|
Mansmi18
| |
| Thursday, March 08, 2007 - 2:38 pm: |
| 
|
बी चातुर्मासात काही लोक (देवावर उपकार करण्यासाठि) मान्स खाणे वर्ज्य करतात. गटारी अमावस्या म्हणजे चातुर्मास सुरु होण्याआधी जी अमवस्या येते तेव्हा पुढले चार महिने खाता येणार नाही म्हणुन हे भक्त लोक मनसोक्त मास, मटण, दारु यान्चि चैन करतात. काही लोक इतकी चैन करतात कि दारु पिउन गटारात पडतात म्हणुन याला गटारी म्हणतात. काही लोक चातुर्मासात कान्दे वर्ज्य करतात ते लोक नवमीला मनसोक्त कान्दे खाउन घेतात तिल "कान्देनवमी" असे म्हणतात.
|
If India is all about celebration, then it doesn't particularly matter what form that celebration takes>>> ईती टाईम्स योगी तुला धन्यवाद. सकाळी सकाळी ह्सविल्या बद्दल. टाईम्स वाला पण ' ऐकदाच ' रेव्ह पार्टीला जाऊन आल्याची जास्त शक्यता आहे. मी वर लिहीलेच आहे ' त्यांना ' आपण मागासले वाटतो. जरा त्यांना Trafic सिनेमा पण पाहायला सांगायला लागेल.
|
Bsk
| |
| Thursday, March 08, 2007 - 6:01 pm: |
| 
|
मी कालच टाईम्स चे ते एडीटोरीअल वाचले,आणि खरच चिडचिड झाली! कुठल्या गोष्टींचे समर्थन करतायत हे?? जिथे ड्रग्स वगैरे आढळली अशा पार्टीचे समर्थन?? काय reaction द्यावी हेच कळेना झालंय.. प्रसारमाध्यमांचा असा दृष्टीकोन असेल तर काय बोलणंच खुंटलं... 
|
Bee
| |
| Friday, March 09, 2007 - 2:12 am: |
| 
|
मनु मीही तुला धन्यवाद देतो कारण जसे केदारला योगीनी हसविले तसे तुही मला हसविलेच सोबत माझ्या टिचभर ज्ञानात भर देखील केली. मला वाटलं की कांदेनवमी.. गटारी अमावस्या ह्यामागे देवाधर्माचे काही इस्पित दडलेले असावे. पण हे तर भलतेच निघाले बुवा माणसांनी माणसांसाठी किती सोई निर्माण केल्यात खरचं!!!!
|
टाईम्स हा पेपर आपल्यासाठी निघत नाही तो फ़क्त page3 Sociallites साठी निघतो,, त्यामुळे आपण तो पेपर वाचणं म्हणजे त्या महान लोकाची बरोबरी करणं..
|
Tawaal
| |
| Friday, March 09, 2007 - 5:46 am: |
| 
|
"टाईम्स हा पेपर आपल्यासाठी निघत नाही तो फ़क्त page3 Sociallites साठी निघतो" म्हणुनच बहुतेक नवीनच कोर्स केलेल्या जर्नालीस्टसना ते घेत विचारत नसावेत. इथे मला काहीतरी जळल्याचा वास येतोय रे!
|
सॉरी.. काहीही जळालेलं नाही कारण मी तिथे कधी जॉबसाठी ट्राय केलं नाही... कारण टाईम्स पगाराच्या बाबतीत जाम कंजूस आहे.. (मालक "जैन" आहे)
|
Zakasrao
| |
| Friday, March 09, 2007 - 6:59 am: |
| 
|
brave लोकांचे पुणे आता rev पार्टी नाचते आहे विदेशातले बरेच पाप पुण्य नगरीत साचते आहे स्वातंत्र्यानंतर अधोगतीच.....कुठली पायरी चुकली आहे? सिंहगडाची मान शरमेने, पायथ्यापर्यंत झुकली आहे ही चारोळी मला सकाळी मेल वर आली आहे. सर्वांसाठी टाकली येथे. लेखक माहीत नाही.
|
Tawaal
| |
| Friday, March 09, 2007 - 7:14 am: |
| 
|
सिंहगडाची मान शरमेने, पायथ्यापर्यंत झुकली आहे सिंहगडाचीच काय महाराजांच्या सर्वच गडांची मान महाराजांच्याच नावाने राजकारण करणार्या लोकांनी कधीचीच झुकवली आहे. आपल्याला मात्र ती अशी कधीतरीच दिसते आहे
|
Chyayla
| |
| Friday, March 09, 2007 - 7:37 am: |
| 
|
ओहो अछा म्हणजे ते शिवधर्म वैगेरे काय ते त्याबद्दल म्हणता आहात वाटत मी पण ऐकले आहे... १००% टक्के अनुमोदन या लोकान्नी खरच महाराजान्च्या नावाखाली महाराजान्ची मान झुकवली आहे.
|
Suvikask
| |
| Friday, March 09, 2007 - 12:03 pm: |
| 
|
बर झाल... आज शिवाजी राजे, आणि तानाजी हयात नाही आहेत ही सिंहगडची विटंबना बघायला... पण खरच असायला हवे होते. सगळ्या नशेबाजांना पकडुन कडेलोट तरी केला असता...
|
लोक उगीचच emotional होत आहेत इथे ! सिंहगडानी काय पाप केलं त्याची मान शरमेने झुकायला ? ज्यांना शिक्षा झाली त्यांची झुकेल ना सिंहगडाची मान आजही तानाजीचा पराक्रम , यशवन्तीची करामत याने ताठ च उभी राहिल ! राहिले ते मूठ भर नशेबाज .. असली पापं , मुघलांचे क्रौर्य , युध्दातली फ़ितुरी सगळं काही गडाने पाहिलं आहे , पण गड कायम सिंहाच्या अभिमानाने ताठ च राहिल !
|
Chyayla
| |
| Sunday, March 11, 2007 - 10:55 pm: |
| 
|
शाब्बास दीपान्जली... पुर्ण अनुमोदन.. तर बोला हर हर महादेव.
|
Zakasrao
| |
| Monday, April 09, 2007 - 4:53 am: |
| 
|
http://www.loksatta.com/daily/20070408/ravi01.htm मित्रहो हे पहा. हा लेख मी कालच वाचला आणि इथे सर्वासाठी लिन्क दिली आहे. आपण ज्या मुद्द्यांवर इथे उहापोह केला त्यातील बरेच उत्तरं सापडतील. हा लेख पोलिसांवर झालेल्या आरोप प्रत्यारोपांमुळे पुणे ग्रामीण चे पोलिस अधिक्षक विश्वास नांगरे पाटिल यानी लिहिला आहे.
|
झकास.. खरोखरच मस्त लेख आहे. अत्यंत विचारपूर्वक माहितीशीर आणि सत्य परिस्थिती मांडणारा लेख आहे.
|
Soha
| |
| Monday, April 09, 2007 - 10:32 am: |
| 
|
माहितीशीर ?? माहितीपूर्ण म्हणायचे आहे का तुम्हाला? पण खरच फारच सडेतोड लेख आहे विश्वास नांगरे पाटील यांचा.
|
च्या मायला... गमतीशीर सारखं म्हणायला गेले,,, चूक लक्षात आणून दिल्यबद्दल धन्यवाद...
|
Zakki
| |
| Monday, April 09, 2007 - 1:20 pm: |
| 
|
च्या मायला... असे बोलू नका हो! हे अगदी शिवीसारखे वाटते, ते सुद्धा सभ्य नि सुशिक्षित स्त्रीकडून ऐकायला कसेसेच वाटते. कुठे घाणेरड्या वस्तीतल्या अशिक्षित, असभ्य माणसाने म्हंटले की काय असे वाटते!
|
मादक पदार्थ (ड्रग) विकणे वा वापरणे हे भारतात बेकायदेशीर आहे. त्याकरता शिक्षा होऊ शकते. पण खरोखर असे असायची गरज आहे का? दारुप्रमाणे ही द्रव्येही मुक्त केली तर काय हरकत आहे? हॉलंड मधे ड्रग्जवर बंदी नाही. पण असे असून सगळा समाज ड्रग्जच्या कचाट्यात आहे, गुन्हेगारी वाढली आहे असे दिसत नाही. उलट तिथली गुन्हेगारी शेजारच्या फ्रान्सपेक्षा कमीच आहे. आणि फ्रान्समधे ड्रग्जवर बंदी आहे. आपल्या देशात पोलिस हे अत्यंत भ्रष्ट आहेत. एखादी गोष्ट बेकायदा केली की पोलिसांना पैसे खायला एक नवे कुरण मिळते. कित्येक उच्चपदस्थ लोक आणि त्यांची पिल्लावळ नि:संकोचपणे मादक पदार्थ सेवन करतात. आपले धडाडीचे (भावी) युवा नेते राहुल महाजन बघा. शिवाय संजय दत्त, फरदीन खान वगैरे. कुणाला त्याबद्दल शिक्षा वगैरे झाल्याचे ऐकलेले नाही. हे पोलिस व अन्य सरकारी अधिकार्यांच्या कृपेशिवाय होत नाही. त्यापेक्षा ड्रग्ज वाईट आहेत असा प्रचार करावा, अल्पवयीन लोकांना ड्रग विकणार्यांना शिक्षा होईल असे पहावे. हे जास्त व्यावहारिक आहे. कुणी प्रगल्भ माणूस अविचार करुन आपल्या पायावर कुर्हाड मारत असेल तर मारु द्या. त्याचा दुसर्याला त्रास होत नसेल तोवर सरकारने काही करु नये असे मला वाटते. सिगरेट, विडी, दारु तसेच भांग, गांजा, चरस, अफू असे म्हटले तर काय चूक?
|
Nanya
| |
| Tuesday, April 10, 2007 - 2:09 am: |
| 
|
>>मादक पदार्थ (ड्रग) विकणे वा वापरणे हे भारतात बेकायदेशीर आहे. त्याकरता शिक्षा होऊ शकते. पण खरोखर असे असायची गरज आहे का? दारुप्रमाणे ही द्रव्येही मुक्त केली तर काय हरकत आहे? खरच कीती सोपे आहे नाही, गुन्हेगारीचे प्रमाण कमी करणे.. मी तर म्हणतो, भ्रष्टाचारदेखिल गुन्हा नाही असे जाहीर केले पाहिजे, म्हणजे गुन्हेगारीचे प्रमाण एकदम ६०% तरी कमी व्हायला हरकत नाही. आणि मग हळुहळु खुन,चोरी इ. सामान्य गुन्हे (?)देखील गुन्हे नाहीत असे जाहीर केले पाहिजे, नक्किच भारत गुन्हेगारीमुक्त होइल..
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|