|
Zakki
| |
| Wednesday, December 12, 2007 - 5:08 pm: |
| 
|
परवा मराठी सिनेमाच्या प्रसंगी कुणितरी भाषणात म्हणाले, श्वास सारखे मार्केटिंग सर्वच मराठी सिनेमांना मिळाले तर मराठी सिनेमांना चांगले प्रोत्साहन मिळेल. काहो, श्वासला काही आर्थिक फायदा झाला का? त्या प्रोत्साहनानंतर त्यांनी कुठला मराठी सिनेमा काढला?
|
Svsameer
| |
| Wednesday, December 12, 2007 - 6:21 pm: |
| 
|
असामी २००० चा अंक दिसतोय कि नीट. फक्त संपादक मंडळ ची image दिसत नाही आहे
|
Asami
| |
| Wednesday, December 12, 2007 - 7:50 pm: |
| 
|
मी FF मधे बघतोय रे. त्यात दिसत नाही
|
Zakki
| |
| Thursday, December 27, 2007 - 2:56 pm: |
| 
|
महापालिकेतील शाळेतील मुलांना 'सुगंधी' दूध देण्याचा ३०० कोटी रुपयांचा प्रस्ताव पास करून घेतला, नि ते दूध प्यायल्याने काही मुलांना विषबाधा झाली. आता कुणि तरी याची चौकशी करावी. ते दूध कुणि पुरविले? त्या व्यक्तीला किती फायदा झाला? तो प्रस्ताव पास करून घेण्यात कुणा कुणा आमदारांचा हात होता? त्यांचे नि दूध पुरवणार्यांचा काय संबंध होता (नातेवाईक, मित्र, भागीदार् इ.), विरोध कुणि केला? इ. माहिति जनतेपुढे आली पाहिजे. मग काही गैर कारभार आढळल्यास संबंधित व्यक्तींवर खटला भरला पाहिजे. अर्थात्, असे करणारे पत्रकार थोडे, बहुतेक सगळे लोकसत्तेचे, म. टा. चे नि इतर फक्त सिनेमानट नट्या यांच्या मागे!
|
Runi
| |
| Thursday, December 27, 2007 - 6:13 pm: |
| 
|
मी आत्ताच ईथे ही म.टा. ची बातमी वाचल्यावर तो अंक बघीतला. तिथे प्रमुख संपादन कोणीतरी सचिन परब यांचे आहे. थोड्या शोधाशोधीनंतर मला या माणसाचे Orkut profile मिळाले. कोणाला माहीत आहे का की हेच ते परब? (उगाच चुकीच्या माणसाला नको काही लिहील जायला) त्यांना scrap टाकुन काही होईल का? सगळ्या मायबोली वाल्यांनी तिथे scrap ( email पण आहे त्या profile वर) टाकायला चालु केले पाहीजे.
|
Dineshvs
| |
| Friday, December 28, 2007 - 3:00 am: |
| 
|
झक्कि, हे शाळेतील मुलाना खाऊ हे प्रकरण बरेच जुने आहे. काहिही पुरवायचे म्हंटले तर त्या बाबतीत इतर विचारच केला जात नाही. आधी खिचडि पुरवत असत, ती शिजवायची कुणी, त्याला भांडी, जळण कुणी पुरवायचे, ह्याचा विचारच झाला नव्हता. दूधाच्या बाबतीतही, वाहतुकीची आणि साठवणुकिची व्यवस्था नीट केली नव्हती. फार पुर्वी सुकडी नावाचे कोरडे अन्न देत असे, चिक्कीचाही प्रयोग झाला होता, पण या सगळ्याच योजनांचे व्यवस्थापन नीट न झाल्याने त्या बारगळल्या. आणि राजीव गांधी म्हणत असत त्याप्रमाणे, भारतात कुठल्याही सरकारी योजनेचा ८५ टक्के खर्च, वायाच जातो.
|
Zakki
| |
| Friday, December 28, 2007 - 1:29 pm: |
| 
|
किंवा कुणाच्या तरी खिशात जातो??!
|
Dineshvs
| |
| Friday, December 28, 2007 - 5:18 pm: |
| 
|
या सुकडी बाबत माझ्या जेष्ठ मित्रांचा अनुभव फ़ारच वाईट आहे. त्यानी स्वतः प्रयोग करुन, भाजलेल्या धान्याचे योग्य असे मिश्रण तयार केले होते. ते चविष्ठही होते. एका मराठी राजकिय नेत्यानी, त्याना प्रोत्साहन दिले. शाळाना पुरवायची योजना गळी उतरवली. त्यापुर्वी स्वतः त्यानी तो पदार्थ चाखुन बघितला होता. माझ्या मित्राने, मग मशिनरीची सोय केली. मजूर नेमले. कच्चा माल साठवला. आणि मग त्यात त्यांच्या हितशत्रुनी मोडता घातला. सगळी गुंतवणुक फ़ुकट गेली. तरी त्यानी पर्याय म्हणुन चिक्की पुरवायची तयारी दाखवली. त्याला आधी होकार मिळाला, मग परत ती योजना बारगळली. मग त्यानी या योजनेचे नावच टाकुन दिले. म्हणजे बघा अश्या योजनामधे ना मुलांचा फायदा ना उत्पादकांचा. फायदा कुणाचा, हे आपल्या सगळ्यानाच माहित आहे.
|
Farend
| |
| Friday, March 21, 2008 - 12:42 am: |
| 
|
मराठी कलांवतसुद्धा 'होळी खेळत' असल्याच्या बातम्या (या पानवर साधारण मधे पाहा) येत असताना सकाळच्या साईट वर ही होळी ची अस्सल मराठी 'टिमकी' दिसल्यामुळे होळीची खरी आठवण आली. ही टिमकी बर्याच दिवसांनी बघितली. बाकी महाराष्ट्रात सुद्धा "होळीचे रंग", "होळी खेळणे" वगैरे १५-२० वर्षांपूर्वी माहीत नसलेले शब्दप्रयोग बघून उत्तर भारताच्या होळीचा किती प्रभाव पडला आहे ते दिसते. कदाचित मराठी लोकांना ही रंगपंचमी पर्यंत थांबायचा कंटाळा येत असेल. पूर्वी वाघाचे वगैरे मुखवटे घालत ते होळीलाच का? लक्षात नाही. होळी म्हंटले की ते मुखवटे, टिमक्या, पुरण पोळी अणि रात्रीचे होळी, बोंबा वगैरे जाऊन हे आजकाल रंग खेळणे वगैरे कधी रूढ झाले काय माहीत! तसेच दुसर्या दिवशीची धुळवड आणि मग चार दिवसांनी रंगपंचमीला रंग हे असे आता कोठे साजरे होते का? नक्कीच होत असेल, पण प्रसिद्धी सगळी 'होळी खेळण्याला' मिळते असे दिसते
|
Psg
| |
| Friday, March 21, 2008 - 10:14 am: |
| 
|
फ़ारेंड, पुण्यात खूप ठिकाणी.. गणपति मंडळं, सोसायट्यांमधे आज, म्हणजे होळीच्या दिवशी संध्याकाळी होळी पेटते. इथे रंगपंचमीलाच रंग खेळतात, त्या दिवशी पाणीही दिवसभर असतं उद्याच, म्हणजे धुळवडीलाही रंग खेळण्याची पद्धत उत्तरभारतीय लोकांमुळे आली आहे, मुंबईतही उद्याच रंग खेळणार, पण पुण्यात रंग रंगपंचमीलाच खेळतात. संध्याकाळी होळीसमोर वाजवायला टिमक्या, ड्रम वगैरे बाजारात आले आहेत. पिचकार्याही चिकार प्रकारात आहेत नैसर्गिक रंगांबद्दल खूप बोललं जात असलं तरी दुर्दैवानी वापरले मात्र ते घाणरेडेच रंग जातात
|
Pha
| |
| Friday, March 21, 2008 - 10:54 am: |
| 
|
>.नक्कीच होत असेल, पण प्रसिद्धी सगळी 'होळी खेळण्याला' मिळते असे दिसते फारेंडा, आपण आपल्या गोष्टींची टिमकी वाजवत नाही हा प्रॉब्लेम आहे. सांप्रतकाळात महाराष्ट्राने उत्तर भारताचे सांस्कृतिक मांडलिकत्व पत्करल्यागतच चित्र दिसत आहे (तसेही मनसबदारीकरता दिल्लीच्या तख्तासमोर स्वतःचा मान गहाण ठेवणं मराठी रक्ताला नवं नाही). आजचे वृत्तपत्रांचे अंक पाहिल्यावर, 'मटा'सारखी वृत्तपत्रे मुंबईतल्या हस्तिदंती मनोर्यांत बसून होळीचं रंगमाहात्म्य लिहून दाखवतायत असंच वाटतं. यावर उपाय एकच - आपण आपल्या गोष्टींचा माज करणे! आपण देशात असू नाहीतर परदेशात, आपल्या समाजातल्या लोकांना घेऊन सणवार आपल्या पद्धतीने साजरे करायचे.. आपले झेंडे आपणच नाचवायचे.
|
Dineshvs
| |
| Friday, March 21, 2008 - 12:47 pm: |
| 
|
माझ्या लहानपणापासून मुंबईत धुळवडीलाच रंग खेळले जातात. फ़क्त त्याच दिवशी सुट्टी असते ना ! रंगपंचमी ला परत कुठली मिळायला सुट्टी !!
|
हो माझ्याही लहानपणा पासुन होळीच्या दुसर्या दिवशीच रंगपंचमी. फक्त पुण्यात व आजुबाजुच्या भागात रंगपंचमीच्या दिवशी रंग खेळतात. बाकी बहुतांश महाराष्ट्रात होळीच्या दुसर्या दिवशी. (बुरा ना मानो होली है.)
|
Asami
| |
| Friday, March 21, 2008 - 7:06 pm: |
| 
|
काय राव, दोन्ही दिवस खेळा ना. एव्हढा मस्त सण , त्यात कसले तुमचे माझे करायचे. * ? बाकी होळीनिमित्त इतरांच्या नावाने बोंबा मारायचा वसा आपण सोडायचा नाही
|
Farend
| |
| Friday, March 21, 2008 - 10:48 pm: |
| 
|
लोकसत्ता मधे आलेला हा ही लेख पाहा
|
Runi
| |
| Saturday, March 22, 2008 - 12:16 am: |
| 
|
बरोबर दिनेशदा आणि केदार, आम्हीपण होळीच्या दुसर्या दिवशीच धुळवडीला रंग खेळायचो. आम्हाला रंगपंचमीला सुट्टी नसायची. मी हा प्रकार पुण्यातच बघीतला पहिल्यांदा की रंगपंचमीला रंग खेळतात धुळवडीला नाही.
|
Pha
| |
| Saturday, March 22, 2008 - 3:41 am: |
| 
|
>>बाकी बहुतांश महाराष्ट्रात होळीच्या दुसर्या दिवशी. (बुरा ना मानो होली है.) केदार, हे काही पटलं नाही बुवा. तुम्ही पुण्याखेरीज नाशकात जा, कोल्हापुरात जा, कोकणात जा, इंदुरात जा; रंग खेळण्याची पद्धत रंगपंचमीलाच असते. काल मटात वाचलं की लातुरात(मराठवाड्याच्या गाभ्यात) रंगपंचमीलाच रंग खेळतात. होळीच्या दुसर्या दिवशी धुळवडीला होळीच्या राखेच्या, मातीच्या गोळ्यांनी धुळवड खेळतात. एखाद्या हौदापाशी राख, माती कालवून त्या राड्यात एकमेकांना लोळवण्याचा मजेशीर खेळ असतो. कदाचित धुळवडीच्या अस्सल प्रकाराला डाउनमार्केट मानण्याचा न्यूनगंड शिरल्यानं किंवा ' जे जे उत्तर (भारतीय); उदात्त, उन्नत, महन्मधुर ते ते ' मानण्याचा भाबडेपणा शिरल्यानं असो, (प्रामुख्याने मुंबई परिसरात आणि आता थोडंफार महाराष्ट्रात इतरत्रही) धुळवडीला रंग खेळण्याची पद्धत पाळली जाते असं दिसतंय. किंवा दिनेश म्हणताहेत तसं सुट्टीची अडचण हेही कारण असू शकेल. असो. असामी म्हणतो तसं सण रिपीट मारायला काय हरकत आहे?? नाहीतरी आपण उत्सवप्रिय मंडळी शिवजयंत्याही वेगवेगळ्या पद्धतींनुसार वर्षातून दोन - तीनवेळा साजर्या करतोच की! (ता.क. : वर कोकण, नाशिक, कोल्हापूर, लातूर, इंदूर असे नामनिर्देश माझ्या अनुभवांना / माहितीला स्मरून केले आहेत. मला खात्रीशीर माहिती नाही याखेरीज नागपुराचा उल्लेख न करण्यामागे काहीही राजकीय / वैयक्तिक कारण नाही. परंतु, झक्कींच्या नागपुरात पुणेकरांप्रमाणे रंगपंचमीला रंग न खेळता होळीलाच खेळले जातात किंवा कसे, याबद्दल इतर नागपूरकरांकडून माहिती जाणून घ्यायला मला आवडेल. )
|
Zakasrao
| |
| Saturday, March 22, 2008 - 4:47 am: |
| 
|
फ़ कोल्हापुरात रंगपंचमीलाच रंग खेळतात रे. बरोबर आहे तुझ. उलट मी इकडे आल्यावर होळीच्या दुसर्या दिवशी रंग खेळताना पाहिलेले लोक बघुन जरा गोंधळात पडलो होतो. मला आठवतय की रंगपंचमीला सुट्टी असायची. आठवीपासुन बंद झाली ती सुट्टी.
|
Abhi_
| |
| Saturday, March 22, 2008 - 5:44 am: |
| 
|
फ अनुमोदन!! माझ्याही माहिती प्रमाणे सातारा, सांगली, कोल्हापूर वगैरे भागात रंगपंचमीच्या दिवशीच रंग खेळतात.. होळीच्या दुसरे दिवशी धुळवड खेळतात.. पण शहरापेक्षा ती छोट्या गावातूनच खेळली गेलेली मी बघितली आहे.. तसंही राजकारणी लोकांची धुळवड आणि रंगपंचमी हल्ली बाराही महिने सुरुच असते.. त्यामुळे त्यांच्याच दावणीला बांधलेल्या वृत्तपत्रांकडून किंवा वृत्तवाहिन्यांकडून काय अपेक्षा ठेवायच्या? बाकी असाम्यालाही अनुमोदन अनुमोदन दिलं आहे म्हणजे हि कंपूबाजी नाहिये.. तसं कुणाला वाटल्यास तो आ. बु. दो. स.
|
Ajjuka
| |
| Saturday, March 22, 2008 - 12:57 pm: |
| 
|
अगदी बरोबर जिथे जिथे उत्तर भारतीय पगडा जास्त आहे तिथे धुळवडीच्या दिवशी होळी खेळतात. जिथे मराठी लोक आहेत ते होळीपासून पाचव्या दिवशी रंगपंचमी खेळतात. आम्हाला सुट्टी पण रंगपंचमीलाच असायची. धुळवड खेळलेली कधी पाह्यली नाही ऐकलीये फक्त.
|
असाम्या अरे होळीला बोंब नाही मारनार तर कधी . बाकी केतकरांच्या लोकसत्तेत मराठी प्रेम पाहुन भरुन आले. ही ' राज ' चीच तर किमया नसावी ना?
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|