Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 19, 2007

Hitguj » Views and Comments » मायबोली-हितगुज » लिखाणावरील प्रतिक्रीया » Archive through April 19, 2007 « Previous Next »

Robeenhood
Wednesday, April 18, 2007 - 4:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या बी बी च्या आसपास एखादा ज्येष्ठ इसम घासलेटाचा डबा, काही बोळे आणि काडेपेटी घेऊन संशयास्पद रीत्या फिरताना दिसून आला आहे का हो?

Ajjuka
Wednesday, April 18, 2007 - 4:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी पाह्यलाय मी पाह्यलाय. हुडा अगदी जवळपासच आहे तो इसम. घासलेटाच्या बोळ्याचा वास पण येतोय इथपर्यंत. आणि त्या इसमाच्या वासावर येणारा अजून एक माणूस पण.. तुला माहितीये का रे तो कोण ते? साधारण अंगकाठी तुझ्यासारखीच आहे.. तुझा दुष्ट जुळा भाऊ तर नव्हे... :P

Arch
Wednesday, April 18, 2007 - 6:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका, तुला एक सांगू का? नाही सांगतेच. अग जेंव्हा कोणाला इथली एखादी कथा किंवा कविता किंवा कलेचा कोणताही अविष्कार आवडत नाही तेंव्हा लोक तस सांगतात. पण त्या सगळ्यांना इतर लोक एवढा जोरदार प्रतिकार करत नाहीत जेवढा तुला इथे केला गेला आहे. त्यालाही काही कारण असेलच न? may be तुझी प्रतिक्रिया abrasive वाटत असेल. जर बर्‍याच लोकांना ती तशी वाटत असेल तर त्यात थोड तथ्य असू शकेल, नाही का? मग थोडस mild शब्दात लिहायला काय हरकत आहे? खरं सांगू का, थोड्या मवाळ शब्दात सूचना केल्या न, तर लोक त्याला लगेच accept करतात. बघ पटतय का ते.

Zakki
Wednesday, April 18, 2007 - 6:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

prady , गेले ते दिन गेले. कमी काम पण पगार जास्त द्याल तरच नोकरीवर येईन म्हंटले तर त्यांनी खरच मला कमी काम नि जास्त पगाराची नोकरी दिली, शिवाय माझ्या सौ. लाहि ते कळले.त्यामुळे नोकरीवर आलेच पाहिजे!

तेंव्हा आता MBA कमीच. फक्त इथे ऑफिसमधे बसून दुपारी अंमळ झोप, व दिवसभर रॉकेलचे बोळे नि काड्यापेटी घेऊन इथे मायबोलीवर लिहितो. पण आता हळू हळू त्यात दुष्ट बदल होतील. उदा. आज झोपलो नाही! उद्या कदाचित् कामहि करावे लागेल!


Ajjuka
Wednesday, April 18, 2007 - 7:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बर आर्च, माझ्या वरच्या भयानक आणि जहाल भाषेचे मवाळीकरण करून दे मला.
BTW इथे असेही काहींनी म्हणलेय की वरच्या प्रतिक्रियेमधे आक्षेप घेण्यासारखे काही नाही. पण मी आणि अर्थातच माझ्या बाजूने बोलणारे लोक चूकच असणार तर आता द्याच मवाळ शब्द लिहून.
जगाला पटत नाही म्हणून आपल्याला जे योग्य वाटते ते करू नये. हीच philosophy अंगी बाणवायला हवी ना. त्यापेक्षा मग मायबोली सोडून गेलेले काय वाईट?


Zakki
Wednesday, April 18, 2007 - 8:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो अज्जुक्का, तुम्ही मायबोली सोडून जाऊ नका हो! मला तरी तुमच्या लिखाणात आक्षेपार्ह असे काही दिसत नाही. फक्त स्पष्टवक्तेपणा दिसतो.

खरे कुणालाच आवडत नाही. पण म्हणून सगळ्या गोष्टी साखरेच्या पाकात घालून कश्या खायच्या? मग फरक तो काय राहिला दोन निरनिराळ्या गोष्टींत? कोण वाचेल ते सगळे सारखे गोऽड गोऽड? त्याचा काही उपयोग नाही. जरा नावे ठेवली, ती सुद्धा लिखाणाला, व्यक्तिला नाही, तर अगदी लहान मुला सारखे (किंवा पुणेकरांसारखे) रडायला नको!


Savyasachi
Thursday, April 19, 2007 - 12:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुकाचे पोस्ट साधे होते. त्यात कुठेही टवाळी करण्याचा हेतू नव्हता असे मला वाटते. उगाच पराचा कावळा केला आहे. अज्जुका, एवढ्या तेवढ्याने (किंबहुना कशानेही) पळून (सोडून) जाणे तुला शोभत नाही :-)
आणि तू गेलीस तर भांडणे (सखोल चर्चा) कशी होणार? :-)


Bee
Thursday, April 19, 2007 - 2:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सव्यसाचीला नुस्त भांडातंडणात रस आहे :-)

Chyayla
Thursday, April 19, 2007 - 2:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला तरी तुमच्या लिखाणात आक्षेपार्ह असे काही दिसत नाही. फक्त स्पष्टवक्तेपणा दिसतो...

झक्की अहो मग हाच स्पष्टवक्तेपणा ईतरान्नीपण म्हणजे प्रतिक्रियान्वर प्रतिक्रिया देउन दाखवला असे तुम्हाला नाही का वाटत?.
काय म्हणाव... घरातल्या भान्डणान्चा राग मायबोलीवर निघतो की काय अशी शन्का येउ लागली आहे

सव्यसाची तुला काय भान्डण म्हणजे Entertainment Channel (मायबोली BB ) वाटले की काय?
दीवे घ्या दीवे....


Ajjuka
Thursday, April 19, 2007 - 7:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एवढे आनंदाने उड्या मारू नका.. मी मायबोली सोडून कुठेही जाणार नाहीये. काही जणांना मी जावेसे वाटत असेलही तर असूदेत. उनकी बलासे!! त्यांच्या नाकावर टीच्चून इथेच रहाणार मी. हा काय पहिला प्रयत्न नाहीये मायबोलीवरून मला हुसकावून लावण्याचा. व्यवस्थित पचवलेत सगळे प्रयत्न. ऑक्टोबर १९९९ पासून आत्तापर्यंत... मी जात नाहीये कुठे एवढ्यातच.
पण जर स्वतःला पटत असलं तरी सगळे सांगतायत म्हणून ऐकायची वेळ इथे आली मला तर जाईनही सोडून एवढंच...


Nkashi
Thursday, April 19, 2007 - 7:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका, अग तु original पुणेकर आहेस का? तुझ्या posts वाचुन वाटत..
anyways मला पुणेकर, मुंबैकर आणि "इतर कर" यात अडकायच नाही.

....काही जणांना मी जावेसे वाटत असेलही तर असूदेत. उनकी बलासे!! त्यांच्या नाकावर टीच्चून इथेच रहाणार मी.

Arch म्हणते तस हेही मवाळ शब्दात लिहिता आल असत की....

आणि "जगाला पटत नाही म्हणून आपल्याला जे योग्य वाटते ते करू नये." ही philosophy कोणाचीच नाही आहे... बहुदा नसावी, पण ती इतराना पटण्यासाठी / सांगण्यासाठी धारदार शब्दांची गरज नाही न?

<hope you'll take this in right sense>

Giriraj
Thursday, April 19, 2007 - 11:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चला! लेखकांनी प्रतिक्रियेनुसार लिखाणाच्या दर्जात चढ उतार माहीत होतच पण आता वाचकांच्या प्रतिक्रियेच्या दर्जातही बदल करण्याइतकी प्रगती निश्चितच झालिये मायबोलिची! :-)

Ajjuka
Thursday, April 19, 2007 - 11:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

होना.. आता वरच्या पोस्टवर काय शब्द वापरायचे हे मेल मधे लिहून पाठवा.
हे लोक म्हणजे असे आहेत की आता खोकला आला तरी म्हणतील अशीच का खोकलीस अश्य अश्य पद्धतीने खोकायला हवे होते.


Ajjuka
Thursday, April 19, 2007 - 12:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चला मला म्हणायचं ते झालं म्हणून आता (सगळं तोंडसुख घेतल्यावर) शेवटचे वाक्य... राईट सेन्स ने घ्या... पाहिजे तर लेफ्टने पण घ्या... घेऊ नका.. जहाल जहाल म्हणून ओरडत सुटा... तुमची मर्जी.

Pha
Thursday, April 19, 2007 - 12:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका, नंदिनीच्या लिखाणावरील तुझ्या मूळ प्रतिक्रिया वाचल्या (अर्थातच त्रयस्थपणे). तुझ्यामते तुझा हेतू केवळ लिखाणातील जे काही बरे - वाईट वाटले ते सांगण्याचा होता. पण त्यातील तुझी "Romanticism पुरे की आता. 1860's मधे संपला तो. या की थोडे वास्तवतावादाकडे किंवा अजून खूप पुढे या, post-modernism कडे. मुळात जरा लोकप्रियतेच्या पलीकडे या हो." ही वाक्यं त्रयस्थपणे वाचूनदेखील ओव्हरस्मार्ट वाटली. मायबोलीवरील कथाविषयांच्या मर्यादा काही वेळा प्रकर्षाने जाणवत असतीलही.. पण इथले बरेचसे लोक शहरी जीवनाच्या चौकटीत जगणारे असल्याने ते स्वाभाविकच आहे. त्यांना साहित्याच्या इतिहासाची, नव्या लाटांची इतकी व्यासंगपूर्ण जाण कशी बरे असणार? 'लोकप्रियतेपलीकडे या, अजून खूप पुढे या, वास्तवतावादाकडे या, डेली सोप पुरे आता' अशा 'आवाहन' स्टाइलच्या वाक्यांवरून माझ्यासारख्या त्रयस्थालादेखील तू स्वतः फार पुढे / वर पोचली आहेस आणि येथील बाकी पामर जनता मात्र ढिम्मगोळा असल्याचा सूर जाणवतो (नंतर ' आमचा कुठे एवढा अभ्यास ब्वा ' म्हणूनदेखील). केवळ आताच नाही तर २००५ च्या दिवाळी अंकातील अश्विनी, सुमतीच्या लिखाणावरील प्रतिक्रिया, त्या अंकाचा समीक्षण - कम - पंचनामा, बडबडीच्या कथेवरील प्रतिक्रिया अशा बर्‍याच प्रसंगी तुझ्या बोलण्या - लिहिण्यातून असा ओव्हरस्मार्टनेस(किंवा आपल्या सदाशिवपेठी बोलीतला ठेवणीतला शब्द ' माजोरडेपणा ' ) दिसलाय. (या प्रकाराला ' स्पष्टवक्तेपणा ' असं भरजरी नाव कशाला द्यावं?! स्पष्टवक्तेपणा आणि आगाऊपणा यांच्यात फरक एकच.. पहिला योग्य वेळी, योग्य ठिकाणी असतो तर दुसरा अस्थानी, अवेळी आणि अवाजवी असतो.) काही दिवसांपूर्वी ' नाव आणि प्रतिमा ' बीबीवर झकासरावाने तुझ्या कामाबद्दल माहिती कळल्यावर तुझं कौतुक केलं होतं. तेव्हादेखील ' सगळ्या मायबोलीला माहीत आहे.. तुम्हाला नव्याने कळलेलं दिसतंय ' टाइप ताठकॉलर उत्तर दिलं होतंस. तुझ्या यशाबद्दल तुझं कौतुक आहेच.. पण मुळात तुझी कर्तबगारी तमाम मायबोलीकर जनतेला माहीत असावी असं तरी का गृहित धरावं?!! कहर आहे!

बरं ते सोड.. या झाल्या तुझ्या लिखाणावरून माझ्यासारख्या तुझ्याशी कधी संबंधही न आलेल्या वाचकाच्या मनात उमटलेल्या प्रतिक्रिया. मला मान्य आहे की मला तुझं लिखाण वाचून जे वाटलं ते केवळ माझं इंटरप्रिटेशन असेल. पण मग आपल्याला ज्या हेतूने प्रतिक्रिया द्यायची आहे त्याचं इंटरप्रिटेशन आपल्याला पाहिजे तितपतच, आणि पाहिजे तेच समोरच्याच्या मनात केलं जाईल याची खबरदारी आपण घ्यायला नको का? साहित्यकृती सार्वजनिकरित्या प्रकाशित केल्यावर बर्‍यावाईट सर्व प्रतिक्रिया झेलणे हे जसे लेखकाकडून अपेक्षिले जाते तसेच प्रतिक्रिया देणार्‍यांकडून त्यांनी नेमक्या शब्दात आपल्या प्रतिक्रिया (डिस्टॉर्शन / गैरसमज होण्याची कुठलीही शक्यता शिल्लक न ठेवता) देणे अपेक्षू नये का?!
तुझ्या प्रतिक्रिया खटकल्या असं म्हणणार्‍या इथल्या आर्काइव्ह्जमधल्या प्रतिसादांतूनही हेच जाणवतं की तुझ्या प्रतिसादातल्या भाषेवर आक्षेप आहे.. तू अमुकतमुक गोष्ट आवडली नाही असं सांगितलंस म्हणून नाही. पण ही बाब समजून न घेता, आत्मपरिक्षण न करता तू ' माझं काय चुकलं? ' असाच हेका धरून बसली आहेस! आपल्या बोलण्याचा गैर-अर्थ समोरच्याच्या मनात उमटला तर कसे प्रॉब्लेम होऊ शकतात हे खरं तर तुझ्यासारख्या पब्लिक फ़ील्डमध्ये काम कराणार्‍या व्यक्तीला सहज कळायला हवं. एखाद्याच्या निर्मितीवर ' आवडलं नाही ' अशी टिप्पणी द्यायला काहीच हरकत नाही.. पण सार्वजनिक फोरमवर आपण लिहीत असलेल्या प्रतिसादाचा समोरच्यावर अपेक्षित(च) परिणाम होईल ना याची काळजी घेतलीच पाहिजे. ' मनात आलं ते लिहिलं.. पटलं तर घ्या; नाही तर सोडा ' असं म्हणून हात झटकून कसं चालेल? त्याआधी दुसर्‍याला आपलं मत कळवावं आणि त्याच्यापर्यंत ते नीट पोचावं ही सुप्त अपेक्षा आपलीच तर होती ना!

असो. मॉडरेटर मंडळी, नेहमीसारखी एक सूचना : हे पोस्ट योग्य वाटले नाही तर येथून उडवून ' नाव आणि प्रतिमा ' येथे टाकावे. :-)

>>पण मी आणि अर्थातच माझ्या बाजूने बोलणारे लोक चूकच असणार तर आता द्याच मवाळ शब्द लिहून.
खरंच लिहून हवं असेल तर सांग तुझ्या कुठल्या ओळींचं ' भावांतर ' हवंय.

Lukkhi
Thursday, April 19, 2007 - 1:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला एक गोष्ट समजत नाही.... केवळ नीरजाच्याच प्रतिक्रियेवर एवढा गदारोळ का?

केवळ प्रतिक्रिया चुकली म्हणून? ती तर (नीरजाच्या स्वत:च्या अगदी टाकाऊ कथांसहीत) बाकी कित्येक अत्यंत सुमार दर्जाच्या कथांची वाहवाही करताना चुकलेलीच असते.

की भाषा चुकली म्हणून? पण यापेक्षा जास्त माजोरडे तर बरेच जण लिहितात... नमुने हर पानावर सापडतील.

केवळ 'ही अज्जुकेची प्रतिक्रिया, म्हणून जास्त झोंबली' असे तर नाही झाले ना?


Divya
Thursday, April 19, 2007 - 1:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Lukkhi या अशा भाषेमुळे बरेच जण दुखावले गेलेत आधीसुद्धा, अगदी मायबोली सोडुन गेले नसले तरी येणे नक्कीच कमी झाले असेल असेही बरेच लोक आहेत. Well said Pha.

Sampada_oke
Thursday, April 19, 2007 - 2:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ, अगदी योग्य शब्दात नेमकं वर्णन केलयंस.

अज्जुका, तुझ्या कथा खूप छान असतात असं ऐकलं होतं. पण ( गेल्या चार वर्षात `प्रतिक्रिया` आणि दिवाळी अंकात काही लिखाण असल्यास ते सोडून काहीच वाचायला मिळालं नाहीये.( कदाचित माझ्या वाचनात आलं नसेल. चू.भू.द्या.घ्या.)

अज्जुका,तू मला विचारलं होतंस काय खटकलं ते लिही,पण फ एव्हढं स्पष्ट मी लिहू शकले नाही.


Mansmi18
Thursday, April 19, 2007 - 2:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सर्वाना अक्षय त्रुतियेच्या शुभेच्छा.

ही नीरजा कोण? असो.

फा,
तुमच्या प्रतिक्रियेवरच्या प्रतिक्रियेत काही आवडलेले मुद्दे.
----------------------------------------------------
स्पष्टवक्तेपणा आणि आगाऊपणा यांच्यात फरक एकच.. पहिला योग्य वेळी, योग्य ठिकाणी असतो तर दुसरा अस्थानी, अवेळी आणि अवाजवी असतो.
----------------------------------------------------
तुझ्या प्रतिक्रिया खटकल्या असं म्हणणार्‍या इथल्या आर्काइव्ह्जमधल्या प्रतिसादांतूनही हेच जाणवतं की तुझ्या प्रतिसादातल्या भाषेवर आक्षेप आहे.. तू अमुकतमुक गोष्ट आवडली नाही असं सांगितलंस म्हणून नाही. पण ही बाब समजून न घेता, आत्मपरिक्षण न करता तू ' माझं काय चुकलं? ' असाच हेका धरून बसली आहेस!
---------------------------------------------------
सार्वजनिक फोरमवर आपण लिहीत असलेल्या प्रतिसादाचा समोरच्यावर अपेक्षित(च) परिणाम होईल ना याची काळजी घेतलीच पाहिजे. ' मनात आलं ते लिहिलं.. पटलं तर घ्या; नाही तर सोडा ' असं म्हणून हात झटकून कसं चालेल?
---------------------------------------------------




Zakki
Thursday, April 19, 2007 - 3:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता पुरे की लोकहो. सगळ्या बाजूने बोलून झाले. जे पटले ते लोक स्वीकारतील नि तुम्हाला त्यांच्या लिखाणातून दिसेल. त्यांना पटत नसेल तर ते काही तुमच्यासाठी बदलणार नाहीत. असते कुणाची भाषा तिखट, म्हणून काय झाले? काही घेण्याजोगे मिळाले त्यातून तर घ्या, नाहीतर सोडून द्या.




मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators