|
Jadhavad
| |
| Monday, March 05, 2007 - 12:51 pm: |
| 
|
म. टा. वार्षिक मध्ये आलेला हा लेख. CENTER's CALL http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2207202.cms मागे हा लेख वाचुन अंगावर शहारे आले, पण आजची ही 'पार्टी' ची बातमी वाचल्यानंतर विश्वास पटला, की खंरच, हातात पैसा असला आणि त्या पैशाची किंमत नसली, तर पैसा खर्च करतांना तो उधळला जातो. १८-२५ वयोगटातल्या ह्या रईस-जाद्यांना सिंहगड रोडचा अलीकडची छोटी घरे अणि झोपडपट्टी बरी नाही दिसली. एखाद्या भुकेल्याला घास भरविन्या एवजी चरस,गांजा, कोकेन ह्याना घ्यावेसे वाटते. एखाद्याला पानी देन्या एवजी ह्याना बीअर आणि दारु ची can संपवावीशी वाटते. एखाद्या उघड्या अंगाला थंडी पासुन वाचविण्यासाठी त्याला कपडे देण्याएवजी छोटे कपडे घालण्यात वा कुणाचे छोटे कपडे काढण्यात ह्या दिवट्यांना interest . चुक ह्यांची नाही, ह्याच्या पालकांची, घरच्यांची. अकलेपेक्षा पगार जास्त. पैसा अमाप, खर्च करायला जागा नाही. विचारायल कुणी नाही. सगळे बरे-वाईट "धंदे" करुन झाले, तरी पैसा आहेच. बरं त्या ३ air-hostess . सगळ जग बघितलेल. सगळ्या जगाची चव चाखलेल्या. आता फ़क्त हे दिवे लावयचे बाकी. आणि त्या साठी पन पुणे च सापडले. संस्क्रुतीच्या राजधानीत हे घडले तरी ही अर्थात "आग" असल्याशिवाय "धुर" निघत नाही म्हणा. नावे नीट बघा, मराठी नावे ही आत तेवढ्याच तोला-मोलाने दिसतात. आणि जवळ्-जवळ ५० मुली. सिंगापुर मध्ये असलेली NAGGING ची शिक्षा करुन त्यांच बुड फ़ोडुन काढायला पाहीजे एक्-एकाला... मग मुलगा असु द्या की मुलगी.
|
Zakki
| |
| Monday, March 05, 2007 - 2:45 pm: |
| 
|
मला वाटते की काही बहकलेल्या, मूर्ख मुलांनी असले काहीतरी केले, त्यावरून एकदम 'आतली, बाहेरची संस्कृति,' 'असले व्यवसाय' वगैरे सारखी गंभीर चर्चा करायची गरज नाही. या मुलांचा नि संस्कृतिचा काही संबंध नाही. संस्कृति अजून शिल्लक आहे (मी आशावादी आहे). शे दोनशे लोक वाईट असले तरी लाखो लोक (अगदी IT मधे असून खूप श्रीमंत झालेले) अजून इतके बेताल झालेले नाहीत (नसावेत). उगीच एखाद्या दिवशी जरा सर्दी पडसे झाले तरी कुणि लगेच मरतात की काय असे वाटायची गरज नाही, तसेच एका घटनेवरून एकदम राईचा पर्वत करू नये. या मुलांना आता शिक्षा अशी जबरदस्त व्हावी की इतरांनी त्या पासून धडा घ्यावा, नि असले चाळे करू नयेत.
|
Mansmi18
| |
| Monday, March 05, 2007 - 2:51 pm: |
| 
|
नमस्कार, हि रेव पार्टी म्हणजे काय असते? झी न्युज वर पाहिले पुण्यात काहीना अटक झालि आहे. मी रेव पार्टी बद्दल कधि एइकले नाही म्हणुन विचारतो आहे. धन्यवाद.
|
Laalbhai
| |
| Monday, March 05, 2007 - 3:33 pm: |
| 
|
मी आशावादी आहे >>> मोठे महत्वाचे वाक्य आहे! जे समाजात मिसळतात, ते आशावादीच असतात. जे वर्तमानपत्रापलिकडे (किंवा तेही नाही!) बघत नाहीत, ते निराशावादीच होतात. ह्याचे मोठे चांगले उदाहरण अब्दुल कलामांनी दिले परवा. कुठे वाचले ते आठवत नाही. त्यांच्या मते आपण लोकं negative गोष्टींचाच जास्त विचार करतो. आपल्या भोवतीच्या positive गोष्टींचा विचारच आपण करत नाही. त्यासाठी तेल अविवचे (इस्त्राईल) उदाहरण त्यांनी दिले. ते एकदा तिकडे गेले असताना, नेहमीप्रमाणे हमासच्या हल्ल्यात अनेक लोक मृत्युमुखी पडले. पण प्रमुख वृत्तपत्रांनी त्या बातमीला ठळक स्थान देण्याऐवजी, कोणत्यातरी शास्त्रज्ञाने काही महत्वाचा नविन शोध लावला, त्याला पहिल्या पानावर प्रसिद्धी दिली! ही सकारात्मकता आहे. केवळ जहाल भाषणे करूनच देशभक्ती प्रज्वलित होते, असे मानणारे महाभाग ह्या उदाहरणावरून बोध घेतील काय? सननाटीपणाने तात्पुरते "एकत्रिकरण" होत असेलही, पण ते मुख्यतः नकारात्मक मानसिकतेतून होते. असा नकारात्मक मानसिकतेचा गट काहीही विधायक कृत्य करू शकत नाही. असो, विषयांतर झाले असेल तर माफ करा. पण फालतू प्रकरणाला वर्तमानपत्रांनी फाजिल प्रसिद्धी दिली आणि लोकांना चघळायला काही विषय मिळाला. ह्यापलिकडे ह्याचे महत्व नाही.
|
लालभाई, अगदी पटले! द्राक्षे आम्बट. दुसरे काय?
|
Disha013
| |
| Monday, March 05, 2007 - 6:34 pm: |
| 
|
मधे बोलल्याबद्दल क्षमस्व. बिनतोड मुद्दे लालभाई. वरील पैकी कुठल्यातरी लिंक मधेच लिहिलेय....याआधी नुकतिच कुठेतरी अशी पार्टी झालेली.... अनेक झालेल्या असतिल आणि होतिलही. हिच्यावर छापा पडला आणि ठळक बातमी झाली इतकाच फ़रक.
|
पुण्याचे दुर्दैव, बाहेरची हलकट संस्कृती (विकृती) फोफावते आहे. हे सर्व पुण्यात घडलं ह्याच मला सर्वाधिक वाईट वाटलं. <<<<फ़क्त पुण्यात घडलं म्हणून वाईट वाटावं ? देशात इतर ठिकाणी घडले तर चालेल का ?? आणि पुण्यात सुध्दा हे काय फ़क्त अत्ता होत आहे का ? अत्ता एक घटना उघडकीला आली इतकेच ! संस्कृती ची राजधानी असली म्हणून काय झाले , तिथे गुन्हे घडतच नव्हते का कधी ? व्यसनाधीन लोकांची समस्या कित्येक वर्षां पासून सगळी कडेच आहे / होती , पुण्यात सुध्दा ! फ़क्त व्यसने बदलली असतील काळा प्रमाणे ! बाकी झक्कींना अनुमोदन , समाजातील काही लोक असे वागले म्हणून काही अख्खी तरुण पिढी बरबाद होत नाही .
|
Chyayla
| |
| Tuesday, March 06, 2007 - 12:49 am: |
| 
|
मुळात वेश्याव्यवसायाची गरज असणे हेच त्या समाजचा पराभव आहे लाख बोललात... बडबडी, झकासराव, महेश तुम्हाला पुर्ण अनुमोदन. अजुन एक... या घटनेमधे केवळ १५ मराठी स्थानिक मुल पकडण्यात आलीत बाकीचे सगळे बाहेरुन आलेले होते. पण हे प्रमाण मराठी मुलातही फ़ोफ़ावत आहे त्याबद्दल काळजी घेणे गरजेचे आहे. अर्थातच हे सगळ घडायला कुणाचे निर्बन्ध नसल्यामुळे असे बेताल वागु शकतात शिवाय भरपुर पैसाही, काही झणाना श्रीमन्ती, पैसा पचवता येत नाही ते खर, कधी कधी अस वाटत "गरीबीपण देगा देवा" पण दुसरीकडे पैसा नाही, चिन्ता आहे असे म्हणुन दारु ढोसणारे ही पाहिलेत. तेन्व्हा हा आतले, बाहेरचे, गरीब, श्रीमन्त असला काही भेद ही विकृती मानत नाहे हे लक्षात घ्यावे. सुसन्स्कारीत सन्स्कृतीचा अभाव हेच ह्या विकृतीचे कारण. माणुस केवळ सुशिक्षीत होउनही काहीच अर्थ नाही तो तरीही पशुच केवळ सुसन्स्कार त्याला माणुस बनवते व आपली सन्स्कृती तर यापेक्षाही उच्च म्हणजे ईश्वरत्वाचा आत्मसाक्षत्कार करवते. मानवाला तो केवळ पापी नसुन अमृताचे पुत्र म्हणुन सम्बोधणारे विवेकानन्द अशान्च्या विचारान्ची गरज आजही तरुणाना आहे नव्हे उलट त्याची जास्त निकड आहे. खरच अशा वेळेस आठवत लहानपणी शुभमकरोती म्हणायला लावणारी मोठ्यान्च्या पाया पडायला लावणारी आई, देवाजवळ दीवा लावणारी, तुळशीला पाणी घालणारी वैयक्तिक सन्स्कार घडवणारी आई, तर शिस्त लागावी, सामाजिक सन्स्कार घडावेत म्हणुन सन्घात पाठवणारे बाबा... किती नकळत सन्स्कार घडत असतात. मुल सन्स्कारीत होण्यासाठी आधी पालकानीच तसे व्हायला पाहिजे हे खर. या छोट्या छोट्या गोष्टीत किती मोठा आशय असतो अगदी जगाला पुरुन उरेल इतका याची खात्री पटते. मी तर असेही पालक पाहिलेत की जर त्याना सान्गाव तर पटत नाही कीन्वा म्हणतात "लडका ऐश कर रहा है करने दो, अरे हमने भी अपनी जवानी मे...". अशाना पालक म्हणावेत? ही त्यान्ची ऐश सन्स्कृती. स्वातन्त्र्य जरुर द्या पण मर्यादा ओलान्डुन स्वैराचार होणार नाही व त्यातुन आयुष्य उध्वस्त होणार नाही याचेही भान शिकवा. तर काही तरुण असल्या फ़सव्या सन्स्कृतीला बळी पडुन स्वताला मॉडर्न म्हणवुन घेण्यासाठी घरच्या आइ-बापान्चा विश्वासघात करतात. खरेच आहे स्वातन्त्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे तर काही जबाबदारी पण आहे. आभाळातुन पडलेले पाणी जर स्वतन्त्र म्हणुन नुसते वाहीले तर त्याचा काही उपयोग होत नाही पण त्यालाच जर बान्ध घातला तरच उपयोगात आणता येत. परमेश्वाराने दीलेले हे अमुल्य आयुश्य त्याचा खरा आनन्द लुटण्यापेक्षा असेच वाहवत न्यायचे? पण मला वाटत मुलाना लहानपनीच सुसन्स्काराद्वारे बान्ध घालुन जीवनाचा निर्मळ आनन्द जन्मभर लुटण्यासाठी पालकान्ची मोठी जबाबदारी आहे.
|
Saavat
| |
| Tuesday, March 06, 2007 - 5:11 am: |
| 
|
>>>आपली सन्स्कृती तर यापेक्षाही उच्च म्हणजे ईश्वरत्वाचा आत्मसाक्षत्कार करवते. मानवाला तो केवळ पापी नसुन अमृताचे पुत्र म्हणुन सम्बोधणारे विवेकानन्द अशान्च्या विचारान्ची गरज आजही तरुणाना आहे नव्हे उलट त्याची जास्त निकड आहे. खरच अशा वेळेस आठवत लहानपणी शुभमकरोती म्हणायला लावणारी मोठ्यान्च्या पाया पडायला लावणारी आई, देवाजवळ दीवा लावणारी, तुळशीला पाणी घालणारी वैयक्तिक सन्स्कार घडवणारी आई,किती नकळत सन्स्कार घडत असतात. मुल सन्स्कारीत होण्यासाठी आधी पालकानीच तसे व्हायला पाहिजे हे खर! च्यायला, १००% अनुमोदन! आई,तुळस,देवघर.. सगळ्या सुखसोईनीयुक्त,अगदी काथ्याकूट करून ठरविलेल्या सुसज्ज फ़्लटच स्वप्न पुर्ण झाल्यावर,रहायला गेल्यानंतर, फ़्लटमध्ये 'देव' कुठ ठेवायचे असा प्रश्न पडणारी आपली पिढी...! नशीब त्या देवांचे की त्यांची आठवण तरि होते... धन्यवाद!!
|
Sherloc
| |
| Tuesday, March 06, 2007 - 5:14 am: |
| 
|
मान्य आहे की मी पहीली पोष्ट जरा उपरोधानेच केवळ विचारमंथन व्हावं म्हणुन केली होती. मीही एक सर्वसामान्य माणुसच आहे. त्यामुळे ही बातमी वाचल्यानंतर पहीला विचार "बरं झालं, या लोकांना चांगली अद्दल घडली" हाच होता. पण, आता मी जो stand घेतला किंवा ओढवुन घेतला त्याचे समर्थन करण्याच्या दृष्टीने विचार सुरु झाले. दुर्दैवाने माझ्यानंतर इथे खुपच विषयांतर झाले. "पोलिसांचे अर्थकारण" हा खरा माझा मुद्दा होता. आज मी दिवसाचे सोळा तास मुंबईत असतो. पहाटेची कसार्याहुन येणारी लोकल मी आसनगावला पकडतो. कल्याण स्टेशन येईपर्यंत First-Class च्या डब्यात मला साथ असते ती पोलीस हवालदार आणि चरसी गर्दुल्ल्यंची. हाच प्रकार रात्री परतीच्या प्रवासातही गेले कित्येक वर्ष चालु असल्याने मला या दोन्ही जमातींविषयी बर्यापैकी माहीती आहे. मुंबईभर पसरलेल्या गर्दुल्ल्यांना पकडायची हिंमत या पोलीसांकडे का नसते? जयबाला आशर चा मारेकरी किंवा आता मुंबईत गाजत असलेले सिरीयल किलरचे प्रकरण ही पोलीसांच्या याबाबतीतल्या निष्क्रियतेची उदाहरणे नाहीत का? यांच्या धाडी कश्या प्रकारच्या असतात हेही आता सर्वश्रुत आहेच. आता दुसरा मुद्दा, संस्कृतीचा. हे "पुण्यात" घडले याचे "ईथल्या म्हणजे मायबोलीवरच्या" संस्कृतीरक्शकाना खुपच वाईट वाटलेले दिसले. म्हणजे मुंबईत काय किंवा इतर उर्वरित भारतात जर घडले असते तर ते तितकेसे गंभिर नसते. आज सर्व जगच Global Village बनत असताना पुणे, मुम्बई, नासिक, नागपुर या नावांना काय अर्थ उरला आहे? घडलं ती जागा महत्वाची नसुन का घडलं त्याचं कारण महत्वाचं का वाटत नाही? आजुबाजुला जर डोळे उघडे ठेवुन बघीतलं तर आपण पुन्हा एकदा आदीमानवाच्या काळाकडे जातोय हे दिसेल. आजच्या पिढीच्या fashions आणि आदीमानवाची वल्कले यामध्ये साम्य दिसतं की नाही? संस्कृती काय किंवा संस्कार काय, घडवतो म्हणुन घडत नसतात तर माणसाची मुळ वृत्ती त्याला अनुकुल असावी लागते. आज अमली पदार्थ ही जर आपण किड समजतो तर social drinking च्या नावाखाली चालणारे दारुकाम काय "शोभेचे" असते? वयाच्या पंधराव्या वर्षी जर मुलगा(गी) दारु पीत असेल तर पंचविसाव्या वर्षापर्यंत त्याला दारुची नशा चढेनाशी होते. मग आणखी नशा पाहीजे. जे पकडले गेले ते बिघडुन खुप वर्ष झाली आहेत हे लख़्शात घ्या. ते असे ना तसे, बिघडणारच होते. त्याना पकडण्यात कसली आली आहे मर्दुमकी? समजा ही पार्टी यशस्वी झाली असती, तर त्याने "आपल्या" समाजाचे काय नुकसान झाले असते? आज आमच्या गावात ठराविक काळानंतर बलुची (ईराणी) लोकांच्या टोळ्या येतात. हे लोक अमली पदार्थांचे "आद्य" वाहक आहेत. या टोळ्या आल्या की गावात हमखास चोर्यांचे प्रमाण वाढते. मी एक वर्षापुर्वी याबाबत रितसर तक्रार नोंदवली होती. त्यावर कारवाई होईपर्यंत ती टोळी निघुन गेली होती. मग एका सहप्रवासी हवालदाराला याबाबत विचारले तेव्हा त्याने सांगीतले की "काय करणार, हे लोक गुन्हेगार आहेत हे आमच्या सर्व सायबांना माहित आहे. पण सरकारी कायदे असे आहेत की यांना अटक केली की लगेच गावातले "मानवाधिकार समितीचे" लोक धावतात. "भटक्या विमुक्त" जमातींवर पोलीसी अत्याचाराच्या बातम्या छापुन आणतात."
|
Mahesh
| |
| Tuesday, March 06, 2007 - 7:30 am: |
| 
|
पुण्यात हलकट संस्कृती (विकृती) वाढते आहे असे लिहिले याचा अर्थ असा नाही की ईतर ठिकाणी असे झाले तर चांगले आहे. पुण्यात अवैध गोष्टी एवढ्या घाऊक प्रमाणात आल्या असतील असे वाटले नव्हते. मुंबई, दिल्ली सारख्या ठिकाणी या शक्यता जास्त असतात. असो... आपल्याकडे पोलिस, राजकारणी, गुंड, ई. लोक मिळून एवढी मोठी लोकशाही यंत्रणा कशी काय चालवतात देव जाणे...
|
Bee
| |
| Tuesday, March 06, 2007 - 7:50 am: |
| 
|
बाहेरच्या शहरातून वा राज्यातून पुण्यात येणारी मुले शिकायला किंवा नोकरी मिळवायला येतात. मराठी लोकही बाहेरच्या राज्यात वा शहरात नेमक्या ह्याच कारणांसाठी जातात. मग आपण तेवढे सुसंस्कृत आणि बाहेरुन पुण्यात आलेले विकृत असे सरळसरळ विधान कशाच्या आधारावर करण्यात येत आहे? होळी हा सण असा आहे जिथे दंगा मस्तीला फ़ार वाव आहे. भांग घेणे हे तरी कुठे उचित आहे तरिपण धुळवडीच्या दिवशी भांग घेणारे युवक तुम्हाला आढळतीलच. म्हणून ते सर्व युवक बिघडलेले किंवा समाजघातकी आहेत असे म्हणता येत नाही. फ़क्त सण साजरा करण्याची त्यांची ती पद्धत चुकीची आहे. ती पद्धत आमच्या पुर्वजांनीच निर्माण केली आहे. धोपटमार्गावर चालण्याचा इथे प्रत्येकाला अधिकार आहे. नव्हे प्रत्येक जण धोपटमार्ग स्विकारुनच आपले जीवन सरल बनवतो. मग हे सणवार ते आपण सहजपणाने साजरे जे करतो त्यात आधी जसे कुणी केले तीच रितभात आपण अंगीकारतो. माझ्या मते छायाचित्रांमधे आपला चेहरा दो हाताच्या ओंजळीत लपविणार्यांमधे बरेच युवक हे रेव उधाणाला बेजबाबदार आहे. 'पुणे तिथे काय उणे' म्हणून पुण्याची प्रतिमा इतकी स्वच्छ आणि निरागस आहे माझ्या मनात की असले प्रकार पुण्यात घडतात ह्याचे मला वाईट वाटते. पुण्यवंताची भुमी आहे ही. इतिहास विसरलात का
|
Laalbhai
| |
| Tuesday, March 06, 2007 - 7:52 am: |
| 
|
कुलकर्णी, "संस्कृती" च्या नावाने शिमगा करायला आणखी एक कारण, दुसरे काय? कशातून कोण काय मुद्दा काढेल, काही सांगता येत नाही. आता "सामना" म्हणतो की "सिंहगडाच्या पायथ्याशी" हे झाले म्हणून वाईट! सगळाच विनोदी प्रकार आहे. सनसनाटीपणाचे व्यसन जे संपूर्ण समाजाला लागलेय, ते ह्या गर्दच्या व्यसनापेक्षा घातक आहे. त्यावर कोण आणि काय उपाय करणार? आता त्या आर. आर. पाटलांना गुन्हेगारी कमी करण्याऐवजी डान्स बार बंद करण्याचे काही पडले होते का? पण नाही, काय तर म्हणे तरूण पिढी बिघडते आणि डान्स बार मधे गुंडांचे सौदे होतात! आता डान्स बार बंद झाले तर मसाज पार्लरची टूम आहे. त्यामुळे सगळ्या beauty parlors ना "brothel" चे status द्या अशी एक नवी टूम निघते आहे. ह्या सगळ्या "संस्कृती" च्या नावाखाली होणार्या मूर्खपणाला कोणी आवर घालायचा? लोकांनाही रस्ते, वीज, पाणी, प्रदुषण, गरीबी, रोगराई, भ्रष्टाचार ह्यापेक्षा हे असले मूर्ख प्रश्न जास्त महत्वचे वाटतात हे समाजाच्या नाठाळपणाचे लक्षण आहे.
|
Yogy
| |
| Tuesday, March 06, 2007 - 8:14 am: |
| 
|
लालभाई, अमली पदार्थाची व्यसनाधीनता हा मूर्ख प्रश्न आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे का? इतर अमली पदार्थ व दारूच्या व्यसनाची तुलना करु नका. एखाद्या व्यक्तीने जर अमली पदार्थ घेतला तर तो व्यसनाधीन होण्याची शक्यता ही ९९ टक्के असते. दारूच्या बाबतीत ही शक्यता १९-२० टक्के आहे. जसा सामना वाचला तसा सकाळही वाचा आजचा. डान्स बारच्या प्रश्नावर त्यांनी टिप्पणी केली आहे. ती तुमची समजूत घालण्यास पुरेशी आहे. मात्र सनसनाटीबद्दलचा तुमचा मुद्दा योग्य आहे. शेरलॉक यांचं आज सर्व जगच Global Village बनत असताना पुणे, मुम्बई, नासिक, नागपुर या नावांना काय अर्थ उरला आहे? हे वाक्य वाचून धन्य झालो. एकंदर पुलं म्हणतात तसं सगळी शहरं ही साच्यातल्या गणपतीप्रमाणे एकसारखीच होणार (व आपला त्याबाबत काहीही आक्षेप नाही )
|
Zakasrao
| |
| Tuesday, March 06, 2007 - 8:43 am: |
| 
|
महेश आणी बी १००% अनुमोदन. बाकि ठिकाणी घडले तर वाइट वाटत नाही अस काही नाही. पण पुणे बाकी शहरांसारखे होत चाललेय म्हणुन जास्त वाइट वाटतय. जास्त शब्दावर लक्ष ठेवा.
|
Laalbhai
| |
| Tuesday, March 06, 2007 - 8:49 am: |
| 
|
yogy, तसे नव्हे, कोणताच प्रश्न महत्वचा किंवा कमी महत्वचा नसतो! आपण त्याला काय स्वरूप देतो, ह्यावरून त्याचे महत्व ठरते. कोणतेही "व्यसन" ही काही "यंत्रयुगाची" भेट नाही! मानवजातीत व्यसनाधिनता ही सुरवातीपासूनच होती. किंबहुना, उत्क्रांतीच्या प्रत्येक टप्प्यावर मानवाने जितकी अधिक प्रगती केली, तितके अधिक दुर्गुण त्याने ओढवून घेतले. त्यामुळे "व्यसनाधिनता" "चैन करणे" "बेजबाबदार वागणे" ह्या दुर्गुणांचा आणि बदलत्या काळाचा, संस्कृतीचा काही संबंध नाही. बेजबाबदार वागण्याचे मार्ग बदलतात, हाच एक फरक! अमली पदार्थ, चरस, गांजा ही व्यसने नवीन आहेत, असे कुणाचे म्हणणे आहे काय? किंवा त्याचा वापर वाढलाय, असे कुणी शास्त्रशुद्ध सर्वेक्षणाद्वारे सिद्ध करू शकते काय? अमली पदार्थांचे व्यसन घातक आणि चूक, हे खरेच. आणि पोलिसांनी केलेली कारवाई योग्य आहे, ह्यातही कोणाचे दुमत नसावे. वर्तमानपत्र ह्या सगळ्याला फाजिल प्रसिद्धी देत आहेत, असे माझे मत आहे. त्याचा राजकिय लाभ उठवला जाईलच! (बघा, "संघा"चे संस्कार असतील तर "असे" घडणार नाही, असे विधान आलेच. ) बाकी सकाळने जो काही दांभिकपणा सुरु केलाय त्याला तोड नाही! मागच्या महिन्यात सकाळने ऑर्कुट विरुद्ध अशीच मोहिम सुरु केली होती. कारण काय तर म्हणे ऑर्कुट वरून लैंगिक स्वैराचाराला आमंत्रण मिळते. हा दावा म्हणजे सकाळच्या संपादकांच्या मागासलेपणाचा उत्तम नमुना होता! वास्तवात, ऑर्कुट सुरु व्हायच्या कितीतरी आधी पासून Internet वर सेक्स कम्युनिटीज उपलब्ध आहेत. जाणकारांचे असे म्हणणे आहे की ६० टक्की Internet चा वापर "पोर्ण" साठी होतो. मग सकाळने "ऑर्कुट" वर जे काही चालते, ते छापून जावईशोध लावण्याचा आविर्भाव आणण्याचे कारण कळले नाही? हाही एक प्रसिद्धीचा आणि खप वाढवण्याचा मार्ग होता, असे माझे स्पष्ट मत आहे. दुर्दैवाने, सकाळसारखे "सोज्वळ" वर्तमानपत्रही त्यांच्या "सोज्वळ" प्रतिमेला बाजारात बसवायला शिकले. बदलत्या काळाचा हा सगळ्यात मोठा तोटा आहे. आता डान्स बारचे म्हणाल तर ते बंद करून काय साधले, ह्याचा ज्याने त्याने स्वतःने शोध घ्यावा. पण डान्स बार बंद केल्यावर मसाज पार्लर वाढले, हा काय निव्वळ योगायोग असू शकतो का? समाजातल्या दुष्प्रवृत्ती पूर्णतः नष्ट करणे, ही अशक्यातली बाब आहे. अमली पदार्थ, वेश्याव्यवसाय, बेजबाबदार वागणे हे मानवाच्या सुरवातीपासून चालू आहेत. प्रवृत्तीत कोणताही बदल नाही, मार्ग बदलताहेत. सरकारने इतकेच करावे की परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही, ह्याची काळजी घ्यावी. जरून पडल्यास ह्या दुष्प्रवृत्तींना स्खलनाचा योग्य तो कायदेशीर मार्ग उपलब्ध करून द्यावा. पण उगाच संस्कृती रक्षकाची भुमिका घेत मध्यमवर्गीयांची मते लाटण्याचा प्रयत्न करू नये, ह्याचे दूरगामी परिणाम होतात. वर्तमानपत्रांनी कसे वागावे, हे इतर कुणी सांगणे हा तर विनोदच आहे. पण उगाच काही झाले की "स्वैराचार" "तरुण पिढी बिघडली" असे नकारात्मक बोलू नये. अनेक तरुण मुलं अतिशय चांगली कामे करत आहेत. हे सार्वजनिक जीवनात नाहीत, ते व्यक्तीगत आयुष्यात शांत जीवन जगत आहेत. "अशा" पार्ट्यांच्या मार्गाने जाणारे प्रमाण कमी आहे. तेच तेच उगाळून आपण इतरांच्या मनात संभ्रम निर्माण करत आहोत, ह्याचेही भान वर्तमानप्त्रांना नसावे, ह्याचे वैषम्य वाटते! त्याऐवजी, आदिवासी, गोरगरीब ह्यांच्यात सर्वस्व झोकून देऊन काम करणारी उदाहरणे छापली तर? पुण्यात अनेक प्रयोगशाळा आहेत. त्यात आंतरराष्ट्रिय दर्जाचे शोध लागत असतात, त्याला प्रसिद्धी दिली तर? "समाज बिघडला" म्हणून बोंब मारण्यात काय अर्थ आहे? आणि ते काही मोठे बुद्धीमत्तेचे काम नाही. मी वरती अब्दुल कलांचे एक उदाहरण दिले ते ह्याच साठी. नकारात्मक विचार करण्याची प्रवृत्ती वाढते आहे. ही सगळी त्याचीच लक्षणे आहेत. असो. तुम्हाला हे सगळे पटेलच ह्याची खात्री नाही. किंवा मला काय म्हणायचे आहे, हे मलाही नीटसे सांगता येत नसावे. पण उगाच कोणत्याही गोष्टीचा "बागुलबुवा" उभा करण्याचे प्रस्थ, वर्तमानपत्रांपासून तथाकथित sacred विचारसरणींपर्यत झिरपले आहे (किंवा उलट्या मार्गाने!) ते ह्या डान्सबार, रेव्ह पार्ट्या, मसाज पार्लर ह्यापेक्षा जास्त घातक आहे, असे किमान माझे तरी मत आहे.
|
Mahesh
| |
| Tuesday, March 06, 2007 - 10:55 am: |
| 
|
लालभाई, तुम्ही म्हणता ते काही अंशी बरोबर आहे, पण संपुर्ण बरोबर नाही. समाजात वाईट गोष्टी रहाणारच हे मान्य आहे. पण त्यामुळे समाजावर दूरगामी वाईट परिणाम होत आहे का आणी होत असेल तर त्याला आळा घालणे ही त्या त्या काळातील राज्यव्यवस्थेची महत्वाची जबाबदारी आहे. डान्सबारवर बंदी घातली हे योग्यच आहे, खरेतर मिडिया मधे (दूरदर्शन, चित्रपट, ई.) जे अत्यंत दळभद्री प्रकार दाखवले जातात ते पण असेच बंद व्हायला पाहिजेत. त्यामुळे आजकाल तरूण पिढी व्यसने आणी अश्लिलता यामधे जास्त अडकत चालली आहे. याचे अनेक सामाजिक दुष्परिणाम आहेत. हे असले लोक समाजाला अत्यंत तापदायक बनत जातात. या मुद्द्याला जास्त प्रसिद्धी मिळण्याचे कारण ड्रग्ज हे आहे. आणी केला लोकांनी संस्कृती रक्षणाचा प्रयत्न तर बिघडले कुठे ड्रग्ज पेक्षा ते निश्चितच चांगले नाही का ? चांगल्या गोष्टी आहेतच समाजात त्याचा सर्वांना अभिमानही आहे, पण म्हणून या असल्या वाईट गोष्टी चालू द्यायच्या की काय ?
|
Tawaal
| |
| Tuesday, March 06, 2007 - 10:57 am: |
| 
|
लालभाऊला माझे २१ अनुमोदक!
|
मी मास कम्युनिकेशनच्या वर्गात असताना सगळ्या मैत्रिणीनी लोणावळ्याला ट्रिप काढली होती. सोबत त्याचे मित्रही होतेच. त्यावेळचा धांगडधिंगा आठवला की आता माझं मला आश्चर्य वाअटतं की मी कशी काय तिथे adjust झाले. ती माझी पहिली पार्टी. नंतर कामावर लागल्यावर तर Entertainment Reporter रोज एक पार्टी. रोज एक धांगडधिंगा.. कधी दिवसातून पाच पाच पार्टी attend केल्या आहेत. मी आणि किशन मूलचंदानी दोघंही एकमेकाना बघून "क्या स्कोअर है?" असंही विचारायचो. त्यातही rave party चं मला कुतूहल होतं. कारण याचे invites नसतात. कुणीही येऊ शकतो. आणि इथे glamor नावालादेखील नसतं. त्यामुळे या पार्टीज page 3 नसतात तर प्रायव्हेट असतात. अशी फ़क्त ३१ची पार्टी अटेंड केली. आईशप्पथ एवढी धमाल आयुष्यात कधी केली नसेल.. माझा रूल आहे No drugs, No booze and no Smoking त्यामुळे ड्रग्स वगैरे त्या पार्टीत होते की नाही माहित नाही. (मी थोडा वेळ माझी शोधपत्रकारिता बाजुला ठेवली होती) आजूबाजुचं वातावरण इतकं धुंद होतं की बास... कुणालाच उद्याची पर्वा नव्हती. जो तो या क्षणासाठी जगत होता.. काय पाप आणि काय पुण्य? कोण संस्क्रुती? डीजेचा कानठळ्या बसवणारं म्युझिक चालु होतं. कित्येक जण डान्सच्या नावाखाली अंग घुसळत होते. माझी एक मैत्रीण डान्सच्या आधी व्होडकाचा शॉट मारायची का तर डान्सला झिंग चढते. माझं क्लासिकल background असल्यामुळे नुसत्या म्युझिकने सुद्धा मला झिंग चढते. त्यामुळे मी पूर्ण रात्र डान्स फ़्लोअरवरच असते. हे सगळं मी लिहिलं कारण बर्याचदा आपण मस्ती मजा व्यसन आणि स्वैराचार यात गफ़लत करत आहोत. rave parties या एकदा किंवा दोनदा attend करणारे खूपजण आहेत. त्यानंतर त्याचा नाद सोडून दिला जातो. अशा एखाद दुसर्या पार्टीने संस्क्रुती डुबत नाही. आई वडीलाचे संस्कार जितके महत्वाचे आहेत त्यापेक्षा महत्वाचं आहे स्वत्:ला या संस्काराची जबाबदारी वाटणं. अशा गोष्टी प्रत्येक समाजात घडतात. रेषा ही जरी लक्ष्मणाने ओढळी तरी पाळायची की नाही हे प्रत्येकाने ठरवायचं आहे.
|
Tawaal
| |
| Tuesday, March 06, 2007 - 11:42 am: |
| 
|
वा भिडु, मान गये! कुठे गेला रे तो शेरलॉक? आता भांडा सौख्यभरे!
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|