Mahesh
| |
| Tuesday, April 10, 2007 - 4:20 am: |
| 
|
ड्रग्ज को ड्रग्ज, गुन्हे को गुन्हा नही तो क्या भगवान कहोगे ? तुम्ही म्हणताय ते आपल्याकडे अमलात आणायचे झाले तर त्याचे काय काय परीणाम होतील याचा विचार केला आहे का ? Halland चे लोक असतील सुजाण नागरिक. आपल्याकडे मानसिकता एवढी विचित्र आहे की या गोष्टी खुल्या केल्या तर त्याच्यापायी प्रचंड मोठी लोकसंख्या झपाट्याने विनाशाच्या खाईकडे गेल्याशिवाय रहाणार नाही असे वाटते. आणी वर म्हणायला कमी करणार नाहीत की बंदी नाहीयेना मग आम्ही कसेही वागू.
|
झक्की.. मी सभ्य आणि सुशिक्षीत नाही. त्यामुळे तो प्रश्नच उद्भवत नाही. माझी जशी बोलीभाषा आहे तसेच मी लिहिते उगाच मानभावीपणे लिहिणं पटत नाही. आयला मायला हल्ली शिव्या राहिल्या नाहीत.. आणि अजून मी इरसाल शिव्या मायबोलीवर लिहिल्या नाहीत.. ड्रग्स मुक्त करा हे बोलण्या आधी माझा एक सल्ला आहे पटला तर घ्या... कधीतरी व्यसन मुक्ती केंद्रात जाऊन ड्रग्ज च्या विळख्यात सापडलेल्या मुलाची अवस्था बघा त्याच्या आईवडीलाची स्थिती बघा.. ड्रग्ज वाईट आहेत हे घेणार्याला सुद्धा माहित असते. हो, अगदी पहिल्यादा घेणार्याला सुद्धा.. त्यामूळे प्रबोधन वगैरे चा परिणाम होत नसतो. ड्रग्स विकणार्याना शिक्षा कशी करणार जर ड्रग्स कायदेशीर केले गेले तर...
|
Mahesh
| |
| Tuesday, April 10, 2007 - 7:41 am: |
| 
|
नंदिनी, तुम्ही जरी सभ्य आणी सुशिक्षित नसलात तरी मायबोली आहे. मला मायबोलीचे या कारणासाठी खरोखर कौतुक वाटते की त्यांनी भाषेच्या सभ्यतेचे संकेत पाळण्याचा खुप चांगला प्रयत्न केला आहे. च्यायला मायला या शिव्या राहिल्या नाहीत हे तुमचे मत असेल. पण मला नाही वाटत अजुनही मराठीमधे सर्रास कोणी असे बोलत असेल. निदान मी तरी नाही. आणी ईरसाल शिव्या लिहिल्यात तर वेगवेगळ्या क्रमांकांचे नेमस्तक येऊन तुम्हाला समज देतील. असो विषयांतराबद्दल क्षमस्व...
|
Bee
| |
| Tuesday, April 10, 2007 - 8:52 am: |
| 
|
'च्या आयला' हे मी इथे कितीवेळा वाचले आहे. आयला ऐवजी मायला शब्द वापरून काही बदल झालेला नाही.. मलाही अशी भाषा आवडत नाही फ़क्त म्हणणे इतकेच की हे फ़ार पुर्वीच लक्षात यायला हवे होते.
|
बी,, हा भाषेमधला फ़रक आहे. कारण माझ्या क्षेत्रात बरेच जण ही भाषा वापरतात. आणि ती अंगवळणी पडून जाते. त्यातही मराठी ही मातृभाषा नसल्यामुळे खूप उशीर शिकले आहे. त्यानंतर हिंदी इंग्रजी असे बरेच संस्कार झालेले आहेत. त्यामुळे हे असंच बोलायची सवय झाली आहे. माझं पूर्णपणे बरोबर आहे असं म्हणत नाही. पण प्रत्येक बोलीभाषेचा एक पंच असतो, मी कोकणात वाढल्यामुळे तिथे हे मी ऐकलेले आहे. त्यामुळे कदाचित तुम्हाला खटकत असेल. तर मी दिलगीर आहे.
|
Bee
| |
| Tuesday, April 10, 2007 - 10:05 am: |
| 
|
नंदिनी, हो तुझे एकदम बरोबर आहे. बोलीभाषेत असे शब्द सर्रास चालतात. त्याशिवाय भाषेला गोडी येत नाही. पण काही शब्द आपण कुठेही वापरत नाही. मायबोलिवर खूप निर्मळ शब्दप्रयोग केले जातात. त्यामुळे खटकले. पण तू इतके काही मनाला लावून घेऊ नकोस. मला म्हणायचे होते झक्की तुला आता बोलताहेत त्या ऐवजी खूप पुर्वीच कुणाला का नाही बोललेत ते.. खर तर ते पोष्टींग तुझ्यावर आक्षेप घेणार्यांसाठी होते.
|
Zakki
| |
| Tuesday, April 10, 2007 - 12:59 pm: |
| 
|
अहो नंदिनी, एव्हढे मनाला लावून घेऊ नका. आता मला काय वाटले ते लिहीले. तश्या मी अनेऽक गलिच्छ शिव्या कित्येकदा ऐकल्या आहेत. शिवाय लोकप्रिय इंग्रजी सिनेमे बघितले की घाणेरडी भाषा कायमच ऐकू येते. पण ते मला आवडत नाही म्हणून मी लिहीले. त्यातून माझा भारतातील तरूण पिढीशी किंवा त्यांच्या बोलीभाषेशी संबंध राहिलाच नाही, त्यामुळे जरा लागले एव्हढेच. तुम्हाला दुखवण्याचा किंवा नविन BB उघडण्याचे सूतोवाच करण्याचा इरादा नव्हता.
|
Lalu
| |
| Tuesday, April 10, 2007 - 1:10 pm: |
| 
|
नंदिनी तू दिलगिरी व्यक्त केली आहेस ते ठीक आहे पण तुझे काही मुद्दे पटले नाहीत त्याबद्दल आता विषय निघालाच आहे तर लिहीते. >>माझी जशी बोलीभाषा आहे तसेच मी लिहिते उगाच मानभावीपणे लिहिणं पटत नाही. आयला मायला हल्ली शिव्या राहिल्या नाहीत.. आणि अजून मी इरसाल शिव्या मायबोलीवर लिहिल्या नाहीत आता 'ते शब्द सर्रास वापरले जातात म्हणून त्या शिव्या राहिल्या नाहीत' अशा प्रकारचे समर्थन मी ते वापरणार्यांकडून ऐकले आहे. असेल तुमची भाषा तशी, उत्स्फूर्तपणे तसे शब्द बोलताना वापरले जात असतील पण लिहिणे आणि बोलणे यात फरक आहे. लिहिताना प्रतिक्रियेची तीव्रता कमी होते असं माझं मत आहे (रागारागाने लिहिलं नसेल तर ), मग असे शब्द त्यात येणं हे जाणूनबुजून केल्या सारखं वाटतं. काही वेळा काही ठिकाणी एरवी उत्स्फूर्तपणे जसे वागतो तसे वागायचे नसते. याला 'शिष्टाचार' म्हणतात, मानभावीपणा नव्हे! वर महेश नी जे लिहिले आहे ते मला पटले. बी, 'काही शब्द आपण कुठेही वापरत नाही' हे बरोबरच आहे. झक्की आधी बोलले नसूदेत, आता तरी बोलले ना? शिकलेल्या मुली (हो मुलीच!) शिव्या का देतात (आणि लिहितात पण! )हे मला न उलगडलेले कोडे आहे. वेगळा बीबी उघडायचा का?
|
हे कल्चर बिबीमधे चालू आहे त्यामुळे नवीन बिबीची गरज नाही वाटत. नंदिनी या आता शिव्या राहिल्या नाहीत म्हणजे काय? ज्या गोष्टी पूर्वी जशा होत्या तशाच असणार ना. हे म्हणजे दारू पिऊन रस्त्याच्या कडेला पडणे आता तितके वाईट राहिलेले नाही असे म्हटल्यासारखे आहे. कोकणात हे शब्द खरंच सर्रास (म्हणजे शिव्या नाहीत अशा पद्धतीने) वापरतात का? तुझ्या घरातल्या आधीच्या पिढीतल्या बायका पण हे शब्द वापरतात का? तसे असेल तर तू म्हणतेस ते ग्राह्य धरायला हवे. पण तरीही... मुलींनी हे Male Gender specific शब्द वापरू नयेत. जर मुलांना मुलींसारखे बोलायची (जसे नको बाई) लाज वाटत असेल तर आपण तरी का मुलांसारखे बोलावे? एखादा मुलगा मेलं हा शब्द वापरतो तेंव्हा मला जितके विनोदी वाटते तितकेच एखादी मुलगी च्यायला मायला म्हणते तेंव्हा वाटते. MHO
|
daru piun rastyachya... sm..
|
Zakki
| |
| Tuesday, April 10, 2007 - 5:58 pm: |
| 
|
अगदी रस्त्याच्या नाही, पण घरातल्या घरात कुठेतरी कोपर्यात पडलेले लोक पुष्कळदा पहाण्यात येतात! अर्थात् शहाण्या लोकांना कळते की आपण तसे करू नये, नि ते वेळीच थांबतात.
|
Bee
| |
| Wednesday, April 11, 2007 - 2:06 am: |
| 
|
जर नविन बीबी उघडायचा असेल तर मी हं
|
Sakhi_d
| |
| Tuesday, April 17, 2007 - 5:19 am: |
| 
|
>>शिकलेल्या मुली (हो मुलीच!) शिव्या का देतात (आणि लिहितात पण! )हे मला न उलगडलेले कोडे आहे.>> लालु, शिव्या देणे किंवा लिहिणे वाईटच आहे. पण तुम्ही लिहीले आहे त्यावरुण असे वाटते की शिव्या मुलींनी दिल्या तर वाईट आणि मुलांनी दिल्या तर चांगल्या.... तुमच्या सारखे शिकलेले लोक असे बोलतात / लिहीतात तेव्हा वाईट वाटते... इतके शिकल्यावरही असे?? शो. ना. हो. बाकी पटले नसेल तर दिवा घ्याच.... पण जरा मोठा
|
>> शिव्या मुलींनी दिल्या तर वाईट आणि मुलांनी दिल्या तर चांगल्या.... मी विचारच करत होते की इतका ज्वलनशील मुद्दा अजून कुणाच्या लक्षात कसा नाही आला BTW सखी मी माझ्या पोस्टमधे हे थोडेसे explain करायचा प्रयत्न केलाय पण.. पण जाऊ दे लालूच्या वाक्यावर लिहीलेय तर तिला आधी चान्स. मी मग लिहीन.
|
Sakhi_d
| |
| Tuesday, April 17, 2007 - 7:30 am: |
| 
|
>>मुलींनी हे Male Gender specific शब्द वापरू नयेत. जर मुलांना मुलींसारखे बोलायची (जसे नको बाई) लाज वाटत असेल तर आपण तरी का मुलांसारखे बोलावे?>> सन्मी तु लिहीलेले पटले आहे पण म्हणुन मुलं करतात ते बरोबर आणि तिच गोष्ट मुलींनी केली तर चुक हे बरोबर नाही.
|
Meggi
| |
| Tuesday, April 17, 2007 - 8:52 am: |
| 
|
मुलींनी हे Male Gender specific शब्द वापरू नयेत. जर मुलांना मुलींसारखे बोलायची (जसे नको बाई) लाज वाटत असेल तर आपण तरी का मुलांसारखे बोलावे?>> मुलं साडी नेसत नाही, पण आपण नाही का jeans घालत..
|
सखी तू लिहीलेयस त्यावर लिहायचा मोह होतोय पण... मेगी अशा गोष्टी काळाच्या कसोटीवर पारखून घेतलेल्या असतात. जीन्स सुटसुटीत असतात म्हणून आपण त्या वापरतो. त्यातही मुलींसाठी बदल केलेले असतातच की. तुम्ही वेस्टसाईड सारख्या दुकानात गेलात तर खास मेन्स सेक्शन मधे जाऊन खरेदी करता की काय?
|
Rajankul
| |
| Tuesday, April 17, 2007 - 4:32 pm: |
| 
|
च्यायला नाव घेउन लिहिणार्या ला तो " तो " आहे म्हणुन माफ़ी आणि आयला म्हणनारी " ती " आहे म्हणुन लगेच सुरु झक्कि महराज की जय हो, भैताड कुठले!
|
Mahesh
| |
| Tuesday, April 17, 2007 - 5:16 pm: |
| 
|
राजनकुल, तुम्ही म्हणताय त्या ID बद्दल मी admin ला लिहिले होते. तो ID खरेच शोभत नाही मायबोलीवर, पण त्यावर काही action घेतली गेली नाही. BTW , यामागे ज्यांचा हा ID आहे त्यांना दुखावण्याचा हेतू नाहीये. सद्ध्या झी मराठीवर एक जुनी मालिका पहायला मिळते. लहान मुलांची नायक नावाची मालिका. त्यामधे दिलिप कुलकर्णीने वडिलांची भुमिका केली आहे. परवा त्यातला एक भाग पहात होतो, मुलांच्या पळण्याच्या शर्यतीबद्दल होता. त्यामधे शाळेतली मुले मधे मधे सर्रास (आयला) असे म्हणत होती. मला सखेद आश्चर्य वाटले. मुलांची नसून लेखक आणी दिग्दर्शकाची चूक आहे. पण आजकाल रेमिक्स, ई च्या युगात हे असे शब्द लोकांना अगदी yes, no, thank you प्रमाणे साधे वाटत असतील.
|
Meggi
| |
| Wednesday, April 18, 2007 - 3:51 am: |
| 
|
संघमित्रा, अग मी उगाच TP म्हनुन लिहिलयं... मुलं मुलीं प्रमाणे अजिबात वागत नाहित.. मी कुठलाहि मुलगा ladies छत्री मधुन जाताना नाही बघितला.. किंवा ladies रुमाल वापरतांना नाही बघितला.. पन मुलिंना अस जास्त फ़रक पडत नही.. चांगलं किंवा वाईट म्हणत नाही, पण एक observation आहे.
|