Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 08, 2007

Hitguj » Views and Comments » Current Affairs » बातम्यांचे / लेखांचे संकलन » Culture » Archive through March 08, 2007 « Previous Next »

Laalbhai
Tuesday, March 06, 2007 - 11:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

म्हणून या असल्या वाईट गोष्टी चालू द्यायच्या की काय ?

>>

नाही नाही, माझ्या म्हणण्याचा हा अर्थ निघतो का? हे चालू द्यायचे, असे नाही. तर अशा गोष्टीत वेळ घालवायचा नाही, असे माझे मत आहे.

सरसकट तरुण पिढी वाईट मार्गाला लागत आहे, ह्याबद्दल आपली मतभिन्नता असू शकते. माझे अनुभव वेगळे आणि फारच सकारात्मक आहेत.


Deshi
Tuesday, March 06, 2007 - 3:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझा रूल आहे No drugs, No booze and no Smoking आईशप्पथ एवढी धमाल आयुष्यात कधी केली नसेल>>>>>

Nandini no offence.

पण रेव्ह पार्टीत तुझ्या सारखी किती जन असतात. (फार फार तर तुच). झिंग आणनार म्यूझीक आहे म्हणुन रेव्ह पार्टीत कोनीही जात नाही.
शिवाय पिअर प्रेशर अशा ठिकानी जास्त येत. (मी पार्टीला येनार पण गांजा नाही पिनार हे कोण ऐकुन घेनार).

तुझ्या लिहीन्यावरुन तिथले चित्र हरे रामा हरे कृष्णा पेक्षा काही वेगळे नाही. (ज्याला अमेरिकेत हिप्पी म्हणतात ते).

तशा पार्टीज ला माझा काहीही विरोध नाही पण अशा पार्टीज मुळेच टीन एजर लोक व्यसनाकडे वळतात हे सत्य आहे.

आता हे फक्त तुझ्या साठी I dont know if you are teenager, patrakaar or artist etc पण तुझ्या कथा वाचुन समहाउ मला वाटत होते की तु पण अशा पार्टीज्ला जात असनार वा जानार.

आपण जे पहातो वाचतो जगतो त्याचे प्रतीबिंब हे आपलया वागन्यात व लिखाणात दिसत असते हे म्हणतात ते काही खोटे नाही.

(मी तुला उपदेश देतोय असा गैरसमज नसावा, फक्त मला जानवलेले लिहील.)

मलाही लालभाई चा मुद्दा काही अंशी पटतो की वृतपत्रांनी तो मुद्दा उचलुन धरायला नाही पाहीजे. पण लालभाई पत्रकारीता हा व्यवसाय असतो जे विकते तेच खपते. तेथे बोध्दीक देऊन काही फायदा नाही.


Mahesh
Tuesday, March 06, 2007 - 4:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी लोणावळा ट्रिप, ३१ च्या पार्ट्या आणी ही असली समाजविघातक पार्टी यात काहीच फरक नाही का ?
तुमच्यासारखे सर्वच असतात असे नाही, उलट कमीच असतात. जास्त लोक या असल्या गोष्टींना बळी पडतात. या असल्या प्रकारांमुळे ईतर व्यभिचारांनाही खतपाणी मिळते. सातच्या आत घरात मधे दाखवले आहेच.


Mansmi18
Tuesday, March 06, 2007 - 4:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला नाही वाटत की पेपर्सनी ही बातमी देउन काही चुक केलि आहे.(अर्थात या बातम्या छापण्याचा त्यान्चा हेतू उदात्त होता असे माझे मत नाही)

ही बातमी देउन आणि त्या मुलान्चि नावे आणि फोटो छापुन इतराना थोडि दहशत बसली तर ती बातमी सार्थक झाली असेच मी म्हणेन.

मजा करणे किव्वा धान्गड्धिन्गा करणे यात काहिच वावगे नाही. तरुणपणात ही मज़ा केलि नाही तरच नवल. परन्तु ती मजा आणि अमली पदार्थचि मजा हे सारखे मानणे हे चुक आहे असे माझे मत आहे.
लक्ष्मणरेशा स्वत्:ला आखुन घेणे वगैरे कागदावर योग्य वाटते पण प्रत्यक्शात किति तरुण मुले हे आखुन घेतिल? 'एकदा करुन पहाण्यात काय हरकत आहे' हा विचार मनात येणे अगदि स्वाभाविक आहे. मला वाटते या रेव पार्टीत अशी बरीच मुले असतील जी "एकदा" आली आणि अडकली.

दुसरा मुद्दा म्हणजे पालकानी सन्स्कार वगैरेचा. कुठले पालक मुलान्वर वाइट सन्स्कार करतील जाणुनबुजुन? शेवटी आपले वर्तन त्या मोहाच्या क्षणी आपल्याकडुन काय घडते त्यावर अवलम्बुन असते. जी मुले पकडली गेली त्यान्च्या पालकानी त्यान्च्यावर चान्गले सन्स्कार केले नसतील असे समजणे चुक आहे.

अशा बातम्या मिडिआ मधे येणे मझ्या द्रुश्टिने अतिशय आवश्यक आहे. विचार करा या बातमीने काही मुलाना जरूर पराव्रूत्त केले असेल तर बातमी देण्यचे सार्थक झाले. असे समजा कि या बातम्या प्रिएम्प्टीव डिटेरन्ट आहेत.(म्हणजे आगाउ परव्रुत्तक:-)

मझेहि २ पैसे.

चु भु द्या घ्या


Disha013
Tuesday, March 06, 2007 - 5:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या कार्ट्यांना असा दणका कुठेतरी मिळाला हे बरे झाले. आता drugs घेताना हजार वेळा विचार करतील, अशी अशा करुयात. police record वर नाव तर गेले. पोलिस कोठडीची हवा चाखली हेही नसे थोडके!

Vinaydesai
Tuesday, March 06, 2007 - 10:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अश्या गोष्टी आता इतक्या होतात की दोन अडिचशे पोराना दणका बसून काही थांबणार नाही.. आणि जे काही झालं त्यात 'बीयर प्यायला आमचं पोरं तिथे आलं असेल' असा बचाव करणारे पालक बघून 'ही पोरं' देखील उद्या परत दुसर्‍या रेव पार्टीत दिसणार नाहीत अशाही भ्रमात राहू नये..

'जगण्यासाठी तो एक क्षण' बाकी नंतर बघू असं ठरवलं, की मग तो क्षण रोज आणायला कोणाची बंदी आहे? नाही का?

गेल्यावर्षी GTG ला जाताना अशीच मजा बघितली.. तरूण पोरं, आणि त्यांना चिकटलेल्या पोरी, मोटरसायकलवर बीयर पीत, हात सोडून (हे करता येतं), भर पावसात सुसाट वेगात निघालेले पाहिले.. ते पण असेच त्या क्षणासाठी जगत असतील... कोण जाणे..?


Chyayla
Tuesday, March 06, 2007 - 10:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पालकानी सन्स्कार वगैरेचा. कुठले पालक मुलान्वर वाइट सन्स्कार करतील जाणुनबुजुन?

मनस्मी अरे यात जाणुन बुजुनचा सम्बन्धच नाही कारण हे जे काही घडत ते अजाणतेपणीच व अज्ञानानीच. सन्स्कार करायला पालक तरी स्वता: तसे हवेत तरच ते करु शकतील. आडातच नाही तर पोहर्यात कुठुन येणार. विनय देसाईन्नी म्हटल्याप्रमाणे ते पालकच बीयर प्यायला आला असेल म्हणुन बचाव करत होते. हे ईथले एकच उदाहरण पुरेसे आहे.

दुसरी गोष्ट सन्स्कार करणे म्हणजे उपदेश देणे नव्हे. तुम्ही बघाल लहान मुल तुमच ऐकणार नाही पण तुमचच अनुकरण करायला चुकणारही नाहीत. तेन्व्हा तुम्हीच जर सद्वर्तन ठेवले तर ते सन्स्कार नकळत मुलानमधे उतरतात.

नन्दिनी ही लक्षमण रेषा काय आहे ते तरी त्याना कळायला हवे ना. ओलान्डणे वैगेरे तर दुरच, आणी या वयात समजायचे म्हणशील तर तोपर्यन्त वेळ निघुन गेली असते, स्वताच्या सदसदविवेकबुद्धीने जर त्याला हे कळले की लक्ष्मण रेषा काय तरच ठीक. पण पाल्यान्चा पुढच्या जीवनात अशा प्रसन्गाना सामोरे जाण्यासाठी पालकान्नी सुसन्स्काराची शिदोरी देणे हे आवश्यक कर्तव्यच ठरते. मुलान्वर आन्धळे प्रेम करुन, सन्स्कार म्हणजे काही तरीच बुरसटलेले विचार व तसेच आधुनिकता म्हणुन स्वता:ची फ़सवणुक करुन सन्स्कार सारख्या महत्वाच्या गोश्टीकडे दुर्लक्ष करणारे पालक म्हणजे खर्या अर्थाने मुलान्चे शत्रुच ठरतात.

पुष्कळदा असही होत तरुण मनाला मोह होतो, हे काय आहे ते अनुभवुन पहाणे यात त्याना एक उत्सुकता असते, साहस (थ्रील) वाटत मीत्रच म्हणतात अरे तु सिगरेट ही पीत नाही छी.. तुझी मर्दानगी आणी बेकार आहे तुझ जीवन अरे मीत्रा एन्जॉय कर... अशा मोहाच्या क्षणी कुणीही भरकटु शकत पण मला वाटत जर त्यावर पुर्वीचे काही सुसन्स्कार असतील तर त्याना हे क्षण टाळण्यास निश्चित मदत होउ शकते.


Sunidhee
Tuesday, March 06, 2007 - 10:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला खरच खुप राग येतोय असल्या मुलांचा.. आपल्या हातानी स्वत:चा नाश करुन घ्यायला निघालेल्या असल्या मुलांबद्दल काय बोलावे तेच कळत नाही !!!!!!!!!?????????
अरे, जरा डोळे उघडे ठेउन आणि मेंदुला गदागदा हलवून आजुबाजुला पहा म्हणावे.. म्हणजे कळेल किती लोक आपल्या लाडक्यांचे असंख्य कारणांमुळे, रोगांमुळे धोक्यात आलेले आयुष्य एक्-एक दिवसानी वाढावे म्हणुन कासावीस होत असतात, नियतीशी झगडत असतात, न थकता सतत प्रयत्न करत असतात... आणि हे ????? ह्यांना नशिबाने निरोगी आयुष्य मिळाले आहे तर आपल्या हातानी नाश करायची ह्यांना बुध्दी होते..
जे लोक खाऊन्-पिऊन माजतात ना (माफ करा जरा तीव्र भाषा आहे) त्याना नियतीने लांबुन तरी हलकासा फटका मारायला हवा म्हणजे अगदी त्यांचे जग उध्वस्त झाले नाही तरी ते झाले तर काय होउ शकते याची त्यांना जाणीव होइल आणि मग जरा वठणीवर येतील.

आता ह्या प्रकरणामधे त्याना जरा तरी शिक्षा व्हायलाच हवी, म्हणजे बाकीचे निदान २ दा विचार करतील तसे करताना. सुरुवात कुठुनतरी व्हायला हवीच. आणि वर्तमानपत्रांनी सुरु केले आहेच तर आता ह्याचा निकाल लागे पर्यन्त मागोवा घ्या म्हणावे, नाहीतर सनसनाटी छापायचे आणि मग अर्ध्यातच सोडुन द्यायचे.. पुढे काय ते कोणाला कळतच नाही.

आहेत, ह्या पेक्षा गंभीर प्रश्न आहेत पण त्याला हात लावत नाहीत म्हणुन ह्याला पण नाही लावायचा असे कसे चालेल?


Mahesh
Wednesday, March 07, 2007 - 12:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आजूबाजुचं वातावरण इतकं धुंद होतं की बास... कुणालाच उद्याची पर्वा नव्हती. जो तो या क्षणासाठी जगत होता.. काय पाप आणि काय पुण्य? कोण संस्क्रुती?
अरे वा काय पाप आणी काय पुण्य काय संस्कृती काय ? एकदा का या असल्या मोहमयी स्वार्थी जगण्याची चटक लागली की संयम नसणार्‍यांचे आणी त्यांच्या संबंधितांचे पुढचे सगळे क्षण वाया जातात.

आपल्या संस्कृतीमधे अनेक सण आणी उत्सव आहेत की असले आनंद मिळवण्यासाठी. अर्थात त्यांचेही स्वरूप बदलले आहे. नीट विचार करून पहा या सर्व गोष्टी मानवी जीवनात आवश्यक आहेत याचा विचार करून आपल्याकडे काही उत्सवांमधे बंधने कमी केलेली आहेत. उदा. महाशिवरात्र, होळी, धुळवड, गटारी अमावस्या
जेणे करून ईतर दिवशी चांगले वागताना मनावर जो ताण असेल तो हलका होईल. गणपती उत्सवात हल्ली बायकापण मनसोक्त नाचत असतात. पुर्वीसारखे घरच्यांच्या धाकात फारसे कोणीही नाही तरीदेखील लोकांना त्याच्या पुढच्या पायर्‍या हव्या आहेत.


Deepanjali
Wednesday, March 07, 2007 - 12:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गणपती उत्सवात हल्ली बायकापण मनसोक्त नाचत असतात. पुर्वीसारखे घरच्यांच्या धाकात फारसे कोणीही नाही तरीदेखील लोकांना त्याच्या पुढच्या पायर्‍या हव्या आहेत.
<<<<<हे बायकांच्या बाबतीत जे statement केलय त्याचा अर्थ काय हो महेश ??


Bee
Wednesday, March 07, 2007 - 2:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उदा. महाशिवरात्र, होळी, धुळवड, गटारी अमावस्या
जेणे करून ईतर दिवशी चांगले वागताना मनावर जो ताण असेल तो हलका होईल. >> ही गटारी अमावस्या काय प्रकार आहे :-)


बाकी नंदीनेचे पोष्ट मला जॅम आवडले. पण नंदीनी इतक्या समंजस मुली वा मुले नसतात. त्यांना हे कळत की ह्यातला काय चांगल आणि काय वाईट आहे पण वळत नाही. त्यामुळे ती नादावतात आणि वाया जातात. शिक्षण ही जशी काळाची गरज आहे तशीच सुसंस्कृत होण किंवा राहणं ही देखील काळाजी एक अत्यंत मोठी गरज आहे. पण होत असे आहे की आमचा मुलगा मुलगी batchelors/masters आहेत पण बिचारे सुसंस्कृत नाहीत.


Limbutimbu
Wednesday, March 07, 2007 - 4:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुणाला "दऽऽऽम मारोऽऽऽऽ दमऽऽऽऽऽ मीट जाएऽऽऽ गऽऽऽऽऽम्मऽऽऽऽऽऽ
बोलो शुभ शाऽऽऽऽऽऽऽऽम
हरे कृष्णाऽऽऽऽऽ हरेऽऽऽऽ राऽऽऽऽम हे प्रसिद्ध गाण आठवतय का????????
किती वर्षान्पुर्वी ते चित्रित केल होत???
काय काय दाखवल होत?? का?????
आज इतक्या वर्षान्नतर तसच काही एखाद दुसर "विषय" चघळायला मिळाला म्हणुन मिडीयाने उचलल तर आपणही आमचा आख्खा समाज रसातळाला चाल्ला म्हणुन उर बडवुन घ्यावा का??
या सगळ्या प्रकरणात वर कुणीस म्हणल हे तो "आर्थिक" व्यवहाराचा खर तर "तोडीचा" व्यवहाराबद्दल काय मत हे????
अशा पार्टिज झाल्या तरच "मादक द्रव्यान्बद्दल" कारवाई होणार का??? त्यान्च्या मुळा पर्यन्त जायला कुणाला कुणाची बन्दी हे?????
की उगिच एखाद दुसरी पार्टी उधळवुन, शे दोनशे पोट्टेपोट्टी आत घालुन "कारवाई" केल्याचे रेकॉर्ड तयार केले जातय???????
अनेक प्रश्ण हेत!
मी अशा पार्ट्यान्चे समर्थन करीत नसुन, अशा पार्ट्यान्ची क्वचित येणारया बातमी वर काय प्रतिक्रिया द्यावी याचा विचार करतो हे!

Yogy
Wednesday, March 07, 2007 - 4:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वृतपत्रांनी तो मुद्दा उचलुन धरायला नाही पाहीजे हे अतिशय चुकीचे वाक्य आहे.

लालभाई तुम्ही संस्कार, संस्कृती, परंपरा वगैरे सगळे मुद्दे विसरुन विचार करा. (काही लोकांनी या शब्दांना अतिशय चुकीचा अर्थ दिला आहे ही गोष्ट मला मान्य आहे.)

अमली पदार्थांचा प्रसार व एड्सचा प्रादुर्भाव यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. उद्या हे अमली पदार्थ कॉलेजच्या कॅन्टीनमध्येही मिळतील. पुण्यातील विद्यार्थीवर्गाची मोठी संख्या लक्षात घेता या गोष्टीचा प्रसारही वेगाने होऊ शकतो. दहा वर्षांपूर्वी अमली पदार्थांनी मुंबईत घातलेले थैमान आठवा.

पुणे हे आंतरराष्ट्रीय पातळीवर अमली पदार्थांच्या व्यवहाराचे केंद्र होऊ शकते. गुन्हेगारीची वाढ, गॅंगवार वगैरे गोष्टी पुढे येतीलच.
आपल्या आजूबाजूला जे घडत असते त्याचा प्रभाव अर्थातच आपल्या आयुष्यावर पडतो.

झालेली घटना ही अतिशय गंभीर होती. पुण्याच्या पायाखाली काय जळत आहे याची जाणीव या निमित्ताने झाली.

Sherloc
Wednesday, March 07, 2007 - 4:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

LT, बरं झालं तुम्ही एकडे फिरकलात ते.
हे व्यवहार खरोखरच "तोडीचे" असतात. त्यासाठी पोलीसांच्या वेगळ्या "कार्यशाळा" चालतात. पोलीस, मग तो राजाराम कॉलेजमधला असु दे नाहीतर फर्ग्युसनमधला, जात शेवटी एकच. जोपर्यंत मी पोलीसातल्या "माणसाचा" प्रत्यक्ष अनुभव घेत नाही तोवर माझे विचार हेच राहणार.
माझ्याबरोबर शाळेत शिकणार्‍या एका मित्राची आई घरामागच्या शेतात हातभट्टी लावायची. मित्राच्या वडीलांचे लवकर निधन झाल्याने त्या आईने उपजिविकेचा मार्ग म्हणुन याची निवड केली. रोज संध्याकाळी त्यांची दोन्ही मुले दुधाचा रतीब असावा इतक्या सहजतेने दारुच्या बाटल्या पोहोचवायची. त्यातला मोठा पदवीधर झाला तर धाकटा चक्क ईन्जीनीअर झाला. हे सर्व त्या हातभट्टीच्या धंद्यामुळे शक्य झाले. पण घरात दारु गाळत असुनही त्या दोन्ही मुलांना कुठलेही व्यसन लागले नाही. आज ते दोघही आपल्या आईबद्दल अभिमानाने बोलतात. गावामध्ये विदेशी मद्याची दुकाने राजरोस चालत असताना यांना मात्र कायम पोलीसांचा त्रास सहन करावा लागला. जो पोट भरतो तो कुठलाही धंदाऊद्योग वाईट नाही. वाईट असतो तो समाज, इथल्या बिनकामाच्या रुढी, चाली आणि
so called परंपरा.
आज प्रत्येक पिढीला याचा फटका बसला आहे. त्यामुळे बंधन झुगारुन टाकताना कधी-कधी स्वत:चे नुकसान होते. पण ते प्रत्येकाचे प्रत्येकाला समजले पाहीजे.
मी आदीमानवाचा उल्लेख केला. आज कितीजण मनापासुन कायदे पाळतात. आणि जर मनाला पटत नसेल तर हळुहळु हे कायदे नष्ट होतील आणि पुन्हा आपण कुठलेही कायदे, सुव्यवस्था नसलेल्या स्थितीत पोहोचु.
Nostradamus ने वर्तवलेली जगबुडी मला वाटत तीच असेल.

(लेखनसीमा)


Kedarjoshi
Wednesday, March 07, 2007 - 4:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ज्यांना एकदम ही बातमी पुण्यात घडली याचे नवल वाटत आहे त्यांचा साठी.

पुणे म्हणजे काय वेगळ गाव आहे का? जगप्रसिध्द बुधवार पेठ याच गावात आहे. अनेक लोकांना मी पुण्यात फक्त या कारणा साठी आलेले बघीतले आहे.

आजुबाजुला निट पाहीले तर डेक्क्न वर जनसेवा च्या समोर गर्द मिळत असे. रुपाली हॉटेल समोर एक मुतारी होती तिथे गर्द, चरस व समलिंगी लोकांचा पार्ट्या ठरत असत (असे ऐकीवात आहे मी त्यातला नाही). त्यामुळे ति मुतारी पाडन्यात आली. काही पाणपट्यांवर आजही शॉटस मिळतात ही वस्तुस्तिथी आहे. आणी हे सगळे पुण्यातच घडत आहे, अमेरिकेत नाही. त्यामुळे ही पहिली वेळ नाही व शेवटची तर नक्क्कीच नाही.
१९९५ च्या आसपास जिगलोच्या पार्ट्या मुंबईतल्या एका बिच वर होतात व तिथे तेच कल्चर आहे अशा बातम्या आल्या होत्या (टाईम्स पासुन मटा
पर्यंत), काय झाले लोक काही दिवस बोलले व विसरल्य त्या पार्‍ट्या कदाचीत आजही चालु असतील.

त्यामुळे हे सर्व प्रत्येक गावात असतच. कुठे कमी कुठे जास्त.
खुन करनार्यांना शिक्षा दिली हे रोज पेपरात येत ( काही अपवाद सोडता) तरी कोणी खुन करन्याचे थांबवत नाही.

म्हणुन पेपरात आले काय नी न आले काय फार फरक नाही.

मुळात अशा पार्ट्या होऊ नयेत पण
अशा पार्ट्यात लोकांना झिंग येते म्हणे तर त्याला आप्ण कोण रोखनार. फक्त ईतकेच पाहाय्चे की " आपले " कोणी तिकडे फिरकनार नाही. कारण ऐकदा तिकडे गेले की मग मनाचा ताबा बिबा ह्या गोष्टी झुट आहेत. एकदा त्यात गेला की तो झुरका मारणारच (हां अगदी वय जर ३० च्या पुढे असेल तर तो ताबा राहु शकतो अन्यथा नाही).

कुनाचा भावना दुखविल्या असतील तरी क्षमस्व असे लिहीनार नाही कारण अशा लोकांचा २ मिनीटाच्या झिंगे मुळे बाकीच्या लोकांचे आयुष्य उद्वस्त होते. पण गंमत अशी की त्या झिंगे ला विरोध केला की आपण म्हने मागासवर्गीय.


Mansmi18
Wednesday, March 07, 2007 - 8:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार

मला वाटते आपण समजतो त्यापेक्षा हा गम्भीर प्रश्न आहे. या अशा पार्ट्यन्चा सम्पूर्ण नायनाट व्हायला हवा. म्हणा हवे तर मला मागासलेला.
या पार्ट्यान्चे अमली पदार्थापर्यन्त मर्यादित राहत नाही. मजल शरीरसम्बन्धा पर्यन्त जाते. त्यातून एचाय्वी चि लागण व्हायची शक्यता वाढते.

क्षणभर विचार करा तुमचि मुलगीमुलगा लग्नाचि आहे आणि तिला असे फ़क्त "एकदा" मजा केलेल्या पण एर्वी सरळ असणार्या मुलाचेमुलिचे स्थळ आले. तुम्हाला माहीत नव्हते हे काही आणि तुम्ही लग्न करुन दिलेत. त्यानन्तर त्याना लागण झाली. दोश कुणाचा आहे?
एकदा चुक झाली वगैरे बोलायला सोपे वाटते पण प्रत्यक्ष आपल्या दरवाज्यात हे सन्कट उभे राहिले कि आपल्याला कळते.

हा प्रश्न सदैव चर्चेत रहावा आणि तरूण पिढिवर हे प्रेशर कायम राहिले पाहिजे. कोणि कोणाबरोबर मजा करावी, अमली पदार्थ घ्यावे आणि आयुश्य बरबाद करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण जेव्हा हे वर्तन दुसर्याच्या आयुश्यशी खेळ करते तेव्हा ह प्रश्न वैयक्तिक रहात नाही.

एका मुलिचा पिता या नात्याने हा सगळा विचार करुन आताच केस पान्ढरे व्हायला सुरुवात झाली आहे. अजुन वीस वर्शानी आपण आणखी काय काय पहावे लागेल देव जाणे.


Mahesh
Thursday, March 08, 2007 - 4:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनस्मि, १००% अनुमोदन,
खरेतर दारू, सिगारेटपण वाईटच आहेत, पण त्याला उगीच प्रतिष्ठा मिळू लागली आहे.
मी बायकांच्या नाचण्याचे जे विधान केले आहे त्यात एवढे चकित होण्यासारखे काय आहे मी फक्त नमूद केले ईतकेच. ते चांगले की वाईट याबद्दल मी लिहिलेले नाही. तो वेगळा विषय होईल वादाचा त्यामुळे त्यावर आत्ता काही लिहित नाही.

पुणे हे महाराष्ट्रातच नव्हे, भारतात अनेक चांगल्या कारणांसाठी प्रसिद्ध आहे. शिवाजी महाराजांनी जिर्णोद्धार करून नावारूपाला आणलेले, पेशव्यांची राजधानी, विद्येचे माहेरघर, आणी आता होऊ घातलेली आर्थिक उपराजधानी. अजुनही खुप चांगल्या गोष्टी बरेचजण सांगू शकतील. आणी यासाठीच पुणे हे ईतर शहरांपेक्षा वेगळे आणी निःसंशय चांगले आहेच आहे. केदार जोशींच्या लिखाणाला उत्तर म्हणून लिहिले आहे. कृपया पुढची सगळी चर्चा पुणे चांगले की वाईट या विषयाकडे जाऊ देऊ नये ही विनंती.


Tawaal
Thursday, March 08, 2007 - 4:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लालभाऊकडे काल मी २१ अनुमोदक दिलेत. ते या पानावरच्या समद्यानी वाटुन घेवा. आपले लालभाऊ कम्युनिष्ट हेत. ते या वाटाघाटीला नाही म्हणायचे नाहीत.

(लेखन-रमेश देव)



Tawaal
Thursday, March 08, 2007 - 4:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"जो पोट भरतो तो कुठलाही धंदाऊद्योग वाईट नाही."
ह्यो बरोबर बोल्ला. ते बॉम्बस्फोटतले आरोपीपण हेच सांगतायत की आम्ही फक्त पोटासाठी
RDX ची चढ-उतार, वाहतुक केली होती. त्यान्ला पण सोडुन दिले पाहीजे.
(ह्यो मला भेटला तर मीबी "पोटासाठी" याचं टाळकं फोडणार आहे नी पकडल्यावर मायबोलीवरच्या पुणेकरांनी मला सुपारी दिली होती असे सांगणार आहे. कशी वाटते आयडीया?


Yogy
Thursday, March 08, 2007 - 11:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

टाईम्स ऑफ इंडिया वाल्यांनी किती निर्लज्जपणे रेव्ह पार्टीचे समर्थन केले आहे हे वाचा
http://timesofindia.indiatimes.com/OPINION/Editorial/TODAYS_EDITORIAL_Party-poopers/articleshow/1728936.cms

पुणेकरांनीही उत्तर भारतीयांप्रमाणे होळीला असेच तमाशे करावेत हा सल्ला दिला आहे

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators