|
Zakki
| |
| Monday, April 16, 2007 - 5:36 pm: |
| 
|
उगाच मारामारी करण्यात काय अर्थ आहे? अर्थ काही नाही. पण गंमत मात्र खूप आहे, विशेषत: बाजूला बसून धावते समालोचन देण्यात!

|
मनोजभाऊ म्हणजे तुम्ही कुत्र्यांची आणि हत्तींची उपदेश करून समजूत काढलीत. हेच इथल्या तेल ओतायला आलेल्या ढुढ्ढाचार्याना इतका वेळ कळत नव्हते. धन्यवाद... जा बरे कुत्र्यानो जा आपापल्या भुंकण्याच्या कामावर.. हत्तीही आपला बाजारात जाईल! अन बोवाजी तुम्ही आता इथे काय करताय? पळा इथून.. रिकाम टेकडे अन जनतेला साकडे. मॉडरे SSSSS टर................ अवं............... मॉडरे SSSSS टर.... .
|
Deshi
| |
| Monday, April 16, 2007 - 7:11 pm: |
| 
|
मी अत्यंत शांतपणे, कुठलाही शहाणपणाचा आव न आणता केवळ एक मत म्हणून सूचना केल्या होत्या. आता जिला केल्या होत्या तिला माझे शब्द समजले .........>>>>>>> Sorry, but i dont agree with this >>>>>>>> which part? त्यांचे मत की <<<आता जिला केल्या होत्या तिला माझे शब्द समजले >>. हे. कारण अजुक्काने तुझा लेखनाला complement दिली असे वाटेल. "आता सोप सारखे न लिहीता सिरीयस लिही" तर तुम्ही लिहीले की हो पोस्ट करायला वेळ लागतो म्हणुन डेली करते. तर तो भाग तुम्हाला समजलाच नाही. तुमचे लिखान चांगलेच आहे पण त्याला त्याच त्या प्रेमकथां मध्ये अडकवु नका असा अर्थ त्या प्रतिक्रियेतुन व्यक्त होतो असे वाटले.
|
Mansmi18
| |
| Monday, April 16, 2007 - 8:27 pm: |
| 
|
रॉबिनहूड्साहेब, तुमच्या मारामारीमधे मी पडत नाही. आणि मी कुणाला उपदेश वगैरेच्या भानगडीतही पडत नाहि हो. मला काय वाटले ते मी आपले बोललो. उगाच या क्रॉसफ़ायर मधे माझ्यावर गोळीबार नको तुमचे चालु द्या
|
Itsme
| |
| Tuesday, April 17, 2007 - 5:13 am: |
| 
|
या page वरचे सगळे post वाचुन मग ajjuka चे पहीले आणि nandini2911 ची immediate reaction पण वाचली, त्यावरुन तरी ajjuka ने काही जहाल शब्दात लिहीले आहे असे वाटत नाही, आणि तिने जे काही लिहीले आहे त्यात nandini2911 ला ही 'तेंव्हा' तरी काहीच वावगे वाटलेले नाही .... असे मला वाटले
|
Giriraj
| |
| Tuesday, April 17, 2007 - 5:46 am: |
| 
|
अज्जुकाने लिहिले त्याच्या खूप आधीच संघमित्रानेही त्याच प्रकारची म्हणजे केकेता कपूर प्रकारात कथा अडकू नये अश्या आशयाची प्रतिक्रिया दिलीच होती की! नंदिनी,उगाच भलत्या वादांत अडकून कथेवरचे लक्ष हटवू नकोस.. तू चांगले इहित आहेस. प्रतिक्रिया देणार्याला स्वतला लिहिता किंवा चांगलं लिहिता येण्याची गरजच काय? वाचकाने जर आपल्या अपेक्षा लेखकापर्यन्त पोचवल्या तर इतका V &C होणे गरजेचे नाही.. मुळात कथा हा प्रकार दुसर्याने वाचावा यासाठीच लिहिला जातो असे मला वाटते. कवीने मी फ़क्त व्यक्त होण्यासाठीच आणि फ़क्त स्वतसाठीच लिहितो असे म्हटलेले खूपदा ऐकले आहे. त्यामुळे वाचकांच्या काही अपेक्षा असतिल लेखकाकडून की ज्या त्याच्या लिखाणावरच्या प्रेमामुळे निर्माण झाल्या सतिल तर त्यांचा विचार व्हावा इतकेच! बाकी वरच्या फ़ालतू चर्चेत तसा काही दम नाही!
|
Ajjuka
| |
| Tuesday, April 17, 2007 - 5:56 am: |
| 
|
>>टीकाकारानी सुद्धा आपले मत कोणाला न दुखावता मान्डता आले तर पहावे. जे "एस्टब्लिश्ड" लेखक आहेत त्याना टीका पचवता येते पण नवोदित लेखकाना ते कदाचित कठीण जाइल हे समजुन लिहावे.<< मनस्मि १८ आजपर्यंत प्रत्येक वेळी तुम्ही मलाच उपदेश करत आला आहात. आधी तो बापू बीबी, मग सिरीयल्सचा आणि आता इथे. पण आता बास. आधी माझे मूळ पोस्ट काय आहे हे वाचा. त्यात कोणाही ’norma’ माणसाला दुखावण्यासारखे काय आहे हे सांगा आणि मग उपदेश करण्यास या. उद्धट, खडूस, शहाणपणाचा आव, फडतूस लिखाण हे सगळे माझ्याबद्दल वापरलेले शब्द आपणास दिसले नसतीलच. बाकी अजून बोलण्यात काही अर्थ नाही. प्रत्येक लेखकाने लिहिताना आधीच जाहीर करावे फक्त चांगल्याच प्रतिक्रिया द्या किंवा प्रामाणिक प्रतिक्रिया द्या इत्यादी. तसे केले नाही आणि एखादी प्रामाणिक पण negative प्रतिक्रिया आली तर निदान तिथल्या तिथे ते न आवडल्याचे नमूद करावे. प्रतिक्रियेवर ’आपण नंतर चर्चा करू’ असा मानभावीपणा दाखवून मग दुसऱ्यांच्यापुढे रडून त्यांच्या तोंडून प्रतिक्रिया देणाऱ्यास शिवीगाळ करवून घेऊ नये. असो.. मी आत्ताही असेच म्हणेन की मी दिलेली पहिली किंवा दुसरीही प्रतिक्रिया आरोप केल्याप्रमाणे कुठल्या भांडणाच्या आवेशात, खडूसपणे, उद्धटपणे, स्वतःला शहाणे समजत दिलेली नव्हती. ती केवळ एक प्रामाणिक प्रतिक्रिया होती आणि मानणे न मानणे हे कोणावर बंधनकारक नव्हते.
|
ohh ही चर्चा इथे चालू आहे होय... मला माहितच नव्हतं.. अर्थात मी हत्तीं इतका senior नाहिये त्याला मी तरी काय करणार?? उगाच नंदिनीच्या कथेत अडथळा नको म्हणून मी reply करणं थांबवलं... post edited by moderator.
|
Zakasrao
| |
| Tuesday, April 17, 2007 - 6:27 am: |
| 
|
अरे काय चाललय काय जरा सगळे शांत बसा पाहु. नन्दिनीच्या कथे वर अज्जुकाने प्रतिक्रिया दिली. तिला जे वाटते ते तिने प्रामाणिकपणे लिहिले.त्यात जर नन्दिनीला तथ्यांश वाटला तर ति नक्कि तिच्याशी ह्या विषयावर चर्चा करेल नाहितर सोडुन देइल. त्यानंतर जे सहस्त्रबुद्धे विवेकि आणि राजनकुल यानी अज्जुकावर वैयक्तिक लिहिले तिथे हा विषय भरकटला. पुढे आरोप प्रत्यारोप. ह्याने वाद वाढतो चर्चा नाही. अज्जुका तु कोणी तुझ्यावर आरोप केल्यामुळे व्यथित झालीस हे मान्य पण हे लोकाना उद्देशुन तु काहिही लिहु नयेस असे मला वाटते कारण वाद वाढायला नकोय. मुळात हे लोक किति वेळा प्रतिक्रिया देतात हे बघ. नंदिनी,उगाच भलत्या वादांत अडकून कथेवरचे लक्ष हटवू नकोस.. गिरी अनुमोदन. हे नन्दिनी लक्षात ठेवेलच. अज्जुका मि तुला तसेच नन्दिनीला थोडेफ़ार ओळखतो त्यावरुन सांगतो कि जशी तु सडेतोड आहेस तशी ति हि आहे. त्यामुळे तु जे लिहिल आहेस कि हे चुक आहे ह्या गोष्टीमधे तिला स्वारस्य नाही. तिला जे काहि लिहायचे आहे ते ति स्पष्ट लिहिलच. अशा लिखाणामुळे गैरसमज होण्याची शक्यता जास्त असते. तस काही नकोय व्हायला. मी तिला आणि तुलादेखिल पब्लिक फ़ोरम वर न येता चॅटिंग करा असे सुचवले होतेच त्याचा विचार करा. तुझ्या ज्या काहि प्रतिक्रिया आणि अपेक्षा आहेत त्या तु जरुर कळव तिला फ़ायदा होइल कि नाहि हे तिला ठरवु दे. बाकिचे लोक तुला काय बोलतात हे तुझ्या लिखाणाव्रील त्यावेळच्या प्रतिक्रियामधे महत्वाच आहे. इतरवेळी नाही. आता मी जे काहि लिहिले आहे त्यावर अजुन कोणी विषय भरकटत नेणार नाहि अशी अपेक्षा आहे.
|
नंदिनी, जो पर्यंत तुला खात्री नव्हती की कुणीतरी या वादात तुझ्या बाजूने उडी मारणार आहे तोपर्यंत तुला अशा प्रतिक्रियांचा काही प्रॉब्लेम नव्हता असे दिसतेय. मी हे लिहीलेय कारण अज्जुकाने लिहीले साधारण त्याच अर्थाचे मीही लिहीले होतेच आधी. तुझ्या कथांचा flow अतिशय interesting असतो. वाचक नकळत गुंतत जातातच. आणि तू योग्य जागी कथा break करणे, typical वळणे देणे अशा डेली सोप ट्रिक्स वापरतेसच ना. ती प्रिया रेहानची गोष्ट लिहीलीस तेंव्हा मला अगदी कौतुक वाटलं होतं की लोक वाट्टेल त्या प्रतिक्रिया लिहीतायत पण तू मनावर घेत नाहीयेस. आता मात्र या सगळ्यामुळे तू ती चांगली चाललेली गोष्ट अर्धवट सोडून स्वतःवर आणि त्यात involve झालेल्या वाचकांवर अन्याय करतेयस असं नाही का वाटत तुला? >> प्रत्येक लेखकाने लिहिताना आधीच जाहीर करावे फक्त चांगल्याच प्रतिक्रिया द्या किंवा प्रामाणिक प्रतिक्रिया द्या इत्यादी. अगदी अगदी.
|
Ajjuka
| |
| Tuesday, April 17, 2007 - 6:45 am: |
| 
|
झकासराव, हे सगळं ठिके हो जोवर माझा असा समज होता की ही असली शेंडाबुडखा नसलेली फडतूस टिका त्यांच्या त्यांच्या दुखण्यातून उदभवलेली आहे तोवरच.. पण आता चित्र थोडं वेगळं दिसतय... लोकांना साधी सुधी एक सूचना सहन होत नाही मग ते लोक सडेतोडपणे तसं न सांगता दुसरीकडे जाऊन रडतात... मग हे दुसरे लोक छू म्हणल्यासारखां, काहीही विचार न करता येतात अंगावर धावून आणि ते सूचना सहन न होणारे लोक बसतात 'आता मी लिहिणारच नाही' अशी sympathy tour काढत.
|
Ajjuka
| |
| Tuesday, April 17, 2007 - 6:49 am: |
| 
|
>>जो पर्यंत तुला खात्री नव्हती की कुणीतरी या वादात तुझ्या बाजूने उडी मारणार आहे तोपर्यंत तुला अशा प्रतिक्रियांचा काही प्रॉब्लेम नव्हता असे दिसतेय.<< सन्मे... तू तर वर्मावरच बोट ठेवलंस की!! (आता वर्मा कोण विचारू नकोस.. )
|
Bee
| |
| Tuesday, April 17, 2007 - 7:22 am: |
| 
|
अरे जरा विचार करा असे कित्येक साहित्यीक आहेत ज्यांच्या साहित्याची निव्वळ उपेक्षा होते आहे. निदान इथे एकतरी चांगले आहे की चांगल्या प्रतिक्रियांबरोबर टिकाही वाचायला मिळतात.
|
Meggi
| |
| Tuesday, April 17, 2007 - 7:26 am: |
| 
|
वादात आपल्या बाजुने कोणी उडि मारेल, याची वाट बघायची नंदिनीला गरजच नाहिये. तिच्या कथांची बरेच लोक आतुरतेने वाट बघतात याची तिला नीट कल्पना आहे.
|
Ajjuka
| |
| Tuesday, April 17, 2007 - 7:37 am: |
| 
|
आला नवीन खांदा बंदुकीसाठी....
|
Viveki
| |
| Tuesday, April 17, 2007 - 7:37 am: |
| 
|
आता विषय निघालाच आहे तर सोक्षमोक्ष लागू द्या. कारण अनेक नव्या लिहिणार्यांच्या उत्साहावर वाचकांच्या प्रतिक्रियांचा फार परिणाम होतो. उदाहरण म्हणून मी अज्जुकाच्याच चार प्रतिक्रिया देतो. उदाहरण एक व दोन : दिवाळी अंक २००५ आश्विनीने तिला आवडलेल्या एका छान कादंबरीचा परिचय करून दिला होता. त्यावर अज्जुकाची प्रतिक्रिया. परिचय्: The bridges of Madison county – पुस्तकाच परिचय म्हणजे गोष्ट नव्हे. त्यात लेखकाची शैली, लेखनाची रचना, लेखकाचे statement या व इतर अनेक गोष्टींना स्पर्श करायला हवा. सध्या तरी आहे ती गोष्ट वाचून हे पुस्तक Mills & Boons च्या पेक्षा फार वरचे असेल असे वाटत नाही. त्यामुळे अर्थातच वाचावे असेही वाटत नाही. ही अत्यंत मान्यताप्राप्त आशी कादांबरी आहे, आणि तडक फडक भाषेत उगाच टिका. सुमतीने डान्स बार या समस्येवर लिहिलेले एक ओघवते ललित, भय इथले संपत नाही, त्यावरची प्रैतिक्रिया. भय इथले संपत नाही – ओके आहे. ज्वलंत विषय घेऊन त्यावर काहीतरी लिहिण्याचा सोस आणि खरंतर त्या विषयाशी आपल काहीच नातं नसण त्यामुळे लेखनामधे येणारा कत्रिमपणा इथेही दिसून येतो. कदाचित पहिली फारशी तिखट नसेल पण ही तर सरळ सरळ अपमान करणारी आहे. 'सोस' हा काय शब्द आहे, सुमती ही एक ज्येष्ठ लेखिका आहे हे तरी अज्जुकाला माहिती आहे का ? बर आणि लगेच एक पोस्ट लिहून स्वत : च स्वत : च्या प्रतिक्रियांचे कौतुक कसे केले आहे ते वाचा. मी कोणीही फार मोठी नाही पण माझ्यामते माझे वाचन, कलाक्षेत्रातला अनुभव, creative व्यक्तींशी असलेला सततचा संपर्क या सगळ्या गोष्टींमुळे माझ्या प्रतिक्रिया अगदीच टाकून देण्यासारख्या नसाव्यात. नसतात असे अनेकांचे म्हणणे आहे. तसेच प्रतिक्रिया देताना personal attack मी करत नाही. झालाच तर पुढच्या लेखनाला काहितरी उपयोग व्हावा असाच या प्रतिक्रियांचा हेतू असतो. म्हणजे मी मोठी नाही असे म्हणून लगेच कशी मोठी ते वाचन, कलाक्षेत्रातला संपर्क वगैरे बोलून दाखवून देणे. आणि आव तर असा की आपण टीका करूनच फार मोठे उपकार करत आहोत. लिहिण्याचा सोस आणि नंतर बडबडीला वापरलेले चाळवा चाळवी करण्याचा लेखिकेचा उद्देश हे शब्द Personal Attack नाहीत तर काय आहे. उदाहरण तीन : बडबडीची गोष्ट माफ कर बडे.. मला अजिबात आवडली नाही कथा. खूपच गुडीगुडी आणि वरवरची वाटली. (आता पब्लिक पेटणार माझ्यावर..) इथपर्यंत प्रतिक्रिया ठीक होती. पण बडबडीने स्पष्टीकरण दिल्यावर भांडणार नाहीत पण इतके गुडगुडणार पण नाहीत. माझा आणि मैत्रिणींचा अनुभव तरी असंच सांगतो. तुमचा जो अनुभव असेल तेवढीच दुसर्याची कथा असली पाहिजे का ? आणी मग पुढे अजून हे लिहिले इथे तपशीलात जाणे अपेक्षित नाहीये. व्यक्तिरेखा कळत नाहीत. केवळ पहिल्या रात्रीचं गोडगुलाबी वर्णन एवढंच ते रहातं. त्यामुळे उद्देश फक्त चाळवण्यापुरता आहे असं वाटतं. असलं चाळवाचाळवी करणारं लिहायला आणि वाचायलाही मला आवडत नाही. इथे लेखिकेच्या उद्देशाबद्दल अतिशय अपमानास्पद शब्द वापरले आहेत. एरवी अनेक हळदीकुंकू कथा येत असतातच की मायबोलीवर.. एकाला तरी काही कॊमेंट दिलीये का? म्हणजे तुझा अपमान करतेय हाच तुझा बहुमान समज, बाकीच्यांची ती पण लायकी नाही. चौथे उदाहरण म्हणजे आताचे ते वरच आहे पुन्हा देत नाही. नंदिनीलाच काय बोलताय तुम्ही, सुरुवातीला तिने उगाच अज्जुकाच्या तोंडी लागून आजून अपमान का करून घ्यायचा म्हणून गप्प बसणे स्वीकारले असेल. आता या चार लेखिकांनीही पुढे येउन सांगावे की अज्जुकाच्या प्रतिक्रिया त्यांना आक्षेपार्ह वाटल्या की नाही. प्रतिकूल प्रतिक्रिया द्यावी की नाही हा मुद्दा नाही. जरूर द्यावी. जो स्वत : लिहित नाही, किंवा फारसे चांगले लिहित नाही त्याने प्रतिक्रिया द्यावी की नाही हाही मुद्दा नाही. जरूर द्यावी. स्वत : फडतूस लिहित असतांना सर्वज्ञ असल्याचा आव आणून अत्यंत अपमानास्पद भाषेत प्रतिक्रिया देणे हे गैर आहे. आश्विनी, सुमती आणि नंदिनीने त्यांना ते आवडले नसल्याचे बोलूनही दाखवले आहे. मी उगाच हवेत विधान केले नव्हते म्हणून आता पुन्हा सविस्तर पुराव्यासह लिहिले आहे. पटले तर सुधारा नाहीतर माझ्यावर तुटुन पडा किंवा जुन्या असल्याचा फायदा घेऊन मॉडरेटरच्या मदतीने माझे पोस्ट उडवून टाका.
|
Zakasrao
| |
| Tuesday, April 17, 2007 - 7:57 am: |
| 
|
ते सूचना सहन न होणारे लोक बसतात 'आता मी लिहिणारच नाही' अशी sympathy tour काढत. कुणीतरी या वादात तुझ्या बाजूने उडी मारणार आहे तोपर्यंत तुला अशा प्रतिक्रियांचा काही प्रॉब्लेम नव्हता असे दिसतेय.<< >>>> हा विषय सुरु व्हायच्या आधीच तिने मला मेल पाठवली होती तुझ्या प्रतिक्रियेविषयी. तुझ्या प्रतिक्रियीमधल काय पटल नाही हे अस मनात काहितरी धरुन तुला कळणार नाही. नाहि सन्मि याना. त्यासाठीच मी तुम्हा दोघीना चॅटिंग करण्याचा सल्ला दिला. तिने मला काय लिहिले होते हे मि तिच्या परवानगीशिवाय इथे लिहिणार नाहि पण तु जस समजतेस तस नाही हे मात्र नक्कि. इथे चर्चा खुप वेगळ्या अंगाने जात आहे. ज्यानी सुरु केलि ते कुठे आहेत ह्याचा विचार करा कारण ह्या आरोप प्रत्यारोप ह्यामधुन फ़क्त संबंध बिघडतात आणि ते कुणाचे ह्याचा जरा डोक शांत ठेवुन विचार करा. मला तुम्हा दोघींविषयी आपुलकी आहे आणि संबध बिघडु नयेत हि इच्छ म्हणुन मी एवढ लिहितोय. तुमच्यात भांडणे लागतील पण ज्यानी विषय सुरु केला ते नामानिराळे.
|
Ajjuka
| |
| Tuesday, April 17, 2007 - 8:11 am: |
| 
|
इथे अनेकांना तुमच्यापेक्षा वेगळे वाटले होते. तेव्हाही आणि आत्ताही. आणि वरच्या उदाहरणातून हेच दिसून येते की कुठल्याही लेखिकेला आपल्या लिखाणावरची negative टिका पचवता आली नाहीये. निदान बाकीच्यांनी तसे स्पष्ट लिहिलेय पण सध्याच्या व्यक्तीमधे तेवढाही प्रांजळपणा नाही म्हणून तिने तुम्हाला सोडलेय माझ्यावर. बर.. या सगळ्यांना तुम्ही चांगले लिहू शकता पण अजून चांगले व्हायला हवे या हेतूने मी लिहिते आहे हे मी स्पष्ट केले होते पण अर्थात नंदीनीला तेही झेपले नाही हे उघड आहे. मी निदान मला का आवडले नाही याची कारणे तरी दिलीयेत (ती तुम्हाला झेपत नाहीयेत म्हणून तुम्ही त्यांना काहीही विशेषणे देताय.) पण तुमचे काय? तुम्ही जे काही बोलताय त्यातला एक शब्द तरी विचार करावा या लायकीचा आहे का? माझ्या लिखाणाला तुम्ही फडतूस म्हणताय तर ठीके पण ते फडतूस का आहे याचे विश्लेषण करू शकता का? तर नाही. आणि माझ्या लिखाणाला चांगलं म्हणणारीही अनेक मंडळी आहेत इथे आणि बाहेरही. बरोबरचे आणि ज्येष्ठही. चांगल्या वाईट दोन्ही टोकाच्या प्रतिक्रिया येऊनसुद्धा मी मधेच कुठेतरी आहे हे मला माहितीये. तेव्हा लिखाणावरची टिका मला पचवता येते पण मी लिहिलेल्या शब्दांमधून स्वतःला सोयीस्कर अर्थ काढून माझ्यावर, माझ्या व्यवसायाला धरून वैयक्तिक चिखलफेक होणार असेल तर ते मला मान्य नाही. आणि तुम्ही दिलेल्या पुराव्यांमधून काहीही सिद्ध होत नाहीये. मी आधीच नमूद केल्याप्रमाणे.... तुमच्या बोलण्यातून तुमची बुद्धी व कर्तुत्व या दोन्हीमधले ज्येष्ठत्व अथवा तुमची कळकळ ह्यातले काहीच सिद्ध होत नाही तेव्हा तुमच्या शब्दांना माझ्यालेखी काहीही अर्थ नाही.
|
Ajjuka
| |
| Tuesday, April 17, 2007 - 8:16 am: |
| 
|
BTW maza post jhakas la nahi tar aviveki la uddeshun aahe.
|
Viveki
| |
| Tuesday, April 17, 2007 - 8:22 am: |
| 
|
उगाच वैयक्तिक टीका करू नाका, मी पण केली नहिये. मुद्द्याना उत्तरं द्या समजले असतील तर. लिहिण्याच सोस, चाळवा चाळवी करण्याचा उद्देश असे घाणेरडे शब्द तुम्ही इथल्या आपल्या लेखिकांना म्हणालात त्याचे काय स्पष्टिकरण आहे ? त्यांना खूप प्रतिसाद मिळतात आणि तुमच्या उच्च (!#@) लेखनाला मिळत नाहीत याची जळजळ तर नाही ना हेही एकदा स्वत : शी तपासून बघा.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|