Lukkhi
| |
| Tuesday, April 17, 2007 - 2:16 pm: |
| 
|
नन्दिनीने कथा अर्धवट सोडुन दिली आहे. मी आताच तिचे पोस्ट वाचले. >> मनोज, तिच्या चाहत्यांना आता नक्कीच वाईट वाटेल, परंतू हा बी बी लिखाणावरील प्रतिक्रीयांसाठी आहे... ती जे लिहिणार होती पण लिहिले नाही त्यावर प्रतिक्रीया देण्यासाठी हा बी बी वापरू नये अशी नम्र अपेक्षा...
|
Mansmi18
| |
| Tuesday, April 17, 2007 - 2:20 pm: |
| 
|
मॉडरेटर, माझे विषयबाह्य पोस्ट क्रुपया उडवुन टाका. हा बोर्ड फ़क्त मारामारीसाठि आहे हे मी विसरलो लुक्खिसाहेब. क्षमा करा.
|
>> बाकी सहस्रबुद्दे, विवेकी आणि राजन्कुल ह्या मूर्खांकडे लक्ष द्यायची गरज नाही हे मला माहितीये <<< आता तुम्ही आमच्या बद्दल "सभ्य" भाषेत गोडवे च गायले आहेत नाही का??? >>एकंदरीत त्यांचा बोलविता धनी ती असावी असं वाटणं साहजिकच आहे. << तुम्ही लेखकांना "प्रामाणिकपणे" आणि "सभ्य" भाषेत आणि हो "शहाणपणाचा आव न आणता" लिखाण आवाडलं नाही असं सांगू शकता.. मग एखाद्या वाचकानी किंवा लेखिकेने तुमची प्रतिक्रिया आवडली नाही असं सांगितलं तर तुम्हाला एव्हडा त्रागा कऱण्याचं कारण काय??? (इथे मला खरतर नाकाला मिरच्या का झोंबाव्या असं म्हणायचं आहे...!) (आणि लेखिकेने ते अतिशय सभ्य शब्दात सांगितलं होतं..) आणि नंदिनीने मला तिच्या बाजूने बोलायला सांगायचा संबंधच कुठे येतो.. मी मायबोली वर एक दोन लोक सोडून कोणालाही ओळखत नाही तेव्हा उगाच तुमचं तर्कशास्र नको तिथे लढवू नका...
|
Lukkhi
| |
| Tuesday, April 17, 2007 - 2:28 pm: |
| 
|
मनोज, तुमचे पोस्ट नाही हो विषयबाह्य, मला फक्त एवढेच म्हणायचे होते की नंदिनी ताईंची कथा थांबल्या नंतर लोक इथे येऊन ती का आणि कशी आणि कुणामुळे थांबली यावर रवंथ करतील, यासाठी माझे पोस्ट... तुम्ही मनावर नका घेऊ माझे पोस्ट... आणि तुम्हाला त्यामुळे त्रास झाल्याबद्दल क्षमस्व
|
Deshi
| |
| Tuesday, April 17, 2007 - 2:47 pm: |
| 
|
हा बोर्ड फ़क्त मारामारीसाठि आहे हे मी विसरलो >>>> मला वाटत नंदीनीची कथा व त्यावरच्या प्रतिक्रीया म्हणजे कावळा बसायला व फांदी तुटायला एकच वेळ झाली. एकुनच आपले मित्र त्यांच्या कथा, कविता (काही खरच चांगल्या काही अतिशय रद्दड) व यावरील प्रतिक्रीयांसाठी हि चर्चा असायला पाहीजे.
|
Deshi
| |
| Tuesday, April 17, 2007 - 3:24 pm: |
| 
|
अहो लुखी ती म्हण आहे. त्याचा अर्थ असा की अशी चर्चा आज ना उद्या झालीच असती. नेमकी ती आज झाली व त्याला नाम मात्र कारण नंदीनीची कथा झाली. कदाचित ती कोणाचीही कथा असु शकली असती. hope you are clear now.
|
अज्जुका, आपली ओळख नाहीये.(माझी नंदिनीशी सुद्धा ओळख नाही.) पण तुझ्यातील कलाकाराची मला जाणीव आहे. मायबोलीवर मागे `आतल्यासहित माणूस`वर जेव्हा टीका झाली होती, तेव्हा मी तो प्रयोग पाहिलेला नसताना सुद्धा डुप्लिकेट आयडीने लिहिलेया वादाला उत्तर लिहिले होते( तुझी बाजू घेऊन.) हे सांगायचा उद्देश एव्हढाच की माझी तुझ्याशी कोणतीही `दुश्मनी`नाही. आता तू नंदिनीच्या गोष्टीवर दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. एकतर तु ति प्रतिक्रिया फ़ार लवकर दिलीस. माझ्यामते तरी नंदिनी हल्लीच मायबोलीवर लिहू लागलीये. सुरुवातील एकाच टाईपच्या कथा लिहितात लोक. आपली कथा आवडलीये म्हंटल्यावर नवीन विषयांवर लिहिण्याचा प्रयत्न करतात. तुझ्या प्रतिक्रियेतील भाषा मला सुद्धा खटकली होती. एव्हढी उपरोधिक पोस्ट लिहिण्यापेक्षा तू तिला एखादा मेल लिहिला असतास तर फ़ार बरे झाले असते, असे मला वाटते. संघमित्राने जरी त्याच अर्थाचे पोस्ट लिहिले असले तरी त्यातली भाषा बरीच सौम्य आहे. त्या प्रतिक्रियेनंतर सुद्धा नंदिनीने गोष्ट पुढे चालू ठेवली होती. मी तर म्हणेन, ती वाचकांना वाट बघायला लावत नाही, याचे आपण नक्कीच कौतुक करायला हवे. आणि सुरुवातीच्या काळात यासारख्या वादांमुळे प्रतिभेवर नक्कीच परिणाम होतो. BTW मी मायबोलीची गेले ४ वर्षे मेंबर आहे.( नवीन आणि जुने मेंबर्स, डुप्लिकेट आयडी या वर चर्चा होऊ नये, यासाठी खटाटोप.)
|
Ajjuka
| |
| Tuesday, April 17, 2007 - 5:32 pm: |
| 
|
>>लोकांना व्यसन लागेल इतपत चांगलं नक्की लिहितेयस पण डेली सोपच्या पलिकडे जाऊन काहितरी अस्सल शोधायचा प्रयत्न करशील अशी आशा आहे. हलकेच मुळीच घेऊ नकोस. गंभीरपणेच घे. फक्त हे तुला कमीपणा देण्यासाठी नाही आहे हे लक्षात घे. भोचकपणा वाटत असेल तर सोडून दे. मला कुणी भोचक म्हणल्याने मला फरक पडत नाही.<< >>डेली सोप हे एकदम किंवा तुकड्याने या अर्थी नाही म्हणाले मी. खोली अथवा depth या अर्थी म्हणते आहे. Romanticism पुरे की आता. 1860's मधे संपला तो. या की थोडे वास्तवतावादाकडे किंवा अजून खूप पुढे या, post-modernism कडे. मुळात जरा लोकप्रियतेच्या पलीकडे या हो. खरं खुरं, आपलं, आतलं लिहा की.<< >>बाई गं.. माझ्याकडून शिकण्यासारखं आहे म्हणतेस पण तसे मला मुळीच वाटत नाही. आणि मी शिकवण्यासाठी अभिप्राय ही दिला नाहीये. तसा सूर जाणवला असेल तर क्षमस्व. बाकी तुझी तू स्वतःच्या विचारानेच, स्वतःला तपासून बघतच, introspect ने खूप काही शिकशील. ते तुझ्यातच आहे.<< >>अरे नाही बाबा.. ते एक माझं मत आहे केवळ. ते चुकीचंही असू शकतं. माझा कसला अभ्यास ब्वा?<< माझे सुरूवातीचे सगळे पोस्टस परत देण्याचा एकच हेतू आहे संपदा की मला सांग या भाषेत उपरोधिक आणि खटकण्यासारखं काय आहे? कथा पूर्ण झाल्यावर प्रतिक्रिया द्यायला हवी होती हे एक वेळ मान्य आहे पण कथा पूर्ण होईपर्यंत मग येणार्या positive प्रतिक्रिया पण थांबतात का?
|
कथा पुर्ण झाल्यावरच जर अभिप्राय हवे असतील तर सगळी कथा एकदमच टाकावी. भले मग तुम्ही ती तुकड्यातुकड्यांनी लिहा आधी वर्षभर.
|
Disha013
| |
| Tuesday, April 17, 2007 - 7:57 pm: |
| 
|
रणांगण करुन टाकलयं बीबीचं! बीबी चे नाव बदलून 'लिखाणावरील प्रतिक्रियेवरील प्रतिक्रिया' असे ठेवायला हवे खरे तर. प्रतिकियांची अपेक्षा लेखकाचीपण असणारच. म्हणुनच ती तुकड्यात पोस्टली जाते असे मला वाटते. मधे प्रतिक्रिया देवु नका,असे एकाही लेखकाने म्हटलेले मी अजुन तरी नाही पाहिले. तसे सदर लेखकाने लिहिले तर नाही देणार आम्ही आमचे मत कथा पूर्ण झाल्याशिवाय. निगेटिव प्रतिक्रिया या सौम्य शब्दात देता येतात. पण प्रतिक्रिया देवु नका ही अगदी टोकाची भुमिका झाली.
|
चर्चा (v&C) हा मायबोलीकरांचा प्रचंड आवडता विषय आहे गेल दशकभर तरी आणि त्याची युद्धभूमी होणे हे ही normal आहे.
|
Nanya
| |
| Tuesday, April 17, 2007 - 11:55 pm: |
| 
|
V & C हा प्रतिमेचा (आणि मायबोलीचा) प्राणवायु आहे असे स.ग. कुडचेडकरानी म्हणलेच आहे. :D
|
Meggi
| |
| Wednesday, April 18, 2007 - 4:08 am: |
| 
|
कथा पूर्ण झाल्यावर प्रतिक्रिया द्यायला हवी होती हे एक वेळ मान्य आहे पण कथा पूर्ण होईपर्यंत मग येणार्या positive प्रतिक्रिया पण थांबतात का?>> नाही, आणि थांबू पण नयेत. उत्स्फ़ुर्त दाद कलाकाराला नेहमीच प्रोत्साहन देते. आपलं लेखन कोणी वाचतय, वाट बघतय असं असेल तर लेखकाला अजून उत्साह येतो.
|
Ajjuka
| |
| Wednesday, April 18, 2007 - 5:34 am: |
| 
|
थोडक्यात... तू खूप महान लिहितेस्/ लिहितोस एवढं म्हणलं की हुरूप येतो. पण चांगलं लिहू शकशील अजून काही सुधारणा केल्यावर हे म्हणलं की हुरूप येत नाही.. म्हणजे हे लोक evaluation ला तयारच नाहीत की. माझा आधीचाच मुद्दा सिद्ध झाला की याने. प्रत्येक लिहिणार्याने (आपण सगळे हौशी आहोत ना तेव्हा लेखक पद प्राप्त नाही झाले आपल्याला अजून..) तर प्रत्येकाने लिहिण्यापूर्वी एक सूचना टाकावी की मला कसे आणि कधी प्रतिसाद अपेक्षित आहेत ते. वा वा छान छान पासून ई घाण पर्यंत कुठले? संपूर्ण प्रामाणिक ते संपूर्ण अप्रामाणिक? कथा चालू असताना की संपल्यावर? चालू असताना काय प्रतिसाद द्यावे हुरूप वाढण्यासाठी? इत्यादी इत्यादी.. आधीच लिहा म्हणजे आम्ही त्यावरच ठरवू कथा वाचायची की नाही ते.
|
>>आधीच लिहा म्हणजे "आम्ही" त्यावरच ठरवू कथा वाचायची की नाही ते. आज्जुका... आता तुम्ही स्वत्:साठी आदरार्थी बहुवचन वापरत असाल तर हरकत नाही... अन्यथा कथा वाचयची की नाही हे ज्याचं त्याला ठरवू द्या.. तुम्ही फक्त स्वत: पूरत मत तयार किंवा व्यक्त केलेलच बरं..!
|
Peshawa
| |
| Wednesday, April 18, 2007 - 6:54 am: |
| 
|
अज्जुके तु प्रतिक्रिय टाकत रहा त्या प्रतिक्रिये वर ज्याना problem आहे ते शोधतिल उत्तरे तु तुझ्या प्रतिक्रिया त्याना कशा वाटतात हे कशाला बघतेस... तुला तुझ्या प्रतिक्रिया रद्दड आहेत हे म्हटल्याने काही फ़रक पडतो का? तु तुझ्या म्नाल जे योग्य वातेल ते लिहित जा बकिच्याना जे वाटते ते लिहीतील (तुझ्या प्रतिक्रिवर प्रतिक्रिय सुधा) समजाउन सांगायच इतना कष्ट तु कायको कर रहेला है? भला ignore नाम कि भि कोइ चिज होती है माय्बोळि पे...
|
Ajjuka
| |
| Wednesday, April 18, 2007 - 7:15 am: |
| 
|
जया, अति झालं तेव्हा म्हणाले ना. प्रतिक्रिया अश्याच दिल्या पाहिजेत आणि तश्याच दिल्या पाहिजेत हे ठरवणारे हे कोण? बर काहीच नसताना केवळ पोटशूळ म्हणून उगाच हल्ले करत असतील हे लोक तर कधीतरी retaliate केलं पाहिजेच ना. तेवढंच केलं मी. पण कळलं की इथे तू आणि काही ठराविक माणसं सोडली तर कुणालाच लिखाणावर प्रामाणिक प्रतिक्रिया नको असते. इथे जे लिहितात ते एखादा अपवाद वगळता वा छान एवढेच ऐकून घ्यायलाच लिहितात. दुसरे काही नाही. आता तुझा सल्ला मानते.
|
V & C हा प्रतिमेचा (आणि मायबोलीचा) प्राणवायु आहे असे स.ग. कुडचेडकरानी म्हणलेच आहे. :D >>>> नान्या गटन्या घुसला का तुझ्यात. सही बोला है बाप.
|
Zakki
| |
| Wednesday, April 18, 2007 - 2:10 pm: |
| 
|
इथे जे लिहितात ते एखादा अपवाद वगळता वा छान एवढेच ऐकून घ्यायलाच लिहितात. काही लोकांना इथली भांडणे वाचून गंमत वाटते. खवचट काय, आकस काय, मूर्ख काय नि काय, काय, काय. नुसती मज्जा. गोष्ट नि प्रतिक्रिया राहीली बाजूलाच. म्हणून मग काही लोक उगीचच वाट्टेल ते लिहीतात. कुणि वा, छान म्हणोत अथवा न म्हणोत! खरे तर माझे अजून असे म्हणणे आहे की कुणा कल्पक व्यक्तिने मायबोलीवरील व्यक्तिरेखा घेऊन नि मायबोलीतील 'भाषणे' घेऊन एक धमाल विनोदी नाटक लिहावे! मीच लिहीणर होतो. पण मला येत नाही नाटक लिहीता! पुन: नवीन एक भांडण उद्भवेल इथे!
|
Prady
| |
| Wednesday, April 18, 2007 - 4:16 pm: |
| 
|
मीच लिहीणर होतो. पण मला येत नाही नाटक लिहीता! पुन: नवीन एक भांडण उद्भवेल इथे! <<<<< परत MBA च्या अभ्यासाच्या आड पण येइल ना ते
|