आधीचे वगैरे अधिक माहितीसाठी आधीचि पोस्ट्स चाळा). आम्ही "बन्दिनी", "वहिनीसाहेब" आणि नवीन गोडगोड "अभिलाषा" वगैरे बघणारी मन्डळी आहोत. आम्हाला ते सोडुन "क्लसिक" वगैरे काही कळणार पण नाही.(अपवादान्नी स्वत:ला वगळावे..उगाच त्यावर मेसेजा-मेसेजी नको). पुलनी चान्गल्या पुस्तकाची व्याख्या केली आहे "जे वाचत रहवेसे वाटते ते चान्गले पुस्तक." त्याप्रमाणे तुमची कथा वाचत रहावी अशी आहे. त्यामुळे पुढच्या भागाची उत्सुकता आहे.(तो अभिजित तुमचा लग्न झालेला न निघो हाच घोर लागला आहे.) क्रुपया अपडेट करत रहा. पुलन्च्या खिल्ली मधे त्यानी पुणेकर होण्यामधील एक अट सन्गितली आहे. "प्रत्येक बाबतीत मतभेद करायला शिका. म्हणजे आपण कोण आहोत, आपला शैक्षणीक दर्जा काय, एकन्दर कर्त्रुत्व काय हे विसरुन मत ठण्कावता आले पाहिजे. उदा. "अमेरिकेची आर्थिक घडी नीट बसवण्याचा खरा मार्ग कोणता? यावर आपण पुणे महानगरपालिकेत उन्दीर मारायच्या विभागात कारकून आहोत हे विसरुन मत ठणकावता आले पाहिजे." तुमच्या लिखाणावर अशा पुणेकरान्च्या प्रतिक्रियाना आपले मानुन सोडुन द्या.(मी स्वत:ही पुणेकर आहे सो क्रुपया इतर पुणेकरानी मला क्षमा करा.) पत्रा जरा मोठे झाल्यबद्दल क्षमस्वा. लेखनसीमा................
|
Ashwini
| |
| Friday, April 20, 2007 - 2:00 pm: |
| 
|
मी या विषयावर काहीही लिहीणार नव्हते. वाद घालण्यापेक्षा दुर्लक्ष करावे अश्या मताला मी आजकाल आले आहे. या सगळ्या गदारोळात मी एकदासुद्धा अज्जुकाला म्हंटले नाही की बाई, तुझे शब्द चूकीचे होते. फक्त नंदिनी कथा सोडून द्यायला निघाली तेंव्हा तिला लिहीण्यासाठी encourage करणे मला गरजेचे वाटले. पण फार वेळा ऐकून घेतले की मला negative प्रतिक्रिया पचवता आली नाही म्हणून. यावर फक्त एकदा हे उत्तर देणार आहे आणि परत मी वादाच्या बाहेर. अज्जुका, वरती सगळे जण (केवळ एक दोन तुझे मित्र वगळता) तुला सतत सांगत आहेत की, बाई ग, प्रश्न negative प्रतिक्रियेचा नाही तर जी भाषा तू वापरतेस तिचा आहे. तरी पुन्हा पुन्हा लोकांना negative बोललेले आवडत नाही फक्त गोड गोड प्रतिक्रियाच आवडतात हे लिहीणे म्हणजे वेड पांघरून पेडगावला जाण्यासारखेच नाही का? त्या दिवाळी अंकात तू माझ्या लेखावर जी प्रतिक्रिया दिली होतीस त्यावरही मी तुला स्वतःला उद्देशून काही म्हंटलं नव्हतं. फक्त तू मांडलेल्या मुद्द्यांना उत्तर दिले होते. कारण मला तुझ्याशी वाद वाढवायचा नव्हता. पण याचा अर्थ असा नव्हे की कुणीही काहीही बोललेले मी ऐकून घ्यावे. पण कळस म्हणजे इथे तू लिहीले आहेस की त्या लेखिकांना negative प्रतिक्रिया आवडली नव्हती आणि त्यांनी तसे स्पष्ट म्हंटले आहे. हा शुद्ध मानभावीपणा झाला. तुझी प्रतिक्रिया आणि मी दिलेले उत्तर अजून तिथे आहे. तुझी प्रतिक्रिया मला आवडली नाही हे मी कुठेही म्हंटले नाही. पण याचा अर्थ तू मांडलेल्या मुद्द्यांचे खंडन मी करू नये का? तुझ्या प्रतिक्रिया फेकून देण्यासारख्या नसतात असे तूच म्हणालीस तेंव्हा ते वाचकांनाच ठरवू दे इतकाच उल्लेख मी केला होता. आता या चर्चेविषयी, वरती पण एकदा तू लिहीले होतेस की त्या लेखिकांना negative प्रतिक्रिया पेलल्या नाहीत. तेंव्हाच उत्तर देण्याची उर्मी उफाळून आली होती पण मी प्रयत्नाने स्वतःला रोखले. तो ताशेरा ignore करावा असे ठरवले. पण किती गप्प बसावे याला मर्यादा आहेत. आता, 'त्या लेखिकांना negative प्रतिक्रिया पेलल्या नाहीत', 'अश्विनीने मनात अढी धरली' हे personal attack नाहीत का? नाहीतर personal attack ची तुझी definition काय आहे मग? केवळ तू म्हणतेस म्हणून तुझ्या लेखनात personal attack , वैयक्तिक टीका नाहीत, हे कसे मानायचे? तुझे लेखन वाचून तर तसे अजिबात वाटत नाही. आणि मी मनात अढी धरली याला पुरावा काय आहे? एका शब्दाने आजपर्यंत मी तुला काही बोलले आहे का? केवळ तू इतरत्र लिहीलेल्या गोष्टींना कधी मी वाहवा केली नाही म्हणून? आता खरच मला ते नाही आवडले. पण आवडले नाही तर मी गप्प बसण्याचा मार्ग पसंत करते. कदाचित तुझ्या दृष्टीने तो मार्ग योग्य नसेलही. भले मग त्या लेखकांच्या साहित्यिक आणि वैचारिक प्रगतीला साहाय्यभूत न होण्याचे पातक मी करत असेनही कदाचित, पण हा माझा दृष्टीकोण झाला. तुझा तसा असावा असे माझे म्हणणे नाही. तू इतरांना केलेल्या टीकेला त्यांनी उत्तर दिले तर ती टीका त्यांना घेता येत नाही, आणि तुझ्यावर कुणी टीका केली तर तो त्यांचा पोटशूळ, हा कुठला न्याय? आणि मला तुझ्याविषयी कुठलाही पोटशूळ असण्याचे कुठलेच कारण नाही. कारण माझे यश हे तुझ्या यशापेक्षा कुठल्याही अर्थाने कमी आहे असे मला वाटत नाही.
|
Divya
| |
| Friday, April 20, 2007 - 3:21 pm: |
| 
|
१९ april च्या पोस्तची लिन्क दिसत नहीये... /hitguj/messages/46/124954.html?117699770
|
बाप रे! एवढा वाद झाला आणि मला पत्ताच नाही? गेली साधारण दोन वर्षं मी सातत्याने मायबोलीवर कविता लिहीते आहे. त्या दोन वर्षांत, तसंच गज़ल कार्यशाळेत जे अनुभव आले, त्यावरून आणि हा वरचा सगळा वाद वाचून काही जाणवलेले मुद्दे: १. ' लेखन हे स्वांतःसुखाय असतं' या दाव्याला फारसा अर्थ नाहीये. जर ते तसं असतं, तर तुम्ही आम्ही पोस्ट का केलं असतं? २. कुठल्याही लेखनात व्यक्त होण्याची उर्मी, मांडायचा असलेला विचार आणि तो मांडण्याची पद्धत या तीन बाबी महत्त्वाच्या असतात. नवोदित लिखाणात उर्मी हा भाग जास्त प्रभावी असतो तर सराईत लिखाणात पद्धतही refine होत गेलेली दिसते. ३. कुठल्याही लेखनावर प्रतिक्रिया देताना या विचार मांडण्याच्या पद्धतीबाबत अश्या प्रकारे चर्चा व्हावी की त्यामुळे ती व्यक्त होण्याची उर्मी मारली जाऊ नये, हे माझं वैयक्तिक मत. ४. कोणी कुठल्या विषयावर लिहावं, किंबहुना कोणाला कोणता विषय / विचार त्यावर लिहीण्याइतका भिडावा ह्यावर दुसरा कोणी ताशेरे कसे काय ओढू शकतो? मी आणि माझ्या मैत्रिणी रोमँटिक नाही आहोत, तेव्हा तुम्हीही होवू नका, हा नक्की काय मुद्दा आहे? तुम्हाला तथाकथित contemporary विषयावर लिहायला कोणी बंदी केली आहे का? ५. मी अज्जुकाचं लिखाण फारसं वाचलेलं नाही. जे वाचलंय त्यात मला एकतर रोमँटिसिझम (ओठांवरची लिपस्टिक आणि त्यामागे दडवलेले उमाळे, किंवा प्रत्येकाचं आपलं आपलं वादळ, इ.) दिसला किंवा नुसतीच बंडखोरीसाठी बंडखोरी ( आमची ' मारून' ( ??) ठेवणार्या क्रिएटिविटीच्या भुता..) तरी दिसली. आता अज्जुका स्वतः अजिबात लिहीतच नसती, नुसतीच समीक्षा करत असती तर हा मुद्दा आला नसता. पण आपण स्वतः रोमँटिक लिहीत असताना दुसर्याला लिहू नका म्हणण्याला काय अर्थ आहे? ६. बाकी वर काही जणांनी कार्यशाळेतील अभिप्रायांबद्दल ते biased असल्याचं म्हटलंय. त्यांनी अजूनही त्यांची निर्भीड मतं ( म्हणजे विचार मांडण्याची पद्धत आणि त्यात काय सुधारणा करता येईल याबद्दल मार्गदर्शन) तिथे जरूर मांडावीत असं मी त्यांना आवाहन करत आहे. केवळ छान छान म्हणण्याला काही अर्थ नाही हे जितकं खरं, तितकंच नुसतं ' हे काही खास नाही, ते काही विशेष नाही' अश्या प्रतिक्रियांनी तरी नक्की काय साध्य होतं?
|
चला आता सर्वांचे बोलून झालेय असे वाटते. कुणाकडे नविन मुद्दा नसेल तर वैयक्तिक धूळफ़ेक सुरु न करता हा विषय थांबवायला हरकत नसावी..
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|